बुधवार, १५ जुलै, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, पंचदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 15

 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः पञ्चदशोऽध्यायः

 

"शिशुपालाच्या पूर्व-जन्मान्तराचे तसेच वसुदेवाच्या सन्ततिचे वर्णन"

मैत्रेय उवाच
हिरण्यकशिपुत्वे च रावणत्वे च विष्णुना ।
अवाप निहतो भोगानप्राप्यानमरैरपि ॥ १ ॥

न लयं तत्र तेनैव निहतः स कथं पुनः ।
सम्प्राप्तः शिशुपालत्वे सायुज्यं शाश्वते हरौ ॥ २ ॥
श्री मैत्रेय म्हणाले ;- भगवन ! पूर्वजन्मी हिरण्यकश्यपु आणि रावण असल्याने ह्या  शिशुपालाला भगवान विष्णु द्वारा मारला गेल्याने देव-दुर्लभ भोगांची प्राप्ती झाली, पण तो त्या श्रीहरीत लीन नाही झाला; मग ह्या  जन्मीच त्याच्या द्वारा मारला गेल्यावर त्याने सनातन पुरुष श्रीहरीत सायुज्य मोक्ष कसा प्राप्त केला? ॥१-२॥

 


 एतदिच्छाम्यहं श्रोतुं सर्वधर्मभृतां वर ।
 कौतूहलपरेणैतत्पृष्टो मे वक्तुमर्हसि ॥ ३ ॥

हे समस्त धर्मात्मां मधील श्रेष्ठ मुनिवरा! ही गोष्ट जाणून घेण्याची माझी फार इच्छा आहे . अत्यन्त कुतूहलवश होऊन मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे, कृपया ह्याचे निरूपण करा ॥३॥


 

 श्रीपराशर उवाच
दैत्येश्वरस्य वधाय अखिललोकोत्पत्तिस्थितिविनाशकारिणा पूर्वं तनुग्रहणं कुर्वता नृसिंह रूपमाविष्कृतम् ॥ ४ ॥

श्रीपराशर म्हणाले; प्रथम जन्मात दैत्यराज हिरण्यकश्यपुचा वध करण्यासाठी सम्पूर्ण जगताची उत्पत्ति, स्थिति व नाश करणार्‍या भगवंताने शरीर ग्रहण करताना नृसिंह रूप प्रकट केले होते ॥४॥

 


 तत्र च हिरण्यकशिपोर्विष्णुरयमित्येतन्न मनस्यभूत् ॥ ५ ॥

त्यावेळी हिरण्यकश्यपुच्या चित्तात हा भाव नव्हता की हे विष्णु भगवान आहेत ॥ ५ ॥

 


 निरतिशय पुण्यसमुद्‍भूतमेतत् सत्त्वाजातमिति ॥ ६ ॥

केवळ इतकाच विचार होता की हा कोणी निरतिशय पुण्य समूहातून उत्पन्न झालेला प्राणी आहे ॥ ६॥



रजोद्रेकप्रेरितैकाग्रमतिः तद्‍भावनायोगात् ततोवाप्तवधहैतुकीं निरतिशयामेव अखिलत्रैलोक्यकारीणीं दशाननत्वे भोगसम्पदमवाप ॥ ७ ॥

रजोगुणी उत्कर्षाने प्रेरित होऊन त्याची मति त्या विपरीत भावनेनुसार दृढ़ झाली. म्हणून त्याच्या मनात ईश्वरी भावनेचा योग नसल्याने भगवंता द्वारा मारला गेल्यानेच रावणाचा जन्म घेतल्यावर त्याने सम्पूर्ण त्रैलोकात सर्वाधिक भोग संपत्ति प्राप्त केली ॥

 


 न तु स तस्मिन् अनादिनिधने परब्रह्मभूते भगवत्यनालम्बिनि कृते मनसस्तल्लयमवाप ॥ ८ ॥

त्या अनादि-निधन, परब्रह्मस्वरूप, निराधार भगवंतात चित्त एकाग्र न झाल्याने तो त्यांच्यात लीन झाला नाही॥८॥

 
एवं दशाननत्वेपि अनङ्‍गपराधीनतया जानकीसमासक्तचेतसा भगवता दाशरथि रूपधारिणा हतस्य तद्‍रूपदर्शनमेवासीत् नायमच्युत इत्यासक्तिर्विपद्यतोंऽतःकरणे मानुषबुद्धिरेव केवलमस्याभूत् ॥ ९ ॥

अशा प्रकारे रावण असूनही कामवश झाल्याने जानकीत चित्त लागले व भगवान दशरथनन्दन रामा द्वारा मारला गेल्यावर केवळ भगवंताचे रूपच दिसले; 'हे अच्युत आहेत अशी जाणीव झाली नाही, ऊलट मरते वेळी त्याच्या अन्तःकरणात केवळ मनुष्य बुद्धिच होती ॥ ९॥



 पुनरपि अच्युतविनिपातमात्रफलं अखिलभूमण्डल श्लाघ्यचेदिराजकुले जन्म अव्याहतैश्वर्यं शिशुपालत्वेप्यवाप ॥ १० ॥

तरीही अच्युता द्वारा मारला गेल्याचे फळ म्हणूत्याने सम्पूर्ण भूमण्डळात प्रशंसित अशा चेदिराजाच्या कुळात शिशुपाल रूपाने जन्म घेऊन अक्षय ऐश्वर्य प्राप्त केले।॥१०॥

 


 तत्र त्वखिलानामेव स भगवन्नाम्नां त्वङ्‍कारकारणमभवत् ॥ ११ ॥

त्या जन्मात तो भगवंताच्या प्रत्येक नियमात तुच्छतेची भावना ठेवू लागला ॥११॥

 


 ततश्च तत्कालकृतानां तेषामशेषणामेव अच्युतनाम्नामनवरतं अनेकजन्मसु वर्धितविद्वेषानुबन्धिचित्तो विनिन्दनसन्तर्जनादिषु उच्चारणमकरोत् ॥ १२ ॥

त्याचे हृदय अनेक जन्मांच्या द्वेषामुळे बद्ध होते, म्हणून तो भगवंताची निन्दा आणि तिरस्कार करत भगवंताच्या सर्व लीलाकृत नामांचे निरन्तर उच्चारण करत होता ॥१२॥

 


 तच्च रूपमुत्फुल्लपद्मदलामलाक्षिं अत्युज्ज्वलपीतवस्त्रधार्य मलकिरिटकेयूरहारकटकादि शोभितमुदारचतुर्बाहु शङ्‍खचक्रगदाधरमति प्ररूढवैरानुभावाद् अटनभोजनस्नानासनशयनादिषु अ्वशेषावस्थान्तरेषु नान्यत्रोपययावस्य चेतसः ॥ १३ ॥

पूर्ण उमललेल्या कमलदला समान ज्याचे निर्मल नेत्र आहेत, ज्याने उज्ज्वल पीताम्बर, निर्मल किरीट, केयूर, हार आणि कटक आदि धारण केले आहेत तसेच ज्याच्या लांबलांब चार भुजा आहेत आणि ज्याने शङ्ख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले आहेत, भगवंताचे हे दिव्य रूप तीव्र वैरभावामुळे भ्रमण, भोजन, स्नान, आसन आणि शयन आदि सम्पूर्ण अवस्थांमध्येही कधीच त्याच्या चित्तापासून वेगळे झाले नाही ॥ १३ ॥

 

 

ततस्तमेवाक्रोशेषु उच्चारयंस्तमेव हृदयेन धारयन्नात्मवधाय यावद् भगवद्धस्तचक्रांशु मालोज्ज्वालमक्षयतेजःस्वरूपं ब्रह्मभूतमपगतद्वेषादिदोषं भगवन्तमद्राक्षीत् ॥ १४ ॥

मग शिव्या देतानाही त्याचेच नामोच्चारण करणार्‍या व हृदयातही त्याचेच ध्यान करणार्‍या शिशुपालाने आपल्या वधासाठी हाती धारण केलेल्या चक्राच्या उज्ज्वल किरणजालांनी सुशोभित, अक्षय तेजस्वरूप, द्वेषादि सम्पूर्ण दोष रहित, ब्रह्मभूत भगवंताला पाहिले ॥ १४।।

 


 तावच्च भगवच्चक्रेणाशु व्यापादितस्तत्स्मरण दग्धाखिलाघसञ्चयो भगवतान्तं उपनीतस्ततस्मिन्नेव लयमुपययौ ॥ १५ ॥

तेव्हा त्वरित भगव्या चक्राने मारला गेला; भगवद् स्मरणामुळे सम्पूर्ण पापराशी दग्ध झाल्याने भगवंताद्वारा त्याचा अन्त झाला आणि तो त्यांच्यातच लीन झाला ॥ १५॥

 


 एतत्तवाखिलंमयाभिहितम् ॥ १६ ॥

अशा प्रकारे ह्या सम्पूर्ण रहस्याचे मी तुला वर्णन केले ॥ १६ ॥

 


 अयं हि भगवान् कीर्तितश्च संस्मृतश्च द्वेषानुबन्धेनापि अखिलमुरासुरादिदुर्लभं फलं प्रयच्छति किमुत सम्यग्भक्तिमतामिति ॥ १७ ॥

अहो! हा भगवंत द्वेषानुबन्धामुळे कीर्तन व स्मरण केल्याने सुद्धा समस्त देवता आणि असुरांना दुर्लभ परमफळ देतो, मग भक्ति-सम्पन्न पुरुषांविषयी तर सांगायलाच नको? ॥ १७ ॥





 वसुदेवस्य त्वानकदुन्दुभेः पौरवी रोहिणी मदिरा भद्रादेवकीप्रमुखा बह्व्यः पत्‍न्योऽभवन् ॥ १८ ॥

आनक दुन्दुभि वसुदेवाच्या पूर्व, रोहिणी, मदिरा, भद्रा आणि देवकी आदि अनेक स्त्रिया होत्या ॥ १८ ॥

 


 बलभद्र शठ सारण दुर्मदादीन् पुत्रान् रोहिण्यां आनकदुन्दुभिरुत्पादयामास ॥ १९ ॥

त्यापैकी रोहिणीपासून वसुदेवाने बलभद्र, शठ, सारण आणि मंद आदि अनेक पुत्र उत्पन्न केले ॥ १९ ॥

 


 बलदेवोऽपि रेवत्यां विशठोल्मुकौ पुत्रावजनयत् ॥ २० ॥

तसेच बलभद्राला रेवतीपासून विशठ आणि उल्मुक नामक दोन पुत्र झाले ॥ २० ॥

 


 सार्ष्टिमार्ष्टिशिशु सत्यधृतिप्रमुखाः सारणात्मजाः ॥ २१ ॥

साष्टि, पुष्टिं, शिशु, सत्य आणि धृति आदि सारणचे पुत्र होते ॥ २१ ॥

 


भद्राश्व भद्रबाहु दुर्दमभूताद्याः रोहिण्याः कुलजाः ॥ २२ ॥

ह्या व्यतिरिक्त भद्राश्व, भद्रबाहु, दुर्दम आणि भूत आदि सुद्धा रोहिणीचीच संतति होती ॥ २२ ॥

 


 नन्दोपनन्दकृतकाद्य मदिरायास्तनयाः ॥ २३ ॥
 भद्रायाश्चोपनिधिगदाद्याः ॥ २४ ॥

नन्द, उपनन्द आणि कृतक आदि मदिराचे तसेच उपनिधि आणि गद आदि भद्राचे पुत्र होते ॥ २३-२४ ॥

 


वैशाल्यां च कौशिकं एकमेवाजनयत् ॥ २५ ॥

वैशालीच्या गर्भापासून कौशिक नामक केवळ एकच पुत्र झाला ॥ २५॥




आनकदुन्दुभेर्देवक्यामपि कीर्तिमत्सुषेणोदायु भद्रसेनऋजदासभद्रदेवाख्याः षट् पुत्रा जज्ञिरे ॥ २६ ॥

आनक दुन्दुभिला देवकीपासून कीर्तिमान् सुषेण, उदायु, भद्रसेन, ऋजुदास तसेच भद्रदेव नामक सहा पुत्र झाले ॥ २६ ॥

 


 तांश्च सर्वानेव कंसोघातितवान् ॥ २७ ॥

ह्या सर्वांना कंसाने मारून टाकले होते ॥ २७ ॥

 


अनन्तरं च सप्तमं गर्भमर्धरात्रे भगवत्प्रहिता योगनिद्रा रोहिण्या जठरमाकृष्य नीतवती ॥ २८ ॥

नंतर भगवंताच्या प्रेरणेने योगमायाने देवकीच्या सातव्या गर्भाला मध्यरात्री ओढून रोहिणीच्या कुशीत स्थापित केले ॥२८॥

 


कर्षणाच्चासावपि संकर्षणाख्यामगमत् ॥ २९ ॥

आकर्षण केल्याने ह्या गर्भाचे नाव संक्रमण पडले ॥ २९ ॥

 


ततश्च सकलजगन्महातरुमूलभूतो भूतभविष्यदादि सकलसुरासुर मुनिजन मनसामप्यगोचरोऽब्जभवप्रमुखैः अनलमुखैः प्रणम्यावनिभारहरणाय प्रसादितो भगवाननादिमध्यनिधनो देवकीगर्भमवततार वासुदेवः ॥ ३० ॥
तत्प्रसादविवद्धमानोरुमहिमा च योगनिद्रा नन्दगोपपत्‍न्या यशोदाया गर्भमधितिष्ठितवती ॥ ३१ ॥

नन्तर सम्पूर्ण संसाररूपी महावृक्षाचे मूलस्वरूप, भूत, भविष्य आणि वर्तमानकालीन समस्त देव, असुर आणि मुनिजनांच्या बुद्धिला अगम्य तसेच ब्रह्मा व अग्नि आदि देवतां द्वारा प्रणाम करून भूभार हरण करण्यासाठी प्रसन्न केले गेलेले आदि, मध्य आणि अंतहीन अशा भगवान वासुदेवाने देवकीच्या गर्भातून अवतार घेतला . त्यांच्याच कृपेने वाढलेली योगनिद्रा सुद्धा नन्दगोपाची पत्नी यशोदेच्या गर्भात स्थित झाली ॥ ३०-३१॥

 


सुप्रसन्नादित्य चन्द्रादिग्रहमव्यालादिभयं स्वस्थमानसं अखिलमेवैतद् जगदपास्ताधर्ममभवत् तत्स्मिंश्च पुण्डरीकनयने जायमाने ॥ ३२ ॥

त्या कमलनयन भगवंताच्या प्रकट होण्याने हे सम्पूर्ण विश्व प्रसन्न झालेल्या सूर्य, चंद्र आदि ग्रहांनी सम्पन्न, सर्प आदिच्या भयाने रहित, अधर्म रहित तसेच स्वस्थचित्त झाले॥३२॥

 


जातेन च तेनाखिलं एवैतत्सन्मार्गवर्ति जगदक्रियत ॥ ३३ ॥

त्यांनी प्रकट होऊन ह्या समस्त विश्वाला सन्मार्गावलम्बी केले ॥३३॥


 भगवतोप्यत्र मर्त्यलोकेऽवतीर्णस्य षोडशसहस्राणि एकोत्तरशताधिकानि भार्याणामभवन् ॥ ३४ ॥

ह्या मृत्युलोकी अवतीर्ण झालेल्या भगवंताच्या सोळा हजार एकशे एक राण्या होत्या ॥ ३४ ॥

 

तासां च रुक्मिणी सत्यभामा जाम्बवती चारुहासिनीप्रमुखा ह्यष्टौ पत्‍न्यः प्रधाना बभूचवुः ॥ ३५ ॥

त्यात रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती आणि चारूहासिनी आदि आठ मुख्य होत्या ॥ ३५ ।।


 तासु चाष्टावयुतानिलक्षं च पुत्राणां भगवान् अखिलमूर्तिरनादिमानजनयत् ॥ ३६ ॥

अनादि भगवान अखिल मूर्तिने त्यांच्यापासून एक लाख ऐंशी हजार पुत्र उत्पन्न केले ॥ ३६ ॥


 तेषां च प्रद्युम्न चारुदेष्ण्यसाम्बादयस्त्रयोदश प्रधानाः ॥ ३७ ॥

त्यापैकी प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि साम्ब आदि तेरा पुत्र प्रधान होते ॥ ३७ ॥

 
प्रद्युम्नोपि रुक्मिणस्तनयां रुक्मवतीं नामोपयेमे ॥ ३८ ॥

प्रद्युम्नाने सुद्धा रुक्मीची पुत्री रुक्मवती बरोबर विवाह केला होता ॥३८॥


 तस्यामनिरुद्धो जज्ञे ॥ ३९ ॥

तिच्यापासून अनिरुद्धाचा जन्म झाला ॥ ३


 अनिरुद्धोऽपि रुक्मिणा एव पौत्रीं सुभद्रां नामो पयेमे ॥ ४० ॥

अनिरुद्धाने सुद्धा रुक्मीची पुत्री सुभद्रा हिच्याशी विवाह केला ॥ ४० ॥


 तस्यामस्य वज्रो जज्ञे ॥ ४१ ॥

तिच्यापासूवज्र उत्पन्न झाला ।। ४१ ।।


वज्रस्य प्रतिबाहुस्तस्यापि सुचारुः ॥ ४२ ॥

वज्रचा पुत्र प्रतिबाहु तसेच प्रतिबाहुचा सुचारु होता ।। ४२ ॥


 एवं अनेकशतसहस्र पुरुषसंख्यस्य यदुकुलस्य पुत्रसंख्या वर्षशतैरपि वक्तुं न शक्यते ॥ ४३ ॥

ह्याप्रकारे शेकडो हजार पुरुष संख्या असलेल्या यदुकुळाच्या संततिची गणना करायला शंभर वर्षही अपुरी पडतील ॥ ४३ ॥


 यतो हि श्लोकाविमावत्र चरितार्थौ ॥ ४४ ॥

कारण ह्या विषयी हो दोन श्लोक आहेत -- ॥ ४४॥


 तिस्त्रः कोट्यःसहस्राणां अष्टाशीति शतानि च ।
 कुमाराणां गृहाचार्याश्चापयोगेषु ये रताः ॥ ४५ ॥
संख्यानं यादवानां कः करिष्यति महात्मनाम् ।
 यत्रायुतानामयुतलक्षेणास्ते सदाहुकः ॥ ४६ ॥

गृहकार्य आणि कुमारांना धनुर्विद्येचे शिक्षण देण्यात जे यादव तत्पर असत त्यांचीच संख्या तीन करोड़ अट्ठ्याऐंशी लाख होती, तर मग जे लाखो-करोडोंच्या संख्येने सदैव यदुराज उग्रसेन सोबत राहायचे त्या महात्मा यादवांची गणना तरी कोण करेल ? ।। ४५-४६ ।।


देवासुरे हता ये तु दैतेयाःसुमहाबलाः ।
उत्पन्नास्ते मनुष्येषु जनोपद्रवकारिणः ॥ ४७ ॥

देवासुर-संग्रामात जे महाबली दैत्यगण मारले गेले होते ते मनुष्यलोकात उपद्रव करणारे राजा बनून उत्पन्न झाले ॥ ४७॥

 

रेषामुत्सादनार्थाय भुवि देवा यदोः कुले । अवतीर्णाः कुलशतं यत्रैकाभ्यधिकं द्विज ॥ ४८ ॥

त्यांचा नाश करण्यासाठी देवतांनी यदुवंशात जन्म घेतला ज्यात एकशेएक कुळे होती ।। ४८ ॥

 

विष्णुस्तेषां प्रमाणे च प्रभुत्वे च व्यवस्थितः ।
 निदेशस्थायिनस्तस्य ववृधुःसर्वयादवाः ॥ ४९ ॥

त्यांच्या नियन्त्रण आणि स्वामित्वावर भगवान विष्णुच अधिष्ठित झाले, व ते समस्त यादवगणांनी त्यांच्या आज्ञेनुसार वृद्धि प्राप्त केली ॥ ४९ ॥


 इति प्रसूतिं वृष्णीनां यः शृणोति नरः सदा ।
 स सर्वैः पातकैर्मुक्तो विष्णुलोकं प्रपद्यते ॥ ५० ॥

अशा प्रकारे जो पुरुष ह्या वृष्णिवंशाच्या उत्पत्तिचे विवरण ऐकतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णु लोक प्राप्त करतो ॥ ५० ॥


 
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थांशे पञ्चदशोऽध्यायः (१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमो ऽध्यायः ॥   "कालिया-दमन"   श्रीपराशर उवाच   एकदा तु विना रामं कृष्णो वृन...