॥
विष्णुपुराणम् ॥
द्वितीयः अंशः॥ षोडशोऽध्यायः
॥
ऋभूच्या आज्ञेने निदाघचे आपल्या घरी परतणे
ब्राह्मण उवाच
ऋभुर्वर्षसहस्रे तु समतीते नरेश्वर ।
निदाघज्ञानदानाय तदेव नगरं ययौ ॥ १ ॥
ब्राह्मण म्हणाला - हे नरेश्वरा !
त्यानन्तर सहस्त्र वर्षांनी महर्षि ऋभु निदाघला ज्ञानोपदेश करण्यासाति त्याच नगरीत
गेले ॥१॥
नगरस्य बहिः सोऽथ निदाघं ददृशे मुनिः ।
महीबलपरीवारे पुरं विशति पार्थिवे ॥ २ ॥
दूरे स्थितं महाभागं जनसंमर्दवर्जकम् ।
क्षुत्क्षामकण्ठमायान्तमरण्यात्ससमित्कुशम्
॥ ३ ॥
तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की तिथला
राजा भरपूर सेना वगैरेसह मोठ्या धूमधडाक्यात नगरीत प्रवेश करत आहे आणि वनातून कुशा
तसेच समिधा घेऊन आलेला तहान आणि भुकेने व्याकुळ महाभाग निदाघ जन समूहापासून दूर
उभा आहे ॥२-३॥
दृष्ट्वा निदाघं स ऋभुरुपगम्याभिवाद्य च
।
उवाच कस्मादेकान्ते स्थीयते भवता द्विज ॥
४ ॥
निदाघला पाहून ऋभु त्याच्या जवळ गेला आणि
त्याला अभिवादन करून म्हणाला - ' हे द्विजा ! इथे, एकान्तात
तु का उभा आहेस?' ॥४॥
निदाघ उवाच
भो विप्र जनसंमर्दो महानेष नरेश्वरः ।
प्रविविक्षुः पुरं रम्यं तेनात्र स्थीयते
मया ॥ ५ ॥
निदाघ म्हणाला - हे विप्रवरा !
आज ह्या अति रमणीय नगरीत राजा जाऊ इच्छितो असल्याने, मार्गात
खूप गर्दी होत आहे म्हणून मी इथे उभा आहे ॥५॥
ऋभुरुवाच
नराधिपोत्र कतमः कतमश्चेतरोजनः ।
कथ्यतां मे द्विज श्रेष्ठ त्वमभिज्ञो मतो
मम ॥ ६ ॥
ऋभु म्हणाला - हे
द्विजश्रेष्ठा ! तुला इथल्या सर्व गोष्टी माहिती आहेत असे दिसते . म्हणून सांग कि
ह्यांच्याप राजा कोण आहे ? आणि अन्य
पुरुष कोण आहेत ? ॥६॥
निदाघ उवाच
योयं गजेन्द्रमुन्मत्तमद्रिशृङ्गसमुच्छ्रितम्
।
अधिरूढो नरेद्रोऽयं परिलोकस्तथेतरः ॥ ७ ॥
निदाघ म्हणाला - तो जो
पर्वतासारख्या उंच मत्त गजराजा वर चढलेला आहे तोच राजा आहे आणि इतर सर्व लोग
परिजन आहेत ॥७॥
ऋभुरुवाच
एतौ हि गजराजानौ युगपद्दर्शितौ मम ।
भवता न विशेषेण पृथक्चिह्नोपलक्षणौ ॥ ८
॥
ऋभु म्हणाला - तु राज आणि गज, दोन्ही
एकत्रच दाखवलेस पण दोघांचे पृथक् - पृथक् विशेष चिन्ह अथवा लक्षण नाही सांगितलेस
॥८॥
तत्कथ्यतां महाभाग विशेषो भवतानयोः ।
ज्ञातुमिच्छाम्यहं कोत्र गजः को वा
नराधिपः ॥ ९ ॥
म्हणून हे महाभागा ! ह्या दोघांमध्ये काय
काय विशेषता आहेत ते सांग . ह्यातील राजा कोण आणि गज कोण ? ते मी जाणू इच्छितो ? ॥९॥
निदाघ उवाच
गजो योऽयमधो ब्रह्मन्नुपर्यस्यैष भूपतिः
।
वाह्यवाहकसम्बन्धं को न जानानि वै द्विज
॥ १० ॥
निदाघ म्हणाला - ह्यातील जो खाली
आहे तो गज आणि त्याच्यावर राजा आहे . हे द्विजा ! ह्या दोघांमध्ये वाह्य-वाहक
सम्बन्ध आहे, ही गोष्ट कोण नाही जाणत ? ॥१०॥
ऋभुरुवाच
जानाम्यहं यथा ब्रह्यंस्तथा मामवबोधय ।
अधःशब्दनिगद्यं हि किं चोर्ध्वमभिधीयते ॥
११ ॥
ऋभु म्हणाला - (ठीक आहे, पण) हे
ब्रह्मन ! मला अशा प्रकारे समजव, ज्यामुळे मला हे कळेल की 'खाली' ह्या
शब्दाचे वाच्य काय आहे ? आणि 'वर' कशाला म्हणतात ॥११॥
ब्राह्मण उवाच
इत्युक्तः सहसारुह्य निदाघः प्राह
तमृभुम् ।
श्रूयतां कथयाम्येष यन्मां त्वं
परिपृच्छसि ॥ १२ ॥
ब्राह्मण म्हणाला - ऋभुने असे
म्हटल्यावर निदाघने अचानक त्याच्यावर चढून म्हटले - "ऐक, तु
जे विचारलस तेच सांगतो - ॥१२॥
उपर्यहं यथा राजा त्वमधः कुञ्जरो यथा ।
अवबोधाय ते ब्रह्मन्दृष्टान्तो दर्शितो
मया ॥ १३ ॥
ह्या वेळी राजासारखा मी वर आहे आणि गजा
सारखा तू खाली आहेस। हे ब्रह्मन ! तुला समजावे म्हणूनच मी हे दृष्टान्ताने दाखवले
आहे"
॥१३॥
ऋभुरुवाच
त्वं राजेन द्विजश्रेष्ठ स्थितोहं
गजवद्यदि ।
तदेतत्त्वं समाचक्ष्व कतमस्त्वमहं तथा ॥
१४ ॥
ऋभु म्हणाला - हे
द्विजश्रेष्ठा ! जर तू राजासारखा आणि मी गजासारखा आहे तर हे सांग कि तू कोण आहेस ? आणि मी कोण आहे? ॥१४॥
ब्राह्मण उवाच
इत्युक्तः सत्वरं तस्य प्रगृह्य चरणावुभौ
।
निदाघस्त्वाह
भगवानाचार्यस्त्वमृभुर्ध्रुवम् ॥ १५ ॥
ब्राह्मण म्हणाला - ऋभुने असे
म्हणताच निदाघने त्वरित त्याचे दोन्ही पाय पकडले आणि म्हटले 'नक्कीच
आपण आचार्यचरण महर्षि ऋभु आहात" ॥१५॥
नान्यस्याद्वैतसंस्कारसंस्कृतं मानसं तथा
।
यथाचार्यस्य तेन त्वां मन्ये प्राप्तमहं
गुरुम् ॥ १६ ॥
"माझ्या आचार्यां
सारखे अद्वैत संस्कार युक्त चित्त आणि कोणाचेही नाही; म्हणून
मला वाटते की आपण माझे गुरुजीच येऊन उपस्थित झाला आहात' ॥१६॥
ऋभुरुवाच
तवोपदेशदानाय पूर्वशुश्रुषणादृतः ।
गुरुस्नेहादृभुर्नाम निदाघ समुपागतः ॥ १७
॥
ऋभु म्हणाला - हे निदाघा !
पुर्वी तु सेवा-शुश्रुषा करून माझा खूप आदर केला होतास म्हणून तुझ्यावरील
स्नेहामुळेच मी ऋभु नामक तुझा गुरुच तुला उपदेश देण्यासाठी आलो आहे ॥१७॥
तदेतदुपदिष्टं ते संक्षेपेण महामते ।
परमार्थसारभूतं यत्तदद्वैतमशेषतः ॥ १८ ॥
हे महामते ! 'समस्त
पदार्थांमध्ये अद्वैत- आत्म-बुद्धि ठेवणे' हेच परमार्थाचे
सार आहे असा मी तुला संक्षेपात उपदेश केला ॥१८॥
ब्राह्मण उवाच
एवमुक्त्वा ययौ विद्वान्निदाघं स ऋभुर्गुरुः ।
निदाघोऽप्युपदेशेन तेनाद्वैतपरोऽभवत् ॥ १९ ॥
ब्राह्मण म्हणाला - निदाघला असे
सांगून परम विद्वान गुरुवर भगवान ऋभु निघून गेले आणि त्यांच्या उपदेशाने निदाघ
देखिल अद्वैत चिन्तनात तत्पर झाला ॥१९॥
सर्वभूतान्यभेदेन
ददृशे स तदात्मनः ।
यथा ब्रह्मपरो मुक्तिमवाप परमां द्विजः ॥ २० ॥
तथा त्वमपि धर्मज्ञ तुल्योत्मरीपुबान्धवः ।
भव सर्गगतं जानन्नात्मानमवनीपते ॥ २१ ॥
आणि समस्त प्राण्यांना आपल्यातच अभिन्न
रूपाने पाहू लागला. हे धर्मज्ञा ! हे पृथिवीपते ! ज्याप्रकारे त्या ब्रह्म परायण
ब्राह्मणाने परम मोक्षपद प्राप्त केले, त्याच प्रकारे
तू सुद्धा आत्मा, शत्रु आणि मित्रादिंमध्ये समान भाव ठेवून स्वतःला सर्वगत जाणून
मुक्तिचा लाभ करून घे ॥२०-२१॥
सितनीलादिभेदेन यथैकं दृश्यते नभः ।
भ्रान्तदृष्टिभिरात्मापि तथैकः
सन्पृथक्पृथक् ॥ २२ ॥
ज्या प्रकारे एकच आकाश श्वेत-नील आदि भेद
असलेले दिसते, त्याच प्रकारे भ्रान्तदृष्टि असलेल्यांना एकच आत्मा वेगवेगळा दिसतो
॥२२॥
एकः समस्तं यदिहास्ति किञ्चित्तदच्युतो
नास्ति परं ततोन्यत् ।
सोऽहं स च त्वं स च सर्वमेतदात्मस्वरूपं
त्यज भेदमोहम् ॥ २३ ॥
ह्या संसारात जे काही आहे ते सर्व एक
आत्माच आहे आणि तो अविनाशी आहे, त्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही ; मी तु
आणि हे सर्व आत्मस्वरूपच आहे . म्हणून हा भेद-ज्ञानरूप मोह सोडून दे ॥२३॥
श्रीपराशर उवाच
इतीरितस्तेन स राजवर्यस्तत्याज भेदं
परमार्थदृष्टिः ।
स चापि जातिस्मरणाप्तबोधस्तत्रैव
जन्मन्यपवर्गमाप ॥ २४ ॥
श्रीपराशर म्हणाले - त्याने असे
सांगितल्यावर सौवीरराजाने परमार्थदृष्टिचा आश्रय घेऊन भेदबुद्धिचा त्याग केला आणि
तो जातिस्मर ब्राह्मणश्रेष्ठ सुद्धा बोधयुक्त झाल्याने त्याच जन्मात मुक्त झाला
॥२४॥
इति भरतनरेन्द्रसारवृत्तं कथयति यश्च
शृणोति भक्तियुक्तः ।
स विमलमतिरेति नात्ममोहं भवति च
संसरणेणु मुक्तियोग्यः ॥ २५ ॥
अशा प्रकारे महाराज भरतच्या इतिहासाचा हा
सारभूत वृत्तान्त जो पुरुष भक्तिपूर्व सांगतो किंवा ऐकतो त्याची बुद्धि निर्मल
होते, त्याला कधीच आत्म-विस्मृति होत नाही आणि तो जन्म-जन्मान्तरात
मुक्तिची योग्यता प्राप्त करतो ॥२५॥
इति
श्रीविष्णुपुराणे द्वितीये अंशे षोड्शोऽध्यायः ॥१६॥
इति
श्रीपराशरमुनिविरचिते श्रीविष्णूपरत्वनिर्णायके श्रीमति विष्णुमहापुराणे द्वितीय अंशः
समाप्तः ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा