॥ विष्णुपुराणम् ॥
द्वितीयः अंशः॥ एकादशोऽध्यायः ॥
सूर्य शक्ति आणि वैष्णवी शक्तीचे वर्णन
मैत्रेय उवाच
यदेतद्भगवानाह गणः सप्तविधो रवेः ।
मण्डले हिमतापादेः कारणं तन्मया श्रुतम् ॥ १ ॥
मैत्रेय म्हणाले -
भगवन ! तुम्ही जे सांगितल की
सूर्यमण्डलात स्थित सातही गण शीत-ग्रीष्म आदिचे कारण असतात, ते मी
ऐकले .
व्यापारश्चापिकथितो
गन्धर्वोरगरक्षसाम् ।
ऋषीणां वालखिल्यानां तथैवाप्सरसां गुरो ॥ २ ॥
यक्षाणां च रथे भानोर्विष्णुशक्तिधृतात्मनाम् ।
किं चादित्यस्य यत्कर्म तन्नात्रोक्तं त्वया मुने ॥ ३ ॥
हे गुरो ! तुम्ही सूर्याच्या रथात स्थित
आणि विष्णुच्या शक्तिने प्रभावित गन्धर्व, सर्प, राक्षस, ऋषि, बालखिल्यादि, अप्सरा
तसेच यक्षांचे पृथक् पृथक् व्यापार सांगितले किंतु हे मुने ! हे नाही सांगितले कि
सूर्याचे कार्य काय आहे ? .
यदि सप्तगणो वारि हिममुष्णं च वर्षति ।
तत्किमत्र रवेर्येन वृष्टिः
सूर्यादितीर्यते ॥ ४ ॥
जर सातही गणच शीत, ग्रीष्म
आणि वर्षाला कारणीभूत आहेत तर मग सूर्याचे प्रयोजन काय आहे ? आणि मग असे का म्हटले जाते कि
वृष्टि सूर्यामुळे होते ?
विवस्वानुदितो मध्ये यात्यस्तमिति किं
जनः ।
ब्रवीत्येतत्समं कर्म यदि सप्तगणस्य तत्
॥ ५ ॥
जर ह्या सातही गणांचे वृष्टि आदि कार्य
समान आहे तर मग 'सूर्य उदय झाला, आता मध्यावर आहे, आता अस्त झाला' असे लोक
का म्हणतात ?
पराशर उवाच
मैत्रेय श्रूयतामेतद्यद्भवान्परिपृच्छ्ति
।
यथा सप्तगणोप्येकः प्राधान्येनाधिको रविः
॥ ६ ॥
परशर म्हणाले - हे मैत्रेया ! जे काही तु
विचारलेस त्याचे उत्तर ऐक, सूर्य सात गणां मधलाच एक आहे, पण त्यांच्यात प्रधान
असल्याने त्याच्यात विशेषता आहे .
सर्वशक्तिः परा
विष्णर्ऋग्यजुःसामसंज्ञिता ।
सैषात्रयी तपत्यंहो जगतश्च हिनस्ति या ॥
७ ॥
भगवान विष्णुची जि सर्वशक्ति मयी ऋक्, यजुः, साम
नामक पराशक्ति आहे ती वेदत्रयीच सूर्याला ताप प्रदान करते आणि (उपासना केल्याने)
संसारातील समस्त पापांना नष्ट करते .
सैष विष्णुः स्थितः स्थित्यां जगतः पालनोद्यतः ।
ऋग्यजुः सामभूतोन्तः सवितुर्द्विजतिष्ठति ॥ ८ ॥
हे द्विजा ! जगताची स्थिति आणि पालन
करण्यासाठी तो ऋक्, यजुः, आणि सामरूप
श्रीविष्णु सूर्यातच निवास करतो .
मासि मासि रविर्योयस्तत्र तत्र हि सा परा ।
त्रयीमयी विष्णुशक्तिरवस्थानं करोति वै ॥ ९ ॥
प्रत्येक महिन्यात जो-जो सूर्य असतो
त्याच्यातच ती वेदत्रयी रूपिणी विष्णुची पराशक्ति निवास करते .
ऋचः स्तुवन्तिः पूर्वाह्ने मध्याह्नेऽथ यजूंषि वै ।
बृहद्रथन्तरादीनि सामान्यह्नः क्षये रविम् ॥ १० ॥
पूर्वह्णात ऋक्, मध्याह्णात, बृहद्रथन्तरादि
यजुः आणि सायंकाळी सामश्रुती सूर्याची स्तुति करतात .
अङ्गमेषा त्रयी विष्णोर्ऋग्यजुः सामसंज्ञिता ।
विष्णुशक्तिरवस्थानं सदादित्ये करोति सा ॥ ११ ॥
ही ऋक् - यजुः- सामस्वरूपिणी वेदत्रयी
भगवान श्रीविष्णुचेच अंग आहे. ही विष्णु-शक्ति सर्वदा आदित्यात राहते .
न केवलं रवेः शक्तिर्वैष्णवी सा त्रयीमयी
।
ब्रह्माथ पुरुषो
रुद्रस्त्रयमेतत्त्रयीमयम् ॥ १२ ॥
ही त्रयीमय वैष्णवी शक्ति केवळ सूर्याचीच
अधिष्ठात्री आहे असे नाही तर ब्रह्मा, विष्णु आणि
महादेव सुद्धा त्रयीमयच आहेत .
सर्गादौ ऋङ्मयो ब्रह्मा स्थितौ
विष्णुर्यजुर्मयः ।
रुद्रः साममयोऽन्ताय
तस्मात्तस्याशुचिर्ध्वनिः ॥ १३ ॥
सर्गाच्या आदि समयी ब्रह्मा ऋक्मय आहे, सर्गाच्या
स्थिति समयी विष्णु यजुर्मय आहे आणि अन्तकाळी रुद्र साममय आहे. म्हणूनच सामगानाचा
ध्वनि अपवित्र मानला जातो .
एवं सा सात्त्विकी शक्तिर्वैष्णवी या
त्रयीमयी ।
आत्मसप्तगणस्थं तं भास्वन्तमधितिष्ठति ॥
१४ ॥
अशा प्रकारे, ती
त्रयीमयी सात्विकी वैष्णवी शक्ति आपल्या सप्तगणांमध्ये स्थित आदित्यातच
(अतिशयरुपात) अवस्थित असतात .
तया चाधिष्ठितः सोऽपि जाज्वलीति
स्वरश्मिभिः ।
तमः समस्तजगतां नाशं नयति चाखिलम् ॥ १५ ॥
त्याने अधिष्ठित सूर्यदेवसुद्धा आपल्या प्रखर किरणांनी अत्यन्त
प्रज्वलित होऊन संसारातील सम्पूर्ण अन्धकार नष्ट करतो .
स्तुवन्ति चैनं मुनयो गन्धर्वैर्गीयते
पुरः ।
नृत्यन्त्योऽप्सरसो यान्ति तस्य चानु
निशाचराः ॥ १६ ॥ वहन्ति पन्नगा यक्षैः क्रियतेऽभीषुसङ्ग्रहः
।
वालखिल्यास्तथैवैनं परिवार्य समासते ॥ १७ ॥
त्या सूर्यदेवाची मुनिगण स्तुति करतात, गन्धर्वगण
त्याच्या सम्मुख यशोगान करतात . अप्सरा नृत्य करतात, राक्षस रथाच्या
मागे असतात, सर्पगण रथाचा साज सजवतात, यक्ष घोड्यांना
सांभाळतात तसेच बालखिल्यादि रथाला सर्वबांजूंनी घेरून असतात .
नोदेता नास्तमेता च कदाचिच्छक्तिरूपधृक्
।
विष्णुर्विष्णोः पृथक् तस्य
गणस्सप्तविधोऽप्ययम् ॥ १८ ॥
त्रयीशक्तिरूप भगवान श्रीविष्णुचा कधीच उदय होत नाही कि अस्त सुद्धा होत नाही (अर्थात तो स्थायी रूपात सदा
विद्यामान असतो) हे सात प्रकारचे गण मात्र त्याच्यापासून पृथक म्हणजे वेगळे आहेत .
स्तम्भस्थदर्पणस्येव योऽयमासन्नतां गतः ।
छायादर्शनसंयोगं स तं प्राप्नोत्यथात्मनः
॥ १९ ॥
स्तम्भाला लागलेल्या दर्पणा जवळ जो कोणी
जातो त्याला आपलीच सावली दिसू लागते .
एवं सा वैष्णवी शक्तिर्नैवापैति ततो
द्विज ।
मासानुमासं भास्वन्तमध्यास्ते तत्र
संस्थितम् ॥ २० ॥
हे द्विजा ! त्याच प्रकारे ती वैष्णवी
शक्ति सूर्याच्या रथावरून कधीच जात नाही आणि प्रत्येक महिन्यात पृथक पृथक सूर्य
(परिवर्तित होऊन) तिच्यात स्थित झाल्याने ती शक्ति त्याची अधिष्ठात्री असते .
पितृदेवमनुष्यादीन्स सदाप्याययन्प्रभुः ।
परिवर्तत्यहोरात्रकारणं सविता द्विज ॥ २१
॥
हे द्विजा ! दिवस व रात्रिचा कारणस्वरूप
असलेला भगवान सूर्य पितृगण, देवगण आणि मनुष्यादिंना सदा तृप्त करत फिरत राहतो .
सूर्यरश्मिः सुषुम्णा यस्तर्पितस्तेन
चन्द्रमाः ।
कृष्णपक्षेऽमरैः शश्वत्पीयते वै सुधामयः
॥ २२ ॥
सूर्याच्या सुषुम्ना नामक किरणांनी शुक्रपक्षात
चन्द्राचे पोषण होते व कृष्णपक्षात त्या अमृतमय चन्द्राच्या एक-एक कलेचे देवगण
निरन्तर सेवन करतात .
पीतं तं द्विकलं सोमं कृष्णपक्षक्षये द्विज ।
पिबन्ति पितरस्तेषां भास्करात्तर्पण तथा ॥ २३ ॥
हे द्विजा ! कृष्णपक्षाचा क्षय झाल्यावर
(चतुर्दशी नन्तर) दोन कलायुक्त चन्द्राचे पितृगण सेवन करतात. अशा प्रकारे
सूर्याद्वारा पितृगणांचे तर्पण होते.
आदत्ते रश्मिभिर्यन्तु क्षितिसंस्थं रसं रविः ।
तमुत्सृजति भूतानां पुष्ट्यर्थं सस्यवृद्धये ॥ २४ ॥
सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वी वरील जल
शोषून घेतो आणि ते सर्व प्राण्यांची पुष्टि आणि अन्नाच्या वृद्धिसाठी बरसवतो .
तेन प्रीणात्यशेषाणि भूतानि भगवान् रविः ।
पितृदेवमनुष्यादीनेवमाप्याययत्यसौ ॥ २५ ॥
असे करून भगवान सूर्य समस्त प्राण्यांना
आनन्दित करतो आणि देव, मनुष्य व पितृगण
आदि सर्वांचेच पोषण करतो .
पक्षतृप्तिं तु देवानां पितॄणां चैव मासिकीम् ।
शश्वत्तृप्तिं च मर्त्यानां मैत्रेयार्कः प्रयच्छति ॥ २६ ॥
हे मैत्रेया ! अशा प्रकारे सूर्यदेव
देवतांची पाक्षिक, पितृगणांची मासिक आणि मनुष्यांची नित्यप्रति तृप्ति करत राहतो .
इति
श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे एकादशोऽध्यायः (११)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा