॥ प्रथमः अंशः ॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥
"चातुर्वर्ण्य-व्यवस्था, पृथ्वी-विभाग आणि
अन्नादिच्या उत्पत्तिचे वर्णन"
मैत्रेय
उवाचः
अर्वाक्स्रोतस्तु कथितो भवता यस्तु
मानुषः ।
ब्रह्मन् विस्तरतो ब्रूहि ब्रह्मा
तमसृजद्यथा ॥ १ ॥
मैत्रेय म्हणाले :– हे भगवन !
तुम्ही ज्या अर्वाक-स्रोत मनुष्यांविषयी सांगितले त्यांची
सृष्टी ब्रह्माने कशाप्रकारे केली ते विस्तारपूर्वक सांगावे.
यथा च वर्णानसृजद्यद्गुणांश्च
महामुने ।
यच्च तेषां स्मृतं कर्म विप्रादीनां
तदुच्यताम् ॥ २ ॥
श्प्रजापतिने ब्राह्मणादि वर्णांना
ज्या ज्या गुणांनी युक्त आणि जशाप्रकारे रचले होते त्यांचे जे जे कर्तव्य-कर्म
निर्धारित केले ते सर्व वर्णन करावे.
पराशर उवाचः
सत्याभिध्यायिनः पूर्वं
सिसृक्षोर्ब्रह्मणो जगत् ।
अजायन्त द्विजश्रेष्ठ
सत्त्वोद्रिक्ता मुखात्प्रजाः ॥ ३ ॥
पराशर म्हणाले :– हे
द्विजश्रेष्ठा ! जगतरचनेच्या इच्छेने युक्त सत्यसंकल्प ब्रह्माच्या मुखापासून
सर्वप्रथम सत्त्वप्रधान प्रजा उत्पन्न झाली.
वक्षसो
रजसोद्रिक्तास्तथा वै ब्रह्मणोऽभवन् ।
रजसा तमसा चैव समुद्रिक्तास्तथोरुतः
॥ ४ ॥
त्यानंतर ब्रह्माच्या
वक्ष:स्थलापासून रज:प्रधान तथा जांघांपासून रज आणि तमविशिष्ट सृष्टी निर्माण झाली.
पद्भ्यामन्याः
प्रजा ब्रह्मा ससर्ज द्विजसत्तम ।
तमःप्रधानास्ताः
सर्वाश्चातुर्वर्ण्यमिदं ततः ॥ ५ ॥
हे द्विजोतमा ! चरणांपासून ब्रह्माने
एक आणखी प्रकारची प्रजा उत्पन्न केली, ती तम:प्रधान होती. तेच सर्व चारही वर्ण झाले.
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः
शूद्राश्च द्विजसत्तम ।
पादोरुवक्षःस्थलतो मुखतश्च समुद्गताः
॥ ६ ॥
अशाप्रकारे हे द्विजसत्तमा !
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि
शुद्र हे चारही क्रमश: ब्रह्माच्या मुख, वक्ष:स्थल, जानू और चरणांपासून उत्पन्न झाले.
यज्ञनिष्पत्तये
सर्वमेतद्ब्रह्मा चकार वै ।
चातुर्वर्ण्यं
महाभाग यज्ञसाधनमुत्तमम् ॥ ७ ॥
हे महाभागा ! ब्रह्माने
यज्ञानुष्ठानासाठीच यज्ञाचे उत्तम साधनरूप अशी ही संपूर्ण चातुर्वर्ण्याची रचना
केली होती .
यज्ञैराप्यायिता
देवा वृष्ट्युत्सर्गेण वै प्रजाः ।
आप्याययन्ते धर्मज्ञ यज्ञाः
कल्याणहेतवः ॥ ८ ॥
हे धर्मज्ञा ! यज्ञाने तृप्त होऊन
देवगण जल वर्षाव करून प्रजेला तृप्त करतात, म्हणून यज्ञ सर्वथा कल्याणाचा हेतु आहे.
निष्पाद्यन्ते नरैस्तैस्तु
स्वकर्माभिरतैस्सदा
विशुद्धाचरणोपेतैः
सद्भिः सन्मार्गगामिभिः ॥ ९ ॥
जे
मनुष्य सदा स्वधर्मपरायण,
सदाचारी, सज्जन आणि
सुमार्गगामी असतात त्यांच्यापासूनच यज्ञाचे यथावत अनुष्ठान शक्य आहे.
स्वर्गापवर्गौ
मानुष्यात्प्राप्नुवन्ति नरा मुने ।
यच्चाभिरुचितं स्थानं तद्यान्ति
मनुजा द्विज ॥ १० ॥
हे मुने ! यज्ञाद्वारा मनुष्य ह्या
मनुष्य-शरीरापासून स्वर्ग आणि अपवर्ग प्राप्त करू शकतो तसेच इतरही ज्या स्थानाची तो इच्छा
करतो तिथे जाऊ शकतो .
प्रजास्ता ब्रह्मणा
सृष्टाश्चातुर्वर्ण्यव्यवस्थिताः ।
सम्यक्छ्रद्धाः
समाचारप्रवणा मुनिसत्तम ॥ ११ ॥
यथेच्छावासनिरताः सर्वबाधाविवर्जिताः
।
शुद्धान्तःकरणाः
शुद्धाः कर्मानुष्ठाननिर्मलाः ॥ १२ ॥
हे मुनिसत्तमा ! ब्रह्माद्वारा रचली
गेलेली चातुर्वर्ण्य-विभागात स्थित असलेली ही प्रजा अति श्रद्धायुक्त आचरण करणारी, स्वेच्छेनुसार
राहाणारी, संपूर्णपणे
बाधारहीत, शुद्ध
अंत:करणाची, सत्कुलोत्पन्न
आणि पुण्यकर्मांच्या
अनुष्ठानामुळे
परम पवित्र होती .
शुद्धे च तासां मनसि शुद्धेऽन्तः
संस्थिते हरौ ।
शुद्धज्ञानं प्रपश्यन्ति
विष्ण्वाख्यं येन तत्पदम् ॥ १३ ॥
ह्या प्रजेचे चित्त शुद्ध असल्याने
तिच्यात निरंतर शुद्धस्वरूप श्रीहरि विराजमान असल्याने ह्या प्रजेला शुद्धज्ञान
प्राप्त होत होते ज्यामुळे ती भगवंताच्या त्या ‘विष्णु’ नामक परमपदाला पाहू शकत होती .
ततः कालात्मको योऽसौ स चांशः कथितो
हरेः ।
स पातयत्यघं घोरमल्पमल्पाल्पसारवत् ॥
१४ ॥
नंतर (त्रेतायुगाच्या आरंभी) मी तुला
भगवंताच्या ज्या काल नामक अंशाचे वर्णन केले आहे, ते अति अल्प सुखाचे, तुच्छ आणि घोर पापांना
प्रजेत प्रवृत्त करते .
अधर्मबीजमुद्भूतं
तमोलोभसमुद्भवम् ।
प्रजासु तासु मैत्रेय रागादिकमसाधकम्
॥ १५ ॥
हे मैत्रेया ! त्यामुळे प्रजेत
पुरुषार्थाचे विघातक तथा अज्ञान आणि लोभ उत्पन्न करणार्या रागादिरूप अधर्माचे बीज
उत्पन्न होते.
ततः सा सहजा सिद्धिस्तासां नातीव
जायते ।
रसोल्लासादयश्चान्याः सिद्धयोऽष्टौ
भवन्ति याः ॥ १६ ॥
आणि म्हणून त्यानंतर त्याला
विष्णु-पद-प्राप्ति-रूप स्वाभाविक सिद्धि आणि रसोल्लास आदि अन्य अष्टसिद्धि मिळत
नाहीत .
तासु
क्षीणास्वशेषासु वर्धमाने च पातके ।
द्वन्द्वाभिभवदुःखार्तास्ता भवन्ति
ततः प्रजाः ॥ १७ ॥
ह्या समस्त सिद्धि क्षीण झाल्याने
आणि पाप वाढल्याने संपूर्ण प्रजा द्वन्द्व, ह्रास आणि दुःखाने आतुर झाली.
ततो
दुर्गाणि ताश्चक्रुर्धान्वं पार्वतमौदकम् ।
कृत्रिमं च तथा दुर्गं
पुरखर्वटकादिकम् ॥ १८ ॥
तेव्हा प्रजेने मरुभूमि, पर्वत आणि जल
आदिंचे स्वाभाविक तथा कृत्रिम दुर्ग आणि पुर तथा खर्वट आदि स्थापित केले .
गृहाणि
च यथान्यायं तेषु चक्रुः पुरादिषु ।
शीतातपादिबाधानां प्रशमाय महामते ॥
१९ ॥
हे महामते ! त्या पुरांना शीत आणि
ताप आदि बाधां पासून वाचवण्यासाठी प्रजेने यथायोग्य घरे बनवली.
प्रतीकारमिमं
कृत्वा शीतादेस्ताः प्रजाः पुनः ।
वार्तोपायं
ततश्चक्रुर्हस्तसिद्धिं च कर्मजाम् ॥ २० ॥
अशाप्रकारे
शीतोष्णादि बचावाचे उपाय करून त्या प्रजेने जीविकेचे साधनरूप कृषि तथा कला-कौशल
आदिची रचना केली.
व्रीहयश्च यवाश्चैव
गोधूमाश्चाणवस्तिलाः ।
प्रियङ्गवो
ह्युदाराश्च कोरदूषाः सतीनकाः ॥ २१ ॥
माषा मुद्गा मसूराश्च निष्पावाः
सकुलत्थकाः ।
आढक्यश्चणकाश्चैव
शणाः सप्तदश स्मृताः ॥ २२ ॥
हे मुने ! धान्य, जव, गहू, छोटे धान्य, तिळ, कांगनी, ज्वारी, कोडो, छोटेमटार, उडीद, मूग, मसूर, मोठेमटार, मटार
, कुळीथ, राई, चणा और सण ह्या
सतरा ग्रामीण औषधींच्या जाती आहेत .
इत्येता ओषधीनां तु ग्राम्यानां
जातयो मुने ।
ओषध्यो यज्ञियाश्चैव
ग्राम्यारण्याश्चतुर्दश ॥ २३ ॥
ग्रामीण आणि वन्य दोन्ही प्रकार
मिळून एकूण चौदा औषधी याज्ञिक आहेत .
व्रीहयस्सयवा
माषा गोधूमाश्चाणवस्तिलाः ।
प्रियङ्गुसप्तमा
ह्येता अष्टमास्तु कुलत्थकाः ॥ २४ ॥
श्यामाकास्त्वथ नीवारा जर्तिलाः
सगवेधुकाः ।
तथा वेणुयवाः
प्रोक्तास्तद्वन्मर्कटका मुने ॥ २५ ॥
ग्राम्यारण्याः स्मृता ह्येता
ओषध्यस्तु चतुर्दश ।
यज्ञनिष्पत्तये यज्ञस्तथासां
हेतुरुत्तमः ॥ २६ ॥
त्यांची नावे ह्याप्रमाणे आहेत –
धान्य, जव, उडीद, गहू, छोटे धान्य, तिळ, कांगनी आणि
कुळीथ – हे आठ तसेच श्यामक,
नीवार, वनतिल, गवेधु, वेणुयव आणि मका
ह्या चौदा
ग्रामीण आणि वन्य औषधी यज्ञानुष्ठानाची सामग्री आहेत आणि यज्ञ ह्यांच्या
उत्पत्तिचा प्रधान हेतु आहे .
एताश्च सह यज्ञेन प्रजानां कारणं
परम् ।
परावरविदः प्राज्ञास्ततो
यज्ञान्वितन्वते ॥ २७ ॥
यज्ञांसहित ह्या औषधी प्रजेच्या
बुद्धिचे परम कारण आहे म्हणून इहलोक व परलोकाचे ज्ञाता पुरुष यज्ञांचे अनुष्ठान
करतात .
अहन्यहन्यनुष्ठानं यज्ञानां
मुनिसत्तम ।
उपकारकरं पुंसां क्रियमाणाघशान्तिदम्
॥ २८ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! नित्यप्रति केले
जाणारे यज्ञानुष्ठान मनुष्यांसाठी परम उपकारक आणि त्यांनी केलेली पापे शांत करणारे
आहे .
येषां
तु कालसृष्टोऽसौ पापबिन्दुर्महामते ।
चेतःसु
ववृधे चक्रुस्ते न यज्ञेषु मानसम् ॥ २९ ॥
हे महामुने ! ज्यांच्या मनात
काळाच्या गतिनुसार पापाचे बीज वाढते त्यांचेच चित्त यज्ञात प्रवृत्त होत नाही.
वेदवादांस्तथा
वेदान्यज्ञकर्मादिकं च यत् ।
तत्
सर्वं निन्दमानासुर्यज्ञव्यासेधकारिणः ॥ ३० ॥
जे यज्ञांच्या विरोधात आहेत त्यांनी
वैदिक मत, वेद
आणि यज्ञादि कर्म सर्वांची निंदा केली आहे .
प्रवृत्तिमार्गव्युच्छित्तिकारिणो
वेदनिन्दकाः ।
दुरात्मानो दुराचारा बभूवुः
कुटिलाशयाः ॥ ३१ ॥
ते लोक दुरात्मा, दुराचारी, कुटिलमति, वेद-निन्द्क
आणि प्रवृत्तिमार्गाचा उच्छेद करणारे आहेत .
संसिद्धायां
तु वार्तायां प्रजाः सृष्टा प्रजापतिः ।
मर्यादां स्थापयामास यथास्थानं
यथागुणम् ॥ ३२ ॥
वर्णानामाश्रमाणां च
धर्मान्धर्मभृतां वर ।
लोकांश्च सर्ववर्णानां
सम्यग्धर्मानुपालिनाम् ॥ ३३ ॥
हे धर्मवानांमध्ये श्रेष्ठ मैत्रेया
! अशाप्रकारे कृषि आदि जीविका साधने निश्चित झाल्यावर प्रजापति ब्रह्माने प्रजेची
रचना करून त्यांच्या स्थान आणि गुणांच्या अनुसार मर्यादा, वर्ण आणि आश्रमांचे धर्म
तसेच आपापल्या धर्माचे यथायोग्य पालन करणार्या समस्त वर्णांचे लोक आदिंची स्थापना केली .
प्राजापत्यं
ब्राह्मणानां स्मृतं स्थानं क्रियावताम् ।
स्थानमैन्द्रं
क्षत्रियाणां सङ्ग्रामेष्वनिवर्तिनाम् ॥ ३४ ॥
कर्मनिष्ठ ब्राह्मणांचे स्थान
पितृलोक आहे, युद्धक्षेत्रा पासून कधीच न हटणार्या
क्षत्रियांचा इंद्रलोक आहे .
वैश्यानां
मारुतं स्थानं स्वधर्मनिरतात्मनाम् ।
गान्धर्वं
शूद्रजातीनां परिचर्यानुवर्तिनाम् ॥ ३५ ॥
तसेच आपल्या धर्माचे पालन करणार्या
वैश्यांचा वायुलोक आणि सेवाधर्मपरायण शूद्रांचा गन्धर्वलोक आहे .
अष्टाशीतिसहस्राणि
मुनीनामूर्ध्वरेतसाम् ।
स्मृतं तेषां तु यत्स्थानं तदेव
गुरुवासिनाम् ॥ ३६ ॥
अठ्ठ्याऐंशी हजार ऊर्ध्वरेता मुनि
आहेत. त्यांचे
जे स्थान सांगितले गेले आहे तेच गुरुकुलवासी ब्रह्मचार्यांचे स्थान आहे .
सप्तर्षीणां
तु यत्स्थानं स्मृतं तद्वै वनौकसाम् ।
प्राजापत्यं गृहस्थानां ब्राह्मं
संन्यासिनां स्मृतम् ॥ ३७ ॥
अशाचप्रकारे वनवासी वानप्रस्थांचे
स्थान सप्तर्षिलोक, गृहस्थांचे
पितृलोक आणि सन्यासींचे ब्रह्मलोक आहे .
योगिनाममृतं स्थानं
स्वात्मसन्तोषकारिणाम् ॥ ३८ ॥
तसेच आत्मानुभवाने तृप्त योग्यांचे
स्थान अमरपद (मोक्ष) आहे.
एकान्तिनः सदा ब्रह्मध्यायिनो
योगिनश्च ये ।
तेषां तु परमं स्थानं यत्तत्पश्यन्ति
सूरयः ॥ ३९ ॥
जो निरंतर एकांतसेवी आणि
ब्रह्मचिन्तनात मग्न राहाणारा योगिजन आहे त्याचे जे परमस्थान आहे ते केवळ पंडितजनच
पाहू शकतात .
गत्वा
गत्वा निवर्तन्ते चन्द्रसूर्यादयो ग्रहाः ।
अद्यापि न निवर्तन्ते
द्वादशाक्षरचिन्तकाः ॥ ४० ॥
चन्द्र आणि सूर्य आदि ग्रह देखील
आपआपल्या लोकात जाऊन परत येतात. पण द्वादशाक्षर मंत्राचे (ॐ नमो भगवते
वासुदेवाय) चिंतन करणारे आजवर मोक्षपदा पासून परतलेले नाहीत .
तामिस्रमन्धतामिस्रं महारौरवरौरवौ ।
असिपत्रवनं घोरं कालसूत्रमवीचिकम् ॥
४१ ॥
विनिन्दकानां वेदस्य
यज्ञव्यासेधकारिणाम् ।
स्थानमेतत्समाख्यातं
स्वधर्मत्यागिनश्च ये ॥ ४२ ॥
तामिस्र, अन्धतामिस्त्र, महारौरव, रौरव, असिपत्रवन, घोर, कालसूत्र आणि
अवीचिक आदि जे नरक आहेत ते वेदांची निंदा आणि यज्ञांचा उच्छेद करणार्या तथा
स्वधर्म-विमुख पुरुषांचे स्थान सांगितले गेले आहे .
इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे षष्ठोऽध्यायः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा