॥ विष्णुपुराणम्
॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ त्रिंशोऽध्यायः ॥
"पारिजात-हरण"
श्रीपराशर उवाच
गरुडो वारुणं छत्रं तथैव मणिपर्वतम् ।
सभार्यं च हृषीकेशं लीलयैव वहन्ययौ ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
पक्षीराज गरुड़ त्या वारुण छत्र, मणि पर्वत आणि सत्यभामा सहित श्रीकृष्णाला लीलया घेऊन
निघाले ॥ १ ॥
ततः शङ्खमुपाध्मासीत्स्वर्गद्वारगतो हरिः
।
उपतस्थुस्तथा देवाः सार्घ्यहस्ता जनर्जनम्
॥ २ ॥
स्वर्गाच्या दरवाजावर
पोहोचताच श्रीहरीने आपला शंख वाजवला. शंखनाद ऐकताच देवगण
अर्घ्य घेऊन भगवंता समोर उपस्थित झाले ॥ २ ॥
स देवैरर्चितः कृष्णो देवमातुर्निवेशनम् ।
सिताभ्रशिखराकारं प्रविश्य ददृशेऽदितिम् ॥
३ ॥
देवतांकडून पूजित होऊन
श्रीकृष्णांनी देवमाता अदितीच्या श्वेत मेघशिखरा समान गृहात जाऊन तिचे दर्शन घेतले
॥ ३ ॥
स तां प्रणम्य शक्रेण सह ते कुण्डलोत्तमे ।
ददौ नरकनाशं च शशंसास्यै जनार्दनः ॥ ४ ॥
तेव्हा जनार्दनाने इंद्रासोबत
देवमातेला प्रणाम करून तिचे अत्युत्तम कुण्डल दिले आणि तिला नरक-वधाचा वृत्तान्त सांगितला
॥ ४ ॥
ततः प्रीता जगन्माता धातारं जगतां हरिम् ।
तुष्टवादितिरव्यग्रा कृत्वा तत्प्रवणं मनः
॥ ५ ॥
त्यानंतर जगत माता अदितीने
प्रसन्नतापूर्वक तन्मय होऊन जगद्धाता श्रीहरीची अव्यग्रभावाने स्तुति केली ॥ ५ ॥
अदितिरुवाच
नमस्ते पुण्डरीकाक्ष भक्तानामभयङ्कर ।
सनातनात्मन् सर्वात्मन् भूतात्मन् भूतभावन
॥ ६ ॥
अदिती म्हणाली ;- हे कमलनयना
! हे भक्तांना अभय देणार्या ! हे सनातनस्वरूपा ! हे सर्वात्मना ! हे भूतस्वरूपा !
हे भूतभावना ! आपणाला नमस्कार ॥ ६ ॥
प्रणेतर्मनसो बुद्धेरिन्द्रियाणां गुणात्मक
।
त्रिगुणातीत निर्द्वन्द्व शुद्धसत्त्व हृदि
स्थित ॥ ७ ॥
हे मन, बुद्धि आणि इन्द्रियांच्या
रचयिता ! हे गुणस्वरूपा ! हे त्रिगुणातीता ! हे निर्द्वन्द्वा! हे शुद्धसत्त्वा ! हे
अन्तर्यामि ! आपणाला नमस्कार ॥ ७ ॥
सितदीर्घादिनिःशेषकल्पनापरिवर्जित ।
जन्मादिभिरसंस्पृष्ट स्वप्नादिपरिवर्जित ॥
८ ॥
हे नाथा ! आपण श्वेत,
दीर्घ आदि सम्पूर्ण कल्पनांनी रहीत आहात, जन्मादि विकारांपासून वेगळे आहात तसेच स्वप्नादि
अवस्था त्रयीच्या पलीकडे आहात; आपणाला नमस्कार ॥ ८ ॥
सन्ध्या रात्रिरहो भूमिर्गगनं वायुरम्बु च
।
हुताशनो मनो बुद्धिर्भूतादिस्त्वं तथाच्युत
॥ ९ ॥
हे अच्युता ! संध्या,
रात्री, दिवस, भूमि, आकाश, वायु, जल, अग्नि, मन, बुद्धि आणि अहंकार हे सर्व आपणच आहात
॥ ९ ॥
सर्गस्थितिविनाशानां कर्ता कर्तृपतिर्भवान्
।
ब्रह्मविष्णुशिवाख्याभिरात्ममूर्तिभिरीश्वर
॥ १० ॥
हे ईश्वरा! आपण ब्रह्मा,
विष्णु आणि शिव नामक आपल्या मूर्तीपासून जगताच्या उत्पत्ति, स्थिति व नाशाचे कर्ता
आहेत तसेच आपण कर्तांचेही स्वामी आहात ॥ १० ॥
देवा दैत्यास्तथा यक्षा राक्षसाः सिद्धपन्नगाः
।
कूष्माण्डाश्च पिशाचाश्च गन्धर्वा मनुजास्तथा
॥ ११ ॥
पशवश्च मृगाश्चैव पतङ्गाश्च सरीसृपाः ।
वृक्षगुल्मलता बह्व्यःसमस्तास्तृणजातयः ॥ १२
॥
स्थूला मध्यास्तथा सूक्ष्माः सूक्ष्मात्सूक्ष्मतराश्च
ये ।
देहभेदा भवान् सर्वे ये केचित्पुर्गलाश्रयाः
॥ १३ ॥
देवता, दैत्य, यक्ष, राक्षस,
सिद्ध, पन्नग (नाग), कूष्माण्ड, पिशाच, गन्धर्व, मनुष्य, पशु, मृग, पतङ्ग, सरीसृप
(साप), अनेक वृक्ष, गुल्म आणि लता, समस्त तृणजाती तसेच स्थूल मध्यम सूक्ष्म आणि सूक्ष्माहूनही
सूक्ष्म जितके देह भेद परमाणुंचे आश्रित आहेत ते सर्व आपणच आहात ॥ ११ - १३ ॥
माया तवेयमज्ञातपरमार्थातिमोहिनी ।
अनात्मन्यात्मविज्ञानं यया मूढो निरुद्ध्यते
॥ १४ ॥
हे प्रभो ! आपली मायाच
परमार्थतत्व न जाणणार्या पुरुषांना मोहित करणारी आहे ज्यामुळे मूढ पुरुष अनात्म्यात
आत्मबुद्धि ठेऊन बन्धनात पडतात ॥ १४ ॥
अस्वे स्वमिति भावोऽत्र यत्पुंसामुपजायते ।
अहं ममेति भावो यत्प्रायेणैवाभिजायते ।
संसारमातुर्मायायास्तवैतन्नाथ चेष्टितम् ॥
१५ ॥
हे नाथा ! पुरुषाला अनात्म्यात
आत्मबुद्धि आणि 'मी माझं' आदि भाव प्रायः उत्पन्न होतात ते सर्व आपल्या जगज्जननी मायेचाच
विलास आहे ॥ १५ ॥
यैः स्वधर्मपरैर्नाथ नरैराराधितो भवान् ।
ते तरन्त्यखिलामेतां मायामात्मविमुक्तये ॥
१६ ॥
हे नाथा ! जे स्वधर्म
परायण पुरुष आपली आराधना करतात ते आपल्या मोक्षासाठी ही सम्पूर्ण माया पार करून जातात
॥ १६ ॥
ब्रह्माद्याःसकला देवा मनुष्याः पशवस्तथा ।
विष्णुमायामहावर्तमोहान्धतमसावृताः ॥ १७ ॥
ब्रह्मा आदि सम्पूर्ण
देवगण तसेच मनुष्य व पशु आदि सगळे विष्णुमायारूपी महान आवर्तनात पडून मोहरूपी अन्धकाराने
आवृत आहेत ॥ १७ ॥
आराध्य त्वामभीप्सन्ते कामानात्मभवक्षयम् ।
यदेते पुरुषा माया सैवेयं भगवंस्तव ॥ १८ ॥
हे भगवन ! जन्म मरणाच्या
चक्रात पडलेले हे पुरुष जीवाचे भवबन्धन नष्ट करणार्या आपली आराधना करूनही नाना प्रकारच्या
कामना करतात ती आपलीच माया आहे ॥ १८ ॥
मया त्वं पुत्रकामिन्या वैरिपक्षजयाय च ।
आराधितो न मोक्षाय मायाविलसितं हि तत् ॥ १९
॥
मी देखील जयाच्या इच्छेने
शत्रु पक्षाला पराजित करण्यार्या पुत्रांसाठी आपली आराधना केली होती, मोक्षासाठी नाही. हा सुद्धा आपल्या मायेचाच विलास आहे ॥ १९ ॥
कौपीनाच्छादनप्राया वाञ्चा कल्पद्रुमादपि ।
जायते यदपुण्यानां सोपराधः स्वदोषजः ॥ २० ॥
पुण्यहीन पुरुषांना कल्पवृक्षा
पासूनही जी कौपीन आणि आच्छादन वस्त्राचीच इच्छा होते तो त्यांचा कर्मदोष जन्य अपराधच
आहे ॥ २० ॥
तत्प्रसीदाखिलजगन्मायामोहकराव्यय ।
अज्ञानं ज्ञानसद्भावभूतं भूतेश नाशय ॥ २१
॥
हे अखिल-जगन्माया-मोहकारी
अव्यय प्रभो ! आपण प्रसन्न व्हा आणि हे भूतेश्वरा ! माझे ज्ञानाभिमान जनित अज्ञान नष्ट
करा ॥ २१ ॥
नमस्ते चक्रहस्ताय शार्ङ्गहस्ताय ते नमः ।
नन्दहस्ताय ते विष्णो शङ्खहस्ताय ते नमः ॥
२२ ॥
हे चक्रपाणी ! आपणाला
नमस्कार, हे शार्ङगधरा ! आपणाला नमस्कार; हे गदाधरा! आपणाला नमस्कार; हे शंखपाणी! हे
विष्णो! आपणाला वारंवार नमस्कार ॥ २२ ॥
एतत्पश्यामि ते रूपं स्थूलचिह्नोपलक्षितम्
।
न जानामि परं यत्ते प्रसीद परमेश्वर ॥ २३ ॥
मी स्थूल चिह्नांनी प्रतीत
होणारे आपले हे रूपच बघते आहे; मी आपके वास्तविक परस्वरूप जाणत नाही ; हे परमेश्वरा
! आपण प्रसन्न व्हा ॥ २३ ॥
श्रीपराशर उवाच
अदित्यैवं स्तुतो विष्णुः प्रहस्याह सुरारणिम्
।
माता देवि त्वमस्माकं प्रसीद वरदा भव ॥ २४
॥
श्रीपराशर म्हणाले ;-
अदिती द्वारा अशाप्रकारे स्तुति केली गेल्यावर भगवान विष्णु देवमातेला हसून म्हणाले
-"हे देवी ! तुच माझी माता आहेस; तु प्रसन्न होऊन मला वरदायिनी हो" ॥ २४
॥
अदितिरुवाच
एवमस्तु यथेच्छा ते त्वमशेषैः सुरासुरैः ।
अजेयः पुरुषव्याघ्र सर्त्यलोके भविष्यसि ॥
२५ ॥
अदिती म्हणाली ;- हे पुरुषसिंहा
! तुझी इच्छा पूर्ण होओ. तु मर्त्युलोकी सम्पूर्ण सुर असुरांपासून
अजेय होशील ॥ २५ ॥
श्रीपराशर उवाच
ततः कृष्णस्य पत्नी च शक्रेण सहितादितिम्
।
सत्यभामा प्रणम्याह प्रसीदेति पुनः पुनः ॥
२६ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
त्यानंतर शक्र पत्नी शची सहित कृष्णप्रिया सत्यभामेने अदितीला पुन्हा पुन्हा प्रणाम
करून म्हटले- "माते ! आपण प्रसन्न व्हा"॥ २६ ॥
अदितिरुवाच
मत्प्रसादान्न ते सुभ्रु जरा वैरूप्यमेव वा
।
भविष्यत्यनवद्याङ्गि सुस्थिरं नवयौवनम् ॥
२७ ॥
अदिति म्हणाली ;- हे सुन्दर
भृकुटिवाली! माझ्या कृपेने वृद्धावस्था किंवा विरूपता तुला कधीच व्याप्त करणार नाही. हे अनिन्दिताङ्गि! तुझे नवयौवन सदैव स्थिर राहील ॥ २७ ॥
श्रीपराशर उवाच
अदित्या तु कृतानुज्ञो देवराजो जनार्दनम् ।
यथावत्पूजयामास बहुमानपुरःसरम् ॥ २८ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
त्यानंतर अदितीच्या आज्ञेने देवराजाने अत्यन्त आदर-सत्कारासह श्रीकृष्णाचे पूजन केले
॥ २८ ॥
शची च सत्यभामायै पारिजातस्य पुष्पकम् ।
न ददौ मानुषीं मत्वा स्वयं पुष्पैरलङ्कृता
॥ २९ ॥
पण कल्पवृक्षाच्या पुष्पांनी
अलंकृत असलेल्या इन्द्राणीने सत्यभामेला मानुषी समजून ती पुष्प दिली नाहीत
॥ २९ ॥
ततो ददर्श कृष्णोऽपि सत्यभामासहायवान् ।
देवोद्यानानि हृद्यानि नन्दनादीनि सत्तम ॥
३० ॥
हे साधुश्रेष्ठा ! नंतर
सत्यभामेसह श्रीकृष्णाने सुद्धा देवतांची नन्दन आदि मनोहर उद्याने पाहीली ॥ ३०॥
ददर्श च सुगन्धाढ्यं मञ्जरीपुञ्जधारिणम् ।
नित्याह्लादकरं ताम्रबालपल्लवशोभितम् ॥ ३१
॥
मथ्यमानेऽमृते जातं जातरूपोपमत्वचम् ।
पारिजातं जगन्नाथः केशवः केशिसूदनः ॥ ३२ ॥
तिथे केशिनिषूदन जगन्नाथ
श्रीकृष्णाने सुगन्धपूर्ण मञ्जरीपुञ्जधारी, नित्य आह्लादकारी, ताम्र वर्णाच्या
बालपल्लविंनी सुशोभित अमृत-मन्थना वेळी प्रकट झालेला सोनेरी त्वचेचा पारिजात वृक्ष
पाहीला ॥ ३१-३२ ॥
तुतोष परमप्रीत्या तरुराजमनुत्तमम् ।
तं दृष्ट्वा प्राह गोविन्दं सत्यभामा द्विजोत्तम
।
कस्मान्न द्वारकामेष नीयते कृष्ण पादपः ॥ ३३
॥
हे द्विजोत्तमा ! तो अत्युत्तम
वृक्षराज पाहून परम प्रीतिवश सत्यभामा अति प्रसन्न होऊन गोविंदाला म्हणाली -“हे कृष्णा
! आपण ह्या वृक्षाला द्वारकापुरी का घेऊन जात नाही ? ॥ ३३ ॥
यदि चेत्त्वद्वचः सत्यं त्वमत्यर्थं प्रियेति
मे ।
मद्गेहनिष्कुटार्थाय तदयं नीयतां तरुः ॥ ३४
॥
'तु मला अत्यन्त प्रिय
आहेस’ हे आपलं वचन जर खरं असेल तर माझ्या गृहोद्यानात लावण्यासाठी हा वृक्ष घेऊन चला
॥ ३४ ॥
न मे जाम्बवती तादृगभीष्टा न च रुक्मिणी ।
सत्ये यथा त्वमित्युक्तं त्वया कृष्णासकृत्प्रियम्
॥ ३५ ॥
हे कृष्णा ! आपण अनेकदा
म्हटलं आहेत की 'हे सत्ये ! तु मला जितकी प्रिय आहेस तितकी जाम्बवती किंवा रुक्मिणी
सुद्धा नाही’ ॥३५॥
सत्यं तद्यदि गोविन्द नोपचारकृतं मम ।
तदस्तु पारिजातोऽयं मम गेहविभूषणम् ॥ ३६ ॥
हे गोविन्दा ! जर आपले
हे कथन खरं असेल तर हा पारिजात वृक्ष माझ्या गृहाचे भूषण होओ ॥ ३६ ॥
बिभ्रती पारिजातस्य केशपक्षेण मञ्जरीम् ।
सपत्नीनामहं मध्ये शोभेयमिति कामये ॥ ३७ ॥
माझी अशी इच्छा आहे की
मी आपल्या केश-कलापात पारिजात पुष्प गूंफून आपल्या अन्य सपत्निंमध्ये सुशोभित व्हावे"
॥ ३७॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्तः स प्रहस्यैनां पारिजातं गरुत्मति
।
आरोपयामास हरिस्तमूचुर्वनरक्षिणः ॥ ३८ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
सत्यभामेने असे म्हटल्यावर श्रीहरीने हसत तो पारिजात-वृक्ष गरुडावर ठेऊन दिला; तेव्हा
नंदनवनातील रक्षक म्हणाले ॥ ३८॥
भो शची देवराजस्य महिषी तत्परीग्रहम् ।
पारिजातं न गोविन्द हर्तुमर्हसि पादपम् ॥ ३९
॥
"हे गोविन्दा ! हा
पारीजात वृक्ष देवराज इन्द्रपत्नी महारानी शचीची सम्पत्ति आहे, आपण ह्याचे हरण करू
नका ॥ ३९ ॥
उत्पन्नो देवराजाय दत्तः सोऽपि ददौ पुनः ।
महिष्यै सुमहाभाग देव्यै शच्यै कुतूहलात् ॥
४० ॥
क्षीर समुद्रातून उत्पन्न
झाल्यानंतर हा देवराजाला दिला गेला होता; हे महाभागा ! देवराजाने
कुतूहलवश हा आपली महिषी शचीदेवीला दिला ॥ ४० ॥
शचीविभूषणार्थाय देवैरमृतमन्थने ।
उत्पादितोऽयं न क्षेमी गृहीत्वैनं गमिष्यसि
॥ ४१ ॥
समुद्र मंथनाच्या वेळी
शचीला विभूषित करण्यासाठी देवतांनी ह्याला उत्पन्न केले होते, ह्याला घेऊन आपण कुशलतापूर्वक
जाऊ शकत नाही ॥ ४१ ॥
देवराजो मुखप्रेक्षी यस्यास्तस्याः परिग्रहम्
।
मैढ्यात्प्रार्थयसे क्षेमी गृहीत्वैनं हि को
व्रजेत् ॥ ४२ ॥
देवराज सुद्धा जिचे मुख
पाहात राहतात त्या शचीची सम्पत्ति असलेल्या ह्या पारिजाताची इच्छा आपण मूढतेमुळे करत
आहात ; ह्याला घेऊन सकुशलतेने कोणी जाऊ शकेल का ? ॥ ४२ ॥
अवश्यमस्य देवेन्द्रो निष्कृतिं कृष्ण यास्यति
।
वज्रोद्यतकरं शक्रमनुयास्यन्ति चामराः ॥ ४३
॥
हे कृष्णा ! देवराज इन्द्र
ह्या वृक्षाचा बदला चुकविण्यासाठी अवश्य वज्र घेऊन उद्यत होतील आणि मग देवगण सुद्धा
नक्कीच त्यांचे अनुगमन करतील ॥ ४३ ॥
तदलं सकलैर्देवैर्विग्रहेण तवाच्युत ।
विपाककटु यत्कर्म तन्न शंसन्ति पण्डिताः ॥
४४ ॥
म्हणून हे अच्युता ! समस्त
देवतांसह शत्रुता वाढविण्यात आपला कोणताच फायदा नाही, कारण ज्या कर्माचा परिणाम कटु
असतो पण्डितजन त्याला चांगले म्हणत नाहीत" ॥ ४४ ॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्ते तैरुवाचैतान् सत्यभामातिकोपिनी ।
का शची पारिजातस्य को वा शक्रःसुराधिपः ॥ ४५
॥
श्रीपराशर म्हणाले ;-
उद्यान रक्षकांनी असे म्हटल्यावर सत्यभामा अत्यन्त क्रुद्ध होऊन बोलली "शची अथवा
देवराज इन्द्र ह्या पारिजाताचे कोण आहेत? ॥ ४५ ॥
सामान्यः सर्वलोकस्य यद्येषोऽमृतमन्थने ।
समुत्पन्नस्तरुः कस्मादेको गृह्णाति वासवः
॥ ४६ ॥
जर हा अमृत-मन्थनावेळी
उत्पन्न झाला आहे तर तो सर्वांचीच समान सम्पत्ति आहे. एकटा
इन्द्रच ह्याला कसा काय घेऊ शकतो ? ॥ ४६ ॥
यथा सुरा यथैवेन्दुर्यथा श्रीर्वनरक्षिणः ।
सामान्यःसर्वलोकस्य पारिजातस्तथा द्रुमः ॥
४७ ॥
वनरक्षकांनो ! समुद्रातून
उत्पन्न झालेले मदिरा, चन्द्रमा आणि लक्ष्मीला जसे सर्वजण समाननेते भोगतात त्याच प्रकारे
पारिजात-वृक्ष सुद्धा सर्वांची सम्पत्ति आहे ॥ ४७ ॥
भर्तृ बहुमहागर्वाद्रुणद्ध्येनमथो शची ।
तत्कथ्यतामलं क्षान्त्या सत्या हारयति द्रुमम्
॥ ४८ ॥
पतिच्या बाहुबळामुळे गर्विष्ठ
होऊन शचीने जर ह्यावर आपला अधिकार जमवला असेल तर तिला सांगा की सत्यभामा हा वृक्ष हरण
करून घेऊन जात आहे, तुम्हाला क्षमा करण्याची आवश्यकता नाही ॥ ४८ ॥
कथ्यतां च द्रुतं गत्वा पौलोम्या वचनं मम ।
सत्यभामा वदत्येतदिति गर्वोद्धताक्षरम् ॥ ४९
॥
यदि त्वं दयिता भर्तुर्यदि वश्यः पतिस्तव ।
मद्भर्तुर्हरतो वृक्षं तत्कारय निवारणम् ॥
५० ॥
माळ्यांनो ! तुम्ही लगेच
जाऊन माझं बोलणं शचीला सांगा की सत्यभामेने अत्यन्त गर्वाने सांगितलं आहे की जर तु
आपल्या पतिला अत्यन्त प्रिय आहेस आणि ते तुला वशीभूत आहेत तर त्यांनी माझ्या पतीला
पारिजाताचे हरण करण्यापासून रोखावे ॥ ४९ - ५० ॥
जानामि ते पतिं शक्रं जानामि त्रिदशेश्वरम्
।
पारिजातं तथाप्येनं मानुषी हारयामि ते ॥ ५१
॥
मी तुझे पति शक्र ह्याला
ओळखते आणि ते देवतांचे स्वामी आहेत हे सुद्धा जाणते, तरी मी मानवीच तुझा हा पारिजात
वृक्ष घेऊन जात आहे ॥ ५१ ॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्ता रक्षिणो गत्वा शच्याः प्रोचुर्यथोदितम्
।
श्रुत्वा चोत्साहयामास शची चक्रं सुराधिपम्
॥ ५२ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
सत्यभामा असे बोलल्यावर वन रक्षकांनी शची जवळ जाऊन तिला हा सम्पूर्ण वृत्तान्त जसाच्या
तसा सांगितला. हे ऐकून शचीने आपल्या पती देवराज
इंद्राला प्रोत्साहित केले ॥ ५२ ॥
ततःसमस्तदेवानां सैन्यैः परिवृतो हरिम् ।
प्रययौ पारिजातार्थमिन्द्रो योद्धुं द्विजोत्तम
॥ ५३ ॥
हे द्विजोत्तमा ! तेव्हा
देवराज इन्द्र पारिजात-वृक्ष सोडवून आणण्यासाठी सम्पूर्ण देवसेनेसह श्रीहरीशी लढायला
निघाले ॥ ५३ ॥
ततः परिघनिस्त्रिंशगदाशूलवरायुधाः ।
बभूवुस्त्रिदशाः सज्जाः शक्रे वज्रकरे स्थिते
॥ ५४ ॥
इन्द्राने आपल्या हातात
वज्र घेताच सर्व देवगण परिधि, निस्त्रिंश , गदा आणि शूलादि अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित
झाले ॥ ५४ ॥
ततो निरिक्ष्य गोविन्दो नागराजोपरिस्थितम्
।
शक्रं देवपरिवारं युद्धाय समुपस्थितम् ॥ ५५
॥
चकार शङ्खनिर्घोषं दिशः शब्देन पूरयन् ।
मुमोच शरसङ्घातान् सहस्रायुतशः शितान् ॥ ५६
॥
नंतर देवसेनेने घेरलेल्या
व ऐरावतावर आरूढ़ इन्द्रा युद्धासाठी उद्यत पाहून गोविंदाने सम्पूर्ण दिशांना भरून
टाकणारा शङ्खनाद केला आणि हजारों लाखों तीक्ष्ण बाण सोडले ॥ ५५-५६ ॥
ततो दिशो नभश्चैव दृष्ट्वा शरशतैश्चितम् ।
मुमुचुस्त्रिदशाःसर्वे ह्यस्त्रशस्त्राण्यनेकशः
॥ ५७ ॥
अशाप्रकारे सर्व दिशा
आणि आकाश शेकडो बाणांनी व्यापलेले पाहून देवतांनी अनेक अस्त्र-शस्त्र सोडले ॥ ५७ ॥
एकैकमस्त्रं शस्त्रं च दैवैर्मुक्तं सहस्रशः
।
चिच्छेद लीलयैवेशो जगतां मधुसूदनः ॥ ५८ ॥
त्रिलोकीचे स्वामी मधुसूदन
ह्यांनी देवतांनी सोडलेल्या प्रत्येक अस्त्र-शस्त्राचे लीलया हजारो तुकडे केले ॥ ५८
॥
पाशं सलिलराजस्य समाकृष्योरगाशनः ।
चकार खण्डशश्चञ्च्वा बालपन्नगदेहवत् ॥ ५९ ॥
सर्पाहारी गरुडाने जलाधिपति
वरुणाचे पाश खेचून आपल्या चोचीने त्याचे सापाच्या पिल्लासारखे असंख्य तुकडे केले ॥
५९ ॥
यमेन प्रहितं दण्डं गदाविक्षेपखण्डितम् ।
पृथिव्यां पातयामास भगवान् देवकीसुतः ॥ ६०
॥
देवकीनन्दनाने यमाने फेकलेले
दण्डाचे आपल्या गदेने तुकडे तुकडे करून पृथ्वीवर टाकले ॥ ६० ॥
शिबिकां च धनेशस्य चक्रेण तिलशो विभुः ।
चकार शौरिरर्कं च दृष्टिदृष्टहतौजसम् ॥ ६१
॥
कुबेराच्या विमानाला भगवंताने
सुदर्शन चक्र द्वारा तीळतीळ केले आणि सूर्याला आपल्या तेजोमय दृष्टिने केवळ बघूनच निस्तेज
केले ॥ ६१ ॥
नीतोऽग्निः शीततां बाणैर्द्राविता वसवो दिशः
।
चक्रविच्छिन्नशुलाग्रा रुद्रा भुवि निपातिताः
॥ ६२ ॥
नंतर भगवंताने बाणांची
वृष्टी करून अग्नीला शीतल केले आणि वसुंना आठही दिशांना पळवून लावले तसेच आपल्या चक्राने
त्रिशूळाचे टोक कापून रुद्रगणांना पृथ्वीवर पाडवले ॥ ६२ ॥
साध्या विश्वेऽथ मरुतो गन्धर्वाश्चैव सायकैः
।
शार्ङ्गिणा प्रेरितैरस्ता व्योम्नि शाल्मलितूलवत्
॥ ६३ ॥
भगवंताने सोडलेल्या बाणांनी
साध्यगण, विश्वेदेवगण मरुद्गगण आणि गन्धर्वगण कापसासारखे आकाशातच लीन झाले ॥ ६३ ॥
गरुत्मानपि तुण्डेन पक्षाभ्यां च नखाङ्कुरैः
।
भक्षयंस्ताडयन् देवान् दारयंश्च चचार वै ॥
६४ ॥
भगवंता सोबत गरुड सुद्धा
आपली चोच, पंख आणि पंजांनी देवतांना खात, मारत आणि फाडत फिरत होता ॥ ६४ ॥
ततः शतसहस्रेण देवेन्द्रमधुसूदनौ ।
परस्परं ववर्षाते धाराभिरिव तोयदौ ॥ ६५ ॥
नंतर जलधारांचा वर्षाव
करणार्या दोन मेघांसारखे देवराज इंद्र आणि श्रीमधुसूदन एक दुसर्यावर बाणांचा वर्षाव
करू लागले ॥ ६५ ॥
ऐरावतेन गरुडो युयुधे तत्र संकुले ।
देवैः समस्तैर्युयुधे शक्रेण च जनार्दनः ॥ ६६ ॥
ह्या युद्धात गरुड ऐरावता
बरोबर आणि श्रीकृष्ण इन्द्र तसेच सर्व देवतां बरोबर लढत होते ॥ ६६॥
भिन्नेष्वशेषबाणेषु शस्त्रेष्वस्त्रेषु च त्वरन्
।
जग्राह वासवो वज्रं कृष्णश्चक्रं सुदर्शनम्
॥ ६७ ॥
सर्व बाण संपल्यावर आणि
अस्त्र-शस्त्रांचा चक्काचूर झाल्यावर इन्द्राने त्वरित आपले वज्र आणि कृष्णाने सुदर्शन
चक्र हातात घेतले ॥ ६७ ॥
ततो हाहाकृतं सर्वं त्रैलोक्यं द्विजसत्तम
।
वज्रचक्रकरौ दृष्ट्वा देवराजजनार्दनौ ॥ ६८
॥
हे द्विजश्रेष्ठा ! त्यावेळी
सम्पूर्ण त्रिलोकात इन्द्र आणि श्रीकृष्णाला वज्र व चक्र घेतलेले पाहून हाहाकार माजला
॥ ६८ ॥
क्षिप्तं वज्रमथेन्द्रेण जग्राह भगवान्हरिः
।
न मुमोच तदा चक्रं शक्रं तिष्ठेति चाब्रवीत्
॥ ६९ ॥
श्रीहरीने इन्द्राने सोडलेले
वज्र आपल्या हातांनीच पकडले आणि स्वतः चक्र न सोडता इंद्राला म्हटले " जरा थांब
!" ॥ ६९ ॥
प्रणष्टवज्रं देवेन्द्रं गरुडक्षतवाहनम् ।
सत्यभामाब्रवीद्वीरं पलायनपरायणम् ॥ ७० ॥
वज्र हिरावून घेतल्याने
व आपले वाहन ऐरावत गरुडाकडून क्षत-विक्षत झाल्यामुळे पळून जाणार्या वीर इन्द्राला
सत्यभामा म्हणाली- ॥ ७० ॥
त्रैलोक्येश न ते युक्तं शचीभर्तुः पलायनम्
।
पारिजातस्रगाभोगा त्वामुपस्थास्यते शची ॥ ७१
॥
"हे त्रिलोकेश्वरा
! तु शचीचा पति आहेस, तु अशा प्रकारे युद्धात पाठ दाखवणे उचित नाही, पळून जाऊ नकोस,
पारिजात पुष्पांच्या मालांनी विभूषिता होऊन शची लवकरच तुझ्या जवळ येईल ॥७१॥
कीदृशं देवराज्यं ते पारिजातस्रगुज्ज्वलाम् ।
अपक्येतो यथापूर्वं प्रणयाभ्यागतां शचीम् ॥
७२ ॥
प्रेमवश आपल्या जवळ आलेल्या
शचीला आधीसारखे पारिजात-पुष्पमाळेने अलङ्कृत नसलेले पाहिल्यावर तला देवराजत्वाचे काय
सुख मिळणार? ॥ ७२ ॥
अलं शक्र प्रयासेन न व्रीडां गन्तुमर्हसि ।
नीयतां पारिजातोयं देवाःसन्तु गतव्यथाः ॥ ७३
॥
हे शक्रा ! आता तुला आणखी
प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, विनासंकोच हा पारिजात वृक्ष घेऊन जा. हा प्राप्त करून देवगण सन्तापरहित होवोत ।। ७३ ॥
परिगर्वावलेपेन बहुमानपुरःसरम् ।
न ददर्श गृहं यातामुपचारेण मां शची ॥ ७४ ॥
आपल्या पतिच्या बाहुबळामुळे
अत्यन्त गर्वित शचीने तिच्या घरी गेल्यावर माझ्याकडे फारसे सम्मानित दृष्टिने पाहिले
नव्हते ॥ ७४ ॥
स्त्रीत्वादगुरुचित्ताहं स्वभर्तृश्लाघनापरा
।
ततः कृतवती शक्र भवता सह विग्रहम् ॥ ७५ ॥
स्त्री असल्याने माझे
चित्त देखील फार गम्भीर नाही, म्हणूनच मी सुद्धा माझ्या पतीचा गौरव दाखविण्यासाठी तुझ्याशी
लढायचे ठरवले ॥ ७५ ॥
तदलं पारीजातेन परस्वेन हृतेन मे ।
रूपेण गर्विता सा तु भर्त्रा का स्त्री न गर्विता
॥ ७६ ॥
मला दुसर्याची संपत्ति
असलेला हा पारिजात घेऊन जायची आवश्यकताच काय? शचीला जर आपल्या रूपाचा आणि पतीचा गर्व
आहे तर इतर कोणत्या स्त्रिला असा गर्व का नसावा? ॥ ७६ ॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्तो वै निववृते देवराजस्तया द्विज ।
प्राह चैनामलं चण्डि सख्युः खेदोक्तिविस्तरैः
॥ ७७ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
हे द्विजा ! सत्यभामाने असे म्हटल्यावर देवराज मागे फिरून म्हणाला -"हे क्रोधिते!
मी तुझा सुहृद आहे म्हणून माझ्यासाठी अशी वैमनस्य वाढविणारी वापरण्याचे काहीच प्रयोजन
नाही ॥ ७७ ॥
न चापि सर्गसंहारस्थितिकर्ताखिलस्य यः ।
जितस्य तेन मे व्रीडा जायते विश्वरूपिणा ॥
७८ ॥
जे सम्पूर्ण जगताची उत्पत्ति,
स्थिति व संहार करणाले आहेत त्या विश्वरूप प्रभुंकडून पराजित होण्यात मला कसलाही संकोच
नाही ॥ ७८ ॥
यस्माज्जगत्सकलमेतदनादिमध्या-
द्यस्मिन्यतश्च न भविष्यति सर्वभूतात् ।
तेनोद्भवप्रलयपालनकारणेन
व्रीडा कथं भवति देवि निराकृतस्य ॥ ७९ ॥
ज्या आदि व मध्यरहित प्रभुपासुन
हे सम्पूर्ण जगत उत्पन्न झाले आहे, ज्याच्यात यह स्थित आहे आणि मग ज्याच्यात लीन होऊन
शेवटी ते राहणार नाही; हे देवि !
जगताची उत्पत्ति, प्रलय आणि पालनाचे कारण असलेल्या त्या परमात्म्याकडून पराजित होण्यात
मला का लाज वाटेल ? ॥ ७९ ॥
सकलभुवनसूतिर्मूर्तिरल्पाल्पसूक्ष्मा
विदितसकलबैद्यैर्ज्ञायते यस्य नान्यैः ।
तमजमकृतमीशं शाश्वतं स्वेच्छयैनं
जगदुपकृतिमर्त्यं को विजेतुं समर्थः ॥ ८० ॥
ज्याच्या सम्पूर्ण जगत
उत्पन्न करणार्या अत्यन्त अल्प व सूक्ष्म मूर्तिला, सम्पूर्ण वेद जाणणारे अन्य पुरुषही
जाणू शकत नाहीत तसेच ज्याने जगताच्या उपकारा साठी आपल्या इच्छेनेच मनुष्य रूप धारण
केले आहे त्या अजन्मा, अकर्ता नित्य ईश्वराला जिंकायला मी कुठे समर्थ आहे?" ॥
८० ॥
इति श्रीपिष्णुमहापुराणे
पञ्चमे
अंशे त्रिंशोध्यायः
(३०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा