॥
विष्णुपुराणम् ॥
द्वितीयः अंशः॥ पञ्चदशोऽध्यायः ॥
ऋभुने निदाघला केलेला अद्वैत ज्ञानोपदेश
श्रीपराशर उवाच
इत्युक्ते मौनिनं भूयश्चिन्तयानं महीपतिम् ।
प्त्युवाचाथ विप्रोऽसावद्वैतान्तर्गतां
कथाम् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले-हे मैत्रेया ! असे
सांगितल्यावर, राजाला मौन होऊन मनातल्या मनात विचार करताना पाहून तो विप्रवर ही
अद्वैत संबंधित कथा सांगू लागला ॥१॥
ब्राह्मण उवाच
श्रूयतां नृपशार्दूल यद्गीतमृभुणा पुरा
।
अवबोधं जनयता निदाघस्य महात्मनः ॥ २ ॥
ब्राह्मण म्हणाला - हे राजशार्दुला ! पूर्वकाळी महर्षि ऋभुने महात्मा
निदाघला उपदेश करताना जे सांगितले ते ऐक ॥२॥
ऋभुनामाऽभवत्पुत्रो ब्रह्मणः परमेष्ठिनः
।
विज्ञाततत्त्वसद्भावो निसर्गादेव भूपते
॥ ३ ॥
हे भूपते ! परमेष्ठी श्रीब्रह्माचा ऋभु
नामक एक पुत्र होता, तो स्वभावतः परमार्थतत्त्व जाणणारा होता ॥३॥
तस्य शिष्यो निदाघोऽभूत्पुलस्त्यतनयः
पुरा ।
प्रादादशेषविज्ञानं स तस्मै परया मुदा ॥
४ ॥
पूर्वकाळी महर्षि पुलस्त्यचा पुत्र निदाघ
त्या ऋभुचा शिष्य होता. त्याला त्याने अति प्रसन्न होऊन सम्पूर्ण तत्वज्ञानाचा
उपदेश दिला होता ॥४॥
अवाप्तज्ञानतन्त्रस्य न तस्याद्वैतवासना
।
स ऋभुस्तर्कयामास निदाघस्य नरेश्वर ॥ ५ ॥
हे नरेश्वरा ! ऋभुने पाहिले कि सम्पूर्ण
शास्त्रांचे ज्ञान असूनही निदाघची अद्वैतात निष्ठा नाही ॥५॥
देविकायास्तटे वीरनगरं नाम वै पुरम् ।
समृद्धमतिरम्यं च पुलस्त्येन विवेशित्म ॥
६ ॥
त्यावेळी देविकानदीच्या तीरावर
पुलस्त्यने वसविलेले वीरनगर नामक एक अति रमणीय समृद्धिसम्पन्न नगर होते ॥६॥
रम्योपवनपर्यन्ते स तस्मिन्पार्थिवोत्तम
।
निदाघो नाम योगज्ञ ऋभुशिष्योऽवसत्पुरा ॥
७ ॥
हे पार्थिवोत्तमा ! रम्य उपवनांनी
सुशोभित त्या पुरीत पूर्वकाळी ऋभुचा शिष्य योगवेता निदाघ राहात होता ॥७॥
दिव्ये वर्षसहस्रे तु समतीतेऽस्य
तत्पुरम् ।
जगाम स ऋभुः शिष्यं निदाघमवलोककः ॥ ८ ॥
महर्षि ऋभु आपला शिष्य निदाघ ह्याला
पाहायला एक सहस्त्र दिव्यवर्ष लोटल्यावर त्या नगरीत गेला ॥८॥
स तस्य वैश्वदेवान्ते द्वारालोकनगोचरे ।
स्थितस्तेन गृहीतार्घ्यो निजवेश्म
प्रवेशितः ॥ ९ ॥
ज्यावेळी निदाघ बलिवैश्वदेवाच्या नंतर
आपल्या दरवाजावर (अतिथिंची) प्रतीक्षा करत होता, तो त्याच्या
दृष्टीस पडला आणि तो त्याला दरवाजावर जाऊन अर्घदानपूर्वक आपल्या घरी घेऊन गेला ॥९॥
प्रक्षालिताङ्घ्रिपाणिं च
कृतासनपरिग्रह्म ।
उवाच स द्विजाश्रेष्ठो भुज्यतामिति
सादरम् ॥ १० ॥
त्या द्विजश्रेष्ठाने त्याचे हात-पाय
धुतले आणि मग आसनावर बसवून आदरपूर्वक म्हटले - 'भोजन करा' ॥१०॥
ऋभुरुवाच
भो विप्रवर्य भोक्तव्यं यदन्नं भवतो गृहे
।
तत्कथ्यतां कदन्नेषु न प्रीतिः सततं मम ॥
११ ॥
ऋभु म्हणाला- हे विप्रवरा !
तुझ्याकडे कोणकोणत्या अन्नाचे भोजन करावे लागेल ते सांग, कारण कुत्सित अन्न मला आवडत नाही ॥११॥
निदाघ उवाच
सक्तुयावकवाट्यानामपूपानां च मे गृहे ।
यद्रोचते द्विजश्रेष्ठ तत्त्वं भुक्ष्व
यथेच्छया ॥ १२ ॥
निदाघ म्हणाला - हे
द्विजश्रेष्ठा ! माझ्या घरी सत्तू, जवाची लापशी, कन्द-मूल-फळ
तसेच अपूप बनवले आहेत . आपल्याला ह्यातील जे आवडते त्याचे भोजन करावे ॥१२॥
ऋभुरुवाच
कदन्नानि द्विजैतानि मृष्टमन्नं प्रयच्छ
मे ।
संयावपायसादीनि द्रप्सफाणितवन्ति च ॥ १३
॥
ऋभु म्हणाला - हे द्विजा ! हे
तर सर्व कुत्सित अन्न आहे, तु मला हलवा, खीर तसेच मट्ठा आणि खांड ह्यांनी बनलेले स्वादिष्ट भोजन दे ॥१३॥
निदाघ उवाच
हे हे शालिनि मद्गेहे
यत्किञ्चिदतिशोभनम् ।
भक्ष्योपसाधनं मृष्टं तेनास्यान्नं
प्रसाधय ॥ १४ ॥
तेव्हा निदाघने आपल्या पत्नीला म्हटले -
हे गृहदेवी ! आपल्या घरी जी चांगल्यात चांगली वस्तु असेल त्यानेच ह्यांच्यासाठी अति
स्वादिष्ट भोजन बनव ॥१४॥
ब्राह्मण उवाच
इत्युक्ता तेन सा पत्नी मृष्टमन्नं
द्विजस्य यत् ।
प्रसाधितवती तद्वै भर्तुर्वचनगौरवात् ॥
१५ ॥
ब्राह्मण (जडभरत) म्हणाला- त्याने असे
म्हटल्यावर त्याच्या पत्नीने आपल्या पतिच्या आज्ञेने त्या विप्रवरासाठी अति
स्वादिष्ट अन्न तयार केले ॥१५॥
तं भुक्तवन्तमिच्छातो मृष्टमन्नं महामुनिम् ।
निदाधः प्राह भूपाल प्रश्रयावनतः स्थितः ॥ १६ ॥
हे राजन ! ऋभुने यथेच्छ भोजन केल्यावर
निदाघने अति विनीत होऊन त्या महमुनिला म्हटले ॥१६॥
निदाघ उवाच
अपिते परमा तृप्तिरुत्पन्ना तुष्टिरेव च ।
अपि ते मानसं स्वस्थमाहारेण कृतं द्विज ॥ १७ ॥
निदाघ म्हणाला - हे द्विजा !
भोजन करून आपले चित्त स्वस्थे झाले का ? आपण पूर्णतया
तृप्त आणि सन्तुष्ट झालात ना ? ॥१७॥
क्वनिवासो भवान्विप्र क्व च गन्तुं समुद्यतः ।
आगम्यते च भवता यतस्तच्च द्विजोच्यताम् ॥ १८ ॥
हे विप्रवरा ! मला सांगा कि आपण कुठे
राहणारे आहात ? कुठे
जायच्या तयारीत आहात ? आणि कुठून
निघाला आहात? ॥१८॥
ऋभुरुवाच
क्षुद्यस्य तस्य भुक्तेऽन्ने
तृप्तिर्ब्राह्मण जायते ।
न मे क्षुन्नाभवत्तृप्तिः कस्मान्मां
परिपृच्छसि ॥ १९ ॥
ऋभु म्हणाला - हे ब्राह्मणा !
ज्याला भूक लागते त्याचीच तृप्ती सुद्धा होते . मला तर कधी भूकच नाही
लागत , मग तृप्ति विषयी तु काय विचारतोस ? ॥१९॥
वह्निना पार्थिवे धातौ क्षपिते क्षुत्समुद्भवः ।
भवत्यम्भसि च क्षीणे नृणां तृडपि जायते ॥ २० ॥
जठराग्नि द्वारा पार्थिव धातुंच्या क्षीण
होण्याने मनुष्याला क्षुधेची प्रतीति होते आणि जल क्षीण झाल्याने तहानेचा अनुभव
होतो ॥२०॥
क्षुत्तुष्णे देहधर्माख्ये न ममैते यतो
द्विज ।
ततः क्षुत्सम्भवाभावात्तृप्तिरस्त्येव मे
सदा ॥ २१ ॥
हे द्विजा ! ही क्षुधा आणि तुष्णा तर
देहाचे धर्म आहेत, माझे नाहीत; म्हणून कधीच भूक वगैरे नसल्याने मी तर सर्वदा तृप्तच आहे ॥२१॥
मनसः स्वस्थता तुष्टिश्चित्तधर्माविमौ
द्विज ।
चेतसो यस्य तत्पृच्छ पुमानेभिर्न युज्यते
॥ २२ ॥
स्वस्थता आणि
तुष्टि सुद्धा मनातच होते, म्हणून हे मनाचेच धर्म आहेत; पुरुषाशी
(आत्मा) ह्यांचा कोणताच सम्बन्ध नाही . म्हणून हे द्विजा ! हे ज्याचे धर्म आहेत
त्या विषयीच मला विचार ॥२२॥
क्व निवासस्तवेत्युक्तं क्व
गन्तासि च यत्त्वया ।
कुताश्चागम्यते तत्र त्रितयेपि निबोध मेः
॥ २३ ॥
आणि तू जे विचारलेस की 'आपण
कुठले राहाणारे ? कुठे जात आहात ? तसेच कुठून आलात?’ तर ह्या
तीनही विषयांवर माझे मत ऐक - ॥२३॥
पुमान्सर्वगतो व्यापी आकाशवदयं यतः ।
कुतः कुत्र क्व गन्तासीत्येतदप्यर्थवत्कथम् ॥ २४ ॥
आत्मा सर्वगत आहे, कारण तो
आकाशा समान व्यापक आहे; म्हणून 'कुठले राहाणारे ? कुठे
जात आहात ? तसेच कुठून आलात' 'हे कथन सुद्धा कसे सार्थक होऊ शकते ? ॥२४॥
सोऽहं गन्ता न चागन्ता नैकदेशनिकेतनः ।
त्वं चान्ये च न च त्वं च नान्ये
नैवाहमप्यहम् ॥ २५ ॥
मी तर कुठेच जातही नाही आणि येतही नाही,
किंवा कोणत्या एका स्थानावर राहातही नाही (तू, मी आणि
अन्य पुरुष सुद्धा देहादि मुळे जसे वेगवेगळे दिसतात वास्तवात तसे नाही) वस्तुतः तू
तु नाहीस, अन्य अन्य नाही आणि मी मी नाही ॥२५॥
मृष्टं न मृष्टमप्येषा जिज्ञासा मे कृता
तव ।
किं वक्ष्यसीति तत्रापि श्रूयतां
द्विजसत्तम ॥ २६ ॥
किमस्वाद्वथ वा मृष्टं भुञ्जतोऽस्ति
द्विजोत्तम ।
मृष्टमेव यदामृष्टं तदेवोद्वेगकारकम् ॥
२७ ॥
वास्तवात मधुर सुद्धा मधुर नाही; पाहा, मी
तुझ्याकडे ज्या मधुर अन्नाची याचना केली होती तेव्हा मला हेच बघायचे होते कि ' तु काय
म्हणतोस' हे द्विजश्रेष्ठा ! भोजन करण्यासाठी स्वादु आणि अस्वादु सुद्धा काय
आहे ? कारण स्वादिष्ट पदार्थच जर काही काळाने अस्वादु होतात तर ते
उद्वेगजनक होतात ॥२६-२७॥
अमृष्टं जायते मृष्टं मृष्टादुद्विजते
जनः ।
आदिमध्यावसानेषु किमन्नं रुचिकारकम् ॥ २८
॥
अशा प्रकारे कधी अरुचिकर पदार्थ रुचिकर होतात आणि रुचिकर
पदर्थांपासून मनुष्याला उद्वेग होतो. असे अन्न कोणते आहे जे आदि, मध्य
आणि अन्त अशा तीनही काळात रुचिकरच आहे ? ॥२८॥
मृण्मयं हि गृहं यद्वन्मृदा लिप्तं
स्थिरं भवेत् ।
पर्थिवोयं तथा देहः पार्थिवैः परमाणुभिः
॥ २९ ॥
ज्या प्रकारे मातीचे घर मातीने
लिंपल्यामुळे दृढ़ होते, त्याच प्रकारे हा पार्थिव देह पार्थिव अन्नाच्या परमाणुंनीच पुष्ट
होतो ॥२९॥
यवगोधूममुद्गादि घृतं तैलं पयो दधि ।
गुडं फलादीनि तथा पार्थिवाः परमाणवः ॥ ३०
॥
जव, गहू, मूग, घृत, तेल , दूध , दही गुळ आणि फळ आदि सर्व पदार्थ पार्थिव परमाणुच तर आहेत . (ह्यात
कशाला स्वादु म्हणावे आणि कशाला अस्वादु? ) ॥३०॥
तदेतद्भवता ज्ञात्वा मृष्टामृष्टविचारि
यत् ।
तन्मनःसमतालम्बि कार्यं साम्यं हि
मुक्तये ॥ ३१ ॥
म्हणून असे समजून तु ह्या स्वादु
अस्वादुचा विचार करणार्या चित्ताला समदर्शी बनवले पाहिजेस कारण मोक्षाचा एकमात्र
उपाय समता हाच आहे ॥३१॥
ब्राह्मण उवाच
इत्याकर्ण्य वचस्तस्य परमार्थश्रितं नृप
।
प्रणिपत्य महाभागो निदाघो वाक्यमब्रवीत्
॥ ३२ ॥
ब्राह्मण म्हणाला - हे राजन ! त्याचे असे
परमार्थमय वचन ऐकून महाभाग निदाघने त्याला प्रणाम करून म्हटले - ॥३२॥
प्रसीद मद्धितार्थाय कथ्यतां यत्त्वमागतः
।
नष्टो मोहस्तवाकर्ण्य वचांस्येतानि मे
द्वीज ॥ ३३ ॥
"प्रभो ! आपण
प्रसन्न व्हा ! कृपया हे सांगा, की माझे कल्याण करण्याच्या इच्छेने आलेले
आपण कोण आहात ? हे द्विजा ! आपली ही वचने ऐकून माझा सम्पूर्ण मोह नष्ट झाला आहे" ॥३३॥
ऋभुरुवाच
ऋभुरस्मि तवाचार्यः प्रज्ञादानाय ते
द्विज ।
इहागतोऽहं यास्यामि परमार्थस्तवोदितः ॥
३४ ॥
ऋभु म्हणाला -
हे द्विजा ! मी तुझा गुरु ऋभु आहे; तुला सदसद्विवेक
बुद्धि प्रदान करण्यासाठी मी इथे आलो होतो . आता मी जातो; जो काही
परमार्थ आहे तो मी तुला सांगितला ॥३४॥
एवमेकमिदं विद्धि न भेदि सकलं
जगत् ।
वासुदेवाभिधेयस्य स्वरूपं परमात्मनः ॥ ३५
॥
ह्या परमार्थतत्त्वाचा विचार करताना तु
हे सम्पूर्ण जगत एक वासुदेव परमात्माचेचे स्वरूप आहे हे जाण; ह्यात
अजिबात भेद-भाव नाही ॥३५॥
ब्राह्मण उवाच
तथेत्युक्त्वा निदाघेन प्रणिपातपुरःसरम्
।
पूजतः परया भक्त्या इच्छातः प्रययावृभुः
॥ ३६ ॥
ब्राह्मण म्हणाला - त्यानन्तर निदाघने 'बरं' म्हणून त्याला प्रणाम
केला आणि परत त्याच्याकडून परम भक्तिपूर्वक पुजित होऊन ऋभु स्वेच्छेने तिथून निघून
गेले ॥३६॥
इति श्रीविष्णुपुराणे द्वितीये अंशे पंचद्शोऽध्यायः
॥१५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा