शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

विष्णुपुराण, प्रथम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 7

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः   ॥ सप्तमोऽध्यायः ॥

 

"मरीचि आदि प्रजापतिगण, तामसिक सर्ग, स्वायम्भुवमनु आणि शतरूपा तथा त्यांच्या संततिचे वर्णन"

पराशर उवाचः
ततोऽभिध्यायतस्तस्य जज्ञिरे मानसाः प्रजाः ।
तच्छरीरसमुत्पन्नैः कार्यैस्तैः करणैः सह ।
 
क्षेत्रज्ञाः समवर्तन्त गात्रेभ्यस्तस्य धीमतः ॥ १ ॥

पराशर म्हणालेमग त्या प्रजापतिने ध्यान केल्यावर त्याच्या देहस्वरूप भूतांपासून उत्पन्न झाले शरीर आणि इंद्रियांसही मानस प्रजा उत्पन्न झाली. त्यावेळी मतिमान ब्रह्माच्या जड शरीरापासून चेतन जीवांचा प्रादुर्भाव झाला.

 


ते सर्वे समवर्तन्त ये मया प्रागुदाहृताः ।
देवाद्याः स्थावरान्ताश्च त्रैगुण्यविषये स्थिताः ॥ २ ॥ 

एवं भूतानि सृष्टानि चराणि स्थावराणि च ॥ ३ ॥

मी आधी ज्यांचे वर्णन केले ते देवतांपासून  स्थावरां पर्यंत सगळे त्रिगुणात्मक चर आणि अचर जीव अशाप्रकारे उत्पन्न झाले .

 


यदास्य ताः प्रजाः सर्वा न व्यवर्धन्त धीमतः ।
 
अथान्यान्मानसान्पुत्रान्सदृशानात्मनोऽसृजत् ॥ ४ ॥
 
भृगुं पुलस्त्यं पुलहं क्रतुमङ्‌गिरसं तथा ।
 
मरीचिं दक्षमत्रिं च वसिष्ठं चैव मानसान् ॥ ५ ॥
 
नव ब्रह्माण इत्येते पुराणे निश्चयं गताः ॥ ६ ॥

जेव्हा महाबुद्धिमान प्रजापतिची ती प्रजा पुत्र पौत्रादि क्रमाने आणखी वाढली नाही तेव्हा त्यांनी भृगु, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अंगिरा, मरीचि, दक्ष, अत्रि व वसिष्ठ ह्या आपल्या सारख्याच अन्य मानसपुत्रांची सृष्टि केली. पुराणांमध्ये हे नऊ ब्रह्मा मानले गेले आहेत .



ख्यातिं भूतिं च सम्भूतिं क्षमां प्रीतिं तथैवच ।
सन्नतिं च तथैवोर्ज्जामनसूयां तथैव च ॥ ७ ॥
 
प्रसूतिं च ततः सृष्ट्‍वा ददौ तेषां महात्मनाम् ।
पत्‍न्यो भवध्वमित्युक्त्वा तेषामेव तु दत्तवान् ॥ ८ ॥

नंतर ख्याति, भूति, सम्भूति, क्षमा, प्रीति, सन्नति, ऊर्ज्जा, अनसूया तथा प्रसूति ह्या नऊ कन्यांना उत्पन्न करून, त्यांना तु ह्याची पत्नी होअसे सांगून त्या महात्म्यांना  दिले .



सनन्दनादयो ये च पूर्वसृष्टास्तु वेधसा ।
न ते लोकेष्वसज्जन्त निरपेक्षाः प्रजासु ते ॥ ९ ॥

ब्रह्माने आधी ज्या सनंदनादिंना उत्पन्न केले होते ते निरपेक्ष असल्याने संतति व संसारात प्रवृत्त झाले नाहीत .

 


सर्वे तेऽभ्यागतज्ञाना वीतरागा विमत्सराः
तेष्वेवं निरपेक्षेषु लोकसृष्टौ महात्मनः ।
ब्रह्मणोऽभून्महान् क्रोधस्त्रैलोक्य दहन क्षमः ॥ १० ॥
तस्य क्रोधसमुद्‌भूत ज्वालामालाति दीपितम् ।
ब्रह्मणोऽभूत्तदा सर्वं त्रैलोक्यमखिलं मुने ॥ ११ ॥

ते सर्व ज्ञानसम्पन्न, विरक्त आणि मत्सरादि दोषारहीत होते. त्या महात्म्यांच्या रचनेमुळे बह्माला त्रैलोक्याला भस्म करणारा महान क्रोध उत्पन्न झाला .  हे मुने ! त्या ब्रह्माच्या क्रोधामुळे सम्पूर्ण त्रैलोक्य ज्वालामालांनी अत्यंत देदीप्यमान झाले .



भ्रुकुटीकुटिलात्तस्य ललाटात्क्रोध दीपितात् ।
समुत्पन्नस्तदा रुद्रो मध्याह्नार्कसमप्रभः ॥ १२ ॥

त्यावेळी त्याच्या वक्र भुवया आणि क्रोध-संतप्त कपाळापासून मध्यान्हसमयीच्या सूर्यासमान प्रकाशमान रूद्राची उत्पत्ति झाली .

 


 
अर्धनारीनरवपुः प्रचण्डोऽतिशरीरवान् ।
 
विभजात्मानमित्युक्त्वा तं ब्रह्मान्तर्दधे ततः ॥ १३ ॥

त्याचे अति प्रचंड शरीर अर्धे नर आणि अर्धे नारीरूप होते . तेव्हा ब्रह्मा "आपल्या शरीराचा विभाग कर" असे म्हणून अन्तर्धान झाला .

 


तथोक्तोऽसौ द्विधा स्त्रीत्वं पुरुषत्वं तथाकरोत् ।
बिभेदपुरुषत्वं च दशधा चैकधा च सः ॥ १४ ॥

असे सांगितल्यावर त्या रूद्राने आपल्या शरीरस्थ स्त्री व पुरुष दोन्ही भागांना वेगवेगळे केले आणि मग पुरुष भागाला अकरा भागांमध्ये विभागले .

 


 
सौम्यासौम्यैस्तदा शान्ताशान्तैः स्त्रीत्वं च स प्रभुः ।
 
बिभेद बहुधा देवः स्वरूपैरसितैः सितैः ॥ १५ ॥

तसेच स्त्री-भागाला देखील सौम्य, क्रूर, शांत-अशांत आणि श्याम – गौर आदि अनेक रूपांमध्ये विभागले. .

 


 
ततो ब्रह्माऽऽत्मसम्भूतं पूर्वं स्वायम्भुवं प्रभुः ।
 
आत्मानमेव कृतवान्प्राजापत्ये मनुं द्विज ॥ १६ ॥

त्यानंतर, हे द्विजा ! आपल्यापासून उत्पन्न झालेले आपलेच स्वरूप अशा स्वायम्भुवाला ब्रह्माने प्रजा पालनासाठी प्रथम मनु बनवले .

 


शतरूपां च तां नारीं तपोनिर्धूतकल्मषाम् ।
स्वायम्भुवो मनुर्देवः पत्नीत्वे जगृहे विभुः ॥ १७ ॥

त्या स्वायम्भुव मनुने [आपल्याच सोबत उत्पन्न झालेल्या] तपामुळे निष्पाप अशा शतरूपा नावाच्या स्त्रीला आपल्या पत्नीरूपात ग्रहण केले .

 


तस्मात्तु पुरुषाद्‌देवी शतरूपा व्यजायत ।
 
प्रियव्रतोत्तानपादौ प्रसूत्याकूतिसंज्ञितम् ॥ १८ ॥
 
कन्याद्वयं च धर्मज्ञ रूपौदार्यगुणान्वितम्
 
ददौ प्रसूतिं दक्षाय आकूतिं रुचये पुरा ॥ १९ ॥

हे धर्मज्ञा ! त्या स्वायम्भुव मनुपासून शतरूपा देवीने प्रियव्रत आणि उत्तानपाद नामक दोन पुत्र तथा उदारव रूप गुणसम्पन्न प्रसूति आणि आकूति नामक दोन कन्या उत्पन्न केल्या . त्यांच्यातील प्रसूतिचा दक्षासोबत व  आकूतिचा रूचि प्रजापतिसोबत विवाह झाला .

 


प्रजापतिः स जग्राह तयोर्जज्ञे सदक्षिणः ।
 
पुत्रो यज्ञो महाभाग दम्पत्योर्मिथुनं ततः ॥ २० ॥

हे महाभागा ! रूचि प्रजापतिने तिला ग्रहण केले . तेव्हा त्या दांपत्यापासून यज्ञ आणि दक्षिणा – ही जुळी संतति उत्पन्न झाली .

 


 
यज्ञस्य दक्षिणायां तु पुत्रा द्वादश जज्ञिरे ।
 
यामा इति समाख्याता देवाः स्वायम्भुवे मनौ ॥ २१ ॥

यज्ञाला दक्षिणेपासून बारा पुत्र झाले, जे स्वायम्भुव मन्वन्तरात वाम नामक देवता बनले .

 


 
प्रसूत्यां च तथा दक्षश्चतस्रो विंशतिंस्तथा ।
 
ससर्ज कन्यास्तासां तु सम्यङ्‌ नामानि मे शृणु ॥ २२ ॥

तसेच दक्षाने प्रसूतिपासून चोवीस कन्या उत्पन्न केल्या . त्यांची शुभनावे माझ्याकडून ऐक .

 


श्रद्धा लक्ष्मीर्धृतिस्तुष्टिर्मेधा पुष्टिस्तथा क्रिया ।
 
बुद्धिर्लज्जा वपुः शान्तिः सिद्धिः कीर्तिस्त्रयोदशी ॥ २३ ॥
 
पत्न्यर्थं प्रतिजग्राह धर्मो दाक्षायणीः प्रभुः ।
 
ताभ्यः शिष्टा यवीयस्य एकादश सुलोचनाः ॥ २४ ॥
 
ख्यातिः सत्यथ सम्भूतिः स्मृतिः प्रीतिः क्षमा तथा ।
 
सन्नतिश्चानसूया च ऊर्जा स्वाहा स्वधा तथा ॥ २५ ॥

श्रद्धा, लक्ष्मी, धृति, तुष्टि, मेधा, पुष्टि, क्रिया, बुद्धि, लज्जा, वपु, शान्ति, सिद्धि आणि तेरावी कीर्ति – ह्या दक्ष कन्यांना धर्माने पत्नीरूपात ग्रहण केले . ह्यांच्याहून लहान इतर अकरा कन्या ख्याति, सती, सम्भूति, स्मृति, प्रीति, क्षमा, सन्तति, अनसूया, ऊर्ज्जा, स्वाहा आणि स्वधा होत्या .

 

 

भृगुर्भवो मरीचिश्च तथा चैवाङ्‌गिरा मुनिः ।
पुलस्त्यः पुलहश्चैव क्रतुश्चर्षिवरस्तथा ॥ २६ ॥
अत्रिर्वसिष्ठो वह्निश्च पितरश्च यथाक्रमम् ।
ख्यात्याद्या जगृहुः कन्या मुनयो मुनिसत्तम ॥ २७ ॥

हे मुनिसत्तमा ! ह्या ख्याति आदि कन्यांना क्रमशः भृगु, शिव, मरीचि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, अत्रि, वसिष्ठ – ह्या मुनिंनी तथा अग्नि व पितरांनी ग्रहण केले .

 



 
श्रद्धा कामं चला दर्पं नियमं धृतिरात्मजम् ।
 
संतोषं च तथा तुष्टिर्लोभं पुष्टिरसूयत ॥ २८ ॥

श्रद्धापासून काम, चला (लक्ष्मी) पासून दर्प, धृतिपासून नियम, तुष्टिपासून संतोष आणि पुष्टिपासून लोभाची उत्पत्ति झाली .

 


 
मेधा श्रुतं क्रिया दण्डं नयं विनयमेव च ॥ २९ ॥
 
बोधं बुद्धिस्तथा लज्जा विनयं वपुरात्मजम्
 
व्यवसायं प्रजज्ञे वै क्षेमं शान्तिरसूयत ॥ ३० ॥
 
सुखं सिद्धिर्यशः कीर्तिरित्येते धर्मसूनवः ।
 
कामाद्‌रतिः सुतं हर्षं धर्मपौत्रमसूयत ॥ ३१ ॥

तसेच मेधापासून श्रुत, क्रियापासून दंड, नय आणि विनय, बुद्धिपासून बोध, लज्जापासून विनय, वपुपासून त्याचा पुत्र व्यवसाय, शान्तिपासून क्षेम, सिद्धिपासून सुख आणि कीर्तिपासून यशाचा जन्म झाला. हेच धर्माचे पुत्र आहेत . रतिने कामापासून धर्माचा पौत्र म्हणजे नातू हर्ष ह्याला उत्पन्न केले .

 



हिंसा भार्या त्वधर्मस्य तयोर्जज्ञे तथानृतम् ।
कन्या च निकृतिस्ताभ्यां भयं नरकमेव च ॥ ३२ ॥
माया च वेदना चैव मिथुनं त्विदमेतयोः ।
तयोर्जज्ञेऽथ वै माया मृत्युं भूतापहारिणम् ॥ ३३ ॥
अधर्माची स्त्री हिंसा होती, तिच्यापासून अनृत नामक पुत्र आणि निकृति नामक कन्या उत्पन्न झाली . त्या दोघांपासून भय आणि नरक नावाचे पुत्र तथा त्यांच्या पत्नि माया आणि वेदना नावाच्या कन्या झाल्या . त्यांच्यातील मायाने समस्त प्राण्यांचा संहारकर्ता मृत्यु नामक पुत्र उत्पन्न केला .

 


वेदना स्वसुतं चापि दुःखं जज्ञेऽथ रौरवात् ।
मृत्योर्व्याधिजराशोकतृष्णाक्रोधाश्च जज्ञिरे ॥ ३४ ॥

वेदनेने सुद्धा रौरव (नरक) पासून आपला पुत्र दुःख ह्याला जन्म दिला आणि मृत्युपासून व्याधि, जरा, शोक, तृष्णा आणि क्रोधाची उत्पत्ति झाली .

 


दुःखोत्तराः स्मृता ह्येते सर्वे चाधर्मलक्षणाः ।
नैषां पुत्रोऽस्ति वै ते भार्या सर्वे ह्यूर्ध्वरेतसः ॥ ३५ ॥

हे सगळे अधर्मरूप आहेत वदु:खोत्तरनावाने प्रसिद्ध आहेत, [कारण ह्यांच्यापासून शेवटी दुःखच प्राप्त होते] ह्यांची कोणी स्त्री किंवा संतति नाही. हे सगळे ऊर्ध्वरेता आहेत .

 


रौद्राण्येतानि रूपाणि विष्णोर्मुनि वरात्मज ।
नित्यप्रलयहेतुत्वं जगतोऽस्य प्रयान्ति वै ॥ ३६ ॥

हे मुनिकुमारा ! ही भगवान विष्णुची महाभयंकर रूपे आहेत आणि हीच संसारच्या नित्य-प्रलयाची कारणं होतात .

 

 

दक्षो मरीचिरत्रिश्च भृग्वाद्याश्च प्रजेश्वराः ।
जगत्यत्र महाभाग नित्यसर्गस्य हेतवः ॥ ३७ ॥

हे महाभाग ! दक्ष, मरीचि, अत्रि और भृगु आदि प्रजापतिगण ह्या जगाच्या नित्य-सर्गाचे कारण आहेत .

 

 

मनवो मनुपुत्राश्च भूपा वीर्यधराश्च ये ।
सन्मार्गाभिरताः शूरास्ते नित्यं स्थितिकारिणः ॥ ३८ ॥

तसेच मनु आणि मनुचे पराक्रमी, सन्मार्गपरायण आणि शूरवीर पुत्र राजागण ह्या संसाराच्या नित्य-स्थितिचे कारण आहेत .

 


 
मैत्रेय उवाचः
येयं नित्या स्थितिर्ब्रह्मन्नित्यसर्गस्तथेरितः ।
नित्याभावश्च तेषां वै स्वरूपं मम कथ्यताम् ॥ ३९ ॥

मैत्रेय म्हणालेहे ब्रह्मन् ! तुम्ही जो नित्य-स्थिति, नित्य-सर्ग आणि नित्य-प्रलयाचा उल्लेख केला कृपा करून मला त्यांच्या स्वरूपाविषयी सांगा .

 



पराशर उवाचः
सर्गस्थितिविनाशांश्च भगवान्मधुसूदनः ।
तैस्तै रूपैरचिन्त्यात्मा करोत्यव्याहतान् विभुः ॥ ४० ॥
पराशर म्हणालेज्यांची गति कुठेही थांबत नाही ते अचिंत्यात्मा सर्वव्यापक भगवान मधुसुदन निरंतर ह्या मनु आदि रूपांनी संसाराची उत्पत्ति, स्थिति व नाश करत राहतात .

 


नैमित्तिकः प्राकृतिकस्तथैवात्यन्तिको द्विज ।
 
नित्यश्च सर्वभूतानां प्रलयोऽयं चतुर्विधः ॥ ४१ ॥

हे द्विजा ! समस्त भूतांचा चार प्रकारचा प्रलय आहे – नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक आणि नित्य .

 


ब्राह्मो नैमित्तिकस्तत्र शेतेऽयं जगतीपतिः ।
प्रयाति प्राकृते चैव ब्रह्माण्डं प्रकृतौ लयम् ॥ ४२ ॥

त्यांच्यातील नैमित्तिक प्रलयच ब्राह्मप्रलय आहे, ज्यात जगत्पति प्रलयात ब्रह्मांड प्रकृतीत लीन होतो .

 


ज्ञानादात्यन्तिकः प्रोक्तो योगिनः परमात्मनि ।
नित्यः सदैव जातानां यो विनाशो दिवानिशम् ॥ ४३ ॥

ज्ञानाच्या द्वारे योग्याचे परमात्मात लीन होणे आत्यंतिक प्रलय आहे आणि  रात्रंदिवस भूतांचा जो क्षय होतो तोच नित्यप्रलय .

 


प्रसूतिः प्रकृतेर्या तु सा सृष्टिः प्राकृता स्मृता ।
 
दैनंदिनी तथा प्रोक्ता यान्तरप्रलयादनु ॥ ४४ ॥

प्रकृतिपासून महत्तत्त्वादि क्रमाने जी सृष्टि होते तिला प्राकृतिक सृष्टि म्हणतात आणि अवांतर प्रलयानंतर ब्रह्मा द्वारा चराचर जगताची जी उत्पत्ति होते तिला दैनंदिनी सृष्टि म्हणतात .

 


 
भूतान्यनुदिनं यत्र जायन्ते मुनिसत्तम ।
 
नित्यसर्गो हि स प्रोक्तः पुराणार्थविचक्षणैः ॥ ४५ ॥

आणि हे मुनिश्रेष्ठा ! जिच्यात प्रतिदिन प्राण्यांची उत्पत्ति होत राहते तिला पुराणार्थात कुशल महानुभावांनी नित्य  सृष्टि म्हटले आहे .

 

 

एवं सर्वशरीरेषु भगवान्भूतभावनः ।
संस्थितः कुरुते विष्णुरुत्पत्तिस्थितिसंयमान् ॥ ४६ ॥

अशाप्रकारे समस्त शरीरात स्थित भूतभावन भगवान विष्णु जगताची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय करत राहतात .

 


सृष्टिस्थितिविनाशानां शक्तयः सर्वदेहिषु ।
वैष्णव्यः परिवर्तन्ते मैत्रेयाहर्निशं सदा ॥ ४७ ॥

हे मैत्रेया ! सृष्टि, स्थिति आणि विनाशाच्या ह्या वैष्णवी शक्तिंचा समस्त शरीरांमध्ये समान भावाने अहर्निश संचार होत राहतो .

 


गुणत्रयमयं ह्येतद्‌ब्रह्मन् शक्तित्रयं महत् ।
योऽतियाति स यात्येव परं नावर्तते पुनः ॥ ४८ ॥

हे ब्रह्मन् ! ह्या तिन्ही महान शक्ती त्रिगुणमयी आहेत. म्हणून जो ह्या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो तोच परमपद प्राप्त करतो आणि मग जन्म – मरणादि चक्रात पडत नाही .

 

 

 

"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे सप्तमोऽध्यायः"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...