गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, दशम अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 10

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः दशमोऽध्यायः ॥




"जातकर्म, नामकरण आणि विवाह-संस्कार विधि"

सगर उवाच
कथितं चातुराश्रम्यं चातुर्वर्ण्यक्रियास्तथा ।
पुंसः क्रियामहं श्रोतुमिच्छामि द्विजसत्तम ॥ १ ॥

सगर म्हणाला ;– हे द्विजश्रेष्ठा ! आपण चारही आश्रम आणि चारही वर्णांच्या कर्मांचे वर्णन केले. आता मी आपल्या द्वारा मनुष्याची कर्मे ऐकू इच्छितो || ||

 


 नित्यनैमित्तिकाः काम्याः क्रियाः पुंसामशेषतः ।
 समाख्याहि भृगुश्रेष्ठ सर्वज्ञो ह्यसि मे मतः ॥ २ ॥

हे भृगुश्रेष्ठा ! मला माहित आहे कि आपण सर्वज्ञ आहात . म्हणून आपण मनुष्यांच्या नित्य नैमित्तिक आणि काम्य आदि सर्व प्रकारच्या कर्मांचे निरूपण करावे || ||

 


 और्व उवाच
 यदेतदुक्तं भवता नित्यनैमित्तिकाश्रयम् ।
 तदहं कथयिष्यामि शृणुष्वैकमना मम ॥ ३ ॥

और्य म्हणाले ;– हे राजन ! तू जे नित्य-नैमित्तिक आदि क्रियाकलापां विषयी विचारले ते सर्व मी वर्णन करतो एकाग्रचित्ताने ऐक || ||



 जातस्य जातकर्मादिक्रियाकाण्डमशेषतः ।
 पुत्रस्य कुर्वीत पिता श्राद्धं चाभ्युदयात्मकम् ॥ ४ ॥

पुत्र उत्पन्न झाल्यावर पित्याने त्याचे जातकर्म आदि सर्व क्रियाकांड आणि आभ्युदयिक श्राद्ध करावे || ||

 

 

 युग्मांस्तु प्राङ्मुखान्विप्रान्भोजयेन्मनुजेश्वर ।
 यथा वृत्तिस्तथा कुर्याद्दैवं पित्र्यं द्विजन्मनाम् ॥ ५ ॥

हे नरेश्वरा ! पूर्वाभिमुख बसून युग्म ब्राह्मणांना भोजन द्यावे तसेच द्विजातिंच्या  व्यवहारानुसार देव व पितृपक्षाच्या तृप्तिसाठी श्राद्ध करावे || ||

 


 दध्ना यवैः सबदरैर्मिश्रान्पिडान्मुदा युतः ।
 नान्दीमुखेभ्यस्तीर्थेन दद्याद्दैवेन पार्थिव ॥ ६ ॥

आणि हे राजन ! प्रसन्नता पूर्वक देवतीर्थ (बोटांचा अग्रभाग) द्वारा नांदीमुख पितृगणाला दही, जव आणि बदरीफळाचे मिश्रण बनवून पिण्ड द्यावा || ||

 


 प्राजापत्येन वा सर्वमुपचारं प्रदक्षिणम् ।
 कुर्वीत तत्तथाशेषवृद्धिकालेषु भूपते ॥ ७ ॥

अथवा प्राजापत्यतीर्थ (करंगळीचे मूळ) द्वारा सम्पूर्ण उपचारद्रव्यांचे दान करावे | अशा प्रकारे कन्या किंवा पुत्रांच्या विवाह आदि समस्त वृद्धिकाळाच्या वेळी सुद्धा करावे || ||

 


 ततश्च नाम कुर्वीत पितैव दशमेऽहनि ।
 देवपूर्वं नराख्यं हि शर्मवर्मादिसंयुतम् ॥ ८ ॥

त्यानन्तर, पुत्रोत्पत्तिच्या दहाव्या दिवशी पित्याने नामकरण-संस्कार करावा. पुरुषाचे नाव पुरुषवाचक असावे. त्याच्याआधी देववाचक शब्द असावा व नंतर शर्मा, वर्मा आदि शब्द असावा || ||

 


 शर्मेति ब्राह्मणस्योक्तं वर्मेति क्षत्रसंश्रयम् ।
 गुप्तदासात्मकं नाम प्रशस्तं वैश्यशुद्रयोः ॥ ९ ॥

ब्राह्मणाच्या नावाच्या शेवटी शर्मा, क्षत्रियाच्या नावाच्या शेवटी वर्मा तसेच वैश्य व शूद्रांच्या नावाशेवटी क्रमश: गुप्त आणि दास शब्दांचा प्रयोग करावा || ||

 


 नार्थहीनं न चाशस्तं नापशब्दयुतं तथा ।
 नामङ्‍गल्यं जुगुप्स्यं वा नाम कुर्यात्समाक्षरम् ॥ १० ॥

नाम अर्थहीन, अविहित, अपशब्दयुक्त, अमांगलिक आणि निंदनीय नसावे तसेच अक्षर समान असावे || १० ||

 


 नातिदीर्घं नातिह्रस्वं नातिगुर्वक्षरान्वितम् ।
 सुखोच्चार्यं तु तन्नाम कुर्याद्यत्प्रणवाक्षरम् ॥ ११ ॥

अति दीर्घ, अति लघु अथवा कठिन अक्षरांनी युक्त असे नाव नसावे . ज्याचे सुखपूर्वक उच्चारण करता येईल आणि ज्याचे मागचे वर्ण लघु असतील असे नाव असावे || ११ ||


 ततोऽनन्तरसंस्कारसंस्कृतो गुरुवेश्मनि ।
 यथोक्तविधिमाश्रित्य कुर्याद्विद्यापरिग्रहम् ॥ १२ ॥

त्यानन्तर उपनयन-संस्कार झाल्यावर गुरुगृही राहून विधिपूर्वक विद्याध्ययन करावे || १२ ||

 


 गृहीतविद्यो गुरवे दत्त्वा च गुरुदक्षिणाम् ।
 गार्हस्थ्यमिच्छन्भूपाल कुर्याद्दारपरिग्रहम् ॥ १३ ॥

हे भूपाला ! विद्याध्ययन झाल्यावर गुरूला दक्षिणा देऊन जर गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर विवाह करावा || १३ ||

 


 ब्रह्मचर्येण वा कालं कुर्यात्संकल्पपूर्वकम् ।
 गुरोः शुश्रुषणं कुर्यात्तत्पुत्रादेरथापि वा ॥ १४ ॥

किंवा दृढ़ संकल्पपूर्वक नैष्ठिक ब्रह्मचर्य ग्रहणकरून गुरु अथवा गुरुपुत्रांची सेवा-शुश्रूषा करत राहावे || १४ ||

 


 वैखानसो वापि भवेत्परिव्राडथ वेच्छया ।
 पूर्वसंकल्पितं यादृक् तादृक्कुर्यान्नराधिप ॥ १५ ॥

अथवा आपल्या इच्छेनुसार वानप्रस्थ किंवा संन्यास ग्रहण करावा . हे राजन ! आधी जो संकल्प केला असेल तसेच करावे || १५ ||




 वर्षैरेकगुणां भार्यामुद्वहेत्त्रिगुणःस्वयम् ।
 नाति केशामकेशां वा नातिकृष्णां न पिङ्‍गलाम् ॥ १६ ॥

जर विवाह करायचा असेल तर आपल्याहून तृतीयांश अवस्थेतील कन्येशी विवाह करावा तसेच अधिक किंवा अल्प केस असलेल्या किंवा अति सावळी किंवा पांडूवर्णाच्या स्त्रीशी सम्बन्ध करू नये || १६ ||

 


 निसर्गतोऽधिकाङ्‍गीं वा न्यूनाङ्‍गीमपि नोद्वहेत् ।
 नाविशुद्धां सरोमां वाकुलजां वापि रोगिणीम् ॥ १७ ॥

जिच्यात जन्मतःच अधिक वा न्यून अंग असले, जी अपवित्र, रोमयुक्त, अकुलीना अथवा रोगिणी असेल त्या स्त्रीचे पाणिग्रहण करू नये || १७ ||

 


 न दुष्टां दुष्टवाक्यां वा व्यंगिनीं पितृमातृतः ।
 न श्मश्रुव्यञ्जनवतीं न चैव पुरुषाकृतिम् ॥ १८ ॥
 न घर्वरस्वरां क्षामां तथा काकस्वरां न च ।
 नानिबन्धेक्षणां तद्वद्वृत्ताक्षीं नोद्वहेद्‍बुधः ॥ १९ ॥

बुद्धिमान पुरुषाला उचित हेच आहे कि दुष्ट स्वभावाची, कटुभाषिणी, माता किंवा पित्याच्या अनुसार अंगहीना असलेली, जिच्यात श्मश्रु चिन्ह आहेत, पुरुषी आकाराची अथवा घर्घर शब्द करणारी अतिमन्द किंवा गोल नेत्र असलेल्या स्त्रीशी विवाह करू नये || १८ – १९ ||

 


 यस्याश्च रोमशे जङ्‍घे गुल्फौ यस्यास्तथोन्नतौ ।
 गण्डयोः कूपरौ यस्या हसन्त्यास्तां न चोद्वहेत् ॥ २० ॥

जिच्या जांघांवर केस असतील, जिचे गुल्फ ऊंच असतील आणि हसताना जिच्या कपोलांवर खड्डे पड़तात त्या कन्येशी विवाह करू नये || २० ||

 


 नातिरूक्षच्छविं पाण्डुकरजामरुणेक्षणाम् ।
 आपीनहस्तपादां च नकन्यामुद्वहेद्‍ बुधः ॥ २१ ॥

जिची कान्ति अत्यंत उदासीन असेल, नख पांडूवर्ण असतील, नेत्र लाल तसेच हाथ-पाय भारी अवजड असतील, बुद्धिमान पुरुषाने त्या कन्येशी विवाह करू नये || २१ ||

 


 न वामनां नातिदीर्घां नोद्वहेत्संहतभ्रुवम् ।
 न चातिच्छिद्रदशनां न करालमुखीं नरः ॥ २२ ॥

जी अति बुटकी किंवा अति उंच असेल, जिच्या भुवया जोडलेल्या असतील, जिच्या दातात अधिक अंतर असेल व जी दात पुढे आलेली असेल त्या स्त्रीशी कधीही विवाह करू नये || २२||

 


 पञ्चमीं मातृपक्षाच्च पितृपक्षाच्च सप्तमीम् ।
 गृहस्थश्चोद्वहेत्कन्यां न्यायेन विधिना नृप ॥ २३ ॥

हे राजन ! मातृपक्षापासून पाचव्या पीढ़ीपर्यंत आणि पितृपक्षापासून सातव्या पीढ़ीपर्यंत ज्या कन्येचा सम्बन्ध नसेल, गृहस्थ पुरुषाने नियमानुसार तिच्याशीच विवाह करावा || २३ ||

 


 ब्राह्मो दैवस्तथैवार्षः प्राजापत्यस्तथासुरः ।
 गान्धर्वराक्षयौ चान्यौ पैशाचश्चाष्टमो मतः ॥ २४ ॥

ब्राह्य, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गान्धर्व, राक्षस आणि पैशाच – हे आठ प्रकारचे विवाह आहेत || २४ ||

 


 एतेषां यस्य यो धर्मो वर्णस्योक्तो महर्षिभिः ।
 कुर्वीत दारग्रहणं तेनान्यं परिवर्जयेत् ॥ २५ ॥

ह्यापैकी जे विवाह ज्या वर्णासाठी महर्षिंनी धर्मानुकुल सांगितले आहेत त्यानुसारच दार-परिग्रह करावा, किंवा अन्य विधिंचा त्याग करावा || २५ ||

 


 सधर्मचारिणीं प्राप्य गार्हस्थ्यं सहितस्तया ।
 समुद्वहेद्‌ददात्येतत्सम्यगूढं महाफलम् ॥ २६ ॥

अशाप्रकारे सहधर्मिणी प्राप्तकरून तिच्यासोबत गार्हस्थ्यधर्माचे पालन करावे, कारण ह्या धर्माचे पालन महान फळ देणारे आहे || २६ ||




           "इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे दशमोऽध्यायः"





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...