शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, चतुर्थ अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 4

 

विष्णुपुराणम्

॥ पञ्चमः अंशः ॥ चतुर्थोऽध्यायः ॥

 

"वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका"

श्रीपराशर उवाच
 कंसस्ततोद्विग्नमनाः प्राह सर्वान्महासुरान् ।
 प्रलम्बकेशिप्रमुखानाहूयासुरपुङ्‍गवान् ॥ १ ॥

  श्रीपराशर म्हणाले ;- तेव्हा कंसाने खिन्न चित्ताने प्रलम्ब आणि केशी आदि समस्त मुख्य-मुख्य असुरांना बोलावून सांगितले ॥१॥


 कंस उवाच
 हे प्रलम्ब महाबाहो केशिन् धेनुक पूतने ।
 अरिष्टाद्यास्तथैवान्ये श्रूयतां वचनं मम ॥ २ ॥

कंस म्हणाला ;- हे प्रलम्बा ! हे महाबाहो केशिन ! हे धेनुका ! हे पूतने ! तथा हे अरिष्ट आदि अन्य असुरगण ! माझे बोलणे ऐका ॥२॥



 मां हन्तुममरैर्यत्‍नः कृतः किल दुरात्मभिः ।
 मद्वीर्यतापितान्वीरो न त्वेतान्गणयाम्यहम् ॥ ३ ॥

ही गोष्ट प्रसिद्ध झाली आहे की दुरात्मा देवतांनी मला मारण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे ; पण माझ्यासारखा वीर पुरुष माझ्या वीरतेमुळे त्रासलेल्या ह्या लोकांची पर्वा करत नाही॥३ ॥


 किमिन्द्रेणाल्पवीर्येण किं हरेणैकचारिणा ।
 हरिणा वापि किं साध्यं छिद्रेष्वसुरघातिना ॥ ४ ॥

अल्पवीर्य इन्द्र, एकटाच भटकणारा महादेव किंवा असावधान असलेल्या दैत्यांना शोधून त्यांचा वध करणारा विष्णु कोणते कार्य सिद्ध करू शकतात? ॥ ४ ॥


 किमादित्यैः किं वसुभिरल्पवीर्यैः किमग्निभिः ।
 किंवान्यैरमरैः सर्वैर्मद्‍बाहुबलनिर्जितैः ॥ ५ ॥

माझे बाहुबळच इतके आहे की दलित आदित्य, अल्पवीर्य वसुगण, अग्नी अथवा अन्य समस्त देवतांमुळे माझे काय अनिष्ट होऊ शकणार आहे ? ॥५॥


 किं न दृष्टोमरपतिर्मया संयुगमेत्य सः ।
 पृष्ठेनैव वहन्बाणानपगच्छन्न वक्षसा ॥ ६ ॥

तुम्ही सर्वांनी पाहिले ना की माझ्या बरोबर युद्ध भूमिवर येऊन देवराज इन्द्र, छातीवर नाही तर पाठीवर बाणांचा वर्षाव सहन करत पळून गेला होता ॥६॥

 

मद्‌राष्ट्रे वारिता वृष्टिर्यदा शक्रेण किं तदा ।
मद्‍बाणभिन्नैर्जलदैर्नापो मुक्ता यथेप्सिताः ॥ ७ ॥

जेव्हा इन्द्राने माझ्या राज्यात पाऊस पाडणे बंद केले होते तेव्हा मेघांनी माझ्या बाणांच्या वर्षावामुळे यथेष्ट जलवर्षाव केलेला ना? ॥ ७॥

 


 किमुर्व्यामवनीपाला मद्‍बाहुबलभीरवः ।
 ते सर्वे सन्नतिं याता जरासन्धमृते गुरम् ॥ ८ ॥

माझे गुरु म्हणजेच सासरे जरासंध ह्यांना सोडून पृथ्वीवरील इतर सर्व राजे माझ्या बळामुळे भयभीत होऊन माझ्यासमोर मस्तक झुकवत नाहीत का? ॥८॥

 


 अमरेषु ममावज्ञा जायते दैत्यपुङ्‍गवाः ।
 हास्यं मे जायते वीरास्तेषु यत्‍नपरेष्वपि ॥ ९ ॥

हे दैत्य श्रेष्ठगणांनो ! देवतां कडून माझी अवहेलना होत आहे आणि हे वीरगणांनो! त्यांना माझ्या वधाचा प्रयत्न करताना पाहून तर मला हसू येत आहे ॥९॥

 


 तथापि खलु दुष्टानां तेषामप्यधिकं मया ।
 अपकाराय दैत्येन्द्रा यतनीयं दुरात्मनाम् ॥ १० ॥

तथापि हे दैत्येन्द्रा! त्या दुष्ट आणि दुरात्मांसाठी मला आणखी अधिक प्रयत्न करायला हवा ।। १०॥

 

तद्ये यशस्विनः केचित्पृथिव्यां ये च याजकाः ।
कार्यो देवापकाराय तेषां सर्वात्मना वधः ॥ ११ ॥

म्हणून देवतांचे अपकार करण्यासाठी पृथ्वीवर जे कोणी यशस्वी आणि यज्ञकर्ता असतील त्या सर्वांचा वध करायला हवा चाहिये ॥११॥

 

 उत्पन्नश्चापि मे मृत्युर्भूतपूर्वः स वै किल ।
 इत्येतद्दारिका प्राह देवकीगर्भसम्भवा ॥ १२ ॥

देवकीच्या गर्भातून उत्पन्न झालेल्या बालिकेने असेही म्हटले आहे की, माझा तो भूतपूर्व (पुर्वजन्मीचा) काळ निश्चितच उत्पन्न झालेला आहे ॥ १२ ॥

 


 तस्माद्‍बालेषु च परो यत्‍नः कार्यो महीतले ।
 यत्रोद्रिक्तं बलं बाले स हन्तव्यः प्रयत्‍नतः ॥ १३ ॥

म्हणून ह्यावेळी पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या बालकांविषयी विशेष सावधानी बाळगायला हवी आणि ज्या बालकात विशेष बळाचा उद्रेक असेल त्याला प्रयत्नपूर्वक मारून टाकले पाहिजे ॥ १३ ॥


 इत्याज्ञाप्यासुरान्कंसः प्रविश्याशु गृहं ततः ।
 मुमोच वसुदेवं च देवकीं च निरोधतः ॥ १४ ॥

असुरांना अशी आज्ञा देऊन कंसाने कारागृहात जाऊन लगेच वसुदेव आणि देवकीला बन्धनातून मुक्त केले ॥ १४ ॥



कंस उवाच
युवयोर्घातिता गर्भा वृथैवैते मयाधुना ।
कोप्यन्य एव नाशाय बालो मम समुद्‌गतः ॥ १५ ॥

कंस म्हणाला;- मी आतापर्यंत तुम्हा दोघांच्या बालकांची उगाचच हत्या केली, माझा नाश करण्यासाठी तर कोणी दुसराच बालक उत्पन्न झाला आहे ॥ १५ ॥


 तदलं परितापेन नुनं तद्‍भाविनो हि ते ।
 अर्भका युवयोर्देषाच्चायुषो यद्वियोजिताः ॥ १६ ॥

पण तुम्ही ह्याचे दुःखी होऊ नका कारण त्या बालकांचे नशीबच तसे होते. तुमच्या प्रारब्ध-दोषामुळेच त्या बालकांना आपले आयुष्य गमवावे लागले ॥ १६॥


 श्रीपराशर उवाच
 इत्याश्वास्य विमुक्त्वा च कंसस्तौ परिशङ्‌‍कितः ।
 अन्तर्गृहं द्विजश्रेष्ठ प्रविवेश ततः स्वकम् ॥ १७ ॥

श्रीपराशर म्हणाले;- हे द्विजश्रेठा! अशा प्रकारे त्यांना धीर देऊन आणि बन्धनातून मुक्त करून कंसाने शंकित मनाने अन्तःपुरात प्रवेश केला ॥ १७ ॥



 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे
चतुर्थोऽध्यायः (४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमो ऽध्यायः ॥   "कालिया-दमन"   श्रीपराशर उवाच   एकदा तु विना रामं कृष्णो वृन...