॥
विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः अंशः ॥ ॥ दशमोऽध्यायः ॥
द्वादश सुर्यांची नावे आणि अधिकाऱ्यांचे वर्णन
श्रीपराशर उवाच
साशीतिमण्डलशतं काष्ठयोरन्तरं द्वयोः ।
आरोहणावरोहाभ्यां भानोरब्देन या गतिः ॥ १
॥
पराशर म्हणाले -
आरोह आणि अवरोह द्वारा सूर्याला एका
वर्षात जितकी गति आहे त्या सम्पूर्ण मार्गाच्या दोन्ही काष्ठांचे अन्तर एकशे ऐंशी
मंडळ आहे .
स रथोऽधिष्ठितो देवैरादित्यर्ऋषिभिस्तथा
।
गन्धर्वैरप्सरोभिश्च ग्रामणीसर्पराक्षसैः
॥ २ ॥
सूर्याचा रथ (प्रति मास) भिन्न भिन्न
आदित्य, ऋषि, गन्धर्व, अप्सरा, यक्ष, सर्प आणि राक्षसगणांनी अधिष्ठित होतो .
धाता क्रतुस्थला चैव पुलस्त्यो
वासुकिस्तथा ।
रथभृद्ग्रामणीर्हेतिस्तुम्बुरुश्चैव
सप्तमः ॥ ३ ॥
एते वसन्ति वै चैत्रे मधुमासे सदैव हि ।
मैत्रेय स्यन्दने भानोः सप्तमासाधिकारिणः
॥ ४ ॥
हे मैत्रेया ! मधुमास चैत्रात सूर्याच्या
रथात सर्वदा धाता नामक आदित्य, क्रतुस्थला अप्सरा, पुलस्त्य
ऋषि , वासुकि सर्प, रथभृत यक्ष, हेति राक्षस आणि तुम्बुरु गन्धर्व हे सात मासाधिकारी राहतात .
अर्यमा पुलहश्चैव रथौजाः पुञ्चिकस्थला ।
प्रहेतिः कच्छवीरश्व नारदश्च रथे रवेः ॥
५ ॥
माधवे निवसन्त्येते शुचिसंज्ञे निबोध मे
॥ ६ ॥
तसेच अर्यमा नामक आदित्य, पुलह
ऋषि, रथौजा यक्ष, पुञ्जिकस्थला अप्सरा, प्रहेति राक्षस, कच्छवीर
सर्प आणि नारद नामक गन्धर्व हे वैशाख मासात सुर्याच्या रथावर निवास करतात. हे
मैत्रेया ! आता ज्येष्ठ मासात निवास करणार्यांचे नावे ऐक .
मित्रोत्रिस्तक्षको रक्षः पौरुषेयोथ
मेनका ।
हाहा रथस्वनश्चैव मैत्रेयैते वसन्ति वै ॥
७ ॥
त्यावेळी मित्र नामक आदित्य, अत्रि
ऋषि, तक्षक सर्प, पौरुषेय राक्षस, मेनका अप्सरा, हाहा
गन्धर्व आणि रथस्वन नामक यक्ष त्या रथात वास करतात .
वरुणो वसिष्ठो नागश्च सहजन्या हुहू रथः ।
रथचित्रस्तथा शुक्रे वसन्त्याषाढसंज्ञके
॥ ८ ॥
तसेच आषाढ़ मासात वरुण नामक आदित्य, वसिष्ठ
ऋषि, नाग सर्प, सहजन्या अप्सरा, हूहू गन्धर्व, रथ
राक्षस आणि रथचित्र नामक यक्ष त्यात राहतात .
इन्द्रो विश्वावसुः स्रोता
एलापुत्रस्तथाङ्गिराः ।
प्रम्लोचा च न भस्येते सर्पिश्चार्के वसन्ति वै ॥ ९ ॥
श्रावण मासात इन्द्र नामक आदित्य, विश्वावसु
गन्धर्व, स्त्रोत यक्ष, एलापुत्र सर्प, अंगिरा ऋषि, प्रम्लोच
अप्सरा आणि सर्पि नामक राक्षस सूर्याच्या रथात राहतात .
विवस्वानुग्रसेनश्च भृगुरापूरणस्तथा ।
अनुम्लोचा शङ्खपालो व्याघ्रो भाद्रपदे
तथा ॥ १० ॥
तसेच भाद्रपद महिन्यात विवस्वान् नामक
आदित्य, उग्रसेन गन्धर्व भृगु ऋषि, आपूरण यक्ष, अनुम्लोचा
अप्सरा, शंखपाल सर्प आणि व्याघ्र नामक राक्षसाचा रथात निवास असतो .
पूषा च सुरुचिर्वातो गौतमोथ धनञ्जयः ।
सुषेणोऽन्यो घृताची च वसन्त्याश्वयुजे
रवौ ॥ ११ ॥
आश्विन-मासात पूषा नामक आदित्य, वसुरुचि
गन्धर्व, वात राक्षस, गौतम ऋषि धनत्र्जय सर्प, सुषेण गन्धर्व
आणि घॄताची नामक अप्सरेचा त्यात वास असतो .
विश्वावसुर्भरद्वाजः पर्जन्यैरावतौ तथा ।
विश्वाची सेनजिच्चापि कार्तिके च वसन्ति
वै ॥ १२ ॥
कार्तिक मासात त्यात विश्वावसु नामक
गन्धर्व, भरद्वज ऋषि, पर्जन्य आदित्य, ऐरावत सर्प, विश्वाची
अप्सरा, सेनाजित् यक्ष तसेच आप नामक राक्षस राहतात .
अंशकाश्यपतार्क्ष्यास्तु
महापद्मस्तथोर्वशी ।
चित्रसेनस्तथा
विद्युन्मार्गशीर्षेधिकारिणः ॥ १३ ॥
मार्गशीष महिन्याचे अधिकारी अंश नामक आदित्य, काश्यप
ऋषि, तार्क्ष्य यक्ष, महापद्म सर्प, उर्वशी
अप्सरा, चित्रसेन गन्धर्व आणि विद्युत् नामक राक्षस आहेत .
क्रतुर्भगस्ततोर्णायुः स्फूर्जः
कर्कोटकस्तथा ।
अरिष्टनेमिश्चैवान्या
पूर्वाचित्तिर्वराप्सराः ॥ १४ ॥
पौषमासे वसन्त्येते सप्तभास्करमण्डले ।
लोकप्रकाशनार्थाय विग्रवर्याधिकारिणः ॥
१५ ॥
हे विप्रवरा ! पौष-महिन्यात क्रतु ऋषि, भग
आदित्य, ऊर्णायु गन्धर्व, स्फूर्ज राक्षस, कर्कोटक
सर्प, अरिष्टनेमि यक्ष तसेच पूर्वचित्ति अप्सरा जगताला प्रकाशित करण्यासाठी
सूर्यमण्डलात राहतात .
त्वष्टाथ जमदग्निश्च कम्बलोऽथ तिलोत्तमा
।
ब्रह्मोपेतोथ ऋतजिद् धृतराष्ट्रोऽथ
सप्तमः ॥ १६ ॥
माघमासे वसन्त्त्येते सप्त मैत्रेय
भास्करे ।
श्रूयतां चापरे सूर्ये फाल्गुनेनिवसन्ति
यो ॥ १७ ॥
हे मैत्रेया ! त्वष्टा नामक आदित्य, जमदग्रि
ऋषि, कम्बल सर्प, तिलोत्तमा अप्सरा, ब्रह्मोपेत राक्षस, ऋताजित्
यक्ष और धृतराष्ट्र गन्धर्व - हे सात माघ मासात भास्करमन्डलात राहतात . आता, जे
फाल्गुन महिन्यात सूर्याच्या रथात राहतात त्यांची नावे ऐक .
विष्णुरश्वतरो रम्भा सूर्यवर्चाश्च
सत्यजित् ।
विश्वामित्रस्तथा रक्षो यज्ञोपेतो
महामुने ॥ १८ ॥
हे महामुने ! ते विष्णु नामक आदित्य, अश्वतर
सर्प, रम्भा अप्सरा, सुर्यवर्चा गन्धर्व, सत्यजित् यक्ष, विश्वामित्र
ऋषि आणि यज्ञोपेत नामक राक्षस आहेत .
मासेष्वेतेषु मैत्रेय वसन्त्येते तु
सप्तकाः ।
सवितुर्मण्डले
ब्रह्मन्विष्णुसक्त्युपबृंहिताः ॥ १९ ॥
हे ब्रह्मन ! अशा प्रकारे श्रीविष्णुच्या
शक्तिने तेजोमय झालेले हे सात - सात गण एक- एक मासा पर्यंत सूर्यमण्डलात राहतात .
स्तुवन्ति
मुनयः सूर्यं गन्धर्वैर्गीयते पुरः ।
नृत्यन्त्यप्सरसो यान्ति सूर्यस्यानुनिशाचराः ॥ २० ॥
वहन्ति पन्नगा यक्षैः क्रियतेऽभीषुसङ्ग्रहः ॥ २१ ॥
वालखिल्यास्तथैवैनं परिवार्य समासते ॥ २२ ॥
मुनिगण सूर्याची स्तुति करतात, गन्धर्व
सम्मुख राहून त्याचे यशोगान करतात, अप्सरा नृत्य
करतात, राक्षस रथा मागे चालतात, सर्प वहन
करण्यास अनुकूल रथाला सुसज्जित करतात आणि यक्षगण रथाची व्यवस्था सांभाळतात तसेच
नित्यसेवक वालखिल्यादि रथाला सर्व बाजूने घेरून असतात .
सोयं सप्तगणः सूर्यमण्डले मुनिसत्तम ।
हिमोष्णवारिवृष्टीनां हेतुः स्वसमयं गतः ॥ २३ ॥
हे मुनिसत्तमा ! सूर्यमण्डलाचे हे
सात-सात गणच आपआपल्या समयी उपस्थित होऊन शीत, ग्रीष्म आणि
वर्षा आदिचे कारण बनतात .
इति श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे
दशमोऽध्यायः (१०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा