गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, पंचम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 5

 

विष्णुपुराणम्

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ पञ्चमोऽध्यायः ॥

 

"पूतना-वध"


श्रीपराशर उवाच
 विमुक्तो वसुदेवोऽपि नन्दस्य शकटं गतः ।
 प्रहृष्टं दृष्टवान्नन्दं पुत्रो जातो ममेति वै ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- बन्दीगृहातून सुटताच वसुदेव नन्दच्या शकटाजवळ गेले तेव्हामाझ्या पुत्राचा जन्म झालाही बातमी कळल्याने त्यांना अत्यन्त प्रसन्न पाहीले



 वसुदेवोपि तं प्राह दिष्ट्यादिष्ट्येति सादरम् ।
 वार्धकेऽपि समुत्पन्नस्तनयोऽयं तवाधुना ॥ २ ॥

तेव्हा वसुदेवाने सुद्धा आदरपूर्वक म्हटले, आता वृद्धावस्थेतही तुम्ही आपल्या पुत्राचे मुख पाहीले ही मोठ्या सौभाग्याची गोष्ट आहे ॥२॥

 


 दत्तो हि वार्षिकःसर्वो भवद्‌‍भिर्नृपतेः करः ।
 यदर्थमागतास्तस्मान्नात्र स्थेयं महाधनैः ॥ ३ ॥

तुम्ही ज्यासाठी इथे आलेलात तो राजाचा सर्व वार्षिक कर देऊन झाला आहे. धनवान पुरुषांनी इथे जास्त वेळ थांबू नये ॥३॥

 

 

 यदर्थमागताः कार्यं तन्निष्पन्नं किमास्यते ।
 भवद्‌‍भिर्गम्यतां नन्द तच्छीघ्रं निजगोकुलम् ॥ ४ ॥

तुम्ही ज्यासाठी आलेलात ते कार्य पूर्ण झाले, तर आता आणखी का थांबला आहात ? म्हणून हे नन्दा ! तुम्ही शीघ्र आपल्या गोकुळात जा



 ममापि बालकस्तत्र रोहिणी प्रभवो हि यः ।
 स रक्षणीयो भवता यथायं तनयो निजः ॥ ५ ॥

तिथे रोहिणीपासून उत्पन्न झालेला माझा पुत्र आहे त्याचेसुद्धा आपल्या ह्या बालका सारखेच रक्षण करा॥


 इत्युक्ताः प्रययुर्गोपा नन्दगोपपुरोगमाः ।
 शकटारोपितैर्भाण्डैः करं दत्त्वा महाबलाः ॥ ६ ॥

वसुदेवाने असे सांगितल्यावर नन्द आदि महा बलवान गोपगण शकटातील भांड्यामधून आणलेला कर भरून निघून गेले ॥ ६ ॥
 वसतां गोकुले तेषां पूतना बालघातिनी ।
 सुप्तं कृष्णमुपादाय रात्रौ तस्मै स्तनं ददौ ॥ ७ ॥

ते गोकुळात असताना बालघाती पूतनाने रात्रीच्या वेळी झोपलेल्या कृष्णाला मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला ॥७॥

 

 

यस्मै यस्मै स्तनं रात्रौ पूतना सम्प्रयच्छति ।
तस्यतस्य क्षणेनाङ्‍गं बालकस्योपहन्यते ॥ ८ ॥

पूतना ज्या-ज्या बाळाच्या तोंडात आपला स्तन द्यायची त्याचे शरीर तत्काळ नष्ट होत असे ८॥

 


 कृष्णस्तु तत्स्तनं गाढं कराभ्यामतिपीडितम् ।
 गृहीत्वा प्राणसहितं पपौक्रोधसमन्वितः ॥ ९ ॥

कृष्णचन्द्राने क्रोधपूर्वक तिचा स्तन आपल्या हातांनी खूप दाबून पकडला आणि तिच्या प्राणांसहित पीऊ लागला ॥९॥

 


 सातिमुक्तमहारावा विच्छिन्नस्‍नायुबन्धना ।
 पपात पूतना भूमौ म्रियमाणातिभीषणा ॥ १० ॥

तेव्हा स्नायुबन्ध शिथिल झाल्याने भयंकर आवाज करत पूतना मरतेवेळी महाभयङ्कर रूप धारण करूत पृथ्वीवर पडली १०॥

 


 तन्नादश्रुतिसन्त्रस्ताः प्रबुद्धास्ते व्रजौकसः ।
 ददृशुः पूतनोत्सङ्‍गे कृष्णं तां च निपातिताम् ॥ ११ ॥

तिचा घोर नादाने ऐकून भयभीत झालेले व्रजवासी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहीले की कृष्ण पूतनेच्या मांडीवर आहे आणि ती मरून पडली आहे ११॥



 आदाय कृष्णं सन्त्रस्ता यशोदापि द्विजोत्तम ।
 गोपुच्छभ्रामणेनाथ बालदोषमपाकरोत् ॥ १२ ॥

हे द्विजोत्तमा ! तेव्हा भयभीत माता यशोदेने कृष्णाला मांडीवर घेऊन त्याला गाईच्या शेपटीने झाडले आणि त्याचे ग्रह-दोष निवारण केले १२



 गोपुरीषमुपादाय नन्दगोपोऽपि मस्तके ।
 कृष्णस्य प्रददो रक्षां कुर्वंश्चैतदुदीरयन् ॥ १३ ॥

नन्दगोपाने सुद्धा विधिपूर्वक रक्षा करण्यासाठी कृष्णाच्या मस्तकावर शेणाचे चूर्ण लावले आणि म्हटले १३


 नन्दगोप उवाच
 रक्षतु त्वामशेषाणां भूतानां प्रभवो हरिः ।
 यस्य नाभिसमुद्‍भूतपङ्‍कजादभवज्जगत् ॥ १४ ॥

नन्दगोप म्हणाले;- ज्याच्या नाभितून प्रकट झालेल्या कमळापासून सम्पूर्ण जगत उत्पन्न झाले आहे ते समस्त भूतांचे आदिस्थान श्रीहरि तुझी रक्षा करो १४


 येन दंष्ट्राग्रविधृता धारयत्यवनिर्जगत् ।
 वराहरूपधृग्देवःस त्वां रक्षतु केशवः ॥ १५ ॥

ज्यांच्या दाढांच्या अग्रभागावर स्थापित होऊन भूमि सम्पूर्ण जगत धारण करते ते वराह-रूपधारी श्रीकेशव तुझी रक्षा करो १५

 

 

नखाङ्‍कुरविनिर्भिन्नवैरिवक्षस्थलो विभुः ।
नृसिंहरूपी सर्वत्र रक्षतु त्वां जनार्दनः ॥ १६ ॥

ज्या विभुने आपल्या नखाग्रांनी शत्रूचे वक्षःस्थल विदीर्ण केले होते ते नृसिंहरूपी जनार्दन तुझी सर्वत्र रक्षा करो ॥१६॥

 


 वामनो रक्षतु सदा भवन्तं यः क्षणादभूत् ।
 त्रिविक्रमः क्रमाक्रान्तत्रैलोक्यः स्फुरदायुधः ॥ १७ ॥

ज्यांनी क्षणमात्रात सशस्त्र त्रिविक्रमरूप धारण करून आपल्या तीन पावलांनी त्रेलोक्याला मापले होते ते वामन भगवान तुझी सर्वदा रक्षा करो १७

 


 शिरस्ते पातु गोविन्दः कण्ठं रक्षतु केशवः ।
 गुह्यं च जठरं विष्णुर्जङ्‍घे पादौ जनार्दनः ॥ १८ ॥

गोविन्द तुझ्या मस्तकाची, केशव कण्ठाची, विष्णु गुह्यस्थान आणि जठराची तसेच जनार्दन जांघ आणि चरणांची रक्षा करो १८॥


 मुखं बाहू प्रबाहू च मनः सर्वेद्रियाणि च ।
 रक्षत्वव्याहतैश्‍वर्यस्तव नारायणोऽव्ययः ॥ १९ ॥

तुझे मुख, बाहु, प्रबाहु, मन आणि सम्पूर्ण इन्द्रियांची अखण्ड ऐश्वर्यसम्पन्न अविनाशी श्रीनारायण रक्षा करो १९

 

 

 शार्ङ्‍गचक्रगदापाणेः शङ्‍खनादहताः क्षयम् ।
 गच्छन्तु प्रेतकूष्माण्डराक्षसा ये तवाहिताः ॥ २० ॥

तुझे अनिष्ट करणारे जे प्रेत, कूष्माण्ड आणि राक्षस आहेत ते शार्ङ्गधनुष, चक्र आणि गदा धारण करणार्‍या विष्णुच्या शंख-ध्वनिने नष्ट होवोत २०


 त्वां पातु दिक्षु वैकुण्ठो विदिक्षु मधुसूदनः ।
 हृषीकेशोऽम्बरे भूमौ रक्षतु त्वां महीधरः ॥ २१ ॥

भगवान वैकुण्ठ दिशांना, मधुसूदन विदिशांना, हृषीकेश आकाशात तथा पृथ्वी धारण करणारे श्रीशेष पृथ्वीवर तुझी रक्षा करो ॥२१॥



 श्रीपराशर उवाच
 एवं कृतस्वस्त्ययनो नन्दगोपेन बालकः ।
 शायितः शकटस्याधो बालपर्यङ्‌‍किकातले ॥ २२ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- अशा प्रकारे स्वस्तिवाचन करून नन्दगोपाने कृष्णाला शकटाखाली एका खाटेवर झोपवले २२

 

 ते च गोपा महद्दृष्ट्‍वा पूतनायाः कलेवरम् ।
 मृतायाः परमं त्रासं विस्मयं च तदा ययुः ॥ २३ ॥

मेलेल्या पूतनाचे महान कलेवर पाहून ते सर्वच गोप अतिशय भयभीत आणि विस्मित झाले २३


 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे
पञ्चमोऽध्यायः (५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमो ऽध्यायः ॥   "कालिया-दमन"   श्रीपराशर उवाच   एकदा तु विना रामं कृष्णो वृन...