शनिवार, ११ जुलै, २०२६

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, चतुर्दश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 14

 

विष्णुपुराणम्

चतुर्थ: अंशः चतुर्दशोऽध्यायः

 

"अनमित्र आणि अंधक वंशाचे वर्णन"

 

श्रीपराशर उवाच
अनमित्रस्य पुत्रः शिनिर्नामाभवत् ॥ १ ॥

तस्यापि सत्यकः सत्यकात्सात्यकिर्युयुधानापरनामा ॥ २ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- अनमित्रला शिनि नामक पुत्र झाला; शिनिला सत्यक व सत्यकपासून सात्यकिचा जन्म झाला ज्याचे दूसरे नाव युयुधान होते ।॥ १-२॥॥



 तस्मादपि संजयः तत्पुत्रश्च कुणिः कुणेर्युगन्धरः ॥ ३ ॥ इत्येते शैनेयाः ॥ ४ ॥

त्यानन्तर सात्यकिला सञ्जय, सञ्जयला कृषि आणि कृषिपासून युगन्धराचा जन्म झाला. हे सर्व शैनेय नावाने विख्यात झाले॥ ३ -४ ॥

 

 

अनमित्रस्यान्वये पृष्णिस्तस्मात् श्चफल्कस्तत्प्रभावः कथित एव ॥ ५ ॥
श्वफल्कस्यान्यः कनीयांश्चित्रकोनाम भ्राता ॥ ६ ॥

अनमित्रच्या वंशातच पृश्निचा जन्म झाला आणि पृश्निपासून श्वफल्कची उत्पत्ति झाली ज्याचा प्रभाव आधी वर्णन केला आहे. श्वफल्कला चित्रक नामक एक छोटा भाऊ होता॥५-६ ॥

 


श्वफल्कादक्रूरो गान्दिन्यामभवत् ॥ ७ ॥

श्वफल्कला गान्दिनीपासून अक्रूर झाला ॥७ ॥

 


तथोपमद्‍ गुपमद्‍गोर्मृदामृद विश्वारिमेजय गिरिक्षत्रोप क्षत्रशतघ्नारिमर्दन धर्मदृग्दृष्टधर्म गन्धमोजवाह प्रतिवाहाख्या पुत्राः ॥८॥ सुताराख्या कन्या च ॥९॥

तसेच (एका दुसर्‍या स्त्रीपासून) उपमद्गु, सृसृ, विश्वारि, मेजय, गिरिक्षत्र, उपक्षत्र, शतघ्र, अरिमर्दन, धार्मिक, दृष्टि धर्म, गन्धम, वाह आणि प्रतिवाह नामक पुत्र तसेच सुतारा नावाची कन्या झाली ॥ ८-९ ॥

 


देववानुपदेवश्चाक्रूरपुत्रौ ॥१०॥
पृथुवि पृथुप्रमुखाश्चित्रकस्य पुत्रा बहवो बभूवुः ॥११॥

देव आणि उपदेव हे दोन अक्रूरचे पुत्र होते. तसेच चित्रकला पृथु आदि अनेक पुत्र होते ॥१०-११॥

 


 कुकुरभजमान शुचिकम्बलबर्हिषाख्याः तथान्धकस्य चत्वारः पुत्राः ॥ १२ ॥
 कुकुराद्धृष्टस्तस्माच्च कपोतरोमा ततश्च विलोमा तस्मादपि तुम्बुरसखोऽभवदनुसंज्ञश्च ॥ १३ ॥

कुकुर, भजमान, शुचिकम्बल आणि बर्हिषि हे चार अन्धकाचे पुत्र झाले. त्यापेकी कुकुरला धृष्ट, धृष्टला कपोतरोमा, कपोतरोमाला विलोमा तसेच विलोमापासून तुम्बुरुला मित्र आणि अनुचा जन्म झाला ॥ १२-१३ ॥

 


 अनोरानकदुन्दभिः ततश्चाभिजित् अभिजितः पुनर्वसुः ॥ १४ ॥
 तस्याप्याहुकः आहुकी च कन्या ॥ १५ ॥

अनुला आनक दुन्दुभि, त्याच्यापासून अभिजित, अभिजितपासून पुनर्वसु आणि पुनर्वसुला आहुक नामक पुत्र आणि आहुकी नावाची कन्या झाली॥१४-१५॥

 


 आहुकस्य देवकोग्रसेनौ द्वौ पुत्रौ ॥ १६ ॥

आहुकला देवक आणि उग्रसेन नामक दोन पुत्र झाले॥१६॥

 

देववानुपदेवः सहदेवो देवरक्षितच देवकस्य चत्वारः पुत्राः ॥ १७ ॥

त्यापैकी देवकला देववान् उपदेश, सहदेव आणि देवरक्षित नामक चार पुत्र झाले ॥१७॥

 


तेषां वृकदेवोपदेवा देवरक्षिता श्रीदेवा शान्तिदेवा सहदेवा देवकी च सप्तभगिन्यः ॥ १८ ॥

ह्या चारहीजणांना वृकदेवा, उपदेवा, देवरक्षिता, श्रीदेवा, शान्तिदेवा, सहदेवा आणि देवकी ह्या सात बहिणी होत्या ॥ १८ ॥

 


 ताश्च सर्वा वसुदेव उपयेमे ॥ १९ ॥

ह्या सर्वांचा विवाह वसुदेव बरोबर झाला ॥१९॥

 


 उग्रसेनस्यापि कंसन्यग्रोध सुनामानकाह्वशङ्‍कुसु भूमिराष्ट्रपाल युद्धतुष्टि सुतुष्टिंमत्संज्ञाः पुत्रा बभूवुः ॥ २० ॥
 कंसाकंसवतीसु तनूराष्ट्रपलिकाह्वाश्च उग्रसेनस्य तनूजाः कन्याः ॥ २१ ॥

उग्रसेनाला सुद्धा कंस, न्यग्रोध, सुनाम, आनकाह, शङ्कु, सुभूमि, राष्ट्रपति, युद्धतुष्टि आणि सुतुष्टिमान् नामक पुत्र तसेच कथा, कलावती, तनु आणि राष्ट्रपालिका नावाची कन्या झाली ॥ २०-२१ ॥

 


 भजमानाच्च विदूरथः पुत्रोऽभवत् ॥ २२ ॥ विदूरथाच्छूरः शुराच्छमी शमिनः प्रतिक्षत्रः तस्मात्स्वयम्भोजः ततश्च हृदिकः ॥ २३ ॥ तस्यापि कृतवर्म शतधनुर्दवार्ह देवगर्भाद्याः पुत्रा बभूवुः ॥ २४ ॥ देवगर्भस्यापि शुरः ॥ २५ ॥

भजमानचा पुत्र विदूरथ झाला, विदूरथला शूर, शूरला शमी, शमीला प्रतिक्षत्र, प्रतिक्षत्रला स्वयंभोज, स्वयंभोजला हृदिक तसेच हृदिकला कृतवर्मा, शतधन्वा, देवाह आणि देवगर्भ आदि पुत्र झाले . देवगर्भचा पुत्र शूरसेन होता ॥ २२-२५ ॥

 

 

 शुरस्यापि मारीषा नाम पत्‍न्यभवत् ॥ २६ ॥
 तस्यां चासौ दशपुत्रानजनयद्वसुदेवरूर्वान् ॥ २७ ॥

शूरसेनची मनीषा नावाची पत्नी होती, तिच्यापासून त्याने वसुदेव आदि दहा पुत्र उत्पन्न केले ॥ २६-२७॥



 वसुदेवस्य जातमात्रस्यैव तद्‍गृहे भगवदंशावतारं अव्याहतदृष्ट्या पश्यद्‍भिर् देवैर् दिव्यानकदुन्दुभयो वादिताः ॥ २८ ॥

वसुदेवाने जन्म घेताच ह्याच्याच घरी भगवंत अंशावतार घेणार हे आपल्या अव्याहत दृष्टिने पाहिल्यावर आनक, दुन्दुभि आदि वाद्य वाजवली ।।२८ ।।

 


 ततश्चसावानकदुन्दुभिसंज्ञामवाप ॥ २९ ॥

म्हणून त्याचे नाव आनकदुन्दुभि असेही पडले ॥ २९ ॥

 


 तस्य च देवभाग देवश्रवाष्टक ककुच्चक्र वत्सधारक सृंजयश्याम शमिकगञ्जूषसंज्ञा नव भ्रतरोऽभवन् ॥ ३० ॥

ह्याला देवभाग, देवश्रवा, अष्टक, ककुच्चक्र, वत्सधारक, सृञ्जय, श्याम, शमिक आणि गण्डूष नावाचे नऊ भाऊ होते ॥३०॥


 पृथा श्रुतदेवा श्रुत कीर्तिः श्रुतश्रवा राजाधिदेवी च वसुदेदादीनां पञ्च भगिन्योऽभवन् ॥ ३१ ॥

तसेच ह्या वसुदेव आदि दहा भावांना पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ति, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी ह्या पाच बहिणी होत्या ॥ ३१ ॥

 

 

 शुरस्य कुन्तिर्नाम सखाभवत् ॥ ३२ ॥

शूरसेनाचा कुन्ति नामक एक मित्र होता ॥ ३२ ॥



 तस्मै चापुत्राय पृथामात्मजां विधिना शुरो दत्तवान् ॥ ३३ ॥ तां च पाण्डुरुवाह ॥ ३४ ॥ तस्यां च धर्मानिलेन्द्रैर् युधिष्ठरभीमसेनार्जुनाख्यास्त्रयः पुत्राःसमुत्पादिताः ॥ ३५ ॥

तो निःसन्तान होता म्हणून शूरसेनाने दत्तक-विधिने त्याला आपली पृथा नावाची कन्या दिली होती . तिचा राजा पाण्डु बरोबर विवाह झाला. तिला धर्म, वायु आणि इंद्रापासून क्रमशः युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नामक तीन पुत्र झाले ॥३३-३५ ॥

 


 पूर्वमेवानूढायाश्च भगवता भास्वता कानीनः कर्णो नाम पुत्रोऽजन्यत ॥ ३६ ॥

त्यांच्याआधी हिला अविवाहित अवस्थेत असताना भगवान सूर्याद्वारा कर्ण नामक एक पुत्र आणखी झाला होता॥३६ ॥

 


 तस्याश्च सपत्‍नी माद्री नामाभूत् ॥ ३७ ॥
 तस्यां च नासत्यदस्त्राभ्यां नकुलसहदेवौ पाण्डोः पुत्रौ जनितौ ॥ ३८ ॥

पांडूला माद्री नावाची आणखी एक पत्नी होती. तिला अश्विनीकुमार द्वारा नकुल आणि सहदेव नावाचे पाण्डुचे दोन पुत्र झाले ॥ ३७-३८ ।।

 

 

 श्रुतदेवां तु वृद्धधर्मा नाम कारूश उवयेमे ॥ ३९ ॥
 तस्याञ्च च दन्तवक्रो नाम महासुरो जज्ञे ॥ ४० ॥

शूरसेनाची दूसरी कन्या श्रुतदेवा हीचा कारूष-नरेश वृद्धधर्मा बरोबर विवाह झाला होता. तिच्यापासून दन्तवक्र नामक महादैत्य उत्पन्न झाला॥३९-४०॥


 श्रुतकीर्तिमपि केकयराजा उपयेमे ॥ ४१ ॥
 तस्यां च सन्तर्दनादयः कैकेयाः पञ्च पुत्रा बभूवुः ॥ ४२ ॥

श्रुतकीर्तिचा केकयराजा बरोबर विवाहा झाला. तिच्यापासून कैकई-नरेशला सन्तर्दन आदि पाच पुत्र झाले॥ ४१-४२ ॥

 


 राजाधिदेव्यमावन्त्यौ विन्दानुविन्दौ जज्ञाते ॥ ४३ ॥

राजाधिदेवीपासून अवन्तिदेशीय विन्द आणि अनुविन्द चा जन्म झाला ॥ ४३ ॥

 


 श्रुतश्रवसमपि चेदिराजो दमघोषनामोपयेमे ॥ ४४ ॥
 तस्यां च शिशुपालमुत्पादयामास ॥ ४५ ॥

श्रुतश्रवाचे चेदिराज दमघोषने पाणिग्रहण केले. तिने शिशुपालला जन्म दिला ॥४४-४५ ॥


 स वा पूर्वमप्युदारविक्रमो दैत्यानामादिपुरुषो हिरण्यकशिपुरभवत् ॥ ४६ ॥
 यश्च भगवता सकललोकगुरुणा नारसिंहेन घातितः ॥ ४७ ॥

पूर्वजन्मी तो अतिशय पराक्रमी हिरण्यकशिपु नामक दैत्यांचा मूळपुरुष होता ज्याला सकल लोकगुरु भगवान नरसिंहाने मारले होते ॥ ४६-४७ ॥

 


 पुनरपि अक्षयवीर्य शौर्यसम्पत्पराक्रमगुणःसमाक्रान्त सकलत्रैलोकेश्वर प्रभावो दशाननो नामाभूत् ॥ ४८ ॥

त्यानंतर हा अक्षय वीर्य, शौर्य, सम्पति आणि पराक्रम आदि गुणांनी सम्पन्न तसेच समस्त त्रिभुवनाचा स्वामी असलेल्या इंद्राचाही प्रभाव थंड करणारा दशानन झाला ॥४८॥

 


 बहुकालोपभुक्त भगवत्सकाशावाप्त शरीरपातोद्‍भव पुण्यफलो भगवता राघवरूपिणा सोऽपि निधनमुपपादितः ॥ ४९ ॥

स्वतः भगवंताच्या हातूनच मारला गेल्याने प्राप्त झालेल्या पुण्यामुळे खूप काळ नाना भोग भोगत शेवटी राघवरूपधारी भगवंताच्या द्वारा मारला गेला ॥ ४९ ॥

 

 


 पुनश्चेदिराजस्य दमघोषस्यात्मजः शिशु पालनामाभवत् ॥ ५० ॥

त्यानंतर हो चेदिराज दमघोषाचा पुत्र शिशुपाल झाला ॥५०॥

 


 शिशुपालत्वेपि भगवतो भूभारावतारणायावतीर्णांशस्य पुण्डरीकनयनाख्यस्योपरि द्वेषानुबन्धमतितराञ्चकार ॥ ५१ ॥

शिशुपाल असूनही तो भू-भार हरण करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या भगवंताचा अंशस्वरूप भगवान पुण्डरीकाक्ष विषयी अत्यन्त द्वेषबुद्धि बाळगू लागला ॥५१॥

 

 


भगवता च स निधनमुपानीतस्तत्रैव परमात्मभूते मनस एकाग्रतया सायुज्यमवाप ॥ ५२ ॥

शेवटी भगवंताच्याच हातून मारले गेल्यावर त्या परमात्मा मध्येच मन लागल्या कारणाने सायुज्य मोक्ष प्राप्त केला॥५२॥

 


 भगवान् यदि प्रसन्नो यथाभिलषितं ददाति तथा अग्रसन्नोपि निघ्नन् दिव्यमनुपमं स्थानं प्रयच्छति ॥ ५३ ॥

भगवान जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा जसे यथेच्छ फल देतात, तसेच अप्रसन्न होऊन मारल्यावरही ते अनुपम दिव्यलोकाची प्राप्ति करवून देतात ।। ५३ ॥

 


 
इति श्रिविष्णुमहापुराणे चतुर्थांशे चतुर्दशोऽध्यायः (१४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, चतुर्दश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 14

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ चतुर्दशो ऽध्यायः ॥   "अनमित्र आणि अंधक वंशाचे वर्णन"   श्रीपराशर उवाच अनमित्...