॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ एकदशोऽध्यायः ॥
गृहस्थ संबंधित सदाचार वर्णन
सगर उवाच
गृहस्थस्य सदाचारं श्रोतुमिच्छाम्यहं मुने ।
लोकादस्मात्परस्माच्च यमातिष्ठन्न हीयते ॥ १ ॥
सगर म्हणाला,
"हे मुने !
मला गृहस्थाच्या चांगल्या वर्तनाबद्दल ऐकायचे आहे, ज्याचे पालन केल्याने
या जगातून किंवा पुढील जगातून त्याचे कधीही अध:पतन होत नाही." ॥ १ ॥
और्व उवाच
श्रूयतां पृथिवीपाल सदाचारस्य लक्षणम् ।
सदाचारवता पुंसा जितौ लोकावुभावपि ॥ २ ॥
और्व म्हणाले, “ हे पृथ्वीपते, सदगुणांची लक्षणे
ऐक. सद्गुणी माणूस इहलोक आणि परलोक दोन्ही जिंकतो. ॥ २ ॥
साधवः क्षीणदेषास्तु
सच्छब्दः साधुवाचकः ।
तेषामाचरणं यस्तु सदाचारः स उच्यते ॥ ३ ॥
सत म्हणजे संत म्हणजेच जे सर्व दोषांपासून मुक्त असतात;
आणि संतांच्या वर्तणूकीलाच सदाचार म्हणतात.'
॥
३
॥
सप्तर्षयोऽथ मनवः प्रजानां पतयस्तथा ।
सदाचारस्य वक्तारः कर्तारश्च महीपते ॥ ४ ॥
हे राजा, ह्या नैतिकतेचे वक्ते आणि
कर्ते सप्तर्षि, मनू व प्रजापति आहेत. ॥ ४ ॥
ब्राह्मो मुहूर्ते चोत्थाय मनसा मतिमान्नृप ।
प्रबुद्धश्चिन्तयेद्धर्ममर्थं चाप्यविरोधिनम् ॥ ५
॥
अपीडया तयोः काममुभयोरपि चिन्तयेत् ।
दृष्टादृष्टविनाशाय त्रिवर्गे समदर्शिता ॥ ६ ॥
हे राजा, ज्ञानी माणसाने ब्राह्ममुहूर्तावर उठावे आणि धर्म तसेच धर्माविरोधी
अर्थाचे चिंतन करावे . तसेच ज्यात धर्म आणि अर्थाची क्षिति नाही अशा कामाचे सुद्धा
चिंतन करावे . अशा प्रकारे दृष्ट आणि अदृष्ट अनिष्टाची निवृत्ती करण्यासाठी धर्म
अर्थ आणि काम ह्या तीनही ठिकाणी समभाव ठेवावा. ॥ ५
- ६ ॥
परित्यजेदर्थकामौ धर्मपीडाकरौ नृप ।
धर्ममप्यसुखोदर्कं लोकविद्विष्टमेव च ॥ ७ ॥
हे राजा धर्मविरुद्ध अर्थ आणि
कामाचा त्याग करावा तसेच अशा धर्माचेही आचरण करू नये जे उत्तर काळी दुखमय अथवा
समाज विरोधी असेल. ॥ ७ ॥
ततः कल्यं समुत्थाय कुर्यान्मूत्रं नरेश्वर ॥ ८ ॥
नैर्ऋत्यामिषुविक्षेपमतीत्याभ्यधिकं भुवः ।
दूरादावसथान्मूत्र पुरीषं च विसर्जयेत् ॥ ९ ॥
पादावनेजनोच्छिष्टे प्रक्षिपेन्न गृहाङ्गणे ॥ १०
॥
ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर त्याने सर्वप्रथम मूत्रत्याग
करावा, गावातून नैर्ऋत्येला जितक्या दूर
बाण जाईल त्याहून अधिक अंतरावर जाऊन किंवा गावापासून दूर कुठेही,
मलमूत्रत्याग करावा. पाय धुतल्यावर उरलेले आणि उष्टे पाणी आपल्या घराच्या अंगणात फेकू नये. ॥
८-१०
॥
आत्मच्छायां तरुच्छायां गोसूर्याग्न्यनिलांस्तथा ।
गुरुद्विजादींस्तु बुधो नाधिमेहेत्कदाचन ॥ ११ ॥
ज्ञानी माणसाने कधीही स्वतःच्या किंवा झाडाच्या सावलीवर
तसेच गाय, सूर्य, अग्नी, वायु, आपले गुरु किंवा द्विजातीय पुरुषा समोर मलमूत्र
त्याग करू नये.॥ ११ ॥
न कृष्टे सस्यमध्ये वा गौव्रजे जनसंसदि ।
न वर्त्मनि न नद्यादितीर्थेषु पुरुषर्षभ ॥ १२ ॥
नाप्सु नैवाम्भसस्तीरे श्मशाने न समाचरेत् ।
उत्सर्गं वै पुरीषस्य मूत्रस्य च विसर्जनम् ॥ १३ ॥
तसेच हे राजा, नांगरलेल्या शेतात, कुरणात, माणसांच्या सहवासात, उंच रस्त्यावर,
रस्त्याच्या
मध्ये, गाईच्या गोठ्यात, पवित्र नद्यांमध्ये, नदीकाठावर किंवा स्मशानात मलमूत्र त्याग करू नये. ॥
१२-१३
॥
उदङ्मुखो दिवा मूत्रं विपरीतमुखो निशि ।
कुर्वितानापदि प्राज्ञो मूत्रोत्सर्गं च पार्थिव ॥
१४ ॥
हे राजा, विशेष आपत्ति नसेल तर दिवसा उत्तरेकडे तोंड करून
आणि रात्री दक्षिणेकडे तोंड करून मलमूत्र त्याग करावा.॥ १४
॥
तृणैरास्तीर्य वसुधां वस्त्रप्रावृतमस्तकः ।
तिष्ठेन्नातिचिरं तत्र नैव किञ्चिदुदीरयेत् ॥ १५ ॥
मलमूत्र त्याग करताना डोके कापडाने आणि जमीन गवताने
झाकावी, तसेच त्या ठिकाणी अधिक
काळ राहू नये किंवा तिथे बोलूही नये. ॥ १५ ॥
वल्मीकमूषिकोद्भूतां मृदं नान्तर्जलां तथा ।
शौचावशिष्टां गेहाच्च नादद्याल्लेपसम्भवाम् ॥ १६ ॥
अणुप्राण्युपपन्नां च हलोत्खातां च पार्थिव ।
परित्यजेन्मृदो ह्येताःसकलाः शौचकर्मणि ॥ १७ ॥
त्याने उंदराने बिळातून काढलेली, पाण्याच्या
आतील, मुंग्यांच्या वारुळातील, घर लिंपुन राहिलेली, लहान जीवांनी उकरून काढलेली,
शौचकर्म केल्यावर उरलेली आणि मूळापासून काढलेली माती शौचकर्मासाठी वापरू नये. ॥
१६-१७
॥
एका लिङ्गे गुदे तिस्त्रो दस वामकरे नृप ।
हस्तद्वये च सप्त स्युर्मृदः शौचोपपादिकाः ॥ १८ ॥
लिंग एकदा, गुद्द्वार तीनदा, डावा हात दहा वेळा आणि दोन्ही हात सात वेळा मातीने स्वच्छ घासणे आवश्यक आहे. ॥
१८
॥
अच्छेनागन्धलेपेन जलेनाबुद्बुदेन च ।
आचामेच्च मृदं भूयस्तथा दद्यात्समाहितः ॥ १९ ॥
मग त्याने गंध आणि फेस रहित शुद्ध जलाने आपले तोंड धुवावे. मग परत भरपूर माती घ्यावी. ॥
१९
॥
निष्पादिताङ्घ्रिशौचस्तु पादावभ्युक्ष्य तैः पुनः
।
त्रिः पिबेत्सलिलं तेन तथा द्विः परिमार्जयेत् ॥ २०
॥
त्या मातीने चरण शुद्धी केल्यावर परत तीन वेळा चूळ भरावी आणि दोनदा तोंड धुवावे. ॥ २० ॥
शिर्षण्यानि
ततः खानि मूर्धानं च समालभेत् ।
बाहू नाभिं च तोयेन हृदयं चापि संस्पृशेत् ॥ २१ ॥
त्यानंतर पाण्याने आपल्या डोक्याला,
डोळ्यांच्या पोकळ्या,
कान, नाकपुड्या,
कपाळ,
नाभी आणि हृदयाला स्पर्श
करावा.॥
२१ ॥
स्वाचान्तस्तु ततः कुर्यात्पुमान्केशप्रसाधनम् ।
आदर्शाञ्जनमाङ्गल्यं दूर्वाद्यालम्भनानि च ॥ २२ ॥
नंतर, माणसाने व्यवस्थित स्नान करून, केस विंचरून स्वच्छ कपडे घालावे आणि आरशासमोर उभे राहून
काजळ, दूर्वा आदि मंगल द्रव्यांचा वापर करावा. ॥ २२ ॥
ततःस्ववर्णधर्मेण
वृत्त्यर्थं च धनार्जनम् ।
कुर्वीत श्रद्धासम्पन्नो यजेच्च पृथिवीपते ॥ २३ ॥
हे पृथ्वीपते त्यानंतर धर्म प्रथेनुसार,
उदरनिर्वाहासाठी
आणि संपत्तीसाठी श्रद्धेने देवतांची पूजा करावी. ॥
२३ ॥
सोमसंस्था हविःसंस्थाः पाकसंस्थास्तु संस्थिताः ।
धने यतो मनुष्याणां यतेतातो धनार्जने ॥ २४ ॥
सोमसंस्था, पाकसंस्था आणि
हवीसंस्था ह्या तीनही संस्थांचा आधार धनच आहे म्हणून पुरुषाने संपत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.॥
२४ ॥
नदीनदतटाकेषु देवखातजलेषु च ।
नित्यक्रियार्थं स्नायीत गिरिप्रस्त्रवणेषु च ॥ २५
॥
नित्यकर्मांच्या
संपादनासाठी गृहस्थाने नदी, तलाव, नैसर्गिक नाले किंवा डोंगराच्या प्रवाहात स्नान करावे. ॥
२५ ॥
कूपेषूद्धृततोयेन स्नानं कुर्वीत वा भुवि ।
गृहेषूद्धृततोयेन ह्यथवा भुव्यसम्भवे ॥ २६ ॥
किंवा विहिरीतून, नदीतून अथवा इतर स्रोतातून घेतलेल्या पाण्याने,
जवळील जमिनीवर किंवा तेही शक्य नसेल तर आपल्या घरी आंघोळ करावी. ॥
२६ ॥
शुचिवस्त्रधरः स्नातो देवर्षिपितृतर्पणम् ।
तेषामेव हि तीर्थेन कुर्वीत सुसमाहितः ॥ २७ ॥
आंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यावर, देवांना,
ऋषींना आणि पूर्वजांना त्या जलाने भक्तीपूर्वक तर्पण करावे. ॥
२७ ॥
त्रिरपः प्रीणनार्थाय देवानामपवर्जयेत् ।
ऋषीणां च यथान्यायं सकृच्चापि प्रजापतेः ॥ २८ ॥
ऋषि आणि देवांना संतुष्ट करण्यासाठी तीनदा आणि प्रजापतीला संतुष्ट करण्यासाठी एकदा पाणी सोडावे.
॥
२८ ॥
पितॄणां प्रीणनार्थाय तदपः पृथिवीपते ।
पितामहेभ्यश्च तथा प्रीणयेत्प्रपितामहान् ॥ २९ ॥
मातामहाय तत्पित्रे तत्पित्रे च समाहितः ।
दद्यात्पैत्रेण तीर्थेन काम्यं चान्यच्छृणुष्व मे
॥ ३० ॥
तसेच आपले पितृगण आणि पितामहांना
संतुष्ट करण्यासाठी तीनदा आणि आपल्या पणजोबा, आईचे वडील, आजोबा आणि पणजोबा ह्यांच्यासाठी देखील पितृतीर्थाने
जलदान करावे. आता काम्य तर्पणाचे वर्णन करतो ते ऐक. ॥ २९-३०
॥
मात्रे स्वमात्रे तन्मात्रे गुरुपत्न्यै तथा नृप
।
गुरूणां मातुलानां च स्निग्धमित्राय भूभूजे ॥ ३१ ॥
इदं चापि जपेदम्बु दद्यादात्मेच्छया नृप ।
उपकाराय भूतानां कृतदेवादितर्पणम् ॥ ३२ ॥
हे जल आईसाठी, हे आईची आई आणि हे आजीसाठी, हे जल गुरूपत्नीला,
हे गुरूसाठी, हे मामा आणि हे इतर नातेसंबंधी, प्रिय मित्र आणि हे राजासाठी असा जप करत सर्व प्राणीमात्रांच्या
हितासाठी देवादीना तर्पण करून आपल्या इच्छेनुसार इच्छित संबंधितांसाठी जल
दान करावे . ॥ ३१-३२ ॥
देवासुरास्तथा यक्षा नागगन्धर्वराक्षसाः ।
पिशाचा गुह्यकाःसिद्धाः कूष्माडाः पशवः खगाः ॥ ३३
॥
जलेचरा भूनिलया वाय्वाहाराश्च जतवः ।
तृप्तिमेतेन यान्त्वाशु मद्दत्तेनाम्बुनाखिलाः ॥
३४ ॥
देव आदींना तर्पण करताना, “देव,
दानव,
यक्ष, सर्प, राक्षस, गंधर्व, पिशाच, गुह्यक , सिद्ध , कुष्मांड, वृक्ष, पक्षी, जलचर, स्थलचर, वायुभक्षक,
आदि सर्व जीव मी दिलेल्या जलाने तृप्त होवोत” असे म्हणावे . ॥ ३३
– ३४ ॥
नरकेषु समस्तेषु यातनासु च ये स्थिताः ।
तेषामाप्यायनायैतद्दीयते सलिलं मया ॥ ३५ ॥
हे पाणी मी वेगवेगळ्या नरकात पिडीत असलेल्या सर्वांच्या वेदनांच्या
निवारणासाठी दिले आहे. ॥ ३५ ॥
ये बान्धवाबान्धवा ये येऽन्यजन्मनि बान्धवाः ।
ते तृप्तिमखिला यान्तु ये चास्मत्तोयकांक्षिणः ॥ ३६
॥
जे माझे नातेवाईक आहेत किंवा जे माझे नातेवाईक नाहीत, तसेच जे पूर्वजन्मी माझे नातेसंबंधी होते आणि
इतर सगळे जे माझ्याकडून जलाची इच्छा बाळगतात त्या सर्वांना ह्या जलापासून समाधान प्राप्त होवो. ॥
३६
॥
यत्र क्वचनसंस्थानां क्षुत्तृष्णोपहतात्मनाम् ।
इदमाप्यायनायास्तु मया दत्तं तिलोदकम् ॥ ३७ ॥
मी दिलेल्या ह्या जल आणि तीळ,
दु:खाने ग्रस्त असलेल्या
सर्वांची भूक आणि तहान दूर होऊ दे, मग ते कुठेही असोत . ॥
३७
॥
काम्योदकप्रदानं ते मयैतत्कथितं नृप ।
यद्दत्त्वा प्रीणयत्येतन्मनुष्यःसकलं जगत् ।
जगदाप्यायनोद्भूतं पुण्यमाप्नोति चानध ॥ ३८ ॥
हे राजा, मी तुला काम्य तर्पण कसे करावे
ह्याचे निरूपण केले जे केल्याने सर्व जगाला तृप्ती मिळते आणि हे अनघा,
जो प्रामाणिकपणे श्रद्धेने
हे कार्य करतो, त्याला विश्व तृप्ती मुळे मिळणारे फळ प्राप्त होते . ॥
३८ ॥
दत्त्वा काम्योदकं सम्यगेतेभ्यः
श्रद्धयान्वितः ।
आचम्य च ततो दद्यात्सूर्याय सलिलाञ्जलिम्
॥ ३९ ॥
नमो विवस्वते ब्रह्मभास्वते विष्णुतेजसे
।
जगत्सवित्रे शुचये सवित्रे कर्मसाक्षिणे
॥ ४० ॥
“अशा प्रकारे काम्य जलदान
केल्यानंतर आचमन करून सूर्याला जलांजलि अर्पण करावी आणि प्रार्थना करावी की, ' अति पवित्र, वेदवेद्य, विष्णूच्या
तेजस्वरूप असलेल्या आणि जगताला उत्पन्न करणाऱ्या कर्म साक्षी भगवान विवस्वानाला नमस्कार. ॥ ३९-४० ॥
ततो गृहार्चनं
कुर्यादभीष्टसुरपूजनम् ।
जलाभिषेकैः पुष्पैश्च धूपाद्यैश्च निवेदनम् ॥ ४१ ॥
त्यानंतर जलाभिषेक आणि पुष्प धूप आदि अर्पण
करून गृहदेव आणि इष्टदेवतेची पूजा करावी. ॥ ४१
॥
अपूर्वमाग्निहोत्रं च कुर्यात्प्राग्ब्रह्मणे नृप
॥ ४२ ॥
प्रजापतिं समुद्दिश्य दद्यादाहुतिमादरात् ।
गृहेभ्यः काश्यपायाथ ततोऽनुमतये क्रमात् ॥ ४३ ॥
हे नृपा नंतर अपूर्व अग्निहोत्र
करावा ज्यात आधी ब्रह्माला आणि मग क्रमश: प्रजापती, गुह्य, काश्यप आणि अनुमतीला श्रद्धेने आहुति द्यावी . ॥
४२
- ४३ ॥
तच्छेषं मणिके पृथ्वीर्पजन्येभ्यः क्षिपेत्ततः ।
द्वारे धातुर्विधातुश्च मध्ये च ब्रह्मणे क्षिपेत्
॥ ४४ ॥
गृहस्य पुरषव्याघ्र
दिग्देवानपि मे शृणु ॥ ४५ ॥
उरलेले हव्य पृथ्वी आणि मेघांसाठी
उदकपात्रात, धाता आणि विधातासाठी घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला आणि ब्रह्मदेवासाठी घराच्या मध्यभागी ठेवावे. हे पुरुषव्याघ्रा आता मी दीकपाल
गणाच्या पूजेचे वर्णन करतो ते ऐक . ॥ ४४ -
४५ ॥
इन्द्राय धर्मराजाय वरुणाय तथेन्दवे ।
प्राच्यादिषु बुधो दद्याद्धुतशेषात्मकं बलिम् ॥ ४६
॥
ज्ञानी माणसाने त्याच्या निवासस्थानाच्या
पूर्व,
दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेला क्रमाने इंद्र , यम , वरुण आणि सोम यांना यज्ञांचे अवशेष असलेले
बळी , अर्पण करावे. ॥
४६
॥
प्रागुत्तरे च दिग्भागे धन्वन्तारिबलिं बुधः ।
निर्वपैद्वैश्वदेवं च कर्म कुर्यादतः परम् ॥ ४७ ॥
वायव्यां वायवे दिक्षु समस्तासु यथादिशम् ।
ब्रह्मणे चान्तारीक्षाय भानवे च क्षिपेद्बलिम् ॥
४८ ॥
पूर्व आणि उत्तरेला धन्वंतरीला बळी अर्पण करून मग अवशेषांचा काही भाग सर्व
देवांना (विश्वदेवांना)
अर्पण करावा
. बळी
वैश्वदेवांचे वेळी वायव्येला वायुसाठी आणि मग सर्व दिशांना वायु व त्या दिशांसाठी बळी
अर्पण करावा. अशाच प्रकारे ब्रह्मा, अंतरिक्ष आणि सूर्यासाठी सुद्धा त्यांच्या दिशा
अनुसार बळी अर्पण करावा . ॥ ४७ - ४८ ॥
विश्वेदवान्विश्वभूतानष्टौ विश्वपतीन्पितॄन् ।
यक्षाणां च समुद्दिश्य बलिं दद्यान्नरेश्वर ॥ ४९ ॥
ततोन्यदन्नमादाय भूमि भागे शुचौ बुधः ।
दद्यादशेषभूतेभ्यः स्वेच्छया सुसमाहितः ॥ ५० ॥
हे नरेश्वरा त्यानंतर सर्व देवांना,
सर्व प्राण्यांना,
प्राण्यांच्या स्वामींना,
पितरांना आणि यक्षांना यथास्थान बळी
प्रदान करावा . त्यानंतर बुद्धिमान व्यक्तीने जमिनीवर स्वच्छ जागी बसून प्रसन्न चित्ताने ते सर्व प्राण्यांना अर्पण
करावे. ॥
४९-५०
॥
देवा मनुष्याः पशवो वयांसिसिद्धाःसयक्षोरगदैत्यसङ्घाः
।
प्रतोः पिशाचास्तरवःसमस्ता ये चान्नमिच्छन्ति मयात्र
दत्तम् ॥ ५१ ॥
पिपीलिकाः कीटपतङ्गकाद्या बुभुक्षिताः कर्मनिबन्धबद्धाः
।
प्रयान्ति ते तृप्तिमिदं मयान्नं तेभ्यो विसृष्टं
सुखिनो भवन्तु ॥ ५२ ॥
त्यावेळी ही प्रार्थना करावी , “देव,
माणसे,
प्राणी,
पक्षी,
संत,
यक्ष,
सर्प,
दानव,
भूत,
पिशाच्च,
झाडे,
मुंग्या,
कृमी,
पतंग आणि इतर कीटक,
भुकेले आणि कृत्यांच्या
बंधनात बांधले गेलेले सर्व जे माझ्या अन्नाची अपेक्षा करत आहेत त्या सर्वांना माझ्या अर्पण केलेल्या अन्नामुळे तृप्ती आणि आनंद मिळो. ॥
५१-५२
॥
येषां न माता न पिता न बन्धुर्नैवान्नसिद्धिर्न
तथान्नमस्ति ।
तत्तृप्येऽन्नं भुवि दत्तमेतत्ते
यान्तु तृप्तिं मुदिता भवन्तु ॥ ५३ ॥
ज्यांना आई, वडील किंवा नातेसंबंध नाहीत,
तसेच
अन्न किंवा ते तयार करण्याचे
साधन नाही, ते त्यांच्या तृप्तीसाठी अर्पण केलेल्या ह्या अन्नाने तृप्त आणि प्रसन्न होवोत . ॥ ५३
॥
भूतानि सर्वाणि तथान्नमेतदहं च विष्णुर्न
ततोन्यदस्ति ।
तस्मादहं भूतनिकायभूतमन्नं प्रयच्छामि
भवाय तेषाम् ॥ ५४ ॥
सर्व प्राणी, हे अन्न, मी आणि विष्णू वेगळे नाहीत,
कारण
श्रीविष्णु शिवाय भिन्न असे काहीही नाही . म्हणून मी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सर्व प्राण्यांच्या
शरीरात एकरूप असलेले अन्न देतो. ॥ ५४ ॥
चतुर्दशो भूतगणो य एष तत्र स्थिता
येऽखिलभूतसङ्घाः ।
तृप्त्यर्थमन्नं हि मया विसृष्टं
तेषामिदं ते मुदिता भवन्तु ॥ ५५ ॥
अस्तित्वात असलेल्या चौदा प्रकारच्या भूतमात्रात
जितके प्राणिगण आहेत, ते सर्व त्यांच्या तृप्तीसाठी मी दिलेल्या अन्नाने तृप्त आणि आनंदित व्हावेत.'॥ ५५
॥
इत्युच्चार्य नरो दद्यादन्नं श्रद्धासमन्वितः
।
भुवि सर्वोपकाराय गृही सर्वाश्रयो
यतः ॥ ५६ ॥
अशा प्रार्थने नंतर, गृहस्थाने श्रद्धेने सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या
पोषणासाठी अन्न जमिनीवर टाकावे; कारण गृहस्थच सर्वांचा आधार असतो. ॥
५६
॥
श्वचण्डालविहङ्गानां भुवि दद्यान्नरेश्वर
।
ये चान्ये पतिताः केचिदपुत्राः सन्तिमानवाः
॥ ५७ ॥
त्याला कुत्रे,
चांडाळ
(बहिष्कृत), पक्षी आणि पतीत व पुत्रहीन असलेल्यांसाठी पृथ्वीवर अन्न अर्पण करावे .॥ ५७ ॥
ततो गोदोहमात्रं वै कालं तिष्ठेद्गृहाङ्गणे
।
अतिथिग्रहणार्थाय तदूर्ध्वं तु तथैच्छया
॥ ५८ ॥
“मग गृहस्थाने सायंकाळी गाईच्या दोहनाची वेळ
होईपर्यंत आपल्या अंगणात पाहुण्यांच्या आगमनाची वाट पाहत राहावे. ॥
५८
॥
अतिथिं तत्र सम्प्राप्तं पूजयेत्स्वागदादिना
।
तथासनप्रदानेन पादप्रक्षालनेन च
॥ ५९ ॥
कोणी अतिथि आला तर त्याचे आदरातिथ्य करून स्वागत
करावे;
त्याला आसन अर्पण करून,
त्याचे पाय धुवावेत.॥ ५९ ॥
श्रद्धया चान्नदानेन
प्रियप्रश्नोत्तरेण च ।
गच्छतश्चानुयानेन प्रीतिमुत्पादयेद् गृही ॥ ६० ॥
त्याला श्रद्धेने अन्न द्यावे, त्याच्याशी सभ्य आणि दयाळूपणे बोलावे आणि जेव्हा तो निघतो,
तेव्हा त्याला मैत्रीपूर्ण
शुभेच्छा देऊन त्याचा निरोप घ्यावा. ॥ ६० ॥
अज्ञातकुलनामानमन्यदेशादुपागतम्
।
पूजयेदतिथिं सम्यङ्नैकग्रामनिवासिनम्
॥ ६१ ॥
जो दुसऱ्या ठिकाणाहून आला असेल आणि ज्याचे नाव आणि वंश
अज्ञात असेल त्याचाच अतिथिसत्कार करावा . गृहस्थाने आपल्याच गावच्या
व्यक्तीचा अतिथि सत्कार करणे योग्य नाही. ॥ ६१ ॥
अकिञ्चनमसम्बन्धमज्ञातकुलशीलिनम्
।
असम्पूज्यातिथिं भुक्त्वा भोक्तुकामं
व्रजत्यधः ॥ ६२ ॥
ज्या व्यक्ति जवळ कोणतेही
सामान नाही, जो अनोळखी व गरीब आहे तसेच ज्याची कोणाशीही ओळख नाही, ज्याचे कुल शील
माहीत नाही आणि ज्याला भोजनाची इच्छा आहे अशा व्यक्तीला भोजन न देता स्वतःच भोजन
गृहस्थ नरकात जातो. ॥
६२
॥
स्वाध्यायगोत्राचरणमपृष्ट्वा च
तथा कुलम् ।
हिरण्यगर्भबुद्ध्या तं मन्येताभ्यागतं
गृही ॥ ६३ ॥
दारात आलेल्या व्यक्तिचे कुल, शील,
ज्ञान, जात वगैरे विषयी कोणतीही चौकशी न करता श्रद्धेने त्याचे आदरातिथ्य करावे . ॥
६३
॥
पित्रर्थं चापरं विप्रमेकमप्याशयेन्नृप
।
तद्देश्यं विदिताचारसम्भूतिं पाञ्चयज्ञिकम्
॥ ६४ ॥
हे नृपा गृहस्थाने अशा व्यक्तीचे आदरातिथ्य केल्यानंतर
आपल्याच गावातील आणखी एका पांचयज्ञिक ब्राह्मणाचे ज्याचे कुटुंब आणि गोत्र माहीत आहे त्याचे
आदरातिथ्य करून त्यास भोजन द्यावे . ॥ ६४ ॥
अन्नाग्रञ्च समुद्धृत्य हन्तकारोपकल्पितम्
।
निर्वापभूतं भूपाल श्रोत्रियायोपपादयेत्
॥ ६५ ॥
आधीच काढून ठेवेलेल्या हंतकार
नावाच्या अन्नाने त्या वेदांमध्ये
शिकलेल्या ब्राह्मणाला अन्न द्यावे . ॥ ६५ ॥
दद्याच्च भिक्षात्रितयं परिव्राड्ब्रह्मचारीणाम्
।
इच्छया च बुधो दद्याद्विभवे सत्यवारितम्
॥ ६६ ॥
अशाप्रकारे देव, अतिथि आणि
ब्राह्मण ह्यांना तीन भिक्षा दिल्यानंतर आपल्या
सामर्थ्यानुसार पारीव्राजक आणि ब्रह्मचार्यांना देखील इच्छेनुसार भिक्षा द्यावी .
॥
६६
॥
इत्येतेऽतिथयः प्रोक्ताः प्रागुक्ता
भिक्षवश्च ये ।
चतुरः पूजायित्वैतान्नृप पापात्प्रमुच्यते
॥ ६७ ॥
आधी वर्णन केलेले तिघे आणि भिक्षूगण ह्या
चारही जणांना अतिथि म्हणतात . ह्या चारहिंचे पूजन केल्याने मनुष्य सर्व पापांटून
मुक्त होतो. ॥ ६७ ॥
अतिथिर्यस्य
भग्नाशो गृहात्प्रतिनिवर्तते ।
स तस्मै दुष्कृतं दत्त्वा पुण्यमादाय
गच्छति ॥ ६८ ॥
जर अतिथि कोणत्या घरातून निराश होऊन परतातो,
तो त्याची पापे त्या घरच्या यजमानाला
देऊन यजमानाचे पुण्य घेऊन जातो . ॥ ६८ ॥
धाता प्रजापतिः शक्रो वह्निर्वसुगणोर्यमा
।
प्रविश्यातिथिमेते वै भुञ्जन्तेन्नं
नरेश्वर ॥ ६९ ॥
हे नरेश्वरा, “ब्रह्मा,
प्रजापती,
इंद्र,
अग्नी,
वासुगण
आणि आर्यमा हे समस्त देवगण अतिथि मध्ये प्रविष्ट होऊन त्याला दिलेले अन्न त्याच्या रूपाने खातात . ॥
६९
॥
तस्मादतिथिपूजायां
यतेत सततं नरः ।
स केवलमघं भुङ्क्ते यो भुङ्क्ते
ह्यतिथिं विना ॥ ७० ॥
म्हणून माणसाने नेहेमी आदरातिथ्याचे कर्तव्य पार
पाडण्यात तत्पर असावे; कारण जो अतिथीला काहीही न देता आपले अन्न खातो तो केवळ पाप भोगतो. ॥
७०
॥
ततः स्ववासिनीदुःखी गर्भिणीवृद्धबालकान्
।
भोजयेत्संस्कृतान्नेन प्रथमं चरमं
गृही ॥ ७१ ॥
"त्यानंतर गृहस्थाने पितृगृही
राहणाऱ्या विवाहित मुली, आजारी, दुखी, गर्भवती
महिला, घरातील वृद्ध आणि लहान मुलांना भोजन देऊन मगच शेवटी स्वतः भोजन करावे . ॥
७१
॥
अभुक्तवत्सु
चैतेषु भुञ्जन्भुङ्क्ते स दुष्कृतम् ।
मृतश्च गत्वा नरकं श्लोष्मभुग्जायते
नरः ॥ ७२ ॥
वरील सांगितलेल्या सर्वांना भोजन
दिल्याशिवाय जो स्वतः भोजन करतो तो या जन्मात पापाचा दोषी ठरतो आणि मृत्यूनंतर नरकात श्लेष्मभोजी कीट
बनतो. ॥ ७२ ॥
अस्नाताशी मलं भुक्ते ह्यजपी पूयशोणितम् ।
असंस्कृतान्नभुङ्मूत्रं बालादिप्रथमं
शकृत् ॥ ७३ ॥
अहोमी च कृमीन्भुङ्क्ते अदत्त्वा
विषमश्नुते ॥ ७४ ॥
जो स्नान न करता भोजन करतो तो मल
भक्षण करतो आणि जो जप केल्याशिवाय भोजन करतो तो रक्त आणि पू भक्षण करतो,
संस्कारहीन भोजन करणारा मूत्र पान करतो व वृद्ध तसेच मुलांच्या आधी भोजन करणारा
विष्ठा भक्षण करतो. होम केल्याशिवाय भोजन करणारा किडे भक्षण करतो आणि दान केल्याशिवाय
भोजन करणारा विष भक्षण करतो. ॥ ७३-७४ ॥
तस्माच्छृणुष्व राजेन्द्र यथा भुञ्जीत
वै गृही ।
भुञ्जतश्च यथा पुंसः पापबन्धो न
जायते ॥ ७५ ॥
इह चारोग्यविपुलं बलबुद्धिस्तथा
नृप ।
भवत्यरिष्टशान्तिश्च वैरिपक्षाभिचारिका
॥ ७६ ॥
म्हणून हे राजा,
‘गृहस्थाने
कसे भोजन
करावे ते ऐक - जेणेकरुन जेवताना कोणतेही पाप होणार नाही, अखंड आरोग्य आणि वाढीव जोम सुरक्षित
राहील, ज्ञान प्राप्ती
होईल आणि
सर्व दुष्कृत्ये व प्रतिकूल डावपेच टाळता येतील ती भोजन पद्धती ऐक . ॥
७५-७६
॥
स्नातो तथावत्कृत्वा च देवर्षिपितृतर्पणम्
।
प्रशस्तरत्नपाणिस्तु भुञ्जीत प्रयतो
गृही ॥ ७७ ॥
गृहस्थाने, आंघोळ करून, यथाविधी देवता आणि पितृगणाना मानाने प्रसाद अर्पण करून,
हातात
उत्तम रत्न धारण करून, प्रसन्नतेने पवित्रतापूर्वक भोजन करावे. ॥ ७७
॥
कृते जपे हुते वह्नौ शुद्धवस्त्रधरो
नृप ।
दत्त्वातिथिभ्यो विप्रेभ्यो गुरुभ्यः
संश्रिताय च ।
पुम्यगन्धश्शस्तमाल्यधारी चैव नरेश्वर
॥ ७८ ॥
एकवस्त्रधरोऽथार्द्रपाणिपादो महीपते
।
वुशुद्धवदनः प्रीतो भुञ्जीत न विदिङ्मुखः
॥ ७९ ॥
जप, अग्निहोत्र वगैरे नंतर शुद्ध
वस्त्र धारण करून अतिथि, ब्राह्मण, गुरुजन आणि इतर आश्रित ह्यांना भोजन द्यावे आणि
मग स्वच्छ
कपडे तसेच
सुगंधी फुलांचे हार घालून, हात पाय आणि तोंड स्वच्छ
धुवून मगच प्रसन्नतेने भोजन करावे . जेवते वेळी इथे तिथे बघू नये . ॥
७८-७९
॥
प्राङ्मुखोदङ्मुखो
वापि न चैवान्यमना नरः ।
अन्नं प्रशस्तं पथ्यं च प्रोक्षितं प्रोक्षणोदकैः ॥ ८० ॥
त्याने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे
तोंड न करता, उत्तम प्रतीचे पथ्यकर अन्न मंत्रित जलाने प्रोक्षण करून मगच भोजन
करावे. ॥ ८० ॥
न कुत्सिताहृतं नैव जुगुप्सावदसंस्कृतम्
।
दत्त्वा तु भक्तं शिष्येभ्यः क्षुधितेभ्यस्तथा
गृही ॥ ८१ ॥
प्रशस्तशुद्धपात्रे तु भुञ्जीताकुपितो
द्विजः ॥ ८२ ॥
कोणत्याही नीच व्यक्तीने आणलेले, अयोग्य मार्गाने किंवा अयोग्यरित्या
शिजवलेले तसेच बलीविश्वेदेव आदि संस्कारशून्य अन्न ग्रहण करू नये. हे द्विजा, गृहस्थाने
आपल्या अन्नाचा काही अंश आपले शिष्य व इतर भुकेल्या साथीदारांना देऊन मग शांत मनाने स्वच्छ पात्रातून भोजन करावे .
॥
८१-८२ ॥
नासन्दिसंस्थिते पात्रे नादेशे च
नरेश्वर ।
नाकाले नातिसंकीर्णे दत्त्वाग्रं
च नरोग्नये ॥ ८३ ॥
हे नरेश्वरा, “ वेताच्या आसनावर
ठेवलेल्या भांड्यातील, अयोग्य स्थानी ठेवलेले किंवा संध्या आदि अवेळी तसेच संकुचित
स्थानी कधीही भोजन करू नये. वाढलेल्या अन्नाचा अग्रभाग प्रथम अग्नीला अर्पण करून मगच भोजन करावे. ॥
८३
॥
मन्त्राभिमन्त्रितं शस्तं न च पर्युषितं
नृप ।
अन्यत्र फलमूलेभ्यः शुष्कशाखादिकात्तथा
॥ ८४ ॥
तद्वद्धारीतकेभ्यश्च गुडभक्ष्येभ्य
एव च ।
भुञ्जीतोद्धृतसाराणि न कदापि नरेश्वर
॥ ८५ ॥
मंत्रित, प्रशस्त आणि शिळे नसलेले
अन्नच खावे. परंतु फळ, मुळे आणि सुका भाजीपाला, न शिजविलेल्या चटण्या, गुळाचे
पदार्थ ह्यांचीसाठी वरील नियम नाही . हे नरेश्वरा, “सारहीन पदार्थ कधीही खाऊ
नयेत”. ॥ ८४-८५ ॥
न शेषं पुरुषोऽश्नीयादन्यत्र जगतीपते
।
मध्वम्बुदधिसर्पिभ्यः सक्तुभ्यश्च
विवेकवान् ॥ ८६ ॥
विवेकी पुरुषाने मध,
पाणी,
दही तूप आणि सत्तू याशिवाय कोणताही पदार्थ
पूर्णपणे खाऊ नये . ॥ ८६ ॥
अश्नीयात्तन्मयो भूत्वा पूर्वं तु
मधुरं रसम् ।
लबणाम्लौ तथा मध्ये कटुतिक्तादिकांस्ततः
॥ ८७ ॥
एकाग्रचित्ताने भोजन करावे, तसेच
प्रथम गोड
चवीचे
पदार्थ, त्यानंतर मीठाचे आणि आंबट पदार्थ आणि शेवटी तिखट आणि कडू चवीचे पदार्थ खावेत. ॥
८७
॥
प्राग्द्रवं
पुरुषोऽश्नीयान्मध्ये कठिनभोजनः ।
अन्ते पुनर्द्रवाशी तु बलारोग्ये
न मुञ्चति ॥ ८८ ॥
जेवणाच्या सुरुवातीला द्रवपदार्थ,
नंतर घनपदार्थ आणि शेवटी
पुन्हा द्रवपदार्थ खाऊन भोजन समाप्त करतो, तो माणूस कायम स्वस्थ आणि निरोगी राहतो . ॥
८८
॥
अनिन्द्यं भक्षयेदित्थं
वाग्यतोऽन्नमकुत्सयन् ।
पञ्चग्रासं महामौनं प्राणाद्याप्यायनं
हि तत् ॥ ८९ ॥
अशा रीतीने वाणी संयमित ठेऊन,
शांतपणे अनिषिद्ध अन्न भोजन
करावे. अन्नाची कधीही निंदा करू नये. पाहिले पाच घास नेहमी एकही शब्द न उच्चारता खावेत. त्यामुळे
पंचप्राण तृप्त होतात. ॥ ८९ ॥
भुक्त्वा सम्यगथाचम्य
प्राङ्मुखोदङ्मुखोऽपि वा ।
यथावत्पुनराचामेत्पाणी प्रक्षाल्य मूलतः ॥ ९० ॥
जेवल्यानंतर, गृहस्थाने आपले तोंड पूर्वेकडे किंवा
उत्तरेकडे वळवून तोंड स्वच्छ धुवावे, हात मनगटापासून खालच्या दिशेने धुवावेत आणि परत आचमन करावे. ॥
९०
॥
स्वस्थः प्रशान्तचित्तस्तु कृतासनपरिग्रहः
।
अभीष्टदेवतानां तु कुर्वीत स्मरणं
नरः ॥ ९१ ॥
त्यानंतर प्रसन्न आणि शांतचित्ताने आसनावर बसून आपल्या
इष्टदेवतेचे चिंतन करावे. ॥ ९१ ॥
अग्निराप्याययेद्धातुं पार्थिवं पवनेरितः ।
दत्तावकाशं नभसा जरयत्यस्तु मे सुखम् ॥ ९२ ॥
प्रार्थना करावी की, “वायूने उत्तेजित झालेल्या
जठराग्नीने,
आकाशाद्वारा अवकाशयुक्त
अन्नाचे घटकांमध्ये रूपांतर करून त्याचे पचन होऊन मला समाधान मिळो!
॥
९२
॥
अन्नं बलाय मे भूमेरपामग्न्यनिलस्य
च ।
भवत्येतत्परीणतं ममास्त्यव्याहतं
सुखम् ॥ ९३ ॥
ह्या अन्नामुळे,
माझ्या शरीरातील पृथ्वी,
जल,
अग्नी आणि वायू ह्यांचे बल वाढविण्यास हातभार लागो आणि ह्या चार
तत्त्वांमध्ये रूपांतरित झालेले अन्न मला अखंड तृप्ती प्रदान करो ! ॥ ९३ ॥
प्राणापानसमानानामुदानव्यानयोस्तथा
।
अन्नं पुष्टिकरं चास्तु ममाप्यव्याहतं
सुखम् ॥ ९४ ॥
ह्या अन्नामुळे माझे प्राण, अपान,
समान, उदान आणि व्यान ह्यांची पुष्टी करो आणि मला निर्बाध सुखाची प्राप्ती होवो. ॥
९४
॥
अगस्तिरग्निर्वडवानलश्च भुक्तं मयान्नं
जरयत्वशेषम् ।
सुखं च मे त्परिणामसम्भवंयच्छन्त्वरोगं
मम चास्तु देहे ॥ ९५ ॥
मी खाल्लेल्या सर्व अन्नाचा अगस्ती नामक
अग्नी आणि वडवानल परिपाक करोत आणि
त्यामुळे माझ्यावर चांगला परिणाम होऊन मला सुख मिळो आणि माझ्या शरीराला आरोग्य प्राप्त
होवो. ॥ ९५ ॥
विष्णुःसमस्तेन्द्रियदेहदेही
वृथा न भूतो भगवान्यथैकः ।
सत्येन तेनात्तमशेषमन्नमारोग्यदं
मे परिणाममेतु ॥ ९६ ॥
विष्णू, जो देह आणि इंद्रियांचे मुख्य तत्व आहे,
त्याच्यावरील माझ्या श्रद्धेने
प्रसन्न होवो,
आणि मी जे स्फूर्तिदायक
अन्न ग्रहण
करतो त्याचा माझ्या आरोग्यावर
लाभदायक प्रभाव पडो . ॥ ९६ ॥
विष्णुरत्ता तथैवान्नं परिणामश्च
वै तथा ।
सत्येन तेन मद्भुक्तं जीर्यत्यन्नमिदं
तथा ॥ ९७ ॥
भक्षक ,अन्न आणि पोषण हे सर्व विष्णुच आहे या श्रद्धेने मी जे
खाल्ले आहे त्याचे योग्य रित्या पचन व्हावे.” ॥ ९७
॥
इत्युच्चार्य
स्वहस्तेन परिमृज्य तथोदरम् ।
अनायासप्रदायीनि कुर्यात्कर्मण्यतन्द्रितः
॥ ९८ ॥
“ही प्रार्थना करून गृहस्थाने आपल्या पोटावरून
हात फिरवावा आणि कमी श्रमाची कामे करावीत. ॥ ९८ ॥
सच्छास्त्रादिविनोदेन सन्मार्गादविरोधिना
।
दिनं नयेत्ततःसन्ध्यामुपतिष्ठेत्समाहितः
॥ ९९ ॥
पवित्र शास्त्रांद्वारे अधिकृत केलेले संस्कार तसेच व धार्मिक प्रथांशी विसंगत
नसलेल्या
करमणुकीत दिवस घालवावा आणि सायंकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी
संध्योपासना करावी. ॥
९९
॥
दिनान्तसन्ध्यां सूर्येण पूर्वामृक्षैर्युतां
बुधः ।
उपतिष्ठेद्यथान्याय्यं सम्यगाचम्य
पार्थिव ॥ १०० ॥
हे राजन बुद्धिमान पुरुषाने
सायंकाळी सूर्यास्ता पूर्वी आणि प्रातःकाळी तारांगण दिसत असताना म्हणजे
सूर्योदयापूर्वी योग्य प्रकारे आचमन आदि करून विधिपूर्वक संध्योपासना करावी. ॥
१००
॥
सर्वकालमुपस्थानं सन्ध्ययोः पार्थिवेष्यते
।
अन्यत्र सूतकाशौचविभ्रमातुरभीतितः
॥ १०१ ॥
हे पार्थिवा, “सूतक (पुत्रजन्म आदि
मुळे होणारी अशुचिता) अशौच (मृत्यू मुळे होणारी अशुचिता), उन्माद, रोग, भय आदि
बाधा नसेल तर दररोज संध्योपासना करावी. ॥ १०१ ॥
सूर्येणाभ्युदितो यश्च त्यक्तः सूर्येण
वा स्वपन् ।
अन्यत्रातुरभावात्तु प्रायश्चित्ती
भवेन्नरः ॥ १०२ ॥
जो पुरुष आजारी नसताना सुद्धा
सूर्योदय आणि सूर्यास्ताचे वेळी झोपतो त्याला प्रायश्चित्त घेणे आवश्यक असते . ॥ १०२
॥
तस्मादनुदिते सूर्ये समुत्थाय महीपते
।
उपतिष्ठेन्नरःसन्ध्यामस्वपंश्च दिनान्तजाम्
॥ १०३ ॥
म्हणून माणसाने सकाळी सुर्योदयापूर्वी उठून प्रातःसंध्या
करावी आणि संध्याकाळी सुद्धा संध्यावंदन
करावे, ह्यावेळी झोपू नये. ॥ १०३ ॥
उपतिष्ठन्ति
वै सन्ध्यां ये न पूर्वं न पश्चिमाम् ।
व्रजन्ति ते दुरात्मानस्तमिस्त्रं
नरकं नृप ॥ १०४ ॥
हे नृपा जो पुरुष प्रातःसंध्या आणि
संध्याकाळचे संध्यावंदन करत
नाहीत ते
मृत्यूनंतर (अंधतामिस्र) नावाच्या अंधाराच्या नरकात जातात. ॥ १०४
॥
पुनः पाकमुपादाय सायमप्यवनीपते ।
वैश्वदेवनिमित्तं वै पत्न्यमन्नं
बलिं हरेत् ॥ १०५ ॥
तत्रापि श्वपचादिभ्यस्तथैवान्नविसर्जनम्
॥ १०६ ॥
त्यानंतर हे पृथ्वीपते संध्याकाळी
शिजवलेल्या अन्नाने गृहस्थाच्या पत्नीने, प्रार्थनेशिवाय बळीवैश्वदेव करावे म्हणजेच बहिष्कृत आणि अशुद्ध आत्म्यांना अन्न द्यावे.
ह्यावेळी
परत श्वपच आदि साठी अन्नदान केले जाते . ॥ १०५-१०६ ॥
अतिथिं चागतं तत्र स्वशक्त्या पूजयेद्बुधः
।
पादशौचासनप्रह्वस्वागतोक्त्या च
पूजनम् ।
ततश्चान्नप्रदानेन शयनेन च पर्थिव
॥ १०७ ॥
गृहस्थाने आपल्या साधनानुसार,
येणाऱ्या अतिथीचा पाहुणचार करावा. यजमानाने स्वत: आलेल्या अतिथीचे
विनम्रपणे पाय धुवून त्याला आसन द्यावे आणि रात्रीचे जेवण आणि झोपायला पलंग देऊन त्याचे स्वागत
करावे. ॥ १०७ ॥
दिवातिथौ तु विमुखे गते यत्पातकं
नृप ।
तदेवाष्टगुणं पुंसःसूर्योढे विमुखे
गते ॥ १०८ ॥
सूर्यास्तानंतर आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य न करण्याचे पाप दिवसा येणाऱ्या अतिथीचे आदरातिथ्य न करण्यापेक्षा
आठ पटीने जास्त आहे. ॥
१०८
॥
तस्मात्स्वशक्त्या राजेन्द्र सूर्योढमतिथिं
नरः ।
पूजयेत्पूजिते तस्मिन्पूजिताःसर्वदेवता
॥ १०९ ॥
म्हणून मनुष्याने विशेषतः संध्याकाळी
आश्रयासाठी आलेल्या व्यक्तीचे आतिथ्य करावे कारण त्याला संतुष्ट केल्याने समस्त देवतांचे पूजन
होते. ॥ १०९ ॥
अन्नशाकाम्बुदानेन स्वशक्त्या पूजयेत्पुमान्
।
शयनप्रस्तरमहीप्रदानैरथवापि तम्
॥ ११० ॥
गृहस्थाने आपली कुवतीनुसार घरी आलेल्या पाहुण्यालं पोटभर जेवण,
पाणी
आणि झोपायला जागा, किंवा गवताचे आसन किंवा जमीन
तरी द्यावी. ॥ ११० ॥
सृतपादादिशौचस्तु भुक्त्वा सायं
ततो गृही ।
गच्छेच्छय्यामस्फुटितामपि दारुमयीं
नृप ॥ १११ ॥
“गृहस्थाने संध्याकाळचे जेवण झाल्यावर,
हात
पाय धुऊन छिद्र नसलेल्या
लाकडाच्या पलंगावर विश्रांती घेतली पाहिजे. ॥ १११ ॥
नाविशालां न वै भग्नां नासमां मलिनां
न च ।
नच जन्तुमयीं शय्यामधितिष्ठेदनास्तृताम्
॥ ११२ ॥
जो पलंग मोठा ऐसपैस नसेल, तुटलेला किंवा
उंच सखल असेल, मलिन किंवा कीटकांचा प्रादुर्भाव असलेला असेल तर त्यावर झोपू नये . ॥
११२
॥
प्राच्यां
दिशि शिरःशस्तं याम्यायामथ वा नृप ।
सदैव स्वपतः पुंसो विपरीतं तु रोगदम्
॥ ११३ ॥
झोपताना
नेहमी पूर्वेकडे
किंवा दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे; इतर कोणत्याही दिशेला डोके करून झोपणे अस्वास्थ्यकर आहे. ॥
११३
॥
ऋतावुपगमः शस्तःस्वपत्न्यामवनीपते
।
पुन्नामर्क्षे शुभे काले ज्येष्ठायुग्मासु
रात्रिषु ॥ ११४ ॥
योग्य ऋतूसमयी पुरुषाने आपल्याच पत्नीसोबत संग करणे उचित
आहे. पुल्लिंग नक्षत्रात युग्म् मध्ये आणि त्यातही पूर्वीच्या रात्री शुभसमयी
स्त्रीसंग करावा. ॥ ११४ ॥
नाद्युनां
तु स्त्रियं गच्छेन्नातुरां न रजस्वलाम् ।
नानिष्टां न प्रकुपितां न त्रस्तां
न च गर्भिणीम् ॥ ११५ ॥
जर पत्नी आजारी, अस्वस्थ, रजस्वला, रागावलेली, किंवा गरोदर असेल तर अशावेळी
तिच्याशी संग करू नये. ॥ ११५ ॥
नादक्षिणां नान्यकामां नाकामां नान्ययोषितम्
।
क्षुत्क्षामां नातिभुक्तां वा स्वयं
चैभिर्गुर्णैर्युतः ॥ ११६ ॥
सरळ साधी स्वभावाची नसलेली,
पराभिलाषिणी किंवा निरभिलाषिणी, भुकेलेली
अति खाल्लेली किंवा परस्त्री असेल तर तिच्याशी संग करू नये आणि हे सर्व दोष
आपल्यात असतील तरीही स्त्री संग करू नये. ॥ ११६ ॥
स्नातःस्रग्गन्धधृक्प्रीतो नाध्मातः
क्षुधितोपि वा ।
सकामःसानुरागश्च व्यवायं पुरुषो
व्रजेत् ॥ ११७ ॥
पुरुषाने स्नान केल्यानंतर माला
आणि गंध धारण करून काम् आणि अनुरागयुक्त होऊन स्त्रीगमन करावे. अति भोजन झाल्या
वेळी किंवा भूक लागलेली असता स्त्री संग करू नये . ॥ ११७
॥
चतुर्दश्यष्टमी चैव तथामा चाथ पूर्णिमा
।
पर्वाण्येतानि राजन्द्र रवीसंक्रान्तिरेव
च ॥ ११८ ॥
हे राजेंद्रा, “चतुर्दशी, अष्टमी,
पौर्णिमा, अमावस्या आणि सूर्याची संक्रांत (नवीन चिन्हात प्रवेश) हे सर्व पर्वदिन
आहेत . ॥ ११८
॥
तैलस्त्रीमाससम्भोगी सर्वैष्वेतेषु
वै पुमान् ।
विण्मूत्रभोजनं नाम प्रयाति नरकं
मृतः ॥ ११९ ॥
ह्या दिवशी तेल, मांस आणि स्त्रीचा
भोग घेणारा मृत्यूनंतर विष्ठा आणि मूत्राने भरलेल्या नरकात जातो . ॥
११९
॥
अशेषपर्वस्वेतेषु तस्मात्संयमिभिर्बुधैः
।
भाव्यं सच्छास्त्रदेवेज्याध्यानजप्यपरैर्नरैः
॥ १२० ॥
संयमी आणि ज्ञानी पुरुषाने वरील पर्व दिवशी
सतशास्त्रअवलोकन, देवोपासना, ध्यान यज्ञानुष्ठान आणि प्रार्थनेत स्वतःला व्यस्त
ठेवावे.
॥
१२०
॥
नान्ययोनावयोनौ वा नोपयुक्तौषधस्तथा
।
द्विजदेवगुरूणां च व्यवायी नाश्रमे
भवेत् ॥ १२१ ॥
गाय वगैरे इतर योनि असलेल्यांशी, औषधांनी किंवा अनैसर्गिक वस्तूंनी ब्राह्मण, देवता आणि
गुरूच्या आश्रमात तसेच सार्वजनिक किंवा पवित्र ठिकाणी मैथुन करू नये. ॥ १२१
॥
चैत्यचत्वरतीरेषु
नैव गोष्ठे चतुष्पथे ।
नैव श्मशानोपवने सलिलेषु महीपते
॥ १२२ ॥
चैत्यवृक्षाखाली, अंगणात,
तीर्थक्षेत्री, पशुशाळेत, चाररस्त्यात, स्मशानात, बागेत किंवा जलात मैथुन करणे
योग्य नाही. ॥ १२२ ॥
प्रोक्तपर्वस्वशेषेषु नैव भूपाल सन्ध्ययोः ।
गच्छेद्व्यवायं मनसा न मूत्रोच्चारपीडितः ॥ १२३ ॥
वर सांगितलेल्या सर्व पर्व दिवशी
सकाळी आणि सायंकाळी तसेच मल मूत्र समयी बुद्धिमान पुरुषाने मैथुन करू नये. ॥
१२३
॥
पर्वस्वभिगमोऽधन्यो दिवा पापप्रदो
नृप ।
भुवि रोगावहो नॄणामप्रशस्तो जलाशये
॥ १२४ ॥
पर्वदिवशी स्त्रीगमन केल्याने
धनहानी होते, दिवसा केल्याने पाप लागते, पृथ्वीवर केल्याने रोग होतात आणि जलाशयात
स्त्रीप्रसंग केल्याने अमंगल होते. ॥ १२४ ॥
परदारान्न गच्छेच्च मनसापि पथञ्चन
।
किमु वाचास्थिबन्धोऽपि नास्ति तेषु
व्यवायिनाम् ॥ १२५ ॥
परस्त्रीसोबत वाणीने तर नाहीच पण
मनाने सुद्धा प्रसंग करू नये कारण त्यांच्याशी मैथुन करणाऱ्यास अस्थि शून्य कीट
आदिचा जन्म मिळतो . ॥ १२५ ॥
मृतो नरकमभ्येति
हीयतेऽत्रापि चायुषः ।
परदाररतिः पुंसामिह चामुत्र भीतिदा ॥ १२६ ॥
परस्त्रीचा संग पुरुषाला इहलोक आणि
परलोक दोन्ही ठिकाणी भयदायी आहे . इहलोकी त्याचे आयुष्य क्षीण होते आणि मृत्यु
नंतर तो नरकात जातो . ॥ १२६ ॥
इति मत्वा स्वदारेषु ऋतुमत्सु बुधो
व्रजेत् ।
यथोक्तदोषहीनेषु सकामेष्वनृतावपि
॥ १२७ ॥
हे जाणून बुद्धिमान पुरुषाने वरील
दोषांपासून मुक्त राहण्यासाठी आपल्या पत्नी सोबतच ऋतुसमयी प्रसंग करावा आणि तिची
इच्छा असल्यास ऋतुकाल नसतानाही तिच्याशी संग करावा. ॥ १२७
॥
इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अंशे एकादशोऽध्यायः (११)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा