गुरुवार, ९ एप्रिल, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, तृतीय अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 3

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः ॥ ॥ तृतीयोऽध्यायः ॥



"चतुर्युगानुसार भिन्न-भिन्न व्यासांची नावे तसेच ब्रह्म-ज्ञानाच्या माहात्म्याचे वर्णन"

 

श्रीमैत्रेय उवाच
ज्ञातमेतन्मया त्वत्तो यथा सर्वमिदं जगत् ।
विष्णुर्विष्णौ विष्णुतश्च न परं विद्यते ततः ॥ १ ॥

श्रीमैत्रेय म्हणाले ;– हे भगवन! आपल्या कथनामुळे मला हे कळले की कशा प्रकारे हे सम्पूर्ण जगत विष्णुरूप आहे, विष्णुतच स्थित आहे, विष्णुपासूनच उत्पन्न झाले आहे आणि विष्णु व्यतिरिक्त आणखी दुसरे काहीही नाही || ||

 


 एतत्तु श्रोतुमिच्छामि व्यस्ता वेदा महात्मना ।
 वेदव्यासस्वरूपेण तथा तेन युगे युगे ॥ २ ॥

आता मी हे ऐकू इच्छितो की भगवंताने वेदव्यासरूपाने युगा-युगात कशा प्रकारे वेदाची विभागणी केली || ||

 


 यस्मिन्यस्मिन्युगे व्यासो यो य आसीन्महामुने ।
 तं तमाचक्ष्व भगवञ्छाखाभेदांश्च मे वद ॥ ३ ॥

हे महामुने! हे भगवन! ज्या ज्या युगात जे जे वेदव्यास झाले त्यांचे तसेच वेदांच्या सम्पूर्ण शाखाभेदांचे आपण मला वर्णन करावे || ||



 श्रीपराशर उवाच
 वेदद्रुमस्य मैत्रेय शाखाभेदास्सहस्रशः ।
 नशक्तो विस्तराद्वक्तुं संक्षेपेण शृणुष्व तम् ॥ ४ ॥

श्रीपराशर म्हणाले;– हे मैत्रेया! वेदरूपी वृक्षाच्या सहस्र शाखा-भेद आहेत, त्यांचे विस्ताराने वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही, म्हणून संक्षेपात सांगतो || ||

 


 द्वापरे द्वापरे विष्णुर्व्यासरूपी महामुने । ।
 वेदमेकं सुबहुधा कुरुते जगतो हितः ॥ ५ ॥

हे महामुने! प्रत्येक द्वापरयुगात भगवान विष्णु व्यासरूपात अवतीर्ण होऊन संसाराच्या कल्याणासाठी एका वेदाचे अनेक भेद करतो || ||

 


 वीर्य तेजो बलं चाल्पं मनुष्याणामवेक्ष्य च ।
 हिताय सर्वभूतानां वेदभेदान्करोति सः ॥ ६ ॥

मनुष्याचे बल, वीर्य आणि तेज अल्प असल्याचे जाणून समस्त प्राणीमात्रांच्या हितासाठी वेदांचा विभाग करतो || ||

 

 

ययासौ कुरुते तन्वा वेदमेकं पृथक् प्रभुः ।
वेदव्यासाभिधाना तु सा च मूर्तिर्मधुद्विषः ॥ ७ ॥

ज्या शरीराद्वारे तो प्रभु एका वेदाचे अनेक विभाग करतो, भगवान मधुसुदनाच्या त्या मुर्तिचे नाव वेदव्यास आहे || ||

 


 यस्मिन्मन्वन्तरे व्यासा ये ये स्युस्तान्निबोध मे ।
 यथा च भेदश्शाखानां व्यासेन क्रियते मुने ॥ ८ ॥

हे मुने! ज्या ज्या मन्वन्तरात जे जे व्यास असतात आणि ते ज्या प्रकारे शाखांचा विभाग करतात, ते माझ्याकडून ऐक || ||

 

 

 अष्टाविंशतिकृत्वो वै वेदो व्यस्तो महर्षिभिः ।
 वैवस्वतेऽन्तरे तस्मिन्द्वापरेषु पुनः पुनः ॥ ९ ॥

ह्या वैवस्वत मन्वन्तराच्या प्रत्येक द्वापरयुगात व्यास महर्षिंनी आतापर्यंत पुन्हा पुन्हा अठ्ठावीस वेळा वेदांचा विभाग केला आहे || ||



 वेदव्यासा व्यतीता ये ह्यष्टाविंशति सत्तम ।
 चतुर्धा यैः कृतो वेदो द्वापरेषु पुनः पुनः ॥ १० ॥

हे साधूश्रेष्ठा! ज्यांनी पुन्हा पुन्हा द्वापरयुगात वेदांचे चार – चार विभाग केले त्या अट्ठावीस व्यासांचे विवरण ऐक || १० ||

 


 द्वापरे प्रथमे व्यस्तस्स्वयं वेदः स्वयम्भुवा ।
 द्वितीये द्वापरे चैव वेदव्यासः प्रजापतिः ॥ ११ ॥

पहिल्या द्वापरयुगात स्वयं भगवान ब्रह्माने वेदांचा विभाग केला होता. दूसर्‍या द्वापरात वेदव्यास प्रजापति झाले || ११ ||

 

 

 तृतीये चोशना व्यासश्चतुर्थे च बृहस्पतिः ।
 सविता पञ्चमे व्यासः षष्ठे मृत्युस्स्मृतः प्रभुः ॥ १२ ॥

तिसर्‍या द्वापरात शुक्राचार्य आणि चौथ्यात बृहस्पति व्यास झाले, पाचव्यात सूर्य आणि सहाव्या द्वापरयुगात भगवान मृत्यु व्यास होते || १२ ||

 


 सप्तमे च तथैवेन्द्रो वसिष्ठश्चाष्टमे स्मृतः ।
 सारस्वतश्च नवमे त्रिधामा दशमे स्मृतः ॥ १३ ॥

सातव्या द्वापराचे वेदव्यास इंद्र, आठव्याचे वसिष्ठ, नवव्याचे सारस्वत आणि दहाव्या द्वापराचे वेदव्यास त्रिधामा होते || १३ ||

 


 एकादशे तु त्रिशिखो भरद्वाजस्ततः परः ।
 त्रयोदशे चान्तरिक्षो वर्णी चापि चतुर्दशे ॥ १४ ॥

अकराव्यात त्रिशिख, बाराव्या द्वापरात भरद्वाज, तेराव्यात अन्तरिक्ष आणि चौदाव्यात वर्णी नामक व्यास झाले || १४ ||

 

 

 त्रय्यारुण: पञ्चदशे षोडशे तु धनञ्जयः ।
 ऋतुञ्जयः सप्तदशे तदूर्ध्वं च जयस्स्मृतः ॥ १५ ॥

पंधरावे त्रय्यारुण, सोळावे धनंजय, सतराव्या द्वापरात क्रतुन्जय आणि अठरावे जय नामक व्यास झाले || १५ ||



ततो व्यासो भरद्वाजो भरद्वाजाच्च गौतमः ।
गौतमादुत्तरो व्यासो हर्यात्मा योऽभिधीयते ॥ १६ ॥

एकोणीसाव्या द्वापरयुगात व्यास भरद्वाज झाले, भरद्वाज नंतर गौतम व त्यानंतर हर्यात्मा व्यास होते || १६ ||

 

 अथ हर्यात्मनोऽन्ते च स्मृतो वाजश्रवा मुनिः ।
 सोमशुष्मायणस्तस्मात्तृणबिन्दुरिति स्मृतः ॥ १७ ॥

हर्यात्मा नंतर वाजश्रवामुनि व्यास झाले व त्यांच्या पश्चात सोमशुष्मवंशी तृणबिंदु वेदव्यास होते || १७ ||

 


 ऋक्षोऽभूद्‌भार्गवस्तस्माद्वाल्मीकिर्योऽभिधीयते ।
 तस्मादस्मत्पिता शक्तिर्व्यासस्तस्मादहं मुने ॥ १८ ॥

त्यानंतभृगुवंशी ऋक्ष व्यास झाले जे वाल्मीकि म्हणून विख्यात होते, नन्तर माझे पिता शक्ति आणि मग मी व्यास झालो || १८ ||

 


 जातुकर्णोऽभवन्मत्तः कृष्णद्वैपायनस्ततः ।
 अष्टाविंशतिरित्येते वेदव्यासाः पुरातनाः ॥ १९ ॥

एको वेदश्चतुर्धा तु तैः कृतो द्वापरादिषु ॥ २० ॥

माझ्या नंतर जातुकर्ण व्यास झाले आणि नंतर कृष्णद्वैपायन – अशा प्रकारे हे अट्ठावीस व्यास प्राचीन आहेत. ह्यांनी द्वापरादि युगांमध्ये एकाच वेदाचे चार – चार विभाग केले || १९- २० ||

 


 भविष्ये द्वापरे चापि द्रौणिर्व्यासो भविष्यति ।
 व्यतीते मम पुत्रेऽस्मिन् कृष्णद्वैपायने मुने ॥ २१ ॥

हे मुने! माझा पुत्र कृष्णद्वैपायन ह्याच्यानंतर आगामी द्वापरयुगात द्रोण-पुत्र अश्वत्थामा वेदव्यास होणार || २१ ||



 ध्रुवमेकाक्षरं ब्रह्म ओमित्येव व्यवस्थितम् ।
 बृहत्वाद्‌बृंहणत्वाच्च तद्‌ब्रह्मेत्यभिधीयते ॥ २२ ॥

ॐ’ हे अविनाशी एकाक्षरच ब्रह्म आहे. हे बृहत आणि व्यापक आहे म्हणून ह्याला ‘ब्रह्म’ म्हणतात || २२ ||

 प्रणवावस्थितं नित्यं भूर्भुवस्स्वरितीर्यते ।
 ऋग्यजुस्सामाथर्वाणो यत्तस्मै ब्रह्मणे नमः ॥ २३ ॥

भूर्लोक, भुवर्लोक आणि स्वर्लोक हे तीनही प्रणवरूप ब्रह्मातच स्थित आहेत तसेच प्रणवच ऋक, यजु: साम आणि अर्थवरूप आहे; म्हणून त्या ओंकाररूप ब्रह्माला नमस्कार || २३ ||



जगतः प्रलयोत्पत्त्योर्यत्तत्कारणसंज्ञितम् ।
महतः परमं गुह्यं तस्मै सुब्रह्मणे नमः ॥ २४ ॥

जो संसाराची उत्पत्ति व प्रलयाचे कारण म्हणून विख्यात आहे तसेच जो महत्तत्त्वा पेक्षाही परम गुह्य, सूक्ष्म आहे त्या ओंकाररूप ब्रह्माला नमस्कार || २४ ||

 


अगाधापारमक्षय्यं जगत्सम्मोहनालयम् ।
स्वप्रकाशप्रवृत्तिभ्यां पुरुषार्थप्रयोजनम् ॥ २५ ॥

जो अगाध, अपार व अक्षय आहे, संसाराला मोहित करणार्‍या तमोगुणाचा आश्रय आहे, तसेच प्रकाशमय सत्त्वगुण आणि प्रवृत्तिरूप रजोगुणां द्वारा पुरुषांचे भोग आणि मोक्षरूप परमपुरुषार्थाचा हेतु आहे || २५ ||


 सांख्यज्ञानवतां निष्ठा गतिश्शमदमात्मनाम् ।
 यत्तदव्यक्तममृतं प्रवृत्तिब्रह्म शाश्वतम् ॥ २६ ॥

जो सांख्यज्ञानिंची परमनिष्ठा आहे, शम दमशालिंचे गंत्तव्य स्थान आहे, जो अव्यक्त आणि अविनाशी आहे तसेच जो सक्रिय ब्रह्म असूनही सदैव आहे || २६ ||

 


 प्रधानमात्मयोनिश्च गुहासंस्थं च शब्द्‍यते ।
 अविभागं तथा शुक्रमक्षयं बहुधात्मकम् ॥ २७ ॥

जो स्वयम्भू, प्रधान आणि अन्तर्यामी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच ज्याची अविभाग, दीप्तीमान, अक्षय अशी अनेक रूपे आहेत || २७ ||

 


 परमब्रह्मणे तस्मै नित्यमेव नमो नमः ।
 यद्‌रूपं वासुदेवस्य परमात्मस्वरूपिणः ॥ २८ ॥

जो परमात्मस्वरूप भगवान वासुदेवाचेच रूप आहे, त्या ओंकाररूप परब्रह्माला सर्वदा वारंवार नमस्कार || २८ ||

 


 एतद्‌ब्रह्म त्रिधा भेदमभेदमपि स प्रभुः ।
 सर्वभेदेष्वभेदोऽसौ भिद्यते भिन्नबुद्धिभिः ॥ २९ ॥

हे ओंकाररूप ब्रह्म अभिन्न असूनही [अकार, उकार आणि मकाररूपाने] तीन भेद असलेले आहे. हे समस्त भेदांमध्ये अभिन्नरूपाने स्थित आहे तरीही भेदबुद्धि मुळे भिन्न भिन्न प्रतीत होते || २९ ||

 


 स ऋङ्‌मयस्साममयः सर्वात्मा स यजुर्मयः ।
 ऋग्यजुस्सामसारात्मा स एवात्मा शरीरिणाम् ॥ ३० ॥

हा सर्वात्मा ऋकमय, सागमय आणि यजुर्मय आहे तसेच ऋगयजु: सामचे साररूप असलेला हा ओंकारच समस्त शरीरधारींचा आत्मा आहे || ३० ||

 


 स भिद्यते वेदमयस्स्ववेदं करोति भेदैर्बहुभिस्सशाखम् ।
 शाखाप्रणेता स समस्तशाखा ज्ञानस्वरूपो भगवानसङ्‌गः ॥ ३१ ॥

तो वेदमय आहे, तोच ऋग्वेदादिरूपात भिन्न होतो आणि तोच आपले वेदरूप नाना शाखांमध्ये विभक्त करतो. तो असंग भगवंतच समस्त शाखांचा रचयिता आणि त्यांचे ज्ञानस्वरूप आहे || ३१ ||

 



             "इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे तृतीयोऽध्यायः"

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...