॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ द्वादशोऽध्यायः ॥
"ग्रहस्थ सम्बन्धी सदाचार वर्णन"
और्व उवाच
देवगोब्राह्मणान्त्सिद्धान्वृद्धाचार्यांस्तथार्चयेत्
।
द्विकालं
च नमेत्सन्ध्यामग्नीनुपचरेत्तथा ॥ १ ॥
और्व म्हणाले ;– गृहस्थ पुरुषाने नित्य देवता, गौ, ब्राह्मण, सिद्धगण, वयोवृद्ध तथा आचार्यांची पूजा
करावी आणि दोन वेळा संध्यावन्दन व अग्निहोत्रादि कर्म करावे || १ ||
सदाऽनुपहते वस्त्रे प्रशस्ताश्च महोषधीः ।
गारुडानि च रत्नानि बिभृयात्प्रयतो नरः ॥ २ ॥
गृहस्थाने सदा संयमी राहून कुठूनही
न फाटलेली दोन वस्त्रे, उत्तम औषधि व गारुड (मरकत आदि विष नष्ट करणारे) रत्न धारण करावे || २ ||
प्रस्निग्धामलकेशश्च
सुगन्धश्चारुवेषधृक् ।
सिताः
सुमनसो हृद्या विभृयाच्च नरः सदा ॥ ३ ॥
केस स्वच्छ व तैलयुक्त असावेत
तसेच सर्वदा सुगंधयुक्त सुंदर वेष आणि मनोहर श्वेतपुष्प धारण करावे || ३ ||
किञ्चित्परस्वं न हरेन्नल्पमप्यप्रियं वदेत् ।
प्रियं च नानृतं ब्रूयान्नान्यदोषानुदीरयेत् ॥ ४ ॥
कोणाचेही थोडेसेसुद्धा धन हरण
करू नये व जरा सुद्धा प्रिय भाषण करू नये . खोटे असलेले प्रिय वचनही बोलू नये व दुसर्याचे दोष सुद्धा सांगू
नयेत || ४ ||
नान्यस्त्रियं
तथा वैरं रोचयेत्पुरुषर्षभ ।
न दुष्टं
यानमारोहेत्कूलच्छायां न संश्रयेत् ॥ ५ ॥
हे पुरुषश्रेष्ठा ! दूसर्याच्या
स्त्रीविषयी किंवा दुसर्यासोबत वैर वैर करण्यात कधीही रूचि ठेऊ नये, निन्दित वाहनात कधी चढू नये आणि
नदीतीराच्या छायेचा आश्रय घेऊ नये || ५ ||
विद्विष्टपतितोन्मत्तबहुवैरादिकीटकैः
।
बंधकी
बन्धकीभर्तुः क्षुद्रानृतकथैः सह ॥ ६ ॥
तथातिव्ययशीलैश्च
परिवादरतैः शठैः ।
बुधो
मैत्रीं न कुर्वात नैकः पन्थानमाश्रयेत् ॥ ७ ॥
बुद्धिमान पुरुषाने लोकविदिष्ट, पतित, उन्मत्त व ज्याचे भरपूर शत्रु
आहेत अशा परपीडक पुरुषांसोबत तसेच कुलटा, कुलटेचा स्वामी, क्षुद्र, मिथ्यावादी अति व्ययशील, निंदापरायण आणि दुष्ट पुरुषांसोबत
कधी मैत्री करू नये व मार्गात कधी एकट्यानेही चालू नये || ६ – ७ ||
नावगाहेज्जलोघस्य
वेगमग्रे नपेश्वर ।
प्रदीप्तं
वेश्म न विशेन्नारोहेच्छिखरं तरोः ॥ ८ ॥
हे नरेश्वरा ! जलप्रवाहाच्या
वेगात समोर पडून स्नान करू नये, जळत्या घरात प्रवेश करू नये व वृक्षाच्या टोकावर चढू नये || ८ ||
न कुर्याद्दन्तसङ्घर्षं
कुष्णियाच्च न नासिकाम् ।
नासंवृतमुखो
जृम्भेच्छ्वासकासो विसर्जयेत् ॥ ९ ॥
नोच्चैर्हसेत्सशब्दं
च न मुञ्चेत्पवनं बुधः ।
नखान्न
खादयेच्छिन्द्यान्न तृणं न महीं लिखेत् ॥ १० ॥
दात एकमेकांवर घासू नयेत, नाकात बोटे
घालू नयेत, तोंड बंद ठेऊन जांभई देऊ नये किंवा खोकू नये किंवा श्वास घेताना अधोवायु
सोडू नये; तसेच नखं चावू नयेत , काटकी तोडू नये व पृथ्वीवर लिहू नये || ९-१० ||
न श्मश्रु
भक्षयेल्लोष्टं न मृद्नीयाद्विचक्षणः ।
ज्योतींष्यमेध्यशस्तानि
नाभिवीक्षेत च प्रभो ॥ ११ ॥
हे प्रभो ! विचक्षण पुरुषाने
दाढी मिशींचे केस चावू नयेत किंवा परस्परांना रगडू नयेत आणि अपवित्र व निन्दित नक्षत्रं पाहू नयेत
|| ११ ||
नग्नां
परस्त्रियं चैव सूर्यं चास्तमयोदये ।
न हुङ्कुर्याच्छवं
गन्धं शवगन्धोहि सोमज ॥ १२ ॥
नग्न परस्त्री तसेच उदय किंवा
अस्त होणारा सूर्य पाहू नये तसेच शव आणि शव गंधाची घृणा करू नये, कारण शव गंध सोमाचा अंश आहे || १२ ||
चतुष्पथं
चैत्यतरुं श्मशानोपवनानि च ।
दुष्टस्त्रीसन्निकर्षं
च वर्जयेन्निशि सर्वदा ॥ १३ ॥
चाररस्ता, चैत्यवृक्ष, स्मशान, उपवन आणि दुष्ट स्त्रीशी सलगी ह्या सर्वांचा रात्रीच्या वेळी सर्वदा त्याग करावा || १३ ||
पूज्यदेवद्विजज्योतिश्छायां
नातिक्रमेद् बुधः ।
नैकः
शून्याटवीं गच्छेत्तथा शून्यगृहे वसेत् ॥ १४ ॥
बुद्धिमान पुरुषाने आपली पूजनीय
देवता, ब्राह्मण व तेजोमय
पदार्थांची सावली कधीच ओलांडू नये तसेच शून्य वनखंडी व शून्य घरात कधीच एकटे राहू नये
|| १४ ||
केशास्थिकण्टकामेध्यबलिभस्मतुषांस्तथा
।
स्नानार्द्रधरणीं
चैव दूरतः परिवर्जयेत् ॥ १५ ॥
प्राज्ञ पुरुषाने अनार्य व्यक्तिचा
संग करू नये , कुटिल पुरुषात आसक्त होऊ नये, सापाजवळ जाऊ नये व जाग आल्यावर खूपवेळ लोळत राहू नये || १५ ||
नानार्यानाश्रयेत्कांश्चिन्न
जिह्मं रोचयेद्बुधः ।
उपसर्पेन्न
वै व्यालं चिरं तिष्ठेन्न वोत्थितः ॥ १६ ॥
अतीव
जागरस्वप्ने तद्वत्स्थानासने बुधः ।
न सेवेत
तथा शय्यां व्यायामं च नरेश्वर ॥ १७ ॥
हे नरेश्वरा ! बुद्धिमान पुरुषाने
नुसतं जागं राहण्यात, झोपण्यात, स्नान करण्यात, बसण्यात, शय्यासेवन करण्यात व व्यायाम
करण्यात अधिक समय घालवू नये || १६-१७ ||
दंष्ट्रिणः
शृङ्गिणश्चैव प्राज्ञो दूरेण वर्जयेत् ।
अवश्यायं
च राजेन्द्र पुरोवातातपौ तथा ॥ १८ ॥
हे राजेन्द्रा ! प्राज्ञ पुरुषाने
दात व शींग असलेल्या पशुंचा, ओस(हिंदी) तसेच सामनेकी वायु व धूप(हिंदी) सर्वदा परित्याग करावा
||१८ ||
न स्नायान्न
स्वपेन्नग्नो न चैवोपस्पृशेद् बुधः ।
मुक्तकेशश्च
नाचामेद्देवाद्यर्चां च वर्जयेत् ॥ १९ ॥
नग्न होऊन स्नान, शयन व आचमन करू नये व केस मोकळे
सोडून आचमन आणि देव-पूजा करू नये || १९ ||
होमदेवार्चनाद्यासु
क्रियास्वाचमने तथा ।
नैकवस्त्रः
प्रवर्तेत द्विजवाचनिके जपे ॥ २० ॥
होम तसेच देवार्चन, आचमन , पुण्याहवाचन आणि जप करताना एक
वस्त्र धारण करून प्रवृत्त होऊ नये || २० ||
नासमञ्जसशीलैस्तु
सहासीत कथञ्चन ।
सद्बुत्तसन्निकर्षो
हि क्षणार्धमपि शस्यते ॥ २१ ॥
संशयशील व्यक्तिंसोबत कधीच राहू
नये . सदाचारी पुरुषांचा तर अर्ध्या
क्षणाचा संग सुद्धा अति प्रशंसनीय असतो || २१ ||
विरोधं
नोत्तमैर्गच्छेन्नाधमैश्च सदा बुधः ।
विवाहश्च
विवादश्च तुल्यशीलैर्नृपेष्यते ॥ २२ ॥
बुद्धिमान पुरुषाने उत्तम किंवा
अधम व्यक्तिंचा विरोध करू नये . हे राजन ! विवाह व
विवाद सदैव समान व्यक्तिं सोबतच असावा || २२ ||
नारभेत
कलं प्राज्ञः शुष्कवैरं च वर्जयेत् ।
अप्यल्पहानिःसोढव्या
वैरेणार्थागमं त्यजेत् ॥ २३ ॥
प्राज्ञ पुरुषाने कलह वाढवू नये
तसेच व्यर्थ वैराचाही त्याग करावा . थोडे नुकसान सहन करावे,
परंतु वैरामुळे फायदा होत असेल तर तेही सोडावे || २३ ||
स्नातो नाङ्गानि संमार्जेत्स्नानशाट्या न पाणिना
।
न च निर्धूतयेत्केशान्नाचामेच्चैव चोत्थितः ॥ २४ ॥
स्नान केल्यानन्तर स्नानाने भिजलेल्या
धोतराने किंवा हाताने शरीर पुसू नये तसेच उभ्याउभ्या केस झाडू नयेत व आचमन करू नये
|| २४ ||
पादेन
नाक्रमेत्पादं न पूज्याविमुखं नयेत् ।
नोच्चासनं
गुरोरग्रे भजेताविनयान्वितः ॥ २५ ॥
पायावर पाय ठेऊ नये, गुरुजनां समोर पाय पसरवू नयेत
आणि धृष्टतापूर्वक त्यांच्या समोर कधीही उच्चासनावर बसू नये || २५ ||
अपसव्यं
न गच्छेच्च देवागारचतुष्पथान् ।
माङ्गल्यपूज्यांश्च
तथा विपरीतान्न दक्षिणम् ॥ २६ ॥
देवालय, चाररस्ते, मांगलिक द्रव्य आणि पूज्य व्यक्ति
– ह्या सर्वांना डाव्या बाजूला ठेऊन जाऊ नये तसेच ह्यांच्या उलट असलेल्या गोष्टी उजवीकडे
ठेऊन जाऊ नये || २६ ||
सोमार्काग्न्यम्बुवायूनां
पूज्यानां च न संमुखम् ।
कुर्यान्निष्ठीवविण्मुत्रसमुत्सर्गं
च पण्डितः ॥ २७ ॥
चन्द्र, सूर्य, अग्नि, जल, वायु व पूज्य व्यक्तिं समोर पंडित
पुरुषाने मलमूत्र त्याग करू नये व थुंकू नये || २७ ||
तिष्ठन्न
मूत्रयेत्तद्वत्पथिष्वपि न मूत्रयेत् ।
श्लेष्मविण्मूत्ररक्तानि
सर्वदैव न लङ्घयेत् ॥ २८ ॥
उभ्याउभ्या किंवा रस्त्यात मूत्र-त्याग करू नये तसेच थूक, विष्ठा, मूत्र आणि रक्त कधीही ओलांडून
जाऊ नये || २८ ||
श्लेष्मशिङ्घाणिकोत्सर्गो
नान्नकाले प्रशस्यते ।
बलिमङ्गलजप्यादौ
न होमे न महाजने ॥ २९ ॥
भोजन, देव-पूजा, मांगलिक कार्य आणि जप-होमादिच्या
वेळी तसेच महापुरुषांसमोर थूकणे व शिंकणे उचित नाही || २९ ||
योषितो
नावमन्येत न चासां विश्वसेद्बुधः ।
न चैवेर्ष्या
भवेत्तासु न धिक्कुर्यात्कदाचन ॥ ३० ॥
बुद्धिमान पुरुषांनी स्त्रियांचा
अपमान करू नये, त्यांच्यावर विश्वासही ठेऊ नये, इर्ष्या व तिरस्कारही करू नये || ३० ||
मङ्गल्यपूर्वरत्नाज्यपूज्याननभिवाद्य च ।
न निष्क्रमेद् गृहात्प्राज्ञःसदाचारपरो नरः ॥ ३१ ॥
सदाचार परायण प्राज्ञ व्यक्तिंना
अभिवादन केल्याशिवाय घरून बाहेर पडू नये || ३१ ||
चतुष्पथान्नमस्कुर्यात्काले
होमपरो भवेत् ।
दीनानभ्युद्धरेत्साधूनुपासीत
बहुश्रुतान् ॥ ३२ ॥
चाररस्त्याला प्रणाम करावे, यथासमय
अग्निहोत्र करावे, दीन-दु:खि लोकांचा उद्धार करावा आणि बहुश्रुत साधू पुरुषांचा सत्संग करावा || ३२ ||
देवर्षिपूजकःसम्यक्पितृपिण्डोदकप्रदः
।
सत्कर्ता
चातिथीनां यः स लोकानुत्तमान्व्रजेत् ॥ ३३ ॥
जो पुरुष देवता व ऋषिंची पूजा
करतो, पितृगणांना पिंडोदक
देतो व अतिथिचा सत्कार करतो तो पुण्यलोकी जातो || ३३ ||
हितं
मितं प्रियं काले वश्यात्मा योऽभिभाषते ।
स याति
लोकानाह्लादहेतुभूतान् नृपाक्षयान् ॥ ३४ ॥
जो व्यक्ति जितेन्द्रिय होऊन
समयानुसार हित, मित व प्रिय भाषण करतो, हे राजन ! त्याला आनंद हेतुभूत अक्षय लोक प्राप्त होतो || ३४ ||
धीमान्ह्रीमान्क्षमायुक्तो
ह्यास्तिको विनयान्वितः ।
विद्याभिजनवृद्धानां
याति लोकाननुत्तमान् ॥ ३५ ॥
बुद्धिमान, लज्जावान, क्षमाशील, आस्तिक व विनयी पुरुष विद्वान
व कुलीन पुरुषांना योग्य अशा उत्तम लोकी जातो || ३५ ||
अकालगार्जितादौ
च पर्वस्वाशौचकादिषु ।
अनध्यायं
बुधः कुर्यादुपरागादिके तथा ॥ ३६ ॥
अकाल मेघगर्जनेच्या वेळी, पर्व-दिनी, अशौच काळी तसेच चन्द्र व सूर्यग्रहणाचे
वेळी बुद्धिमान पुरुषाने अध्ययन करू नये || ३६ ||
समं
नयति यः क्रुद्वान्सर्वबन्धुरमत्सरी ।
भीताश्वासनकृत्साधुःस्वर्गस्तस्याल्पकं
फलम् ॥ ३७ ॥
जो व्यक्ति क्रोधित माणसाला शांत
करतो, सर्वांचा बन्धु असतो, मत्सरशून्य असतो, भयभीत झालेल्याला सांत्वना देतो
व साधू स्वभावाचा असतो त्याच्यासाठी स्वर्ग हे फार मोठे फळ आहे || ३७ ||
वर्षातपादिषु
च्छत्री दण्डी रात्र्यटवीषु च ।
शरीरत्राणकामो
वै सोपानत्कःसदा व्रजेत् ॥ ३८ ॥
ज्याला शरीर-रक्षणाची इच्छा असेल
त्या पुरुषाने पिवसात व उन्हात छत्री घेऊन जावे, रात्रीच्या वेळी व वनात जाताना काठी घेऊन जावे तसेच कुठेही जाताना पादत्राण घालूनच जावे
|| ३८ ||
नोर्ध्वं
न तिर्यग्दूरं वा न पश्यन्पर्यटेद् बुधः ।
युगमात्रं
महीपृष्ठं नरो गच्छेद्विलोकयन् ॥ ३९ ॥
बुद्धिमान पुरुषाने कंबरेजवळ
,इथेतिथे किंवा दूरच्या गोष्टी बघत चालू नये, फक्त चार हाथ लांबवर पृथ्वीवर बघूनच चालावे
|| ३९ ||
दोषहेतूनशेषांश्च
वश्यात्मा यो निरस्यति ।
तस्य
धर्मार्थकामानां हानिर्नाल्पापि जायते ॥ ४० ॥
जो जितेन्द्रिय सर्व दूषित विषयांचा
त्याग करतो त्याच्या धर्म, अर्थ आणि कामाची थोडीसुद्धा हानि होत नाही || ४० ||
सदाचाररतः
प्राज्ञो विद्याविनयशिक्षितः ।
पापेऽप्यपापः
परुषे ह्यभिधत्ते प्रियाणि यः ।
मैत्रीद्रवान्तः
करणस्तस्य मुक्तिः करे स्थिता ॥ ४१ ॥
जो विद्या-विनय-सम्पन्न, सदाचारी प्राज्ञ पुरुष पापी माणसाकडे
पापमय व्यवहार करत नाही, कुटिल पुरुषाकडेही प्रिय भाषण करतो तसेच ज्याचे अंत:करण मैत्रीने द्रवीभूत असते, त्याच्या मुठीत मुक्ति असते || ४१ ||
ये कामक्रोधलोभानां
वीतरागा न गोचरे ।
सदाचारस्थितास्तेषामनुभावैर्धृता
मही ॥ ४२ ॥
जो वीतरागमहापुरुष कधीही काम, क्रोध व लोभादिना वशीभूत होत
नाही तसेच सर्वदा सदाचारी राहतो त्याच्या प्रभावा मुळेच ही पृथ्वी टिकून आहे || ४२ ||
तस्मात्सत्यं
वदेत्प्राज्ञो यत्परप्रीतिकारणम् ।
सत्यं
यत्परदुःखाय तदा मौनपरो भवेत् ॥ ४३ ॥
म्हणूनच प्राज्ञ पुरुषाने असेच
सत्य भाषण करावे ज्यामुळे दूसरे प्रसन्न राहतील . जर एखाद्या सत्य वाक्यामुळे
दुसर्याला दुःख होणार असेल तर मौन रहावे || ४३ ||
प्रियमुक्तं
हितं नैतदिति मत्वा न तद्वदेत् ।
श्रेयस्तत्र
हितं वाच्यं यद्यप्यत्यन्तमप्रियम् ॥ ४४ ॥
प्रिय वाक्य अहितकरी असले तर
ते बोलू नये; अशावेळी हितकरच बोलावे, मग ते अत्यंत अप्रिय असले तरी हरकत नाही || ४४ ||
प्राणीनामुपकाराय
यथैवेह परत्र च ।
कर्मणा
मनसा वाचा तदेव मतीमान्वदेत् ॥ ४५ ॥
जे कार्य इहलोक आणि परलोकात प्राण्यांच्या
हिताचे साधक असेल, मतिमान पुरुषाने मन, वचन व कर्माने त्याचेच आचरण करावे || ४५ ||
इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अंशे द्वादशोऽध्यायः (१२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा