शनिवार, १८ जुलै, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, षोडश, सप्तदश, अष्टादश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 16/17/18

 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः षोडशोऽध्यायः

 

"दुर्वसुच्या वंशाचे वर्णन"

श्रीपराशर उवाच
इत्येष समासतस्ते यदोर्वंशः कथितः ॥ १ ॥
 अथ तुर्वसोर्वंशमवधारय ॥ २ ॥ तुर्वसोर्वह्निरात्मजः वह्नेर्भार्गः भार्गाद्‍भानुस्ततश्च त्रयीसानुस्तस्माच्च करन्दमस्तस्यापि मरुत्तः ॥ ३ ॥  सोऽनपत्योभवत् ॥ ४ ॥
ततश्च पौरवं दुष्यन्तं पुत्रमकल्पयत् ॥ ५ ॥
एवं ययातिशापात्तद्वंशः पौरवमेव वंशं समाश्रितवान् ॥ ६ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- अशा प्रकारे मी तुला संक्षेपात यदुच्या वंशाचे वर्णन केले ॥१॥
आता दुर्वसुच्या वंशाचे वर्णन ऐक ॥ २ ॥ दुर्वसुचा पुत्र वह्नि होता, वह्निचा भार्ग, भार्गचा भानु, भानुचा त्रयीसानु, त्रयीसानुचा करन्दम व करन्दमचा पुत्र मरुत्त होता ॥ ३॥ मरुत्त निस्सन्तान होता ॥४॥ म्हणून त्याने पुरुवंशी दुष्यंताचा पुत्ररूपात  स्वीकार केला ॥५॥ अशा प्रकारे ययातिच्या शापामुळे दुर्वसुच्या वंशाने पुरुवंशाचाच आश्रय घेतला ॥ ६ ॥


 इति श्रीविष्णुमहापुरामे चुतुर्थांशे षोडशोऽध्यायः (१६)






विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः सप्तदशोऽध्यायः

 

 

"द्रुह्यचा वंश"

श्रीपराशर उवाच
 द्रुह्योस्तु तनयो बभ्रुः ॥ १ ॥ बभ्रोःसेतुः ॥ २ ॥ सेतुपुत्र आरब्धनामा ॥ ३ ॥
 आरब्धस्यात्मजो गान्धारः गान्धारस्य धर्मः धर्मात् घृतः घृतात् दुर्दमस्ततः प्रचेताः ॥४॥ प्रचेतसः पुत्रः शतधर्मः बहुलानां म्लेछानां उदीच्यानामाधिपत्यमकरोत् ॥ ५ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- द्रुह्यचा पुत्र बभ्रु होता, बभ्रुचा सेतु, सेतुचा आरब्ध, आरब्धचा गान्धार, गान्धारचा धर्म, धर्मचा घृत, घृतचा दुर्दम, दुर्दमचा प्रचेता तसेच प्रचेताचा पुत्र शतधर्म होता . ह्याने उत्तरवर्ती अनेक म्लेच्छांचे आधिपत्य केले ॥ १ ५ ॥॥

 


 इति विष्णुमहापुराणे चतुर्थांशे सप्तदशोऽध्यायः (१७)



 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः अष्टादशोऽध्यायः



 "अनुवंश"

श्रीपराशर उवाच
 ययातेश्चातुर्थपुत्रस्यानोःसभानलचक्षुः परमेषुसंज्ञास्त्रयः पुत्रा बभूवुः ॥ १ ॥ सभानलपुत्रः कालानलः ॥ २ ॥ कालानलात्सृंजयः ॥ ३ ॥ सृंजयात् पुरञ्जयः ॥ ४ ॥
 पुरञ्जयाज्जनमेजयः ॥ ५ ॥ तस्मान्महाशालः ॥ ६ ॥ तस्माच्च महामनाः ॥ ७ ॥
 तस्मादुशीनरतितीक्षू द्वौ पुत्रावुत्पन्नौ ॥ ८ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- ययातिचा चौथा पुत्र अनु ह्याला सभानल, चक्षु आणि परमेषु नामक तीन पुत्र होते. सभानलका कालानल नावाचा पुत्र झाला, कालानलचा सृञ्जय, सृञ्जयचा पुरञ्जय, पुरञ्जयचा जनमेजय, जनमेजयचा महाशाल, महाशालचा महामना आणि महामनाला उशीनर व तितिक्षु नामक दोन पुत्र झाले ॥ १-८॥


उशीनरस्यापि शिबिनृगनवकृमिवर्माख्याः पञ्च पुत्रा बभूवुः ॥ ९ ॥

उशीनरला शिबि, नृग, नर, कृमि आणि वर्म नामक पाच पुत्र झाले॥ ९॥

 


पृषदर्भसुवीरकेकयमद्रकाश्चत्वारः शबिपुत्राः ॥ १० ॥

त्यापैकी शिबिला पृषदर्भ, सुवीर, केकय आणि मद्रक हे चार पुत्र होते ॥१०॥

 


 तितीक्षोरपि रुशद्रथः पुत्रोऽभूत् ॥ ११ ॥
 तस्यापि हेमः हेमस्यापि सुतपाः सुतपसश्च बलिः ॥ १२ ॥

तितिक्षुचा पुत्र रुशद्रथ होता. त्याला हेम, हेमला सुतपा आणि सुतपाला बलि नामक पुत्र झाला॥११-१२ ।।


 यस्य क्षेत्रे दीर्घतमस अङ्‍गवङ्‍गकलिङ्‍ग सुह्यपौण्ड्राख्यं वालेयं क्षत्रमजन्यत ॥१३॥

ह्या बलिच्या क्षेत्रात (राणीपासून) दीर्घतमा नामक मुनिने अङ्ग, वङ्ग, कलिङ्ग, सुह्य आणि पौण्डू नामक पाच बालेय क्षत्रिय उत्पन्न केले ॥ १३ ॥

 


 तन्नामसन्तसतिसंज्ञाश्च पञ्चविषयाः बभूवुः ॥ १४ ॥

ह्या बलिपुत्रांच्या सन्ततिच्या नावानुसार पाच देशांचीही तीच नावे पडली ॥ १४ ॥


 अङ्‍गादनपानस्ततो दिविरथस्तस्माद्धर्मरथः ॥ १५ ॥ ततश्चित्ररथः रोमपादसंज्ञः ॥ १६ ॥ यस्य दशरथो मित्रं जज्ञे ॥ १७ ॥ यस्याजपुत्रो दशरथः शान्तां नाम कन्यां अनपत्यस्य दुहितृत्वे युयोज ॥ १८ ॥

त्यापैकी अंगला अनपान, अनपानचा दिविरथ, दिविरथला धर्मरथ आणि धर्मरथला चित्ररथ नावाचा पुत्र झाला ज्याचे दुसरे नाव रोमपाद होते. ह्या रोमपादाचा मित्र दशरथ होता, अजचा पुत्र दशरथ ह्याने रोमपाद सन्तानहीन असल्याने त्याला आपली शांता नावाची कन्या दत्तक दिली होती ॥ १५-१८।।


 रोमपादाच्चतुरङ्‍गः तस्मात्पृथुलाक्षः ॥ १९ ॥
 ततश्चम्पः यश्चम्पां निवेशायामास ॥ २० ॥

रोमपादचा पुत्र चतुरंग होता. चतुरंगला पृथुलाक्ष आणि पृथुलाक्षला चम्प नामक पुत्र झाला ज्याने चम्पा नावाची पुरी वसवली होती ॥ १९-२० ॥

 


 चम्पस्य हर्यङ्‍गो नामात्मजोऽभूत् ॥ २१ ॥ हर्यङ्‍गाद्‍भद्ररथः भद्ररथाद्‍बृहद्रथः बृहद्रथाद्‍बृहत्कर्मा बृहत्कर्मणश्च वृहद्‍भानुस्तस्माच्च बृहन्मनाः बृहन्मनसो जयद्रथः ॥२२॥

चम्पला हर्यङ्ग नावाचा पुत्र झाला, हर्यङ्गला भद्ररथ, भद्ररथला बृहद्रथ, बृहद्रथला बृहत्कर्मा, बृहत्कर्माला बृह्द्धानु, बृह्द्धानुला बृहन्मना, बृहन्मनाला जयद्रथ झाला ॥२१-२२ ।।

 


 जयद्रथो ब्रहमक्षत्रान्तरालसम्भूत्यां पत्‍न्यां विजयं नाम पुत्रमजीजनत् ॥ २३ ॥

जयद्रथच्या ब्राह्मण व क्षत्रियाच्या संसर्गातून उत्पन्न झालेल्या पत्नीच्या गर्भातून विजय नामक पुत्राचा जन्म झाला ॥ २३ ॥

 


 विजयश्च धृतिं पुत्रमवाप ॥ २४ ॥ तस्यापि धृतव्रतः पुत्रोऽभूत् ॥ २५ ॥
 धृतव्रतात्सत्यकर्मा ॥ २६ ॥  सत्यकर्मणस्त्वतिरथः ॥ २७ ॥ यो गङ्‍गाङ्‍गतो मञ्जूषागतं पृथापविद्धं कर्णं पुत्रमवाप ॥ २८ ॥ कर्णाद्वृषसेनः इत्येतदन्ता अङ्‍गवंश्याः ॥ २९ ॥

विजयला धृति नामक पुत्र झाला, धृतिला धृतव्रत, धृतव्रतला सत्यकर्मा आणि सत्यकर्मापासून अतिरथचा जन्म झाला ज्याने स्नानासाठी गंगेत गेल्यावेळी पृथेने पेटीत ठेवलेल्या वाहात आलेल्या कर्णाला पुत्ररूपात प्राप्त केले होते . ह्या कर्णाचा पुत्र वृषसेन होता. बस, अङ्गवंश इतकाच आहे ॥ २४-२९ ॥

 


अतश्च पुरुवंशं श्रोतुमर्हसि ॥ ३० ॥

ह्यापुढे पुरु वंशाचे वर्णन ऐक ॥ ३० ॥


 
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थांशेऽष्टादशोऽध्यायः (१८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमो ऽध्यायः ॥   "कालिया-दमन"   श्रीपराशर उवाच   एकदा तु विना रामं कृष्णो वृन...