॥
विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः अंशः॥
॥ सप्तमोऽध्यायः ॥
"भूर्भुवः आदि सात ऊर्ध्वलोकांचा वृतांत"
मैत्रेय उवाच
कथितं भूतलं ब्रह्मन्भमैतदखिलं त्वया ।
भुवर्लोकादिकांल्लोकाञ्छ्रोतुमिच्छाम्यहं मुने ॥ १ ॥
मैत्रेय म्हणाले ;– ब्रह्मन ! आपण मला समस्त भूमंडलाचे वर्णन
केले . हे मुने ! आता मी भुवर्लोक आदि समस्त लोकांविषयी ऐकू इच्छितो .
तथैव ग्रहसंस्थानं प्रमाणानि यथा तथा ।
समाचक्ष्व महाभाग तन्मह्यं परिपृच्छते ॥ २ ॥
हे महाभागा ! मला जिज्ञासुला आपण ग्रहगणाची स्थिति तसेच त्यांचे
परिमाण आदिचे यथावत वर्णन करावे .
श्रीपराशर उवाच
रविचन्द्रमसोर्यावन्मयूखैरवभास्यते ।
ससमुद्रसरिच्छैला तावती पृथिवी स्मृता ॥ ३ ॥
पराशर म्हणाले ;– जितक्या दूर पर्यंत सूर्य आणि चंद्राच्या
किरणांचा प्रकाश जातो; समुद्र, नद्या आणि पर्वतादिंनी युक्त तितक्या संपूर्ण प्रदेशाला पृथ्वी
म्हणतात .
यावत्प्रमाणा पृथिवी विस्तारपरिमण्डलात् ।
नभस्तावन्प्रमाणं वै व्यासमण्डलतो द्विज ॥ ४ ॥
हे द्विजा ! जितका पृथ्वीचा विस्तार आणि परिमंडल (घेर) आहे तितकाच
विस्तार आणि घेर भुवर्लोकाचा सुद्धा आहे .
भूमेर्योजनलक्षे तु सौरं मैत्रेय मण्डलम् ।
लक्षाद्दिवाकरस्यापि मण्डलं शशिनः स्थितम् ॥ ५ ॥
हे मैत्रेया ! पृथ्वीपासून एक लाख योजने दूर सूर्यमंडळ आहे आणि
सूर्यमंडळा पासून एक लक्ष योजनांच्या अंतरावर चन्द्रमंडळ आहे .
पूर्णे शतसहस्रे तु योजनानां
निशाकरात् ।
नक्षत्रमण्डलं
कृत्स्नमुपरिष्टात्प्रकाशते ॥ ६ ॥
चंद्रापासून पुर्ण शंभर हजार योजने वर सम्पूर्ण नक्षत्रमंडळ प्रकाशित
होत आहे .
द्वे लक्षे चोत्तरे ब्रह्मन् बुधो
नक्षत्रमण्डलात् ।
तावत्प्रमाणभागे तु बुधस्याप्युशनाः
स्थितः ॥ ७ ॥
हे ब्रह्मन ! नक्षत्रमडंळापासून दोन लाख योजने वर बुध आणि बुधापासून
दोन लक्ष योजने वर शुक्र स्थित आहे .
अङ्गारकोपि शुक्रस्य तत्प्रमाणे
व्यवस्थितः ।
लक्षद्वये तु भौमस्य स्थितो देवपुरोहितः
॥ ८ ॥
शुक्रापासून तितक्याच अंतरावर मंगळ आहे आणि मंगळापासून दोन लाख योजने
वर बृहस्पति आहे .
सौरिर्बृहस्पतेश्चोर्ध्वं द्विलक्षे समवस्थितः ।
सप्तर्षिमण्डलं तस्माल्लक्षमेकं द्विजोत्तमा ॥ ९ ॥
हे द्विजोत्तमा ! बृहस्पतिपासून दोन लाख योजने वर शनि आहे आणि
शनिपासून एक लक्ष योजनांच्या अंतरावर सप्तर्षिमडंळ आहे .
ऋषिभ्यस्तु सहस्राणां शतादूर्ध्वं व्यवस्थितः ।
मेढीभूतः समस्तस्य ज्योतिश्चक्रस्य वै ध्रुवः ॥ १० ॥
तसेच सप्तर्षिंपासून शंभर हजार योजने वर समस्त ज्योतिश्चक्राचे
नाभिरूप असे ध्रुवमंडळ स्थित आहे .
त्रैलोक्यमेतत्कथितमुत्सेधेन
महामुने ।
इज्याफलस्य भूरेषा इज्या चात्र
प्रतिष्ठिता ॥ ११ ॥
हे महामुने ! हे मी तुला त्रैलोक्याच्या उच्चते विषयीचे वर्णन केले . हे त्रेलोक्य यज्ञफळाची भोग-भूमि आहे आणि यज्ञानुष्ठानाची स्थिति
ह्या भारतवर्षातच आहे .
ध्रुवादूर्ध्वं महर्लोको यत्र ते
कल्पवासिनाः ।
एकयोजनकोटिस्तु यत्र ते कल्पवासिनः ॥ १२
॥
ध्रुवापासून एक करोड़ योजने वर महर्लोक आहे, जिथे
कल्पांत-पर्यन्त राहणारे भृगु आदि सिद्धगण राहतात .
द्वे कोटी तु जनो लोको यत्र ते ब्रह्मणः सुताः ।
सनन्दनाद्याः प्रथिता मैत्रेयामलचेतसः ॥ १३ ॥
हे मैत्रेया ! त्याच्याही दोन करोड़ योजने वर जनलोक आहे जिथे
ब्रह्माचे प्रख्यात पुत्र निर्मलचित्त सनकादि राहतात .
चतुर्गणोत्तरे चोर्ध्वं
जनलोकात्तपः स्थितम् ।
वैराजा यत्र ते देवाः स्थिता
दाहविवर्जिताः ॥ १४ ॥
जनलोकापासून चौपट अर्थात आठ करोड़ योजने वर तपलोक आहे; तिथे
वैराज नामक देवगणांचा निवास आहे ज्यांचा कधीच दाह होत नाही .
षड्गुणेन तपोलोकान्सत्यलोको
विराजते ।
अपुनर्मारका यत्र ब्रह्मलोको हि स स्मृतः
॥ १५ ॥
तपलोकापासून सहापट अर्थात बारा करोड़ योजनांच्या अंतरावर सत्यलोक
सुशोभित आहे ज्याला ब्रह्मलोक असंही म्हणतात आणि जिथे परत मृत्यु न होणारे अमरगण
निवास करतात .
पादगम्यन्तु
यत्किञ्चिद्वस्त्वस्ति पृथिवीमयम् ।
स भूर्लोकः समाख्यातो विस्तरोऽस्य
मयोदितः ॥ १६ ॥
जे काही पार्थिव वस्तुंच्या चरणसंचारा योग्य जो आहे तो भूर्लोकच आहे. त्याचा विस्तार मी सांगितला .
भूमिसूर्यान्तरं यच्च
सिद्धादिमुनिसेवितम् ।
भुवर्लोकस्तु सोऽप्युक्तो द्वितीयो
मुनिसत्तम ॥ १७ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यावर जे सिद्धगण आणि
मुनिगणांनी सेवित असलेले स्थान आहे, तोच दूसरा
भुवर्लोक आहे .
ध्रुवसूर्यान्तरं यच्च नियुतानि
चतुर्दश ।
स्वर्लोकः सोऽपि गदितो
लोकसंस्थानचिन्तकैः ॥ १८ ॥
सूर्य आणि ध्रुवाच्या मध्ये जे चौदा लक्ष योजनांचे अंतर आहे, त्यालाच
लोकस्थितिचा विचार करणार्यांनी स्वर्लोक म्हटले आहे .
त्रैलोक्यमेतत्कृतकं मैत्रेय
परिपठ्यते ।
जनस्तपस्तथा सत्यमिति चाकृतकं त्रयम् ॥
१९ ॥
हे मैत्रेया ! ह्यांना (भू: , भुव:, स्व:) ‘कृतक’ त्रैलोक्य म्हणतात आणि जन, तप तथा
सत्य – हे तीनही ‘अकृतक’ लोक आहेत .
कृतकाकृतयोर्मध्ये महर्लोक इति स्मृतः ।
शुन्यो भवति कल्पान्ते योऽत्यन्तं न विनश्यति ॥ २० ॥
ह्या कृतक आणि अकृतक त्रिलोक्याच्या मध्याला महर्लोक म्हणतात, जो
कल्पांत काळी केवळ जनशून्य होतो, पूर्ण नष्ट नाहीं होत [म्हणून त्याला ‘कृतकाकृत’ म्हणतात] .
एते सप्त मया लोका मैत्रेय
कथितास्तव ।
पातालानि च सप्तैव ब्रह्माण्डस्यैष
विस्तरः ॥ २१ ॥
हे मैत्रेया ! अशाप्रकारे मी तुला हे सात लोक आणि सात पाताळ सांगितले
. ह्या
ब्रह्माण्डांचा बस एवढाच विस्तार आहे .
एतदण्डकटाहेन तिर्यक् चोध्वमधस्तथा ।
कपित्थस्य यथा बीजं सर्वतो वै समावृतम् ॥ २२ ॥
हे ब्रह्माण्ड कपिथ्य (कैथा) बीजासमान वर खाली सर्व बाजूंनी
अंडकटाहाने घेरलेले आहे .
दशोत्तरेण पयसा मैत्रेयाण्डं च
तद्वृतम् ।
सर्वोम्बुपरिधानोऽसौ वह्निना वेष्टितो
बहिः ॥ २३ ॥
हे मैत्रेया ! हे अंड आपल्यापेक्षा दहापट जलाने आवृत आहे आणि हे
जलाचे सम्पूर्ण आवरण अग्निने घेरलेले आहे .
वह्निश्च वायुना वायुर्मैत्रेय
नभसा वृतः ।
भूतादिना नभः सोऽपि महता परिवेष्टितः ।
देशोत्तराम्यशेषाणि मैत्रेयैतानि सप्त वै
॥ २४ ॥
अग्नि वायुने आणि वायु आकाशाने परिवेष्टित आहे तसेच आकाश भूतांमुळे
भूते अहंकाराने आणि अहंकार महत्तत्वाने घेरलेला आहे . हे मैत्रेया ! हे सातही उत्तरोत्तर पहिल्यापेक्षा दहापट आहेत .
महान्तं च समावृत्य प्रधानं समवस्थितम् ।
अनन्तस्य न तस्यान्तः संख्यानं चापि विद्यते ॥ २५ ॥
तदनन्तमसंख्यातप्रमाणं चापि वै यतः ।
हेतुभूतमशेषस्य प्रकृतिः सा परा मुने ॥ २६ ॥
महत्तत्वाला देखील प्रधानाने आवृत केले आहे . ते अनंत आहे; तसेच त्याचा कधी अंत (नाश) होत नाही आणि त्यांची गणनाही नाही; कारण हे
मुने ! ते अनंत, असंख्येय, अपरिमेय, सम्पूर्ण जगताचे कारण आहे आणि तेच परा प्रकृति आहे .
अण्डानां तु सहस्राणां
सहस्राण्ययुतानि च ।
ईदृशानां तथा तत्र कोटिकोटिशतानि च ॥ २७
॥
त्यात अशी हजारों, लाखों शेकडो करोडो ब्रह्माण्डे आहेत .
दारुण्यग्निर्यथा तैलं तिले तद्वत्पुमानपि ।
प्रधानेऽवस्थितो व्यापी
चेतनात्मात्मवेदनः ॥ २८ ॥
ज्या प्रकारे काष्ठ म्हणजे लाकडात अग्नि आणि तिळात तेल राहते त्याच
प्रकारे स्वप्रकाश चेतनात्मा व्यापक पुरुष प्रधानात स्थित आहे .
प्रधानं च पुमांश्चैव
सर्वभूतात्मभूतया ।
विष्णुशक्त्या महाबुद्धे वृतौ
संश्रयधर्मिणौ ॥ २९ ॥
हे महाबुद्धे ! हे संश्रयशील प्रधान आणि पुरुष सुद्धा समस्त
भूतांच्या स्वरूपभूता विष्णु-शक्तिने आवृत आहे .
तयोः सैव पृथग्भावकारणं संश्रयस्य
च ।
क्षोभकारणभूता च सर्गकाले महामते ॥ ३० ॥
हे महामते ! ही विष्णु-शक्तिच [प्रलय काळी] त्यांचे पार्थक्य आणि
[स्थिति काळी] त्यांच्या सम्मिलनाचे कारण आहे तसेच सर्गारम्भाच्या वेळी ही
विष्णु-शक्तिच त्यांच्या क्षोमाचेही कारण आहे .
यथा सक्तं जले वातो बिभर्ति
कणिकाशतम् ।
शक्तिः सापि तथा विष्णोः
प्रधानपुरुषात्मकम् ॥ ३१ ॥
ज्याप्रकारे जलाच्या संसर्गामुळे वायु शेकड़ो जलकण धारण करतो त्याच
प्रकारे भगवान विष्णुची शक्ति सुद्धा प्रधान-पुरुषमय जगताला धारण करते .
यथा च पादपो
मूलस्कन्धशाखादिसंयुतः ।
आदिबीजात्प्रभवति बीजान्यन्यानि वै ततः ॥
३२ ॥
प्रभवन्ति ततस्तेभ्यः सम्भवन्त्यपरे
द्रुमाः ।
तेपि तल्लक्षणद्रव्यकारणानुगता मुने ॥ ३३
॥
एवमव्याकृतात्पूर्वं जायन्ते महदादयः ।
विशेषान्तास्ततस्तेभ्यः
सम्भवन्त्यसुरादयः ।
तेभ्यश्च पुत्रास्तेषां च पुत्राणामपरे
सुताः ॥ ३४ ॥
हे मुने ! ज्याप्रकारे आदि-बीजापासूनच मूळ, स्कन्ध
आणि शाखा आदि सहित वृक्ष उत्पन्न होतो आणि त्यानन्तर त्या वृक्षापासून इतर बीज
उत्पन्न होतात, तसेच त्या बीजांपासून अन्यान्य वृक्ष उत्पन्न होतात आणि ते अन्य
वृक्षदेखील त्याच लक्षण, द्रव्य आणि कारणांनी युक्त असतात, त्याच प्रकारे
आधी अव्याकृत (प्रधान) महत्तत्वापासून पंचभूते सर्व उत्पन्न होतात, तसेच त्यांच्यापासून देव, असुर आदिंचा
जन्म होतो आणि नंतर त्यांचे पुत्र तसेच त्या पुत्रांचे अन्य पुत्र ऊत्पन्न होतात .
बीजाद्वृक्षप्ररोहेण यथा
नापचयस्तरोः ।
भूतानां भूतसर्गेण नैवास्त्यपचयस्तथा ॥
३५ ॥
आपल्या बीजापासून अन्य वृक्ष उत्पन्न झाल्याने ज्याप्रकारे
पूर्ववृक्षाची कोणतीही क्षति होत नाही त्याचप्रकारे अन्य प्राणि उत्पन्न झाल्याने
त्यांच्या जन्मदाता प्राण्यांचा ह्रास होत नाही .
सन्निधानाद्यथाकाशकालाद्याः कारणं तरोः ।
तथैवापरिणामेव विश्वस्य भगवान्हरिः ॥ ३६ ॥
ज्याप्रकारे आकाश आणि काळ आदि सन्निधिमात्रामुळेच वृक्षाचे कारण आहेत
त्याच प्रकारे भगवान श्रीहरि देखील विना परिणाम विश्वाचे कारण आहे .
व्रीहिबीजे यथा मूलं नालं पत्राङ्कुरौ तथा ।
काण्डं कोषस्तु पुष्पं च क्षीरं तद्वच्च तण्डुलाः ॥ ३७ ॥
तुषाः कणाश्च सन्तो वै यान्त्याविर्भावमात्मनः ।
प्ररोहहेतुसामग्रीमासाद्य मुनिसत्तम ॥ ३८ ॥
तथा कर्मस्वनेकेषु देवाद्याः समवस्थिताः ।
विष्णुशक्तिं समासाद्य प्ररोहमुपयान्ति वै ॥ ३९ ॥
हे मुनिसत्तमा ! ज्याप्रकारे धान्याच्या बीजात मूळ, नाळ, पाने, अंकुर, फांद्या, कोष, पुष्प, क्ष्रीर, तंडुल, तुष आणि
कण सगळेच राहतात; तसेच अन्कुरोत्पत्ति साठी कारणीभूत असलेली सामग्री प्राप्त झाल्यावर
ते प्रकट होतात त्याच प्रकारे आपल्या अनेक पुर्वकर्मां मध्ये स्थित देवता आदि
विष्णु-शक्तिचा आश्रय प्राप्त झाल्यावर आविर्भूत होतात .
स च विष्णुः परं ब्रह्म यतः
सर्वमिदं जगत् ।
जगच्च यो यत्र चेदं यस्मिंश्च लयमेष्यति
॥ ४० ॥
ज्याच्यामुळे हे सम्पूर्ण जगत उत्पन्न झाले आहे, जो
स्वयं जगतरूपाने स्थित आहे, ज्याच्यामुळे हे स्थित आहे तसेच ज्याच्यात हे सारे लीन होणार आहे ते
परब्रह्म म्हणजेच श्रीविष्णु आहे .
तद्ब्रह्म तत्परं धाम सदसत्परमं
पदम् ।
यस्य सर्वमभेदेन यतश्चैतच्चराचरम् ॥ ४१ ॥
ते ब्रह्मच विष्णुचे परमधाम (परस्वरूप) आहे, ते पद
सत आणि असत दोन्हीहून विलक्षण आहे तसेच त्यापासून अभिन्न असलेले हे सम्पूर्ण चराचर
जगत त्यापासूनच उत्पन्न झाले आहे .
स एव मूल प्रकृतिर्व्यक्तरूपी
जगच्च सः ।
तस्मिन्नेव लयं सर्वं याति तत्र च
तिष्ठति ॥ ४२ ॥
तोच अव्यक्त मूलप्रकृति आहे, तोच
व्यक्तस्वरूप संसार आहे, त्यातच हे सम्पूर्ण जगत लीन होते आणि त्याच्याच आश्रयाने हे सर्व
स्थित आहे .
कर्ता क्रियाणां स च इज्यते
क्रतुः स एवतत्कर्मफलं
च तस्य ।
स्त्रुगादियत्साधनमप्यशेषं हरेर्न
किञ्चिद्व्यतिरिक्तमस्ति ॥ ४३ ॥
यज्ञादि क्रियांचा कर्ता तोच आहे, यज्ञरूपात
त्याचेच यजन केले जाते आणि त्या यज्ञादिंचे फलस्वरूप देखील तोच आहे, तसेच यज्ञाचे साधनरूप जे स्र्त्रुवा आदि आहे ते सर्व सुद्धि हरिच्या
व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही .
इति
श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे सप्तमोऽध्यायः (७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा