॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः
॥ ॥ नवमोऽध्यायः ॥
"ब्रह्मचर्य आदि आश्रमों का वर्णन"
और्व उवाच
बालः कृतोपनयनो वेदाहरणतत्परः ।
गुरुगेहे वसेद्भूप ब्रह्मचारी समाहितः ॥ १ ॥
और्व म्हणाले ;– हे भूपते ! बालकाने उपनयन संस्कारानंतर
वेदाध्ययनात तत्पर राहून ब्रह्मचर्याचे अवलम्बन करावे व सावधानतापूर्वक गुरुगृही निवास
करावा || १ ||
शौचाचारव्रतं
तत्र कार्यं शुश्रूषणं गुरोः ।
व्रतानि
चरता ग्राह्यो वेदश्च कृतबुद्धिना ॥ २ ॥
तिथे राहून शौच व
आचार-व्रताचे पालन करत गुरुची सेवा-शुश्रूषा करावी आणि व्रतादिंचे आचरण करत स्थिर-बुद्धिने
वेदाध्यायन करावे || २ ||
उभे
सन्ध्ये रविं भूप तथैवाग्निं समाहितः ।
उपतिष्ठेत्तदा
कुर्याद्गुरोरप्यभिवादनम् ॥ ३ ॥
हे राजन ! दोन्ही
संध्यासमयी एकाग्र होऊन सूर्य व अग्निची उपासना करावी आणि गुरुला अभिवादन करावे || ३ ||
स्थिते
तिष्ठेद्व्रजेद्याते नीचैरासीत चासति ।
शिष्यो
गुरोर्नृपश्रेष्ठ प्रतिकूलं न सञ्चरेत् ॥ ४ ॥
गुरु उभे राहिल्यावर उभे राहावे, ते चालत असता त्यांच्या मागे मागे चालावे व ते बसल्यावरच स्वतः खाली बसावे. हे नृपश्रेष्ठा ! अशा प्रकारे
कधीही गुरुच्या विरुद्ध कोणतेही आचरण करू नये || ४ ||
तेनै
वोक्तं पठेद्वेदं नान्यचित्तः पुरःस्थितः ।
अनुज्ञातश्च
भिक्षान्नमश्नीयाद्गुरुणा ततः ॥ ५ ॥
गुरूंनी सांगितल्यावर
त्यांच्या समोर बसून एकाग्रचित्ताने वेदाध्ययन करावे आणि त्यांची आज्ञा असेल तरच भिक्षान्न
भोजन करावे || ५ ||
अवगाहेदपः
पूर्वमाचार्येणावगाहितः ।
समिज्जलादिकं
चास्य कल्यं कल्यमुपानयेत् ॥ ६ ॥
जलात आधी आचार्यांचे स्नान झाल्यावरच मग स्वतः स्नान करावे तसेच दररोज प्रात:काळी गुरूसाठी समिधा, जल, कुश आणि पुष्पादि गोळा करून आणून ठेवावीत || ६ ||
गृहीतग्राह्यवेदश्च
ततोऽनुज्ञामवाप्य च ।
गार्हस्थ्यमाविशेत्प्राज्ञो
निष्पन्नगुरुणिष्कृतिः ॥ ७ ॥
अशाप्रकारे आपला अभिमत
वेदपाठ समाप्त झाल्यावर बुद्धिमान शिष्याने गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांना गुरुदक्षिणा
देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा || ७ ||
विधिनावाप्तदारस्तु
धनं प्राप्य स्वकर्मणा ।
गृहस्थकार्यमखिलं
कुर्याद्भूपाल शक्तितः ॥ ८ ॥
हे राजन ! मग विधिपूर्वक
पाणिग्रहण करून आपल्या वर्णानुकूल वृत्तिने द्रव्योपार्जन करत आपल्या सामर्थ्यानुसार
समस्त गृहकार्य करत रहावे || ८ ||
निवापेन पितॄर्चन्यज्ञैर्देवांस्तथातिथीन्
।
अन्नैर्मुनींश्च
स्वाध्यायैरपत्येन प्रजापतिम् ॥ ९ ॥
भूतानि बलिभिश्चैव
वात्सल्येनाखिलं जगत् ।
प्राप्नोति
लोकान्पुरुषो निजकर्मसमार्जितान् ॥ १० ॥
पिण्ड-दानाने पितृगणांची, यज्ञांनी देवतांची, अन्नदानाने अतिथिंची, स्वाध्यायाने ऋषिंची, पुत्रोत्पत्तिने प्रजापतिची, बलि (अन्नभाग) देऊन भूतगणांची
तसेच वात्सल्यभावाने सम्पूर्ण जगताची पूजा करून पुरुष आपल्या कर्मांद्वारा उत्तमोत्तम
लोक प्राप्त करतो || ९ – १० ||
भिक्षाभुजश्च
ये केचित्परिव्राड्ब्रह्मचारिणः ।
तेप्यत्रैव
प्रतिष्ठन्ते गार्हस्थ्यं तेन वै परम् ॥ ११ ॥
जे केवळ भिक्षावृत्तिने राहणारे
परिव्राजक व ब्रह्मचारी आदि आहेत त्यांचा आश्रय देखील गृहस्थाश्रमच आहे, म्हणूनच गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ
आहे || ११ ||
वेदाहरणकार्याय
तीर्थस्नानाय च प्रभो ।
अटन्ति
वसुधां विप्राः पृथिवीदर्शनाय च ॥ १२ ॥
हे राजन ! विप्रगण
वेदाध्ययन, तीर्थस्नान आणि देश दर्शनासाठी पृथ्वी-पर्यटन करतात || १२ ||
अनिकेता
ह्यनाहारा यत्र सायङ्गृहाश्च ये ।
तेषां
गृहस्थः सर्वेषां प्रतिष्ठा योनिरेव च ॥ १३ ॥
त्यांपैकी ज्यांचे
घर नसते किंवा जर कोणाच्या भोजनाची व्यवस्था झाली नसेल, किंवा जे संध्याकाळ झाल्यावर
त्याच ठिकाणी राहतात, अशा सर्वांचा आधार आणि मूळ गृहस्थाश्रमच आहे || १३ ||
तेषां
स्वागतदानादि वक्तव्यं मधुरं नृप ।
गृहागतानां
दद्याच्च शयनासनभोजनम् ॥ १४ ॥
हे राजन ! असे लोक
घरी आले तर कुशल-प्रश्न आणि मधुर वचनांनी त्यांचे स्वागत करावे तसेच शय्या, आसन आणि भोजना द्वारा त्यांचा
यथाशक्ति सत्कार करावा || १४ ||
अतिथिर्यस्य
भग्नाशो गृहात्प्रतिनिवर्तते ।
स दत्त्वा
दुष्कृतं तस्मै पुण्यमादाय गच्छति ॥ १५ ॥
ज्याच्या घरून अतिथि
निराश होऊन परततो तेव्हा तो तिथे आपले समस्त दुष्कर्म देतो व तेथील पुण्यकर्म स्वतः
घेऊन जातो || १५ ||
अवज्ञानमहङ्कारो
दम्भश्चैव गृह सतः ।
परितापोपघातौ
च पारुष्यं च न शस्यते ॥ १६ ॥
ग्रहस्थाने अतिथिचा अपमान करणे, अंहकार व दम्भाचे आचरण करणे, त्याला दिलेल्याचा पश्चाताप करणे,
त्याला मारणे किंवा त्याच्याशी कटुभाषण करणे योग्य नाही || १६ ||
यस्तु
सम्यक्करोत्येवं गृहस्थः परमं विधिम् ।
सर्वबन्धविनिर्मुक्तो
लोकानाप्नोत्यनुत्तमान् ॥ १७ ॥
अशाप्रकारे जो गृहस्थ
आपल्या परम धर्माचे पूर्णतया पालन करतो तो समस्त बन्धनांतून मुक्त होऊन अत्युत्तम लोक
प्राप्त करतो || १७ ||
वयःपरीणतो राजन्कृतकृत्यो
गृहाश्रमी ।
पुत्रेषु भार्यां
निक्षिप्य वनं गच्छेत्सहैव वा ॥ १८ ॥
हे राजन ! अशाप्रकारे
गृह्स्थोचित कार्य करत-करत ज्याची अवस्था वार्धक्याकडे झुकलेली असेल त्या गृहस्थाने
आपल्या पत्नीला आपल्या पुत्रांवर सोपवून किंवा तिला सोबत घेऊन वनात जावे || १८ ||
पर्णमूलफलाहारः
केशश्मश्रुजटाधरः ।
भूमिशायी
भवेत्तत्र मुनिःसर्वातिथिर्नृप ॥ १९ ॥
तिथे पाने, मूळे, फळे आदिचा आहार करत, लोभ सोडून श्मश्रु (दाढी मिश्या) आणि जटा
धारण करून पृथ्वीवर शयन करावे आणि मुनिवृत्ति स्वीकारून सर्व प्रकारे अतिथिंची सेवा
करावी || १९ ||
चर्मकाशकुशैः
कुर्यात्परिधानोत्तरीयके ।
तद्वत्त्रिषवणं
स्नानं शस्तमस्य नरेश्वरः ॥ २० ॥
त्याने चर्म, काश आणि कुश गवतापासून आपला बिछाना
तसेच व वस्त्र बनवावे . हे नरेश्वरा ! त्या मुनिने त्रिकाल-स्नान करावे असे विधान आहे || २० ||
देवताभ्यर्चनं
होमःसर्वाभ्यागतपूजनम् ।
भिक्षाबलिप्रदानं
च शस्तमस्य नरेश्वर ॥ २१ ॥
अशाप्रकारे देवपूजन, होम, सर्व अतिथिंचा सत्कार, भिक्षा आणि बलिवैश्वदेव, ही त्याची विहित कर्म आहेत || २१ ||
वन्यस्त्नेहेन
गात्राणामभ्यङ्गश्चास्य शस्यते ।
तपश्च
तस्य राजेन्द्र शीतोष्णादिसहिष्णुता ॥ २२ ॥
हे राजेन्द्रा ! वन्यतेलाने
शरीराला मालीश करून शीतोष्ण सहन करत तपस्या करणे हे त्याचे प्रशस्त कर्म है || २२ ||
यस्त्वेतां
नियतश्चर्यां वानप्रस्थश्चरेन्मुनिः ।
स दहत्यग्निवद्दोषाञ्जयेल्लोकांश्च
शाश्वतान् ॥ २३ ॥
जो वानप्रस्थ मुनि
ह्या नियत कर्मांचे आचरण करतो तो आपले समस्त दोष अग्नि समान भस्म करतो आणि नित्य-लोकांची
प्राप्त करून घेतो || २३ ||
चतुर्थश्चाश्रमो
भिक्षोः प्रोज्यते यो मनीषिभिः ।
तस्य स्वरूपं
गदतो मम श्रोतुं नृपार्हसि ॥ २४ ॥
हे नृपा ! पंडितगण
ज्या चतुर्थ आश्रमाला भिक्षु आश्रम म्हणतात मी आता त्याचे स्वरूप वर्णन करतो, नीट लक्ष देऊन ऐक || २४ ||
पुत्रद्रव्यकलत्रेषु
त्यक्तस्त्रेहो नराधिप ।
चतुर्थमाश्रमस्थानं
गच्छेन्निर्धूतमत्सरः ॥ २५ ॥
हे नरेन्द्रा ! तृतीय
आश्रमानंतर पुत्र, द्रव्य आणि स्त्री आदिंचा स्नेह ह्यांचा पूर्ण त्याग करून तसेच मात्सर्य सोडून
चतुर्थ आश्रमात प्रवेश करावा || २५ ||
त्रैवर्गिकांस्त्यजेत्सर्वानारम्भानवनीपते
।
मित्रादिषु
समो मैत्रःसमस्तेष्वेव जन्तुषु ॥ २६ ॥
हे पृथ्वीपते ! अर्थ, धर्म आणि कामरूप त्रिवर्गसम्बन्धी
समस्त कर्मांचा त्याग करून, शत्रु व मित्रांमध्ये समान भाव ठेवणे व सर्व जीवांचा सुह्रद असणे हे भिक्षुसाठी
उचित आहे || २६ ||
जरायुजाण्डजादीनां
वाड्मनःकायकर्मभिः ।
युक्तः
कुर्वीत न द्रोहं सर्वसङ्गांश्च वर्जयेत् ॥ २७ ॥
सदैव समाहित राहून
जरायुज, अंडज आणि स्वेदज आदि समस्त जीवांचा
मन, वाणी किंवा कर्मद्वारा
कधीच द्रोह न करणे व सर्व प्रकारच्या आसक्तिंचा त्याग करणे || २७ ||
एकारात्रस्थितिर्ग्रामे
पञ्चरात्रस्थितिः पुरे ।
तथा
तिष्ठेद्यथाप्रीतिर्द्वेषो वा नास्य जायते ॥ २८ ॥
गावात एक रात्र आणि
पुरीत पाच रात्रि पर्यंतच राहावे व तेही असे की कोणाहीविषयी मनात प्रेम अथवा द्वेष
असू नये || २८ ||
प्राणयात्रानिमित्तं
च व्यङ्गारे भुक्तवज्जने ।
काले
प्रशस्तवर्णानां भिक्षार्थं पर्यटेद् गृहान् ॥ २९ ॥
ज्यावेळी घरातील अग्नि
शांत होतो आणि लोकांचे भोजन झालेले असते त्यावेळी प्राणरक्षेसाठी उत्तम वर्णियांच्या
घरी भिक्षा मागायला जावे || २९ ||
कामः
क्रोधस्तथा दर्पमोहलोभादयश्च ये ।
तांस्तु
सर्वान्परित्यज्य परिव्राड् निर्ममो भवेत् ॥ ३० ॥
परिव्राजकाने काम, क्रोध, दर्प, लोभ आणि मोह आदि समस्त दुर्गुणांचा
त्याग करून ममताशून्य होऊन राहावे || ३० ||
अभयं सर्वभूतेभ्यो
दत्त्वा यश्चरते मुनिः ।
तस्यापि सर्वभूतेभ्यो
न भयं विद्यते क्वचित् ॥ ३१ ॥
जो मुनि समस्त प्राण्यांना
अभयदान देऊन विचरण करतो त्यालासुद्धा कधीच कोणापासून भिती नसते || ३१ ||
कृत्वाग्निहोत्रंस्वशरीरसंस्थंशारीरमग्निं
स्वमुखे जुहोति ।
विप्रस्तु
भैक्ष्योपहितैर्हविर्भिश्चिताग्निकानां व्रहति स्म लोकान् ॥ ३२ ॥
जो ब्राह्मण चतुर्थाश्रमात
आपल्या शरीरात स्थित प्राणादिसहित जठराग्निच्या उद्देश्याने आपल्या मुखात भिक्षान्नरूप
हविने हवन करतो, त्याला असे अग्निहोत्र करून अग्निहोत्रिंचा लोक प्राप्त होतो || ३२ ||
मोक्षोश्रमं
यश्चरते यथोक्तंशुचिःसुखं कल्पितबुद्धियुक्तः ।
अनिन्धनं
ज्योतिरिव प्रशान्तः स ब्रह्मलोकं श्रयते द्विजातिः ॥ ३३ ॥
जो ब्राह्मण बुद्धियोगाने
युक्त होऊन, यथाविधि आचरण करत ह्या मोक्षाश्रमाचे पवित्रता व सुखपूर्वक आचरण करतो, तो निरीबंधन अग्नि समान शांत
होतो आणि शेवटी ब्रह्मलोक प्राप्त करतो || ३३ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा