॥
विष्णुपुराणम् ॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ द्वाविंशोऽध्यायः
॥
"जरासंधाचा
पराजय"
श्रीपराशर उवाच
जरासन्धमुते कंस उपयेमे महाबलः ।
अस्तिं प्राप्तिं च मैत्रेय तयोर्भर्तृहणं हरिम् ॥ १ ॥
महा बलपरीवारो मगधाधिपतिर्बली ।
हन्तुमभ्याययौ कोपाज्जरासन्धः सयादवम् ॥ २ ॥
श्रीपराशर म्हणाले;- हे
मैत्रेया! महाबली कंसाने जरासन्धाच्या मुली अस्ति आणि प्राप्ति ह्यांच्याशी विवाह केला
होता, म्हणून तो अत्यन्त बलिष्ठ मगधराज क्रोधपूर्वक एक फार मोठी सेना घेऊन आपल्या मुलींचे
पती कंस ह्याला मारणार्या श्रीहरिला यादवां सहित मारण्याच्या इच्छेने मथुरेवर हल्ला
केला ॥ १-२॥
उपेत्य मथुरां सोऽथ रुरोध मगधेश्वरः ।
अक्षौहिणीभिः सैन्यस्य त्रयोविंशतिभिर्वृतः
॥ ३ ॥
मगधेश्वर जरासंधाने तेवीस
अक्षौहिणी सेने सहित येऊन मथुरेला चारही बाजूंनी घेरले ॥ ३ ॥
निष्क्रम्याल्पपरीवारावुभौ रामजनार्दनौ ।
युयुधाते समं तस्य बलिनौ बलिसैनिकैः ॥ ४ ॥
तेव्हा महाबली राम आणि
जनार्दन थोड्याशा सेनेसह नगरातून निघून जरासन्धाच्या प्रबळ सैनिकांसोबत युद्ध करू लागले
॥ ४ ॥
ततो रामश्च कृष्णश्च मतिं चक्रतुरञ्जसा ।
आयुधानां पुराणानामादाने मुनिसत्तम ॥ ५ ॥
हे मुनिश्रेष्ठा! तेव्हा
राम आणि कृष्णाने आपली पुरातन शस्त्र ग्रहण करण्याचे ठरवले ॥५॥
अनन्तरं हरेः शार्ङ्गं तूणौ चाक्षयसायकौ ।
आकाशादागतौ विप्र तथा कौमोदकी गदा ॥ ६ ॥
हे विप्रा! हरिने स्मरण
करताच त्यांचे शार्ङ्गधनुष्य, अक्षय बाण असलेले दोन भाते आणि कौमोदकी नावाची गदा आकाशातून
त्यांच्या पूढे उपस्थित झाली ॥ ६ ॥
हलं च बलभद्रस्य गगनादागतं महत् ।
मनसोऽभिमतं विप्र सानन्दं मुसलं तथा ॥ ७ ॥
हे द्विजा! बलभद्राजवळ
सुद्धा त्यांचे मनोवांछित महान हल आणि सुनन्द नावाचे मूसळ आकाशातून आले ॥७॥
ततो युद्धे पराजित्य ससैन्यं
सगधाधिपम् ।
पुरीं विविशतुर्वीरावुभौ रामजनार्दनौ ॥ ८ ॥
त्यानंतर दोन्ही वीर राम
आणि कृष्ण सेनेसह मगधराजाला युद्धात हरवून मथुरापुरीत परतले ॥ ८ ॥
जिते तस्मिन्सुदुर्वृत्ते जरासन्धे महामुने
।
जीवमाने गते कृष्णस्तेनामन्यत नाजितम् ॥ ९
॥
हे महामुने! दुराचारी
जरासंधाला जिंकूनही तो जिवंत परत गेल्याने कृष्णाने स्वतःला अपराजित मानले नाही ॥ ९
॥
पुनरप्याजगामाथ जरासन्धो बलान्वितः ।
जितश्च रामकृष्णाभ्यामपक्रान्तो द्विजोत्तम
॥ १० ॥
हे द्विजोत्तमा! जरासन्ध
परत तितकीच सेना घेऊन आला, पण राम व कृष्णाकडून पराजित होऊन पळून गेला ॥ १० ॥
दश चाष्टौ च सङ्ग्रमानेवमत्यन्तदुर्मदः ।
यदुभिर् मागधो राजा चक्रे कृष्णपुरोगमैः ॥
११ ॥
अशाप्रकारे अत्यन्त दुर्धर्ष
मगधराज जरासन्धाने राम व कृष्ण आदि यादवांशी अठरावेळा युद्ध केले ॥ ११ ।।
सर्वेष्वेतेषु युद्धेषु यादवैः स पराजितः ।
अपक्रान्तो जरासन्धःस्वल्पसैन्यैर्बलाधिकः
॥ १२ ॥
ह्या सर्व युद्धांमध्ये
अधिक सैन्यशाली जरासन्ध थोडीशी सेना असलेल्या यदुवंशींकडून पराजित होऊन पळून गेला
|। १२ ।।
न तद्बलं यादवानां विजितं यदनेकशः ।
तत्तु संनिधिमाहात्म्यं विष्णोरंशस्य चक्रिणः ॥ १३ ॥
यादवांची थोडीशी सेनासुद्धा
पराजित झाली नाही, हे सर्व विष्णुचे अंशावतार असलेल्या श्रीकृष्णाच्या सान्निध्याचे
माहात्म्य होते ॥१३॥
मनुष्यधर्मशीलस्य लीला सा जगतीपतेः ।
अस्त्राण्यनेकरूपाणि यदरातिषु मुञ्चति ॥ १४ ॥
त्या मानव धर्मशील जगत्पतिची
ही लीलाच आहे की आपल्या शत्रुंवर ते नाना प्रकारची अस्त्र-शस्त्र सोडतात ॥ १४ ॥
मनसैव जगत्सृष्टिं संहारं च करोति यः ।
तस्यापिपक्षक्षपणे कियानुद्यमविस्तरः ॥ १५
॥
जे केवळ संकल्पमात्रानेच
संसाराची उत्पत्ति आणि संहार करतात त्यांना आपल्या शत्रुपक्षाचा नाश करण्यासाठी इतका
उपद्व्याप करायची गरजच काय? ॥ १५ ॥
तथापि यो मनुष्याणां धर्मस्तमनुवर्तते ।
कुर्वन्बलवता सन्धिं हीनैर्युद्धं करोत्यसौ
॥ १६ ॥
तरी ते बलवानांशी सन्धि
आणि बलहीनांशी युद्ध करून मानव-धर्माचे अनुवर्तन करतात ॥ १६ ॥
साम चोपप्रदानं च तथा भेदं च दर्शयन् ।
करोति दण्डपातं च क्वचिदेव पलायनम् ॥ १७ ॥
कधी ते साम, तर कधी दान
आणि कधी भेद नीतिचा व्यवहार करतात तसेच कधी दंड देतात आणि कधी स्वतः पळूनही जातात ॥
१७॥
मनुष्यदेहिनां चेष्टामित्येवमनुवर्तते ।
लीला जगत्पतेस्तस्यच्छन्दतः परिवर्तते ॥ १८
॥
अशाप्रकारे मानवदेहधारीं
सारखे वर्तन करत जगत्पतिंची आपल्या इच्छेनुसार लीला होत होती ॥ १८ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे
पञ्चमे
अंशे द्वाविंशोऽध्यायः
(२२)
॥
विष्णुपुराणम् ॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ त्रयोविंशोऽध्यायः
॥
"द्वारका-दुर्गाची
रचना, कालयवनाचे भस्मसात होणे तसेच मुचुकुन्द कृत भगवत्स्तुति"
श्रीपराशर उवाच
गार्ग्यं गोष्ठ्यां द्विजं श्यालष्षण्ढ इत्युक्तवान्द्विज ।
यदूनां सन्निधौ सर्वे जहसुर्यादवास्तदा ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले;- हे द्विजा! एकदा महर्षि गार्ग्यना त्यांच्या मेव्हण्याने यादवांच्या
गप्पा चालल्या असताना नपुंसक म्हटले तेव्हा सर्व यदुवंशी हसले ॥ १ ॥
ततः कोपपरीतात्मा दक्षिणापथमेत्य सः ।
सुतमिच्छंस्तपस्तेपे यदुचक्रभयावहम् ॥ २ ॥
तेव्हा गार्ग्य अत्यन्त
कुपित होऊन दक्षिण-समुद्राच्या तटावर गेले आणि त्यांनी यादवसेनेला भयभीत करणार्या
पुत्राच्या प्राप्तीसाठी तपस्या केली ॥ २ ॥
आराधयन्महादेवं लोहचूर्णमभक्षयत्
।
ददौ वरं च तुष्टोऽस्मै वर्षे तु द्वादशे हरः ॥ ३ ॥
त्यांनी श्री महादेवाची
उपासना करत केवल लोहचूर्ण भक्षण केले. तेव्हा भगवान शंकराने
बाराव्या वर्षी प्रसन्न होऊन त्यांना अभीष्ट वर दिला ॥३॥
सन्तोषयामास च तं यवनेशो ह्यनात्मजः ।
तद्योषित्सङ्गमाच्चास्य पुत्रोऽभूदलिसन्निभः
॥ ४ ॥
एका पुत्रहीन यवनराजाने
महर्षि गार्ग्यंची अत्यन्त सेवाकरून त्यांना सन्तुष्ट केले, त्याच्या स्त्रीच्या संगापासूनच
त्यांना एक भोवर्या सारखा काळा पुत्र झाला ॥ ४ ॥
तं कालयवनं नाम राज्ये स्वे यवनेश्वरः ।
अभिषिच्य वनं यातो वज्रग्रकठिनोरसम् ॥ ५ ॥
तो यवनराज वज्रासमान कठोर
वक्षस्थल असलेल्या त्या कालयवन नामक बाळाला, राज्यपदावर अभिषिक्त करून वनात निघून गेला
॥ ५ ॥
स तु वीर्यमदोन्मत्तः पृथिव्यां बलिनो नृपान्
।
अपृच्छन्नारदस्तस्मै कथयामास यादवान् ॥ ६ ॥
त्यानंतर वीर्यमदोन्मत्त
कालयवनाने नारदाला विचारले की पृथ्वीवर कोण कोण बलवान राजा आहेत? ह्यावर नारदाने त्याला
यादवां विषयी सांगितले ॥६॥
म्लेच्छकोटिसहस्राणां सहस्रैः सोऽभिसंवृतः
।
गजाश्वरथसम्पन्नैश्चकार परमोद्यमम् ॥ ७ ॥
ते ऐकून कालयवनाने हजारों
हत्ती, घोडे आणि रथासह सहस्र करोड़ म्लेच्छ सेना सोबत घेऊन तयारी केली ॥ ७ ॥
प्रययौ सोऽव्यवच्छिन्नं छिन्नयानो दिनेदिने
।
यादवान्प्रति सामर्षो मैत्रेय मथुरां पुरीम्
॥ ८ ॥
आणि यादवां प्रति क्रोधीत
होऊन दररोज थकलेल्या हत्ती, घोडे आदिंना मागे सोडून अखंडपणे चालत मथुरापुरीवर हल्ला
केला ॥८॥
कृष्णोऽपि चिन्तयामास क्षपितं यादवं बलम् ।
यवनेन रणे गम्यं मागधस्य भविष्यति ॥ ९ ॥
हे पाहून श्रीकृष्णाने
विचार केला-"यवनांसोबत युद्ध करून क्षीण झालेली यादवसेना अवश्य मगध नरेशाकडून
पराजित होईल ॥ ९ ॥
मागधस्य बलं क्षीणं स कालयवनो बली ।
हन्तैतदेवमायातं यदूनां व्यसनं द्विधा ॥ १०
॥
आणि जर आधी मगध नरेशासोबत
लढले तरी त्यामुळे क्षीण झालेल्या यादवसेनेला बलवान कालयवन नष्ट करेल. अशाप्रकारे यादवांवर
एकाच वेळी दोन संकटं आली आहेत ॥ १० ॥
तस्माद्दुर्गं करिष्यामि यदूनामरिदुर्जयम्
।
स्त्रियोऽपि यत्र युद्धेयुः किं पुनर्वृष्णिपुङ्गवाः
॥ ११ ॥
म्हणून मी यादवांसाठी
एक असा दुर्जय दुर्ग तयार करतो ज्यात बसून वृष्णि श्रेष्ठ यादव सोडाच पण स्त्रिया सुद्धा
युद्ध करू शकतील ॥ ११ ॥
मयि मत्ते प्रमत्ते वा सुप्ते प्रवसितेऽपि वा ।
यादवाभिभवं दुष्टा मा कुर्वन्त्वरयोऽधिकाः ॥ १२ ॥
त्या दुर्गात राहील्यावर जरी मी मत्त, प्रमत्त असावधान, झोपलेला किंवा बाहेर जरी गेलेला असलो तरी जास्तीत जास्त दुष्ट शत्रुगण सुद्धा यादवांना पराभूत करू शकणार नाहीत" ॥ १२ ॥
इति सञ्चिन्त्य गोविन्दो योजनानां महोदधिम्
।
ययाचे द्वादशपुरीं द्वारकां तत्र निर्ममे ॥
१३ ॥
असा विचार करू श्रीगोविंदाने
समुद्राकडे बारा योजन भूमि मागितली आणि तिथे द्वारकापुरी निर्माण केली ॥ १३ ॥
महोद्यानां महावप्रां
तटाकशतशोभिताम् ।
प्रासादगृहसम्बाधामिन्द्रस्येवामरावतीम् ॥ १४ ॥
जी इन्द्राच्या अमरावती
पुरी सारखी महान उद्यान, खोल दर्या, शेकडो सरोवर तसेच अनेक महलांनी सुशोभित होती ॥
१४ ॥
मथुरावासिनं लोकं तत्रानीय जनार्दनः ।
आसन्ने कालयवने मथुरां च स्वयं ययौ ॥ १५ ॥
कालयवन जवळ आल्यावर श्रीजनार्दन
सर्व मथुरा निवासिंना द्वारकेत घेऊन गेले आणि मग स्वतः मथुरेला परतले ॥ १५ ॥
बहिरावासिते सैन्ये मथुराया निरायुधः ।
निर्जगाम च गोविन्दो ददर्श यवनश्च तम् ॥ १६
॥
जेव्हा कालयवनाच्या सेनेने मथुरेला घेरले तेव्हा श्रीकृष्ण शस्त्र घेतल्याशिवाय मथुरेतून बाहेर आले. यवनराज कालयवनाने त्यांना पाहीले ।।१६।।
स ज्ञात्वा वासुदेवं तं बाहुप्रहरणं नृपः ।
अनुयातो महायोगी चेतोभिः प्राप्यते न यः ॥
१७ ॥
महायोगीश्वरांचे चित्त सुद्धा ज्यांना प्राप्त करू शकत नाही त्या वासुदेवाला केवळ बाहुरूपी शस्त्राने युक्त म्हणजेच कोणत्याही शस्त्राशिवाय तो त्यांच्या मागे धावला ॥ १७ ॥
तेनानुयातः कृष्णोऽपि प्रविवेश महागुहाम् ।
यत्र शेते महावीर्यो मुचुकुन्दो नरेश्वरः ॥ १८ ॥
कालयवनाला आपला पाठलाग
करताना बघून महावीर्यशाली राजा मुचुकुन्द झोपलेल्या महागुहेत श्रीकृष्ण घुसला ॥ १८
॥
सोऽपि प्रविष्टो यवनो दृष्ट्वा शय्यागतं नृपम् ।
पादेन ताडयामास मत्वा कृष्णं सुदुर्मतिः ॥ १९ ॥
त्या दुर्मति यवनाने सुद्धा
गुहेत गेल्यावर झोपलेल्या राजालाच कृष्ण समजून त्याला लाथ मारली ।। १९ ॥
उत्थाय मुचुकुन्दोऽपि ददर्श यवनं नृपः ॥ २० ॥
दृष्टमात्रश्च तेनासौ जज्वाल यवनोग्निना ।
तत्क्रोधजेन मैत्रेय भस्मीभूतश्च तत्क्षणात् ॥ २१ ॥
लाथ मारताच राजा मुचुकुन्दाने
उठून त्या यवनराजाकडे पाहीले. हे मैत्रेया! त्याने
असे बघताच तो यवन त्याच्या क्रोधाग्नि मुळे जळून तात्काळ भस्मसात झाला । २०-२१ ।।
स हि देवासुरे युद्धे गतो हत्वा महासुरान्
।
निद्रार्तः सुमहाकालं निद्रां वव्रे वरं सुरान्
॥ २२ ॥
पूर्वकाळी राजा मुचुकुंद
देवतांच्या बाजूने देवासुर संग्रामात लढायला गेला होता. असुरांना
मारल्यानंतर त्याला प्रचंड झोप आल्याने त्याने देवतांकडे खूप वर्षांपर्यंत झोपण्याचा
वर मागितला होता ॥ २२ ॥
प्रोक्तश्च देवैः संसुप्तं यस्त्वामुत्थापयिष्यति
।
देहजेनाग्निना सद्यः स तु भस्मीभविष्यति ॥
२३ ॥
तेव्हा देवतांनी त्याला
सांगितले तू झोपलेला असताना जो कोणी तुला जागे करेल तो तत्क्षणी आपल्या शरीरातून उत्पन्न
झालेल्या अग्निमुळे जळून भस्म होईल ॥ २३ ॥
एवं दग्ध्वा स तं पापं दृष्ट्वा च मधुसूदनम्
।
कस्त्वमित्याह सोऽप्याह जातोहं शशिनः कुले
।
वसुदेवस्य तनयो यदोर्वंशसमुद्भवः ॥ २४ ॥
मुचुकुन्दोऽपि तत्रासौ वृद्धगार्ग्यवचोऽस्मरत्
॥ २५ ॥
अशा प्रकारे पापी कालयवन
दग्ध झाल्यावर राजा मुचुकुन्दाने श्रीमधुसूदनाला पाहून विचारले 'तू कोण आहेस?' तेव्हा
भगवंताने सांगितले- 'मी चन्द्रवंशी यदुकुळात वसुदेवाच्या पुत्र रूपात उत्पन्न झालो
आहे" तेव्हा मुचुकुन्दाला वृद्ध गार्ग्य मुनिंच्या वचनांचे स्मरण झाले ।॥ २४-२५
॥
संस्मृत्य प्रणिपत्यैनं सर्वं सर्वेश्वरं हरिम् ।
प्राह ज्ञातो भवान्विष्णोरंशस्त्वं परमेश्वर ॥ २६ ॥
त्यांचे स्मरण होताच त्याने
सर्वरूप सर्वेश्वर हरिला प्रणाम करून म्हटले - "हे परमेश्वरा! मी तुम्हाला ओळखले;
आपण साक्षात भगवान विष्णुचा अंश आहात ॥ २६ ॥
पुरा गार्ग्येण कथितमष्टाविंशतिमे युगे ।
द्वापरान्ते हरेर्जन्म यदुवंशे भविष्यति ॥
२७ ॥
पूर्वकाळी गार्ग्य मुनिंनी
सांगितले होते की अट्ठाविसाव्या द्वापरयुगाच्या शेवटी यदुकुळात श्रीहरिचा जन्म होणार
॥२७॥
स त्वं प्राप्तो न सन्देहो मर्त्यानामुपकारकृत् तथाहि सुमहत्तेजो नालं सोढुमहं तव॥ २८ ॥
निस्संदेह आपण भगवान विष्णुचा
अंश आहात आणि मनुष्यांच्या उपकारासाठीच अवतीर्ण झाला आहात तरी मी आपले महान तेज सहन
करण्यास समर्थ नाही ॥२८॥
तथाहि सजलाम्भोदनादधीरतरं तव ।
वाक्यं नमति चैवोर्वी युष्मत्पादप्रपीडिता ॥ २९ ॥
हे भगवंता! आपला आवाज
सजल मेघाच्या घोर गर्जनेसारखा अति गम्भीर आहे म्हणून आपल्या चरणांनी पीडीत होऊन पृथ्वी
वाकली आहे ।। २९ ।।
देवासुरमहायुद्धे दैत्यसैन्यमहाभटाः ।
न सेहुर्मम ते जस्ते त्वत्तेजो न सहाम्यहम्
॥ ३० ॥
हे देवा! देवासुर-महासंग्रामात
दैत्य-सेनेतील मोठमोठे योद्धागण सुद्धा माझे तेज सहन करू शकले नाहीत आणि मी आपले तेज
सहन करू शकत नाही ॥ ३०॥
संसारपतितस्यैको जन्तोस्त्वं शरणं परम् ।
प्रसीद त्वं प्रपन्नार्तिहर नाशय मेऽशुभम्
॥ ३१ ॥
विश्वातील पतित जीवांचे
एकमात्र आपणच परम आश्रय आहात. हे शरणागतांचे दु:ख
दूर करणार्या! आपण प्रसन्न व्हा आणि माझे अमंगल नष्ट करा ॥ ३१ ॥
त्वं पयो निधयः शैलसरितस्त्वं वनानि च ।
मेदिनी गगनं वायुरापोग्निस्त्वं तथा मनः ॥
३२ ॥
आपणच समुद्र आहात, आपणच
पर्वत आहात, आपणच नद्या आहात आणि आपणच वन आहात तसेच आपणच ही पृथ्वी, आकाश, वायु, जल,
अग्नि आणि मन आहात ॥ ३२ ॥
बुद्धिरव्याकृतप्राणाः प्राणेशस्त्वं तथा पुमान्
।
पुंसः परतरं यच्च व्याप्य जन्म विकारवत् ॥
३३ ॥
आपणच ही बुद्धि, अव्याकृत,
प्राण आणि प्राणांचा अधिष्ठाता पुरुष आहात; तसेच पुरुषाच्याही पलीकडे असलेले जे व्यापक
आणि जन्म व विकारापासून शून्य तत्त्व आहे ते सुद्धा आपणच आहात ॥ ३३ ॥
शब्दादिहीनमजरममेयं क्षयवर्जितम् ।
अवृद्धिनाशं तद्ब्रह्म त्वमाद्यन्तविवर्जितम्
॥ ३४ ॥
जो शब्दादि पासून रहित,
अजर, अमेय, अक्षय आणि नाश तसेच वृद्धिरहीत आहे तो आद्यन्त हीन ब्राह्मण सुद्धा आपणच
आहात ॥ ३४ ॥
त्वत्तोऽमराः सपितरो यक्षगन्धर्वकिन्नराः ।
सिद्धाश्चाप्सरसस्त्वत्तो मनुष्याः पशवः खगाः
॥ ३५ ॥
सरीसृपा मृगाः सर्वे त्वत्तः सर्वे महीरुहाः
।
यच्च भूतं भविष्यं च किञ्चिदत्र चराचरम् ॥
३६ ॥
आपल्या पासूनच देवता,
पितृगण, यक्ष, गन्धर्व, किन्नर, सिद्ध आणि अप्सरागण उत्पन्न झाले आहेत. आपल्या पासूनच मनुष्य, पशु, पक्षी, सरीसृप आणि मृग आदि झाले तसेच आपल्या पासूनच
सम्पूर्ण वृक्ष आणि जे काही भी भूत-भविष्य चराचर जगत आहे ते सर्व झाले ॥ ३५-३६॥
मूर्तामूर्तं तथा चापि स्थूलं सूक्ष्मतरं तथा
।
तत्सर्वं त्वं जगत्कर्ता नास्ति किञ्चित्त्वया
विना ॥ ३७ ॥
हे प्रभो! मूर्त-अमूर्त,
स्थूल-सूक्ष्म तसैच आणखीही जे काही आहे त्याचे आपणच जगत्कर्ता आहात, आपल्यापासून भिन्न
दूसरे काहीच नाही ॥ ३७ ॥
मया संसारचक्रेऽस्मिन्भ्रमता भगवन् सदा ।
तापत्रयाभिभूतेन न प्राप्ता निर्वृतिः क्वचित्
॥ ३८ ॥
हे भगवंता ! तापत्रयांनी
युक्त असलेल्या, सर्वदा ह्या संसार-चक्र भ्रमण करणार्या मला कधीच शान्ति प्राप्त झाली
नाही ॥ ३८ ॥
दुःखान्येव सुखानीति मृगतृष्णाजलाशया ।
मया नाथ गृहीतानि तानि तापाय मेऽभवन् ॥ ३९
॥
हे नाथा ! जलाच्या आशेने
मृगतृष्णा समान मी दुःखांनाच सुख समजून ग्रहण केले होते; पण ते माझ्या संतापामुळेच
झाले ॥ ३९ ॥
राज्यमुर्वी बलं कोशो मित्रपक्षस्तथात्मजाः
।
भार्या भृत्य जनो ये च शब्दाद्य विषयाः प्रभो
॥ ४० ॥
सुखबुद्ध्या मया सर्वं गृहीतमिदमव्ययम् ।
परिणामे तदेवेश तापात्मकमभून्मम ॥ ४१ ॥
हे प्रभो ! राज्य, पृथिवी,
सेना, कोश, मित्रपक्ष, पुत्रगण, स्त्री तसेच सेवक आदि आणि शब्दादि विषय ह्या सर्वांना
मी अविनाशी तसेच सुख-बुद्धिनेच जवळ केले होते, पण हे ईश ! परिणामी तेच
दुःखरूप सिद्ध झाले ॥४०-४१॥
देवलोकगतिं प्राप्तो नाथ देवगणोऽपि हि ।
मत्तः साहाय्यकामोभूच्छाश्वती कुत्र निर्वृतिः
॥ ४२ ॥
हे नाथा ! देवलोक प्राप्त
केल्यावर सर्व देवतांना माझ्या मदतीची गरज भासली तर त्या स्वर्गलोकातही मला नित्यशान्ति
कुठली ? ॥ ४२ ॥
त्वामनाराध्य जगतां सर्वेषां प्रभवास्पदम्
।
शाश्वती प्राप्यते केन परमेश्वर निर्वृतिः
॥ ४३ ॥
हे परमेश्वरा ! सम्पूर्ण
जगताच्या उत्पत्तिचे आदिस्थान असलेल्या आपल्या आराधने शिवाय कोण शाश्वत शान्ति प्राप्त
करू शकेल ? ॥ ४३ ॥
त्वन्मायामूढमनसो जन्ममृत्युजरादिकान् ।
अवाप्य तापान्पश्यन्ति प्रेतराजमनन्तरम् ॥
४४ ॥
हे प्रभो ! आपल्या मायेने
मोहीत झालेले पुरुष जन्म, मृत्यु आणि जरा आदि सन्तात भोगत शेवटी यमराजाचे दर्शन करतात
॥ ४४ ॥
ततो निजक्रियासूति नरकेष्वतिदारुणम् ।
प्राप्नुवन्ति नरा दुःखमस्वरूपविदस्तव ॥ ४५
॥
आपले स्वरूप न जाणणारे
पुरुषांना नरकात आपल्या कर्मांच्या फलस्वरूप नाना प्रकारचे दारुण क्लेश प्राप्त होतात
॥ ४५ ॥
अहमत्यन्तविषयी मोहितस्तव मायया ।
ममत्वगर्वगर्तान्तर्भ्रमामि परमेश्वर ॥ ४६
॥
हे परमेश्वरा ! मी अत्यन्त
विषयी आहे आणि आपल्या मायेने मोहीत होऊन ममत्वाभिमानाच्या खड्ड्यात भटकत आहे ॥ ४६ ॥
सोऽहं त्वां शरणमपारमप्रमेयं सम्प्राप्तः परमपदं
यतो न किञ्चित् ।
संसारभ्रमपरितापतप्तचेता निर्वाणे परिणतधाम्नि
साभिलाषः ॥ ४७ ॥
तोच मी आज अपार आणि अप्रमेय
परमपदरूपी, ज्याच्यापासून भिन्न दुसरे काहीच नाही अशा आपल्या शरणी आलो आहे, आणि संसारभ्रमणाच्या
दुःखामुळे खिन्नचित्त होऊन मी निरतिशय तेजोमय निर्वाणस्वरूप अशा आपलाच अभिलाषी आहे
"॥४७॥
इति श्रीविष्णुमहापुराणेच
पञ्चमे
अंशे त्रयोविंशोऽध्यायः
(२३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा