॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ ॥ द्वितीयोऽध्यायः ॥
"सावर्णिमनुची उत्पत्ति तसेच आगामी सात मन्वन्तरांचे मनु, मनुपुत्र, देवता, इंद्र आणि सप्तर्षिंचे
वर्णन"
मैत्रेय उवाच
प्रोक्तान्येानि भवता सप्त मन्वन्तराणि वै ।
भविष्याण्यपि विप्रर्षे ममाख्यातुं त्वमर्हसि ॥ १ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले;–
हे विप्रर्षे! तुम्ही आधी होऊन
गेलेल्या सात मन्वन्तरांची कथा सांगितली, आता मला ह्या पुढील मन्वन्तंरांचे वर्णन देखील सांगा || १ ||
श्रीपराशर उवाच
सूर्यस्य पत्नी संज्ञाभूत्तनया विश्वकर्मणः ।
मनुर्यमो यमी चैव तदपत्यानि वै मुने ॥ २ ॥
श्रीपराशर म्हणाले;–
हे मुने! विश्वकर्माची पुत्री संज्ञा सूर्याची भार्या होती. त्याला तिच्यापासून मनु, यम आणि यमी ही तीन संतति झाली || २ ||
असहन्ती तु सा भर्तुस्तेजच्छायां युयोज वै ।
भर्तृशुश्रूषणेऽरण्यं स्वयं च तपसे ययौ ॥ ३ ॥
कालान्तराने पतिचे
तेज सहन न झाल्याने संज्ञाने आपल्या छायेला पतिच्या सेवेत नियुक्त केले व स्वतः तपस्येसाठी
वनात निघून गेली || ३ ||
संज्ञेयमित्यथार्कश्च छायायामात्मजत्रयम् ।
शनैश्चरं मनुं चान्यं तपतीं चाप्यजाजनत् ॥ ४ ॥
सूर्यदेवाने ही संज्ञाच
आहे असे समजून छायेपासून शनैश्वर, एक आणखी मनु तसेच तपती ही तीन संताने उत्पन्न केली || ४ ||
छायासंज्ञा ददौ शापं यमाय कुपिता यदा ।
तदान्येयमसौ बुद्धिरित्यासीद्यमसूर्ययोः ॥ ५ ॥
एके दिवशी जेव्हा
छायारूपिणी संज्ञाने क्रोधित होऊन यमाला शाप दिला तेव्हा सूर्य आणि यमाला कळले की ही कोणी दुसरी
आहे || ५ ||
ततो विवस्वानाख्याते तयैवारण्यसंस्थिताम् ।
समाधिदृष्ट्याददृशे तामश्वां तपसि स्थिताम् ॥ ६ ॥
तेव्हा छाया द्वारा
सर्व रहस्य कळल्यावर सूर्यदेवाने समाधित स्थित होऊन पाहिले की संज्ञा घोड़ीचे रूप धारण
करून वनात तपस्या करत आहे || ६ ||
वाजिरूपधरः सोऽथ तस्यां देवावथाश्विनौ ।
जनयामास रेवन्तं रेतसोऽन्ते च भास्करः ॥ ७ ॥
म्हणून त्याने सुद्धा
अश्वरूप होऊन तिच्यापासून दोन अश्विनीकुमार आणि रेत:स्त्रावाच्या नन्तर रेवंतला उत्पन्न
केले || ७ ||
आनिन्ये च पुनः संज्ञां स्वस्थानं भगवान् रविः ।
तेजसः शमनं चास्य विश्वकर्मा चकार ह ॥ ८ ॥
मग भगवान सूर्य संज्ञाला
आपल्या स्थानी घेऊन आले आणि विश्वकर्माने त्याचे तेज शांत केले || ८ ||
भ्रममारोप्य सूर्यं तु तस्य तेजोनिशातनम् ।
कृतवानष्टमं भागं स व्यशातयदव्ययम् ॥ ९ ॥
त्याने सूर्याला भ्रमियंत्रावर
चढवून त्याचे तेज छाटले, पण तो त्या अक्षुण्ण तेजाचा केवळ एक अष्टमांशच क्षीण करू शकला || ९ ||
यत्तस्माद्वैष्णवं तेजश्शातितं विश्वकर्मणा ।
जाज्वल्यमानमपतत्तद्भूमौ मुनिसत्तम ॥ १० ॥
हे मुनिसत्तमा! सूर्याचे
जे जाज्वल्यमान वैष्णव-तेज विश्वकर्माने छाटले होते ते पृथ्वीवर पडले || १० ||
त्वष्टैव तेजसा तेन विष्णोश्चक्रमकल्पयत् ।
त्रिशूलं चैव शर्वस्य शिबिकां धनदस्य च ॥ ११ ॥
शक्तिं गुहस्य देवानामन्येषां च यदायुधम् ।
तत्सर्वं तेजसा तेन विश्वकर्मा व्यवर्धयत् ॥ १२ ॥
पृथ्वीपर पडलेल्या
त्या सूर्य तेजा पासूनच विश्वकर्माने विष्णुचे चक्र, शंकराचा त्रिशूल, कुबेराचे विमान आणि कार्तिकेयाची शक्ति
बनवली तसेच अन्य देवतांची सुद्धा जी काही शस्त्र होती त्यांना पुष्ट केले || ११ – १२ ||
छायासंज्ञासुतो योऽसौ द्वितीयः कथितो मनुः ।
पूर्वजस्यासवर्णोऽसौ सावर्णिस्तेन कथ्यते ॥ १३ ॥
छायासंज्ञाचा पुत्र
दूसरा मनु ज्याचे आधी वर्णन केले आहे तो आपल्या अग्रज मनुचा सवर्ण असल्याने सावर्णि
म्हणून विख्यात झाला || १३ ||
तस्य मन्वन्तरं ह्योतत्सावर्णिकमथाष्टमम् ।
तच्छृणुष्व महाभाग भविष्यत्कथयामि ते ॥ १४ ॥
हे महाभागा! आता मी त्याच्याच पुढे होणार्या
सावर्णि नामक आठव्या मन्वन्तराचे वर्णन करतो || १४ ||
सावर्णिस्तु मनुर्योऽसौ मैत्रेय भविता ततः ।
सुतपाश्चामिताभाश्च मुख्याश्चापि तथा सुराः ॥ १५ ॥
हे मैत्रेया! हा सावर्णिच
त्या मन्वंतराचा मनु होईल तसेच सुतप, अमिताभ आणि मुख्यगण देवता होतील || १५ ||
तेषां गणश्च देवानामेकैको विंशकः स्मृतः ।
सप्तर्षिनपि वक्ष्यामि भविष्यान्मुनिसत्तम ॥ १६ ॥
त्या देवतांचा प्रत्येक
गण वीस वीसचा समूह असेल. हे मुनिसत्तमा! आता मी भविष्यात
होणारे सप्तर्षि सुद्धा सांगतो || १६ ||
दीप्तिमान् गालवो रामः कृपो द्रोणिस्तथा परः ।
मत्पुत्रश्च तथा व्यास ऋष्यशृङ्गश्च सप्तमः ॥ १७ ॥
त्यावेळी दीप्तिमान, गालत, राम, कूप, द्रोणपुत्र अश्वत्थामा, माझा पुत्र व्यास आणि ऋष्यश्रुंग
हे सप्तर्षि होतील || १७ ||
विष्णु प्रसादादनघः पातालान्तरगोचरः ।
विरोचनसुतस्तेषां बलिरिन्द्रो भविष्यति ॥ १८ ॥
विरजाश्चोर्वरीवांश्च निर्मोकाद्यास्तथापरे ।
सावर्णेस्तु मनोः पुत्रा भविष्यन्ति नरेश्वराः ॥ १९ ॥
पाताळ लोकवासी विरोचनाचा
पुत्र बलि श्रीविष्णुच्या कृपेने तत्कालीन इंद्र आणि सावर्णिमनुचा पुत्र विरजा, उर्वरीवान तसेच निर्मोक आदि तत्कालीन
राजा होतील || १८ – १९ ||
नवमो दक्षसावर्णिर्भविष्यति मुने मनुः ॥
२० ॥
पारा मरीचिगर्भाश्च सुधर्माणस्तथा त्रिधा
।
भविष्यन्ति तथा देवा ह्योकैको द्वादशो गणः
॥ २१ ॥
तेषामिन्द्रो महावीर्यो भविष्यत्यद्भुतो
द्विज ॥ २२ ॥
हे मुने! नववा मनु
दक्षसावर्णि होईल. त्यावेळी पार, मरीचिगर्भ आणि सुधर्मा नामक तीन देववर्ग असतील, ज्यापैकी प्रत्येक वर्गात बारा
बारा देवता होतील; तसेच हे द्विजा! त्यांचा नायक महापराक्रमी अद्भुत नामक इंद्र असेल || २० – २२ ||
सवनो द्युतिमान् भव्यो वसुर्मेधातिथिस्तथा ।
ज्योतिष्मान् सप्तमः सत्यस्तत्रैते च महर्षयः ॥ २३ ॥
सवन, द्युतिमान, भव्य, वसु, मेधातिथि, ज्योतिष्मान आणि सत्य हे त्यावेळचे
सप्तर्षि असतील || २३ ||
धृतकेतुर्दीप्तिकेतुः पञ्चहस्तनिरामयौ ।
पृथुश्रवाद्याश्च तथा दक्षसावर्णिकात्मजाः ॥ २४ ॥
तसेच धृतकेतु, दीप्तीकेतु, पंचहस्त, निरामय आणि पृथुस्त्रवा आदि दक्षसावर्णिमनुचे
पुत्र होतील || २४ ||
दसमो ब्रह्मसावर्णिर्भविष्यति मुने मनुः ।
सुधामानो विशुद्धाश्च शतसंख्यास्तथा सुराः ॥ २५ ॥
हे मुने! दहावा मनु
ब्रह्मसावर्णि होईल. त्या समयी सुधामा आणि विशुद्ध नामक शंभर शंभर देवतांचे दोन गण
असतील || २५ ||
तेषामिन्द्रश्च भविता शान्तिर्नाम महाबलः ।
सप्तर्षयो भविष्यन्ति ये तथा ताञ्छृणुष्व ह ॥ २६ ॥
महाबलवान शान्ति त्यांचा
इंद्र असेल तसेच तेव्हा जे सप्तर्षिगण होतील त्यांची नावे ऐक || २६ ||
हविष्मान्सुकृतःसत्यस्तपोमूर्तिस्तथापरः ।
नाभागोऽप्रतिमौजाश्चसत्यकेतुस्तथैव च ॥ २७ ॥
त्यांची नावे हविष्मान, सुकृत, सत्य, तपोमूर्ति, नाभाग, अप्रतिमौजा आणि सत्यकेतु असतील
|| २७ ||
सुक्षेत्रश्चोत्तमौजाश्च भूरिषेणादयो दश ।
ब्रह्मसावर्णिपुत्रास्तु रक्षिष्यन्ति वसुन्धराम् ॥ २८ ॥
ब्रह्मसावर्णिमनुचे
सुक्षेत्र, उत्तमौजा आणि भूरिवेण आदि दहा पुत्र पृथ्वीची रक्षा करतील || २८ ||
एकादशश्च भविता धर्मसावर्णिको मनुः ॥ २९ ॥
विहङ्गमाः कामागमा निर्वाणा ऋषयस्तथा ।
गणास्त्वेते तदा मुख्या देवानां च भविष्यताम् ।
ऐकैकस्त्रिंशकस्तेषां गणश्चेन्द्रश्च वै वृषः ॥ ३० ॥
अकरावा मनु धर्मसावर्णि
असेल. त्यावेळच्या देवतांचे विहंगम, कामगम आणि निर्वाणरति नामक मुख्य
गण असतील. ह्यातील प्रत्येकात तीस तीस देवता असतील आणि वृष नामक इंद्र
असेल || २९- ३० ||
निःस्वरश्चाग्नितेजाश्च
वपुष्मान्घृणिरारुणिः ।
हविष्माननघश्चैव भाव्याः सप्तर्षयस्तथा ॥
३१ ॥
त्यावेळच्या सप्तर्षिंची
नावे नि:स्वर, अग्नितेजा, वपुष्मान, घृणी, आरुणि, हविष्मान आणि अनघ आहेत || ३१ ||
सर्वत्रगःसुधर्मा च
देवानीकादयस्तथा ।
भविष्यन्ति मनोस्तस्य तनयाः पृथिवीश्वराः
॥ ३२ ॥
तसेच धर्मसावर्णि
मनुचे सर्वत्रग, सुधर्मा आणि देवानीक आदि पुत्र तेव्हाचे राज्याधिकारी पृथ्वीपति असतील || ३२ ||
रुद्रपुत्रस्तु सावर्णिर्भविता द्वादशो मनुः
।
ऋतुधामा च तत्रेन्द्रो भविता शृणु मे सुरान्
॥ ३३ ॥
रूद्रपुत्र सावर्णि
बारावा मनु होईल. त्याच्या समयी ऋतूधाम नामक इंद्र
असेल व तत्कालीन देवतांची नावे ऐक || ३३ ||
हरिता रोहिता देवास्तथा सुमनसो द्विज ।
सुकर्माणः सुरापाश्च दशकाः पञ्च वै गणाः ॥
३४ ॥
हे द्विजा! त्यावेळी
दहा दहा देवतांचे हरित, रोहित, सुमना, सुकर्मा अरु सुराप नामक पाच गण असतील || ३४ ||
तपस्वी सुतपाश्चैव तपोमूर्तिस्तपोरतिः ।
तपोधृतिर्द्युतिश्चान्यः सप्तमस्तु तपोधनः
।
सप्तर्षयस्त्विमे तस्य पुत्रानपि निबोध मे
॥ ३५ ॥
तपस्वी, सुतपा, तपोमूर्ति, तपोरति, तपोधृति, तपोद्युति तथा तपोधन हे सात सप्तर्षि
असतील. आता मनुपुत्रांची नावे
ऐक || ३५ ||
देववानुपदेवश्च देवश्रेष्ठादयस्तथा ।
मनोस्तस्य महावीर्या भविष्यन्ति महानृपाः
॥ ३६ ॥
त्यावेळी त्या मनुचे
देववाण, उपदेव व देवश्रेष्ठ
आदि महावीर्यशाली पुत्र तत्कालीन सम्राट होतील || ३६ ||
त्रयोदशो रुचिर्नामा भविष्यति मुने मनुः ॥
३७ ॥
सुत्रामाणः सुकर्माणः सुधर्माणस्तथामराः ।
त्रयस्त्रिंशद्विभेदास्त देवानां यत्र वै
गणाः ॥ ३८ ॥
दिवस्पतिर्महावीर्यस्तेषामिन्द्रो
भविष्यति ॥ ३९ ॥
तेरावा रूचि नामक
मनु होईल. ह्या मन्वन्तरात सुत्रामा, सुकर्मा व सुधर्मा नामक देवगण
होतील. ह्यापैकी प्रत्येकात तेहतीस तेहतीस देवता असतील, तसेच महाबलवान दिवस्पति त्यांचा इंद्र होईल || ३७ – ३९ ||
निर्मोहस्तत्त्वदर्शि च निष्प्रकम्प्यो
निरुत्सुकः ।
धृतिमानव्ययश्चान्यःसप्तमःसुतपा मुनिः ।
सप्तर्षयस्त्वमी तस्य पुत्रानपि निबोधे मे
॥ ४० ॥
निर्मोह, तत्त्वदर्शी, निष्कम्प, निरुत्सुक, धृतिमान, अव्यय आणि सुतपा – हे तत्कालीन
सप्तर्षि होतील. आता मनुपुत्रांची नावे
सुद्धा ऐक || ४० ||
चित्रसेनविचित्राद्या भविष्यन्ति
महीक्षितः ॥ ४१ ॥
त्या मन्वन्तरात चित्रसेन
आणि विचित्र आदि मनुपुत्र राजा होतील || ४१ ||
भौमश्चतुर्दशश्चात्र मैत्रेय भविता मनः ।
शुचिरिन्द्रः सुरगणस्तत्र पञ्च शृणुष्व
तान् ॥ ४२ ॥
चाक्षुषाश्च पवित्राश्च कनिष्ठा भ्राजिकास्तथा ।
वाचावृद्धश्च वै देवाःसप्तर्षीनपि मे शृणु ॥ ४३ ॥
हे मैत्रेया! चौदावा
मनु भौम होईल. तेव्हा शुचि नामक इंद्र आणि पाच
देवगण असतील; त्यांची नावे ऐक – ते चाक्षुस, पवित्र, कनिष्ठ, भ्राजिक आणि वाचावृद्ध नामक देवता आहेत. आता तत्कालीन सप्तर्षिंची नावं सुद्धा ऐक || ४२ -४३ ||
अग्निबाहुः शुचिः शुक्रो मागधोऽग्निध्र एव च ।
युक्तस्तथा जितश्चान्यो मनुपुत्रानतः शृणु ॥ ४४ ॥
त्यावेळी अग्रिबाहू, शुचि, शुक्र, मागध, अग्रिध, युक्त आणि जित – हे सप्तर्षि
होतील. आता मनुपुत्रांविषयी
सांगतो || ४४ ||
ऊरुगम्भीरबुद्ध्याद्या मनोस्तस्य सुता नृपाः ।
कथिता मुनिशार्दुल पालयिष्यन्ति ये महीम् ॥ ४५ ॥
हे मुनिशार्दुला!
असं म्हणतात की, त्या मनुचे ऊरू आणि गम्भीरबुद्धि आदि पुत्र होतील जे राज्याधिकारी होऊन पृथ्वीचे
पालन करतील || ४५ ||
चतुर्युगान्ते वेदानां जायते किल विप्लवः ।
प्रवर्तयन्ति तानेत्य भुवं सप्तर्षयो दिवः ॥ ४६ ॥
प्रत्येक चतुर्युगाच्या
शेवटी वेदांचा लोप होतो, तेव्हा सप्तर्षिगणच स्वर्गलोकातून पृथ्वीवर अवतीर्ण होऊन त्याचा
प्रचार करतात || ४६ ||
कृते कृते स्मृतेर्विप्र प्रणेता जायते मनुः ।
देवा यज्ञभुजस्ते तु यावन्मन्वन्तरं तु तत् ॥ ४७ ॥
प्रत्येक सत्ययुगाच्या
सुरूवातीला स्मृति-शास्त्र रचयिता मनुचा प्रादुर्भाव असतो; आणि त्या मन्वन्तराच्या अंतकाळा
पर्यन्त तत्कालीन देवगण यज्ञभाग भोगतात || ४७ ||
भवन्ति ये मनोः पुत्रा यावन्मन्वंतरं तु तैः ।
तदन्वयोद्भवैश्चैव तावद्भूः परीपाल्यते ॥ ४८ ॥
तसेच मनुचे पुत्र
व त्यांचे वंशधर मन्वन्तराच्या अंतापर्यंत पृथ्वीचे पालन करतात || ४८ ||
मनुःसप्तर्षयो देवा भूपालाश्च मनोः सुताः ।
मन्वन्तरे भवन्त्येते शक्रश्चैवाधिकारिणः ॥ ४९ ॥
अशाप्रकारे मनु सप्तर्षि, देवता, इंद्र व मनु-पुत्र राजागण – हे
प्रत्येक मन्वन्तराचे अधिकारी असतात || ४९ ||
चतुर्दशभिरेतैस्तु गतैर्मन्वन्तरैर्द्विज ।
सहस्रयुगपर्यतः कल्पो निःशेष उच्यते ॥ ५० ॥
हे द्विजा! ही चौदा
मन्वन्तरे होऊन गेल्यावर एक सहस्त्र युग राहणारे हे कल्प समाप्त होते असे म्हणतात || ५० ||
तावत्प्रमाणा च निशा ततो भवति सत्तम ।
ब्रह्मरूपधरः शेते शेषाहावम्बुसम्प्लवे ॥ ५१ ॥
हे साधूश्रेष्ठा!
त्यानंतर तितक्याच काळाची रात्र असते. त्यावेळी ब्रह्मरूपधारी
श्रीविष्णु प्रलयकालीन जलावर शेषशय्येवर शयन करतो || ५१ ||
त्रैलोक्यमखिलं ग्रस्त्वा भगवानादिकृद्विभुः ।
स्वमायासंस्थितो विप्र सर्वभूतो जनार्दनः ॥ ५२ ॥
हे विप्रा! तेव्हा
आदिकर्ता सर्वव्यापक सर्वभूत भगवान जनार्दन सम्पूर्ण त्रिलोकीचा ग्रास करून आपल्या
मायेत स्थित राहतो || ५२ ||
ततः प्रबुद्धो भगवान् यथा पूर्वं तथा पुनः ।
सृष्टिं करोत्यव्ययात्मा कल्पेकल्पे रजोगुमः ॥ ५३ ॥
त्यानंतर प्रलय रात्रीचा अंत झाल्यावर प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी
अव्ययात्मा भगवंत जागृत होऊन रजोगुणाच्या आश्रयाने सृष्टिची रचना करतो || ५३ ||
मनवो भूभुजःसेन्द्रा देवाःसप्तर्षयस्तथा ।
सात्त्विकोंऽशः स्थितिकरो जगतो द्विजसत्तम ॥ ५४ ॥
हे द्विजश्रेष्ठा!
मनु, मनु-पुत्र राजागण, इंद्र देवता तसेच सप्तर्षि –
हे सर्ग जगताचे पालन करणार्या भगवंताचेच सात्त्विक अंश आहेत || ५४ ||
चदुर्युगोऽप्यसौ विष्णुः स्थितिव्यापारलक्षणः ।
युगव्यवस्थां कुरुते तथा मैत्रेय तच्छृणु ॥ ५५ ॥
हे मैत्रेया! स्थितिकारक
भगवान विष्णु चारही युगात ज्या प्रकारे व्यवस्था करतो, ते ऐक || ५५||
कृते युगे परं ज्ञानं कपिलादिस्वरूपधृक् ।
ददाति सर्वभूतात्मा सर्वभूतहिते रतः ॥ ५६ ॥
समस्त प्राणीमात्रांच्या
कल्याणात तत्पर तो सर्वभूतात्मा सत्ययुगात कपिल आदिरूप धारण करून परम ज्ञानाचा उपदेश
करतो || ५६ ||
चक्रवर्तिस्वरूपेण त्रेतायामपि स प्रभूः ।
दुष्टानां निग्रह कुर्वन्परिपाति जगत्त्रयम् ॥ ५७ ॥
त्रेतायुगात तो सर्वसमर्थ
प्रभु चक्रवर्ती भूपाल होऊन दुष्टांचे दमन करून त्रिलोकाचे रक्षण करतो || ५७ ||
वेदमेकं चतुर्भेदं कृत्वा शाखाशतैर्विभुः ।
करोति बहुलं भूयो वेदव्यासस्वरूपधृक् ॥ ५८ ॥
नंतर द्वापरयुगात
तो वेदव्यासरूप धारण करून एका वेदाचे चार विभाग करतो आणि शेकडो शाखांमध्ये ते वाटून
त्यांचा भरपूर विस्तार करतो || ५८ ||
वेदांस्तु द्वापरे व्यस्य कलेरन्ते पुनर्हरिः ।
कल्किस्वरूपी दुर्वृत्तन्मार्गे स्थापयति प्रभुः ॥ ५९ ॥
अशा प्रकारे द्वापरयुगात
वेदांचा विस्तार करून कलियुगाच्या शेवटी भगवंत कल्किरूप धारण करून दुराचारी लोकांना
सन्मार्गात प्रवृत्त करतो || ५९ ||
एवमेतज्जगत्सर्वं शश्वत्पाति करोति च ।
हन्ति चान्तेष्वनन्तात्मा नास्त्यस्माद्व्यतिरेकि यत् ॥ ६० ॥
अशा प्रकारे, अनंतात्मा प्रभु निरंतर ह्या
सम्पूर्ण जगताची उत्पत्ति, पालन आणि नाश करत राहतो. ह्या संसारात अशी कोणतीही वस्तु नाही जी त्याच्याहून भिन्न असेल
|| ६० ||
भूतं भव्यं भविष्यं च सर्वभूतान्महात्मनः ।
तदत्रान्यत्र वा विप्र सद्भावः कथितस्तव ॥ ६१ ॥
हे विप्रा! इहलोकी
व परलोकात भूत, भविष्य आणि वर्तमान जितके पदार्थ आहेत ते सर्व महात्मा भगवंत विष्णुपासूनच उत्पन्न
झाले आहेत – हे सर्व मी तुला सांगितले || ६१ ||
मन्वन्तराण्यशेषाणि कथितानि मया तवा ।
मन्वन्तराधिपांश्चैव किमन्यत्कथयामि ते ॥
६२ ॥
मी तुला सम्पूर्ण
मन्वन्तरांचे आणि मन्वन्तरातील अधिकार्यांचे वर्णन सांगितले. आता आणखी तुला काय
ऐकायचे आहे? || ६२ ||
"इति श्रीविष्णुपुराणे
तृतीये अंशे द्वितीयोऽध्यायः"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा