बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, षड्विंश, सप्तविंश अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 26 / 27

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ षड्विंशोऽध्यायः ॥

 

"रुक्मिणीहरण"

श्रीपराशर उवाच
भीष्मकः कुण्डिने राजा विदर्भविषयेऽभवत् ।
रुक्मीतस्यभवत्पुत्रो रुक्मिणी च वरानना ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- विदर्भ देशांतर्गत कुण्डिनपुर नामक नगरात भीष्मक नावाचा एक राजा होता. त्याला रुक्मी नावाचा पुत्र आणि रुक्मिणी नावाची एक सुमुखी कन्या होती ॥१॥

 


 रुक्मिणीं चकमे कृष्णः सा च तं चारुहासिनि ।
 न ददौ याचते चैनां रुक्मी द्वेषेण चक्रिणे ॥ २ ॥

श्रीकृष्णाने रुक्मिणीची आणि चारुहासिनी रुक्मिणीने श्रीकृष्णाची अभिलाषा केली, पण श्रीकृष्णाने विनंती करूनही त्याचा द्वेष करणार्‍या रुक्मीने त्यांना रुक्मिणी देण्यास नकार दिला ॥२॥

 


 ददौ च शिशुपालाय जरासन्धप्रचोदितः ।
 भीष्मको रुक्मिणा सार्धं रुक्मिणीमुरुविक्रमः ॥ ३ ॥

महापराक्रमी भीष्मकाने जरासंधाच्या प्रेरणेने रुक्मी सोबत सहमत होऊन शिशुपालाला रुक्मिणी देण्याचा निश्चय केला ॥३॥


विवाहार्यं ततः सर्वे जरासन्धमुखा नृपाः ।
भीष्मकस्य पुरं जग्मुः शिशुपालप्रियैषिणः ॥ ४ ॥

तेव्हा शिशुपालाचे हितैषी जरासन्ध आदि सम्पूर्ण राजागण विवाहात सम्मिलित होण्यासाठी भीष्मकाच्या नगरात गेले ॥४॥


कृष्णोऽपि बलभद्राद्यैर्यदुभिः परिवारितः ।
प्रययौ कुण्डिनं द्रष्टुं विवाहं चैद्यभूभृतः ॥ ५ ॥

इथे बलभद्र आदि यदुवंशिंसह श्रीकृष्ण सुद्धा चेदिराजाचा विवाह उत्सव पाहण्यासाठी कुण्डिन पुरला आले ॥ ५ ॥


श्वोभाविनि विवाहे तु तां कन्यां हृतवान्हरिः ।
विपक्षभारमासज्य रामादिष्वथ बन्धुषु ॥ ६ ॥

त्यानंतर विवाहाला एक दिवस असताना आपल्या विपक्षिंचा भार बलभद्र आदि बांधवांवर सोपवून श्रीहरीने त्या कन्येचे हरण केले ॥ ६ ॥

 


 ततश्च पैण्ड्रकः श्रीमान्दन्तवक्रो विदूरथः ।
 शिशुपालजरासन्धशाल्वाद्याश्च महीभृतः ॥ ७ ॥
 कुपितास्ते हरिं हन्तुं चक्रुरुद्योगमुत्तमम् ।
 निर्जिताश्च समागम्य रामाद्योर्यदुपुङ्‍गवैः ॥ ८ ॥

तेव्हा श्रीमान पौण्ड्रक, दन्तवक्र, विदूरथ, शिशुपाल, जरासन्ध आणि शाल्व आदि राजांनी क्रोधित होऊन श्रीहरीला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळे बलराम आदि यदुश्रेष्ठांकडून पराजित झाले ॥ ७-८॥

 


 कुण्डिनं न प्रवेक्ष्यामि ह्यहत्वा युधि केशवम् ।
 कृत्वा प्रतिज्ञां रुक्मी च हन्तुं कृष्णमनुद्रुतः ॥ ९ ॥

तेव्हा रुक्मीने “मी युद्धात कृष्णाला मारल्याशिवाय कुण्डिनपुरात प्रवेश करणार नाही” अशी प्रतिज्ञा करून कृष्णाला मारण्यासाठी त्याच्या मागे गेला ॥९॥


 हत्वा बलं सनागाश्‍वं पत्तिस्यन्दनसंकुलम् ।
 निर्जितः पातितश्चोर्व्यां लीलयैव स चक्रिणा ॥ १० ॥

पण कृष्णाने लीलया दोन हत्ती, घोड़े, रथ आणि पायदळाने युक्त असलेली त्याची सेना नष्ट करून त्याला हरवले आणि जमिनीवर पाडले ॥ १०॥।


 निर्जित्य रुक्मिणं सम्यगुपयेमे च रुक्मिणीम् ।
 राक्षसेन विवाहेन सम्प्राप्तां मधुसुदनः ॥ ११ ॥

अशाप्रकारे रुक्मीला युद्धात पराजित करून मधुसूदनाने राक्षस विवाहाने मिळविलेल्या रुक्मिणीचे योग्य वेदोक्त रीतिने पाणिग्रहण केले ॥ ११ ॥

 


 तस्यां जज्ञे च प्रद्युम्नो मदनांशः सवीर्यवान् ।
 जहार शम्बरो यं वै यो जघान च शम्बरम् ॥ १२ ॥

तिच्यापासून त्यांना कामदेवाच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या वीर्यवान् प्रद्युम्न झाला, ज्याचे शम्बरासुराने हरण केले आणि कालक्रमाने प्रद्युम्नाने शम्बरासुराचा वध केला होता ॥ १२ ॥

 


 इति श्रिविष्णुमहापुराणे पञ्चमे
अंशे षड्
विंशोऽध्यायः (२६)




 

                             
 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तविंशोऽध्यायः ॥

 

"प्रद्युम्न-हरण तसेच शम्बर-वध"

श्रीमैत्रेय उवाच
शम्बरेण हृतो वीरः प्रद्युम्नः स कथं मुने ।
शम्बरः स महावीर्यः प्रद्युम्नेन कथं हतः ॥ १ ॥

श्रीमैत्रेय म्हणाले;- हे मुने! वीरवार प्रद्युम्नाचे शम्बरासुराने कसे हरण केले होते? आणि मग त्या महाबली शम्बराने प्रद्युम्नाने कसे मारले? ॥ १ ॥

 


यस्तेनापहृतः पूर्वं स कथं विजघान तम् ।
एतद्विस्तरतः श्रोतुमिच्छामि सरलं गुरो ॥ २ ॥

आधी ज्याचे त्याने हरण केले त्यालाच मग कसे मारले? हे गुरो! मी हा सम्पूर्ण प्रसंग विस्तारपूर्वक ऐकू इच्छितो ॥२॥

 


 श्रीपराशर उवाच
 षष्ठेह्नि जातमात्रं तु प्रद्युम्नं सूतिकागृहात् ।
 ममैष हन्तेति मुने हृतवान्कालशम्बरः ॥ ३ ॥

श्रीपराशर म्हणाले;- हे मुने! काळासमान विकराळ शम्बरासुराने प्रद्युम्नाला त्याच्या जन्मानंतर सहाव्याच दिवशी “हा मला मारणारा आहे” असे जाणून सूतिका गृहातून हरण केले ॥ ३ ॥

 


 हृत्वा चिक्षेप चैवैनं ग्राहोग्रे लवणार्णवे ।
 कल्लोलजनितावर्ते सुघोरे मकारालये ॥ ४ ॥

हरण करून शम्बरासुराने तरंगमालाजनित आवर्तनांनी पूर्ण आणि मोठमोठ्या भयानक मगरींचे घर असलेल्या लवण समुद्रात त्याला टाकले ॥ ४ ॥

 

 


 पातितं तत्र चैवैको मत्स्यो जग्राह बालकम् ।
 न ममार च तस्यापि जठराग्निप्रदीपितः ॥ ५ ॥

तिथे फेकलेल्या त्या बालकाला एका मत्स्याने गिळंकत केले, पण जठराग्नित जळूनही ते बाळ मेले नाही ॥ ५॥

 


 मत्स्यबन्धैश्च मत्स्योऽसौ मत्स्यैरन्यैः सह द्विज ।
 घातितोऽसुरवर्याय शम्बराय निवेदितः ॥ ६ ॥

कालान्तराने काही मासेमार्‍यांनी अन्य मासे पकडताना ह्या मत्स्यालाही आपल्या जाळ्यात पकडले आणि असुर श्रेष्ठ शम्बराला सांगितले ॥६॥

 


तस्य माया वती नामपत्‍नी सर्वगृहेश्वरी ।
कारयामास सूदानामाधिपत्यमनिन्दिता ॥ ७ ॥

त्याची नाममात्र पत्नी मायावती सम्पूर्ण अन्तःपुराची स्वामिनी होती आणि ती सुलक्षणा सम्पूर्ण आचार्‍यांचे आधिपत्य करत होती ॥७॥

 


 दारिते मत्स्यजठरे सा ददर्शातिशोभनम् ।
 कुमारं मन्मथतरोर्दग्धस्य प्रथमाङ्‍कुरम् ॥ ८ ॥

त्या मत्स्याचे पोट चिरताना त्यात एक अति सुन्दर बालक दिसला जो दग्ध झालेल्या कामवृक्षाचा प्रथम अंकुर होता ॥ ८॥

 

कोऽयं कथमयं मत्स्यजठरे प्रविवेशितः ।
इत्येवं कौतुपाविष्टां तन्वीं प्राहाथ नारदः ॥ ९ ॥

तेव्हा “हा कोण आहे आणि ह्या मत्स्याच्या पोटात कसा आला” अशा प्रकारे अत्यन्त आश्चर्यचकित झालेल्या त्या सुन्दरीला देवर्षि नारद येऊन म्हणाले --॥९॥

 


अयं समस्तजगतः स्थितिसंहारकारिणः ।
शम्बरेण हृतो विष्णोस्तनयः सूतिकागृहात् ॥ १० ॥
क्षिप्तःसमुद्रे मत्स्येन निगीर्णस्ते गृहं गतः ।
नररत्‍नमिदं सुभ्रु विस्रब्धा परिपालय ॥ ११ ॥

"हे सुन्दर भृकुटिवाली! हा सम्पूर्ण जगताची स्थिति आणि संहारकर्ता भगवान विष्णुचा पुत्र आहे; त्याला शम्बरासुराने सूतिकागृहातून पळविले आणि समुद्रात फेकून दिले होते. तिथे त्याला मत्स्याने गिळले आणि अशाप्रकारे हा इथे तुझ्या घरी आला. तू ह्या नररत्नाचे विश्वस्त होऊन पालन कर"॥ १०-११॥

 


 श्रीपराशर उवाच
 नारदेनैवमुक्ता सा पालयामास तं शिशुम् ।
 बाल्यादेवातिरागेण रूपातिशयमोहिता ॥ १२ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- नारदाने असे सांगितल्यावर मायावतीने त्या बालकाच्या सौंदर्याने मोहित होऊन बाल्यावस्थेपासूनच त्याचे अति अनुराग पूर्वक पालन केले ॥ १२ ॥

 

 

स यदा यौवनाभोगभूषितोऽभून्महामते ।
साभिलाषा तदा सापि बभूव गजगामिनि ॥ १३ ॥

हे महामते! जेव्हा तो नवयौवनाच्या समागमाने सुशोभित झाला तेव्हा ती गजगामिनी त्याच्या प्रति कामनायुक्त अनुराग प्रकट करू लागली ॥ १३ ॥

 


 मायावती ददौ तस्मै मायाः सर्वा महामुने ।
 प्रद्युम्नायानुरागान्धा तत्र्यस्तहृदयेक्षणा ॥ १४ ॥

हे महामुने! आपले हृदय आणि नेत्र प्रद्युम्नाला अर्पित केलेल्या त्या मायावतीने प्रेमात आंधळे होऊन त्याला सर्व प्रकारची माया शिकवली ॥ १४ ॥

 


प्रसाज्जन्तीं तु तां प्राह स कार्ष्णिः कमलेक्षणाम् ।
मातृत्वमपहायाद्य किमेवं वर्तसेऽन्यथा ॥ १५ ॥

अशा प्रकारे आपल्यावर आसक्त झालेल्या त्या कमललोचनेला कृष्णनंदन प्रद्युम्नाने म्हटले-"आज तु मातृभाव सोडून हा अन्य भाव का प्रकट करत आहेस ?" ॥ १५॥


 सा तस्मै कथयामासन पुत्रस्त्वं ममेति वै ।
 तनयं त्वामयं विष्णोर्हृतवान्कालशम्बरः ॥ १६ ॥
 क्षिप्तः समुद्रे मत्स्यस्य सम्प्राप्तो जठरान्मया ।
 सा हि रोदिति ते माता कान्ताद्याप्यतिवत्सला ॥ १७ ॥

तेव्हा मायावती म्हणाली-"तु माझा पुत्र नाहीस, तु भगवान विष्णुचा तनय आहेस. कालशम्बराने तुला पळवले आणि समुद्रात फेकून दिले होते; तु मला एका मत्स्याच्या उदरात मिळालास. हे कान्त ! तुझी पुत्रवत्सला जननी आजही रडत असेल" ॥ १६-१७ ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इत्युक्तः शम्बरं युद्धे प्रद्युम्नः स समाह्वयत् ।
 क्रोधाकुलीकृतमना युयुधे च महाबलः ॥ १८ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- मायावतीने असे म्हटल्यावर महाबलवान प्रद्युम्नाने क्रोधाने विह्वल होऊन शम्बरासुराला युद्धासाठी ललकारले आणि त्याच्याशी युद्ध करू लागला ॥ १८॥

 


 हत्वा सैन्यमशेषं तु तस्य दैत्यस्य यादवः ।
 सप्तमाया व्यतिक्रम्य मायां प्रयुयुजेऽष्टमीम् ॥ १९ ॥

यादव श्रेष्ठ प्रद्युम्नाने त्या दैत्याची सम्पूर्ण सेना मारून टाकली आणि त्याच्या सातही माया जिंकून स्वतः आठव्या मायेचा प्रयोग केला ॥ १९ ॥

 


तया जघान तं दैत्यं मायया कालशम्बरम् ।
उत्पत्त्य च तया सार्धमाजगाम पितुः पुरम् ॥ २० ॥

त्या मायेने दैत्यराज कालशम्बराला मारून टाकले आणि प्रद्युम्न मायावती सह [विमान द्वारा] उडून आकाशमार्गाने आपल्या पित्याच्या नगरात आला ॥ २० ॥

 


 अन्तःपुरे निपतितं मायावत्या समन्वितम् ।
 तं दृष्ट्‍वा कृष्णसंकल्पा बभूवुः कृष्णयोषितः ॥ २१ ॥

त्याला पाहून श्रीकृष्णाच्या राण्यांना तो कृष्णच आहे असं वाटलं ॥२१॥

 


रुक्मिणी साभवत्प्रेम्णा सास्रदृष्टिरनिन्दिता ।
धन्याया खल्वयं पुत्रो वर्तते नवयौवने ॥ २२ ॥

पण अनिन्दिता रुक्मिणीचे डोळे प्रेमवश अश्रुंनी भरून आले आणि ती म्हणाली "अवश्य हा कोणा भाग्यवतीचा पुत्र आहे व ह्यावेळी नवयौवनात स्थित आहे ॥ २२ ॥


 अस्मिन्वयसि पुत्रो मे प्रद्युम्नो यदि जीवति ।
 सभाग्या जननी वत्स सा त्वया का विभीषिता ॥ २३ ॥

जर माझा पुत्र प्रद्युम्न जिवंत असता तर तो ह्याच वयाचा असता. हे वत्सा! तू नीट सांग की तु कोणत्या भाग्यवती जननीला विभूषित केले आहेस? ॥ २३ ॥

 


 अथ वा यादृशः स्नेहो मम यादृग्वपुस्तव ।
 हरेरपत्यं सुव्यक्तं भवान्वत्स भविष्यति ॥ २४ ॥

अथवा, बेटा! माझ्या मनात तुझ्या बद्दल जी स्नेहभावना निर्माण होत आहे आणि जसे तुझे स्वरूप आहे त्यावरून मला असे वाटते की तू श्रीहरीचाच पुत्र आहेस " ॥ २४ ॥

 


 श्रीपराशर उवाच
 एतस्मिन्नन्तरे प्राप्तः सह कृष्णेन नारदः ।
 अन्तःपुरचरां देवीं रुक्मिणीं प्राह हर्षयन् ॥ २५ ॥

श्रीपराशर म्हणाले;- त्याचवेळी श्रीकृष्णा सोबत नारद तिथे आले. त्यांनी अन्तःपुर निवासिनी देवी रुक्मिणीला आनन्दित करत म्हटले -॥ २५ ॥


 एष ते तनयः सुभ्रु हत्वा शम्बरमागतः ।
 हृतो येनाभवद्‍बालो भवत्याः सूतिकागृहात् ॥ २६ ॥

"हे सुभ्रु! हा तुझाच पुत्र आहे. हा शम्बरासुराला मारून आला आहे, ज्याने ह्याचे बाल्यावस्थेत सूतिकागृहातून हरण केले होते ॥२६॥

 


इयं मायावती भार्या तनयस्यास्य ते सती ।
शम्बरस्य न भार्येयं श्रूयतामत्र कारणम् ॥ २७ ॥

ही सती मायावती सुद्धा तुझ्या पुत्राचीच स्त्री आहे; ही शम्बरासुराची पत्नी नाही. त्याचे कारण ऐक ॥२७॥

 


 मन्मथे तु गते नाशं तदुद्‍भवपरयणा ।
 शम्बरं मोहयामास मायारूपेण रूपिणी ॥ २८ ॥

पूर्वकाळी कामदेव भस्मसात झाल्यावर त्याच्या पुर्नजन्माची प्रतिक्षा करत हीने आपल्या मायामय रूपाने शम्बरासुराला मोहित केले होते ॥ २८ ॥

 


 विहाराद्युपभोगेषु रूपं मायामयं शुभम् ।
 दर्शयामास दैत्यस्य तस्येयं मदिरेक्षणा ॥ २९ ॥

ही मत्तविलोचना त्या दैत्याला विहारादि उपभोगांच्या वेळी आपले अति सुन्दर मायामय रूप दाखवायची ॥ २९॥

 


 कामोऽवतीर्णः पुत्रस्ते तस्येयं दयिता रतिः ।
 विशङ्‍का नात्र कर्तव्या स्नुषेयं तव शोभने ॥ ३० ॥

कामदेवानेच तुझ्या पुत्र रूपात जन्म घेतला आहे आणि ही सुन्दरी त्याची प्रिया रतिच. हे शोभने! ही तुझी पुत्रवधू आहे, ह्याविषयी तु कोणत्याच प्रकारची शंका बाळगू नकोस" ॥ ३० ॥

 


ततो हर्षसमाविष्टौ रुक्मिणीकेशवौ तदा ।
नगरी च समस्ता सा साधुसाध्वित्यभाषत ॥ ३१ ॥

हे ऐकून रुक्मिणी आणि कृष्णाला अतिशय आनन्द झाला तसेच समस्त द्वारकापुरी सुद्धा “छान छान” म्हणू लागली ॥ ३१ ॥


चिरं नष्टेन पुत्रेण सङ्‍गतां प्रेक्ष्य रुक्मिणीम् ।
अवाप विस्मयं सर्वो द्वारवत्यां तदा जनः ॥ ३२ ॥

त्यावेळी चिरकाळापासून हरवलेल्या पुत्रासह रुक्मिणीचा समागम झालेला पाहून द्वारकापुरी मधील सर्व नागरिकांना खूप आश्चर्य वाटले ॥ ३२ ॥

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे
अंशे सप्तविंशोध्यायः (२७)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, त्रिंश अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 30

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ त्रिंशोऽध्यायः ॥   "पारिजात-हरण"   श्रीपराशर उवाच गरुडो वारुणं छत्रं तथैव मणिपर...