॥ विष्णुपुराणम्
॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ षष्ठोऽध्यायः
॥
“शकटभज्जन, यमलार्जुन-उद्धार, ब्रिजवासींचे गोकुळातून वृन्दावनात जाणे आणि वर्षा-वर्णन"
श्रीपराशर उवाच
कदाचिच्छकटस्याधः
शयानो मधुसूदनः ।
चिक्षेप
चरणावूर्ध्वं स्तन्यार्थी प्ररुरोद ह ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- एके दिवशी छकड्याखाली झोपलेल्या मधुसूदनाने दूधासाठी रडताना वर लाथ मारली ॥ १ ॥
तस्य
पादप्रहारेण शकटं परिवर्तितम् ।
विध्वस्तकुम्भभाण्डं
तद्विपरीतं पपात वै ॥ २ ॥
लाथेमुळे छकड़ा उलटा होऊन त्यात ठेवलेली भांडी मडकी फुटली आणि तो उलटा पडला ॥२॥
ततो
हाहाकृतः सर्वो गोपरोपीजनो द्विज ।
आजगामाथ
ददृशे बालमुत्तानशायिनम् ॥ ३ ॥
हे द्विजा ! तेव्हा हाहाकार झाला, समस्त गोप-गोपी गण तिथे आले आणि त्या बाळाला उलटे झोपलेले पाहीले ॥ ३ ॥
गोपाः
केनेति केनेदं शकटं परिवर्तितम् ।
तत्रैव
बालकाः प्रोचुर्बालेनानेन पातितम् ॥ ४ ॥
गोपीगण विचारू लागले की 'हा छकडा कोणी उलटवला ? तेव्हा खेळणार्या मुलांनी सांगितले-"हा कृष्णानेच उलटवला आहे ॥ ४ ॥
रुदता
दृष्टमस्माभिः पादविक्षेपपातितम् ।
शकटं
परिवृत्तं वै नैतदन्यस्य चेष्टितम् ॥ ५ ॥
आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहीले की रडताना त्याची लाथ लागूनच हा छकड़ा उलटा झाला. हे आणखी कोणाचेही काम नाही"॥ ५ ॥
ततः
पुनरतीवासन्गोपा विस्मयचेतसः ।
नन्दगोपोपि
जग्राह बालमत्यन्तविस्मितः ॥ ६ ॥
हे ऐकून गोपी अत्यन्त विस्मित झाले आणि नन्दगोपाने अत्यन्त चकित होऊन बाळाला उचलून घेतले ॥६॥
यशोदा
शकटारूढभग्नभाण्डकपालिका ।
शकटं
चार्चयामास दधिपुष्पफलाक्षतैः ॥ ७ ॥
मग यशोदेने सुद्धा छकड्यात ठेवलेल्या फुटलेल्या भांड्यांच्या तुकड्यांची आणि त्या छकड्याची दही, पुष्प, अक्षता आणि फळादिंनी पूजा केली ॥७ ॥
गर्गश्च
गोकुले तत्र वसुदेवप्रचोदितः ।
प्रच्छन्न
एव गोपानां संस्कारानकरोत्तयोः ॥ ८ ॥
ह्यावेळी वसुदेवाच्या सांगण्यावरून गर्गाचार्यांनी गोपींच्या नकळत गोकुळात येऊन त्या दोन्ही बालकांचे द्विजोचित संस्कार केले ॥ ८॥
ज्येष्ठं
च राममित्याह कृष्णं चैव तथावरम् ।
गर्गो
मतिमतां श्रेष्ठो नाम कुर्वन्महामतिः ॥ ९ ॥
त्या दोघांचा नामकरण संस्कार करताना महामति गर्गांनी मोठ्याचे नाव राम आणि छोट्याचे कृष्ण असे सांगितले ॥९॥
स्वल्पेनैव
तु कालेन रिङ्गिणौ तौ तदा व्रजे ।
घृष्टजानुकरौ
विप्र बभूवतुरुभावपि ॥ १० ॥
हे विप्रा ! ते दोन्ही बालक थोड्याच दिवसात हातापायांवर रांगत रांगत गाईंच्या गोठ्यात जाऊ लागले ॥ १० ॥
करीषभस्मदिग्धाङ्गौ
भ्रममाणावितस्ततः ।
न निवारयितुं
सेहे यशोदा तौ न रोहिणी ॥ ११ ॥
शेण आणि मातीने भरलेल्या शरीराने इथे तिथे फिरणार्या त्या बालकांना यशोदा आणि रोहिणीला अडवू शकत नव्हत्या ।। ११ ।।
गोवाटमध्ये क्रीडन्तौ वत्सवाटं गतौ पुनः ।
तदहर्जातगोवत्सपुच्छाकर्षणतत्परौ ॥ १२ ॥
कधी ते गाईंच्या घोळक्यात खेळायचे तर कधी वासरांमध्ये जायचे तर कधीकधी त्याच दिवशी जन्मलेल्या वासरांची शेपूट ओढून खेचायचे ॥ १२ ॥
यदा
यशोदा तौ बालावेकस्थानचरावुभौ ।
शशाक
नो वारयितुं क्रीडन्तावतिचञ्चलौ ॥ १३ ॥
दाम्ना
मध्ये ततो बद्ध्वा बबन्ध तमुलूखले ।
कृष्णमक्लिष्टकर्माणमाह
चेदममर्षिता ॥ १४ ॥
एक दिवस जेव्हा यशोदा, त्या अतिशय चंचल बाळांना रोखू शकली नाही तेव्हा तिने निरागस कृष्णाच्या कमरेला दोरी बांधून त्याला उखळाला बांधले आणि रागाने म्हणाली -॥ १३-१४ ॥
यदि
शक्नोषि गच्छ त्वमतिचञ्चलचेष्टित ।
इत्युक्त्वाथ
निजं कर्म सा चकार कुटुम्बिनी ॥ १५ ॥
“अरे मस्तीखोरा ! आता तुझ्यात ताकद असेल तर जाऊन दाखव.” असे म्हणून यशोदा आपल्या घरच्या कामात मग्न झाली ॥ १५ ॥
व्याग्रायामथ तस्यां स कर्षमाम उलूखलम् ।
यमलार्जुनमध्येन जगाम कमलेक्षणः ॥ १६ ॥
ती घरकामाला लागल्यावर कमल नयन कृष्ण ऊखळ खेचत खेचत यमलार्जुनच्या मध्ये गेला ॥ १६॥
कर्षता
वृक्षयोर्मध्ये तिर्यग्गतमुलूखलम् ।
भग्नावुत्तुङ्गशाखाग्रौ
तेन तौ यमलार्जुनौ ॥ १७ ॥
आणि त्या दोन्ही वृक्षांमध्ये तिरकी पडलेली उखळ खेचत उंच फांद्या असलेले यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष उखडले ॥ १७ ॥
ततः
कटकटाशब्दसमाकर्णनतत्परः ।
आजगाम
व्रजजनो ददर्श च महाद्रुमौ ॥ १८ ॥
नवोद्गताल्पदन्तांशुसितहासं
च बालकम् ।
तयोर्मध्यगतं
दाम्ना बद्धं गाढं तथोदरे ॥ १९ ॥
ततश्च
तामोदरतां स ययौ दामबन्धनात् ॥ २० ॥
तेव्हा त्यांच्या मोडण्याचा कट-कट आवाज ऐकून ब्रिजवासी तिथे धावत आले आणि त्या दोन्ही महावृक्षांना तसेच त्यांच्या मधोमध कमरेला करकचून दोरी बांधलेल्या बाळाला आपल्या चिमुकल्या शुभ्र दातांनी शुभ्र हसताना पाहीले. तेव्हापासून दोरीने बांधले गेल्याने त्यांचे नाव दामोदर पडले ॥ १८-२०॥
गोपवृद्धास्ततः
सर्वे नन्दगोपपुरोगमाः ।
मन्त्रयामासुरुद्विग्ना
महोत्पातातिभीरवः ॥ २१ ॥
तेव्हा नन्दगोप आदि समस्त वृद्ध गोपींनी महान् उत्पातांमुळे अत्यन्त भयभीत होऊन आपसात ठरवले की- ॥ २१ ॥
स्थानेनेह
न नः कार्यं व्रजामोन्यन्महावनम् ।
उत्पाता
बहवो ह्यत्र दृश्यन्ते नाशहेतवः ॥ २२ ॥
पूतनाया
विनाशश्च शकटस्य विपर्ययः ।
विना
वातादिदोषेण द्रुमयोः पतनं तथा ॥ २३ ॥
'आता ह्या ठिकाणी राहण्यात काही अर्थ नाही, आपण दुसर्या एखाद्या महावनात जायला हवे. कारण इथे पूतना-वध, छकडा उलटणे तसेच वादळ किंवा अन्य कोणत्याही कारणाशिवाय वृक्ष पडणे इत्यादि अनेक उपद्रवी उत्पात अनुभवायला मिळत आहेत ॥ २२-२३ ॥
वृन्दावनमितः
स्थानात्तस्माद्गच्छाम मा चिरम् ।
यावद्भौममहोत्पातदोषो
नाभिभवेद्व्रजम् ॥ २४ ॥
म्हणून जोवर भूमि सम्बन्धी एखादा महान् उत्पात ब्रजभूमीला नष्ट करत नाही तोवर आपण सर्व त्वरित इथून वृन्दावनाला जाऊया ॥ २४ ॥
इति
कृत्वा मतिं सर्वे गमने ते व्रजौकसः ।
ऊचुः
स्वं स्वं कुलं शीघ्रं गम्यतां मा विलम्बथ ॥ २५ ॥
अशा प्रकारे ते सर्व ब्रिजवासी जाण्याचा विचार करून आपापल्या कुटुम्बातील लोकांना लवकर चला, उशीर करू नका असे म्हणू लागले ॥ २५ ॥
ततः
क्षणेन प्रययुः शकटैर्गोधनैस्तथा ।
यूथशो
वत्सपालाश्च कालयन्तो व्रजौकसः ॥ २६ ॥
तेव्हा ते ब्रिजवासी वत्सपाल दल बांधून एकाच क्षणात छकडे आणि गाईंसोबत त्यांना हाकत तिथून निघाले ॥ २६ ॥
द्रव्यावयवनिर्धूतं
क्षणमात्रेण तत्तथा ।
काकभाससमाकीर्णं
व्रजस्थानमभूद्द्विज ॥ २७ ॥
हे द्विजा! वस्तुंच्या अवशिष्टांशांनी युक्त ती ब्रजभूमि क्षणभरातच कावळे व भास आदि पक्ष्यांनी भरून गेली ॥ २७ ॥
वृन्दावनं
भगवता कृष्णेना क्लिष्टकर्मणा ।
शुभेन
मनसा ध्यातं गवं सिद्धिमभीप्सता ॥ २८ ॥
तेव्हा लीलाधारी कृष्णाने गाईंच्या अभिवृद्धिसाठी आपल्या शुद्धचित्ताने वृन्दावनाचे चिन्तन केले ॥२८॥
ततस्तत्रातिरूक्षेऽपि
घर्मकाले द्विजोत्तम ।
प्रावृट्काल
इवोद्भूतं नवशष्पं समन्ततः ॥ २९ ॥
त्यामुळे हे द्विजोत्तमा ! अत्यन्त रूक्ष ग्रीष्म काळातही तिथे वर्षा ऋतु सारखे सगळीकडे कोवळे गवत उत्पन्न झाले ॥ २९ ॥
स समावासितः
सर्वो व्रजो वृन्दावने ततः ।
शकटावाटपर्यन्तश्चन्द्रार्धाकारसंस्थितः
॥ ३० ॥
तेव्हा ते ब्रज चारही बाजूंनी अर्ध चन्द्राकार छकडे लावून स्थित झाले आणि ब्रिजवासी तिथे राहू लागले ॥ ३० ॥
वत्सपालौ
च संवृत्तौ रामदामोदरौ ततः ।
एक स्थनस्थितौ
गोष्ठे चेरतुर्बाललीलया ॥ ३१ ॥
त्यानन्तर राम आणि कृष्णसुद्धा वासरे राखू लागले आणि एकाच ठिकाणी राहून गोठ्यात बाललीला करू लागले ॥ ३१ ॥
बर्हिपत्रकृतापीडौ
वन्यपुष्पावतंसकौ ।
गोपवेणुकृतातोद्यपत्रवाद्यकृतस्वनौ
॥ ३२ ॥ काकपक्षधरौ
बालौ कुमाराविव पावकी ।
हसन्तौ
च रमन्तौ च चेरतुः स्म महावनम् ॥ ३३ ॥
ते काक पक्षधारी दोन्ही बालक डोक्यावर मोरपिसाचा मुकुट धारण करून तसेच वन्यपुष्पांची कर्णभूषणे घालून ग्वालोचित बासरी आदि सर्व प्रकारचे वाद्यध्वनी करत तसेट पर्णवाद्यांनी नाना प्रकारे ध्वनि करत, हसत खेळत त्या महावनात फिरू लागले ॥ ३२-३३ ॥
क्वचिद्वहन्तावन्योन्यं
क्रीडमानौ तथा परैः ।
गोपपुत्रैः समं वत्सांश्चारयन्तौ विचेरतुः ॥ ३४ ॥
कधी खेळताना एक दुसर्यारा आपल्या पाठीवर घेवून जायचे तर कधी अन्य ग्वालबालांसह वासरांना चारत त्यांच्यासोबत फिरायचे ॥ ३४ ॥
कालेन
गच्छता तौ तु सप्तवर्षौ महाव्रजे ।
सर्वस्य
जगतः पालौ वत्सपालौ बभूवतुः ॥ ३५ ॥
अशाप्रकारे त्या महाव्रजात राहात असताना निखिललोक पालक वत्सपाल सात वर्षांचे झाले ॥ ३५ ॥
प्रावृट्कालस्ततोऽतीव
मेघौघस्थगिताम्बरः ।
बभूव
वारिधाराभिरैक्यं कुर्वन्दिशामिव ॥ ३६ ॥
तेव्हा मेघसमूहांनी आकाश आच्छादित करणारा व जलधारांनी दिशा एकरूप करणारा पावसाळा आला ॥ ३६ ॥
प्ररूढनवशष्पाढ्या
शक्रगोपाचिता मही ।
तथा
मारकतीवासीत्पद्मरागविभूषिता ॥ ३७ ॥
त्यावेळी नवीन गवत वाढल्याने पृथ्वी पद्मरागविभूषिता पाचूसारखी हिरवीगार दिसू लागली ॥३७॥
ऊहुरुन्मार्गवाहीनि निम्नगाम्भांसि
सर्वतः ।
मनांसि दुर्विनीतानां प्राप्य लक्ष्मीं नवामिव ॥ ३८ ॥
नवीन धन मिळाल्यावर दुष्ट पुरुषांचे चित्त जसे चंचल होते त्याचप्रमाणे नदीचे जल सगळीकडे आपला निर्दिष्ट मार्ग सोडून वाहू लागले ॥ ३८ ॥
न रेजेऽन्तरितश्चन्द्रो
निर्मलो मलिनैर्घनैः ।
सद्वादिवादो
मूर्खणां प्रगल्भाभिरिवोक्तिभिः ॥ ३९ ॥
मूर्ख माणसाच्या उद्धट बोलण्यापुढे जशी चांगल्या वक्त्याची वाणी सुद्धा मलिन होते तशसेच मलिन मेघांनी आच्छादित राहिल्याने निर्मळ चन्द्र शोभाहीन दिसू लागला ॥ ३९ ॥
निर्गुणेनापि
चापेन शक्रस्य गगने पदम् ।
अवाप्यताविवेकस्य
नृपस्यैव परिग्रहे ॥ ४० ॥
विवेकहीन राजाच्या संगतीत जसा गुणहीन माणूस सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त करतो तसेच आकाशमंडळात गुणरहित इंद्रधनुष स्थित झाले ॥ ४० ॥
मेघपृष्ठे
बलाकानां रराज विमला ततिः ।
दुर्वत्ते
वृत्तचेष्टेव कुलीनस्यातिशोभना ॥ ४१ ॥
दुराचारी पुरुषात कुलीन पुरुषाची निष्कपट शुभचेष्टा दिसावी तशी मेघमंडळात बगळ्यांची निर्मळ पंक्ति सुशोभित होऊ लागते ॥ ४१ ॥
न बबन्धाम्बरे
स्थैर्यं विद्युदत्यन्तचञ्चला ।
मैत्रीव
प्रवरे पुंसि दुर्जनेन प्रयोजिता ॥ ४२ ॥
श्रेष्ठ पुरुषांसोबत दुर्जनांची मैत्री असावी तशी अत्यन्त चंचल वीज आकाशात स्थीर राहात नव्हती ॥ ४२ ॥
मार्गा
बभूवुरस्पष्टास्तृणशष्पचयावृताः ।
अर्थान्तरमनुप्राप्ताः
प्रजडानामिवोक्तयः ॥ ४३ ॥
महामूर्ख माणसांच्या जडवाक्यांसारखे मार्गातील तृण आणि दूबसमूह आच्छादित होऊन अस्पष्ट झाले ॥ ४३ ॥
उन्मत्तशिखिसारङ्गे
तस्मिन्काले महावने ।
कृष्णरामौ
मुदायुक्तौ गोपालैश्चेरतुः सह ॥ ४४ ॥
त्यावेळी उन्मत्त मयूर आणि चातकगणांनी सुशोभित महावनात कृष्ण आणि राम प्रसन्नतेने गोपीकुमारांसह भटकू लागले ॥ ४४ ॥
क्वचिद्गोभिः
समं रम्यं गेयतानरतावुभौ ।
चेरतुः
क्वचिदत्यर्थं शीतवृक्षतलाश्रितौ ॥ ४५ ॥
ते दोघं कधी गाईंसोबत मनोहर गाण म्हणत तान छेडायचे तर कधी अत्यन्त शीतल वृक्षातळी आश्रय घेत भटकायचे ॥ ४५ ॥
क्वचित्कदम्बस्रक्चित्रौ
मयूरस्रग्विराजितौ ।
विलिप्तौ
क्वचिदासातां विविधैर्गिरिधातुभिः ॥ ४६ ॥
कधी ते कदम्ब पुष्पांच्या हारांनी विचित्र वेष बनवायचे तर कधी, मोरपिसांच्या माळांनी सुशोभित व्हायचे आणि कधी नाना प्रकारच्या पर्वतीय धातुंचा आपल्या शरीराला लेप लावायचे ।। ४६ ॥
पर्णशय्यासु
संसुप्तौ क्वचिन्निद्रान्तरैषिणौ ।
क्वचिद्गर्जति
जीमूते हाहाकाररवाकुलौ ॥ ४७ ॥
कधी थोडीशी डुलकी काढण्यासाठी पानांच्या शय्येवर आडवे व्हायचे तर कधी मेघ गर्जना
ऐकून 'हा हा' करत गदारोळ माजवायचे ॥ ४७ ॥
गायतामन्यगोपानां
प्रशंसापरमौ क्वचित् ।
मयूरकेकानुगतौ
गोपवेणुप्रवादकौ ॥ ४८ ॥
कधी दोघेही दूसर्या गोपींच्या गाण्याची प्रशंसा करायचे तर कधी गवळ्यांसारखी बासरी वाजवत मोरांच्या आवाजाची नक्कल करायचे ॥ ४८ ॥
इति नानाविधैर्भावैरुत्तमप्रीतिसंयुतौ
।
क्रीडन्तौ तौ वने तस्मिञ्चेरतुस्तुष्टमानसौ ॥ ४९ ॥
अशाप्रकारे ते दोघेही त्या वनात अत्यन्त प्रेमाने प्रसन्नचित्ताने नानाप्रकारे आपापसात खेळत असत ॥ ४९ ॥
विकाले च समं गोभिर्गोपवृन्दसमन्वितौ ।
विहृत्याथ यथायोगं व्रजमेत्य महाबलौ ॥ ५० ॥
संध्याकाळी ते महाबली बालक वनात यथायोग्य विहार केल्यानंतर गाई व ग्वालबाळांसह ब्रजात परत येत असत ॥ ५० ॥
गोपैः
समानैः सहितौ क्रीडन्तावमराविव ।
एवं
तावूषतुस्तत्र रामकृष्णौ महाद्युती ॥ ५१ ॥
अशाप्रकारे आपल्या समवयस्क गोपगणांसह देवतांसारख्या क्रीडा करत ते महातेजस्वी राम व कृष्ण तिथे राहू लागले ॥ ५१ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे षष्ठोऽध्यायः (६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा