रविवार, १२ एप्रिल, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, चतुर्थ अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 4

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः ॥ ॥ चतुर्थोऽध्यायः ॥

 

"ऋग्वेदाच्या शाखांचा विस्तार"

श्रीपराशर उवाच
आद्यो वेदश्चतुष्पादः कृतः साहस्रसंमितः ।
ततो दशगुणः कृत्स्नो यज्ञोयं सर्वकामधुक् ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– सृष्टिच्या आदिकाळात ईश्वरापासून आविर्भूत झालेला वेद ऋक, यजु: आदि चार पाद युक्त आणि एक लाख मंत्रांचा होता. त्यापासूनच समस्त कामनापुर्ती करणार्‍या अग्निहोत्रादि दहा प्रकारच्या यज्ञांचा प्रचार झाला || ||

 


 ततोऽत्र मत्सुतो व्यासो अष्टविंशतिमेऽन्तरे ।
 वेदमेकं चतुष्पादं चतुर्धा व्यभजत्प्रभुः ॥ २ ॥

त्यानन्तर अठ्ठाविसाव्या द्वापरयुगात माझा पुत्र कृष्णद्वैपायनाने ह्या चतुष्पादयुक्त एकच वेदाचे चार भाग केले || ||

 


 यथा च तेन वै व्यस्ता वेदव्यासेन धीमता ।
 वेदास्तथा समस्तैस्तैरव्यस्ता व्यस्तैस्तथा मया ॥ ३ ॥

परम बुद्धिमान वेदव्यासाने त्याचे जसे विभाग केले, त्याच प्रकारे अन्यान्य वेदव्यासांनी तसेच मी देखील पुर्वी केले होते || ||

 


 तदनेनैव वेदानां शाखाभेदान्द्विजोत्तम ।
 चतुर्युगेषु पठितान्समस्तेष्ववधारय ॥ ४ ॥

म्हणून हे द्विजा! समस्त चतुर्युगांमध्ये ह्याच शाखा भेदांनी वेदांचे पाठण होते असे समज || ||

 


 कृष्णद्वैपायनं व्यासं विद्धि नारायणं प्रभुम् ।
 को ह्यन्यो भुवि मैत्रेय महाभारतकृद्‍भवेत् ॥ ५ ॥

भगवान कृष्णद्वैपायनाला तु साक्षात नारायणच समज, कारण हे मैत्रेया! संसारात नारायणा व्यतिरिक्त दुसरा कोण महाभारताचा रचयिता होऊ शकेल? ||||



 
 तेन व्यस्ता यथा वेदा मत्पुत्रेण महात्मना ।
 द्वापरे ह्यत्र मैत्रेय तस्मिञ्छृणु यथातथम् ॥ ६ ॥

हे मैत्रेत्रा! द्वापरयुगात माझा पुत्र महात्मा कृष्णद्वैपायन ह्याने ज्या प्रकारे वेदांचे विभाग केले होते ते यथावत ऐक || ||

 


 ब्रह्मणा चोदितो व्यासो वेदान्व्यस्तुं प्रचक्रमे ।
 अथ शिष्यान्प्रजग्राह चतुरो वेदपारगान् ॥ ७ ॥

जेव्हा ब्रह्माच्या प्रेरणेने व्यासांने वेदाचा विभाग करण्याचा उपक्रम केला, तेव्हा त्यांनी वेदांचा पूर्णपणे अध्ययन करण्यास समर्थ असलेल्या चार ऋषिंना शिष्य बनवले || ||

 

 

 ऋग्वेदपाठकं पैलं जग्राह स महामुनिः ।
 वैशम्पायननामानं यजुर्वेदस्य चाग्रहीत् ॥ ८ ॥
 जैमिनिं सामवेदस्य तथैवाथर्ववेदवित् ।
 सुमन्तुस्तस्य शिष्योभूद्वेदव्यासस्य धीमतः ॥ ९ ॥

त्यापैकी पैल मुनीला ऋग्वेद, वैशम्पायनाला यजुर्वेद आणि जैमिनिला सामवेद शिकवला तसेच त्या मतिमान व्यासांचा सुमन्तु नामक शिष्य अथर्ववेदाचा ज्ञाता झाला || ८ – ९ ||

 


रोमहर्षणनामानं महाबुद्धिं महामुनिः ।
सूतं जग्राह शिष्यं स इतिहासपुराणयोः ॥ १० ॥

ह्याशिवाय सूतजातीय महाबुद्धिमान रोमहर्षणाला महामुनि व्यासांनी अपने इतिहास आणि पुराण विद्यार्थीरूपात ग्रहण करविले || १० ||



एक आसीद्यजुर्वेदस्तं चतुर्धा व्यकल्पयत् ।
चातुर्हेत्रमभूत्तस्मिंस्तेन यज्ञमथाकरोत् ॥ ११ ॥

पूर्वकाळी यजुर्वेद एकच होता. त्याचे त्यांनी चार विभाग केले, म्हणून त्यात चातुर्होत्राची प्रवुत्ति झाली आणि ह्या चातुर्होत्र-विधिनेच त्यांनी यज्ञानुष्ठानाची व्यवस्था केली || ११ ||

 


 आध्वर्यवं यजुर्भिस्तु ऋग्भिर्होत्रं तथा मुनिः ।
 औद्‍गात्रं सामभिश्चक्रे ब्रह्मत्वं चाप्यथर्वभिः ॥ १२ ॥

व्यासांनी यजु:पासून अध्वर्युच्या, ऋक पासून होताच्या, सामपासून उद्गाताच्या व अथर्ववेदापासून ब्रह्माच्या कर्मांची स्थापना केली || १२ ||

 

 

 ततःस ऋच उद्धृत्य ऋग्वेदं कृतवान्मुनिः ।
 यजूंषि च यजुर्वेदं सामवेदं च सामभिः ॥ १३ ॥

त्यानन्तर त्यांनी ऋक तथा यजु:च्या श्रुतिंचा उद्धार करून ऋग्वेद व यजुर्वेदाची आणि सामश्रुतिंपासून सामवेदाची रचना केली || १३ ||

 


 राज्ञां चाथर्ववेदेन सर्वकर्माणि च प्रभुः ।
 कारयामास मैत्रेय ब्रह्मत्वं च यथास्थिति ॥ १४ ॥

हे मैत्रेया! अथर्ववेदा द्वारा भगवान व्यासांनी सम्पूर्ण राज-कर्म व ब्रह्मत्त्वाची यथावत व्यवस्था केली || १४ ||

 


सोऽयमेको यथा वेदस्तरुस्तेन पृथक्कृतः ।
चतुर्धाथ ततो जातं वेदपादपकाननम् ॥ १५ ॥

अशा प्रकारे व्यासांनी वेदरूपी एक वृक्षाचे चार विभाग करून परत विभक्त झालेल्या त्या चारही वेदरूपी वृक्षांचे वन उत्पन्न झाले || १५ ||




बिभेद प्रथमं विप्र पैलो ऋग्वेदपादपम् ।
इन्द्रप्रमितये प्रादाद्‍बाष्कलाय च संहिते ॥ १६ ॥

हे विप्रा! आधी पैलमुनींनी ऋग्वेदरूपी वृक्षाचे दोन विभाग केले आणि त्या दोन्ही शाखा इंद्रप्रमिति व बाष्कल ह्या आपल्या शिष्यांना शिकवल्या || १६ ||

 


 चतुर्धा स विभेदाथ बाष्कलोपि च संहिताम् ।
 बोधादिभ्यो ददौ ताश्च शिष्येभ्यः स महामुनिः ॥ १७ ॥

नंतर बाष्कलाने सुद्धा आपल्या शाखेचे चार भाग केले आणि ते बोध्य आदि आपल्या शिष्यांना शिकवले || १७ ||

 


बोध्याग्निमाढकौ तद्वद्‌याज्ञवल्क्यपराशरौ ।
प्रतिशाखास्तु शाखायास्तस्यास्ते जगृहुर्मुने ॥ १८ ॥

हे मुने! बाष्कलाच्या शाखेच्या त्या चारही प्रतिशाखा त्याचे शिष्य बोध्य, आग्निमाढक, याग्यवल्क्य आणि पराशर ह्यांनी ग्रहण केले || १८ ||



इन्द्रप्रमितिरेकां तु संहितां स्वसूतं ततः ।
माण्डुकेयं महात्मानं मैत्रेयाध्यापयत्तदा ॥ १९ ॥

हे मैत्रेया! इंद्रप्रमितिने आपली प्रतिशाखा आपल्या पुत्राला महात्मा माण्डुकेय ह्याला शिकवली || १९ ||

 


तस्य शिष्यप्रशिष्येभ्यः पुत्रशिष्यक्रमाद्ययौ ॥ २० ॥
वेदमित्रस्तु शाकल्यः संहितां तामधीतवान् ।
चकार संहिताः पञ्च शिष्येभ्यः प्रददौ च ताः ॥ २१ ॥

अशाप्रकारे शिष्य – प्रशिष्य क्रमाने शाखांचा पुत्र व शिष्यांमध्ये प्रचार झाला. ह्या शिष्य परम्परेनेच शाकल्य वेदमित्राने ह्या संहितेचे पठण करून पाच अनुशाखांमध्ये विभागून आपल्या पाच शिष्यांना शिकवली || २० – २१ ||

 

 

तस्य शिष्यास्तु ये पञ्च तेषां नामानि मे शृणु ।
मुद्‍गलो गोमुखश्चैव वात्स्यः शालीय एव च ।
शरीरः पञ्चमश्चासीन्मैत्रेय सुमहामतिः ॥ २२ ॥

त्याच्या पाच शिष्यांची नावे ऐक. हे मैत्रेया! ते मुद्गल, गोमुख, वात्स्य, शालीय आणि पाचवे महामति शरीर होते || २२ ||

 


 संहितात्रितयं चक्रे शाकपूर्णस्तथेतरः ।
 निरुक्तमकरोत्तद्वच्चतुर्थं मुनिसत्तम ॥ २३ ॥

हे मुनिसत्तमा! त्यांचे दूसरे शिष्य शाकपूर्ण ह्यांनी तीन वेदसंहितांची व एक निरुक्त अशा चार ग्रंथांची रचना केली || २३ ||

 


क्रौञ्चो वैतालिकस्तद्वद्‍बलाकश्च महामुनिः ।
निरुक्तकृच्चतुर्थोभूद्वेदवेदाङ्‍गपारगः ॥ २४ ॥

ह्या संहितांचे अध्ययन करणारे त्यांचे शिष्य महामुनि क्रौंच, वैतालिक आणि बलाक होते तसेच निरुक्ताचे अध्ययन करणारे एक चौथे शिष्य वेद-वेदांगांचे पारगामी निरुक्तकार झाले || २४ ||

 


 इत्येताः प्रतिशाखाभ्यो ह्यनुशाखा द्विजोत्तम ।
 बाष्कलश्चापरास्तिस्त्रःसंहिताः कृतवान्द्विज ।
 शिष्यः कालायनिर्गार्ग्यस्तृतीयश्च कथाजवः ॥ २५ ॥
 इत्येता बह्वृचाः प्रोक्ताः संहिता यैः प्रवर्तिताः ॥ २६ ॥

अशाप्रकारे वेदरूपी वृक्षाच्या प्रतिशाखांपासून अनुशाखांची उत्पत्ति झाली. हे द्विजोत्तमा! बाष्कलाने ह्या व्यतिरिक्त आणखी तीन संहितांची रचना केली. त्यांचे शिष्य कालायनि, गार्ग्य तथा कथाजव होते. अशाप्रकारे ज्यांनी संहितांची रचना केली ते बहवृच नावाने प्रसिद्ध झाले || २५ – २६ ||




             "इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे चतुर्थोऽध्यायः"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...