॥ तृतीयः अंशः ॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥
"सामवेदाच्या शाखा, अठरा पुराणे आणि चौदा विद्यांच्या विभागाचे
वर्णन"
श्रीपराशर उवाच
सामवेदतरोः शाखा व्यासशिष्यस्य जैमिनिः ।
क्रमेण येन मैत्रेय विभेदशृणु तन्मम ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले - हे मैत्रेया! ज्या
क्रमाने व्यासशिष्य जैमिनिने सामवेदाच्या शाखांचा विभाग केला, ते मी सांगतो || १ ||
सुसन्तुस्तस्य
पुत्रोऽभूत्सुकर्मास्याप्यभूत्सुतः ।
अधीतवन्तौ चैकैकां
संहितां तौ महामती ॥ २ ॥
जैमिनिचा पुत्र सुमन्तु
होता व त्याचा पुत्र सुकर्मा होता. त्या दोन्ही महामति पुत्र-पौत्रांनी सामवेदाच्या एक-एक शाखेचे
अध्ययन केले || २ ||
सहस्रसंहिताभेदं
सुकर्मातत्सुतस्ततः ।
चकार तं च तच्छिष्यौ
जगृहाते महाव्रतौ ॥ ३ ॥
हिरण्यनाभः
कौसल्यः पौष्पिञ्जिश्च द्विजोत्तम ।
उदीच्याःसामगाः
शिष्यास्तस्य पञ्चशतं स्मृताः ॥ ४ ॥
त्यानन्तर सुमन्तुपुत्र सुकर्मा
ह्याने आपल्या सामवेदसंहितेचे एक सहस्त्र शाखाभेद केले आणि हे द्विजोत्तमा! त्या शाखा
त्याच्या कौसल्य हिरण्यनाभ तथा पौष्पिंची नामक दोन महाव्रती शिष्यांनी ग्रहण केल्या. हिरण्यनाभाचे पाचशे शिष्य होते जे उदीच्य सामग म्हणून विख्यात
झाले || ३ – ४ ||
हिरण्यनाभात्तावत्यःसंहिता
यैर्द्विजोत्तमैः ।
गृहीतास्तेपि
चोच्यन्ते पण्डितैः प्राच्यसामगाः ॥ ५ ॥
अशा प्रकारे ज्या अन्य
द्विजोत्तमांनी इतक्याच संहिता हिरण्यनाभाकडून ग्रहण केल्या त्यांना पंडितजन प्राच्य
सामग म्हणतात || ५ ||
लोकाक्षिर्नौधमिश्चैव
कक्षिवाँल्लाङ्गलिस्तथा ।
पौष्पिञ्जिशिष्यास्तद्भेदैः
संहिता बहुलीकृताः ॥ ६ ॥
पौष्पिंचिचे शिष्य
लोकाक्षि, नौधमि, कक्षीवान आणि लांगलि होते. त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी आपआपल्या संहितांचे विभाग करून
त्यात भरपूर वाढ केली || ६ ||
हिरण्यनाभशिष्यस्तु
चतुर्विंशतिसंहिताः ।
प्रोवाच कृतनामासौ
शिष्येभ्यश्च महामुनिः ॥ ७ ॥
महामुनि कृति नामक
हिरण्यनाभाच्या आणखी एका शिष्याने आपल्या शिष्यांना सामवेदाच्या चोवीस संहिता शिकवल्या
|| ७ ||
तैश्चापि सामवेदोऽसौ
शाखाभिर्बहुलीकृतः ।
अथर्वणामथो
वक्ष्ये संहितानां समुच्चयम् ।
अथर्ववेदं स
मुनिःसुमन्तुरमितद्युतिः ॥ ८ ॥
नंतर त्यांनी देखील
ह्या सामवेदाचा शाखांद्वारा खूप विस्तार केला . आता मी अर्थववेदाच्या संहितांच्या समुच्चयाचे वर्णन करतो || ८ ||
शिष्यमध्यापयामास
कबन्धं सोऽपि तं द्विधा ।
कृत्वा तु देवदर्शाय
तथा पथ्याय दत्तवान् ॥ ९ ॥
अथर्ववेद सर्वप्रथम
अमित तेजोमय सुमन्तु मुनिने आपला शिष्य कबंध ह्यास शिकवला होता आणि नंतर कबंधाने त्याचे दोन भाग करून ते देवदर्श
आणि पथ्य नामक आपल्या शिष्यांना दिले || ९ ||
देवदर्शस्य
शिष्यास्तु मेधोब्रह्मबलिस्तथा ।
शौल्कायनिः
पिप्पलादस्तथान्यो द्विजसत्तम ॥ १० ॥
हे द्विजसत्तमा !
देवदर्शचे शिष्य मेध, ब्रह्मबलि, शौल्कायनि आणि पिप्पल होते || १० ||
पथ्यस्यापि
त्रयः शिष्याः कृता यैर्द्विज संहिताः ।
जाबालिः कुमुदादिश्च
तृतीयः शौनको द्विज ॥ ११ ॥
हे द्विजा ! पथ्यचे
सुद्धा जाबालि, कुमुदादि आणि शौनक नामक तीन शिष्य होते, ज्यांनी संहितांचे विभाजन केले
|| ११ ||
शौनकस्तु द्विधा कृत्वा ददावेकां तु बभ्रवे
।
द्वितीयां संहितां
प्रादात्सैन्धवाय य संज्ञिने ॥ १२ ॥
शौनकाने देखील आपल्या संहितेचे दोन
विभाग करून त्यातील एक बभ्रुला आणि दुसरी सैन्धव नामक आपल्या शिष्याला दिली || १२ ||
सैन्धवान्मुञ्जिकेशश्च
द्वेधभिन्नास्त्रिधा पुनः ।
नक्षत्रकल्पो
वेदानां संहितानां तथैव च ॥ १३ ॥
चतुर्थःस्यादाङ्गिरसः
शान्तिकल्पश्च पञ्चमः ।
श्रेष्ठास्त्वथर्वणामेते
संहितानां विकल्पकाः ॥ १४ ॥
सैन्धव कडून शिकून
मुच्चिकेश ह्याने आपल्या संहितेचे आधी दोन आणि नंतर तीन विभाग केले . नक्षत्रकल्प, वेद्कल्प, संहिताकल्प, आंगिरसकल्प आणि शान्तिकल्प हे
त्याने रचलेले पाच विकल्प अथर्ववेद संहितांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत || १३- १४ ||
आख्यानैश्चाप्युपाख्यानैर्गाथाभिः
कल्पशुद्धिभिः ।
पुराणसंहितां
चक्रेपुराणार्थविशारदः ॥ १५ ॥
त्यानन्तर, पुराणार्थविशारद व्यासांनी आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्पशुद्धि सहित पुराण
संहितांची रचना केली || १५ ||
प्रख्यातो व्यासशिष्योऽभूत्सूतो वै रोमहर्षणः ।
पुरामसंहितां तस्मै ददौ व्यासो महामतिः ॥ १६ ॥
रोमहर्षण सूत व्यासांचा प्रसिद्ध शिष्य होता
. महामति व्यासांनी त्याला पुराण-संहिता
शिकविल्या || १६ ||
सुमतिश्चाग्निवर्चाश्च
मित्रायुःशांसपायनः ।
अकृतव्रणसावर्णि
षट्शिष्यास्तस्य चाभवन् ॥ १७ ॥
सूताचे सुमति, अग्निवर्चा, मित्रायु, शांसपायन, अकृतव्रण आणि सावर्णि हे सहा
शिष्य होते || १७ ||
काश्यपः संहिताकर्ता
सावर्णिः शांसपायनः ।
रोमहर्षाणिका
चान्या तिसॄणां मूलसंहिता ॥ १८ ॥
चतुष्टयेन भेदेन संहितानामिदं मुने ॥ १९ ॥
काश्यप-गोत्रीय अकृतव्रण, सावर्णि आणि शांसपायन हे तिघे
संहिताकर्ता आहेत . ह्या तीनही संहितांचा आधार रोमहर्षणाची एक संहिता आहे . हे मुने ! ह्या चारही संहितांचे
सारभूत असलेली ही विष्णुपुराण संहिता मी बनवली || १८- १९ ||
आद्यं सर्वपुराणानां
पुराणं ब्राह्ममुच्यते ।
अष्टादशपुराणानि
पुराणज्ञाः प्रचक्षते ॥ २० ॥
पुराणज्ञ पुरुष कुल
अठरा पुराणे असल्याचे सांगतात ; त्या सर्वात प्राचीनतम ब्रह्मपुराण आहे || २० ||
ब्राह्मं पाद्मं वैष्णवं च शैवं भागवतं तथा ।
तथान्यं नारदीयं च मार्कण्डेयं च सप्तमम् ॥ २१ ॥
प्रथम पुराण ब्राह्म, दूसरे पाद्म, तीसरे वैष्णव, चौथे शैव, पाचवे भागवत, सहावे नारदीय आणि सातवे मार्कण्डेय
आहे || २१ ||
आग्नेयमष्टमं
चैव भविष्यन्नवमं स्मृतम् ।
दशमं ब्रह्मवैवर्तं
लैङ्गमेकादशं स्मृतम् ॥ २२ ॥
आठवे आग्नेय, नववे भविष्य, दहावे ब्रह्मवैवर्त्त आणि अकरावे पुराण लिंग आहे || २२ ||
वाराहं द्वादशं
चैव स्कान्दं चात्र त्रयोदशम् ।
चतुर्दशंवामनं
च कौर्मं पञ्चदशं तथा ॥ २३ ॥
मात्स्यं च गारुडं चैव ब्रह्माण्डं च ततः परम्
।
महापुराणान्येतानि
ह्यष्टादश महामुने ॥ २४ ॥
तसेच बारावे वाराह, तेरावे स्कांद, चौदावे वामन, पंधरावे कौर्म व त्यानंतर मात्स्य, गारुड आणि ब्रह्माण्डपुराण आहे
. हे महामुने ! हीच ती अठरा महापुराणे
|| २३ – २४ ||
तथा चोपपुराणानि मुनिभिः कथितानि च ।
सर्गश्च प्रतिसर्गश्च
वंशमन्वन्तराणि च ।
सर्वेष्वेतेषु
कथ्यन्ते वंशानुचरीतं च यत् ॥ २५ ॥
ह्या व्यतिरिक्त मुनिजनांनी
आणखी अनेक उपपुराणे सांगितली आहेत . ह्या सर्वात सृष्टि, प्रलय, देवता आदिंचे वंश, मन्वन्तर आणि भिन्न-भिन्न राजवंशांच्या चरित्रांचे वर्णन केले
गेले आहे || २५ ||
यदेतत्तव मैत्रेय
पुराणं कथ्यते मया ।
एतद्वैष्णवसंज्ञं
वै पाद्मस्यसमनन्तरम् ॥ २६ ॥
हे मैत्रेया ! जे
पुराण मी तुला सांगत आहे ते पाद्मपुराणा नंतरचे वैष्णव नामक महापुराण आहे || २६ ||
सर्गे च प्रतिसर्गे
च वंशमन्वन्तरादिषु ।
कथ्यते भगवान्विष्णुरशेषेष्वेव
सत्तम ॥ २७ ॥
हे साधुश्रेष्ठा ! ह्यात सर्ग, प्रतिसर्ग, वंश आणि मन्वन्तरादिचे वर्णन करताना सर्वत्र केवळ विष्णुचेच वर्णन केले गेले आहे || २७ ||
अङ्गानि वेदाश्चत्वारो
मीमांसा न्यायविस्तरः ।
पुराणं धर्मशास्त्रं
च विद्या ह्येताश्चतुर्दश ॥ २८ ॥
सहा वेदांगे, चार वेद, मीमांसा, न्याय, पुराण आणि धर्मशास्त्र ह्याच
चौदा विद्या आहेत || २८ ||
आयुर्वेदो धनुर्वेदो
गान्धर्वश्चैव ते त्रयः ।
अर्थशास्त्रं
चतुर्थं तु विद्या ह्यष्टादशैव ताः ॥ २९ ॥
ज्ञेया ब्रह्मर्षयः
पूर्वं तेभ्यो देवर्षयः पुनः ।
राजर्षयः पुनस्तेभ्य
ऋषिप्रकृतयस्त्रयः ॥ ३० ॥
ह्यातच आयुर्वेद, धनुर्वेद आणि गान्धर्ववेद हे
तीन तसेच चौथे अर्थशास्त्र मिळून एकूण अठरा विद्या होतात . ऋषिंचे तीन भेद आहेत – प्रथम
ब्रह्मर्षि, द्वितीय देवर्षि आणि मग राजर्षि || २९ – ३० ||
इति शाखाःसमाख्यातः
शाखाभेदास्तथैव च ।
कर्तारश्चैव
शाखानां भेदहेतुस्तथोदितः ॥ ३१ ॥
अशाप्रकारे मी तुला
वेदांच्या शाखा, शाखांचे भेद, त्यांचे रचयिता तसेच शाखा-भेदाच्या कारणांचेही वर्णन केले || ३१ ||
सर्वमन्वन्तरेष्वेवं
शाखाभेदाःसमाः स्मृताः ।
प्राजापत्या
श्रुतिर्नित्या तद्विकल्पास्त्विमे द्विज ॥ ३२ ॥
अशा प्रकारे समस्त मन्वन्तरांमध्ये एक सारखेच शाखाभेद असतात. हे द्विजा ! प्रजापति ब्रह्मापासून
प्रकट होणारी श्रुति नित्य आहे, हे सर्व केवळ विकल्पमात्र आहेत || ३२ ||
एतत्ते कथितं सर्वं यत्पृष्टोहमिह त्वया ।
मैत्रेय वेदसम्बन्धः किमन्यत्कथयामि ते ॥ ३३ ॥
हे सर्व तू जसे विचारलेस तसे मी तुला सांगितले. हे मैत्रेया ! वेद संबंधी
मी तुला आणखी काय सांगू ते सांग ॥ ३३ ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा