॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः ॥ विंशोऽध्यायः ॥
"कुरु वंशाचे वर्णन"
श्रीपराशर उवाच
परीक्षितश्च जनमेजय श्रुतसेनोग्रसेन भीमसेनाश्चत्वारः पुत्राः ॥ १ ॥ जह्नोस्तु सुरथोनामात्मजो बभूव ॥ २ ॥
श्री पराशर म्हणाले ;- कुरु पुत्र परीक्षितला जनमेजय, श्रुतसेन, उग्रसेन आणि भीमसेन नामक चार पुत्र झाले आणि जह्नुला सुरथ नामक एक पुत्र झाला ॥ १-२ ॥
तस्यापि
विदूरथः ॥ ३ ॥
तस्मात्सार्वभोमः
सार्वभौमाज्जयत्सेनः तस्मादाराधितस्ततश्चायुत अयुरयुतायोरक्रोधनः ॥ ४ ॥ तस्माद्देवातिथिः ॥ ५ ॥ ततश्च ऋक्षोऽन्योभवत्
॥ ६ ॥
सुरथला विदुरथ, विदूरथला सार्वभौम, सार्वभौमला जयत्सेन, जयत्सेनला आराधित, आराधितला अयुतायु, अयुतायुला अक्रोधन, अक्रोधनला देवातिथि आणि देवातिथिला [अजमीढचा पुत्र ऋक्ष वेगळा] ऋक्ष नावाचा पुत्र झाला ॥ ३-६ ॥
ऋक्षाद्भीमसेनस्ततश्च
दिलीपः ॥ ७ ॥ दिलीपात् प्रतीपः ॥ ८ ॥
ऋक्षला भीमसेन, भीमसेनला दिलीप आणि दिलीपला प्रतीप नामक पुत्र झाला ॥ ७-८॥
तस्यापि देवापि शान्तनु
बाह्लीक संज्ञास्त्रयः पुत्रा बभूवुः ॥ ९ ॥
प्रतीपला देवापि, शान्तनु आणि बाल्हिक नामक तीन पुत्र झाले ॥ ९॥
देवापिर्बाल
एवारण्यं विवेश ॥ १० ॥ शान्तनुस्तु महीपालोऽभूत्
॥ ११ ॥
ह्यापैकी देवापि बाल्यावस्थेतच वनात गेला म्हणून शान्तनु राजा झाला ॥ १०-११ ।।
अयं
च तस्य श्लोकः पृथिव्यां गीयते ॥ १२ ॥
त्याच्या विषयी पृथिवीतलावर हा श्लोक सांगितला जातो ॥ १२ ॥
यं यं
कराभ्यां स्पृशति जीर्णं यौवनमेति सः ।
शान्तिं
चाप्नोति येनाग्र्यां कर्मणा तेन शान्तनुः ॥ १३ ॥
"राजा शांतनु ज्याला आपल्या हाताने स्पर्श करायचा त्या वृद्ध पुरुषाला देखील युवावस्था प्राप्त होत असे तसेच त्याच्या स्पर्शाने समस्त जीवांना अत्युत्तम शान्तिलाभ होत होता , म्हणून त्याला शान्तनु म्हणायचे"॥ १३ ॥
तस्य च शान्तनो राष्ट्रे
द्वादशवर्षाणि देवो न ववर्ष ॥ १४ ॥
एकदा महाराज शांतनुच्या राज्यात बारा वर्ष पाऊस पडला नाही ॥ १४ ॥
ततश्चाशेषराष्ट्रविनाशमवेक्ष्यासौ राजा ब्राह्मणानपृच्छत् कस्मादस्माकं राष्ट्रे देवो
न वर्षति को ममापराध इति ॥ १५ ॥
तेव्हा सम्पूर्ण देश नष्ट होत असलेला पाहून राजाने ब्राह्मणांना विचारले, 'आपल्या राज्यात पाऊस का नाही पडला ? ह्यात माझा काय अपराध आहे ? ॥ १५॥
ततश्च
तमूचुर्ब्राह्मणाः ॥१६॥ अग्रजस्य ते हीयमवनिस्त्वया सम्भुज्यते अतः परिवेत्ता त्वमित्युक्तः
स राजा पुनस्तानपृच्छत् ॥१७॥ किं मयात्र विधेयमिति ॥१८॥
तेव्हा ब्राह्मण त्याला म्हणाले -'हे राज्य तुझ्या मोठ्या भावाचे आहे पण तू ते भोगत आहेस, म्हणून तू परिवेत्ता आहेस . त्यांच्या ह्या उत्तरावर राजा शांतनुने विचारले, 'मग ह्या संबंधी मला आता काय करायला हवे ? ॥ १६-१८ ॥
ततस्ते
पुनरप्यूचुः ॥ १९ ॥ यावद्देवापिर्न
पतनादिभिर्दोषैरभिभूयते तावदेतत्तस्यार्हं राज्यम् ॥ २० ॥
त्यावर ते ब्राह्मण म्हणाले जोपर्यंत तुझा मोठा भाऊ पतित होत नाही तोपर्यंत हे राज्य त्याच्याच योग्य आहे ॥ १९-२० ॥
तदलमेतेन
तु तस्मै दीयतामित्युक्ते तस्य मन्त्रिप्रवरेणाश्मसारिणा तत्रारण्ये तपस्विनो वेदवादविरोधवक्तारः
प्रयुक्ताः ॥ २१ ॥
म्हणून तू हे त्यालाच देऊन टाक, तुला ह्या राज्याचे काहीच प्रयोजन नाही. ब्राह्मणांनी असे म्हटल्यावर शांतनुचा मन्त्री अश्मसारी ह्याने वेदवादा विरुद्ध बोलणार्या तपस्व्यांना वनात नियुक्त केले॥ २१ ॥
तैरस्याप्यतिऋजुमतेर्महीपतिपुत्रस्य
बुद्धिर्वेदवाद विरोधमार्गानुसारिण्यक्रियत ॥ २२ ॥
त्यांनी सरलमति राजकुमार देवापिची बुद्धि वेदवादाच्या विरुद्ध मार्गात प्रवृत्त केली ॥ २२ ॥
राजा
च शान्तनुर्द्विजवचनोत्पन्न परिदेवनशोकस्तान् ब्राह्मणानग्रतः कृत्वाग्रजस्य प्रदानायारण्यं
जगाम ॥ २३ ॥
इथे राजा शान्तनु ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार दुःख व शोक व्यक्त करत ब्राह्मणांना पुढे करून आपल्या मोठ्या भावाला राज्य देण्यासाठी वनात गेला ॥ २३ ॥
तदाश्रममुपगताश्च
तमवनतमवनीपतिपुत्रं देवापिमुपतस्थुः ॥ २४ ॥
ते ब्राह्मणा
वेदवादानुबन्धीनि वचांसि राज्यमग्रजेन कर्तव्यमित्यर्थवन्ति तमूचुः ॥ २५ ॥
वनात गेल्यावर ते ब्राह्मणगण परम विनीत राजकुमार देवापिच्या आश्रमात उपस्थित झाले आणि 'ज्येष्ठ भ्रात्यानेच राज्य करायला हवे'- ह्याचे समर्थन करणारी अनेक वेदानुकूल वाक्ये सांगू लागले ॥ २४-२५ ॥
असावपि
देवापिर्वेदवाद विरोधयुक्तिदूषितं अनेकप्रकारं तानाह ॥ २६ ॥
पण त्यावेळी देवापिने वेदवादा विरुद्ध नाना प्रकारच्या दुषित गोष्टी केल्या ॥ २६ ॥
ततस्ते
ब्राह्मणाः शान्तनुमूचुः ॥ २७ ॥
तेव्हा ते ब्राह्मण शान्तनुला म्हणाले- ॥२७॥
आगच्छ
हे राजन् अलमत्रातिनिर्बन्धेन प्रशान्त एवासावना वृष्टिदोषः पतितोयं अनादिकालं अभिहितवेदवचन
दूषणोच्चरणात् ॥ २८ ॥
हे राजन् ! चल, आता इथे अधिक आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आता अनावृष्टिचा दोष शान्त झाला . अनादिकाळापासून पूजित असलेल्या वेदवाक्यांना दुषित म्हटल्याने देवापि पतित झाला आहे ॥ २८ ॥
पतिते
चाग्रजे नैव ते परिवेतृत्वं भवतीत्युक्तः शान्तनुःस्वपुरमागम्य राज्यमकरोत् ॥ २९ ॥
ज्येष्ठ भ्राता पतित झाल्याने आता तु परिवेत्ता नाही ठरत . त्यांनी असे म्हटल्यावर शान्तनु अपल्या राजधानीत गेला व राज्यशासन करू लागला ॥ २९ ॥
वेदवादविरोध
वचनोच्चारणदूषिते च शा तिष्ठत्यपि ज्येष्ठभ्रातर्यखिल सस्यनिष्पत्तये ववर्ष भगवान्पर्जन्यः
॥ ३० ॥
वेदवादा विरुद्ध बोलल्याने, देवापिच्या पतित झाल्याने, मोठा भाऊ असूनही धान्यांच्या उत्पत्ति साठी पर्जन्यदेव बरसू लागला ॥ ३० ॥
बाह्लीकात्सोमदत्तः पुत्रोऽभूत् ॥ ३१ ॥
सोमदत्तस्यापि भूरिभूरिश्रवशल्यसंज्ञास्त्रयः पुत्रा बभूवुः ॥ ३२ ॥
बाल्हिकला सोमदत्त नामक पुत्र झाला तसेच सोमदत्तला भूरि, भूरिश्रवा आणि शल्य नामक तीन पुत्र झाले ॥३१-३२॥
न्तनोरप्यमरनद्यां जाह्नव्यां उदारकीर्तिः अशेषशास्त्रर्थविद्भीष्मः पुत्रोऽभूत् ॥
३३ ॥
शान्तनुला गङ्गेपासून अत्यंत कीर्त्तिमान व सम्पूर्ण शास्त्र जाणणारा भीष्म नामक पुत्र झाला ॥ ३३ ॥
सत्यवत्यां
च चित्राङ्गद विचित्रवीर्यौ द्वौ पुत्रावुत्पादयामास शान्तनुः ॥ ३४ ॥
शांतनुला सत्यवतीपासून सुद्धा चित्राङ्गद व विचित्रवीर्य नामक दोन पुत्र झाले ॥ ३४ ॥
चित्राङ्गदस्तु
बाल एव चित्राङ्गदेनैव गन्धर्वोणाहवे निहतः ॥ ३५ ॥
त्यातील चित्राङ्गदाला बाल्यावस्थेतच चित्राङ्गद नावाच्याच एका गन्धर्वाने युद्धात ठार मारले ॥३५॥
विचित्रवीर्योऽपि
काशीराजतनये अम्बिकाम्बालिके उपयेमे ॥ ३६ ॥
विचित्रवीर्याचा काशिराजाच्या कन्या अम्बिका व अम्बालिका यांच्या सोबत विवाह झाला ॥ ३६ ॥
तदुपभोगातिखेदाच्च
यक्ष्मणा गृहीतः स पञ्चत्वमगमत् ॥ ३७ ॥
त्यांच्या उपभोगात अत्यन्त व्यग्र राहिल्याने त्याला यक्ष्मा होऊन त्याचा अकाली मृत्यु झाला ॥ ३७ ॥
सत्यवतीनियोगाच्च मत्पुत्रः कृष्णद्वैपायनो मातुर्वचनमनतिक्रमणीयमिति कृत्वा विचित्रवीर्यक्षेत्रे
धृतराष्ट्रपाण्डु तत्प्रहितभुजिष्यायां विदुरं चोत्पादयामास ॥ ३८ ॥
त्यानन्तर माझा पुत्र कृष्णद्वैपायन ह्याला सत्यवतीने नियुक्त केले व मातेचा शब्द टाळणं उचित नसल्याने त्याने विचित्रवीर्यच्या पत्निपासून धृतराष्ट्र व पाण्डु नामक दोन पुत्र उत्पन्न केले व त्यांनी पाठविलेल्या दासीपासून विदुर नामक एक पुत्र उत्पन्न केला ॥ ३८॥
धतराष्ट्रोपि
गान्धार्यां दुर्योधन दुःशासनप्रधानं पुत्रशतमुत्पादयामास ॥ ३९ ॥
धृतराष्ट्रानेही गांधारीपासून दुर्योधन व दुःशासन आदि शंभर पुत्रांना जन्म दिला ॥ ३९ ॥
पाण्डोरप्यरण्ये मृगयायां
ऋषिशापोपहत प्रजाजननसामर्थ्यस्य धर्म वायु शक्रैर् युधिष्ठिर भीमसेनार्जुनाः कुन्त्यां
नकुलसहदेवौ चाश्विभ्यां माद्रयां पञ्चपुत्राःसमुत्पादिताः ॥ ४० ॥
पाण्डु मृगयेच्यावेळी वनात असताना ऋषिच्या शापामुळे सन्तानोत्पादनात असमर्थ झाला होता म्हणून त्याची स्त्री कुंती हिने धर्म, वायु आणि इंद्र ह्यांच्यापासून क्रमशः युधिष्ठिर, भीम व अर्जुन नामक तीन पुत्र तसेच माद्रीने दोन्ही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव नामक दोन पुत्र उत्पन्न केले . अशाप्रकारे त्याला पाच पुत्र झाले ॥ ४० ॥
तेषां
च द्रौपद्यां पञ्चैव पुत्रा बभूवुः ॥ ४१ ॥
त्या पाचजणांना द्रौपदी पासून पाच पुत्र झाले ॥ ४१ ॥
युधिष्ठिरात्प्रतिविन्ध्यः
भीमसेनाच्छुतसेनः श्रुतकीर्तिरर्जुनाच्छुतानीको नकुलाच्छुतकर्मा सहदेवात् ॥ ४२ ॥
त्यापैकी युधिष्ठिरचा प्रतिविन्ध्य, भीमसेनचा ध्रुतसेन, अर्जुनचा श्रुतकीर्ति, नकुलचा श्रुतानीक व सहदेवचा पुत्र श्रुतकर्मा होता ॥४२ ॥
अन्ये
च पाण्डवानामात्मजास्तद्यथा ॥ ४३ ॥
ह्या व्यतिरिक्त पांडवांना आणखी पुत्रही झाले ॥४३॥
यौधेयी
युधिष्ठिराद्देवकं पुत्रमवाप ॥ ४४ ॥
हिडिम्बा
घटोत्कचं भीमसेनात्पुत्रं लेभे ॥ ४५ ॥
काशी
च भीमसेनादेव सर्वगं सुतमवाप ॥ ४६ ॥
सहदेवाच्च
विजयी सुहोत्रं पुत्रमवाप ॥ ४७ ॥
रेणुमत्यां
च नकुलोपि निरमित्रमजीजनत् ॥ ४८ ॥
जसे युधिष्ठिराला यौधेयीपासून देवक नामक पुत्र, भीमसेनला हिडिंबेपासून घटोत्कच आणि काशीपासून सर्वग नामक पुत्र, सहदेवला विजयीपासून सुहोत्र नावाचा पुत्र झाला, नकुलला रेणुमतीपासून निरमित्र झाला ॥ ४४-४८॥
अर्जुनस्याप्युलूप्यां
नागकन्यायामिरावान्नाम पुत्रोऽभवत् ॥ ४९ ॥
अर्जुनला नागकन्या उलूपीपासून इरावान नामक पुत्र झाला ॥ ४९॥
मणीपुरपतिपुत्र्यां
पुत्रिकाधर्मेण बभ्रुवाहनं नाम पुत्रमर्जुनोऽजनयत् ॥ ५० ॥
मणिपुर नरेशच्या पुत्रीपासून अर्जुनने पुत्रिका-धर्मानुसार बभ्रुवाहन नामक एक पुत्र उत्पन्न केला ॥ ५० ॥
सुभद्रायां
चार्भकत्वेपि योऽसावतिबलपराक्रमः समस्तारातिरथजेता सोऽभिमन्युरजायत ॥ ५१ ॥
तसेच त्याला सुभद्रेपासून अभिमन्यु झाला जो बाल्यावस्थेतच अतिशय बल-पराक्रम सम्पन्न व आपल्या समस्त शत्रुवर जय मिळवणारा होता ॥५१॥
अभिमन्योरुत्तरायां
परिक्षीणेषु कुरुष्वश्वत्थामप्रयुक्तब्रह्मास्त्रेण गर्भ एव भस्मीकृतो भगवतः सकलसुरासुर
वन्दितचरणयुगलस्य आत्मेच्छया कारण मानुषरूपधारीणोनुभावात् पुनर्जीवितमवाप्य परीक्षिज्जज्ञे
॥ ५२ ॥
योऽयं साम्प्रतमेतद् भूमण्डलमखण्डितायतिधर्मेण पालयतीति ॥ ५३ ॥
त्यानन्तर, कुरुकुल झाल्यावर जो अश्वत्थामाने प्रहार केलेल्या ब्रह्मास्त्र द्वारा गर्भातच भस्मीभूत झाला होता, पण ज्याने आपल्या इच्छेनेच माया मानव देह धारण केलेला त्या सकलसुरासुरवन्दित चरणारविन्द श्रीकृष्णाच्या प्रभावाने पुन्हा जीवित झाला; त्या परीक्षिताने अभिमन्यु द्वारा उत्तरेच्या गर्भातून जन्म घेतला जो ह्यावेळी धर्मपूर्वक सम्पूर्ण भूमण्डलाचे शासन करत आहे ज्यामुळे भविष्यातही त्याची सम्पत्ति क्षीण होऊ नये ॥ ५२-५३ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थांशे विंशोऽध्यायः (२०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा