॥ विष्णुपुराणम् ॥
॥ तृतीयः अंशः ॥ ॥
प्रथमोऽध्यायः
॥
"पहिल्या सात मन्वन्तरातील मनु, इंद्र, देवता, सप्तर्षि आणि मनुपुत्रांचे वर्णन"
मैत्रेय उवाच
कथिता गुरूणा सम्यग्भूसमुद्रादिसंस्थितिः ।
सूर्यादिनां च संस्थानं ज्योतिषां चातिविस्तरात् ॥ १ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले;– हे गुरुदेव! आपण पृथ्वी
व समुद्र आदिंची स्थिति तसेच सूर्य आदि ग्रहगणांच्या संस्थानाचे भल्याप्रकारे अति विस्तारपूर्वक
वर्णन केले || १ ||
देवादीनां तथा सृष्टिर्ऋषीणां चापि वर्णिता ।
चातुर्वर्ण्यस्य चोत्पत्तिस्तिर्यग्योनिगतस्य च ॥ २ ॥
आपण देवतादि व ऋषिगणांची सृष्टि
तसेच चातुर्वर्ण्य आणि तिर्यक योनिगत जीवांच्या उत्पत्तिचे सुद्धा वर्णन केले || २ ||
ध्रुवप्रह्लादचरितं विस्तराच्च त्वयोदितम् ।
मन्वन्तराण्यशेषाणि श्रोतुमिच्छाम्यनुक्रमात् ॥ ३ ॥
मन्वन्तराधिपांश्चैव शक्रदेवपुरोगमान् ।
भवता कथितानेताञ्छ्रोतुमिच्छाम्यहं गुरो ॥ ४ ॥
ध्रुव आणि प्रल्हादचे चरित्र देखील आपण विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून हे गुरो ! आता मी आपल्या मुखकमलातून सम्पूर्ण मन्वन्तर
तसेच इंद्र व देवतांसहित मन्वन्तरांचे अधिपति असलेल्या समस्त मनुंचे वर्णन ऐकू इच्छितो
|| ३ – ४ ||
श्रीपराशर उवाच
अतीतानागतानीह यानि मन्वन्तराणि वै ।
तान्यहं भवतः सम्यक्कथयामि यथा क्रमम् ॥ ५ ॥
श्रीपराशर म्हणाले
भूतकाळात जितकी मन्वन्तरे होऊन गेली तसेच ह्यापुढे जी जी होतील त्या सर्वांचे
मी तुला क्रमश: वर्णन करतो || ५ ||
स्वायम्भुवो मनुः पूर्वं परः स्वारोचिषस्तथा ।
उत्तमस्तामसश्चैव रैवतश्चाक्षुषस्तथा ॥ ६ ॥
प्रथम मनु स्वायम्भुव होता. त्याच्या नन्तर क्रमश: स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत आणि चाक्षुस झाले || ६ ||
षडेते मनवोऽतीताःसाम्प्रतं तु रवेःसुतः ।
वैवस्वतेयं यस्त्वेतत्सप्तमं वर्ततेन्तरम्
॥ ७ ॥
हे सहा मनु पूर्वकाळी होऊन गेले
. आता ह्या वेळी सुर्यपुत्र वैवस्वत मनु आहे, ज्याचा हा सातवा वर्तमान
मन्वन्तर आहे || ७ ||
स्वायम्भुवं तु कथितं कल्पादावन्तरं मया ।
देवाः सप्तर्षयश्चैव यथावत् कथिता मया ॥ ८ ॥
कल्पाच्या आरंभी ज्या स्वायम्भुव
मन्वन्तरा विषयी मी सांगितलं त्याचे देवता आणि सप्तर्षिंचे मी आधीच यथावत वर्णन केले
आहे || ८ ||
अत ऊर्ध्वं प्रवक्ष्यामि मनोःस्वारोचिषस्य तु ।
मन्वन्तराधिपान्सम्यग्देवर्षिंस्तत्सुतांस्तथा ॥ ९ ॥
आता इथून पुढे मी स्वारोचिष मनुचे मन्वन्तराधिकारी देवता, ऋषि आणि मनुपुत्रांचे स्पष्ट
वर्णन करेन || ९ ||
पारावताः सतुषिता देवाः स्वारोचिषेऽन्तरे ।
विपश्चत्तत्र देवेन्द्रो मैत्रेयासीन्महाबलः ॥ १० ॥
हे मैत्रेया! स्वारोचिष मन्वन्तरात
पारावत आणि तुषितगण देवता होते, महाबली विपश्चित देवराज इंद्र होता || १० ||
ऊर्जः स्तम्भस्तथा प्राणो वातोऽथ पृषभस्तथा ।
निरयश्च परीवांश्च तत्र सप्तर्षयोऽभवन् ॥ ११ ॥
ऊर्ज्ज, स्तम्भ, प्राण, वात, पृषभ, निरय आणि परिवान हे त्या समयी
सप्तर्षि होते || ११ ||
चैत्रकिम्पुरुषाद्याश्च सुताःस्वारोचिषस्य तु ।
द्वितीयमेतद्व्याख्यातमन्तरं शृणु चोत्तमम् ॥ १२ ॥
तसेच चैत्र आणि किम्पुरुष आदि स्वारोचिष मनुचे पुत्र होते. अशा प्रकारे तुला द्वितीय मन्वन्तराचे
वर्णन केले. आता उत्तम मन्वन्तराचे विवरण ऐक || १२ ||
तृतीयेप्यन्तरे ब्रह्मन्नुत्तमो नाम यो मनुः ।
सुशान्तिर्नाम देवेन्द्रो मैत्रेयासीत्सुरेश्वरः ॥ १३ ॥
हे ब्रह्मन! तिसर्या मन्वन्तरात
उत्तम नामक मनु आणि सुशान्ति नामक देवाधिपति इंद्र होता || १३ ||
सुधामानस्तथा सत्या जपाश्चाथ प्रतर्दनाः ।
वशवर्तिश्च पञ्चैते गणा द्वादशकाःस्मृताः ॥ १४ ॥
त्यासमयी सुधाम, सल्य, जप, प्रतर्दन आणि वशवर्ती हे पाच
बारा-बारा देवतांचे गण होते || १४ ||
वसिष्ठतनया ह्योते सप्त सप्तर्षयोऽभवन् ।
अजः परशुदीप्ताद्यास्तथोत्तममनोःसुताः ॥ १५ ॥
तसेच वसिष्ठांचे सात पुत्र सप्तर्षिगण आणि अज, परशु एवं दीप्त आदि उत्तममनुचे पुत्र होते || १५ ||
तामसस्यान्तरे देवाःसुपारा हरयस्तथा ।
सत्याश्च सुधियश्चैव सप्तविंशतिका गणाः ॥ १६ ॥
तामस मन्वन्तरात सुपार, हरि, सत्य व सुधि हे चार देवतांचे
वर्ग होते व ह्यातील प्रत्येक वर्गात सत्तावीस सत्तावीस देवगण होते || १६ ||
शिबिरिन्द्रस्तथा चासीच्छतयज्ञोपलक्षणः ।
सप्तर्षयश्च ये तेषां तेषां नामानि मे शृणु ॥ १७ ॥
शंभर अश्वमेध यज्ञ केलेला राजा शिबि हा त्यावेळी इंद्र होता तसेच त्यासमयी जो सप्तर्षिगण होता त्यांची नावे ऐक
|| १७ ||
ज्योतिर्धामा पुथुः काव्यश्चैत्रोऽग्निर्वनकस्तथा ।
पीवरश्चर्षयो ह्येते सप्त तत्रापि चान्तरे ॥ १८ ॥
ज्योतिर्धामा, पृथु, काव्य, चैत्र, अग्नि, वनक आणि पीवर हे त्या मन्वन्तराचे
सप्तर्षि होते || १८ ||
नरः ख्यातिः केतुरूपो जानुजङ्घादयस्तथा ।
पुत्रास्तु तामसस्यासन् राजानःसुमहाबलाः ॥ १९ ॥
तसेच नर, ख्याति, केतुरूप आणि जानुजंग आदि तामसमनुचे
महाबली पुत्रच त्यावेळचे राज्याधिकारी होते || १९ ||
पञ्चमे वापि मैत्रेय रैवतो नाम नामतः ।
मनुर्विभुश्च तत्रेन्द्रो देवांश्चात्रान्तरे शृणु ॥ २० ॥
हे मैत्रेया! पाचव्या मन्वन्तरात
रैवत नामक मनु आणि विभु नामक इंद्र झाला व त्यावेळी जो देवगण झाला त्यांची नावं ऐक
|| २० ||
अमिताभा भूतरया वैकुण्ठासःसुमेधसः ।
एते देवगणास्तत्र चतुर्दश चतुर्दश ॥ २१ ॥
ह्या मन्वन्तरात चौदा चौदा देवतांचे
अमिताभ, भूतरय, वैकुण्ठ आणि सुमेधा नामक गण होते
|| २१ ||
हिरण्यरोमा वेदाश्रीरूर्ध्वबाहुस्तथापरः ।
वेदबाहुःसुधामा च पर्जन्यश्च महामुनिः ।
एते सप्तर्षयो विप्र तत्रासन् रैवतेऽन्तरे ॥ २२ ॥
हे विप्रा! ह्या रैवत मन्वन्तरात
हिरण्यरोमा, वेदश्री, ऊर्ध्वबाहू, वेद्बाहू, सुधामा, पर्जन्य व महामुनि हे सात सप्तर्षिगण होते || २२ ||
बलबन्धुश्च सम्भाव्यःसत्यकाद्याश्च तत्सुताः ।
नरेन्द्राश्च महावीर्या बभूवुर्मुनिसत्तम ॥ २३ ॥
हे मुनिसत्तमा! त्या समयी रैवतमनुचे
महावीर्यशाली पुत्र बलबन्धु, सम्भाव्य आणि सत्यक आदि राजा होते || २३ ||
स्वारोचिषश्तोत्तमश्च तामसो रैवतस्तथा ।
प्रियव्रतान्वया ह्येते चत्वारो मनवःस्मृताः ॥ २४ ॥
हे मैत्रेया! स्वारोचिष, उत्तम, तामस आणि रैवत हे चार मनु, राजा प्रियव्रताचे वंशधर मानले
जातात || २४ ||
विष्णुमाराध्य तपसा स राजर्षिः प्रियव्रतः ।
मन्वन्तराधिपानेताँल्लम्ब्धवानात्मवंशजान् ॥ २५ ॥
राजर्षि प्रियव्रताने तपस्येद्वारा
भगवान विष्णुची आराधना करून आपल्या वंशात उत्पन्न झालेल्या ह्या चार मन्वन्तराधिपांना
प्राप्त केले होते || २५ ||
षष्ठे मन्वन्तरे चासीच्चाक्षुषाख्यस्तथा मनुः ।
मनोजवस्तथैवेन्द्रो देवानपि निबोध मे ॥ २६ ॥
सहाव्या मन्वन्तरात चाक्षुष नामक मनु
आणि मनोजव नामक इंद्र होता. त्यावेळी जे देवगण होते त्यांची
नावे ऐक || २६ ||
आप्याः प्रसूता भव्याश्च पृथुकाश्च दिवौकसः ।
महानुभावा लखाश्च पञ्चैते ह्यष्टका गणाः ॥ २७ ॥
त्यावेळी आप्य, प्रसुत, भव्य, पृथुक आणि लेख हे पाच प्रकारचे
महानुभाव देवगण वर्तमान होते व ह्यातील प्रत्येक गणात आठ आठ देवता होते || २७ ||
सुमेधा विरजाश्चैव हविष्मानुत्तमो मधुः ।
अतिनामा सहिष्णुश्च सप्तासन्निति चर्षयः ॥ २८ ॥
त्या मन्वन्तरात सुमेधा, विरजा, हविष्मान, उत्तम, मधु, अतिनामा व सहिष्णु हे सात सप्तर्षि
होते || २८ ||
ऊरुः पूरुः शतध्युम्नप्रमुखाःसुमहाबलाः ।
चाक्षुषस्य मनोः पुत्राः पृथिवीपतयोऽभवन् ॥ २९ ॥
तसेच चाक्षुषचे अति बलवान पुत्र
ऊरू, पुरु आणि शतध्युम्र
आदि राज्याधिकारी होते || २९ ||
विवस्वतःसुतो विप्र श्राद्धदेवो महाद्युतिः ।
मनुःसंवर्तते धीमान् साम्प्रतं सप्तमेन्तरे ॥ ३० ॥
हे विप्रा! आता ह्या सातव्या
मन्वन्तरात सूर्य पुत्र महातेजस्वी बुद्धिमान श्राद्धदेव मनु आहे || ३० ||
आदित्यवसुरुद्राद्या देवाश्चात्र महामुने ।
पुरन्दरस्तथैवात्र मैत्रेय त्रिदशेश्वरः ॥ ३१ ॥
हे महामुने! ह्या मन्वन्तरात
आदित्य, वसु आणि रूद्र आदि
देवगण आहेत तसेच पुरन्दर नामक इंद्र आहे || ३१ ||
वशिष्ठः काश्यपोऽथात्रिर्जमदग्निःसगौतमः ।
विश्वामित्रभरद्वाजौ सप्त सप्तर्षयोऽभवन् ॥ ३२ ॥
ह्या समयी वसिष्ठ, कश्यप, अत्रि, जगदग्नि, गौतम, विश्वामित्र व भरद्वाज हे सात सप्तर्षि आहेत || ३२ ||
इक्ष्वाकुश्च नृगश्चैव धृष्टः शर्यातिरेव च ।
नरिष्यन्तश्च विख्यातो नाभागोऽरिष्ट एव च ॥ ३३ ॥
करूषश्च पृषध्रश्च सुमहाँल्लोकविश्रुतः ।
मनोर्वैवस्वतस्यैते नव पुत्राः सुधार्मिकाः ॥ ३४ ॥
तसेच वैवस्वत मनुचे इक्ष्वाकु, नृग, धृष्ट, शर्याति, नरिश्यंत, नाभाग, अरिष्ट, करूष आणि पृषध हे अत्यंत लोकप्रसिद्ध
आणि धर्मात्मा नऊ पुत्र आहेत || ३३ – ३४ ||
विष्णुशक्तिरनौपम्या सत्त्वोद्रिक्ता स्थितौ स्थिता ।
मन्वन्तरेष्वशेषेषु देवत्वेनाधितिष्ठति ॥ ३५ ॥
सर्व मन्वन्तरांमध्ये देवरूपात
स्थित भगवान विष्णुची अनुपम व सत्त्वप्रधान शक्तिच संसाराच्या स्थितित त्याची अधिष्ठात्री होते || ३५ ||
अंशेन तस्या जज्ञेऽसौ यज्ञःस्वायम्भुवेन्तरे ।
आकूत्यां मानसो देव उत्पन्नः प्रथमेऽन्तरे ॥ ३६ ॥
सर्वात पहिल्या स्वायम्भुव मन्वन्तरात
मानसदेव यज्ञपुरुष त्या विष्णुशक्तिच्या अंशापासूनच आकूतिच्या गर्भातून उत्पन्न झाले
होते || ३६ ||
ततः पुनः स वै देवः प्राप्ते स्वारोचिषेऽन्तरे ।
तुषितायां समुत्पन्नो ह्याजिषस्तुषितैः सह ॥ ३७ ॥
मग स्वारोचिष मन्वन्तराचे वेळी
ते मानसदेव श्रीअजित तुषित नामक देवगणांसह तुषितापासून उत्पन्न झाले || ३७ ||
औत्तमेऽप्यन्तरे देवस्तुषितस्तु पुनःस वै ।
सत्यायामभवत्सत्यः सत्यैः सह सुरोत्तमैः ॥ ३८ ॥
मग उत्तम मन्वन्तरात ते तुषितदेवच
देवश्रेष्ठ सत्यगणासह सत्यरूपापासून सत्याच्या उदरातून प्रकट झाले || ३८ ||
तामसस्यान्तरे चैव सम्प्राप्तो पुनरेव हि ।
हर्यायां हरिभिःसार्धं हरिरेव बभूव ह ॥ ३९ ॥
तामस मन्वन्तरात ते हरि नाम देवगणा
सहित हरिरूपाने हर्याच्या गर्भातून उत्पन्न झाले || ३९ ||
रैवतेप्यन्तरे देवःसम्भूत्यां मानसो हरिः ।
सम्भूतो रैवतैःसार्ध देवैर्देववरो हरिः ॥ ४० ॥
तत्पश्चात देवश्रेष्ठ हरि, रैवत मन्वन्तरात तत्कालीन देवगणां
सहित सम्भूतिच्या उदरातून प्रकट होऊन मानस नावाने विख्यात झाले || ४० ||
चाक्षुषे चान्तरे देवो वैकुण्ठः पुरुषोत्तमः ।
विकुण्ठायामसौ जज्ञे वैकुण्ठैर्दैवतैः सह ॥ ४१ ॥
चाक्षुष मन्वन्तरात पुरुषोत्तम
भगवान वैकुण्ठ नामक देवगणा सहित वैकुंठापासून उत्पन्न होऊन वैकुण्ठ म्हणून ओळखले गेले || ४१ ||
मन्वन्तरेऽत्र सम्प्राप्ते तथा वैवस्वते द्विज ।
वामनः काश्यपाद्विष्णुरदित्यां सम्बभूव ह ॥ ४२ ॥
आणि हे द्विजा! ह्या वैवस्वत मन्वन्तरात भगवान विष्णु कश्यपद्वारा अदितिच्या गर्भातून
वामनरूपात प्रकट झाले || ४२ ||
त्रिभिः क्रमैरिमाँल्लोकाञ्जित्वा येन महात्मना ।
पुरन्दराय त्रैलोक्यं दत्तं निहतकण्टकम् ॥ ४३ ॥
त्या महात्मा वामनाने आपल्या
तीन पावलांनी सम्पूर्ण लोक जिंकून हे निष्कंटक त्रेलोक्य इंद्राला दिले होते || ४३ ||
इत्येतास्तनवस्तस्य सप्तमन्वन्तरेषु वै ।
सप्तस्वेवाभवन्विप्र याभिः संवर्धिताः प्रजाः ॥ ४४ ॥
हे विप्रा! अशा प्रकारे सातही
मन्वन्तरात भगवंतांच्या ह्या सात मूर्त्या प्रकट झाल्या, ज्यापासून (भविष्याप) सम्पूर्ण
प्रजेची वृद्धि झाली || ४४ ||
यस्माद्विष्टमिदं विश्वं यस्य शक्त्या महात्मनः ।
तस्मात्स प्रोच्यते विष्णुर्विशेर्धातोः प्रवेशनात् ॥ ४५ ॥
हे सम्पूर्ण विश्व परमात्म्याच्याच
शक्तिने व्याप्त आहे; म्हणून तो ‘विष्णु’ नावाने विख्यात आहे, कारण ‘विश’ धातुचा अर्थ प्रवेश करणे
असा आहे || ४५ ||
सर्वे च देवा मनवःसमस्ता-स्सप्तर्षयो ये
मनुसूनवश्च ।
इन्द्रश्च योऽयं त्रिदशेशभूतोविष्णोरशोषास्तु
विभूतयस्ताः ॥ ४६ ॥
समस्त देवता, मनु, सप्तर्षि तसेच मनुपुत्र व देवतांचे
अधिपति इंद्रगण सर्व भगवान विष्णुच्याच विभूती आहेत || ४६ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा