॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ ॥ अष्टमोऽध्यायः ॥
"विष्णुची आराधना व चातुर्वर्ण्य धर्माचे वर्णन"
मैत्रेय उवाच
भगवन्भगवान्देवः संसारविजिगीषुभिः ।
समाख्याहि जगन्नाथो विष्णुराराध्यते यथा ॥ १ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले ;– हे भगवन ! जे लोग
संसारावर विजय मिळवू इच्छितात ते कशा प्रकारे जगत्पति विष्णुची उपासना करतात, त्याबद्दल सांगा || १ ||
आराधिताच्च गोविन्दाराधनपरैर्नरैः ।
यत्प्राप्यते फलं श्रोतुं तच्चेच्छामि महामुने ॥ २ ॥
आणि हे महामुने ! त्या गोविन्दाची आराधना केल्याने आराधना परायण पुरुषांना जे फळ
मिळतं, त्याविषयीही मला ऐकायची
इच्छा आहे || २ ||
श्रीपराशर
उवाच
यत्पृच्छति
भवानेतत्सगरेण महात्मना ।
और्वः
प्राह यथा पृष्टस्तन्मे निगदतः शृणु ॥ ३ ॥
श्रीपराशर
म्हणाले ;– हे मैत्रेया ! तू जे विचारत आहेस तेच महात्मा सगराने और्वला विचारले होते . त्याच्या उत्तरात त्याने जे सांगितलेले
तेच मी तुला सांगतो, ऐक || ३ ||
सगरः प्रणिपत्त्यैनमौर्वं पप्रच्छ भार्गवम् ।
विष्णोराराधनोपायसम्बन्धं मुनिसत्तम ॥ ४ ॥
फलं चाराधिते विष्णो यत्पुंसामभिजायते ।
स चाह पृष्टो यत्नेन तस्मै तन्मेऽखिलं शृणु ॥ ५ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! सगराने भृगुवंशी
महात्मा और्वला प्रणाम करून त्याला विष्णु आराधने विषयी आणि विष्णुची उपासना केल्याने
मनुष्याला जे फळ मिळते त्या विषयी विचारले होते. त्याने असे विचारल्यावर और्वने
जे काही सांगितले ते ऐक || ४ – ५ ||
और्व उवाच
भौमं मनोरथं स्वर्गं स्वर्गे रम्यं च यत्पदम् ।
प्राप्नोत्याराधिते विष्णौ निर्वाणमपि चोत्तमम् ॥ ६ ॥
और्व म्हणाले ;– भगवान विष्णुची आराधना केल्याने मनुष्य भूमंडल सम्बन्धित समस्त
मनोरथ, स्वर्ग, स्वर्गाहूनही श्रेष्ठ असे ब्रह्मपद
आणि परमनिर्वाणपद सुद्धा प्राप्त करतो || ६ ||
यद्यदिच्छति यावच्च फलमाराधितेऽच्युते ।
तत्तदाप्नोति राजेन्द्र भूरि स्वल्पमथापि वा ॥ ७ ॥
हे राजेंद्रा ! तो
ज्या फळाची जितकी इच्छा करतो, कमी असो वा अधिक, श्रीअच्युताच्या आराधनेमुळे निश्चितपणे ते सर्व प्राप्त करतो
|| ७ ||
यत्तु
पृच्छसि भूपाल कथामाराध्यते हरिः ।
तदहं
सकलं तुभ्यं कथयामि निबोध मे ॥ ८ ॥
हे भूपाला ! तु जे विचारलस की
श्रीहरिची आराधना कशा प्रकारे करावी, तर ते तुला सर्व सांगतो, लक्ष देऊन ऐक || ८ ||
वर्णाश्रमाचारवता पुरुषेणपरः पुमान् ।
विष्णुराराध्यते पन्था नान्यस्तत्तोषकारकः ॥ ९ ॥
जो पुरुष वर्णाश्रम-धर्माचे पालन
करतो तोच परमपुरुष विष्णुची आराधना करू शकतो; त्याला संतुष्ट करण्याचा दुसरा
कोणताही मार्ग नाही || ९ ||
यजन्यज्ञान्यजत्येनं
जपन्त्येनं जपन्नृप ।
निघ्नन्नन्यान्हिनस्त्येनं
सर्वभूतो यतो हरिः ॥ १० ॥
हे नृपा ! यज्ञांचे यजन करणारा
पुरुष विष्णुचेच यजन करतो, जप करणारा त्याचाच जप करतो आणि दुसर्यांची हिंसा करणाराही त्याचीच
हिंसा करतो; कारण भगवान हरि सर्वभूतमय आहे || १० ||
तस्मात्सदाचारवता
पुरुषेण जनार्दनः ।
आराध्यस्तु
स्ववर्णोक्तधर्मानुष्ठानकारिणा ॥ ११ ॥
म्हणूनच सदाचारयुक्त पुरुष आपल्या
वर्ण विहित धर्माचे आचरण करत जनार्दनाचीच उपासना करतो || ११ ||
ब्राह्मणः
क्षत्रियो वैश्यः शुद्रश्च पृथिवीपते ।
स्वधर्मतत्परो
विष्णुमाराधयति नान्यथा ॥ १२ ॥
हे पृथ्वीपते ! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र आपआपल्या धर्माचे
पालन करतच विष्णुची आराधना करतात, अन्य कोणत्याही प्रकारे नाहीं || १२ ||
परापवादं
पैशुन्यमनृतं च न भाषते ।
अन्योद्वेगकरं
वापि तोष्यते तेन केशवः ॥ १३ ॥
जो पुरुष दुसर्यांची निंदा, चुगली किंवा मिथ्याभाषण करत नाही
तसेच ज्यामुळे दुसर्यांला वाईट वाटेल असे बोलतही नाही, त्याने निश्चितच भगवान केशव प्रसन्न
होतो || १३ ||
परदारपरद्रव्यपरहिंसासु
यो रतिम् ।
न करोति
पुमान्भूप तोष्यते तेन केशवः ॥ १४ ॥
हे राजन ! जो पुरुष दुसर्याची
स्त्री, धन आणि हिंसा ह्यात
रूचि ठेवत नाही त्याच्यावर केशव सदैव संतुष्ट राहतो || १४ ||
न ताडयति
नो हन्ति प्राणिनोऽन्यांश्च देहिनः ।
यो मनुष्यो
मनुष्येन्द्र तोष्यते तेन केशवः ॥ १५ ॥
हे नरेंद्रा ! जो मनुष्य प्राणी
किंवा वृक्षादि अन्य देहधारींना पीडा देत नाही किंवा नष्ट करत नाही त्याच्यावर केशव
सदैव संतुष्ट राहतो || १५ ||
देवाद्विजगुरूणां
च शुश्रूषासु सदोद्यतः ।
तोष्यते
तेन गोविन्दः पुरुषेण नरेश्वर ॥ १६ ॥
जो पुरुष देवता, ब्राह्मण आणि गुरुजनांच्या सेवेत
सदैव तत्पर राहतो, हे नरेश्वरा ! त्याच्यावर गोविंद सदैव प्रसन्न असतो || १६ ||
यथात्मनि च पुत्रे च सर्वभूतेषु यत्तथा ।
हितकामो हरिस्तेन सर्वदा तोष्यते सुखम् ॥ १७ ॥
जो व्यक्ति स्वयं स्वतः आणि स्वतःच्या
पत्रांसमान समस्त प्राण्यांचाही हित-चिंतक असतो तो सुगमतेनेच श्रीहरिला प्रसन्न करतो
|| १७ ||
यस्य
रागादिदोषेण न दुष्टं नृप मानसम् ।
विशुद्धचेतसा
विष्णुस्तोष्यते तेन सर्वदा ॥ १८ ॥
हे नृपा ! ज्याचे चित्त रागादि
दोषांनी दूषित नाही त्या विशुद्ध-चित्त पुरुषावर भगवान विष्णु सदैव संतुष्ट राहतात
|| १८ ||
वर्णाश्रमेषु
ये धर्माः शास्त्रोक्ता मुनिसत्तम ।
तेषु
तिष्ठन्नरो विष्णुमाराहयति नान्यथा ॥ १९ ॥
हे नृपश्रेष्ठा ! शास्त्रात जे
जे वर्णाश्रम-धर्म सांगितले आहेत त्यांचेच आचरण करून पुरुष विष्णुची आराधना करू शकतो
दुसर्या कोणत्याही प्रकारे नाही || १९ ||
सगर उवाच
तदहं श्रोतुमिच्छमि वर्णधर्मानशेषतः ।
तथैवाश्रमधर्मांश्च द्विजवर्य ब्रवीहि तान् ॥ २० ॥
सगर
म्हणाले ;– हे द्विजश्रेष्ठा ! आता मी सम्पूर्ण वर्णधर्म आणि आश्रमधर्म ऐकू इच्छितो , कृपया त्याचे वर्णन करा || २० ||
और्व उवाच
ब्राह्मणक्षत्रियविशां शुद्राणां च यथाकमम् ।
त्वमेकाग्रमतिर्भूत्वा शृणु धर्मान्मयोदितान् ॥ २१ ॥
और्व
म्हणाले ;– ज्यांचे मी वर्णन करतो, त्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या धर्मांचे
तू एकाग्रचित्त होऊन क्रमश: श्रवण कर || २१ ||
दानं
दद्याद्यजेद्देवान् यज्ञैः स्वाध्यायतत्परः ।
नित्योदकी
भवेद्विप्रः कुर्याच्चाग्निपरिग्रहम् ॥ २२ ॥
ब्राह्मणाचे कर्तव्य आहे दान
देणं, यज्ञांद्वारा देवतांचे
यजन करणे, स्वाध्यायशील असणे, नित्य स्नान-तर्पण करणे आणि अग्न्याधान आदि कर्म करत राहणे || २२ ||
वृत्त्यर्थं
याजयेच्चान्यानन्यानध्यापयेत्तथा ।
कुर्यात्प्रतिग्रहादानं
शुक्लार्थान्न्यायतो द्विजः ॥ २३ ॥
ब्राह्मणाने दूसर्यांकडून यज्ञ
करवून घेणे, इतरांना शिकवणे आणि न्यायोपार्जित शुद्ध धनापासून न्यायानुकुल द्रव्य-संग्रह
करणे उचित आहे || २३ ||
सर्वभूतहितं
कुर्यान्नाहितं कस्याचिद् द्विजः ।
मैत्री
समस्तभूतेषु ब्राह्मणस्योत्तमं धनम् ॥ २४ ॥
ब्राह्मणाने कधी कोणाचे अहित
करू नये आणि नेहमी समस्त प्राण्यांच्या हितासाठी तत्पर राहायला हवे . सम्पूर्ण प्राण्यांसोबत मैत्री राखणे हेच ब्राह्मणाचे
परम धन आहे || २४ ||
ग्राव्णिरत्ने
च पारक्ये समबुद्धिर्भवेद् द्विजः ।
ऋतावभिगमः
पत्न्यां शस्यते चास्य पार्थिव ॥ २५ ॥
दगड आणि परद्रव्य ह्यात ब्राह्मणाने
समान-बुद्धि ठेवली पाहिजे . हे राजन ! पत्नी विषयी ऋतूगामी असणेच ब्राह्मणासाठी प्रशंसनीय
कर्म आहे || २५ ||
दानानि
दद्यादिच्छातो द्विजेभ्यः क्षत्रियोपि वा ।
यजेच्च
विविधैर्यज्ञैरधीयीत च पार्थिवः ॥ २६ ॥
क्षत्रियासाठी उचित आहे कि त्याने
ब्राह्मणांना यथेच्छ दान द्यावे, विविध यज्ञांचे अनुष्ठान करावे व अध्ययन करावे || २६ ||
शस्त्राजीवो
महीरक्षा प्रवरा तस्य जीविका ।
तत्रापि
प्रथमः कल्पः पृथिवीपरिपालनम् ॥ २७ ॥
शस्त्र धारण करणे आणि पृथ्वीची
रक्षा करणेच क्षत्रियाची उत्तम आजीविका आहे; ह्यातही पृथ्वी-पालनच उत्कृष्टतर है || २७ ||
धरित्रीपालनेनैव
कृतकृत्या नराधिपाः ।
भवन्ति
तृपतेरंशा यतो यज्ञादिकर्मणाम् ॥ २८ ॥
पृथ्वी-पालनामुळेच राजा कृतकृत्य
होतात, कारण पृथ्वीवर होणार्या
यज्ञादि कर्मांचा अंश राजांना मिळतो || २८ ||
दुष्टानां
शासनाद् राजा शिष्टानां परिपालनात् ।
प्राप्नोत्यभिमताँल्लोकान्वर्णसंस्थां
करोति यः ॥ २९ ॥
जो राजा आपला वर्णधर्म स्थिर
ठेवतो तो दुष्टांना दंड देऊन आणि साधुजनांचे पालन करूनच आपल्याला अभीष्ट असलेले लोक
प्राप्त करतो || २९ ||
पाशुपाल्यं
च वाणिज्यं कृषिं च मनुजेश्वर ।
वैश्याय
जीविकां ब्रह्मा ददौ लोकपितामहः ॥ ३० ॥
हे नरनाथा ! लोकपितामह ब्रह्माने
वैश्यांना पशुपालन, वाणिज्य आणि कृषि हे जीविकारूपात दिले आहेत || ३० ||
तस्याप्यध्ययनं
यज्ञो दानं धर्मश्च शस्यते ।
नित्यनैमित्तिकादीनामनुष्ठानं
च कर्मणाम् ॥ ३१ ॥
अध्ययन, यज्ञ, दान आणि नित्य-नैमित्तिकादि कर्मांचे
अनुष्ठान – ही कर्मे त्यांच्यासाठी सुद्धा विहित आहेत || ३१ ||
द्विजातिसंश्रितं कर्म तादर्थ्यं तेन पोषणम् ।
क्रयविक्रयजैर्वापि धनैः कारूद्भवेन वा ॥ ३२ ॥
शुद्राचे कर्तव्य हेच आहे कि
द्विजातिंच्या प्रयोजन-सिद्धिसाठी कर्म करणे व त्यापासूनच आपले पालन-पोषण करणे, किंवा वस्तुंचा क्रयविक्रय करून
किंवा कारागिरीची कामे करून निर्वाह करणे || ३२ ||
शुद्रस्य
सन्नतिः शौचं सेवा स्वामिन्यमायया ।
अमन्त्रयज्ञो
ह्यस्तेयं तत्सङ्गो विप्ररक्षणम् ॥ ३३ ॥
अति नम्रता, शौच, निष्कपट स्वामि-सेवा, मन्त्रहीन यज्ञ, अस्तेय, सत्संग आणि ब्राह्मणाची रक्षा
करणे ही शुद्राची प्रधान कर्मे आहेत || ३३ ||
दानं
च दद्याच्छूद्रोपि पाकयज्ञैर्यजेत च ।
पित्र्यादिकं
च तत्सर्वं शुद्रः कुर्वीत तेन वै ॥ ३४ ॥
भृत्यादिभरणार्थाय
सर्वेषां च परिग्रहः ।
ऋतुकालेभिगमनं
स्वदारेषु महीपते ॥ ३५ ॥
हे राजन ! शुद्राने दान देणे उचित आहे, बलिवैश्वदेव अथवा नमस्कार आदि अल्प यज्ञांचे अनुष्ठान करणे, पितृश्राद्ध आदि कर्म करणे, आपल्या आश्रित कुटुम्बियांच्या
भरण-पोषणासाठी सकल वर्णांकडून द्रव्य-संग्रह करणे आणि ऋतूकाळी आपल्याच स्त्रीसोबत संग करणे शूद्रासाठी उचित आहे || ३४ – ३५ ||
दया
समस्तभूतेषु तितिक्षा नातिमानिता ।
सत्यं
शौचमनायासो मङ्गलं प्रियवादिता ॥ ३६ ॥
मैत्र्यस्पृहा
तथा तद्वदकार्पण्यं नरेश्वर ।
अनुसूया
च सामान्यवर्णानां कथिता गुणाः ॥ ३७ ॥
हे नरेश्वरा ! ह्या व्यतिरिक्ति
समस्त प्राण्यांवर दया, सहनशीलता, अमानिता, सत्य, शौच, अधिक परिश्रम न करणे, मंगलाचरण, प्रियवादिता, मैत्री, निष्कामता, अकृपणता आणि कोणाचे दोष न पाहणे – हे सर्व वर्णांचे सामन्य गुण आहेत || ३६ – ३७ ||
आश्रमाणां
च सर्वेषामेते सामान्यलक्षणाः ।
गुणांस्तथापद्धर्मांश्च
विप्रादीनामिमाञ्छृणु ॥ ३८ ॥
सर्व वर्णांची सामान्य लक्षणे
अशाच प्रकारची आहेत . आता ब्राह्मणादि चारही वर्णांचे आपधर्म आणि
गुणांचे श्रवण कर || ३८ ||
क्षात्रं
कर्म द्विजस्योक्तं वैश्यं कर्म तथाऽपदि ।
राजन्यस्य
च वैश्योक्तं शूद्रकर्म न चैतयोः ॥ ३९ ॥
आपत्तिच्या वेळी ब्राह्मणाने
क्षत्रिय आणि वैश्य-वर्णांच्या वृत्तिचे अवलम्बन केले पाहिजे तसेच क्षत्रियाने केवळ
वैश्यवृत्तिचाच आश्रय घ्यावा . ह्या दोघांनी शुद्रांचे कर्म (सेवा आदि) कधीच करू नये || ३९ ||
सामर्थ्ये
सति तत्त्याज्यमुभाभ्यामपि पार्थिव ।
तदेवापदि
कर्तव्यं न कुर्यात्कर्मसंकरम् ॥ ४० ॥
हे राजन ! वरील वृत्तिंचा देखील
सामर्थ्य असेल तर त्याग करावा; केवळ आपत्काळीच त्यांचा आश्रय घ्यावा, कर्म-संकरता करू नये || ४० ||
इत्येते
कथिता राजन्वर्णधर्मा मया तव ।
धर्मानाश्रमिणां
सम्यग्ब्रुवतो मे निशामय ॥ ४१ ॥
हे राजन ! अशाप्रकारे वर्णधर्मांचे वर्णन
तुला सांगितले ; आता आश्रम-धर्माचे निरूपण करतो, सावधानतेने ऐक || ४१ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा