शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

 

विष्णुपुराणम्

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमोऽध्यायः ॥

 

"कालिया-दमन"

 

श्रीपराशर उवाच
 एकदा तु विना रामं कृष्णो वृन्दावनं ययौ ।
 विचचार वृतो गोपैर्वन्यपुष्पस्रगुज्ज्वलः ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- एके दिवशी रामला सोबत घेतल्याशिवाय कृष्ण एकटाच वृन्दावनात गेला आणि तिथे वन्य पुष्पमाळांनी सुशोभित होऊन गोपगणांसोबत हिंडू लागला ॥ १ ॥

 


 स जगामाथ कालिन्दीं लोल कल्लोलशालिनीम् ।
 तीरसंलग्नफेनौघैर्हसन्तीमिव सर्वतः ॥ २ ॥

फिरत फिरत ते सगळे चंचल तरंग असलेल्या यमुनेच्या तटावर पोचले जी किनार्‍यावर फेस जमा झाल्याने जणू जोराजोरात हसत आहे अशी भासत होती ॥२॥

 


 तस्याश्चतिमहाभीमं विषाग्निश्रितवारिणम् ।
 ह्रदं कालीयनागस्य ददर्शातिविभीषणम् ॥ ३ ॥

यमुनेत त्यांनी विषाग्निमुळे संतप्त जल असलेले कालियानागाचे महाभयंकर कुण्ड पाहीले ॥ ३ ॥

 


 विषाग्निना प्रसरता दग्धतीरमहीरुहम् ।
 वाताहताम्बुविक्षेपस्पर्शदग्धविहङ्‍गमम् ॥ ४ ॥

त्याच्या विषाग्नीच्या प्रभावाने किनार्‍यावरील वृक्ष जळून गेले होते आणि वार्‍यामुळे उसळणार्‍या जलकणांचा स्पर्श होताच पक्षीगण दग्ध होत होते ॥४॥

 


 तमतीव महा रौद्रं मृत्युवक्रमिवापरम् ।
 विलोक्य चिन्तयामास भगवान्मधुसूदनः ॥ ५ ॥

मृत्युच्या दुसर्‍या मुखासमान ते महाभयंकर कुण्ड पाहून भगवान मधुसूदनाने विचार केला ॥५॥

 


 अस्मिन्वसति दुष्टात्मा कालीयोऽसौ विषायुधः ।
 यो मया निर्जितस्त्यक्त्वा दुष्टो नष्टः पयोनिधिम् ॥ ६ ॥

'ह्यात दुष्टात्मा कालिया नाग राहतो ज्याचे विषच त्याचे शस्त्र आहे आणि जो दुष्ट माझ्याकडून अर्थात माझी विभूति असलेल्या गरुडाकडून पराभूत होऊन समुद्र सोडून इथे पळून आला आहे ॥ ६ ॥

 

तेनेयं दूषिता सर्वा यमुना सागरङ्‍गमा ।
 न नरैगोधनैश्चापि तृषार्तैरुपभुज्यते ॥ ७ ॥

त्याने ही संपूर्ण समुद्रगामिनी यमुना दूषित केली आहे, आता हीचे जल तहानलेल्या माणसांना आणि गाईंना देखील उपयोगाचे राहिले नाही ॥ ७॥

 


 तदस्य नागराजस्य कर्तव्यो निग्रहो मया ।
 निस्त्रासास्तु सुखं येन चरेयुर्व्रजवासिनः ॥ ८ ॥

म्हणून मला ह्या नागराजाचे दमन करायलाच हवे, ज्यामुळे ब्रिजवासी निर्भय होऊन सुखपूर्वक राहू शकतील ॥ ८ ॥

 


 एतदर्थं तु लोकेऽस्मिन्नवतारः कृतो मया ।
 यदेषामुत्पथस्थानां कार्या शान्तिर्दुरात्मनाम् ॥ ९ ॥

“ह्या कुमार्गी दुरात्म्यांना शान्त करण्यासाठीच तर मी ह्या लोकी अवतार घेतला आहे” ॥९॥

 

 
 तदेतं नातिदूरस्थं कदम्बमुरुशाखिनम् ।
 अदिरुद्य पतिष्यामि ह्रदेऽस्मिन्ननिलाशिनः ॥ १० ॥

म्हणून आता मी ऊंचच ऊंच शाखा असलेल्या जवळच्याच कदम्ब वृक्षावर चढून ह्या वायुभक्षी नागराजाच्या कुंडात उडी मारतो ॥ १० ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इत्थं विचिन्त्य बद्ध्वा च गाढं परिकरं ततः ।
 निपपात ह्रदे तत्र नागराजस्य वेगतः ॥ ११ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- हे मैत्रेया ! असा विचार करून भगवंताने वेगाने नागराजाच्या कुंडात उडी मारली ॥ ११ ॥

 


 तेनातिपतता तत्र क्षोभितःस महाह्रदः ।
 अत्यर्थं दूरजातांस्तु समसिञ्चन्महीरुहान् ॥ १२ ॥

त्याच्या उडी मारण्याने महाह्रदाने अत्यन्त क्षोभित होऊन दूर स्थित वृक्षांनाही भिजवून टाकले ॥ १२ ॥


 ते हि दुष्टविषज्वालातप्ताम्बुपवनोक्षिताः ।
 जज्वलुः पादापाःसद्यो ज्वालाव्याप्तदिगन्तराः ॥ १३ ॥

त्या सर्पाच्या विषारी विषाच्या ज्वालांनी तापलेल्या जलाने भिजल्याने त्या वृक्षांनी क्षणार्थात पेट घेतला आणि त्या ज्वाळांनी सम्पूर्ण दिशा व्याप्त झाल्या ॥ १३ ॥

 


 आस्फोटयामास तदा कृष्णो नागह्रदे भुजम् ।
 तच्छब्दश्रवणाच्चाशु नागराजोऽभ्युपागमत् ॥ १४ ॥

तेव्हा कृष्णचन्द्राने त्या नागकुंडात आपल्या भुजा थोपटल्या; त्या आवाजाने तो नागराज लगेच त्यांच्या सम्मुख आला ॥ १४ ॥

 


 आताम्रनयनः कोपाद्विषज्वालाकुलैर्मुखैः ।
 वृतो महाविषैश्चान्यैरुरगैरनिलाशनैः ॥ १५ ॥

त्याचे नेत्र रागाने काहीसे ताम्रवर्ण झाले होते, तोंडातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या आणि तो महाविषारी अन्य वायुभक्षी सर्पांनी घेरलेला होता ॥ १५ ॥

 


 नागपत्‍न्यश्च शतशो हारिहारोपशोभिताः ।
 प्रकम्पिततनुक्षेपचलत्कुण्डलकान्तयः ॥ १६ ॥

त्याच्या सोबत मनोहर हारांनी सुशोभित आणि शरीर-कम्पनामुळे हलणार्‍या कुण्डल कांतीने सुशोभित शेकडो नागपत्नी होत्या ॥ १६ ॥

 


 ततः प्रवेष्टितःसर्पैः स कृष्णे भोगबन्धनैः ।
 ददंशुस्तेऽपि तं कृष्णं विषज्वालाकुलैर्मुखैः ॥ १७ ॥

सर्व सर्पांनी कुण्डलाकार होऊन कृष्णचन्द्राला आपल्या शरीरांनी लपेटले आणि आपल्या विषाग्नि-सन्तप्त मुखांनी दंश करू लागले ॥ १७ ॥

 


 तं तत्र पतितं दृष्ट्‍वा सर्पभोगैर्निपीडितम् ।
 गोपा व्रजमुपागम्य चुक्रुशुः शोकलालसाः ॥ १८ ॥

त्यानन्तर गोपी कृष्णचन्द्राला नागकुंडात पडलेला आणि सर्पांच्या दंशांनी पीडित होत असलेला पाहून ब्रजात गेले व दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागले ॥१८॥

 


 गोपा ऊचुः
 एष मोहं गतः कृष्णो मग्नौ वै कालियह्रदे ।
 भक्ष्यते नागराजेन तमागच्छत पश्यत ॥ १९ ॥

गोपगण म्हणाले;- या,या बघा! हा कृष्ण कालीयडोहात बुडून बेशुद्ध झाला आहे, बघा त्याला नागराज दंश करत आहेत! ॥ १९ ॥

 


 तच्छ्रुत्वा तत्र ते गोपा वज्रपातोपमं वचः ।
 गोप्यश्च त्वरीता जग्मुर्यशोदाप्रमुखा ह्रदम् ॥ २० ॥

वज्रपाता समान त्यांचे हे अमंगल बोलणे ऐकून गोपगण आणि यशोदा आदि गोपी लगेच कालीयाडोहा कडे धावत आले ॥ २० ॥


 हाहा क्वासाविति जनो गोपीनामतिविह्वलः ।
 यशोदया समं भ्रान्तो द्रुतप्रस्खलितं ययौ ॥ २१ ॥

अरेरे! कृष्ण कुठे गेला?' अशाप्रकारे अत्यन्त व्याकुळ होऊन रडणार्‍या गोपीका यशोदासोबत घाईघाईने धडपडत धावत होत्या ॥ २१ ॥

 


 नन्दगोपश्च गोपाश्च रामश्चाद्‍भुतविक्रमः ।
 त्वरितं यमुनां जग्मुः कृष्णदर्शनलालासाः ॥ २२ ॥

नन्द तसेच अन्यान्य गोपगण आणि अद्भुत विक्रमशाली बलराम देखील कृष्णाला पाहायला शीघ्रतापूर्वक यमुना-तटावर आले ॥ २२ ॥

 


 ददृशुश्चापि ते तत्र सर्पराजवशंगतम् ।
 निष्प्रयत्‍नीकृतं कृष्णं सर्पभोगविवेष्टितम् ॥ २३ ॥

तिथे येऊन त्यांनी पाहीले की कृष्णचन्द्र सर्पराजाच्या विळख्यात फसलेला होता आणि त्याने कृष्णाला आपल्या शरीराने लपेटून निरुपाय करून टाकलेले ॥ २३ ॥


 नन्दगोपोऽपि निश्चेष्टो न्यस्य पुत्रमुखे दृशम् ।
 यशोदा च महाभागा बभूव मुनिसत्तम ॥ २४ ॥

हे मुनिसत्तमा! महाभागा यशोदा आणि नन्दगोप सुद्धा पुत्राच्या चेहर्‍याकडे एकटक पाहात स्तम्भित झाले ॥ २४ ॥


 गोप्यस्त्वन्या रुदन्त्यश्च ददृशुः शोककातराः ।
 प्रोचुश्च केशवं प्रीत्या भयकातर्यगद्‍गदम् ॥ २५ ॥

अन्य गोपींनी सुद्धा जेव्हा कृष्णाला अशा स्थितीत पाहीले तेव्हा त्या शोकाकुल होऊन रडू लागल्या आणि घाबरून व्याकुळ होऊन गद्ग़द वाणीने त्याला प्रीतिपूर्वक म्हणू लागल्या ॥ २५ ॥

 

 


 गोप्य ऊचुः
 सर्वा यशोदया सार्धं विशामोत्र महाह्रदम् ।
 सर्पराजस्य नो गन्तुमस्माभिर्युज्यते व्रजम् ॥ २६ ॥

गोपी म्हणाल्या;- आता आम्ही सुद्धा यशोदेसोबत ह्या सर्पराजाच्या महाकुंडात उडी मारतो, आम्हाला आता ब्रजमध्ये जावेसेच वाटत नाही ॥ २६ ॥


 दिवसः को विना सूर्यं विना चन्द्रेण का निशा ।
 विना वृषेण का गावो विना कृष्णेन को व्रजः ॥ २७ ॥

सूर्या शिवाय कसला दिवस? चन्द्रा शिवाय रात्र कशी? बैलांशिवाय गाईंना काय अर्थ? कृष्णाशिवाय ब्रजात ठेवलेच काय आहे? ॥ २७ ॥


 विनाकृता न यास्यामः कृष्णेनानेन गोकुलम् ।
 अरम्यं नातिसेव्यं च वारिहीनं यथा सरः ॥ २८ ॥

कृष्णाला घेतल्याशिवाय आम्ही आता गोकुळात नाही जाणार; कारण त्याच्याशिवाय गोकूळ जलहीन सरोवरा सारखे अत्यंत अभव्य आणि असेव्य आहे ॥ २८ ॥


 यत्र नेन्दीवरश्यामकायकान्तिरयं हरिः ।
 तेनापि मतुर्वासेन रतिरस्तीति विस्मयः ॥ २९ ॥

जिथे नीलकमलदला सारखी प्रभा असणारे श्यामसुन्दर हरी नाही त्या मातृ मन्दिरात प्रीति असणं अतिशय आश्चर्यकारक आहे ॥ २९ ॥

 


 उत्फुल्लपङ्‍कजदलस्पष्टकान्तिविलोचनम् ।
 अपश्यन्तो हरिं दीनाः कथं गोष्ठे भविष्यथ ॥ ३० ॥

अगं! उमललेल्या कमलदलासारखे कान्तियुक्त नेत्र असलेल्या श्रीहरिला बघितल्या शिवाय अत्यन्त दीन झालेली तु ब्रजात कशी राहू शकशील ? ॥ ३० ॥

 


 अत्यन्तमधुरालापहृताशेषमनोरथम् ।
 न विना पुण्डरीकाक्षं यास्यामो नन्दगोकुलम् ॥ ३१ ॥

ज्याने आपल्या अत्यन्त मनोहर बोलीने आमचे समस्त मनोरथ आपल्या वशीभूत केले आहेत त्या कमलनयन कृष्ण चन्द्रा शिवाय आम्ही नन्दाच्या गोकुळात नाही जाणार नहीं ॥ ३१ ॥


 भोगेनाविष्टितस्यापि सर्पराजस्य पश्यत ।
 स्मितशोभिमुखं गोप्यः कृष्णस्यास्मद्विलोकने ॥ ३२ ॥

गोपिकांनो! बघा सर्पराजाच्या फणांनी घेरलेले असूनही श्रीकृष्णाचे मुख आपल्याला पाहून मधुर हास्याने सुशोभित झाले आहे ॥ ३२ ॥

 


 

श्रीपराशर उवाच
 इति गोपीवचः श्रुत्वा रौहिणेयो महाबलः ।
 गोपांश्च त्रासविधुरान्वि लोक्य स्तिमितेक्षणान् ॥ ३३ ॥
 नन्दं च दीनमत्यर्थं न्यस्तदृष्टिं सुतानने ।
 मूर्चाकुलां यशोदां च कृष्णमाहात्मसंज्ञया ॥ ३४ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- गोपिकांचे असे बोलणे ऐकून त्रासलेल्या व चकित झालेल्या गोपांना, पुत्राच्या चेहर्‍याकडे एकटक पाहणारे अत्यन्त दीन नन्दाला आणि शुद्ध हरपायला आलेल्या यशोदेला पाहून महाबली रोहिणीनन्दन बलरामाने श्रीकृष्णाला म्हटले - ॥३३-३४॥

 


 किमिदं देवदेवेश भावोऽयं मानुषस्त्वया ।
 व्यज्यतेऽत्यन्तमात्मानं किमनन्तं न वोत्सि यत् ॥ ३५ ॥

"हे देवदेवेश्वरा! तुम्ही स्वतः अनंत आहात हे माहीत आहे ना? मग असे मानव-भाव का व्यक्त करता आहात? ॥ ३५ ॥

 


 त्वमेव जगतो नाभिरराणामिव संश्रयः ।
 कर्तापहर्ता पाता च त्रौलोक्यं त्वं त्रयीमयः ॥ ३६ ॥

चक्रांची नाभि जशी अरींचे आश्रय असते तसेच आपणही जगताचे आश्रय, कर्ता, हर्ता आणि रक्षक आहात तसेच आपणच त्रैलोक्य स्वरूप आणि वेदत्रयीमय आहात ॥ ३६ ॥

 
 सेन्द्रै रुद्राग्निवसुभिरादित्यैर् मरुदश्विभिः ।
 चिन्त्यसे त्वमचिन्त्यात्मन् समस्तैश्चैव योगिभिः ॥ ३७ ॥

हे अचिन्त्यात्मना! इन्द्र, रुद्र, अग्नि, वसु, आदित्य, मरुद्गण आणि अश्विनी कुमार तसेच समस्त योगिजन आपलेच चिन्तन करतात ॥३७॥

 


 जगत्यर्थं जगन्नाथ भारावतरणेच्छया ।
 अवतीर्णोऽसि मर्त्येषु तवांशश्चाहमग्रजः ॥ ३८ ॥

हे जगन्नाथा! संसाराच्या हितासाठी पृथ्वीचा भार हलका करण्याच्या इच्छेनैच आपण मर्त्यलोकात अवतार घेतला आहे, आपला अग्रज मी सुद्धा आपलाच अंश आहे ॥ ३८ ॥

 
 मनुष्यलीलां भगवन् भजता भवता सुराः ।
 विडम्बयन्तस्त्वल्लीलां सर्व एव सहासते ॥ ३९ ॥

हे भगवंता ! आपण मनुष्य-लीला केल्यामुळे हे गोपवेषधारी समस्त देवगणही आपल्याच लीलांचे अनुकरण करत आपल्या सोबत राहत आहेत ॥ ३९ ॥


 अवतार्य भवान्पूर्वं गोकुले तु सुराङ्‍गनाः ।
 क्रीडार्थमात्मनः पश्चादवर्तीर्णोऽसि शाश्वत ॥ ४० ॥

हे शाश्वता ! आधी विहारार्थ देवाङ्गनांना गोपीरूपात गोकुळात अवतीर्ण करून मग आपण स्वतः अवतार घेतला आहे ॥ ४० ॥


 अत्रावतीर्णयोः कृष्ण गोपा एव हि बान्धवाः ।
 गोप्यश्च सीदतः कस्मादेतान्बन्धूनुपेक्षसे ॥ ४१ ॥

हे कृष्णा ! इथे अवतीर्ण झाल्यावर आपल्या दोघांचे हे गोप और गोपिकाच बान्धव आहेत; तर मग इपल्या ह्या दुखी बान्धवांची आपण अशी उपेक्षा का करत आहात? ॥ ४१ ॥

 


 दर्शितो मानुषो भावो दर्शितं बालचापलम् ।
 तदयं दम्यतां कृष्ण दुष्टात्मा दशनायुधः ॥ ४२ ॥

हे कृष्णा! हा मनुष्य भाव आणि बालचापल्य आपण खूप दाखवले, आता लगेचच दात शस्त्र असलेल्या ह्या दुष्टात्म्याचे दमन करा" ॥ ४२ ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इति संस्मारितः कृष्णः स्मितभिन्नोष्ठसम्पुटः ।
 आस्फोट्य मोचयामास स्वदेहं भोगिबन्धनात् ॥ ४३ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- अशाप्रकारे आठवण करून दिल्यावर मधुर हास्य करत कृष्णचन्द्राने झटक्यात स्वतःचे शरीर सापाच्या बंधनातून सोडवले ॥ ४३ ॥

 


 आनम्य चापि हस्ताभ्यामुभाभ्यां मध्यमं शिरः ।
 आरुह्याभुग्नशिरसः प्रणनर्तोरुविक्रमः ॥ ४४ ॥

आणि मग आपल्या दोन्ही हातांनी त्याची मधली फणा वाकवून त्या नतमस्तक सर्पावर चढून अतिशय वेगाने नाचू लागले ॥ ४४ ॥

 

 


 प्राणाः फणेऽभवंश्चास्य कृष्णस्याङ्‌‍घ्रिनिकुट्टनैः ।
 यत्रोन्नतिं च कुरुते ननामास्य ततः शिरः ॥ ४५ ॥

कृष्णचन्द्राच्या पायातील जोरामुळे त्या सर्पाचे प्राण कंठात गोळा झाले, तो आपले जे मस्तक उचलायचा त्यावरच उडी मारून कृष्ण ते वाकवायचा ॥ ४५ ॥

 


 मूर्चामुपाययौ भ्रान्त्या नागः कृष्णस्य रेचकैः ।
 दण्डपातनिपातेन ववाम रुधिरं बहु ॥ ४६ ॥

कृष्णचन्द्राने भ्रान्ति (भ्रम), रेचक तसेच दण्डपात नावाच्या नृत्यसंबंधित गतींनी ताडन केल्याने तो महासर्प मूर्छित झाला आणि तोंडातून रक्त ओकू लागला ॥४६॥


 तं विभिग्रशिरोग्रीवमास्येभ्यः स्रुतशोणितम् ।
 विलोक्य करुणं जग्मुस्तत्पत्‍न्यो मधुसूदनम् ॥ ४७ ॥

अशाप्रकारे त्याची मस्तके आणि गळे झुकलेले तसेच तोंडातून वाहणारे रक्त पाहून त्याच्या पत्न्या काकुळतीने श्रीकृष्णा जवळ आल्या ॥ ४७ ॥

 


 नागपत्‍न्य ऊचुः
 ज्ञातोऽसि देवदेवेश सर्वज्ञस्त्वमनुत्तमः ।
 परं ज्योतिरचिन्त्यं यत्तदंशः परमेश्वरः ॥ ४८ ॥

नागपत्न्या म्हणाल्या;- हे देव देवेश्वरा! आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही सर्वज्ञ आणि सर्वश्रेष्ठ आहा; जो अचिन्त्य आणि परमज्योति आहे आपण त्याचाच अंश परमेश्वर आहात, ॥ ४८ ॥

 
 न समर्थाः सुराःस्तोतुं यमनन्यभवं विभुम् ।
 स्वरूपवर्णनं तस्य कथं योषित्करिष्यति ॥ ४९ ॥

ज्या स्वयम्भू व व्यापक प्रभुची स्तुति करण्यास देवगण सुद्धा असमर्थ आहेत त्या आपल्या स्वरूपाचे आम्ही स्त्रिया कसं वर्णन करू शकू? ॥ ४९ ॥


 यस्याखिलमहीर्व्योमजलाग्निपवनात्मकम् ।
 ब्रह्माण्डमल्पकाल्पांशः स्तोष्यामस्तं कथं वयम् ॥ ५० ॥

पृथ्वी, आकाश, जल, अग्नि आणि वायु स्वरूप हे सम्पूर्ण ब्रह्माण्ड ज्याचा छोट्यातला छोटा अंश आहे, त्याची स्तुति आम्ही कशी करणार? ॥ ५० ॥


 यतन्तो न विदुर्नित्यं यत्स्वरूपं हि योगिनः ।
 परमार्थमणोरल्पं स्थूलात्स्थूलं नताः स्म तम् ॥ ५१ ॥

योगिजन ज्याचे नित्यस्वरूप प्रयत्न करूनही जाणू शकत नाहीत तसेच जो परमार्थरूप अणुहूनही अणु आणि स्थूलाहूनही स्थूल आहे त्याला आम्ही नमस्कार करतो ॥ ५१ ॥


 न यस्य जन्मने धाता यस्य चान्ताय नान्तकः ।
 स्थितिकर्ता न चान्योऽस्ति यस्य तस्मै नमःसदा ॥ ५२ ॥

विधाता आणि काळ ज्याचे जन्म आणि अंताचे कारण नाहीत तसेच ज्याचा स्थितिकर्ता सुद्धा कोणी अन्य नाही त्यांना सर्वदा नमस्कार ॥ ५२ ॥

 


 कोपः स्वल्पोऽपि ते नास्ति स्थितिपालनमेव ते ।
 कारणं कालियस्यास्य दमने श्रुयतां वचः ॥ ५३ ॥

आपण क्रोधीत झाल्याने ह्या कालियनागाचे दमन करत नाही आहात तर केवळ लोक रक्षण हाच आपला हेतू आहे, म्हणून आमचे निवेदन ऐका ॥ ५३ ॥

 

 स्त्रियोनुकम्प्याःसाधूनां मूढा दीनाश्च जन्तवः ।
 यतस्ततोऽस्य दीनस्य क्षम्यतां क्षमतां वर ॥ ५४ ॥

हे क्षमाशीलांमध्ये श्रेष्ठा! साधु पुरुषांनी स्त्रिया तसेच मूढ़ आणि दीन जन्तुंवर सदैव कृपा करायला हवी, म्हणून आपण आम्हा दीनांचा अपराध क्षमा करा ॥ ५४ ॥



 समस्तजगदाधारो भवानल्पबलः फणी ।
 त्वत्पादपीडितो जह्यान्मुहूर्तार्धेन जीवितम् ॥ ५५ ॥

प्रभों! आपण सम्पूर्ण संसाराचे अधिष्ठान आहात आणि आपल्या तुलनेत हा सर्प तर अत्यन्त बलहीन आहे. आपल्या चरणांनी पीडित होऊन तो पुढच्याच मुहूर्तात आपले प्राण त्यागेल ॥ ५५ ॥


 क्व पन्नगोऽल्पवीर्योऽयं क्व भवान् भुवनाश्रयः ।
 प्रीतिद्वेषौ समोत्कृष्टगोचरौ भवतोऽव्यय ॥ ५६ ॥

हे अव्यया! प्रीति समानांशी आणि द्वेष उत्कृष्टांचा केला जातो; मग कुठे हा अल्पवीर्य सर्प आणि कुठे अखिल भुवनाश्रय आपण? ॥ ५६॥

 

 

 

 ततः कुरु जगत्स्वामिन्प्रसादमवसीदतः ।
 प्राणांस्त्यजति नागोऽयं भर्तृभिक्षा प्रदीयताम् ॥ ५७ ॥

म्हणून हे जगत स्वामी! ह्या दीनावर दया करा. हे प्रभो! आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छितो, कृपा करून आम्हाला आमच्या पतिची भिक्षा द्या ॥ ५७ ॥

 

 
 भुवनेश जगन्नाथ महापुरुष पूर्वज ।
 प्राणांस्त्यजति नागोऽयं भर्तृभिक्षां प्रयच्छ नः ॥ ५८ ॥

हे भुवनेश्वरा! हे जगन्नाथा! हे महापुरुषा! हे पूर्वजा  आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छितो, कृपा करून आम्हाला आमच्या पतिची भिक्षा द्या ॥ ५८ ॥

 


 वेदान्तवेद्य देवेश दुष्टदैत्यनिबर्हण ।
 प्राणांस्त्यजति नागोऽयं भर्तृभिक्षा प्रदीयताम् ॥ ५९ ॥

हे वेदान्तवेद्य देवत्श्वरा ! हे दुष्ट-दैत्य-दलना ! आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छितो, कृपा करून आम्हाला आमच्या पतिची भिक्षा द्या ॥ ५९ ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इत्युक्ते ताभिराश्वस्य क्लान्तदेहोऽपि पन्नगः ।
 प्रसीद देवदेवेति प्राह वाक्यं शनैः शनैः ॥ ६० ॥

श्रीपराशर म्हणाले ;- नागपत्नींनी असे म्हटल्यावर थकलेला नागराज धीर एकवटून म्हणाला 'हे देवदेवा ! प्रसन्न व्हा" ॥ ६० ॥

 


 कालिय उवाच
 तवाष्टगुणमैश्वर्यं नाथ स्वाभाविकं परम् ।
 निरस्तातिशयं यस्य तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६१ ॥

कालियानाग म्हणाला ;- हे नाथा ! आपला स्वभाविक अष्टगुणविशिष्ट परम ऐश्वर्य निरतिशय आहे [म्हणजेच आपणाहून जास्त कोणाचेच ऐश्वर्य नाही], म्हणून मी कशा प्रकारे आपली स्तुति करू शकेन ? ॥ ६१॥


 त्वं परस्त्वं परस्याद्यः परं त्वत्तः परात्मक ।
 परस्मात्परमो यस्त्वं तस्य स्तोष्यामि किन्न्वहम् ॥ ६२ ॥

आपण पर आहात आपण पर (मूलप्रकृति) चेसुद्धा आदिकारण आहात. हे परात्मका ! परची प्रवृत्तिसुद्धा आपल्यापासूनच झाली आहे, म्हणून आपण परहूनही पर आहात; मग मी आपली स्तुति कशी करू शकेन? ॥६२॥

 


 यस्माद्‍बह्माच रुद्रश्च चन्द्रेद्रमरुदश्विनः ।
 वसवश्च सहादित्यैस्तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६३ ॥

ज्यांच्यापासून ब्रह्मा, रुद्र, चन्द्र, इन्द्र, मरुद्गण, अश्विनी कुमार, वसुगण आणि आदित्य आदि सगळे उत्पन्न झाले; त्यांची स्तुति मी कशी करू शकेन ? ॥ ६३ ॥

 


 एकावयवसूक्ष्मांशो यस्यैतदखिलं जगत् ।
 कल्पनावयवस्यांशस्तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६४ ॥

हे सम्पूर्ण जगत ज्यांच्या काल्पनिक अवयवाचा एक सूक्ष्म अवयवांशमात्र आहे, त्या आपली स्तुति मी कशी करू शकेन ? ॥ ६४ ॥

 


 सदसद्‍रूपिणो यस्य ब्रह्माद्यास्त्रिदशेश्वराः ।
 परमार्थं न जानन्ति तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६५ ॥

ज्या सदसत् (कार्य-कारण) स्वरूपाच्या वास्तविक रूपाला ब्रह्मादि देवेश्वरगण सुद्धा जाणत नाहीत त्या आपली स्तुति मी कशी करू शकेन ? ॥ ६५ ॥

 


 ब्रह्माद्यैरर्चितो यस्तु गन्धपुष्पानुलेपनैः ।
 नन्दनादिसमुद्‍भूतैः सोर्च्यते वा कथं मया ॥ ६६ ॥

ज्यांची पूजा ब्रह्मा आदि देवगण नंदनवन पुष्प, गन्ध आणि अनुलेपन आदिंनी करतात त्या आपली पूजा मी कशी करू ? ॥६६॥

 


 यस्यावताररूपाणि देवराजःसदार्चति ।
 न वेत्ति परमं रूपं सोऽर्च्यते वा कथं मया ॥ ६७ ॥

देवराज इंद्र ज्यांच्या अवतार रूपांची सर्वदा पूजा करतात तरीही यथार्थ रूप जाणत नाही त्या आपली पूजा मी कशी करू ? ॥६७॥

 

 


 विषयेभ्यः समावृत्त्य सर्वाक्षाणि च योगिनः ।
 यमर्चयन्ति ध्यानेन सोऽर्च्यते वा कथं मया ॥ ६८ ॥

योगिगण आपल्या समस्त इन्द्रियांना त्यांच्या विषयापासून खेचून ज्यांचे ध्यानद्वारा पूजन करतात त्या आपली पूजा मी कशी करू ?॥ ६८॥


 हृदि संकल्प्य यद्‍रूपं ध्यानेनार्चन्ति योगिनः ।
 भावपुष्पादिना नाथः सोऽर्च्यते वा कथं मया ॥ ६९ ॥

ज्या प्रभुच्या स्वरूपाची चित्तात भावना करून योगिजन भावमय पुष्पादिंनी ध्यानद्वारा उपासना करतात त्या आपली पूजा मी कशी करू ? ॥ ६९ ॥

 


 सोऽहं ते देवदेवेश नार्चनादौ स्तुतौ न च ।
 सामर्थ्यवान् कृपामात्रमनोवृत्तिः प्रसीद मे ॥ ७० ॥

हे देवदेवेश्वरा ! आपली पूजा अथवा स्तुति करण्यास मी सर्वथा असमर्थ आहे, माझ्या चित्तवृत्ति केवळ आपल्या कृपेकडेच लागलेली आहे, म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हा ॥ ७०।।


 सर्पजातिरियं क्रूरा यस्यां जातोऽस्मि केशव ।
 तत्स्वभावोऽयमत्रास्ति नापराधो ममाच्युत ॥ ७१ ॥

हे केशवा ! माझा ज्यात जन्म झाला आहे ती सर्पजाति अत्यन्त क्रूर असते, हा माझा जातीय स्वभाव आहे. हे अच्युता ! ह्यात माझा कोणताच अपराध नाही ॥ ७१ ॥


 सृज्यते भवता सर्वं तथा संह्रीयते जगत् ।
 जातिरूपस्वभावाश्च सृज्यन्ते सृजता त्वया ॥ ७२ ॥

ह्या सम्पूर्ण जगताची रचना आणि संहार आपणच करता. संसारातील रचनांसोबतच त्यांच्या जाति, रूप आणि स्वभाव सुद्धा आपणच बनवता ॥ ७२ ॥

 


 यथाहं भवता सृष्टो जात्या रूपेण चेश्वर ।
 स्वभावेन च संयुक्तस्तथेदं चेष्टितं मया ॥ ७३ ॥

हे ईश्वरा ! आपण मला जाति, रूप आणि स्वभावाने युक्त करून जसे बनवले तसेच मी वागत आहे ॥ ७३ ॥


 यद्यन्यथा प्रवर्तेयं देवदेव ततो मयि ।
 न्यायो दण्डनिपातो वै तवैववचनं यथा ॥ ७४ ॥

हे देव देवा! जर माझे आचरण विपरीत असेल तर अवश्य आपल्या कथना नुसार मला दण्ड देणं योग्य आहे ॥ ७४ ॥


 तथाप्यज्ञे जगत्स्वामिन्दण्डं पातितवान्मयि ।
 स श्लाघ्योऽयं परो दण्डस्त्वत्तो मे नान्यतो वरः ॥ ७५ ॥

तथापि हे जगत-स्वमी ! आपण मझ्यासारख्या अज्ञानीला जो दण्ड दिला आहे तो आपल्याकडून मिळालेला दंड माझ्यासाठी चांगलाच आहे, त्याबदल्यात मला दुसर्‍या कोणाचे वरदानही नको ॥ ७५ ॥


 हतवीर्यो हतविषो दमितोऽहं त्वयाच्युत ।
 जीवितं दीयतामेकमाज्ञापय करोमि किम् ॥ ७६ ॥

हे अच्युता ! आपण माझा पुरुषार्थ आणि विष नष्ट करून चांगल्याप्रकारे माझे मानमर्दन केले आहे. आता केवळ माझे प्राणदान करा आणि आज्ञा द्या की मी काय करू ? ॥ ७६ ॥

 


 श्रीभगवानुवाच
 नात्र स्थेयं त्वया सर्प कदाचिद्‌यमुनाजले ।
 सपुत्रपरिवारस्त्वं समुद्रसलिलं व्रज ॥ ७७ ॥

श्रीभगवंत म्हणाले ;- हे सर्पा ! आता तु ह्या यमुना जलात राहू नकोस. आताच्याआता आपल्या पुत्र व परिवारा सहित समुद्राच्या जलात जा ॥ ७७ ॥

 

 
 मत्पदानि च ते सर्प दृष्ट्‍वा मूर्धनि सागरे ।
 गरुडः पन्नगरिपुस्त्वयि न प्रहरिष्यति ॥ ७८ ॥

तुझ्या मस्तकावर माझी चरण-चिह्ने पाहून समुद्रात राहात असूनही सर्प शत्रु गरुड तुझ्यावर प्रहार करणार नाही ॥ ७८ ॥

 

श्रीपराशर उवाच
 इत्युक्त्वा सर्पराजं तं मुमोच भगवान्हरिः ।
 प्रणम्य सोऽपि कृष्णाय जगाम पयसां निधिम् ॥ ७९ ॥
 पश्यतां सर्वभूतानां सभृत्यसुतबान्धवः ।
 समस्तभार्यासहितः परित्यज्य स्वकं ह्रदम् ॥ ८० ॥

श्रीपराशर म्हणाले ;-  सर्पराज कालियाहा असे सांगून श्रीहरीने त्याला सोडून दिले आणि तो त्यांना प्रणाम करून समस्त प्राण्यांच्या देखत आपले सेवक, पुत्र, बन्धु आणि समस्त स्त्रियांसह ते कुण्ड सोडून समुद्रात निघून गेला ॥ ७९-८० ॥

 



 गते सर्पे परिष्वज्य मृतं पुनरिवागतम् ।
 गोपा मूर्धनि हार्देन सिषिचुर्नेत्रजैर्जलैः ॥ ८१ ॥

सर्प गेल्यानंतर गोपगण, परत जिवंत झालेल्या मृत पुरुषा समान कृष्णचन्द्राला मीठी मारून प्रेमाने त्याचे मस्तक अश्रुंनी भिजवू लागले ॥ ८१ ॥


 कृष्णामाक्लिष्टकर्माणमन्ये विस्मितचेतसः ।
 तुष्टुवुर्मुदिता गोपा दृष्ट्‍वा शिवजलां नदीम् ॥ ८२ ॥

काही अन्य गोपगण यमुनेचे जल स्वच्छ झालेले पाहून प्रसन्न होऊन लीलाबिहारी कृष्णाची आश्चर्याने स्तुति करू लागले ॥ ८२ ॥

 


 गीयमानः स गोपीभिश्चारितैः साधुचेष्टितैः ।
 संस्तूयमानो गोपैश्च कृष्णो व्रजमुपागमत् ॥ ८३ ॥

त्यानन्तर आपल्या उत्तम चरित्राविषयीची गाणी गोपिंकडून एकत आणि गोपांकडून प्रशंसित होत कृष्णचन्द्र ब्रज ला गेले ॥ ८३ ॥

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे
सप्तमोऽध्यायः (७)

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, षष्ठ अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 6

 

विष्णुपुराणम्

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥

 

शकटभज्जन, यमलार्जुन-उद्धार, ब्रिजवासींचे गोकुळातून वृन्दावनात जाणे आणि वर्षा-वर्णन"

श्रीपराशर उवाच
 कदाचिच्छकटस्याधः शयानो मधुसूदनः ।
 चिक्षेप चरणावूर्ध्वं स्तन्यार्थी प्ररुरोद ह ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- एके दिवशी छकड्याखाली झोपलेल्या मधुसूदनाने दूधासाठी रडताना वर लाथ मारली

 
 तस्य पादप्रहारेण शकटं परिवर्तितम् ।
 विध्वस्तकुम्भभाण्डं तद्विपरीतं पपात वै ॥ २ ॥

लाथेमुळे छकड़ा उलटा होऊन त्यात ठेवलेली भांडी मडकी फुटली आणि  तो उलटा पडला ॥२॥


 ततो हाहाकृतः सर्वो गोपरोपीजनो द्विज ।
 आजगामाथ ददृशे बालमुत्तानशायिनम् ॥ ३ ॥

हे द्विजा ! तेव्हा हाहाकार झाला, समस्त गोप-गोपी गण तिथे आले आणि त्या बाळाला उलटे झोपलेले पाहीले


 गोपाः केनेति केनेदं शकटं परिवर्तितम् ।
 तत्रैव बालकाः प्रोचुर्बालेनानेन पातितम् ॥ ४ ॥

गोपीगण विचारू लागले की 'हा छकडा कोणी उलटवला ? तेव्हा खेळणार्‍या मुलांनी सांगितले-"हा कृष्णानेच उलटवला आहे


 रुदता दृष्टमस्माभिः पादविक्षेपपातितम् ।
 शकटं परिवृत्तं वै नैतदन्यस्य चेष्टितम् ॥ ५ ॥

आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहीले की रडताना त्याची लाथ लागूनच हा छकड़ा उलटा झाला. हे आणखी कोणाचेही काम नाही"



 ततः पुनरतीवासन्गोपा विस्मयचेतसः ।
 नन्दगोपोपि जग्राह बालमत्यन्तविस्मितः ॥ ६ ॥

 हे ऐकून गोपी अत्यन्त विस्मित झाले आणि नन्दगोपाने अत्यन्त चकित होऊन बाळाला उचलून घेतले ॥६॥

 

 यशोदा शकटारूढभग्नभाण्डकपालिका ।
 शकटं चार्चयामास दधिपुष्पफलाक्षतैः ॥ ७ ॥

मग यशोदेने सुद्धा छकड्यात ठेवलेल्या फुटलेल्या भांड्यांच्या तुकड्यांची आणि त्या छकड्याची दही, पुष्प, अक्षता आणि फळादिंनी पूजा केली ॥७



 गर्गश्च गोकुले तत्र वसुदेवप्रचोदितः ।
 प्रच्छन्न एव गोपानां संस्कारानकरोत्तयोः ॥ ८ ॥

ह्यावेळी वसुदेवाच्या सांगण्यावरू गर्गाचार्यांनी गोपींच्या नकळत गोकुळात येऊन त्या दोन्ही बालकांचे द्विजोचित संस्कार केले ८॥

 


 ज्येष्ठं च राममित्याह कृष्णं चैव तथावरम् ।
 गर्गो मतिमतां श्रेष्ठो नाम कुर्वन्महामतिः ॥ ९ ॥

त्या दोघांचा नामकरण संस्कार करताना महामति गर्गांनी मोठ्याचे नाव राम आणि छोट्याचे कृष्ण असे सांगितले ॥९॥

 


 स्वल्पेनैव तु कालेन रिङ्‌‍गिणौ तौ तदा व्रजे ।
 घृष्टजानुकरौ विप्र बभूवतुरुभावपि ॥ १० ॥

हे विप्रा ! ते दोन्ही बालक थोड्याच दिवसात हातापायांवर रांगत रांगत गाईंच्या गोठ्यात जाऊ लागले १०


 करीषभस्मदिग्धाङ्‍गौ भ्रममाणावितस्ततः ।
 न निवारयितुं सेहे यशोदा तौ न रोहिणी ॥ ११ ॥

शेण आणि मातीने भरलेल्या शरीराने इथे तिथे फिरणार्‍या त्या बालकांना यशोदा आणि रोहिणीला अडवू शकत नव्हत्या ।। ११ ।।



गोवाटमध्ये क्रीडन्तौ वत्सवाटं गतौ पुनः ।
तदहर्जातगोवत्सपुच्छाकर्षणतत्परौ ॥ १२ ॥

कधी ते गाईंच्या घोळक्यात खेळायचे तर कधी वासरांमध्ये जायचे तर कधीकधी त्याच दिवशी जन्मलेल्या वासरांची शेपूट ओढून खेचायचे ॥ १२ ॥



 यदा यशोदा तौ बालावेकस्थानचरावुभौ ।
 शशाक नो वारयितुं क्रीडन्तावतिचञ्चलौ ॥ १३ ॥
 दाम्ना मध्ये ततो बद्‌ध्वा बबन्ध तमुलूखले ।
 कृष्णमक्लिष्टकर्माणमाह चेदममर्षिता ॥ १४ ॥

एक दिवस जेव्हा यशोदा, त्या अतिशय चंचल बाळांना रोखू शकली नाही तेव्हा तिने निरागस कृष्णाच्या कमरेला दोरी बांधून त्याला उखळाला बांधले आणि रागाने म्हणाली - १३-१४


 यदि शक्नोषि गच्छ त्वमतिचञ्चलचेष्टित ।
 इत्युक्त्वाथ निजं कर्म सा चकार कुटुम्बिनी ॥ १५ ॥

अरे मस्तीखोरा ! आता तुझ्यात ताकद असेल तर जाऊन दाखव.असे म्हणून यशोदा आपल्या घरच्या कामात मग्न झाली १५

 


व्याग्रायामथ तस्यां स कर्षमाम उलूखलम् ।
यमलार्जुनमध्येन जगाम कमलेक्षणः ॥ १६ ॥

ती घरकामाला लागल्यावर कमल नयन कृष्ण ऊखळ खेचत खेचत यमलार्जुनच्या मध्ये गेला १६॥


 कर्षता वृक्षयोर्मध्ये तिर्यग्गतमुलूखलम् ।
 भग्नावुत्तुङ्‍गशाखाग्रौ तेन तौ यमलार्जुनौ ॥ १७ ॥

आणि त्या दोन्ही वृक्षांमध्ये तिरकी पडलेली उखळ खेचत उंच फांद्या असलेले यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष उखडले १७

 


 ततः कटकटाशब्दसमाकर्णनतत्परः ।
 आजगाम व्रजजनो ददर्श च महाद्रुमौ ॥ १८ ॥
 नवोद्‍गताल्पदन्तांशुसितहासं च बालकम् ।
 तयोर्मध्यगतं दाम्ना बद्धं गाढं तथोदरे ॥ १९ ॥
 ततश्च तामोदरतां स ययौ दामबन्धनात् ॥ २० ॥

तेव्हा त्यांच्या मोडण्याचा कट-कट आवाज ऐकून ब्रिजवासी तिथे धावत आले आणि त्या दोन्ही महावृक्षांना तसेच त्यांच्या मधोमध कमरेला करकचून दोरी बांधलेल्या बाळाला आपल्या चिमुकल्या शुभ्र दातांनी शुभ्र हसताना पाहीले. तेव्हापासून दोरीने बांधले गेल्याने त्यांचे नाव दामोदर पडले  ॥ १८-२०॥


 गोपवृद्धास्ततः सर्वे नन्दगोपपुरोगमाः ।
 मन्त्रयामासुरुद्विग्ना महोत्पातातिभीरवः ॥ २१ ॥

तेव्हा नन्दगोप आदि समस्त वृद्ध गोपींनी महान् उत्पातांमुळे अत्यन्त भयभीत होऊन आपसात ठरवले की- २१


 स्थानेनेह न नः कार्यं व्रजामोन्यन्महावनम् ।
 उत्पाता बहवो ह्यत्र दृश्यन्ते नाशहेतवः ॥ २२ ॥
 पूतनाया विनाशश्च शकटस्य विपर्ययः ।
 विना वातादिदोषेण द्रुमयोः पतनं तथा ॥ २३ ॥

'आता ह्या ठिकाणी राहण्यात काही अर्थ नाही, आपण दुसर्‍या एखाद्या महावनात जायला हवे. कारण इथे पूतना-वध, छकडा उलटणे तसेच वादळ किंवा अन्य कोणत्याही कारणाशिवाय वृक्ष पडणे इत्यादि अनेक उपद्रवी उत्पात अनुभवायला मिळत आहेत २२-२३


 वृन्दावनमितः स्थानात्तस्माद्‍गच्छाम मा चिरम् ।
 यावद्‍भौममहोत्पातदोषो नाभिभवेद्‌व्रजम् ॥ २४ ॥

म्हणून जोवर भूमि सम्बन्धी एखादा महान् उत्पात ब्रजभूमीला नष्ट करत नाही तोवर आपण सर्व त्वरित इथून वृन्दावनाला जाऊया २४


 इति कृत्वा मतिं सर्वे गमने ते व्रजौकसः ।
 ऊचुः स्वं स्वं कुलं शीघ्रं गम्यतां मा विलम्बथ ॥ २५ ॥

अशा प्रकारे ते सर्व ब्रिजवासी जाण्याचा विचार करून आपापल्या कुटुम्बातील  लोकांना लवकर चला, उशीर करू नका असे म्हणू लागले ॥ २५ ॥


 ततः क्षणेन प्रययुः शकटैर्गोधनैस्तथा ।
 यूथशो वत्सपालाश्च कालयन्तो व्रजौकसः ॥ २६ ॥

तेव्हा ते ब्रिजवासी वत्सपाल दल बांधून एकाच क्षणात छकडे आणि गाईंसोबत त्यांना हाकत तिथून निघाले २६


 द्रव्यावयवनिर्धूतं क्षणमात्रेण तत्तथा ।
 काकभाससमाकीर्णं व्रजस्थानमभूद्‌द्विज ॥ २७ ॥

हे द्विजा! वस्तुंच्या अवशिष्टांशांनी युक्त ती ब्रजभूमि क्षणभरातच कावळे भास आदि पक्ष्यांनी भरून गेली २७


 वृन्दावनं भगवता कृष्णेना क्लिष्टकर्मणा ।
 शुभेन मनसा ध्यातं गवं सिद्धिमभीप्सता ॥ २८ ॥

तेव्हा लीलाधारी कृष्णाने गाईंच्या अभिवृद्धिसाठी आपल्या शुद्धचित्ताने वृन्दावनाचे चिन्तन केले ॥२८॥


 ततस्तत्रातिरूक्षेऽपि घर्मकाले द्विजोत्तम ।
 प्रावृट्काल इवोद्‍भूतं नवशष्पं समन्ततः ॥ २९ ॥

त्यामुळे हे द्विजोत्तमा ! अत्यन्त रूक्ष ग्रीष्म काळातही तिथे वर्षा ऋतु सारखे सगळीकडे कोवळे गवत उत्पन्न झाले २९


 स समावासितः सर्वो व्रजो वृन्दावने ततः ।
 शकटावाटपर्यन्तश्चन्द्रार्धाकारसंस्थितः ॥ ३० ॥

तेव्हा ते ब्रज चारही बाजूंनी अर्ध चन्द्राकार छकडे लावून स्थित झाले आणि ब्रिजवासी तिथे राहू लागले ३०


 वत्सपालौ च संवृत्तौ रामदामोदरौ ततः ।
 एक स्थनस्थितौ गोष्ठे चेरतुर्बाललीलया ॥ ३१ ॥

त्यानन्तर राम आणि कृष्णसुद्धा वासरे राखू लागले आणि एकाच ठिकाणी राहून गोठ्यात बाललीला करू लागले ३१


 बर्हिपत्रकृतापीडौ वन्यपुष्पावतंसकौ ।
 गोपवेणुकृतातोद्यपत्रवाद्यकृतस्वनौ ॥ ३२ ॥                       काकपक्षधरौ बालौ कुमाराविव पावकी ।
 हसन्तौ च रमन्तौ च चेरतुः स्म महावनम् ॥ ३३ ॥

ते काक पक्षधारी दोन्ही बालक डोक्यावर मोरपिसाचा मुकुट धारण करून तसेच वन्यपुष्पांची कर्णभूषणे घालून ग्वालोचित बासरी आदि सर्व प्रकारचे वाद्यध्वनी करत तसेट पर्णवाद्यांनी नाना प्रकारे ध्वनि करत, हसत खे त्या महावनात फिरू लागले ३२-३३

 

क्वचिद्वहन्तावन्योन्यं क्रीडमानौ तथा परैः ।
गोपपुत्रैः समं वत्सांश्चारयन्तौ विचेरतुः ॥ ३४ ॥

कधी खेळताना एक दुसर्‍यारा आपल्या पाठीवर घेवून जायचे तर कधी अन्य ग्वालबालांसह वासरांना चारत त्यांच्यासोबत फिरायचे ३४


 कालेन गच्छता तौ तु सप्तवर्षौ महाव्रजे ।
 सर्वस्य जगतः पालौ वत्सपालौ बभूवतुः ॥ ३५ ॥

अशाप्रकारे त्या महाव्रजात राहात असताना निखिललोक पालक वत्सपाल सात वर्षांचे झाले ३५


 प्रावृट्कालस्ततोऽतीव मेघौघस्थगिताम्बरः ।
 बभूव वारिधाराभिरैक्यं कुर्वन्दिशामिव ॥ ३६ ॥

तेव्हा मेघसमूहांनी आकाश आच्छादित करणारा जलधारांनी दिशा एकरूप करणारा  पावसाळा आला ३६


 प्ररूढनवशष्पाढ्या शक्रगोपाचिता मही ।
 तथा मारकतीवासीत्पद्मरागविभूषिता ॥ ३७ ॥

त्यावेळी नवीन गवत वाढल्याने पृथ्वी पद्मरागविभूषिता पाचूसारखी हिरवीगार दिसू लागली ॥३७॥

 

ऊहुरुन्मार्गवाहीनि निम्नगाम्भांसि सर्वतः ।
मनांसि दुर्विनीतानां प्राप्य लक्ष्मीं नवामिव ॥ ३८ ॥

नवीन धन मिळाल्यावर दुष्ट पुरुषांचे चित्त जसे चंचल होते त्याचप्रमाणे नदीचे जल सगळीकडे आपला निर्दिष्ट मार्ग सोडून वाहू लागले ३८

 


 न रेजेऽन्तरितश्चन्द्रो निर्मलो मलिनैर्घनैः ।
 सद्वादिवादो मूर्खणां प्रगल्भाभिरिवोक्तिभिः ॥ ३९ ॥

मूर्ख माणसाच्या उद्धट बोलण्यापुढे जशी चांगल्या वक्त्याची वाणी सुद्धा मलिन होते तशसेच मलिन मेघांनी आच्छादित राहिल्याने निर्मळ चन्द्र शोभाहीन दिसू लागला  


 निर्गुणेनापि चापेन शक्रस्य गगने पदम् ।
 अवाप्यताविवेकस्य नृपस्यैव परिग्रहे ॥ ४० ॥

विवेकहीन राजाच्या संगतीत जसा गुणहीन माणूस सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त करतो तसेच आकाशमंडळात गुणरहित इंद्रधनुष स्थित झाले ४०


 मेघपृष्ठे बलाकानां रराज विमला ततिः ।
 दुर्वत्ते वृत्तचेष्टेव कुलीनस्यातिशोभना ॥ ४१ ॥

दुराचारी पुरुषात कुलीन पुरुषाची निष्कपट शुभचेष्टा दिसावी तशी मेघमंडळात बगळ्यांची निर्मळ पंक्ति सुशोभित होऊ लागते ४१


 न बबन्धाम्बरे स्थैर्यं विद्युदत्यन्तचञ्चला ।
 मैत्रीव प्रवरे पुंसि दुर्जनेन प्रयोजिता ॥ ४२ ॥

श्रेष्ठ पुरुषांसोबत दुर्जनांची मैत्री असावी तशी अत्यन्त चंचल वीज आकाशात स्थीर राहात नव्हती ४२


 मार्गा बभूवुरस्पष्टास्तृणशष्पचयावृताः ।
 अर्थान्तरमनुप्राप्ताः प्रजडानामिवोक्तयः ॥ ४३ ॥

महामूर्ख माणसांच्या जडवाक्यांसारखे मार्गातील तृण आणि दूबसमूह आच्छादित होऊन अस्पष्ट झाले ४३


 उन्मत्तशिखिसारङ्‍गे तस्मिन्काले महावने ।
 कृष्णरामौ मुदायुक्तौ गोपालैश्चेरतुः सह ॥ ४४ ॥

त्यावेळी उन्मत्त मयूर आणि चातकगणांनी सुशोभित महावनात कृष्ण आणि राम प्रसन्नतेने गोपीकुमारांसह भटकू लागले ४४


 क्वचिद्‍गोभिः समं रम्यं गेयतानरतावुभौ ।
 चेरतुः क्वचिदत्यर्थं शीतवृक्षतलाश्रितौ ॥ ४५ ॥

ते दोघं कधी गाईंसोबत मनोहर गाण म्हणत तान छेडायचे तर कधी अत्यन्त शीतल वृक्षातळी  आश्रय घेत भटकायचे ४५


 क्वचित्कदम्बस्रक्चित्रौ मयूरस्रग्विराजितौ ।
 विलिप्तौ क्वचिदासातां विविधैर्गिरिधातुभिः ॥ ४६ ॥

कधी ते कदम्ब पुष्पांच्या हारांनी विचित्र वेष बनवायचे तर कधी, मोरपिसांच्या माळांनी सुशोभित व्हायचे आणि कधी नाना प्रकारच्या पर्वतीय धातुंचा आपल्या शरीराला लेप लावायचे ।। ४६


 पर्णशय्यासु संसुप्तौ क्वचिन्निद्रान्तरैषिणौ ।
 क्वचिद्‍गर्जति जीमूते हाहाकाररवाकुलौ ॥ ४७ ॥

कधी थोडीशी डुलकी काढण्यासाठी पानांच्या शय्येवर आडवे व्हायचे तर कधी मेघ गर्जना

कून 'हा हा' करत गदारोळ माजवायचे ४७


 गायतामन्यगोपानां प्रशंसापरमौ क्वचित् ।
 मयूरकेकानुगतौ गोपवेणुप्रवादकौ ॥ ४८ ॥

कधी दोघेही दूसर्‍या गोपींच्या गाण्याची प्रशंसा करायचे तर कधी गवळ्यांसारखी बासरी वाजवत मोरांच्या आवाजाची नक्कल करायचे ४८


इति नानाविधैर्भावैरुत्तमप्रीतिसंयुतौ ।
क्रीडन्तौ तौ वने तस्मिञ्चेरतुस्तुष्टमानसौ ॥ ४९ ॥

अशाप्रकारे ते दोघेही त्या वनात अत्यन्त प्रेमाने प्रसन्नचित्ताने नानाप्रकारे आपापसात खेळत असत ४९


विकाले च समं गोभिर्गोपवृन्दसमन्वितौ ।
विहृत्याथ यथायोगं व्रजमेत्य महाबलौ ॥ ५० ॥

संध्याकाळी ते महाबली बालक वनात यथायोग्य विहार केल्यानंतर गाई ग्वालबाळांसह ब्रजात परत येत असत ॥ ५० ॥

 

 गोपैः समानैः सहितौ क्रीडन्तावमराविव ।
 एवं तावूषतुस्तत्र रामकृष्णौ महाद्युती ॥ ५१ ॥

अशाप्रकारे आपल्या समवयस्क गोपगणांसह  देवतांसारख्या क्रीडा करत ते महातेजस्वी राम कृष्ण तिथे राहू लागले ॥ ५१ ॥



 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे
षष्ठोऽध्यायः (६)

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमो ऽध्यायः ॥   "कालिया-दमन"   श्रीपराशर उवाच   एकदा तु विना रामं कृष्णो वृन...