॥
विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः अंशः ॥ ॥ नवमोऽध्यायः ॥
ज्योतिष्चक्र आणि शिशुमारचक्र
श्रीपराशर उवाच
तारामयं भगवतः शिशुमाराकृति प्रभोः ।
दिवि रूपं हरेर्यत्तु तस्य पुच्छे स्थितो ध्रुवः ॥ १ ॥
पराशर म्हणाले-
आकाशत श्रीविष्णुचे जे शिशुमार (सरडा)
सारख्या आकाराचे तारामय स्वरूप दिसते, त्याच्या पुच्छ
(शेपूट) भागी ध्रुव अवस्थित आहे .
सैष भ्रमन् भ्रामयति चन्द्रादित्यादिकान्
ग्रहान् ।
भ्रमन्तमनु तं यान्ति नक्षत्राणि च
चक्रवत् ॥ २ ॥
हा ध्रुव स्वयं फिरतो आणि फिरताना चन्द्र
सूर्य आदि ग्रहांना सुद्धा फिरवतो त्या भ्रमणशील ध्रुवि सोबत नक्षत्रगण सुद्धा
चक्रासारखे फिरत राहतात .
सूर्याचन्द्रमसौ तारा नक्षत्रामि ग्रहैः
सह ।
वातानीकमयैर् बन्धैर्ध्रुवे बद्धानि तानि
वै ॥ ३ ॥
सूर्य, चन्द्र, तारे, नक्षत्र
व अन्य समस्त ग्रहगण वायु-मण्डलरूपी धाग्याने ध्रुवाला बांधले गेलेले आहेत .
शिशुमाराकृति प्रोक्तं यद्रूपं
ज्योतिषां दिवि ।
नारायणोऽयनं धाम्नां तस्याधारः स्वयं
हृदि ॥ ४ ॥
मी तुला आकाशातील ग्रहगणाच्या ज्या
शिशुमारस्वरूपाचे वर्णन सांगितले, अनन्त तेजाचा आश्रय असलेला स्वयं भगवान
नारायणच त्याचा हृदयस्थित आधार आहे .
उत्तानपादपुत्रस्तु तमाराध्य जगत्पतिम् ।
स तारा शिशुमारस्य ध्रुवः पुच्छे
व्यवस्थितः ॥ ५ ॥
उत्तरपाद ह्याचा पुत्र ध्रुव ह्याने त्या
जगत्पतिची आराधना करून तारामय शिशुमाराच्या पुच्छस्थानात स्वतःला स्थिति प्राप्त
केली आहे .
आधारः शिशुमारस्य सर्वाध्यक्षो जनार्दनः
।
ध्रुवस्य शिशुमारस्तु ध्रुवे
भानुर्व्यवस्थितः ॥ ६ ॥
तदाधारं जगच्चेदं सदेवासुरमानुषम् ॥ ७ ॥
येन विप्रविधानेन तन्ममैकमनाः शृणु ।
विवस्वानष्टभिर्मासैदायापो रसात्मिकाः ।
वर्षत्यम्बुततश्चान्नमन्नादप्यखिलं जगत्
॥ ८ ॥
ध्रुवाचा आश्रय असलेला सूर्यदेव ध्रुवातच
स्थित आहे. म्हणून हे विप्रा ! ज्या प्रकारे देव, असुर आणि मनुष्य
आदिं सोबत हे सम्पुर्ण जगत सुर्याच्या आश्रित आहे, ते सर्व तू
एकाग्र होऊन ऐक.
सूर्य आठ महिन्यांपर्यंत आपल्या किरणांनी षड्रस युक्त जल ग्रहण करून
त्याचा चार महीने वर्षाव करतो ज्यामुळे अन्न उत्पन्न होते आणि अन्नापासूनच
सम्पूर्ण जगताचे पोषण होते .
विवस्वानंशुभिस्तीक्ष्णैरादाय जगतो जलम्
।
सोमं पुष्णात्यथेन्दुश्च
वायुनाडीमयैर्दिवि ।
नालैर्विक्षिपतेऽभ्रेषु
धूमाग्न्यनिलमूर्तिषु ॥ ९ ॥
सूर्य आपल्या तीक्ष्ण किरणांनी (रश्मि) संसारातील
जल खेचून त्याने चन्द्राचे पोषण करतो आणि चन्द्र आकाशातील वायुमय नाड्यांच्या
मार्गे ते उसे धुम्र, अग्नि आणि वायुमय मेघांमध्ये पोहोचवतो .
न भ्रश्यन्ति यतस्तेभ्यो जलान्यभ्राणि
तान्यतः ।
अभ्रस्थाः प्रपतन्त्यापो वायुना
समुदीरिताः ।
संस्कारं कालजनितं मैत्रेयासाद्य
निर्मलाः ॥ १० ॥
हे चन्द्राद्वारा प्राप्त जल मेघांमधून
लगेच भ्रष्ट होत नाही म्हणून त्याला 'अभ्र' म्हणतात.
हे मैत्रेया ! कालजनित संस्कार प्राप्त झाल्यावर हे अभ्रस्थ जल निर्मळ होऊन
वायुच्या प्रेरणेने पृथ्वीवर बरसू लागते .
सरित्समुद्रभौमास्तु तथापः प्राणिसम्भवाः
।
चतुष्प्रकारा भगवानादत्ते सविता मुने ॥
११ ॥
हे मुने ! भगवान सूर्यदेव नदी, समुद्र, पृथ्वी
तसेच प्राण्यांपासून उत्पन्न अशा ह्या चार प्रकारच्या जलांचे आकर्षण करतो .
आकाशगङ्गासलिलं तथादाय गभस्तिमान् ।
अनभ्रगतमेवोर्व्यां सद्यः क्षिपति
रश्मिभिः ॥ १२ ॥
तसेच आकाशगंगेतील जलाचे ग्रहण करून
मेघांशिवाय आपल्या किरणांनीच त्वरित त्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो .
तस्य संस्पर्शनिर्धूतपापपङ्को
द्विजोत्तम ।
न याति नरकं मर्त्यो दिव्यं स्नानं हि
तत्स्मृतम् ॥ १३ ॥
हे द्विजोत्तमा ! त्याच्या
स्पर्शमात्राने पापरूपी चिखल धुतला गेल्याने मनुष्य नरकात जात नाही. म्हणून त्याला दिव्यस्नान म्हणतात .
दृष्टसूर्यं हि यद्वारि पतत्यभ्रैर्विना
दिवः ।
आकाशगङ्गासलिलं तद्गोभिः क्षिप्यते
रवेः ॥ १४ ॥
सूर्य दिसत असताना, ढगांशिवाय जे जल बरसते ते
सूर्य किरणांद्वारा बरसलेले आकाशगंगेचेच जल असते .
कृत्तिकादिषु ऋक्षेषु विषमेषु च यद्दिवः
।
दृष्टार्कपतितं ज्ञेयं तद्गाङ्गं
दिग्गजोज्झितम् ॥ १५ ॥
कृत्तिका आदि विषम (अयुग्म) नक्षत्रां
मध्ये जे जल सूर्य प्रकाशित असताना बरसते त्याला
दिग्गजांद्वारा बरसवलेले आकाशगंगेचे जल समजावे .
युग्मर्क्षेषु च यत्तोयं पतत्यर्कोज्झितं
दिवः ।
तत्सूर्यरश्मिभिः सर्वं समादाय निरस्यते
॥ १६ ॥
रोहिणी आर्द्रा आदि सम संख्यांच्या
नक्षत्रांमध्ये जे जल सूर्य बरसवतो ते सूर्यकिरणांद्वारा (आकाशगंगेतून) ग्रहण
करूनच बरसवले जाते .
उभयं पुण्यमत्यर्थं नृणां पापभयापहम् ।
आकाशगङ्गासलिलं दिव्यं स्नानं महामुने ॥
१७ ॥
हे महामुने ! आकाशगंगेच्या ह्या (सम तथा
विषम नक्षत्रांमध्ये बरसणार्या) दोन्ही प्रकारचे जलमय दिव्य स्नान अत्यन्त पवित्र
आणि मनुष्यांचे पाप-भय दूर करणारे आहे .
यत्तु मैघैः समुत्सृष्टं वारि
तत्प्राणिनां द्विज ।
पुष्णात्यौषधयः सर्वा जीवनायामृतं हि तत्
॥ १८ ॥
हे द्विजा ! जे जल मेघांद्वारा बरसवले
जाते ते प्राण्यांच्या जीवनासाठी अमृत रूप आणि औषधींसाठी पोषक असते .
तेन वृद्धिं परां नीतः सकलश्चौषधीगणः ।
साधकः फलपाकन्तः प्रजानां द्विज जायते ॥
१९ ॥
हे विप्रा ! त्या वृष्टि जलापासून परम
वृद्धि प्राप्त होऊन समस्त औषधी आणि फळे पिकून सुकल्यावर (गोधूम, यव आदि
अन्न) प्रजावर्गाचे (शरीराची उत्पत्ति एवं पोषण आदिंचे) साधक आहेत .
तेन यज्ञान्यथाप्रोक्तान्मानवाः
शास्त्रचक्षुषः ।
कुर्वन्त्यहरहस्तैश्च देवानाप्याययन्तिते
॥ २० ॥
त्यांच्या द्वारा शास्त्रविद मनीषिगण
नित्यप्रति यथाविधि यज्ञानुष्ठान करून देवतांना सन्तुष्ट करतात .
एवं यज्ञाश्च वेदाश्च वर्णाश्च
वृष्टिपूर्वकाः ।
सर्वे देवनिकायाश्च सर्वे भूतगणाश्च ये ॥
२१ ॥
अशा प्रकारे सम्पूर्ण यज्ञ, वेद, ब्रह्माणादि
वर्ण, समस्त देवसमूह आणि प्राणिगण वृष्टिचेच आश्रित आहेत .
वृष्ट्या धृतमिदं सर्वमन्नं निष्पाद्यते
यया ।
सापि निष्पाद्यते वृष्टिः सवित्रा
मुनिसत्तम ॥ २२ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! अन्न उप्तन्न करणारी
वृष्टिच ह्या सर्वांना धारण करते आणि त्या वृष्टिची उत्पत्ति सूर्यापासून होते .
आधारभूतः सवितुर्ध्रुवो मुनिवरोत्तम ।
ध्रुवस्य शिशुमारोऽसौ सोऽपि नारायणात्मकः
॥ २३ ॥
हे मुनिवरोत्तमा ! सूर्याचा आधार ध्रुव
आहे, ध्रुवाचा आधार शिशुमार आहे आणि शिशुमाराचा आश्रय श्रीनारायण आहे .
हृदि नारायणस्तस्य शिशुमारस्यं संस्थितः
।
बिभर्ता सर्वभूतानामादिभूतः सनातनः ॥ २४
॥
त्या शिशुमाराच्या हृदयात श्रीनारायण
स्थित आहे जो समस्त प्राण्यांचा पालनकर्ता तथा आदिभूत सनातन पुरुष आहे .
इति
श्रीविष्णुपुराणे द्वितीये अंशे नवमोऽध्यायः ॥९॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा