॥
विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः
अंशः॥ ॥ अष्टमोऽध्यायः ॥
सूर्य नक्षत्र आणि राशिंची
व्यवस्था तसेच कालचक्र लोकपाल आणि गंगाविर्भावाचे वर्णन
पराशर उवाच
व्याख्यातमैतद्ब्रह्मण्डसंस्थानं तव सुव्रत ।
ततः प्रमाणसंस्थाने सूर्यादीनां शृणुष्व मै ॥ १ ॥
श्रीपराशर
म्हणाले -
हे
सुव्रता ! मी तुला ही ब्रह्माण्डची स्थिति सांगितली, आता सूर्य
आदि ग्रहांची स्थिति आणि त्यांचे परिमाण ऐक .
योजनानां सहस्राणि भास्करस्य रथो नव ।
ईषादण्डस्तथैवास्य द्विगुणो मुनिसत्तम ॥ २ ॥
हे
मुनिश्रेष्ठा ! सूर्यदेवाच्या रथाचा विस्तार नऊ हजार योजने आहे आणि त्याहून दुप्पट
त्याचा ईषा-दण्ड (रथाचा एका भागाचे नाव) आहे .
सार्धकोटिस्तथा सप्त नियुतान्यधिकानि वै ।
योजनानां तु तस्याक्षस्तत्र चक्रं प्रतिष्ठितम् ॥ ३ ॥
त्रिनाभिमति पञ्चारे षण्नेमिन्यत्रयात्मके ।
संवत्सरमये कृत्स्त्रं
कालचक्रं प्रतिष्ठितम् ॥ ४ ॥
त्याची
धुरा दीड करोड़ सात लाख योजने लांब आहे ज्यात त्याचे पहिले चक्र लागलेले आहे. त्या पूर्वाह्ण, मध्याह्न
आणि पराह्णरूपी तीन नाभि, परिवत्सरादि पाच अरे आणि षड्-ऋतुरूपी
सहा नेमि असलेल्या अक्षयस्वरूपी संवत्सरात्मक चक्रात सम्पूर्ण कालचक्र स्थित आहे .
हयाश्च सप्तच्छदांसि तेषां
नामानि मे शृणु ।
गायत्री च
बृहत्युष्णिग्जगती त्रिष्टुभेव च ।
अनुष्टुप्पङ्क्तिरित्युक्ता
छन्दांसि हरयो रवेः ॥ ५ ॥
चत्वारिंशत्सहस्राणि
द्वितीयोऽक्षो विवस्वतः ।
पञ्चान्यानि तु सार्धानि
स्यन्दनस्य महामते ॥ ६ ॥
अक्षप्रमाणमुभयोः प्रमाणं
तद्युगार्धयो ।
ह्रस्वोऽक्षस्तद्युगार्धेन
ध्रुवाधारो रथस्य वै ।
द्वितीयेऽक्षे तु तच्चक्रं
सस्थितं मानसाचले ॥ ७ ॥
सात छन्द
हेच त्याचे घोडे़ आहेत, त्यांची
नावे ऐक - गायत्री, बॄहती, उष्णिक्, जगती, त्रिष्टुप्, अनुष्टुप
आणि पंक्ति - हे छन्दच सूर्याचे घोडे़ आहेत .हे महामते !
भगवान् सूर्याच्या रथाची दुसरी धुरा साडे पस्तीस सहस्त्र योजने लांब आहे. दोन्ही धुरांच्या परिमाणांच्या तुलनेतच त्याच्या
युगार्द्धांचे (जोखड) परिमाण आहे, त्यांतील
छोटा धुरा त्या रथाच्या एका युगार्द्धा सहित ध्रुवाच्या आधारे स्थित आहे आणि दुसऱ्या
धुरेचे चक्र मानसोत्तरपर्वतावर स्थित आहे .
मानसोत्तरशैलस्य पूर्वतो
वासवी पुरी ।
दक्षिणे तु यमस्यान्या
प्रतीच्यां वरुणस्य च ।
उत्तरेण च सोमस्य तासां
नामानि मे शृणु ॥ ८ ॥
वस्वौकसारा शक्रस्य याम्या
संयमनी तथा ।
पुरी सुखा जलेशस्य सोमस्य च
विभावरी ॥ ९ ॥
काष्ठां गतो दक्षिणतः
क्षिप्तेषुरिव सर्पति ।
मैत्रेय
भगवान्भानुर्ज्योतिषां चक्रसंयुतः ॥ १० ॥
ह्या
मानसोत्तरपर्वताच्या पूर्वेला इन्द्राची, दक्षिणेला
यमाची, पश्चिमेला वरूणाची आणि उत्तरेला
चन्द्राची पुरी आहे, त्या पुरींची नावे
ऐक . इन्द्राची
पुरी वस्वौकसारा आहे, यमाची संयमनी आहे, वरूणाची
सुखा आहे आणि चन्द्राची विभावरी आहे . हे मैत्रेया ! ज्योतिश्चक्रा सहित भगवान
भानु दक्षिणदिशेला प्रवेश करून सोडलेल्या बाणासारख्या तीव्र वेगाने जातात .
अहोरात्रव्यवस्थानकारणं भगवान् रविः ।
देवयानः परः पन्था योगिनां
क्लेशसंक्षये ॥ ११ ॥
दिवसस्य वरिर्मध्ये सर्वाकालं व्यवस्थितः।
सर्वद्वीपेषु मैत्रेय निशार्धस्य च सन्मुखः ॥ १२ ॥
भगवान
सूर्यदेव दिवस आणि रात्रिच्या व्यवस्थेचे कारण आहे आणि रागादि क्लेश क्षीण होतात
तेव्हा तोच क्रममुक्तिभागी योगिजनांसाठी देवयान नामक श्रेष्ठ मार्ग आहे. हे मैत्रेया ! सर्व द्वीपांमध्ये सर्वदा मध्यान्ह तथा मध्यरात्रिच्या
समयी सूर्यदेव मध्य-आकाशात समोरील बाजूस राहतात. म्हणजेच ज्या द्वीप किंवा खण्डात
सूर्यदेव मध्याह्न समयी सम्मुख असतो त्याच्याच समान रेखेवर दुसर्या बाजूला स्थित
असलेल्या द्वीपान्तरात तो त्याच प्रकारे मध्यरात्रिच्या वेळी राहतो .
उदयास्तमने चैव सर्वकालं तु सम्मुखे ।
विदिशासु त्वशेषासु तथा ब्रह्मन् दिशासु च ॥ १३ ॥
यैर् यत्र दृश्यते भास्वान्स तेषामुदयः स्मृतः ।
तिरोभावं च यत्रैति तत्रैवास्तमनं रवेः ॥ १४ ॥
अशा
प्रकारे उदय आणि अस्त देखील सदैव एक-दुसर्याच्या सम्मुखच असतात . हे ब्रह्मन !
समस्त दिशा आणि विदिशांना जिथले लोक (रात्र सरल्यावर) सूर्याला ज्या स्थानी पाहतात
त्यांच्यासाठी तिथे त्याचा उदय असतो आणि जिथे दिवस सरल्यावर सूर्याचा तिरोभाव होतो
त्याला त्याचा अस्त म्हणतात .
नैवास्तमनमर्कस्य
नोदयः सर्वदा सतः ।
उदयास्तमनाख्यं हि दर्शनादर्शनं रवेः ॥ १५ ॥
शक्रादीनां पुरे तिष्ठन् स्पृशत्येष पुरत्रयम् ।
विकोणौ द्वौ विकोणस्थस्त्रीन् कोणान्द्वे पुरे तथा ॥ १६ ॥
सदैव
एकाच रूपात स्थित असलेल्या सूर्यदेवाचा, वास्तवात
उदय किंवा अस्तः कधीच होत नसतो, त्याचे
दिसणे आणि न दिसणे म्हणजेच त्याचा उदय किंवा अस्त आहे . मध्याह्नकाळी इन्द्रादिंपैकी एखाद्या
पुरी वर प्रकाशित होत सूर्यदेव ( पार्श्ववर्ती दोन पुरिं सहित) तीन पुरी आणि दोन
कोण (विदिशा) प्रकाशित करतो . अशाच प्रकारे अग्नि आदि कोणांपैकी कोणत्यातरी एका
कोणात प्रकशित होत (पार्श्ववतीं दोन कोणां सहित) तीन कोण आणि दोन पुरिंना प्रकाशित
करतो.
उदितो वर्धमानाभिरामध्याह्नात्तपन् रविः ।
ततः परं ह्रसन्तीभिर्गोभिरस्तं नियच्छति ॥ १७ ॥
उदयास्तमनाभ्यां च स्मृते पूर्वापरे दिशौ ।
यावत्पुरस्तात्तपति तावत्पृष्ठे च पार्श्वयोः ॥ १८ ॥
सूर्यदेव
उदय झाल्यावर मध्याह्नपर्यन्त आपल्या वाढत्या किरणांनी तापतो आणि मग क्षिण होत
जाणार्या किरणांनी अस्त होतो म्हणजेच किरणांची वृद्धि, ह्रास आणि तीव्रता-मन्दता ह्यांचा अनुभव माणेस
सूर्याच्या किती जवळ किंवा दूर आहे त्यानुसार अनुभवतो . सूर्याच्या उदय आणि अस्ताच्या आधीपासूनच
पूर्व तथा पश्चिम दिशांची व्यवस्था झाली आहे . प्रत्यक्षात तो, ज्याप्रकारे पूर्वदिशेला प्रकाशित करतो तसाच पश्चिमेला आणि पार्श्ववर्तिनी
(उत्तर आणि दक्षिण) दिशांना देखील प्रकाशित करतो .
ऋतेऽमरगिरेर्मेरोरुपरि
ब्रह्मणः सभाम् ।
ये ये मरीचयोर्कस्य प्रयान्ति ब्रह्मणः सभाम् ।
ते ते निरस्तास्तद्भासा प्रतीपमुपयान्ति वै ॥ १९ ॥
तस्माद्दिश्युत्तरस्यां वै दिवारात्रिः सदैव हि ।
सर्वेषां द्वीपवर्षाणां सेरुरुत्तरतो यतः ॥ २० ॥
सूर्यदेव
देवापर्यंत सुमेरु वर स्थित ब्रह्माच्या सभेच्या व्यतिरिक्त इतर सर्व स्थानांना
सुद्धा प्रकाशित करतो; त्याची जी किरणें ब्रह्माच्या सभेत
जातात ती त्याच्या तेजाने निरस्त होऊन उलटी परततात. सुमेरुपर्वत समस्त द्वीप आणि वर्षांच्या
उत्तरेला आहे म्हणून उत्तरदिशेला मेरु पर्वतावर सदैव एका बाजूला दिवस आणि दुसर्या
बाजूला रात्र असते .
प्रभा विवस्वतो रात्रावस्तं
गच्छति भास्करे ।
विशत्यग्निमतो रात्रौ
वह्निर्दूरात्प्रकाशते ॥ २१ ॥
वह्नोः प्रभा तथा
भानुर्दिनेष्वाविशति द्विज ।
अतीव वह्निसंयोगादतः सूर्यः
प्रकाशते ॥ २२ ॥
रात्री
सूर्य अस्त झाल्यावर त्याचे तेज अग्नित प्रविष्ट होते ; म्हणून
ह्या समयी अग्नि दुरूनच प्रकाशित होऊ लागतो . अशा
प्रकारे, हे द्विजा ! दिवसा अग्निचे तेज सूर्यात
प्रविष्ट होते म्हणून अग्निच्या संयोगानेच सूर्य
अत्यन्त प्रखरतेने प्रकशित होतो .
तेजसी भास्कराग्नेये
प्रकाशोष्णस्वरूपिणी ।
परस्परानुप्रवेशादाप्यायेते
दिवानिशम् ॥ २३ ॥
दक्षिणोत्तरभूम्यर्धे
समुत्तिष्ठति भास्करे ।
आहोरात्रं विशत्यम्भस्तमः
प्राकाश्यशीलवत् ॥ २४ ॥
अशा
प्रकारे सूर्य आणि अग्निचा प्रकाश तसेच उष्णतामय तेज परस्पर मिळून दिवसा व
रात्रीची वृद्धि प्राप्त होत राहते . मेरुच्या दक्षिणी आणि उत्तरी भूमी
अर्ध्यात सूर्य प्रकाशित होतेवेळी अन्धकारमयी रात्र आणि प्रकशमय दिन क्रमशः जलात
प्रवेश करतात .
आताम्रा हि भवत्यापो
दिवानक्तप्रवेशनात् ।
दिनं विशति चैवाम्भो
भास्करेस्तमुपेयुषि ।
तस्माच्छुक्ला भवन्त्यापो
नक्तमह्नः प्रवेशनात् ॥ २५ ॥
एवं पुष्करमध्येन यदा याति
दिवाकरः ।
त्रिंशद्भागन्तु
मेदिन्यास्तदा मौहूर्तिकी गतिः ॥ २६ ॥
दिवसाच्या
वेळी रात्रिच्या प्रवेशामुळे जल काहिसे ताम्रवर्ण दिसते, पण
सूर्य-अस्त झाल्यावर त्यात दिवसाचा प्रवेश होतो; म्हणून
दिवसाच्या प्रवेशा मुळे रात्रिच्यावेळी तो शुक्लवर्ण होतो. जेव्हा सूर्य पुष्करद्वीपाच्या मध्यावर पोहोचल्यावर पृथ्वीचा तिसावा भाग
पार करतो तेव्हा त्याची ती गति एक मुहुर्त असते. म्हणजेच तितक्या अतिक्रमणाला
लागलेल्या वेळेला एक मुहूर्त म्हणतात .
कुलालचक्रपर्यन्तो भ्रमन्नेष दिवाकरः ।
करोत्यहस्तथा रात्रिं विमुञ्चन्मेदिनीं द्विजः ॥ २७ ॥
अयनस्योत्तरस्यादौ मकरं याति भास्करः ।
ततः कुम्भं च मीनं च राशे राश्यन्तरं द्विज ॥ २८ ॥
त्रिष्वेतेष्वथ भुक्तेषु ततो वैषुवतीं गतिम् ।
प्रयाति सविता कुर्वन्नहोरात्रं ततः समम् ॥ २९ ॥
हे
द्विजा ! कुलालचक्रावर (कुंभाराचे चाक) फिरणार्या जीवासमान भ्रमण करत हा सूर्य
जेव्हा पृथ्वीच्या तिसही भागांचे अतिक्रमण करतो तेव्हा त्याला एक दिन-रात्री म्हणतात. हे द्विजा ! उत्तरायणाच्या आरंभी सूर्य
सर्वात आधी मकरराशीत जातो आणि त्यानंतर
तो कुम्भ आणि मीन राशीत असा एका राशीतून दुसर्या राशीत जातो. ह्या तीनही राशींचा भोग घेतल्यावर सुरूवातीला
सूर्य रात्र आणि दिवस समान करत वैषुवती गतिचे अवलम्बन करतो, म्हणजे
भुमध्य रेखेच्या मधोमध चालतो) .
ततो रात्रिः क्षयं याति
वर्धतेऽनुदिनं दिनम् ॥ ३० ॥
ततश्च मिथुनस्यान्ते परां काष्ठामुपागतः ।
राशिं कर्कटकं प्राप्य
कुरुते दक्षिणायनम् ॥ ३१ ॥
त्या
नन्तर नित्यप्रति रात्र क्षीण होऊ लागते आणि दिवस वाढू लागतो . मग (मेष व वृष
राशीचे अतिक्रमण करून) मिथुनराशीतून निघून उत्तरायणाच्या अन्तिम सीमेवर उपस्थित
होऊन तो कर्कराशीत जाऊन दक्षिणायनाचा आरम्भ करतो .
कुलालचक्रपर्यन्तो
यथाशीघ्रं प्रवर्तते ।
दक्षिणप्रक्रमे सूर्यस्तथा
शीघ्रं प्रवर्तते ॥ ३२ ॥
अतिवेगितया कालं
वायुवेगबलाच्चरन् ।
तस्मात्प्रकृष्टां भूमिं तु
कालेनाल्पेन गच्छति ॥ ३३ ॥
ज्याप्रकारे
कुलाल-चक्राच्या शिरावर स्थित जीव अति शीघ्रतेने फिरतो तसाच सूर्य देखील दक्षिणायन
पार करताना अति शीघ्रतेने चालतो .म्हणून तो अति
शीघ्रतापूर्वक वायुवेगाने चालत आपला उत्कृष्ट मार्ग फार कमी वेळात पार करतो .
सूर्यो द्वादशभिः
शैघ्र्यान्मुहूर्ते दक्षिणायने ।
त्रयोदशार्धमृक्षाणामह्ना
तु चरति द्विज ।
मुहूर्तैस्तावदृक्षाणि
नक्तमष्टादशैश्चरन् ॥ ३४ ॥
कुलालचक्रमध्यस्थो यथा मन्दं प्रसर्पति ।
तथोदगयने सूर्यः सर्पते
मन्दविक्रमः ॥ ३५ ॥
हे
द्विजा ! दक्षिणायनात दिवसा शीघ्रतापूर्वक चालण्याने त्या वेळच्या साडे तेरा
नक्षत्रांना सूर्य बारा मुहूर्तांमध्ये पार करतो, पण
रात्रीच्ड वेळी मन्दगामी असल्याने तीच नक्षत्रे अठरा मुहूर्तांमध्ये पार करतो. कुलाल-चक्राच्या मध्यावर स्थित असलेला
जीव जसा हळुहळु चालतो तसाच उत्तरायणात सूर्य मन्दगतिने चलतो .
तस्माद्दीर्घेण कालेन
भूमिमल्पां तु गच्छति ।
अष्टादशसुहूर्तं
यदुत्तरायणपश्चिमम् ॥ ३६ ॥
अहर्भवति तच्चापि चरते
मन्दविक्रमः ॥ ३७ ॥
त्रयोदशार्धमह्ना तु
ऋक्षाणां चरते रविः ।
मुहूर्तैस्तावदृक्षाणि
रात्रौ द्वादशभिश्चरन् ॥ ३८ ॥
म्हणून
त्यावेळी त्याला थोडीशी भूमि सुद्धा पार करायला अति दीर्घकाल लागतो, म्हणून उत्तरायणाचा अन्तिम दिवस अठरा मुहूर्तांचा असतो, त्या
दिवशी देखील सूर्य अति मन्दगतिने चालतो आणि ज्योतिश्चक्रार्धाचे साडे तेरा नक्षत्र
एका दिवसात पार करतो पण रात्रीच्या वेळी तीच साडे तेरा नक्षत्रे बारा मुहूर्तात
पार करतो .
अतो मन्दतरं नाभ्यां चक्रं भ्रमति वै यथा ।
मृत्पिण्ड इव मध्यस्थो
ध्रुवो भ्रमति वै तथा ॥ ३९ ॥
कुलालचक्रनाभिस्तु यथा
तत्रैववर्तते ।
ध्रुवस्तथा हि मैत्रेय
तत्रैव परिवर्तते ॥ ४० ॥
म्हणून
ज्या प्रकारे नाभिदेशात चक्र मन्द मन्द फिरण्याने तेथील मृत् पिण्ड सुद्धा
मन्दगतिने फिरतो तसेच ज्योतिश्चक्राच्या मध्यावर स्थित ध्रुव अतिमन्द गतिने फिरतो. हे मैत्रेया ! ज्या प्रकारे कुलालचक्राची नाभि आपल्या स्थानावरच फिरते, तसेच
ध्रुव सुद्धा आपल्या स्थानावरच फिरत राहतो.
उभयोः काष्ठयोर्मध्ये
भ्रमतो मण्डलानि तु ।
दिवा नक्तं च सूर्यस्य
मन्दा शीघ्रा च वै गतिः ॥ ४१ ॥
मन्दाह्नि यस्मिन्नयने
शीघ्रा नक्तं तदा गतिः ।
शीघ्रा निशि यदा चास्य तदा
मन्दा दिवा गतिः ॥ ४२ ॥
अशा
प्रकारे उत्तर तथा दक्षिण सीमांच्या मध्यावर मण्डलकार फिरत राहिल्याने सूर्याची
गति दिवसा अथवा रात्री समय मन्द अथवा शीघ्र होते . ज्या अयनात सूर्याची गति दिवसा मन्द होते तिथे ती रात्री
शीघ्र होते तसेच ज्या अयनात गति दिवसा शीघ्र होते तेव्हा ती दिवसा मन्द होते .
एक प्रमाणमेवैष मार्गं याति
दिवाकरः ।
अहोरात्रेण यो भुङ्क्ते
समस्ता राशयो द्विज ॥ ४३ ॥
हे
द्विजा ! सूर्याला सदैव एक सारखाच मार्ग पार करावा लागतो ; एका
दिवस- रात्रीत तो समस्त राशींचा भोग घेतो .
षडेव राशीन् यो भुङ्क्ते
रात्रावन्यांश्च षड्दिवा ॥ ४४ ॥
राशिप्रमाणजनिता दीर्घह्रस्वात्मता दिने ।
तथा निशायां राशीनां प्रमाणैर्लघुदीर्घता ॥ ४५ ॥
सूर्य
सहा राशींना रात्रीच्या वेळी भोगतो आणि सहा दिवसा. राशींच्या परिमाणा नुसार दिवस
लहानमोठा होतो तसेच रात्रीची लघुता किंवा दीर्घता देखील राशींच्या परिमाणा नुसारच
होते .
दिनादेर्दिर्घह्रस्वत्वं
तद्भोगेनैव जायते ।
उत्तरे प्रक्रमे शीघ्रा
निशि मन्दा गतिर्दिवा ॥ ४६ ॥
दक्षिणे त्वयने चैव
विपरीतां विवस्वतः ॥ ४७ ॥
राशींच्या
भोगानुसारच दिवस अथवा रात्रीची लघुता अथवा दीर्घता असते . उत्तरायणात सूर्याची गति
रात्री शीघ्र व दिवसा मन्द असते . दक्षिणायणात त्याची गति ह्याच्या विपरित असते .
उषा रात्रिः समाख्याता व्युष्टिश्चाप्युच्यते दिनम् ।
प्रोच्यते च तथा सन्ध्या उषाव्युष्ट्योर्यदन्तरम् ॥ ४८ ॥
सन्ध्याकाले च सम्प्राप्ते रौद्रे परमदारुणे ।
मन्देहा राक्षसा घोराः सूर्यमिच्छन्ति खादितुम् ॥ ४९ ॥
प्रजापतिकृतः शापस्तेषां मैत्रेय रक्षसाम् ।
अक्षयत्वं शरीराणां मरणं च दिने दिने ॥ ५० ॥
रात्रीला
उषा म्हणतात तथा दिवसाला व्युष्टि (प्रभात) म्हणतात; उषा आणि व्युष्टिच्या मधील समयाला सन्ध्या म्हणतात. 'व्युष्टि' आणि 'उषा' दिवस आणि
रात्रीची वैदिक नावे आहेत; जसे 'रात्रिर्वा
उषा अहर्व्युष्टिः'. हा अति
दारुण व भयानक सन्ध्याकाल उपस्थित होतो तेव्हा मन्देहा नामक भयंकर राक्षसगण
सूर्याला खाऊ इच्छितात. हे मैत्रेया ! त्या राक्षसांना प्रजापतिचा शाप आहे की त्यांचे शरीर अक्षय राहूनही त्यांना दररोज मरण प्राप्त होते .
ततः सूर्यस्य तैर्युद्धं भवत्यत्यन्तदारुणम् ।
ततो द्विजोत्तमास्तोयं
संक्षिपन्ति महामुने ॥ ५१ ॥
ओङ्कारब्रह्मसंयुक्तं गायत्र्या चाभिमन्त्रितम् ।
तेन दह्यन्ति ते पापा
वज्रीभूतेन वारिणा ॥ ५२ ॥
म्हणून
सन्ध्या समयी त्यांचे सूर्यासोबत अति भीषण युद्ध होते. हे
महामुने ! त्या वेळी द्विजोत्तमगण जे ब्रह्मास्वरूप ॐकार आणि गायत्रीने अभिमंत्रित
असलेले जल सोडतात त्या वज्रस्वरूप जलाने ते दुष्ट राक्षस
दग्ध होतात .
अग्निहोत्रे हूयते या समन्त्रा प्रथमाहुतिः ।
सूर्योज्योतिः
सहस्रांशुस्तया दीप्यति भास्करः ॥ ५३ ॥
ओङ्कारो
भगवान्विष्णुस्त्रिधामा वचसां पतिः ।
तदुच्चारणतस्ते तु विनाशं
यान्ति राक्षसाः ॥ ५४ ॥
वैष्णुवोंऽशः परः सूर्यो योऽन्तर्ज्योतिरसम्प्लवम् ।
अभिधायक ओङ्कारस्तस्य
तत्प्रेरकं परः ॥ ५५ ॥
अग्निहोत्रात 'सूर्यो
ज्योति;' इत्यादि मंत्राने जी प्रथम आहुति दिली
जाते त्यामुळे सहस्त्रांशु दिननाथ देदीप्यमान होतो . ॐकार हा
विश्व, तेज आणि प्राज्ञरूप अशा तीन धामांनी
युक्त असलेला भगवान् विष्णु आहे तसेच सम्पूर्ण वाणींचा (वेदांचा) अधिपति है, त्याच्या
उच्चारणमात्रानेच ते राक्षसगण नष्ट होतात . सूर्य विष्णु भगवानाचा अति श्रेष्ठ अंश
आणि विकाररहित अन्तज्योतिःस्वरूप आहे. ॐकार
त्याचा वाचक आहे तो त्या राक्षसांच्या वधात अत्यन्त प्रेरित करणारा आहे .
तेन सम्प्रेरितं
ज्योतिरोंकारेणाथ दीप्तिमत् ।
दहत्यशेषरक्षांसि
मन्देहाख्यान्यघानि वै ॥ ५६ ॥
तस्मान्नोल्लङ्घनं कार्यं सन्ध्योपासनकर्मणः ।
स हन्ति सूर्यं सन्ध्याया
नोपास्तिं कुरुते तु यः ॥ ५७ ॥
ततः प्रयाति
भगवान्ब्राह्मणैरभिरक्षितः ।
वालखिल्यादिभिश्चैव जगतः
पालनोद्यतः ॥ ५८ ॥
त्या
ॐकाराच्या प्रेरणेने अति प्रदीप्त होऊन ती ज्योति मन्देहा नामक सम्पूर्ण पापी
राक्षसांना दग्ध करते . म्हणूनच
सन्ध्योपासनकर्माचे उल्लंघन कधीच करू नये . जो पुरुष
सन्ध्योपासन करत नाही तो भगवान सूर्याचा घात करतो . त्यानन्तर (त्या राक्षसांचा वध
केल्यावर) भगवान सूर्य संसारपालनात प्रवृत्त होऊन वालखिल्यादि ब्राह्मणांकडून
सुरक्षित होऊन गमन करतो .
काष्ठा निमेषा दश पञ्च चैव त्रिंशच्च काष्ठा गणयेत्कलां च ।
त्रिशत्कलश्चैव भवेन्मुहूर्तस्तैस्त्रिंशता रात्र्यहनी समेते ॥ ५९ ॥
ह्रासवृद्धी त्वहर्भागैर्दिवसानां यथाक्रमम् ।
सन्ध्यामुहूर्तमात्रा वै ह्रासवृद्धौ समा स्मृता ॥ ६० ॥
रेखाप्रभृत्यथादित्ये त्रिमुहूर्तगते रवौ ।
प्रातः स्मृतस्ततः कालो भागश्चाह्नः स पञ्चमः ॥ ६१ ॥
पंधरा
निमेषांची एक काष्ठा असते आणि तीस काष्ठांची एक कला गणली जाते . तीस कालांचा एक मुहूर्त असतो आणि तीस मुहूर्तांचा एक सम्पूर्ण दिवस रात्र
.
दिवसांचा
र्हास अथवा वृद्धि क्रमशः प्रातःकाल, मध्याह्नकाल
आदि दिवसांच्या अंशांच्या र्हास-वृद्धिचे कारण आहे, सम्पूर्ण दिवस लहान मोठा असूनही सन्ध्या सर्वदा समान भावाने एकाच
मुहूर्ताची असते. उदयापासून
सूर्याच्या तीन मुहुर्तांच्या गति काळाला 'प्रातःकाल' म्हणतात, हा
सम्पूर्ण दिवसाचा पाचवा भाग असतो .
तस्मात्प्रातस्तनात्कालात्त्रिमुहूर्तस्तु
सङ्गवः ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तस्तु तस्मात्कालात्तु सङ्गवात् ॥ ६२ ॥
तस्मान्माध्याह्निकात्कालादपराह्न इति स्मृतः ।
त्रय एव मुहूर्तास्तु कालभागः स्मृतो बुधैः ॥ ६३ ॥
आपराह्णे व्यतीते तु कालः सायाह्न एव च ।
दशपञ्च मुहूर्तं वै मुहूर्तास्त्रय एव च ॥ ६४ ॥
ह्या
प्रातःकाला नन्तर तीन मुहुर्तांच्या समयाला 'संगव' म्हणतात
तसेच संगवकाळा नंतरच्या तीन मुहूर्तांचा 'मध्याह्न' असतो . मध्याह्न काळा नंतरचा समय 'अपराह्ण' असतो
ज्याला बुद्धीजनांनी तीन मुहूर्तांचा म्हटले आहे . अपराह्णकाळा नंतर 'सायाह्न' काळ असतो
. अशा प्रकारे सम्पूर्ण दिवसाचे पन्द्रह मुहूर्त असतात आणि प्रत्येक
दिवसांश तीन मुहूर्तांचा असतो .
दशपञ्च मुहूर्तं वै
अहर्वैषुवतं स्मृतम् ॥ ६५ ॥
वर्धते ह्रसेत चैवाप्ययने दक्षिणोत्तरे ।
अहस्तु ग्रसते रात्रिं रात्रिर्ग्रसति वासरम् ॥ ६६ ॥
वैषुवत
दिवस पंधरा मुहूर्तांचा असतो पण उत्तरायण आणि दक्षिणायनात क्रमशः त्याची वृद्धि
आणि ह्नास होत जातो . अशा प्रकरे उत्तरायणात दिवस रात्रीचा ग्रास
करू लागतो आणि दक्षिणायनात रात्र दिवसाचा ग्रास करते .
शरद्वसन्तयोर्मध्ये विषुवं तु विभाव्यते ।
तुलामेषगते भानौ समरात्रिदिनं तु तत् ॥ ६७ ॥
कर्कटावस्थिते भानौ दक्षिणायनमुच्यते ।
उत्तरायणमप्युक्तं मकरस्थे दिवाकरे ॥ ६८ ॥
त्रिंशन्मुहूर्तं कथितमहोरात्रं तु यन्मया ।
तानिपञ्चदश ब्रह्मन् पक्ष इत्यभिधीयते ॥ ६९ ॥
शरद आणि
वसन्तऋतुच्या मध्यावर सूर्याचे तुला किंवा मेषराशीत प्रवेश झाल्यावर 'विषुव' होतो. ह्यावेळी दिवस आणि रात्र समान असते. सूर्य
कर्कराशीत उपस्थित होतो तेव्हा त्याला दक्षिणायन म्हणतात आणि तो मकरराशीवर येतो
तेव्हा उत्तरायण म्हणतात. हे ब्रह्मन् ! मी जो तीस
मुहूर्तांचा एक रात्र-दिवस सांगितला तशा पंधरा रात्र - दिवसांना एक 'पक्ष' म्हणतात .
मासः पक्षद्वयेनोक्तो द्वौ मासौ चार्कजावृतुः ।
ऋतुत्रयं चाप्ययनं द्वेऽयने वर्षसंज्ञिते ॥ ७० ॥
संवत्सरादयः पञ्च चतुर्मासविकल्पिताः ।
निश्चयः सर्वकालस्य युगमित्यभिधीयते ॥ ७१ ॥
संवत्सरस्तु प्रथमो द्वितीयः परिवत्सरः ।
इद्वत्सरस्तृतीयस्तु चतुर्थश्चानुवत्सरः ।
वत्सरः पञ्चमश्चात्र कालोयं युगसंज्ञितः ॥ ७२ ॥
दोन
पक्षांचा एक मास होतो, दोन सौरमासांचा एक ऋतु आणि तीन ऋतुंचे
एक अयन असते तसेच दोन अयन मिळूनच एक वर्ष म्हणतात . चार प्रकारच्या मासांनुसार विविधरूपाने
कल्पित संवत्सरादि पाच प्रकारचे वर्ष म्हणजेच 'युग' हे युगच
सर्व प्रकारच्या काल निर्णयाचे कारण सांगितले गेले आहे . त्यात पहिले संवत्सर, दुसरे
परिवत्सरा, तीसरे इद्वत्सर, चौथे
अनुवत्सर व पाचवे वत्सर आहे . हा काळा 'युग' ह्या नावाने विख्यात आहे .
यः श्वेतस्योत्तरः शैलः
शृङ्गवानिति विश्रुतः ।
त्रीणि तस्य तु शृङ्गाणि
यैरयं शृङ्गवान्स्मृतः ॥ ७३ ॥
दक्षिणं चोत्तरं चैव मध्यं
वैषुवतं तथा ।
शरद्वसन्तयोर्मध्ये तद्भानुः
प्रतिपद्यते ।
मेषादौ च तुलादौ च मैत्रेय
विषुवस्थितम् ॥ ७४ ॥
तदा तुल्यमहोरात्रं करोति
तिमिरापहः ।
दशपञ्च मुहूर्तं वै
तदेतदुभयं स्मृतम् ॥ ७५ ॥
श्वेतवर्षाच्या
उत्तरेला जो श्रुंगवान् नावाचा विख्यात पर्वत आहे त्याची तीन श्रृंग आहेत, ज्यांच्या
मुळे त्याला श्रुंगवान म्हणतात . त्यातील एक श्रृंग उत्तरेला, एक
दक्षिणेला आणि एक मध्यावर आहे . मध्यश्रृंगच 'वैषुवत' आहे . शरद आणि वसन्तऋतुच्या मध्यावरून सूर्य ह्या वैषुवतश्रृंगा वर येतो म्हणून
हे मैत्रेया ! मेष किंवा तुलाराशीच्या सुरूवातीला तिमिरापहारी सूर्यदेव विषुवतावर
स्थित होऊन दिवस रात्रीचे परिमाण समान करतो . ह्यावेळी
हे दोन्ही पंधरा पंधरा मुहूर्तांचे असतात .
प्रथमे कृत्तिकाभागे यदा भास्वांस्तदा शशी ।
विशाखानां चतुर्थेंऽशे मुने तिष्ठत्यसंशयम् ॥ ७६ ॥
विशाखानां यदा सूर्यश्चरत्यंशं तृतीयकम् ।
तदा चन्द्रं विजानीयात्कृत्तिकाशिरसि स्थितम् ॥ ७७ ॥
तदैव विषुवाख्योऽयं कालः
पुण्योऽभिधीयते ।
तदा दानादि देयानि देवेभ्यः
प्रयतात्मभिः ॥ ७८ ॥
ब्रह्मणेभ्यः पितृभ्यश्च
मुखमेतत्तु दानजम् ।
दत्तदानस्तु विषुवे
कृतकृत्योऽभिजायते ॥ ७९ ॥
हे मुने
! ज्यावेळी सूर्य कृत्तिकाक्षत्राच्या प्रथम भागात म्हणजे मेषराशीच्या शेवटी तसेच
चन्द्र निश्चितच विशाखाच्या चतुर्थांशात असतो (म्हणजे वृश्चिकेच्या आरम्भी); किंवा
ज्या वेळी सूर्य विशाखा नक्षत्राच्या तृतीय भागात म्हणजे तुळ राशीच्या
अन्तिमांशाचा भोग करतो आणि चन्द्र कृतिकेच्या प्रथम भागात अर्थात मेष राशीच्या
अन्तिमेला स्थित असतो तेव्हा त्याला 'विषुव' नामक अति
पवित्र काळ म्हणतात ; ह्या समयी देवता, ब्राह्मण
आणि पितृगणांना उद्देश्शून संयतचित्त होऊन दानादि करावे . हा काळ जणू दानग्रहणा साठी देवतांच्या उघडलेल्या मुखासमान आहे . म्हणून 'विषुव' काळात
दान करणारा मनुष्य कृतकृत्य होतो .
अहोरात्रार्धमासास्तु
कलाः काष्ठाः क्षणास्तथा ।
पौर्णमासी तथा ज्ञेया अमावास्या तथैव च ।
सिनीवाली कुहूश्चैव राका चानुमतिस्तथा ॥ ८० ॥
तपस्तपस्यै मधुमाधवौ च शुक्रः शुचिश्चायनमुत्तरं स्यात् ।
नभोनभस्यौ च इषस्तथोर्ज- स्सहसहस्याविति
दक्षिणं तत् ॥ ८१ ॥
लोका लोकश्च यश्शैलः प्रागुक्तो भवतो मया ।
लोकपालास्तु चत्वारस्तत्र तिष्ठन्ति सुव्रताः ॥ ८२ ॥
यागादिंच्या
काल-निर्णयासाठी दिवस, रात्र, पक्ष, कला, काष्ठा
आणि क्षण आदिचा विषय भल्याप्रकारे समजून घ्यायला हवा . राका आणि अनुमति ह्या दोन प्रकारच्या पौर्णिमा तसेच सिनीवाली आणि कुहू
ह्या दोन प्रकारच्या अमावस्या असतात . माघ-फाल्गुन, चैत्र-वैशाख, तथा
ज्येष्ठ, आषाढ़ हे सहा महिने म्हणजे उत्तरायण आणि
श्रावण, भाद्र, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष हे
सहा महिने दक्षिणायन आहेत . मी आधी तुला ज्या लोकालोक पर्वताचे वर्णन
केले त्यावर चार व्रतशील लोकपाल निवास करतात .
सुधामा शङ्खपाच्चैव
कर्दमस्यात्मजो द्विज ।
हिरण्यरोमा
चैवान्यश्चतुर्थः केकुमानपि ॥ ८३ ॥
निर्द्वन्द्वा निरभीमाना
निस्तन्द्रा निष्परिग्रहाः ।
लोकपालाः स्थिता ह्येते
लोकालोके चतुर्दिशम् ॥ ८४ ॥
उत्तरं यदगस्त्यस्य
अजवीथ्याश्च दक्षिणम् ।
पितृयानः स वै पन्था
वैश्वानरपथाद्बहिः ॥ ८५ ॥
हे
द्विजा ! सुधामा, कर्दमचे पुत्र शंखपाद आणि हिरण्यरोमा
तसेच केतुमान - हे चारही निर्द्वन्द्व, निरभिमान, निरालस्य
आणि निष्परिग्रह लोकपालगण लोकालोक पर्वताच्या चारही दिशांना स्थित आहेत . जो अगस्त्यच्या उत्तरेला तसेच
अजवीथिच्या दक्षिणेला वैश्वानर मार्गाहून भिन्न (मृगवीथि नामक) मार्ग आहे तोच
पितृयानपथ आहे .
तत्रासते महात्मान ऋषयो
येऽग्निहोत्रिणः ।
भूतारम्भकृतं ब्रह्म
शंसन्तो ऋत्विगुद्यताः ।
प्रारभन्ते तु ये
लोकास्तेषां पन्थाः स दक्षिणः ॥ ८६ ॥
चलितं ते पुनर्ब्रह्म
स्थापयन्ति युगेयुगे ।
सन्तत्या तपसा चैव
मर्यादाभिः श्रुतेन च ॥ ८७ ॥
जायमानास्तु पूर्वे च
पश्चिमानां गृहेषु वै ।
पश्चिमाश्चैव पूर्वेषां
जायन्ते निधनेष्विह ॥ ८८ ॥
त्या
पितृयानमार्गात महात्मा मुनिजन राहतात . जे लोग
अग्निहोत्री होऊन प्राण्याच्या उप्तत्तिचा आरम्भक ब्रह्माची (वेद) स्तुति करत
यज्ञानुष्ठानासाठी उद्यत होऊन कर्माचा आरम्भ करतात हा पितृयान त्यांचा दक्षिणमार्ग
आहे . ते
युग-युगान्तरात विच्छिन्न झालेल्या वैदिक धर्माची, सन्तान
तपस्या वर्णाश्रम-मर्यादा आणि विविध शास्त्रां द्वारा पुन्हा स्थापना करतात . पूर्वतन धर्मप्रवर्तकच आपल्या
उत्तरकालीन सन्तानांकडे उप्तन्न होतात आणि उत्तरकालीन धर्म प्रचारकगण परत आपल्या
कडे सन्तानरूपात उत्पन्न झालेल्या आपल्याच पितृगणांच्या कुळात जन्म घेतात .
एवमावर्तमानास्ते तिष्ठन्ति
नियतव्रताः ।
सवितुर्दक्षिणं मार्गं
श्रिता ह्याचन्द्रतारकम् ॥ ८९ ॥
नागावीथ्युत्तरं यच्च
सप्तर्षिभ्यश्च दक्षिणम् ।
उत्तरः सवितुः पन्था
देवयानश्च स स्मृतः ॥ ९० ॥
तत्र ते वासिनः सिद्धा
विमला ब्रह्मचारिणः ।
सन्ततिं ते जुगुप्सन्ति
तस्मान्मृत्युर्जितश्च तैः ॥ ९१ ॥
अशा
प्रकारे ते व्रतशील महर्षिगण चन्द्र आणि तारागणाच्या स्थिति पर्यन्त सूर्याच्या
दक्षिणमार्गे पुन्हा पुन्हा येत जात राहतात . नागवीथिच्या उत्तरेला आणि
सप्तार्षिंच्या दक्षिणेला जो सूर्याचा उत्तरीय मार्ग आहे त्याला देवयानमार्ग
म्हणतात . तिथे जे
प्रसिद्ध निर्मलस्वभाव आणि जितेन्द्रिय ब्रह्माचारिगण निवास करतात ते सन्तानाची
इच्छा करत नाहीत, म्हणून त्यांनी मृत्युवर विजय मिळवलेला
आहे .
अष्टाशीतिसहस्राणि
मुनीनामूर्ध्वरेतसाम् ।
उदक्पन्थानमर्यम्णः
स्थितान्याभूतसम्प्लवम् ॥ ९२ ॥
ते सम्प्रयोगाल्लोभस्य
मैथुनस्य च वर्जनात् ।
इच्छाद्वेषाप्रवृत्त्या च
भूतारम्भविवर्जनात् ॥ ९३ ॥
पुनश्च
कामासंयोगाच्छब्दादेर्देषदर्शनात् ।
इत्येभिः कारणैः
शुद्धास्तेऽमृतत्वं हि भेजिरे ॥ ९४ ॥
सूर्याच्या
उत्तरमार्गात ऐंशी हजार ऊर्ध्वरेता मुनिगण प्रलयकाळा पर्यन्त निवास करतात . त्यांनी लोभाचा असंयोग, मैथुनाचा त्याग, इच्छा
आणि द्वेषा विषयी अप्रवृत्ति, कर्मानुष्ठानाचा
त्याग, काम-वासनांचा असंयोग आणि शब्दादि
विषयांचे अदर्शन इत्यादि कारणांमुळे शुद्धचित्त होऊन अमरता प्राप्त केली आहे .
आभूतसम्प्लवं स्थानममृतत्वं
विभाव्यते ।
त्रैलोक्यस्थितिकालोऽयमपुनर्मार
उच्यते ॥ ९५ ॥
ब्रह्महत्याश्वमेधाभ्यां
पापपुण्यकृतो विधिः ।
आभूतसम्प्लवान्तन्तु
फलमुक्तं तयोर्द्विज ॥ ९६ ॥
यावन्मात्रे प्रदेशे तु
मैत्रेयावस्थितो ध्रुवः ।
क्षयमायाति तावत्तु
भूमेराभूतसम्प्लवात् ॥ ९७ ॥
भूतलांच्या
प्रलयापर्यन्त स्थिर राहण्यालाच अमरता म्हणतात .
त्रैलोक्याच्या स्थितिपर्यंतच्या ह्या काळालाच अपुनर्मार (पुनर्मृत्युरहित) म्हटले
जाते . हे
द्विजा ! ब्रह्महत्या आणि अश्वमेधयज्ञामुळे जे पाप आणि पुण्य प्राप्त होते त्याचे
फळ प्रलया पर्यन्त सांगितले आहे . हे मैत्रेया ! जितक्या प्रदेशात ध्रुव
स्थित आहे, पृथ्वीसकट त्या प्रदेशा पर्यन्त
सम्पूर्ण देश प्रलयाकाळी नष्ट होतो .
ऊर्ध्वोत्तरमृषिभ्यस्तु
ध्रुवो यत्र व्यवस्थितः ।
एतद्विष्णुपदं दिव्यं
तृतीयं व्योम्नि भासुरम् ॥ ९८ ॥
निर्धूतदोषपङ्कानां यतीनां
संयतात्मनाम् ।
स्थानं तत्परमं विप्र
पुण्यपापपरिक्षये ॥ ९९ ॥
अपुण्यपुण्योपरमे
क्षीणाशेषाप्तिहेतवः ।
यत्र गत्वा न शोचन्ति
तद्विष्णोः परपं पदम् ॥ १०० ॥
सप्तर्षिंपासून
उत्तरेला वरील बाजूस जिथे ध्रुव स्थित आहे ते अति तेजोमय स्थानच आकाशात विष्णुचे
तिसरे दिव्यधाम आहे . हे विप्रा ! पाप-पुण्य क्षीण झाल्यावर दोष आणि पंकशून्य संयतात्मा मुनिजनांचे हेच परमस्थान आहे . पाप-पुण्य निवृत्त झाल्यावर तसेच
देहप्राप्तिचे सम्पूर्ण कारण नष्ट झाल्यावर प्राणिगण ज्या स्थानी जाऊन परत शोक करत
नाहीत तेच भगवान विष्णुचे परमपद आहे .
धर्मध्रुवाद्यास्तिष्ठन्ति
यत्र ते लोकसाक्षिणः ।
तत्सार्ष्ट्योत्पन्नयोगेद्धास्तद्विष्णोः
परमं पदम् ॥ १०१ ॥
यत्रोतमेतत्प्रोतं च यद्भूतं
सचराचरम् ।
भव्यं य विश्वं मैत्रेय
तद्विष्णोः परमं पदम् ॥ १०२ ॥
दिवीव चक्षुराततं योगिनां
तन्मयात्मनाम् ।
विवेकज्ञानदृष्टं च
तद्विष्णोः परमं पदम् ॥ १०३ ॥
जिथे
भगवंतासमान ऐश्वर्यतेने प्राप्त झालेल्या योगद्वारा सतेज होऊन धर्म आणि ध्रुव आदि
लोक - साक्षिगण निवास करतात तेच विष्णूचे परमपद आहे .हे मैत्रेया ! जिथे हे भूत, भविष्य
आणि वर्तमान चराचर जगत ओतप्रोत होत आहे तेच विष्णूचे परमपद आहे . जे तल्लीन योगिजनांना आकाश मण्डलात
देदीप्यमान सूर्या समान सर्वांच्या प्रकाशकरूपाने प्रतीत होते तसेच ज्याचे
प्रत्यक्ष प्रमाण केवळ विवेक ज्ञानानेच होते तेच विष्णूचे परमपद आहे .
यस्मिन्प्रतिष्ठितो
भास्वान्मेढीभूतः स्वयं ध्रुवः ।
ध्रुवे च सर्वज्योतींषि
ज्योतिष्वम्भोमुचो द्विज ॥ १०४ ॥
मेघेषु सङ्गता
वृष्टिर्वृष्टेः सृष्टेश्च पोषणम् ।
आप्यायनं च सर्वेषां
देवादीनां महामुने ॥ १०५ ॥
ततश्चाज्याहुतिद्वारा
पोषितास्ते हविर्भुजः ।
वृष्टेः कारणतां यान्ति
भूतानां स्थितये पुनः ॥ १०६ ॥
हे
द्विजा ! त्या विष्णूपदातच सर्वांचा आधारभूत परमतेजस्वी ध्रुव स्थित आहे, तसेच
ध्रुवात समस्त नक्षत्र, नक्षत्रांमध्ये मेघ आणि मेघांमध्ये
वृष्टि आश्रित आहे . हे महामुने ! त्या वृष्टिमुळेच समस्त
सृष्टिचे पोषण आणि सम्पुर्ण देव मनुष्यादि प्राण्यांची पुष्टि होते . त्यानन्तर गौ आदि प्राण्यांपासून उत्पन्न दुग्ध आणि घृत आदिंच्या
आहुतिंनी परितुष्ट अग्निदेवच प्राण्यांच्या स्थितीसाठी पुन्हा वृष्टिचे कारण बनतो .
एवमेतत्पदं विष्णोस्तृतीयममलात्मकम् ।
आधारभूतं लोकानां त्रयाणां वृष्टिकारणम् ॥ १०७ ॥
ततः प्रभवति
ब्रह्मन्सर्वपापहरा सरित् ।
गङ्गा देवाङ्गनाङ्गानामनुलेपनपिञ्जरा
॥ १०८ ॥
वामपादाम्बुजाङ्गुष्ठनखस्त्रोतोविनिर्गताम् ।
विष्णोर्बिभार्ति यां
भक्त्या शिरस्साहर्निशं ध्रुवः ॥ १०९ ॥
अशाप्रकारे
विष्णुचा हा निर्मल तृतीय लोकच (ध्रुव) त्रैलोकाचे आधारभूत आण वृष्टीचे आदिकारण
आहे . हे ब्रह्मन ! ह्या विष्णुपदापासूनच
देवांगनांच्या अंगरागातून पाण्डुरवर्ण सर्वपापापहारिणी गंगा उप्तन्न झाली आहे . विष्णुच्या वाम चरणकमलाच्या अंगठ्याच्या
नखरूप स्त्रोतापासून निघालेल्या त्या गंगेला ध्रुव दिवस रात्र आपल्या मस्तकावर
धारण करतो .
ततः सप्तर्षयो यस्याः प्राणायामपरायणाः ।
तिष्ठन्ति
वीचिमालाभिरुह्यमानजटाजले ॥ ११० ॥
वार्योघैः सन्ततैर्यस्याः
प्लावितं शशिमण्डलम् ।
भूयोधिकतरां कान्तिं
वहत्येतदुह क्षये ॥ १११ ॥
मेरुपृष्टे पतत्युच्चैर्निष्क्रान्ता शशिमण्डलात् ।
जगतः पावनार्थाय प्रयाति च
चतुर्दिशम् ॥ ११२ ॥
त्यानन्तर
जिच्या जलात ऊभे राहून प्राणायाम-परायण सप्तर्षिगण तिच्या तरंगभंगाने जटाकलापा
सारखे कम्पायमान होत, अघमर्षण मंत्राचा जप करतात आणि जिच्या
विस्तृत जलसमूहाने आप्लावित होऊन चन्द्रमण्डल क्षयानंतर पुन्हा पहिल्यापेक्षा
जास्त कान्ति धार्ण करतो, ती गंगा चन्द्रमंण्डलातून निघून
मेरुपर्वतावर पडते आणि संसाराला पवित्र करण्यासाठी चारही दिशांना जाते .
सीता चालकनन्दा च
चक्षुर्भद्रा च संस्थिता ।
एकैव या चतुर्भेदा
दिग्भेदगतिलक्षणा ॥ ११३ ॥
भेदं चालकनन्दाख्यं यस्याः
शर्वोपि दक्षिणाम् ।
दधार शिरसा प्रीत्या
वर्षाणामधिकं शतम् ॥ ११४ ॥
शम्भोर्जटाकलापाच्च
विनिष्क्रान्तास्थिशर्कराः ।
प्लावयित्वा दिवं निन्ये या
पापान्सगरात्मजान् ॥ ११५ ॥
स्त्रातस्य सलिले यस्याः
सद्यः पापं प्रणश्यति ।
अपूर्वपुण्यप्राप्तिश्च
सद्यो मैत्रेय जायते ॥ ११६ ॥
चारही
दिशांना गेल्याने तीच एकटीच ए सीता, अलकनन्दा, चक्षु
आणि भद्रा अशी चार भेद असणारी होते . जिच्या अलकनन्दा नामक दक्षिणी भेदाला
भगवान शंकराने अत्यन्त प्रीति पूर्वक शंभर वर्षांहून अधिक आपल्या मस्तकावर धारण
केले होते, जिने शंकराच्या जटाकलापातून निघून पापी
सगरपुत्रांना अस्थिचरण आप्लावित करून स्वर्गात पोहोचवले . हे मैत्रेया ! जिच्या
जलात स्नान केल्याने शीघ्र समस्त पाप नष्ट होतात आणि अपुर्व पुण्याची प्राप्ति
होते .
दत्ताः पितृभ्यो
यत्रापस्तनयैः श्रद्धयान्वितैः ।
समाशतं प्रयच्छन्ति तृप्तिं
मैत्रेय दुर्लभाम् ॥ ११७ ॥
यस्यामिष्ट्वा महायज्ञैर्यज्ञेशं पुरुषोत्तमम् ।
द्विजभूपाः परां
सिद्धिमवापुर्दिवि चेह च ॥ ११८ ॥
स्नानाद्विधूतपापाश्च यज्जलैर्यतयस्तथा ।
केशवासक्तमनसः प्राप्ता
निर्वाणमुत्तमम् ॥ ११९ ॥
जिच्या
प्रवाहात पुत्रांद्वारा पितरांसाठी श्रद्धापूर्वक केलेले एक दिवसाचे तर्पणाने
सुद्धा त्यांना शंभर वर्षांपर्यंत दुर्लभ तृप्ति मिळते . हे द्विजा ! जिच्या तटावर राजांनी
महायज्ञ करून यज्ञेश्वर भगवान पुरुषोत्तमाचे यजन करून इहलोक आणि स्वर्गलोकात
परमसिद्धिचा लाभ प्राप्त केला . जिच्या जलमें स्नान केल्याने निष्पाप
झालेल्या यतिजनांनी भगवान केशवात चित्त लावून अत्युत्तम निर्वाणपद प्राप्त केले .
श्रुताऽभिलषिता दृष्टा
स्पृष्टा पीताऽवगाहिता ।
या पावयति भूतानि कीर्तिता
च दिने दिने ॥ १२० ॥
गङ्गा गङ्गेति यैर्नाम
योजनानां शतेष्वपि ।
स्थितैरुच्चारितं हन्ति
पापं जन्मत्रयार्जितम् ॥ १२१ ॥
यतः सा पावनायालं त्रयाणां
जगतामपि ।
समुद्भूता परं तत्तु
तृतीयं भगवत्पदम् ॥ १२२ ॥
जी केवळ
आपले श्रवण, इच्छा, दर्शन, स्पर्श, जलपान, स्नान
तथा यशोगान केल्याने देखील दररोज प्राण्यांना पवित्र करत राहते . तसेच जिचे 'गंगा, गंगा' असे नाव
शंभर योजनांच्या दूरीवरून उच्चारल्याने सुद्धा जीवाचे तीन जन्मांचे संचित पाप नष्ट
करते .त्रैलोक्याला पवित्र करण्यास समर्थ असलेली ही
गंगा जिथून उप्तन्न झाली, तेच
भगवंताचे तीसरे परमपद आहे .
इति श्रीविष्णुपुराणे
द्वितीये अंशे अष्टोमोऽध्यायः ॥८॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा