॥ प्रथमः अंशः ॥
॥ अष्टमोऽध्यायः ॥
"रौद्र– सृष्टि, तसेच भगवंत आणि लक्ष्मीच्या
सर्वव्यापकतेचे वर्णन"
पराशर उवाचः
कथितस्तामसः सर्गो ब्रह्मणस्ते
महामुने ।
रुद्रसर्गं प्रवक्ष्यामि तन्मे
निगदतः शृणु ॥ १ ॥
पराशर म्हणाले– हे महामुने !
मी तुला ब्रह्माच्या तामस-सर्गाचे वर्णन केले, आता मी रूद्र सर्गाचे वर्णन करतो ते ऐक .
कल्पादावात्मनस्तुल्यं सुतं
प्रध्यायतस्ततः ।
प्रादुरासीत्प्रभोरङ्के कुमारो
नीललोहितः ॥ २ ॥
कल्पाच्या आरंभी आपल्या सारखे पुत्र
उत्पन्न व्हावेत म्हणून चिंतन करणार्या ब्रह्माच्या मांडीवर नीललोहित वर्णाच्या
एका कुमाराचा प्रादुर्भाव झाला .
रुरोद
वै सुस्वरं सोऽथ प्राद्रवद्द्विजसत्तम ।
किं
त्वं रोदिषि तं ब्रह्मा रुदन्तं प्रत्युवाच ह ॥ ३ ॥
हे द्विजोत्तमा ! जन्मानंतर लगेच तो
जोरजोरात रडू लागला आणि इथेतिथे धावू लागला. त्याला रडताना पाहून ब्रह्माने त्याला
विचारले – ‘तू का
रडत आहेस? .
नाम
देहीति तं सोऽथ प्रत्युवाच प्रजापतिः ।
रुद्रस्त्वं
देव नाम्नासि मा रोदीर्धैर्यमावह ।
एवमुक्तः पुनः सोऽथ सप्तकृत्वो रुरोद
वै ॥ ४ ॥
त्याने म्हटले – "माझे नाव ठेवा". तेव्हा ब्रह्मा
म्हणाले – ‘ हे
देवा ! तुझे नाव रूद्र आहे,
आता तू
रडू नकोस, धैर्य
धारण कर ’ असे
सांगितल्यावर देखील तो आणखी सात वेळा रडला .
ततोऽन्यानि
ददौ तस्मै सप्त नामानि स प्रभुः ।
स्थानानि चैषामष्टानां पत्नीः
पुत्रांश्च स विभुः ॥ ५ ॥
तेव्हा भगवान ब्रह्माने त्याची आणखी
सात नावे ठेवली तसेच
त्या आठांची स्थाने, स्त्री
आणि पुत्र देखीत निश्चित केले .
भवं
शर्वमथेशानं तथा पशुपतिं द्विज ।
भीममुग्रं
महादेवमुवाच स पितामहः ॥ ६ ॥
हे द्विजा ! प्रजापतिने त्याला भव, शर्व, ईशान, पशुपति, भीम, उग्र आणि
महादेव असे संबोधले.
चक्रे
नामान्यथैतानि स्थानान्येषां चकार सः ।
सूर्यो जलं मही वायुर्वह्निराकाशमेव
च ।
दीक्षितो ब्राह्मणः सोम
इत्येतास्तनवः क्रमात् ॥ ७ ॥
हीच त्याची नावे ठेवली आणि त्यांची
स्थाने देखील निश्चित केली.
सूर्य, जल, पृथ्वी, वायु, अग्नि, आकाश, [यज्ञात]
दीक्षित ब्राह्मण आणि चंद्रमा – ह्या क्रमश: त्यांच्या मूर्त्या आहेत .
सुवर्चला
तथैवोषा विकेशी चापरा शिवा ।
स्वाहा दिशस्तथा दीक्षा रोहिणी च
यथाक्रमम् ॥ ८ ॥
सूर्यादीनां नरश्रेष्ठ
रुद्राद्यैर्नामभिः सह ।
पत्न्यः स्मृता महाभाग तदपत्यानि मे
शृणु ॥ ९ ॥
येषां सूतिप्रसूतिभ्यामिदमापूरितं
जगत् ॥ १० ॥
हे द्विजश्रेष्ठा ! रूद्र आदि
नावांच्या त्या सूर्य आदि मूर्त्यांच्या क्रमश: सुवर्चला, ऊषा, विकेशी, अपरा, शिवा, स्वाहा, दिशा, दीक्षा आणि
रोहिणी नामक पत्नी आहेत .
हे
महाभागा ! आता त्यांच्या पुत्रांची नावे ऐक. त्यांच्याच पुत्र-पौत्रादिकांपासून हे
संपूर्ण जगत परिपूर्ण आहे .
शनैश्चरस्तथा
शुक्रो लोहिताङ्गो मनोजवः ।
स्कन्दः
स्वर्गोऽथ सन्तानो बुधश्चानुक्रमात्सुताः ॥ ११ ॥
शनैश्वर, शुक्र, लोहितांग, मनोजव, स्कन्द, सर्ग, सन्तान आणि बुध
हे क्रमश: त्यांचे पुत्र आहेत .
एवंप्रकारो रुद्रोऽसौ सतीं
भार्यामविन्दिताम् ।
उपयेमे दुहितरं दक्षस्यैव प्रजापतेः
॥ १२ ॥
अशाप्रकारे भगवान रूद्राने प्रजापति
दक्षाच्या अनिंदिता पुत्री सतीला आपली भार्या म्हणून ग्रहण केले .
दक्षकोपाच्च तत्याज सा सती स्वं
कलेवरम् ।
हिमवद्दुहिता साभून्मेनायां
द्विजसत्तम ॥ १३ ॥
उपयेमे पुनश्चोमामनन्यां भगवान्हरः ॥
१४ ॥
हे द्विजसत्तमा ! त्या सतीने दक्षावर
क्रोधित झाल्या कारणाने आपले शरीर त्यागले होते . नंतर ती मेनाच्या गर्भापासून
हिमाचलाची कन्या (उमा) झाली . भगवान
शंकराने त्या अनन्यपरायणा उमासोबत परत विवाह केला .
देवौ धातृविधातारौ भृगोः ख्यातिरसूयत
।
श्रियं च देवदेवस्य पत्नी नारायणस्य
या ॥ १५ ॥
भृगु द्वारा ख्यातिने धाता आणि
विधाता नामक दोन देवतांना तसेच लक्ष्मीला जन्म दिला जी भगवान विष्णुची पत्नी झाली .
मैत्रेय उवाचः
क्षीराब्धौ
श्रीः समुत्पन्ना श्रूयतेऽमृतमन्थने ।
भृगोः ख्यात्यां समुत्पन्नेत्येतदाह
कथं भवान् ॥ १६ ॥
मैत्रेय म्हणाले – भगवन् ! असे
ऐकिवात आहे की लक्ष्मी तर अमृत मंथनाचे वेळी क्षीर-सागरातून उत्पन्न झाली होती, तर मग तुम्ही
असं कसं म्हणता की ती भृगु द्वारा ख्यातिपासून उत्पन्न झाली .
पराशर उवाचः
नित्यैवैषा जगन्माता विष्णोः
श्रीरनपायिनी ।
यथा सर्वगतो विष्णुस्तथैवेयं
द्विजोत्तम ॥ १७ ॥
पराशर म्हणाले– हे द्विजोत्तमा
! भगवंताची कधीही साथ न सोडणारी जगज्जननी लक्ष्मी तर नित्यच आहे आणि ज्याप्रकारे
श्रीविष्णुभगवान सर्वव्यापक आहेत तशीच तीही आहे .
अर्थो विष्णुरियं वाणी नीतिरेषा नयो
हरिः ।
बोधो
विष्णुरियं बुद्धिर्धर्मोऽसौ सत्क्रिया त्वियम् ॥ १८॥
विष्णु अर्थ आहे आणि ही वाणी है, हरि नियम आणि
ही निती है, भगवान
विष्णु बोध आहे आणि ही बुद्धि आहे तसेच ते धर्म आहेत आणि ही सत्क्रिया आहे .
स्रष्टा विष्णुरियं सृष्टिः
श्रीभूमिर्भूधरो हरिः ।
संतोषो
भगवाँल्लक्ष्मीस्तुष्टिर्मैत्रेय शाश्वती ॥ १९ ॥
हे मैत्रेया ! भगवंत जगताचा स्रष्टा
आहे आणि लक्ष्मी सृष्टि आहे, श्रीहरि
भूधर (पर्वत अथवा राजा) आहे आणि लक्ष्मी भूमि आहे तथा भगवंत संतोष आहे आणि लक्ष्मी
नित्य तुष्टि आहे
.
इच्छा श्रीर्भगवान्कामो यज्ञोऽसौ
दक्षिणा तु सा ।
आज्याहुतिरसौ देवी पुरोडाशो जनार्दनः
॥ २० ॥
भगवंत काम आहे आणि लक्ष्मी इच्छा आहे, ते यज्ञ आहेत
तर ती दक्षिणा आहे, श्रीजनार्दन
पुरोडाश आहेत आणि देवी लक्ष्मी आज्याहुति (घृताची आहुति) आहे .
पत्नीशाला
मुने लक्ष्मीः प्राग्वंशो मधुसूदनः ।
चितिर्लक्ष्मीर्हरिर्यूप इध्मा
श्रीर्भगवान्कुशः ॥ २१ ॥
हे मुने ! मधुसुदन यजमानगृह आहेत आणि
लक्ष्मी पत्नीशाला आहे, श्रीहरि
युप आहेत आणि लक्ष्मी चिति आहे तसेच भगवंत कुशा आणि लक्ष्मी इध्मा आहे .
सामस्वरूपी
भगवानुद्गीतिः कमलालया ।
स्वाहा लक्ष्मीर्जगन्नाथो वासुदेवो
हुताशनः ॥ २२ ॥
भगवंत सामस्वरूप आहेत आणि
श्रीकमलादेवी उद्भिति आहे,
जगत्पति
भगवंत वासुदेव हुताशन आहेत आणि लक्ष्मी स्वाहा आहे .
शङ्करो भगवाञ्छौरिर्गौरी
लक्ष्मीर्द्विजोत्तम ।
मैत्रेय केशवः सूर्यस्तत्प्रभा
कमलालया ॥ २३ ॥
हे द्विजोत्तमा ! भगवंत विष्णु शंकर
आहेत आणि श्रीलक्ष्मी गौरी आहे तथा हे मैत्रेया ! श्रीकेशव सूर्य आहेत आणि
कमलवासिनी श्रीलक्ष्मी त्यांची प्रभा आहे .
विष्णुः पितृगणः पद्मा स्वधा
शाश्वतपुष्टिदा ।
द्यौः श्रीः सर्वात्मको
विष्णुरवकाशोऽतिविस्तरः ॥ २४ ॥
श्रीविष्णु पितृगण आहेत आणि श्रीकमला
नित्य पुष्टिदायिनी स्वधा आहे, विष्णु अति विस्तीर्ण सर्वात्मक अवकाश आहेत आणि
लक्ष्मी स्वर्गलोक आहे .
शशाङ्कः श्रीधरः कान्तिः
श्रीस्तस्यैवानपायिनी ।
धृतिर्लक्ष्मीर्जगच्चेष्टा वायुः
सर्वत्रगो हरिः ॥ २५ ॥
भगवान श्रीधर चन्द्रमा आहेत आणि
श्रीलक्ष्मी त्यांची अक्षय कान्ति आहे, हरि सर्वगामी वायु आणि लक्ष्मी जगचेष्टा (जगताची
गति) आणि धृति (आधार) आहे .
जलधिर्द्विज गोविन्दस्तद्वेला
श्रीर्महामते ।
लक्ष्मीस्वरूपमिन्द्राणी देवेन्द्रो
मधुसूदनः ॥ २६ ॥
हे महामुने ! श्रीगोविंद समुद्र आहेत
आणि हे द्विजा ! लक्ष्मी त्या समुद्राचे तरंग, भगवान मधुसुदन देवराज इंद्र आहेत आणि लक्ष्मी
इंद्राणी आहे .
यमश्चक्रधरः साक्षाद्धूमोर्णा
कमलालया ।
ऋद्धिः श्रीः श्रीधरो देवः स्वयमेव
धनेश्वरः ॥ २७ ॥
चक्रपाणि भगवान यम आहेत आणि श्रीकमला
यमपत्नी धुमोर्णा आहे, देवाधिदेव
श्रीविष्णु कुबेर आहेत आणि श्रीलक्ष्मी साक्षात ऋद्धि आहे .
गौरी लक्ष्मीर्महाभागा केशवो वरुणः
स्वयम् ।
श्रीर्देवसेना विप्रेन्द्र
देवसेनापतिर्हरिः ॥ २८ ॥
श्रीकेशव स्वयं वरुण आहेत आणि
महाभागा लक्ष्मी गौरी आहे,
हे
द्विजराजा ! श्रीहरि देवसेनापति स्वामिकार्तिकेय आहेत आणि श्रीलक्ष्मी देवसेना आहे .
अवष्टम्भो
गदापाणिः शक्तिर्लक्ष्मीर्द्विजोत्तम ।
काष्ठा लक्ष्मीर्निमेषोऽसौ
मुहूर्तोऽसौ कला तु सा ॥ २९ ॥
हे द्विजोत्तमा ! भगवान गदाधर आश्रय
आहेत आणि लक्ष्मी शक्ति आहे, भगवंत निमेष आहेत आणि लक्ष्मी काष्ठा आहे, ते मुहूर्त
आहेत आणि ही कला आहे .
ज्योत्स्ना लक्ष्मीः प्रदीपोऽसौ
सर्वः सर्वेश्वरो हरिः ।
लताभूता जगन्माता
श्रीर्विष्णुर्द्रुमसंज्ञितः ॥ ३० ॥
सर्वेश्वर सर्वरूप श्रीहरि दीपक आहेत
आणि श्रीलक्ष्मी ज्योति आहे, श्रीविष्णु वृक्षरूप आहेत आणि जगन्माता
श्रीलक्ष्मी लता आहे .
विभावरी श्रीर्दिवसो देवश्चक्रगदाधरः
।
वरप्रदो वरो विष्णुर्वधूः पद्मवनालया
॥ ३१ ॥
चक्रगदाधरदेव श्रीविष्णु दिवस आहेत
आणि लक्ष्मी रात्र आहे, वरदायक
श्रीहरि वर आहेत आणि पद्मनिवासिनी श्रीलक्ष्मी वधु आहे .
नदस्वरूपी
भगवाञ्छ्रीर्नदीरूपसंस्थिता ।
ध्वजश्च पुण्डरीकाक्षः पताका कमलालया
॥ ३२ ॥
भगवंत नद आहेत आणि श्री नदी आहे, कमलनयन भगवान
ध्वजा आहेत आणि कमलालया लक्ष्मी पताका आहे .
तृष्णा लक्ष्मीर्जगन्नाथो लोभो
नारायणः परः ।
रतिरागश्च मैत्रेय लक्ष्मीर्गोविन्द
एव च ॥ ३३ ॥
जगदीश्वर परमात्मा नारायण लोभ आहेत आणि लक्ष्मी
तृष्णा आते तसेच रति आणि राग देखील लक्ष्मी
व गोविन्दच आहेत.
किं चाति बहुनोक्तेन सङ्क्षेपेणेदमुच्यते ॥ ३४ ॥
देवतिर्यङ्मनुष्येषु पुन्नामा भगवान्हरिः ।
स्त्रीनाम्नी श्रीश्च विज्ञेया नानयोर्विद्यते
परम् ॥ ३५ ॥
अधिक काय सांगावे ? संक्षेपात, सांगायचे झाले
तर देव, तिर्यक
आणि मनुष्य आदिंमध्ये पुरुषवाची भगवान हरि आणि स्त्रीवाची श्रीलक्ष्मी, त्यांच्या
व्यतिरिक्त आणखी कोणीही नाही .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे अष्टमोऽध्यायः"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा