॥ विष्णुपुराणम्
॥
॥ पञ्चमः अंशः ॥
॥ द्वितीयोऽध्यायः
॥
"भगवंताचा गर्भप्रवेश
आणि देवगणाद्वारा देवकीची स्तुति"
श्रीपराशर उवाच
यथोक्तं सा जगद्धात्त्री देवदेवेन वै तथा ।
षड्गर्भगर्भविन्यासं चक्रे चान्यस्य कर्षणम् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- हे मैत्रेया ! देवाधिदेव श्रीविष्णुने जसे सांगितलेले त्याप्रमाणे
जगद्धात्री योगमायेने सहा गर्भ देवकीच्या उदरात स्थित केले आणि सातवा गर्भ तिच्या उदरातून
काढला ॥१॥
सप्तमे रोहिणीं गर्भे प्राप्ते गर्भं ततो हरिः ।
लोकत्रयोपकाराय देवक्याः प्रविवेश ह ॥ २ ॥
अशा प्रकारे सातवा गर्भ
रोहिणीच्या उदरात गेल्यावर श्रीहरिने तीनही लोकांचा उद्धार करण्याच्या इच्छेने देवकीच्या
गर्भात प्रवेश केला ॥२॥
योगनिद्रा यशोदायास्तस्मिन्नेव तथा दिने ।
सम्भूता जठरे तद्वद्यथोक्तं परमेष्ठिना ॥ ३ ॥
भगवंताने सांगितल्यानुसार
योगमाया सुद्धा त्याच दिवशी यशोदेच्या गर्भात स्थित झाली ॥३॥
ततो ग्रहगणःसम्यक्प्रचचार दिवि द्विज ।
विष्णोरंशे भुवं याते ऋतवश्चाबभुः शुभाः ॥ ४ ॥
हे द्विजा! विष्णुचा अंश
पृथ्वीवर आल्यानंतर आकाशात ग्रहगण योग्य गतिने चालू लागले आणि ऋतुगण सुद्धा मंगलमय
होऊन सुशोभित झाले ॥ ४ ॥
न सेहे देवकीं द्रष्टं कश्तिदप्यतितेजसा ।
जाज्वल्यमानां तां दृष्ट्वा मनांसि क्षोभमाययुः ॥ ५ ॥
त्यावेळी अत्यंत तेजामुळे
देदीप्यमान देवकीकडे कोणीही पाहू शकत नव्हते. तिला
पाहणारा थक्क होत असे ॥ ५॥
अदृष्टाः पुरुषैः स्त्रीभिर्देवकीं देवतागणाः
।
बिभ्राणां वपुषा विष्णुं तुष्टुवुस्तामहर्निशम्
॥ ६ ॥
तेव्हा अन्य पुरुष किंवा
स्त्रियांच्या नजरेला न पडणारे देवतागण विष्णुला आपल्या शरीरात गर्भरूपात धारण करणार्या
देवकीची अहर्निश स्तुति करू लागले ॥ ६ ॥
देवता ऊचुः
प्रकृतिस्त्वं परा सूक्ष्मा ब्रह्मगर्भाभवः
पुरा ।
ततो वाणी जगद्धातुर्वेदगर्भासि शोभने ॥ ७ ॥
देवता म्हणाले ;- हे शोभने!
तू आधी ब्रह्म प्रतिबिम्ब धारिणी मूल प्रकृति झाली होतीस आणि मग जगद्विधात्याची वेदगर्भा
वाणी झालीस ॥ ७ ॥
सृज्यस्वरूपगर्भासि सृष्टिभूता सनातने ।
बीजभूता तु सर्वस्य यज्ञभूताभवस्त्रयी ॥ ८ ॥
हे सनातने! तूच सृज्य
पदार्थ उत्पन्न करणारी आणि तूच सृष्टिरूपा आहेस; तू सर्वांची बीजस्वरूपा यज्ञमयी, वेदत्रयी
झाली आहेस ॥ ८ ॥
फलगर्भा त्वमेवेज्या वह्निगर्भा तथारणिः ।
अदितिर्देवगर्भा त्वं दैत्यगर्भा तथा दितिः ॥ ९ ॥
तूच फलमयी यज्ञक्रिया
आणि अग्निगर्भा अरणि आहेस तसेच तूच देवमाता अदिति आणि दैत्यमाता दिति आहेस ॥ ९॥
ज्योत्स्ना वासरगर्भा त्वं ज्ञानगर्भासि सन्नतिः ।
नयगर्भा परा नीतिर्लज्जा त्वं प्रश्रयोद्वहा ॥ १० ॥
तूच दिनकर प्रभाकर ज्ञानगर्भा
गुरुशुश्रूषा आहेस आणि तूच न्यायमयी परमनीति आणि विनयाची मूलभूत लज्जा आहेस॥१०॥
कामगर्भा तथेच्छा त्वं तुष्टिः सन्तोषगर्भिणी ।
मेधा च बोधगर्भासि धैर्यगर्भोद्वहा धृतिः ॥ ११ ॥
तूच काममयी इच्छा, सन्तोषमयी
तुष्टि, बोधगर्भा प्रज्ञा आणि धैर्यधारिणी धृति आहेस ॥ ११ ॥
ग्रहर्क्षतारकागर्भा द्यौरस्याखिलहैतुकी ।
एता विभूतयो देवि तथान्याश्च सहस्रशः ।
तथा संख्या जगद्धात्री साम्प्रतं जठरे तव ॥
१२ ॥
समुद्राद्रिनदीद्वीपवनपत्तनभूषणा ।
ग्रामखर्वटखेटाढ्या समस्ता पृथिवी शुभे ॥ १३
॥
समस्तवहयोऽम्भांसि सकलाश्च समीरणाः ।
महोरगास्तथा यक्षा राक्षसाः प्रेतगुद्यकाः
॥ १४ ॥
ग्रहर्क्षतारकाचित्रं विमानशतसंकुतम् ।
अवकाशमशेषस्य यद्ददाति नभस्थलम् ॥ १५ ॥
भूलोकश्च भुवर्लोकःस्वर्लोकोऽथ महर्जनः ।
तपश्च ब्रह्मलोकश्च ब्रह्माण्डमखिलं शुभे ॥
१६ ॥
तदन्तरे स्थिता देवा दैत्यगन्धर्वचारणाः ।
महोरगास्तथा यक्षा राक्षसाः प्रेतगुह्यकाः
॥ १७ ॥
मनुष्याः पशवश्चान्ये ये च जीवा यशस्विनि ।
तैरन्तस्थैरनन्तोऽसौ सर्वगः सर्वभावनः ॥ १८
॥ रूपकर्मस्वरूपाणि न परिच्छेदगोचरे ।
यस्याखिलप्रमाणानि स विष्णुर्गर्भगस्तव ॥ १९ ॥
ग्रह, नक्षत्र आणि तारागणाला
धारण करणारे तसेच व्रष्टि आदिद्वारा ह्या अखिल विश्वाचे कारणस्वरूप आकाश तूच आहेस. हे जगद्धात्री! हे देवि! हे सर्व तसेच आणखीही सहस्र आणि असंख्य विभूती ह्यावेळी
तुझ्या उदरात स्थित आहेत. हे शुभे ! समुद्र, पर्वत, नदी, द्वीप,
वन आणि नगरांनी सुशोभित तसेच ग्राम, खर्वट आणि खेटादिंनी सम्पन्न समस्त पृथ्वी, सम्पूर्ण
अग्नी आणि जल तसेच समस्त वायु, ग्रह, नक्षत्र आणि तारागणांनी चित्रित तसेच सर्वांना
अवकाश देणारे शेकडो विमानांनी पूर्ण आकाश, भूर्लोक, भूवर्लोक, तथा मह:, जन, तप आणि
ब्रह्मलोक पर्यंत सम्पूर्ण ब्रह्माण्ड तसेच त्यांचे अन्तर्वर्ती देव, असुर, गन्धर्व,
चारण, नाग, यक्ष, राक्षस, प्रेत, गुह्यक, मनुष्य, पशु आणि जे अन्यान्य जीव आहेत, हे
यशस्विनि ! ते सर्व तुझ्या अन्तर्गत असल्यामुळे जो श्री अनन्त सर्वगामी आणि सर्वभावन
आहे तसेच ज्याचे रूप, कर्म, स्वभाव तथा समस्त परिमाण परिच्छेदाचा विषय नाही होऊ शकत
तो श्रीभगवान विष्णु तुझ्या गर्भात स्थित आहे ॥ १२-१९ ॥
त्वं स्वाहा त्वं स्वधा विद्या सुधा त्वं ज्योतिरम्बरे
।
त्वं सर्वलोकरक्षार्थमवतीर्णा महीतले ॥ २०
॥
तूच स्वाहा, स्वधा, विद्या,
सुधा आणि आकाश स्थिता ज्योति आहेस. सम्पूर्ण लोकांच्या
रक्षणासाठीच तू पृथ्वीवर अवतार घेतला आहेस ॥ २० ॥
प्रसीद देवि सर्वस्य जगतः शं शुभे कुरु ।
प्रीत्या तं धारयेशानं धृतं येनाखिलं जगत्
॥ २१ ॥
हे देवि ! तू प्रसन्न
हो. हे शुभे ! तू सम्पूर्ण जगताचे कल्याण कर. ज्याने हा समस्म संसार धारण केला आहे त्या प्रभुला तू प्रीतिपूर्वक आपल्या
गर्भात धारण कर ॥ २१ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे
पञ्चमे
अंशे द्वितीयोऽध्यायः
(२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा