॥ विष्णुपुराणम् ॥
॥
पञ्चमः अंशः ॥ ॥ तृतीयोऽध्यायः ॥
"भगवंताचा
आविर्भाव आणि योगमायाद्वारा कंसाची वञ्चना"
श्रीपराशर उवाच
एवं
संस्तूयमाना सा देवैर्देवमधारयत् ।
गर्भेण
पुण्डरीकाक्षं जगतस्त्राणकारणम् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- हे मैत्रेया ! देवतांकडून अशा प्रकारे स्तुति केली जात असणार्या
देवकीने संसाराच्या रक्षणासाठी पुण्डरीकाक्षाला गर्भात धारण केले ॥ १ ॥
ततोऽखिलजगत्पद्मबोधायाच्युतभानुना
।
देवकीपूर्वसन्ध्यायामाविर्भूतं
महात्मना ॥ २ ॥
त्यानन्तर सम्पूर्ण संसाररूपी
कमळाला विकसित करण्यासाठी देवकीरूपी पूर्व संध्येमध्ये महात्मा अच्युतरूपी सूर्यदेवाचा
आविर्भाव झाला ॥२॥
तज्जन्मदिनमत्यर्थमाह्लाद्यमलदिङ्मुखम्
।
बभूव
सर्वलोकस्य कौमुदी शशिनो यथा ॥ ३ ॥
चंद्राच्या चांदण्याप्रमाणे
भगवंताचा जन्म-दिन सम्पूर्ण जगताला आह्लादित करणारा झाला व त्या
दिवशी सर्व दिशा अत्यन्त निर्मळ झाल्या ॥ ३ ॥
सन्तःसन्तोषमधकं
प्रशमं चण्डमारुताः ।
प्रसादं
निम्नगा याता जायमाने जनार्दने ॥ ४ ॥
जनार्दनाने जन्म घेतल्याने
संतजनांना परम सन्तोष झाला, प्रचण्ड वायु शान्त झाला तसेच नद्या अत्यन्त स्वच्छ झाल्या
॥ ४ ॥
सिन्धवो
निजशब्देन वाद्यं चक्रुर्मनोहरम् ।
जगुर्गन्धर्वपतयो
ननृतुश्चाप्सरोगणाः ॥ ५ ॥
समुद्रगण मनोहर घोष करू
लागले, गन्धर्वराज गान करू लागले व अप्सरा नाचू लागल्या ॥ ५ ॥
ससृजुः
पुष्पवर्षाणि देवा भुव्यन्तरिक्षगाः ।
जज्वलुश्चाग्नयः
शान्ता जायमाने जनार्दने ॥ ६ ॥
जनार्दन प्रकट झाल्यावर
आकाशगामी देवगण पृथ्वीवर पुष्पवृष्टी करू लागले आणि शान्त झालेले यज्ञाग्नि परत प्रज्वलित
झाले ॥ ६॥
मदं
जगुर्जुर्जलदाः पुष्पवृष्टिमुचो द्विज ।
अर्धरात्रेऽखिलाधारे
जायमाने जनार्दने ॥ ७ ॥
हे द्विजा ! अर्ध्यारात्री
सर्वाधार भगवान जनार्दन आविर्भूत झाल्यावर पुष्पवृष्टी करत मेघगण मन्द-मन्द गर्जना
करू लागले ॥ ७॥
फुल्लेन्दीवरपत्राभं
चतुर्बाहुमुदीक्ष्य तम् ।
श्रीवत्सवक्षसं
जातं तुष्टावानकदुन्दुभिः ॥ ८ ॥
उमललेल्या कमलदलाची आभा
असणार्या, चतुर्भुज आणि वक्ष: स्थलावर श्रीवत्सचिह्नसहित उत्पन्न झालेले बाळ पाहून
आनकदुन्दुभि वसुदेव स्तुति करू लागले ॥८॥
अभिष्टूय
च तं वाग्भिः प्रसन्नाभिर् महामतिः ।
विज्ञापयामास
तदा कंसाद्भीतो द्विजोत्तम ॥ ९ ॥
हे द्विजोत्तमा ! महामति
वसुदेवाने प्रसाद युक्त वचनांनी भगवंताची स्तुति केली आणि कंसाच्या भयाने असे म्हटले
॥ ९ ॥
वसुदेव
उवाच
जातोऽसि
देवदेवेश शङ्खचक्रगदाधरम् ।
दिव्यरूपमिदं
देव प्रसादेनोपसंहर ॥ १० ॥
वसुदेव म्हणाले ;- हे
देवदेवेश्वरा ! जर आपण [साक्षात् परमेश्वर] प्रकट झाला असाल, तर हे देवा ! माझ्यावर
कृपा करून आता आपल्या ह्या शंख-चक्र-गदाधारी दिव्य रूपाचा उपसंहार करा ।। १०॥
अद्यैव देव कंसोऽयं कुरुते
मम घातनम् ।
अवतीर्ण इति ज्ञात्वा त्वमस्मिन्मम मन्दिरे ॥ ११ ॥
हे देवा ! आपण माझ्या
घरी अवतीर्ण झाला आहात हे कळताच , कंस तुमचा सर्वनाश करतील ॥११॥
देवक्युवाच
योऽनन्तरूपोऽखिलविश्वरूपो
गर्भेऽपि लोकान्वपुषा बिभर्ति ।
प्रसीतदामेष
स देवदेवो यो माययाविष्कृतबालरूपः ॥ १२ ॥
देवकी म्हणाली;- जो अनन्तरूप
आणि अखिल विश्वस्वरूप आहे, जो गर्भात स्थित होऊनही आपल्या शरीराने सम्पूर्ण लोक धारण
करतो तसेच ज्याने आपल्या मायेने बालरूप धारण केले आहे तो देवसेन आमच्यावर प्रसन्न होवो
॥ १२ ॥
उपसंहर
सर्वात्मन् रूपमेतच्चतुर्भुजम् ।
जानातु
मावतारं ते कंसोऽयं दितिजन्मजः ॥ १३ ॥
हे सर्वात्मना ! आपण आपल्या
ह्या चतुर्भुज रूपाचा उपसंहार करावा. भगवंता ! राक्षसाच्या
अंशाने उत्पन्न कंसाला आपल्या ह्या अवताराचे वृत्तान्त कळायला नको ॥ १३ ॥
श्रीभगवानुवाच
स्तुतोऽहं
य त्त्वया पूर्वं पुत्रार्थिन्या तदद्य ते ।
सफलं
देवि संजातं जातोऽहं यत्तवोदरात् ॥ १४ ॥
श्रीभगवान म्हणाले ;-
हे देवि ! पूर्वजन्मी तू पुत्र कामनेने पुत्ररूपाने उत्पन्न होण्यासाठी माझी प्रार्थना
केली होतीस. आज मी तुझ्या गर्भातून जन्म घेतला
आहे आणि तुझी इच्छा पूर्ण झाली ॥१४॥
श्रीपराशर
उवाच
इत्युक्त्वा
भगवांस्तूष्णीं बभूव मुनिसत्तम ।
वसुदेवोऽपि
तं रात्रावादाय प्रययौ बहिः ॥ १५ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
हे मुनिश्रेष्ठा ! असे म्हणून भगवान मौन झाले तसेच वसुदेव सुद्धा त्यांना
घेऊन रात्रीच बाहेर पडले ।। १५
।।
मोहिताश्चाभवंस्तत्र
रक्षिणो योगनिद्रया ।
मथुराद्वारपालाश्च
व्रजत्यानकदुन्दुभौ ॥ १६ ॥
वसुदेव बाहेर पडले तेव्हा कारागृहाचे रक्षक आणि मथुरेचे द्वारपाल योगनिद्रेच्या प्रभावाने अचेत
झाले ॥१६॥
वर्षतां
जलदानां च तोयमात्युल्बणं निशि ।
संवृत्यानुययौ
शेषः फणैरानकदुन्दुभिम् ॥ १७ ॥
त्या रात्री घर्षण करत
मेघांची जलराशि आपल्या फणांनी रोखत श्रीशेष आनकदुन्दुभिच्या मागे मागे चालत होते ॥
१७ ॥
यमुनां
चातिगम्भीरां नानावर्तशताकुलाम् ।
वसुदेवो
वहन्विष्णुं जानुमात्रवहां ययौ ॥ १८ ॥
भगवान विष्णुला घेऊन जाताना
वसुदेव नाना प्रकारच्या शेकडो भोवर्यांनी भरलेली आणि गुढघ्यापर्यंत आलेली अत्यन्त
गम्भीर यमुनानदी पार करून गेले ॥ १८ ॥
कंसस्य
करदानाय तत्रैवाभ्यागतास्तटे ।
नन्दादीन्गोपवृद्धांश्च
यमुनाया ददर्श सः ॥ १९ ॥
त्यांनी यमुनेच्या तटावरच
कंसाला कर देण्यासाठी आलेले नन्द आदि वृद्ध गोपी पाहिले ॥ १९ ।।
तस्मिन्काले
यशोदापि मोहिता योगनिद्रया ।
तामेव
कन्यां मैत्रेय प्रसूता मोहिते जने ॥ २० ॥
हे मैत्रेया ! ह्याच वेळी
योगनिद्रेच्या प्रभावाने सर्व मनुष्य मोहित झाल्यावर मोहित झालेल्या यशोदेने सुद्धा
कन्येला जन्म दिला ॥२०॥
वसुदेवोपि विन्यस्य बालमादाय
दारिकाम् ।
यशोदाशयनात्तूर्णमाजगामामितद्युतिः
॥ २१ ॥
तेव्हा अतिशय कान्तिमान्
वसुदेव सुद्धा त्या बालकाला तिथे झोपवून आणि त्या कन्येला घेऊन लगेच यशोदेच्या शयनगहातून
निघाले ।॥ २१ ॥
ददृशे
च प्रबुद्धा सा यशोदा जातमात्मजम् ।
नीलोत्पलदलश्यामं
ततोऽत्यर्थं मुदं ययौ ॥ २२ ॥
जाग आल्यावर जेव्हा यशोदेने
पाहिले की तिला नीलकमळासारखा श्यामवर्ण पुत्र झाला आहे ती अत्यन्त प्रसन्न झाली ॥ २२
॥
आदाय
वसुदेवोऽपि दारिकां निजमन्दिरे ।
देवकीशयने
न्यस्य यथापूर्वमतिष्ठत ॥ २३ ॥
इथे वसुदेववाने कन्येला
नेऊन आपल्या महाली देवकीच्या शयनगृहात झोपवले ॥ २३ ।।
ततो
बालध्वनिं श्रुत्वा रक्षिणः सहसोत्थिताः ।
कंसायावेदयामासुर्देवकीप्रसवं
द्विज ॥ २४ ॥
हे द्विजा ! त्यानन्तर
बाळाच्या रडण्याचा आवाज एकून कारागृहाचे रक्षक जागे झाले आणि देवकीला सन्तान झाल्याचा
वृत्तान्त कंसाला सांगीतला ॥ २४ ।।
कंसस्तूर्णमुपेत्यैनां
ततो जग्रह बालिकाम् ।
मुञ्चमुञ्चेति
देवक्या सन्नकण्ठ्या निवारितः ॥ २५ ॥
चिक्षेप
च शिलापृष्ठे सा क्षिप्ता वियति स्थिता ।
अवाप
रूपं सुमहत्सायुधाष्टमहाभुजम् ॥ २६ ॥
हे ऐकताच कंसाने लगेच तिथे जाऊन देवकीने रडत रडत 'सोड, सोड'-असे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न
केला तरी त्या बालिकेला पकडून तिला एका शिळेवर आपटले. तिला
आपटताच ती आकाशात स्थित झाली आणि तिने शस्त्रयुक्त एक महान अष्टभुज रूप धारण केले ॥
२५-२६।॥
प्रजहास
तथैवोच्चैः कंसं च रुषिताब्रवीत् ।
किं
मया क्षिप्तया कंस जाता यस्त्वां वधिष्यति ॥ २७ ॥
तिने उच्चस्वराने अट्टहास
करत कंसाला रोषपूर्ण आवाजात म्हटले -'अरे कंसा ! मला आपटून तुझा कोणता उद्देश पूर्ण
झाला? जो तुझा अंत करणार आहे त्याने तर आधीच जन्म घेतला आहे ॥२७॥
सर्वस्वभूतो
देवानामासीन्मृत्युः पुरा स ते ।
तदेतत्सम्प्रधार्याशु
क्रियतां हितमात्मनः ॥ २८ ॥
देवतांचा सर्वस्वरूप तो
हरी पूर्वजन्मी सुद्धा तुझा काळ होता. म्हणून तु आता आपल्या
हिताचे पाहा ॥ २८ ॥
इत्युक्त्वा प्रययौ देवी
दिव्यस्रग्गन्धभूषणा ।
पश्यतो भोजराजस्य स्तुता सिद्धैर्विहायसा ॥ २९ ॥
असे म्हणून, दिव्यमाला
आणि चन्दनादिने विभूषित तसेच सिद्धगणद्वारा स्तुति केली जात असलेली देवी भोजराज कंसाच्या
देखत आकाशमार्गाने निघून गेली ॥ २९॥
इति श्रिविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे तृतीयोऽध्यायः (३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा