॥ विष्णुपुराणम्
॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ चतुर्विंशोऽध्यायः ॥
“मुचुकुन्दाचे तपस्येसाठी प्रस्थान आणि बलरामाची ब्रज यात्रा"
श्रीपराशर उवाच
इत्थं स्तुतस्तदा तेन मुचुकुन्देन धीमता ।
प्राहेशः सर्वभूतानामनादिनिधनो हरिः ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले;- परम बुद्धिमान् राजा मुचुकुन्दाने अशाप्रकारे
स्तुति केल्यावर सर्व भूतांचे ईश्वर अनादिनिधन भगवान हरी म्हणाले ॥१॥
श्रीभगवानुवाच
यथाभिवाञ्छितान्दिव्यान्गच्छ लोकान्नराधिप ।
अव्याहतपरैश्वर्यो मत्प्रसादोपबृंहितः ॥ २ ॥
श्रीभगवान म्हणाले;- हे नरेश्वरा! तु आपल्या इच्छित दिव्य लोकात
जा; माझ्या कृपेने तुला अव्याहत परम ऐश्वर्य प्राप्त होईल ॥२॥
भुक्त्वा दिव्यन्महाभोगान्भविष्यसि महाकुले ।
जातिस्मरो मत्प्रसादात्ततोमोक्षमवाप्स्यसि ॥ ३ ॥
तिथे अत्यन्त दिव्य भोग भोगून शेवटी तु एका महान कुळात जन्म घेशील, त्यावेळी
तुला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण असेल आणि मग माझ्या कृपेने तु मोक्षपद प्राप्त करशील
॥३॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्तः प्रणिपत्येशं जगतामच्युतं नृपः ।
गुहामुखाद्विनिष्क्रान्ततः स ददर्शाल्पकान्नरान् ॥ ४ ॥
श्रीपराशर म्हणाले;- भगवंताने असे म्हटल्यावर राजा मुचुकुन्दाने जगदीश्वर श्रीअच्युताला
प्रणाम केला आणि आपल्या गुहेतून बाहेर येऊन पाहिले की लोक खूप छोटे छोटे झाले होते ॥ ४ ॥
ततः कलियुगं मत्वा प्राप्तं तप्तुं नृपस्तपः ।
नरनारायणस्थानं प्रययौ गन्धमादनम् ॥ ५ ॥
तेव्हा कलियुगाला वर्तमान समजून राजा तपस्येसाठी श्री नर नारायणाच्या स्थानी
गंधमादन पर्वतावर गेला ॥५॥
कृष्णोपि घातयित्वारिमुपायेन हि तद्बलम् ।
जग्राह मथुरामेत्य हस्त्यश्वस्यन्दनोज्ज्वलम्
॥ ६ ॥
आनीय चोग्रसेनाय द्वारवत्वां न्यवेदयत् ।
पराभिभवनिःशङ्कं बभूव च यदोः कुलम् ॥ ७ ॥
अशाप्रकारे कृष्णाने उपायपूर्वक शत्रुला नष्ट करून परत मथुरेत येऊन त्याची
हत्ती, घोडे आणि रथादिंनी सुशोभित सेना वशीभूत केली आणि ती सेना द्वारकेत नेऊन तिला
राजा उग्रसेनाला अर्पण केली. तेव्हापासून यदुवंश
शत्रुंच्या हल्ल्यापासून निःशंक झाले ॥ ६-७ ॥
बलदेवोऽपि मैत्रेय प्रशान्ताखिलविग्रहः ।
ज्ञातिदर्शनसोत्कण्ठः प्रययौ नन्दगोकुलम् ॥ ८ ॥
हे मैत्रेया! हा सम्पूर्ण विग्रह शांत झाल्यावर बलदेव आपल्या बान्धवांचे दर्शन
करण्याच्या उत्कंठेने नन्दाच्या गोकुळी गेले ॥ ८ ॥
ततो गोपाश्च गोपीश्च यथा पूर्वममित्रजित् ।
तथैवाभ्यवदत्प्रेम्णा बहुमानपुरःसरम् ॥ ९ ॥
तिथे पोचल्यावर शत्रुजित् बलभद्राने गोप आणि गोपिंना पुर्वीसारखेच आदर व प्रेमाने
अभिवादन केले ॥ ९ ॥
स कैश्चित् सम्परिष्वक्तः कांश्चिच्च परिषस्वजे ।
हास्यं चक्रे समं कैश्चिद्गोपैर्गोपीजनैस्तथा ॥ १० ॥
कोणी त्यांना आलिङ्गन दिले तर कोणाला त्यांनी मीठी मारली तसेच काही गोप गोपींसह
त्यांनी हसतहसत गप्पा मारल्या ॥ १०॥
प्रियाण्यनेकान्यवदन् गोपास्तत्र हलायुधम् ।
गोप्यश्च प्रेमकुपिताः प्रोचुःसेर्ष्यमथापराः ॥ ११ ॥
काही गोपी कौतुकाने, काही कृतककोपाने त्यांच्याशी बोलल्या तर काहींनी उपालम्भयुक्त
गोष्टी केल्या ॥ ११ ॥
गोप्यः पप्रच्छुरपरा नागरीजनवल्लभः ।
कच्चिदास्ते सुखं कृष्णश्चलप्रेमलवात्मकः ॥ १२ ॥
अन्य काही गोपींनी विचारले;- चञ्चल आणि अल्प प्रेम करणं हाच ज्याचा स्वभाव
आहे, तो नगर-नारींचा प्राणाधार कृष्ण आनंदात आहे ना ? ॥ १२ ॥
अस्मच्चेष्टामपहसन्न कच्चित्पुरयोषिताम् ।
सौभाग्यमानमधिकं करोति क्षणसौहृदः ॥ १३ ॥
तो 'क्षणिक स्नेह ठेवणारा नन्दनन्दन आमच्या वागण्याचा उपहास करत नगरातील महिलांच्या
सौभाग्याचा मान वाढवतो का? ॥ १३ ॥
कच्चित्स्मरति नः कृष्णो गीतानुगमनं कलम् ।
अप्यसौ मातरं द्रष्टु सकृदप्यागमिष्यति ॥ १४
॥
कृष्णाला आमच्या गीतानुयायी मनोहर स्वराचे स्मरण होते का? एकदातरी आपल्या मातेला
बघायला ते इथे येणार का? ॥ १४ ॥
अथवा किं तदालापैः क्रियन्तामपराः कथाः ।
यस्यास्मभिर्विना तेन विनास्माकं भविष्यति
॥ १५ ॥
नाहीतरी आता त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला काय फायदा, काहीतरी दुसरं बोलुया. आमच्याशिवाय ते निभावत आहेत तर आम्हीसुद्धा त्यांच्याशिवाय निभावू शकतो ॥
१५ ॥
पिता माता तथा भ्राता भर्ता बन्धुजनश्च किम्
।
सन्त्यक्तस्तत्कृतेस्माभिरकृतज्ञध्वजो हि सः
॥ १६ ॥
माता, पिता, बन्धु, पति आणि कुटुम्बातील लोकांचं काय? आम्ही तर त्याच्यासाठी
सर्वांनाच सोडलं, पण तो फार मोठा अकृतज्ञ निघाला ॥ १६ ॥
तथापि कच्चिदालापमिहागमनसंश्रयम् ।
करोति कृष्णो वक्तव्यं भवता राम नानृतम् ॥
१७ ॥
पण बलरामा! खरं सांग कृष्ण कधी इकडे येण्याविषयी काही बोलतो का? ॥ १७ ॥
दामोदरोऽसौ गोविन्दः पुरस्त्रीसक्तमानसः ।
अपेतप्रीतिरस्मासु दुर्दर्शः प्रतिभाति नः
॥ १८ ॥
आम्हाला वाटते की दामोदर कृष्णाचे चित्त नागरी नारींमध्येच गुंतलं आहे; आमच्या
विषयी आता त्यांच्या मनात जराही प्रेम नाही, म्हणून आम्हाला आता त्यांचं दर्शन होणं
दुर्लभच आहे ॥ १८ ॥
श्रीपराशर उवाच आमन्त्रितश्च कृष्णेति पुनर्दामोदरेति
च ।
जहसुःसस्वरं गोप्यो हरिणा हृतचेतसः ॥ १९ ॥
श्रीपराशर म्हणाले;- त्यानंतर श्रीहरिने ज्यांच्या चित्ताचे हरण केले होते
त्या गोपिका बलरामालाच कृष्ण आणि दामोदर म्हणून सम्बोधू लागल्या आणि मोठमोठ्याने हसू लागल्या ॥ १९ ॥
सन्देशैः साममधुरैः प्रेमगर्भैरगर्वितैः ।
रामेणाश्वासिता गोप्यः कृष्णस्यातिमनोहरैः
॥ २० ॥
तेव्हा बलभद्राने कृष्णाचा अति मनोहर शान्तिमय, प्रेमगर्भित आणि गर्वहीन सन्देश
सांगून गोपिकांचे सांत्वन केले ॥ २०॥
गोपैश्च पूर्ववद्रामः परिहासमनोहराः ।
कथाश्चकार रेमे च सह तैर्व्रजभूमिषु ॥ २१ ॥
तसेच गोपांसोबत हसतखेळत आधीसारख्याच खूप छानछान गप्पा मारल्या, आणि ब्रजभूमित
त्यांच्या बरोबर नाना प्रकारच्या लीला केल्या ॥ २१ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे
पञ्चमे
अंशे चतुर्विंशोध्यायः
(२४)
॥ विष्णुपुराणम्
॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ पञ्चविंशोऽध्यायः ॥
"बलभद्राचा व्रज-विहार व यमुनाकर्षण"
श्रीपराशर उवाच
वने विचरतस्तस्य सह गोपैर्महात्मनः ।
मानुषच्छद्मरूपस्य शेषस्य धरणीधृतः ॥ १ ॥
निष्पादितोरुकार्यस्य कार्येणोर्वीप्रचारिणः ।
उपभोगार्थमत्यर्थं वरुणः प्राह वारुणीम् ॥ २ ॥
श्रीपराशर म्हणाले;- आपल्या कार्यांनी पृथ्वी विचलित करणार्या, विकट कार्य
करणार्या, धरणीधर शेषावतार मायामानवरूप महात्मा बलरामाला गोपांसह वनात विचरण करताना
पाहून त्यांच्या उपभोगासाठी वरुणने वारुणीला (मदिरा) म्हटले-॥ १-२ ॥
अभीष्टा सर्वदा यस्य मदिरे त्वं महौजसः ।
अनन्तस्योपभोगाय तस्य गच्छ मुदे शुभे ॥ ३ ॥
हे मदिरे! ह्या महाबलशाली अनन्त देवाला तु सर्वदा प्रिय हो; हे शुभे! तु त्यांच्या
उपभोग व प्रसन्नतेसाठी जा". ॥ ३
॥
इत्युक्ता वारुणी तेन सन्निधानमथाकरोत् ।
वृन्दावनसमुत्पन्नकदम्बतरुकोटरे ॥ ४ ॥
वरुणाची अशी आज्ञा झाल्यावर वारुणी वृन्दावनात उत्पन्न झालेल्या कदम्ब वृक्षाच्या
कोटरात राहू लागली ॥ ४ ॥
विचरन् बलदेवोऽपि मदिरागन्धमुत्तमम् ।
आघ्राय मदिरातर्षमवापाथ वराननः ॥ ५ ॥
तेव्हा मनोहर मुख असलेल्या बलदेवाला वनात विचरण करताना मदिरेचा अति उत्तम गंध
आल्याने तिला प्यायची इच्छा झाली ॥ ५ ॥
ततः कदम्बात्सहसामद्यधारां स लाङ्गली ।
पतन्तीं वीक्ष्य मैत्रेय प्रययौ परमां मुदम् ॥ ६ ॥
हे मैत्रेया! त्याचवेळी कदम्बातून मद्याची धार गळताना पाहून हलधारी बलराम प्रसन्न
झाले ॥६॥
पपौ च गोपगोपीभिः समुपेतो मुदान्वितः ।
प्रगीयमानो ललीतं गीतवाद्यविशारदैः ॥ ७ ॥
तसेच नृत्यगायनात कुशल गोप आणि गोपींसह मधुर स्वरात गायन करत त्यांनी त्यांच्यासोबत
प्रसन्नतापूर्वक मद्यपान केले ॥ ७ ॥
स मत्तोत्यन्तघर्माम्भः कणिकामौक्तिकोज्ज्वलः ।
आगच्छ यमुने स्नातुमिच्छामीत्याह विह्वलः ॥ ८ ॥
त्यानंतर अत्यन्त घामाघूम झाल्याने स्वेद-बिन्दुरूप मोत्यांनी सुशोभित मदोन्मत्त
बलरामाने विह्वल होऊन म्हटले -"यमुने! ये, मी स्नान करू इच्छितो" ॥ ८॥
तस्य वाचं नदी सा तु मत्तोक्तामवमत्य वै ।
नाजगाम ततः क्त्रुद्धो हलं जग्राह लाङ्गली ॥ ९ ॥
त्याचे बोलणे म्हणजे उन्मत्तपणाचा प्रलाप असे समजून यमुनेने दुर्लक्ष केले
आणि ती तिथे आली नाही. ह्यावर चिडून हलधराने क्रोधित होऊन
आपला हल उचलला ॥ ९॥
गृहीत्वा तां हलान्तेन चकर्ष मदविह्वलः ।
पापे नायासि नायासि गम्यतामिच्छयान्यतः ॥ १०
॥
आणि मदाने विह्वल होऊन यमुनेचे टोक हलकेच पकडून तिला खेचत म्हटले ---
"अगं पापिणी! तू येतच नव्हतीच! अच्छा, आता आपल्या इच्छेनुसार अन्यत्र जाऊनच दाखव
" ॥ १०॥
साकृष्टा सहसा तेन मार्गं सन्त्यज्य निम्नगा
।
यत्रास्ते बलभद्रोऽसौ प्लावयामास तद्वनम् ॥
११ ॥
अशा प्रकारे बलरामाने खेचल्यावर यमुनेने अकस्मात् आपला मार्ग सोडला आणि ज्या
वनात बलराम उभे होते त्या जागेला आप्लावित केले ॥ ११॥
शरीरिणी तदाभ्येत्य त्रासविह्वललोचना ।
प्रसीदेत्यब्रवीद्रामं मुञ्च मां मुसलायुध
॥ १२ ॥
तेव्हा ती शरीर धारण करून बलरामाजवळ आली आणि भयाने डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली
“हे मुसलायुधा! आपण प्रसन्न व्हा आणि मला सोडा" ॥ १२ ॥
ततस्तस्याः सुवचनमाकर्ण्य स हलायुधः ।
सोऽब्रवीदवजानासि मम शौर्यबले नदि ।
सोऽहं त्वां हलपातेन नयिष्यामि सहस्रधा ॥ १३
॥
तिची मधुर वचने ऐकून हलायुध बलभद्र म्हणाले-"अगं नदी! तू माझ्या बल-वीर्याची
अवज्ञा करतेस का? बघ ह्या हलाने मी आता तुझे हजार तुकडे करून टाकेन ॥ १३ ॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्तयातिसन्त्रासात्तया नद्य प्रसादितः ।
भूभागे प्लाविते तस्मिन्मुमोच यमुनां बलः ॥ १४ ॥
श्रीपराशर म्हणाले;- बलरामाने असे सांगितल्यावर भयभीत होऊन यमुना त्या भू भागात
वाहू लागल्यावर त्यांनी प्रसन्न होऊन तिला सोडून दिले ॥ १४ ॥
ततः स्नातस्य वै कान्तिरजायत महात्मनः ॥ १५
॥
अवतंसोत्पलं चारु गृहीत्वैकं च कुण्डलम् ।
वरुणप्रहितां चास्मै मालामम्लानपङ्कजाम् ।
समुद्राभे तथा वस्त्रे नीले लक्ष्मीरयच्छत
॥ १६ ॥
त्यावेळी स्नान केल्यावर महात्मा बलराम अत्यन्त शोभित झाले. तेव्हा लक्ष्मीने सशरीर प्रकट होऊन त्यांना एक सुन्दर कर्णफूल, एक कुण्डल,
एक वरुणाने पाठवलेली कधीच न कोमेजणारी कमलपुष्पांची माळ आणि दोन समुद्रासारख्या कान्तीचे
नीलवर्ण वस्त्र दिली ॥ १५-१६॥
कृतावतंसः स तदा चारुकुंडलभूषितः ।
नीलाम्बरधरःस्रग्वी शुशुभे कान्तिसंयुतः ॥
१७ ॥
ते कर्णफूल, सुंदर कुण्डल, नीलाम्बर आणि पुष्प- माला धारण करून बलराम अतिशय
कान्तियुक्त होऊन सुशोभित झाले ॥ १७ ॥
इत्थं विभूषितो रेमे तत्र रामस्तथा व्रजे ।
मासद्वयेन यातश्च स पुनर्द्वारकां पुरीम् ॥
१८ ॥
अशा प्रकारे विभूषित होऊन बलभद्राने ब्रजात अनेक लीला केल्या व नंतर दोन महिन्यांनी
द्वारकापुरीला परतले ॥ १८॥
रेवतीं नाम तनयां रैवतस्य महीपतेः ।
उपयेमे बलस्तस्यां जज्ञाते निशितोल्मुकौ ॥
१९ ॥
तिथे येऊन बलदेवाने राजा रैवताची पुत्री रेवतीशी विवाह केला; तिच्यापासून त्यांना
निशठ आणि उल्मुक नामक दोन पुत्र झाले ॥ १९ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे
पञ्चमे
अंशे पञ्चविंशोध्यायः
(२५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा