॥ विष्णुपुराणम् ॥
॥ चतुर्थ: अंशः ॥
एकोनविंशोऽध्यायः ॥
"पुरुवंश"
श्रीपराशर उवाच
पूरोर्जनमेजयस्तस्यापि प्रचिन्वान् प्रचिन्वतः प्रवीरः प्रवीरान्मनस्युः मनस्योश्चाभयदस्तस्यापि
सुद्युः सुद्योर्बहुगतस्तस्यापि संयातिः संयातेरहंयातिस्ततो रौद्राश्वः ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- पुरुचा पुत्र जनमेजय होता . जनमेजयचा प्रचिन्वान्, प्रचिन्वानचा प्रवीर, प्रवीरचा मनस्यु, मनस्युचा अभयद, अभयदचा सुधु, सुधुचा बहुगत, बहुगतचा संयाति, संयातिचा अहंयाति आणि अहंयातिचा पुत्र रौद्राश्व होता ॥ १ ॥
ऋतेषुकक्षेषुस्थण्डिलेषु कृतेषुजलेषु धर्मेधृतेषुस्थलेषु सन्नतेषुनामानो रौद्राश्वस्य
दश पुत्रा बभूवुः ॥ २ ॥
रौद्राश्वला ऋतेषु, क्षेपु, स्थण्डिलेषु, कृतेषु, जलेषु, धर्मे, धृतेषु, स्थलेषु, सन्नतेपु आणि वनेषु नावाचे दहा पुत्र होते॥२॥
ऋतेषोरन्तिनारः पुत्रोऽभूत् ॥३॥सुमतिमप्रतिरथं ध्रुवं चाप्यन्तिनारः पुत्रानवाप ॥४॥
ऋतेषुचा पुत्र अन्तिनार झाला तसेच अन्तिनारला सुमति, अप्रतिरथ आणि ध्रुव नावाचे तीन पुत्र झाले ॥ ३- ४ ॥
अप्रतिरषस्य
कण्वः पुत्रोऽभूत् ॥ ५ ॥ तस्यापि मेधातिथिः ॥ ६
॥ यतः कण्वायना द्विजा बभूवुः ॥ ७ ॥
ह्यापैकी अप्रतिरथचा पुत्र कण्व आणि कण्वचा पुत्र मेधातिथि होता ज्यांची संतति काण्वायन ब्राह्मण झाली ॥ ५ -७ ॥
अप्रतिरथस्यापरः
पुत्रोऽभूदैलीनः ॥ ८ ॥
अप्रतिरथचा दूसरा पुत्र ऐलीन होता ॥ ८ ॥
एलीनस्य दुष्यन्ताद्याश्चत्वारः पुत्रा बभूवुः ॥ ९ ॥
ह्या ऐलीनला दुष्यन्त आदि चार पुत्र झाले ॥९॥
दुष्यन्ताच्चक्रवर्ती भरतोऽभूत् ॥ १० ॥
यन्नामहेतुर्देवैः श्लेको गीयते ॥ ११ ॥
दुष्यंतला चक्रवर्ती सम्राट भरत झाला ज्याच्या नावाविषयी देवगणाने हा श्लोक म्हटला-॥१०-११॥
माता
भस्त्रा पितुः पुत्रो येन जातः स एव सः ।
भरस्व
पुत्रं दुष्यन्त मावमंस्थाः शकुन्तलाम् ॥ १२ ॥
रेतोधाः
पुत्रो नयति नरदेव यमक्षयात् ।
त्वं
चास्य धाता गर्भस्य सत्यमाह शकुन्तला ॥ १३ ॥
माता केवळ चामड्याच्या पिशवी समान आहे, पुत्रावर अधिकार पित्याचाच आहे, पुत्र ज्याच्या द्वारा जन्म ग्रहण करतो त्याचेच स्वरूप असतो . हे दुष्यन्ता ! तु ह्या पुत्राचे पालन पोषण कर, शकुन्तलेचा अपमान नको करूस. हे नरदेवा ! आपल्याच वीर्यापासून उत्पन्न झालेला पुत्र आपल्या पित्याला यमलोकातून स्वर्गलोकी नेतो . 'हा पुत्र तुझाच आहे'-शकुन्तलेने सत्यच सांगितले आहे॥ १२-१३ ॥
भरतस्य
पत्नित्रये नव पुत्रा बभूवुः ॥ १४ ॥
भरतला तीन कन्या होत्या ज्यांना नऊ पुत्र झाले ॥ १४॥
नैते
ममानुरूपा इत्यभिहितास्तन्मातरः परित्यागभयात्तत्पुत्राञ्जघ्नुः ॥ १५ ॥
भरत जेव्हा म्हणाला की, 'हे मला अनुरूप नाहीत,” तेव्हा त्यांच्या मातांनी राजा आपला त्याग करेल ह्या भयाने त्या पुत्रांना मारून टाकले ॥ १५ ॥
ततोस्य वितथे पुत्रजन्मनि पुत्रार्थिनो मरुत्सोमयाजिनो दीर्घतमसः पार्ष्ण्यपास्तद्बृहस्पति
वीर्यादुतथ्यपत्न्यां ममतायां समुत्पन्नो भरद्वाजाख्यः पुत्रो मरुद्भिर्दत्तः ॥
१६ ॥
अशा प्रकारे पुत्रजन्मासाठी भरतने मरुत्सोम नामक यज्ञ केला. ह्या यज्ञाच्या शेवटी मरुद्गगणाने त्याला भरद्वाज नामक एक बालक पुत्र रूपात दिला जो उतथ्य पत्नी ममताच्या गर्भात स्थित दीर्घतमा मुनिच्या पादप्रहाराने स्खलित झालेल्या बृहहस्पतिच्या वीर्यापासून उत्पन्न झाला होता ॥१६॥
तस्यापि
नामनिर्वचनश्लोकः पठ्यते ॥ १७ ॥
त्याच्या नामकरणा विषयी हा श्लोक सांगितला जातो -॥ १७ ।।
मूढे भर द्वाजमिमं भरद्वाजं
बृहस्पते । यातौ यदुक्त्वा पितरौ भरद्वाजस्ततस्त्वयम् ॥ १८ ॥
"पुत्रोत्पत्ति नन्तर बृहस्पति ममताला म्हणाला मूढ़े ! हा पुत्र द्वाज (आपल्या दोघांपासून उत्पन्न झालेला) आहे तू ह्याचे भरण कर. तेव्हा ममता म्हणाली-हे बृहस्पते ! हा पुत्र द्वाज आहे म्हणून तु त्याचे भरण कर.' असा परस्पर विवाद करत त्याचे मातापिता निघून गेले म्हणून त्याचे नाव भारद्वाज पडले ॥१८॥
भरद्वाजःस
तस्य वितथे पुत्रजन्मनि मरुद्भिर्दत्तस्ततो वितथसंज्ञामवाप ॥ १९ ॥
पुत्र-जन्म विफल झाल्यावर मरुद्गणाने राजा भरताला भरद्वाज दिला होता, म्हणून त्याचे नाव "वितथ" असेही पडले ॥ १९॥
वितथस्यापि
मन्युः पुत्रोऽभवत् ॥ २० ॥
बृहत्क्षत्रमहावीर्यनगरगर्गा
अभवन्मन्युपुत्राः ॥ २१ ॥
वितथचा पुत्र मन्यु होता व मन्युला बृहत्क्षत्र, महावीर्य, नर आणि गर्ग आदि अनेक पुत्र झाले ॥ २०-२१ ॥
नगरस्य
संकृतिः संकृतेर्गुरुप्रीतिरन्तिदेवौ ॥ २२ ॥
नरचा पुत्र संस्कृति आणि संस्कृतिला गुरुप्रीति व रन्तिदेव नामक दोन पुत्र झाले ॥ २२ ॥
गर्गाच्छिनिः
ततश्च गार्ग्याः शैन्याः क्षत्रोपेता द्विजातयो बभूवुः ॥ २३ ॥
गर्गपासून शिनिचा जन्म झाला ज्याच्यापासून गार्ग्य आणि शैन्य नावाने विख्यात असलेले क्षत्रोपेत ब्राह्मण उत्पन्न झाले ॥ २३ ॥
महावीर्याच्च
दुरुक्षयो नाम पुत्रोऽभवत् ॥ २४ ॥
महावीर्यचा पुत्र दुरुक्षय झाला ॥ २४ ॥
तस्य
त्रय्यारुणिः पुष्करिण्यो कपिश्च पुत्रक्षयमभूत् ॥ २५ ॥
त्याला व्रय्यारुणि, पुष्करिण्य आणि कपि नामक तीन पुत्र झाले ॥ २५ ॥
तच्च
पुत्रत्रितयमपि पश्चाद्विप्रतामुपजगाम् ॥ २६ ॥
हे तीनही पुत्र नंतर ब्राह्मण झाले होते॥२६ ॥
बृहत्क्षत्रस्य सुहोत्रः
॥ २७ ॥ सुहोत्रद्धस्ती य इदं हस्तिनपुरमावासयामास ॥ २८ ॥
बृहत्क्षत्रचा पुत्र सुहोत्र, आणि सुहोत्रचा पुत्र हस्ती होता ज्याने हे हस्तिनापुर नामक नगर वसवले होते ॥ २७-२८॥
अजमीढद्विजमीढास्त्रयो
हस्तिनस्तनयाः ॥ २९ ॥ अजमीढात्कण्वः ॥ ३० ॥ कण्वान्मेधातिथिः ॥ ३१ ॥ यतः कण्वायना द्विजाः
॥ ३२ ॥
हस्तीला अजमीढ, द्विजमीढ आणि पुरुमीढ हे तीन पुत्र होते . अजमीढला कण्व आणि कण्वला मेधातिथि नामक पुत्र झाला ज्याच्या पासून काण्वायन ब्राह्मण उत्पन्न झाले ॥ २९-३२॥
अजमीढस्यान्यः पुत्रो बृहदिषुः ॥ ३३ ॥
अजमीढचा दूसरा पुत्र बृहदिषु होता ॥ ३३ ॥
बृहदिषोर्बृहद्धनुः बृहद्धनुषश्च बृहत्कर्मा ततश्च जयद्रथः तस्मादपिविश्वजित् ॥३४॥ ततश्च सेनजित् ॥३५॥ रुचिराश्वकाश्यदृढहनुवत्स
हनुसंज्ञाःसेनजितः पुत्राः ॥ ३६ ॥
त्याला बृहद्धनु, बृहद्धनुला बृहत्कर्मा, बृहत्कर्माला जयद्रथ, जयद्रथला विश्वजित् आणि विश्वजित् पासून सेनजित् चा जन्म झाला. सेनजित् ला रुचिराश्व, काश्य, दृढहनु आणि वत्सहनु नामक चार पुत्र झाले।। ३४-३६ ॥
रुचिराश्वपुत्रः पृथुसेनः
पृथुसेनात्पारः ॥ ३७ ॥ पारान्नीलः ॥ ३८ ॥ तस्यैकशतं पुत्राणाम् ॥ ३९ ॥ तेषां प्रधानः काम्पिल्याधिपतिःसमरः
॥ ४० ॥
रुचिराश्वला पृथुसेन, पृथुसेनला पार आणि पारपासून नीलचा जन्म झाला. ह्या नीलला शंभर पुत्र होते, ज्यापैकी काम्पिल्यनरेश समर प्रधान होता ॥३७-४०॥
समरस्यापि
पारसुपारसदश्वास्त्रयः पुत्राः ॥ ४१ ॥
समरला पार, सुपार आणि सदस्य नामक तीन पुत्र होते॥ ४१॥
सुपारात्पृथुः
पृथोःसुकृतिस्ततो र्विभ्राजः ॥ ४२ ॥ तस्माच्चाणुहः ॥
४३ ॥ यः शुकदुहितरं
कीर्ति नामोपयेमे ॥ ४४ ॥
सुपारला पृथु, पृथुला सुकृति, सुकृतिला विभ्राज आणि विभ्राजला अणुह नामक पुत्र झाला, ज्याने शुककन्या कीर्तिसोबत विवाह केला होता ।। ४२-४४ ॥
अणुहाद्ब्रह्मदत्तः
॥ ४५ ॥ ततश्च विष्वक्सेनस्तस्मादुदक्सेनः ॥ ४६ ॥ भल्लाभस्तस्य चात्मजः ॥ ४७ ॥
अणुहपासूम ब्रह्मदत्तचा जन्म झाला. ब्रह्मादत्तला विष्वक्सेन, विष्वक्सेनला उद्कसेन आणि उद्कसेनला भल्लाभ नामक पुत्र झाला॥ ४५-४७ ॥
द्विजमीढस्य तु यवीनरसंज्ञः
पुत्रः ॥ ४८ ॥
द्विजमीढचा पुत्र यवीनर होता ।। ४८ ॥
तस्यापि धृतिमांस्तस्माच्च सत्यधृतिस्ततश्च दृढनेमिस्तस्माच्च सुपार्श्वस्ततःसुमतिस्ततश्च
सन्नतिमान् ॥ ४९ ॥ सन्नतिमतः कृतः पुत्रोऽभूत् ॥५०॥ यं हिरण्यनाभो योगमध्यापयामास ॥ ५१ ॥ यश्चतुर्विंशतिप्राच्यसामागानां संहिताश्चकार ॥ ५२ ॥
त्याचा धृतिमान्, धृतिमान् चा सत्यधृति, सत्यधृतिचा दृढनेमि, दृढनेमिचा सुपार्श्व, सुपार्श्वचा सुमति, सुमतिचा सन्नतिमान् आणि सन्नतिमान् चा पुत्र कृत होता ज्याने हिरण्य ह्या नावाने योगविद्या शिकवली तसेच प्राच्य सामग श्रुतिंच्या चोवीस संहिता रचल्या ॥ ४९-५२ ।।
कृताच्चोग्रायुधः
॥ ५३ ॥ येन प्राचुर्येण नीपक्षयः कृतः ॥ ५४ ॥
कृतचा पुत्र उग्रायुध होता ज्याने अनेक नीपवंशी क्षत्रियांचा नाश केला ॥ ५३-५४ ॥
उग्रायुधात्क्षेम्यः क्षेम्यात्सुधीरस्तस्मादरिपुञ्जयस्तस्माच्च बहुरथ इत्येते पौरवाः
॥ ५५ ॥
उग्रायुधला क्षेम्य, क्षेम्यला सुधीर, सुधीरला रिपुञ्जय आणि रिपुञ्जयला बहुरथ नावाचा पुत्र झाला . हे सर्व पुरु वंशीय राजागण झाले ॥ ५५ ॥
अजमीढस्य नलिनी नाम पत्नी तस्यां नीलसंज्ञः पुत्रोऽभवत् ॥ ५६ ॥
अजमीढची नलिनी नावाची एक भार्या. तिला नील नामक एक पुत्र झाला ॥ ५६ ।।
तस्मादपि
शान्तिः शान्तेः सुशान्तिः सुशान्तेः पुरञ्जयः तस्माच्च ऋक्षः ॥ ५७ ॥
ततश्च
हर्यश्वः ॥ ५८ ॥
नीलला शान्ति, शान्तिला सुशान्ति, सुशान्तिला पुरञ्जय, पुरञ्जयला ऋक्ष आणि ऋक्षला हर्यश्व नामक पुत्र झाला ॥ ५७- ५८ ॥
तस्मान्मुद्गल सृंजय बृहदिषु यवीनर काम्पिल्य संज्ञाः पञ्चानामैव तेषां विषयाणां रक्षणायालमेते
मत्पुत्रा इति पित्राभिहिताः पाञ्चालाः ॥ ५९ ॥
हर्यश्वला मुद्गल, सृंजय, बृहदिषु, यवीनर आणि काम्पिल्य नामक पाच पुत्र झाले. पित्याने म्हटले की माझे हे पुत्र माझ्या आश्रित पाच देशांची रक्षा करण्यास समर्थ आहेत, म्हणून ते पांचाल बनले ॥ ५९ ।
मुद्गलाच्च मौद्गल्याः क्षत्रोपेता द्विजातयो बभूवुः ॥ ६० ॥
मुद्गलपासून मौद्गल्य नामक क्षत्रोपेत ब्राह्मणांची उत्पत्ति झाली ॥६०॥
मुद्गलाद्बृहदश्वः
॥ ६१ ॥
बृहदश्वाद्दिवोदासोऽहल्या
च मिथुनमभूत् ॥ ६२ ॥
मुद्गलला बृहदश्व आणि बृहदश्वला दिवोदास नामक पुत्र आनि अहल्या नामक एक कन्या झाली ॥ ६१-६२ ॥
शरद्वतश्चाहल्यायां
शतानन्दोऽभवत् ॥ ६३ ॥
अहल्येने महर्षि गौतम ह्यांच्या द्वारा शतानन्दला जन्म दिला ।। ६३ ।।
शतानन्दात्सत्यधृतिर्धनुर्वेदान्तगो
जज्ञे ॥ ६४ ॥
शतानन्दपासून धनुर्वेदचा पारदर्शी सत्यधृति उत्पन्न झाला ॥६४॥
सत्यधृतेर्वराप्सरसमुर्वशीं
दृष्ट्वा रेतस्कन्नं शरस्तम्बे पपात ॥ ६५ ॥
एकदा
अप्सरांमध्ये श्रेष्ठ उर्वशीला पाहिल्याने सत्यधृतिचे वीर्य स्खलित होऊन शरस्तम्बावर पडले ॥ ६५ ॥
तच्च
द्विधागतमपत्यद्वयं कुमारः कन्या चाभवत् ॥ ६६ ॥
ते दोन भागात विभागले गेल्याने पुत्र और पुत्रीरूपी दोन संतति जन्माला आली ॥६६॥
तौ च मृगयामुपयातः शन्तनुर्दृष्ट्वा कृपया जग्राह ॥ ६७ ॥
मृगयेसाठी गेलेले राजा शांतनु त्यांना दयाबुद्धीने घेऊन आले ॥ ६७ ॥
ततः कृपः कुन्या चाश्वत्थाम्नो जननी कृपी द्रोणाचार्यस्य पत्न्यभवत् ॥ ६८ ॥
त्यानन्तर पुत्राचे नाव कृप पडले आणि कन्या अश्वत्थामाची माता द्रोणाचार्यची पत्नी कृपी झाली ॥ ६८ ॥
दिवोदासस्य पुत्रो मित्रायुः ॥ ६९ ॥
दिवोदासचा पुत्र मित्रायु होता ॥ ६९ ॥
मित्रायोश्चयवनो
नाम राजा ॥ ७० ॥ च्यवनात्सुदासः सुदासात्सौदासः सौदासात्सहदेवस्तस्यापि
सोमकः ॥ ७१ ॥ सोमकाज्जन्तुः पुत्रशतज्येष्ठोऽभवत् ॥ ७२ ॥ तेषां यवीयान् पृषतः पृषताद् द्रुपदस्तस्माच्च धृष्टद्युम्नस्ततोधृष्टकेतुः
॥ ७३ ॥
मित्रायुचा पुत्र च्यवन नामक राजा होता, च्यवनचा सुदास, सुदासचा सौदास, सौदासचा सहदेव, सहदेवचा सोमक आणि सोमकला शंभर पुत्र झाले, ज्यापैकी जन्तु सर्वात मोठा व
पृषत सर्वात छोटा होता . पृषतचा पुत्र द्रुपद, द्रुपदचा धृष्टद्युम्न आणि धृष्टद्युम्नचा पुत्र धृष्टकेतु होता ॥७०-७३ ॥
अजमीढस्यान्यो ऋक्षनामा
पुत्रोऽभवत् ॥ ७४ ॥
अजमीढला ऋक्ष नामक आणि एक पुत्र होता ॥ ७४ ॥
तस्य
संवरणः ॥७५॥ संवरणात्कुरुः ॥७६॥ य इदं धर्मक्षेत्रं कुरुक्षेत्रं चकार ॥७७॥
त्याचा पुत्र संवरण होता, संवरणचा पुत्र कुरु होता ज्याने धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राची स्थापना केली ॥७५ - ७७ ॥
सुधनुर्जह्नुपरीक्षित्प्रमुखाः
कुरोः बभूवुः ॥ ७८ ॥
कुरुला सुधनु, जहु आणि परीक्षित् आदि पुत्र होते ॥ ७८ ॥
सुधनुषः
पुत्रःसुहोत्रस्तस्माच्च्यवनश्च्यवनात् कृतकः ॥ ७९ ॥
ततश्चोपरिचरो
वसुः ॥ ८० ॥
सुधनुचा पुत्र सुहोत्र, सुहोत्रचा च्यवन, च्यवनचा कृतक आणि कृतकचा पुत्र उपरिचर वसु झाला॥ ७९-८० ॥
बृहद्रथ
प्रत्यग्र कुशाम्ब कुचेलमात्स्यप्रमुखाः वसोः पुत्राः सप्ताजायन्त ॥ ८१ ॥
वसुचे बृहद्रथ, प्रत्यग्र, कुशाम्बु, कुचेल आणि मात्स्य आदि सात पुत्र होते ॥ ८१ ॥
बृहद्रथात्कुशाग्रः कुशाग्राद्वृषभः वृषभात् पुष्पवान् तस्मात्सत्यहितः तस्मात्सुधन्वा
तस्य च जतुः ॥ ८२ ॥
ह्यातील बृहद्रथला कुशाग्र, कुशाग्रला वृषभ, वृषभला पुष्पवान, पुष्पवानला सत्यहित, सत्यहितला सुधन्वा आणि सुधन्वाला जतु नावाचा पुत्र झाला ॥ ८२ ॥
बृहद्रथाच्चान्यः शकलद्वयजन्मा जरया सन्धितो जरासन्धनामा ॥ ८३ ॥
बृहद्रथला दोन तुकड्यांमध्ये विभागलेला एक आणखी पुत्र होता जो जरा द्वारा जोडला गेल्याने त्याचे नाव जरासन्ध पडले ॥ ८३ ॥
तस्मात्सहदेवः सहदेवात्सोमपः ततश्च श्रुतिश्रवाः ॥ ८४ ॥
त्याने सहदेवला जन्म दिला तसेच सहदेवपासून सोमप आणि सोमपपासून श्रुतिश्रवाची उत्पत्ति झाली ॥ ८४ ॥
इत्येते मया मागधा भूपालाः कथिताः ॥ ८५ ॥
अशा प्रकारे मी तुला हे मागध भूपालांचे वर्णन केले आहे ॥ ८५ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा