॥ विष्णुपुराणम् ॥
॥ पञ्चमः अंशः ॥ ॥
प्रथमोऽध्यायः
॥
"वसुदेव-देवकीचा
विवाह, भारपीडिता पृथ्वीचे देवतांसहित क्षीरसमुद्रावर जाणे आणि भगवंताचे प्रकट होऊन
तिला धैर्य देणे, कृष्णावताराचा उपक्रम"
मैत्रेय उवाच
नृपाणां कथितःसर्वो भवता वंशविस्तरः ।
वंशानुचरितं चैव यथावदनुवर्णितम् ॥ १ ॥
श्री मैत्रेय म्हणाले
;- भगवन ! आपण राजांचा सम्पूर्ण वंशविस्तार तसेच त्यांच्या चरित्रांचे क्रमशः यथावत्
वर्णन केले ॥१॥
अंशावतारो ब्रह्मर्षे योऽयं यदुकुलोद्भवः ।
विष्णोस्तं विस्तरेणाहं श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ २ ॥
आता हे ब्रह्मर्षे! यदुकुळात
जो भगवान विष्णुंचा अंशावतार झाला होता, त्याविषयी मी विस्तारपूर्वक ऐकू इच्छितो ॥२॥
चकार यानि कर्माणि भगवान् पुरुषोत्तमः ।
अंशांशेनावतीर्योर्व्यां तत्र तानि मुने वद
॥ ३ ॥
हे मुने ! भगवान पुरुषोत्तमाने
आपल्या अंशांशाने पृथ्वीवर अवतीर्ण होऊन जी जी कर्म केली होती त्या सर्वांचे तुम्ही
मला वर्णन करा ॥ ३ ॥
श्रीपारशर उवाच
मैत्रेय श्रूयतामेतद्यत्पृष्टोऽहमिह त्वया
।
विष्णोरंशांशसम्भूतिचरितं जगतो हितम् ॥ ४ ॥
श्री पराशर म्हणाले
;- हे मैत्रेया ! तु मला विचारलेले संसारातील परम मङ्गलकारी भगवान विष्णुच्या अंशावताराचे
चरित्र ऐक ॥ ४ ॥
देवकस्य सुतां पूर्वं वसुदेवो महामुने ।
उपयेमे महाभागां देवकीं देवतोपमाम् ॥ ५ ॥
हे महामुने ! पूर्वकाळी
महाभाग्यशालिनी पुत्री देवी स्वरूपा देवकी बरोबर वसुदेवाचा विवाह झाला ॥५॥
कंसस्तयोर्वररथं चोदयामास सारथिः ।
वसुदेवस्य देवक्या संयोगे भोजनन्दनः ॥ ६ ॥
वसुदेव आणि देवकीच्या
विवाहानंतर तिची पाठवणी करताना भोजनन्दन कंस सारथी बनून त्या दोघांचा मंगल रथ चालवू
लागला ॥६॥
आथान्तरिक्षे वागुच्चैः कंसमाभाष्य सादरम् ।
मेघगम्भीरनिर्घोषं समाभाष्येदमब्रवीत् ॥ ७ ॥
त्यावेळी मेघासमान गम्भीर
घोषणा करत आकाशवाणी कंसाला उच्च स्वरात सम्बोधून म्हणाली ॥ ७॥
यामेतां वहसे मूढ सह भर्त्रा रथे स्थिताम् ।
अस्यास्तवाष्टमो गर्भः प्राणानपहरिष्यति ॥ ८ ॥
"अरे मूर्खा ! पति
सोबत रथावर बसलेल्या ज्या देवकीला तू घेऊन जात आहेस तिचा आठवा गर्भ तुझा प्राण घेणार"
॥ ८॥
श्रीपराशर उवाच
इत्याकर्ण्य समुत्पाट्य खड्गं कंसो महाबलः ।
देवकीं हन्तुमारब्धो वसुदेवोऽब्रवीदिदम् ॥ ९ ॥
श्रीपराशर म्हणाले ;-
हे ऐकताच महबाली कंस म्यानातून तलवार काढून देवकीला मारण्यास निघाला. तेव्हा वसुदेव म्हणाले ॥९॥
न हन्तव्या महाभाग देवकी भवतानघ ।
समर्पयिष्ये सकलान्गर्भानस्योदरोद्भवान् ॥
१० ॥
"हे महाभाग ! हे
अनघ ! देवकीचा वध करू नका; मी हिच्या गर्भातून उत्पन्न झालेले सर्व बालक तुम्हाला देईन
" ॥ १० ॥
श्रीपराशर उवाच
तथेत्याह ततः कंसो वसुदेवं द्विजोत्तम ।
न घातयामास च तां देवकीं सत्यगौरवात् ॥ ११
॥
श्री पराशर म्हणाले
;- हे द्विजोत्तमा ! तेव्हा सत्याचा गौरव करत कंसाने वसुदेवाला 'ठीक आहे' म्हटले आणि
देवकीचा वध केला नाही ॥ ११ ॥
एतस्मिन्नेवकाले तु भूरिभारावपीडिता ।
जगाम धरणी मेरौ समाजं त्रिदिवौकसाम् ॥ १२ ॥
ह्याच वेळी भाराने अत्यन्त
पीड़ित होऊन पृथ्वी गाईचे रूप धारण करून सुमेरु पर्वतावर देवतांच्या दलात गेली ॥ १२
॥
स ब्रह्मकान्सुरान्सर्वान्प्रणिपत्याथ मेदिनि ।
कथयामास तत्सर्वं खेदात्करुणभाषिणी ॥ १३ ॥
तिथे तिने ब्रह्मासहित
समस्त देवतांना प्रणाम करून खेदपूर्वक करुणस्वरात आपला सर्व वृत्तान्त सांगितला ॥ १३
॥
भूमिरुवाच
अग्निःसुवर्णस्य गुरुर्गवां सूर्यः परो गुरुः
।
ममाप्यखिललोकानां गुरुर्नारायणो गरुः ॥ १४
॥
पृथ्वी म्हणाली ;- ज्याप्रकारे
अग्नि सवर्णचा तसेच सूर्य गौ (किरण) समूहाचा परमगुरु आहे त्याचप्रकारे समस्त लोकांचे
गुरु श्रीनारायण माझे गुरु आहेत ॥१४॥
प्रजापतिपतिर्ब्रह्म पूर्वेषामपि पूर्वजः ।
कलाकाष्ठानिमेषात्मा कालश्चाव्यक्तमूर्तिमान्
॥ १५ ॥
ते प्रजापतिंचे पति आणि
पूर्वजांचे पूर्वज ब्रह्मा आहेत तसेच तेच कला, काष्ठा, निमेष आदिंच्या रूपात प्रतीत
होणारे अव्यक्तस्वरूप आहेत ॥ १५॥
तदंशभूतःसर्वैषां समूहो वः सुरोत्तमाः ॥ १६
॥
आदित्या मरुतःसाध्या रुद्रा वस्वश्विवह्नयः
।
पितरो ये च लोकानां स्रष्टारोऽत्रिपुरोगमाः एते तस्याप्रमेयस्य विष्णो
रूपं महात्मनः ॥ १७ ॥
हे देवश्रेष्ठगणांनो
! तुम्हा सर्वांचा समूह देखील त्यांचेच अंशस्वरूप आहे. आदित्य,
मरुद्ण, साध्यगण, रुद्र, वसु, अश्विनी कुमार, अग्नि, पितृगण आणि लोकांची सृष्टि करणारे
अत्रि आदि प्रजापतिगण ही सर्व अप्रमेय महात्मा विष्णुचीच रूपे आहे ॥ १६-१७॥
यक्षराक्षसदैतेयपिशाचोरगदानवाः ।
गन्धर्वाप्सरसश्चैव रूपं विष्णोर्महात्मनः
॥१८॥
यक्ष, राक्षस, दैत्य,
पिशाच, सर्प, दानव, गन्धर्व आणि अप्सरा आदि महात्मा विष्णुचीच रूपे आहेत ॥१८॥
ग्रहर्क्षतारकाचित्रगगनाग्निजलानिलाः ।
अहं च विषयाश्चैव सर्व विष्णुमयं जगत् ॥ १९॥
ग्रह, नक्षत्र तसेच तारागणांनी
चित्रित आकाश, अग्नि, जल, वायु, मी आणि इन्द्रियांचे सम्पूर्ण विषय, हे सर्व जगत् विष्णुमयच
आहे ॥ १९॥
तथा चानेकरूपस्य तस्य रूपाण्यहर्निशम् ।
बाध्यबाधकतां यान्ति कल्लोला इव सागरे ॥ २०
॥
तथापि त्या अनेकरूपधारी
विष्णुची ही रूपे समुद्री तरंगा समान रात्रंदिवस एक-दुसर्याला बाध्य-बाधक होत राहतात
॥ २० ॥
तत्साम्प्रतममी दैत्याः
कालनेमिपुरोगमाः ।
मर्त्यलोकं समाक्रम्य बाधन्तेऽहर्निशं प्रजाः ॥ २१॥
आता ह्यावेळी कालनेमि
आदि दैत्य मर्त्यलोकावर अधिकार जजवून रात्रंदिवस जनतेला क्लेश देत आहेत ॥ २१॥
कालनेमिर्हतो योऽसौ विष्णुना प्रभविष्णुना
।
उग्रसेनसुतः कंसःसम्भूतःस महासुरः ॥ २२ ॥
अरिष्टो धेनुकः केशी प्रलम्बो नरकस्तथा ।
सुन्दोऽसुरस्तथात्युग्रो बाणश्चापि बलेःसुतः
॥ २३ ॥
ज्या कालनेमिला सामर्थ्यवान
भगवान विष्णुने मारले होते, तोच आज उग्रसेनाचा पुत्र महान असुर कंसाच्या रूपात उत्पन्न
झाला आहे. अरिष्ट, धेनुक, केशी, प्रलम्ब, नरक,
सुन्द, बलिका पुत्र अति भयंकर बाणासुर ॥ २२-२३ ॥
तथान्ये च महावीर्या नृपाणां भवनेषु ये ।
समुत्पन्ना दुरात्मानस्तान्न संख्यातुमुत्सहे
॥ २४ ॥
तसेच आणखीनही जे महाबलवान दुरात्मा राक्षस राजांच्या
घरी उत्पन्न झाले आहेत त्यांची मी गणना नाही करू शकत ॥ २४ ॥
अक्षोहिण्योत्र बहुला दिव्यमूर्तिधराःसुराः
।
महाबलानां दृप्तानां दैत्येन्द्राणां ममोपरि
॥ २५ ॥
हे दिव्यमूर्तिधारी देवगणांनो
! ह्यावेळी माझ्यावर महाबलवान् आणि गर्विष्ठ दैत्यराजांच्या अनेक अक्षौहिणी सेना आहेत
॥ २५ ॥
तद्भूरिभारपीडार्ता न शक्नोम्यमरेश्वराः ।
बिभर्तुमात्मानमहमिति विज्ञापयामि वः ॥ २६ ॥
हे अमरेश्वरांनो ! मी
तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांच्या भाराने अत्यन्त पीड़ित झाल्याने माझ्यात स्वतःला
धारण करण्याची शक्ति सुद्धा उरलेली नाही ॥ २६ ॥
क्रियतां तन्महाभागा मम भारावतारणम् ।
यथा रसातलं नाहं गच्छेयमतिविह्वला ॥ २७ ॥
म्हणून हे महाभागगणांनो
! तुम्ही माझा भार उतरवा; जेणेकरून अत्यन्त व्याकुळ होऊन मी रसातळाला जाऊ नये ॥ २७॥
इत्याकर्ण्य धरावाक्यमशेषैस्त्रिदशेश्वरैः ।
भुवो भारावतारार्थं ब्रह्मा प्राह प्रचोदितः ॥ २८ ॥
पृथ्वीची ही वाक्ये ऐकून
तिचा भार उतरवण्या विषयी समस्त देवतांच्य् प्रेरणेने ब्रह्मा म्हणाले ॥ २८ ॥
ब्रह्मोवाच
यथाह वसुधा सर्वं सत्यमेव दिवौकसः ।
अहं भवो भवन्तश्च सर्वे नारायणात्मकाः ॥ २९ ॥
ब्रह्माजी म्हणाले ;-
हे देवगणांनो ! पृथ्वीने जे सांगितले ते सर्व सत्यच आहे. खरंतर
मी, शंकर
आणि तुम्ही सर्व नारायण स्वरूपच आहात॥ २९ ॥
विभूतयश्च यास्तस्य तासामेव परस्परम् ।
आधिक्यं न्यूनता बाध्यबाधकत्वेन वर्तते ॥ ३० ॥
त्यांच्या ज्या ज्या विभूति
आहेत, त्यांची परस्पर न्यूनता आणि अधिकता होऊन बाध्य तथा बाधकरूपात राहतात॥ ३० ॥
तदागच्छत गच्छामः क्षीराब्धेस्तटमुत्तमम् ॥
३१ ॥ तत्राराध्य
हरिं तस्मै सर्वं विज्ञापयाम वै ॥ ३२ ॥
म्हणून आता आपण सगळे क्षीरसागराच्या
पवित्र तटावर जाऊन तिथे श्रीहरिची आराधना करून हा सम्पूर्ण वृत्तान्त त्यांना निवेदन
करूया ॥ ३१-३२ ॥
सर्वथैव जगत्यर्थे स सर्वात्मा जगन्मयः ।
सत्त्वांशेनावतीर्योर्व्यां धर्मस्य कुरुते
स्थितिम् ॥ ३३ ॥
ते विश्वरूप सर्वात्मा
सदैव संसाराच्या हितासाठीच आपल्या शुद्ध सत्वांशाने अवतीर्ण होऊन पृथ्वीवर धर्माची
स्थापना करतात ॥ ३३ ॥
श्रीपराशर उवाच
इत्युक्त्वा प्रययो तत्र सह देवैः पितामहः
।
समाहितमनाश्चैवं तुष्टाव गरुडध्वजम् ॥ ३४ ॥
श्री पराशर म्हणाले
;- असे म्हणून देवतां सहित पितामह ब्रह्मा तिथे गेले आणि एकाग्रचित्ताने श्री गरुड़ध्वज
भगवंताची अशा प्रकारे स्तुति करू लागले ॥ ३४ ॥
ब्रह्मोवाच
द्वे विद्ये त्वमनाम्नाय परा चैवापरा तथा ।
त एव भवतो रूपे मूर्तामूर्तात्मिके प्रभो ॥
३५ ॥
ब्रह्मा म्हणाले ;- हे
वेदवाणीला अगोचर असलेल्या प्रभो! परा आणि अपरा- ह्या दोन्ही विद्या आपणच आहात. हे नाथ! त्या दोन्ही आपलेच मूर्त आणि अमूर्त रूप आहे ॥ ३५ ॥
द्वे ब्रह्मणी त्वणीयोऽतिस्थूलात्मन्सर्व सर्ववित्
।
शब्दब्रह्मपरं चैव ब्रह्म ब्रह्ममयस्य यत्
॥ ३६ ॥
हे अत्यन्त सूक्ष्म! हे
विराट स्वरूप! हे सर्व! हे सर्वज्ञ! शब्दब्रह्म आणि परब्रह्म- ही दोन्ही ब्रह्ममय आपलीच
रूपे आहेत ॥ ३६ ॥
ऋग्वेदस्त्वं यजुर्वेदःसामवेदस्त्वथर्वणः ।
शिक्षाकल्पो निरुक्तं च च्छन्दो ज्योतिषमेव
च ॥ ३७ ॥
आपणच ऋग्वेद, यजुर्वेद,
सामवेद आणि अथर्ववेद आहात तसेच आपणच शिक्षा, कल्प, निरुक्त, छन्द आणि ज्योतिष-शास्त्र
आहात ॥३७ ॥
इतिहासपुराणे च तथा व्याकरणं प्रभो ।
मीमांसा न्यायशास्त्रं च धर्मशास्त्राण्यधोक्षज
॥ ३८ ॥
हे प्रभो! हे अधोक्षज!
इतिहास, पुराण, व्याकरण, मीमांसा, न्याय आणि धर्मशास्त्र हे सर्व देखील आपणच आहात ॥
३८ ॥
आत्मात्मदेहगुणवद्विचाराचारि यद्वच ।
तदप्याद्यपते नान्यदध्यात्मात्मस्वरूपवत् ॥
३९ ॥
हे आद्यपते! जीवात्मा,
परमात्मा, स्थूल-सूक्ष्म-देह तसेच त्यांचे कारण असलेले अव्यक्त ह्या सर्वांच्या विचाराने
युक्त जे अन्तरात्मा आणि परमात्माच्या स्वरूपाचे बोधक वेदान्त-वाक्य आहे, ते सुद्धा
आपल्यापासून भिन्न नाही॥ ३९ ॥
त्वमव्यक्तमनिर्देश्यमचिन्त्यानामवर्मवत् ।
अपाणिपादरूपं च शुद्धं नित्यं परात्परम् ॥
४० ॥
आपण अव्यक्त, अनिर्वाच्य,
अचित्तय, नाम आणि वर्णरहित, हातपाय आणि रूप , शुद्ध, सनातन आणि पराहूनही पर आहात ॥
४० ॥
शृणोष्यकर्णः परिपश्यसि त्वमचक्षुरेको बहुरूपरूपः
।
अपादहस्तो जवनो ग्रहीता त्वं वेत्सि सर्वं
न च सर्ववेद्यः ॥ ४१ ॥
आपण कर्णहीन असूनही ऐकता,
नेत्रहीन असूनही पाहता, एक असूनही अनेक रूपात प्रकट होता। हस्तपादरहित असूनही वेगशाली
ग्रहण करणारे आहात तसेच अवेद्य असूनही सर्वांना जाणणारे आहात ॥ ४१ ॥
अणोरणीयां समसत्स्वरूपं त्वां पश्यतो ज्ञाननिवृत्तिरग्र्या
।
धीरस्य धीरस्य बिभर्ति नान्यद्वरेण्यरूपात्परतः
परात्मन् ॥ ४२ ॥
हे परमात्मन् ! ज्या धीर
पुरुषाची बुद्धि आपल्या श्रेष्ठतम रूपापेक्षा वेगळं काहीच पाहात नाही, आपले अणुहूनही
अणु असे दृश्य-स्वरूप पाहणार्या त्या पुरुषाची आत्यन्तिक अशाननिवृत्ति होते ॥ ४२ ॥
त्वं विश्वनाभिर्भुवनस्य गोप्ता सर्वाणि भूतानि
तवान्तराणि ।
यद्भूतभव्यं यदणोरणीयः पुमांस्त्वम् एकः प्रकृतेः
परस्तात् ॥ ४३ ॥
आपण विश्वाचे केन्द्र
आणि त्रिभुवनाचे रक्षक आहात; सम्पूर्ण भूत आपल्यातच स्थित आहे तसेच जे काही भूत, भविष्य
आणि अणुहूनही अणु आहे ते सर्व प्रकृतिच्या परे असलेले एकमात्र परम पुरूष आपणच आहात
॥ ४३ ॥
एकश्चतुर्धा भगवान्हुताशो वर्चोविभूतं जगतो
ददासि ।
त्वं विश्वतश्चक्षुरनन्तमूर्ते त्रेधा पदं
त्वं निदधासि धातः ॥ ४४ ॥
आपणच चार प्रकारचे अग्नि
होऊन संसाराला तेज आण विभूति दान करता. हे अनन्तमूर्ते
! आपले नेत्र सर्वत्र आहेत. हे धाता आपणच त्रिविक्रम
अवतारात तीनही लोकात आपले तीन पाय ठेवता ॥ ४४ ॥
यथाग्निरेको बहुधा समिध्यते विकारभेदैरविकाररूपः
।
तथा भवान्सर्वगतैकरूपी रूपाण्यशेषाण्यनुपुष्यतीश
॥ ४५ ॥
हे ईश ! ज्या प्रकारे
एकच अविकारी अग्नि विकृत होऊन नाना प्रकारे प्रज्वलित होतो त्याच प्रकारे सर्वगतरूप
एक आपणच अनन्त रूप धारण करता ॥ ४५।।
एकं तवाग्र्यं परमं पदं य त्पश्यन्ति त्वां सूरयो ज्ञानदृश्यम् ।
त्वत्तो नान्यत्किञ्चिदस्ति स्वरूपं यद्वा
भूतं यच्च भव्यं परात्मन् ॥ ४६ ॥
जे एकमात्र श्रेष्ठ परमपद
आहे, ते आपणच आहात. ज्ञान-दृष्टिने पाहण्यायोग्य असलेल्या
आपल्यालाच ज्ञानी पुरुष पाहतात. हे परमात्मन् !
भूत आणि भविष्य जे काही स्वरूप आहे ते आपल्या व्यतिरिक्त काहीही नाही ॥ ४६॥
व्यक्ताव्यक्तस्वरूपस्त्वं समष्टिव्यष्टिरूपवान्
।
सर्वज्ञःसर्वनित्सर्वशक्तिज्ञानबलर्धिमान्
॥ ४७ ॥
आपण व्यक्त आणि अव्यक्त
स्वरूप आहात, आपण समष्टि आणि व्यष्टिरूप आहात तसेच आपणच सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान्
एवं सम्पूर्ण ज्ञान, बल आणि ऐश्वर्याने युक्त आहात ॥ ४७ ॥
अन्यूनश्चाप्यवृद्धिश्च स्वाधीनो नादिमान्वशी
।
क्लमतन्द्री भयक्रोधकामादिभिरसंयुतः ॥ ४८ ॥
आपण ह्रास आणि वृद्धिरहित,
स्वाधीन, अनादि आणि जितेन्द्रिय आहात तसेच आपण श्रम, तन्द्रा, भय, क्रोध आणि काम आदि
रहित आहात ॥ ४८ ॥
निरवद्यः परः प्राप्तेर्निरधिष्ठोऽक्षरः क्रमः
।
सर्वेश्वरः पराधारो धाम्नां धामात्मकोऽक्षयः
॥ ४९ ॥
आपण अनिन्द्य, अप्राप्य,
निराधार आणि अव्याहत-गति आहात; आपण सर्वांचे स्वामी, अन्य ब्रह्मादिंचे आश्रय तसेच
सूर्यादि तेजांचे तेज व अविनाशी आहात ॥ ४९ ॥
सकलावरणानीतनिरालम्बनभावन ।
महाविभूतिसंस्थान नमस्ते पुरुषोत्तम ॥ ५० ॥
आपण समस्त आवरणशून्य,
असहाय्यांचे पालक आणि सम्पूर्ण महाविभूतिंचे आधार आहात, हे पुरुषोत्तमा ! आपणाला नमस्कार
॥ ५० ॥
नाकारणात्कारणाद्वा कारणाकारणान्न च ।
शरीरग्रहणं वापि धर्मत्राणाय केवलम् ॥ ५१ ॥
आपण कोणत्याही कारणाने
अथवा अकारण शरीरग्रहण करत नाही, केवळ धर्म-रक्षे साठीच करता । ५१ ॥
श्रीपराशर उवाच
इत्येवं संस्तवं श्रुत्वा मनसा भगवानजः ।
ब्रह्माणमाह प्रीतेन विश्वरूपं प्रकाशयन् ॥
५२ ॥
श्री पराशर म्हणाले
;- अशा प्रकारे स्तुति ऐकून भगवान अज आपले विश्वरूप प्रकट करत ब्रह्माला प्रसन्नचित्ताने
म्हणाले ॥ ५२ ॥
श्रीभगवानुवाच
भोभो ब्रह्मंस्त्वया मत्तःसह देवैर्यदिष्यते
।
तदुच्यतामशेषं च सिद्धमेवावधार्यताम् ॥ ५३
॥
श्रीभगवान म्हणाले ;-
हे ब्रह्मन ! देवतांसहित तुला माझ्याकडून जे हवे ते माग आणि ते झालेच असे समज ॥ ५३ ॥
श्रीपराशर उवाच
ततो ब्रह्मा हरेर्दिव्य विश्विरूपमवेक्ष्य
तत् ।
तुष्टाव भूयो देवेषु साध्वसावनतात्मसु ॥ ५४
॥
श्री पराशर म्हणाले
;- तेव्हा श्रीहरिच्या त्या दिव्य विश्वरूपाला पाहून समस्त देवतांच्या भयाने विनीत
होऊन ब्रह्मा पुन्हा स्तुति करू लागले ॥ ५४ ॥
ब्रह्मोवाच
नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः सहस्रबाहो बहुवक्त्रपाद
।
नमोनमस्ते जगतः प्रवृत्ति-विनाशसंस्थानकराप्रमेय
॥ ५५ ॥
ब्रह्मा म्हणाले ;- हे
सहस्रबाहो! हे अनन्तमुख! तुला हजारवेळा नमस्कार. ह्या
जगताची उत्पत्ति, स्थिति व विनाश करणार्या हे अप्रमेया ! तुला वारंवार नमस्कार ॥ ५५ ॥
सूक्ष्मातिसूक्ष्मातिबृहत्प्रमाण गरीयसामप्यतिगौरवात्मन्
।
प्रधानबुद्धीन्द्रियवत्प्रधान- मूलात्परात्मन्भगवन्प्रसीद
॥ ५६ ॥
हे भगवंता ! तुम्ही सूक्ष्माहूनही
सूक्ष्म, गुरुहूनही गुरु आणि अति बृहत प्रमाण आहात, तथा प्रधान (प्रकृति), महत्तत्त्व
आणि अहंकारादित प्रधानभूत मूल पुरुषाच्याही पलिकडे आहात; हे भगवंता ! तू आमच्यावर प्रसन्न
हो ॥ ५६ ॥
एषा मही देव महीप्रसूतैर्महासुरैः पीडितशैलबन्धा
।
परायणं त्वां जगतामुपैति भारावतारार्थमपारसार
॥ ५७ ॥
हे देवा ! ह्या पृथ्वीवरील
पर्वतरूपी मूलबन्ध तिच्यावर उत्पन्न झालेल्या महान असुसांच्या उत्पातामुळे शिथिल झाले
आहेत. म्हणून हे अपरिमितवीया ! ही आपला भार उतरविण्यासाठी
तुला शरण आली आहे ॥ ५७ ॥
एते वयं वृत्ररिपुस्तथायं नासत्यदस्त्रौ वरुणस्तथैव
।
इमे च रुद्रा वसवःससूर्याः- समीरणाग्निप्रसुखास्तथान्ये
॥ ५८ ॥
सुराःसमस्ताःसुरनाथकार्य-मेभिर्मया यच्च तदीश
सर्वम् ।
आज्ञापयाज्ञां परिपालयन्त-स्तवैव तिष्ठाम सदास्तदोषाः
॥ ५९ ॥
हे सुरनाथा ! मी, इन्द्र,
अश्विनी कुमार तसेच वरुण, हे रुद्रगण, वसुगण, सूर्य, वायु आणि अग्नि आदि अन्य समस्त
देवगण इथे उपस्थित आहेत. त्यांनी किंवा मी करण्यायोग्य जे
काही उचित असेल त्यासाठी आज्ञा करावी. हे ईशा ! तुमच्या
आज्ञेचे पालन करतच आम्ही सम्पूर्ण दोषातून मुक्त होऊ शकू ॥ ५८-५९ ॥
श्रीपराशर उवाच
एवं संस्तूयमानस्तु भगवान्परमेश्वरः ।
उज्जहारात्मनः केशौ सितकृष्णौ महामुने ॥ ६०
॥
श्री पराशर म्हणाले
;- हे महामुने ! अशा प्रकारे स्तुति केल्यानंतर परमेश्वराने आपले श्याम आणि श्वेत दोन
केस उपटले ॥ ६० ॥
उवाच च सुरानेतौ मत्केशौ वसुधातले ।
अवतीर्य भुवो भारक्लेशहानिं करिष्यतः ॥ ६१
॥
आणि देवतांना म्हणाले
हे माझे दोन्ही केस पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीचे भाररूप कष्ट दूर करतील ॥ ६१ ॥
सुराश्च सकलाःस्वांशैरवतीर्य महीतले ।
कुर्वन्तु युद्धमुन्मत्तैः पूर्वोत्पन्नैर्महासुरैः
॥ ६२ ॥
सर्व देवगणांनी आपआपल्या अंशाने पृथ्वीवर अवतार घेऊन आपल्या
आधी उत्पन्न झालेल्या उन्मत्त दैत्यांसह युद्ध करावे ॥६२ ॥
ततः क्षयमशेषास्ते दैतेया धरणीतले ।
प्रयास्यन्ति न सन्देहो मद्दृपातविचूर्णिताः
॥ ६३ ॥
तेव्हा माझ्या दृष्टिपापाने दलित होऊन पृथ्वीवरील सम्पूर्ण दैत्यगण
सदेह क्षीण होतील ॥ ६३ ॥
वसुदेवस्य या पत्नी देवकी देवतोपमा ।
तत्रायमष्टमो गर्भो मत्केशो भविता सुराः ॥
६४ ॥
वसुदेवाची जी देवी समान
देवकी नामक भार्या आहे तिच्या आठव्या गर्भातून माझा हा श्याम केस अवतार घेईल ॥६४ ॥
अवतीर्य च तत्रायं कंसं घातयिता भुवि ।
कालनेमीं समुद्भूतमित्युक्त्वान्तर्दधे हरिः
॥ ६५ ॥
आणि अशा प्रकारे तिथे
अवतार घेऊन हा कालनेमिचा अवतार असलेल्या कंसाचा वध करेल।' असे म्हणून श्रीहरि अन्तर्धान
पावले ॥ ६५ ॥
अदृश्याय ततस्तस्मै प्रणिपत्य महामुने ।
मेरुपृष्ठं सुरा जग्मुरवतेरुश्च भूतले ॥ ६६
॥
हे महामुने ! भगवंत अदृश्य
झाल्यावर त्यांना प्रणाम करून देवगण सुमेरु पर्वतावर निघून गेले आणि मग पृथ्वीवर अवतीर्ण
झाले ॥ ६६ ॥
कंसाय चाष्टमो गर्भो देवक्या धरणीधरः ।
भविष्यतीत्याचचक्षे भगवान्नारदो मुनिः ॥ ६७
॥
त्याचवेळी देवकीच्या आठव्या
गर्भात भगवान धरणीधर जन्म घेतील असे नारदाने कंसाला जाऊन सांगितले की ॥ ६७ ॥
कंसोऽपि तदुपश्रुत्य नारदात्कुपितस्ततः ।
देवकीं वसुदेवं च गृहे गुप्तावधारयत् ॥ ६८
॥
नारदाचा हा समाचार मिळाल्याने
कंसाने क्रोधित होऊन वसुदेव आणि देवकीला कारागृहात बंद केले ॥ ६८ ॥
वसुदेवेन कंसाय तेनैवोक्तं यथा पुरा ।
तथैव वसुदेवोऽपि पुत्रमर्पितवान् द्विज ॥ ६९
॥
द्विजा ! वसुदेव सुद्धा,
त्याने आधीच सांगितल्याप्रमाणे आपला प्रत्येक पुत्र कंसाला देत असे ॥ ६९ ॥
हिरण्यकशिपोः पुत्राः षड्गर्भा इति विश्रुताः
।
विष्णुप्रयुक्ता स्तान्निद्रा क्रमाद्गर्भानयोजयत्
॥ ७० ॥
असे म्हणतात की हे सहा
गर्भ आधी हिरण्यकशिपुचे पुत्र होते. भगवान विष्णुच्या
प्रेरणेने योगनिद्रा त्यांना क्रमशः गर्भात स्थित करत राहिली ॥ ७० ॥
योगनिद्रा महामाया वैष्णवी मोहितं यया ।
अविद्यया जगत्सर्वं तामाह भगवान्हरिः ॥ ७१
॥
ज्या अविद्या रूपिणीमुळे
सम्पूर्ण जगत मोहित होत राहते, ती योगनिद्रा भगवान विष्णुचीच महामाया आहे. तिला भगवान श्रीहरि म्हणाले ॥ ७१ ॥
श्रीभगवानुवाच
निद्रे गच्छ ममादेशात्पातालातलसंश्रयान् ।
एकैकत्वेन षड्गर्भान्देवकीजठरं नय ॥ ७२ ॥
श्रीभगवान म्हणाले ;-
हे निद्रे ! जा, माझ्या आज्ञेने तू पाताळात स्थित सहा गर्भांना एक-एक करून देवकीच्या
कुक्षीत स्थापित कर ॥ ७२ ॥
हतेषु तेषु कंसेन शेषाख्योंऽशस्सतो मम ।
अंशांशेनोदरे तस्याःसप्तमः सम्भविष्यति ॥ ७३ ॥
कंस द्वारा ते सर्व मारले
गेले की शेषनामक माझा अंश आपला अंशांश देवकीच्या सातव्या गर्भात स्थित होईल ॥ ७३ ॥
गोकुले वसुदेवस्य भार्यान्या रोहिणी स्थिता ।
तस्याःस सम्भूतिसमं देवि नेयस्त्वयोदरम् ॥ ७४ ॥
हे देवि ! गोकुळात वसुदेवाची
रोहिणी नामक जी दूसरी भार्या राहते तिच्या उदरात तो सातवा गर्भ घेऊन जाऊन तू अशा प्रकारे
स्थापित कर ज्यामुळे तो तिच्याच जठरातून उत्पन्न झाला असे वाटेल ॥ ७४ ॥
सप्तमो भोजराजस्य भयाद्रोधोपरोधतः ।
देवक्याः पतितो गर्भ इति लोको वदिष्यति ॥ ७५ ॥
ह्या विषयी संसार असेच
म्हणेल की कारागारात बन्द असल्याने भोजराज कंसाच्या भयाने देवकीचा सातवा गर्भ पडला
॥ ७५ ॥
गर्भसंकर्षणात्सोऽथ लोके संकर्षणेति वै ।
संज्ञामवाप्स्यते वीरः श्वेताद्रिशिखरोपमः
॥ ७६ ॥
तो श्वेत शैलशिखरा समान
वीरपुरुष गर्भातून आकर्षित केला गेल्याने संसारात 'सङ्कर्षण' नावाने प्रसिद्ध
होईल ॥ ७६ ॥
ततोऽहं सम्भविष्यामि देवकीजठरे शुभे ।
भर्गं त्वया यशोदाया गन्तव्यमविलम्बितम् ॥ ७७ ॥
त्यानन्तर, हे शुभे !
देवकीच्या आठव्या गर्भात मी स्थित होईन. त्या
वेळी तू सुद्धा लगेच यशोदेच्या गर्भात जा ॥ ७७ ॥
प्रावृट्काले च नभसि कृष्णाष्टम्यामहं निशि
।
उत्पत्स्यामि नवम्यां तु प्रसूतिं त्वमवाप्स्यसि
॥ ७८ ॥
वर्षा ऋतुतील भाद्रपद
कृष्ण अष्टमीला रात्रिच्या वेळी मी जन्म घेईन आणि तू नवमीला उत्पन्न होशील ॥ ७८ ॥
यशोदाशयने मां तु देवक्यास्त्वामनिन्दिते ।
मच्छक्तिप्रोरितमतिर्वसुदेवो नयिष्यति ॥ ७९
॥
हे अनिन्दिते ! त्यावेळी
माझ्या शक्तिमुळे आपली मति फिरल्याने वसुदेव मला यशोदाच्या आणि तुला देवकीच्या शयनगृहात
घेऊन जाईल ॥ ७९ ॥
कंसश्च त्वामुपादाय देवि शैलशिलातले ।
प्रक्षेप्स्यत्यन्तारिक्षे च संस्थानं त्वमवाप्स्यसि
॥ ८० ॥
तेव्हा, हे देवि ! कंस
तुला पकडून पर्वत-शिळेवर आपटेल; त्याने आपटताच तू आकाशात स्थित होशील ॥ ८० ॥
ततस्त्वां शतदृक्छक्रः प्रणम्य मम गौरवात्
।
प्रणिपातानतशिरा भगिनीत्वे ग्रहीष्यति ॥ ८१
॥
त्यावेळी माझ्यावरील गौरवाने
सहस्रनयन इन्द्र वाकून प्रणाम केल्यावर तुझा भगिनीरूपात स्वीकार करेल ॥ ८१ ॥
त्वं च शुम्भनिशुम्भादीन्हत्वा दैत्यान्सहस्रशः
।
स्थानैरनेकैः पृथिवीमशेषां मण्डयिष्यसि ॥ ८२
॥
तू सुद्धा शुम्भ, निशुम्भ
आदि ,सहस्र दैत्यांना मारून आपल्या अनेक स्थानांनी समस्त पृथ्वी सुशोभित करशील ॥८२ ॥
त्वं भूतिः सन्नतिः क्षान्तिः कान्तिर्द्यौः
पृथिवी धृतिः ।
लज्जा पुष्टीरुषा या तु काचिदन्या त्वमेव सा
॥ ८३ ॥
तूच भूति, सन्नति, क्षान्ति
आणि कन्ति आहेस; तूच आकाश, पृथ्वी, धृति, लज्जा, पुष्टि आणि उषा आहेस; ह्यांच्या व्यतिरिक्त
संसारात आणखी ज्या कोणत्या शक्ति आहेत त्या सर्व तूच आहेस ॥ ८३ ॥
ये त्वामार्येति दुर्गेति वेदगर्भाम्बिकेति च ।
भद्रेति भद्रकालीति क्षेमदा भग्यदेति च ॥ ८४ ॥
प्रातश्चैवापराह्ने च
स्तोष्यन्त्यानम्रमूर्तयः ।
तेषां हि प्रार्थितं सर्वं मत्प्रसादाद्भविष्यति ॥ ८५ ॥
जे लोक प्रातः काळी आणि
सायंकाळी अत्यन्त नम्रतापूर्वक तुझे आर्या, दुर्गा, वेदगर्भा, अम्बिका, भद्रा, भद्रकाली,
क्षेमदा आणि भाग्यदा आदि म्हणून तुझी स्तुति करतील त्यांच्या समस्त कामना माझ्या कृपेने
पूर्ण होतील ॥ ८४-८५ ॥
सुरामांसोपहारैश्च भक्ष्यभोज्यैश्च पूजिता
।
नृणामशेषकामांस्त्वं प्रसन्ना सम्प्रदास्यसि
॥ ८६ ॥
मदिरा आणि मांसाची भेंट
चढविल्याने तसेच भक्ष्य आणि भोज्य पदार्थांनी पूजा केल्याने प्रसन्न होऊन तू मनुष्यांच्या
सम्पूर्ण कामना पूर्ण करशील ॥ ८६ ॥
ते सर्वे सर्वदा भद्रे मत्प्रसादादसंशयम् ।
असन्दिग्धा भविष्यन्ति गच्छ देवि यथोदितम्
॥ ८७ ॥
तुझ्या द्वारे दिलेल्या
त्या समस्त कामना माझ्या कृपेने निस्सन्देह पूर्ण होतील. हे
देवी! आता तू मी सांगितलेल्या ठिकाणी जा ॥८७॥
इति विष्णुमहापुराणे
पञ्चमे अंशे प्रथमोऽध्यायः (१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा