॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ ॥ पञ्चमोऽध्यायः ॥
"शुक्लयजुर्वेद तथा तैत्तिरीय यजु:शाखांचे वर्णन"
श्रीपराशर उवाच
यजुर्वेतदरोश्शाखाःसप्तविंशन्महामुनिः
।
वैशम्पायननामासो
व्यासशिष्यश्चकार वै ॥ १ ॥
शिष्येभ्यः
प्रददौ ताश्च जगृहुस्तेप्यनुक्रमात् ॥ २ ॥
श्रीपराशर म्हणाले
हे महामुने! व्यासांचे शिष्य वैशम्पायन ह्यांनी यजुर्वेदरूपी
वृक्षाच्या सत्ताविस शाखांची रचना केली; आणि त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवले व शिष्यांनी सुद्धा ते क्रमशः ग्रहण केले || १ – २ ||
याज्ञवल्क्यस्तु तत्राभूद्ब्रह्मरातसुतो द्विज ।
शिष्यः परमधर्मज्ञो गुरुवृत्तिपरःसदा ॥ ३ ॥
हे द्विजा! त्यांचा
एक परम धार्मिक व सदैव गुरुसेवेत तत्पर राहणार्या शिष्य ब्रह्मरात ह्याचा पुत्र याज्ञवल्क्य
होता || ३ ||
ऋषिर्योद्य
महामेरोः समाजे नागमिष्यति ।
तस्य वै सप्तरात्रात्तु
ब्रह्महत्त्या भविष्यति ॥ ४ ॥
जो कोणी महामेरुवर
स्थित आमच्या समाजात सम्मिलित होत नाही त्याला सात रात्रींच्या आतच ब्रह्महत्येचे पातक
लागते || ४ ||
पूर्वमेवं मुनिगणैः
समयो यः कृतो द्विज ।
वैशम्पायन एकस्तु
तं व्यतिक्रान्तवांस्तदा ॥ ५ ॥
हे द्विजा! अशाप्रकारे
मुनिंनी पुर्वी जो काल नियत केला होता त्याचे केवळ एका वैशम्पायनानेच अतिक्रमण केले
|| ५ ||
स्वस्त्रीयं
बालकं सोऽथ पदा स्पृष्टमघातयत् ॥ ६ ॥
शिष्यानाह स
भोः शिष्या ब्रह्महत्यापहं व्रतम् ।
चरध्वं मत्कृते
सर्वे न विचार्यमिदं तथा ॥ ७ ॥
त्यानंतर त्याने प्रसादवश
पदस्पर्श झालेल्या आपल्या भाच्याची हत्या केली; तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना
म्हटले, ‘हे शिष्यांनो! तुम्ही
सर्वांनी इतर कोणताही विचार न करता माझ्यासाठी ब्रह्महत्या दूर करण्याचे व्रत करा’
|| ६ – ७ ||
अथाह याज्ञवल्क्यस्तु
किमेभिर्भगवन्द्विजैः ।
क्लेशितैरल्पतेजोभिश्चरिष्येऽहमिदं
व्रतम् ॥ ८ ॥
याज्ञवल्क्य म्हणाले
‘भगवन! हे सर्व ब्राह्मण अत्यंत निस्तेज आहेत, त्यांना कष्ट देण्याची काय आवश्यकता? मी एकटाच ह्या व्रताचे अनुष्ठान
करेन’ || ८ ||
ततः क्रुद्धो
गुरुः प्राह याज्ञवल्क्यं महामुनिम् ।
मुच्यतां यत्त्वयाधीतं
मत्तो विप्रावमानक ॥ ९ ॥
त्यावर गुरु वैशम्पायनांनी
क्रोधित होऊन महामुनि याज्ञवल्क्याला म्हटले – ‘अरे ब्राह्मणांचा अपमान करणार्या, तू माझ्याकडून जे काही शिकलास, त्या सर्वाचा त्याग कर || ९ ||
निस्तेजसो वदस्येनान्यत्त्वं
ब्राह्मणपुङ्गवान् ।
तेन शिष्येण
नार्थोस्ति ममाज्ञाभङ्गकारिणा ॥ १० ॥
तू ह्या समस्त द्विजश्रेष्ठांना
निस्तेज म्हणतोस, मला तुझ्यासारख्या आज्ञाभंगकारी शिष्याचे कोणतेच प्रयोजन नाही’ || १० ||
याज्ञवल्क्यस्ततः
प्राह भक्त्यैतत्ते मयोदितम् ।
ममाप्यलं त्वयाधीतं
यन्मया तदिदं द्विज ॥ ११ ॥
याज्ञवल्क्य म्हणाला
– ‘हे द्विजा! मी भक्तिवश आपल्याला तसे म्हटले होते, मलासुद्धा आपल्यापासून काही प्रयोजन
नाही, मी तुमच्याकडून जे
काही शिकलो ते सर्व घ्या’ || ११ ||
श्रीपराशर उवाच
इत्युक्तो रुधिराक्तानि
सरूपाणि यजूंषि सः ।
छर्दयित्वा
ददौ तस्मै ययौ स स्वेच्छया मुनि ॥ १२ ॥
श्रीपराशर म्हणाले
असे म्हणून महामुनि याज्ञवल्क्याने
रक्ताने माखलेला मूर्तिमान यजुर्वेद वाम करून गुरूंना परत केला; आणि स्वेच्छेने तिथून
निघून गेला || १२ ||
यजूंष्यथ विसृष्टानि
याज्ञवल्क्येन वै द्विज ।
जगृहुस्तित्तिरा
भूत्वा तैत्तिरीयास्तु ते ततः ॥ १३ ॥
हे द्विजा! याज्ञवल्क्यद्वारा
वमन केलेल्या त्या यजु:श्रुति अन्य शिष्यांनी तित्तिर रूपाने ग्रहण केल्या, म्हणून त्यांना तैत्तिरीय म्हटले
जाते || १३ ||
ब्रह्महत्त्याव्रतं
चीर्णं गुरुणा चोदितैस्तु तैः ।
चरकाध्वर्यवस्ते
तु चरणान्मुनिसत्तम ॥ १४ ॥
हे मुनिसत्तमा! ज्या
विप्रगणांनी गुरुच्या प्रेरणेने ब्रह्महत्या-विनाशक व्रताचे अनुष्ठान केले होते, ते सगळे व्रताचरणामुळे यजु: शाखाध्यायी
चरकाध्वर्यु झाले || १४ ||
याज्ञवल्क्योपि
मैत्रेय प्राणायामपरायणः ।
तृष्टाव प्रयतःसूर्यं
यजूंष्यभिलषंस्ततः ॥ १५ ॥
त्यानन्तर, याज्ञवल्क्याने सुद्धा यजुर्वेद
प्राप्तिच्या इच्छूने प्राणांचे संयम करून संयतचित्ताने सूर्यभगवानाची स्तुति केली
|| १५ ||
याज्ञवल्क्य
उवाच
नमः सवित्रे
द्वाराय मुक्तेरमिततेजसे ।
ऋग्यजुःसामभूताय
त्रयीधाम्ने च ते नमः ॥ १६ ॥
याज्ञवल्क्य म्हणाले
अतुलित तेजस्वी, मुक्तिचे द्वारस्वरूप तसेच वेदत्रयरूपी तेजाने सम्पन्न एवं ऋक, यजु: तसेच सामस्वरूप सवितादेवाला
नमस्कार || १६ ||
नमोऽग्नीषोमभूताय
जगतः कारणात्मने ।
भास्कराय परं
तेजःसौषुम्नरुचिबिभ्रते ॥ १७ ॥
जो अग्नि व चन्द्रमारूप, जगताचे कारण आणि सुषुम्न नामक
परमतेज धारण करणारा आहे, त्या भगवान भास्कराला नमस्कार || १७ ||
कलाकाष्ठानिमेषादिकालज्ञानात्मरूपिणे
।
ध्येयाय विष्णुरूपाय
परमाक्षररूपिणे ॥ १८ ॥
कला, काष्ठा, निमेष आदि कालज्ञानामुळे तसेच
ध्यान करण्यायोग्य परब्रह्मस्वरूप विष्णुमय श्रीसूर्यदेवाला नमस्कार || १८ ||
बिभर्ति यःसुरगणानाप्यायेन्दुं
स्वरश्मिभिः ।
स्वधामृतेन
च पितृंस्तस्मै तृप्त्यात्मने नमः ॥ १९ ॥
जो आपल्या किरणांनी
चन्द्रमाला पोषित करत देवतांना तसेच स्वधारूप अमृताने पितृगणांना तृप्त करतो, त्या तृप्तिरूप सूर्यदेवाला नमस्कार
|| १९ ||
हिमाम्बुघर्मवृष्टीनां
कर्ता भर्ता च यः प्रभुः ।
तस्मै त्रिकालरूपाय
नमःसूर्यायवेधसे ॥ २० ॥
जो हिम, जल व उष्णतेचा कर्ता [अर्थात
शीत, वर्षा, ग्रीष्म आदि
ऋतुंचे कारण] आहे व जगताचे पोषण करणारा आहे, त्या त्रिकालमूर्ति विधाता भगवान सूर्याला नमस्कार || २० ||
अपहन्ति तभो
यश्च जगतोऽस्य जगत्पतिः ।
सत्त्वधामधरो
देवो नमस्तस्मै विवस्वते ॥ २१ ॥
जो जगत्पति ह्या सम्पूर्ण
जगताचा अन्धकार दूर करतो, त्या सत्त्वमुर्तिधारी-विवस्वानाला नमस्कार || २१ ||
सत्कर्मयोग्यो
न जनो नैवापः शुद्धिकारणम् ।
यस्मिन्ननुदिते
तस्मै नमो देवाय भास्वते ॥ २२ ॥
जो उदित झाल्या शिवाय
मनुष्य सत्कर्मात प्रवृत्त होऊ शकत नाही आणि जल शुद्धिचे कारण होऊ शकत नाही त्या भास्वान्देवाला
नमस्कार || २२ ||
स्पृष्टो यदंशुभिर्लोकः
क्रियायोग्यो हि जायते ।
पवित्रताकारणाय
तस्मै शुद्धात्मने नमः ॥ २३ ॥
ज्याच्या किरण-समूहाच्या
स्पर्शाने लोक कर्मानुष्ठानाच्या योग्य होतो, त्या पवित्रतेचे कारण असलेल्या शुद्धस्वरूप सूर्यदेवाला
नमस्कार || २३ ||
नमः सवित्रे
सूर्याय भास्कराय विवस्वते ।
आदित्यायादिभूताय
देवादीनां नमो नमः ॥ २४ ॥
भगवान सविता, सूर्य, भास्कर आणि विवस्वानाला नमस्कार, देवता आदि समस्त भूतांचा आदिभूत
आदित्यदेवाला वारंवार नमस्कार || २४ ||
हिरण्मयं रथं
यस्य केतवोऽमृतवाजिनः ।
वहन्ति भुवनालोकचक्षुषं
तं नमाम्यहम् ॥ २५ ॥
ज्याचा तेजोमय रथ
आहे, [प्रज्ञारूप] ध्वजा
आहेत, ज्याचे [छ्न्दोमय]
अमर अश्वगण वहन करतात तसेच जो त्रिभुवनाला प्रकाशित करणारा नेत्ररूप आहे, त्या सूर्यदेवाला मी नमस्कार
करतो || २५ ||
श्रीपराशर उवाच
इत्येवमादिभिस्तेन स्तूयमानः स वै रविः ।
वाजिरूपधरः प्राह व्रीयतामिति वाञ्छितम् ॥ २६ ॥
श्रीपराशर म्हणाले
त्याच्या ह्या स्तुतिने भगवान सूर्य अश्वरूपात प्रकट होऊन म्हणाला, ‘तु तुला अभीष्ट वर माग’ || २६ ||
याज्ञवल्क्यस्तदा
प्राह प्रणिपत्य दिवाकरम् ।
यजूंषि तानि
मे देहि यानि सन्ति न मे गुरौ ॥ २७ ॥
तेव्हा याज्ञवल्क्य
सूर्याला प्रणाम करून म्हणाला, ‘आपण मला अशा यजु:श्रुतिंचा उपदेश करा ज्या माझ्या गुरूंनाही माहित
नाहीत’ || २७ ||
श्रीपराशर उवाच
एवमुक्तो ददौ
तस्मै यजूंषि भगवान् रविः ।
अयातयामसंज्ञानि
यानि वेत्ति न तद्गुरुः ॥ २८ ॥
त्याने असे म्हटल्यावर
सूर्याने त्याला अयातयाम नामक यजु:श्रुतिंचा उपदेश दिला ज्यांच्याबद्दल गुरु वैशम्पायनांना
सुद्धा माहीत नव्हते || २८ ||
यजूंषि यैरधीतानि
तानि विप्रैर्द्विजोत्तम ।
वाजिनस्ते समाख्याताः
सूर्योप्यश्वोऽभवद्यतः ॥ २९ ॥
हे द्विजोत्तमा! ह्या
श्रुतिंचे पठण ज्या ब्राह्मणांनी केले ते वाजी-नावाने विख्यात झाले कारण सूर्याने अश्वरूपात
त्यांचा उपदेश केला होता || २९ ||
शाखाभेदास्तु
तेषां वै दश पञ्च च वाजिनाम् ।
काण्वाद्याःसुमहाभागा
याज्ञवल्क्याः प्रकीर्तिताः ॥ ३० ॥
हे महाभागा ! त्या
वाजिश्रुतिंच्या कण्व आदि पंधरा शाखा आहेत; ह्या सर्व शाखा महर्षि याज्ञवल्क्याने प्रवुत्त केल्या असे म्हणतात
|| ३० ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा