रविवार, २२ मार्च, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, द्वादश अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 12

 

॥ विष्णुपुराणम् ॥

द्वितीयः अंशः॥ ॥ द्वादशोऽध्यायः ॥

 

नवग्रहांचे वर्णन आणि लोकांतरसंबंधी व्याख्यानाचा उपसंहार

 

श्रीपराशर उवाच
रथस्त्रिचक्रः सोमस्य कुन्दाभास्तस्य वाजिनः ।
वामदक्षिणतो युक्ता दश तेन चरत्यसौ ॥ १ ॥
वीथ्याश्रयाणि ऋक्षाणि ध्रुवाधारेण वेगिना ।
ह्रासवृद्धिक्रमस्तस्य रश्मीनां सवितुर्यथा ॥ २ ॥

श्रीपराशरज म्हणाले -

चद्राचा रथ तीन चाकांचा आरे, त्याच्या डाविकडे दक्षिणेला कुन्दकुसुम समान श्वेतवर्ण दहा घोडे़ जुंपलेले आहेत. ध्रुवच्या आधारावर स्थित त्या वेगशाली रथातून चन्द्र भ्रमण करतो आणि नागवीथिवर आश्रित अश्विनी आदि नक्षत्रांचा भोग करतो . सूर्या समान चंद्राच्या किरणांचा सुद्धा कमीजास्त होण्याचा निश्चित क्रम आहे ॥१-२॥


 अर्कस्येव हि तस्याश्वाः सकृद्युक्ता वहन्ति ते ।
 कल्पमेकं मुनिश्रेष्ठ वारीगर्भसमुद्‍भवाः ॥ ३ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! सूर्या समान समुद्रगर्भातून उप्तन्न झालेले त्याचे घोड़े सुद्धा एकदा जुंपल्यावर एक कल्पापर्यन्त रथ खेचत राहतात ॥३॥


 क्षीणं पीतं सुरैः सोममाप्याययति दीप्तिमान् ।
 मैत्रेयैककलं सन्तं रश्मिनैकेन भास्करः ॥ ४ ॥

हे मैत्रेया ! सुरगणांनी पान करत राहिल्याने क्षीण झालेल्या कलामात्र चंन्द्राचे प्रकाशमय सूर्यदेव आपल्या एका किरणाने पुन्हा पोषण करतो ॥४॥

 

 

 क्रमेण येन पीतोऽसौ देवैस्तेन निशाकरम् ।
 आप्याययत्यनुदिनं भास्करो वारितस्करः ॥ ५ ॥

ज्या क्रमाने देवगण चन्द्राचे पान करतात त्याच क्रमाने जलापहारी सूर्यदेव चंद्राला शुक्ला प्रतिपदेपासून प्रतिदिन पुष्ट करतो ॥५॥



 सम्भृतं चार्धमासेन तत्सोमस्थं सुधामृतम् ।
 पिबन्दि देवा मैत्रेय सुधाहारा यतोऽमराः ॥ ६ ॥

हे मैत्रेया ! अशा प्रकारे अर्ध्या महिन्यात एकत्रित झालेल्या चन्द्राच्या अमृत देवगण परत पीऊ लागतात कारण देवतांचा आहार अमृतच आहे ॥६॥

 

 त्रयास्त्रिंशत्सहस्राणि त्रयस्त्रिंशच्छतानि च ।
 त्रयस्त्रिंशत्तथा देवाः पिबन्ति क्षणदाकरम् ॥ ७ ॥

तेहतीस हजार तीनशे तेहतीस देवगण चन्द्रस्थ अमृताचे पान करतात ॥७॥



 कलाद्वयावशिष्टस्तु प्रविष्टः सूर्यमण्डलम् ।
 अमाख्यारश्मौ वसति अमावास्या ततः स्मृता ॥ ८ ॥

ज्यावेळी दोन कालामात्र ऊरलेला चन्द्र सूर्यमण्डलात प्रवेश करून त्याच्या अमा नामक किरणांमध्ये राहतो त्या तिथिला अमावास्या म्हणतात ॥८॥


 अप्सु तस्मिन्नहोरात्रे पूर्वं विशति चन्द्रमाः ।
 ततो वीरुत्सु वसति प्रयात्यर्कं ततः क्रमात् ॥ ९ ॥

त्या दिवशी रात्री तो आधी जलात प्रवेश करतो, मग वृक्ष-लता आदिंमध्ये निवास करतो आणि मग क्रमाने सूर्यात जातो ॥९॥


 छिनत्ति विरुधो यस्तु वीरुत्संस्थे निशाकरे ।
 पत्रं वा पातयत्येकं ब्रह्महत्यां स विन्दति ॥ १० ॥

वृक्ष आणि लता आदिंमध्ये चन्द्र स्थित असताना (अमावास्येला) जो त्यांना कापतो किंवा त्यांचे एक पान जरी तोड़तो त्याला ब्रह्महत्येचे पाप लागते ॥१०॥


 सोमं पञ्चदशे भागे किञ्चिच्छिष्टे कलात्मके ।
 अपाराह्णे पितृगणा जघन्यं पर्युपासते ॥ ११ ॥

केवळ पंधरावा कलारूप भाग राहतो तेव्हा त्या क्षीण चंद्राला पितृगण मध्याह्नोत्तर काळी चारहीबाजूंनी घेरतात ॥११॥


 पिबन्ति द्विकलाकारं शिष्टा तस्य कला तु या ।
 सुधामृतमयी पुण्या तामिन्दोः पितरो मुने ॥ १२ ॥

हे मुने ! त्यावेळी त्या द्विकलाकार चंद्राच्या उरलेल्या अमृतमयी एका कलेचे ते पितृगण पान करतात ॥१२॥


 निःसृतं तदमावास्यां गभस्तिभ्यः सुधामृतम् ।
 मासं तृप्तिमवाप्याग्र्यां पितरः सन्ति निर्वृताः ।
 सौम्या बर्हिषदश्चैव अग्निष्वात्ताश्च ते त्रिधा ॥ १३ ॥

अमावास्येच्या दिवशी चन्द्र-किरणांमधून निघालेल्या त्या सुधामृताचे पान करून अत्यन्त तृप्त झालेले सौम्य, बर्हिषद् आणि अग्निष्वत्ता हे तीन प्रकारचे पितृगण एक मासपर्यन्त सन्तुष्ट राहतात ॥१३॥

 

एवं देवान् सिते पक्षे कृष्णपक्षे तथा पितॄन् ।
 वीरुधश्चामृतमयैः शीतैरप्परमाणुभिः ॥ १४ ॥
 वीरुधौषधिनिष्पत्त्या मनुष्यपशुकीटकान् ।
 आप्याययति शीतांशुः प्राकाश्याह्लादनेन तु ॥ १५ ॥

अशा प्रकारे चन्द्र शुक्लपक्षात देवतांची आणि कृष्णपक्षात पितृगणांची पृष्टि करतात, तसेच अमृतमय शीतल जलकणांनी लतावृक्षादि आणि लता औषधी आदि उत्पन्न करून व आपल्या चन्द्रिकेद्वारा आल्हादित करून तो मनुष्य, पशु, कीट-पतंगादि सर्व प्राण्यांचे पोषण करतो ॥१४-१५॥


 वाय्वग्निद्रव्यसम्भूतो रथश्चन्द्रसुतश्च च ।
 पिशङ्‍गैस्तुरगैर्युक्तः सोऽष्टाभिर्वायुवेगिभिः ॥ १६ ॥

चंद्राच्या पुत्र बुधाचा रथ वायु आणि अग्निमय द्रव्याचा बनलेला आहे आणि त्याला वायुसारखे वेगशाली आठ पिशंगवर्णी घोडे़ जुंपलेले आहेत ॥१६॥

सवरूथः सानुकर्षो युक्तो भूसम्भवैर्हयैः ।
सोपासङ्‍गपताकस्तु शुक्रस्यापि रथो महान् ॥ १७ ॥

वरुथ, अनुकर्ष, उपासंग आणि पताका तसेच पृथ्वीपासून उप्तन्न झालेल्या घोड्यांसहित शुक्राचा रथही अति महान आहे ॥१७॥


अष्टाश्वः काञ्चनः श्रीमान्भौमस्यापि रथो महान् ।
पद्मरागारुणैरश्वैः संयुक्तो वह्निसम्भवैः ॥ १८ ॥

तसेच मंगळाचा अति शोभायमान सुवर्ण-निर्मित महान रथ सुद्धा अग्नि पासून झालेल्या पद्मराग-मणि समान, अरुणवर्णी, आठ घोड्यांनी युक्त आहे ॥१८॥


 अष्टाभिः पाण्डुरैर्युक्तो वाजिभिः काञ्चनो रथः ।
 तस्मिंस्तिष्ठति वर्षान्ते राशौ राशौ बृहस्पतिः ॥ १९ ॥

जो आठ पाण्डुरवर्णी घोड्यांनी युक्त सुवर्णका रथ आहे त्यात वर्षाच्या शेवटी प्रत्येक राशित बृहस्पति विराजमान होतो  ॥१९॥


 आकाशसम्भवैरश्वैः शबलैः स्यन्दनं युतम् ।
 तमारुह्य शनैर्याति मन्दगामी शनैश्चरः ॥ २० ॥

आकाशतून उत्पन्न झालेल्या विचित्रवर्णी घोड्यांनी युक्त रथात आरुढ़ होऊन मन्दगामी शनैश्वर अतिशय हळुहळु चालतो ॥२०॥


 स्वर्भानोस्तुरगा ह्यष्टौ भृङ्‍गाभा धूसरं रथम् ।
 सकृद्युक्तास्तु मैत्रेय वहन्त्यविरतं सदा ॥ २१ ॥

राहुचा रथ धूसर (मातकट) वर्णाचा आहे, त्याला भ्रमरा समान कृष्णवर्णी आठ घोड़े जुंपलेले आहेत . हे मैत्रेया ! एकदा जुंपल्यावर ते घोड़े निरन्तर चालत राहतात ॥२१॥


 आदित्यान्निःसृतो राहुः सोमं गच्छति पर्वसु ।
 आदित्यमेति सोमाच्च पुनः सौरेषु पर्वसु ॥ २२ ॥

चन्द्रपर्वाच्या वेळी (पौर्णिमा) हा राहु सूर्याकडून निघून चंद्राजवळ येतो आणि सौरपर्वाच्या वेळी (अमावस्या) तो चंद्राकडून निघून सूर्याच्या जवळ येतो ॥२२॥


 तथा केतुरथस्याश्वा अप्यष्टौ वातरंहसः ।
 पलालधूमवर्णाभा लाक्षारसनिभारुणाः ॥ २३ ॥

अशा प्रकार केतुच्या रथाचे वायुवेग शाली आठ घोडे सुद्धा धुम्राची आभा असलेले लाखेसारखे लाल रंगाचे आहेत ॥२३॥

 

 एते मया ग्रहाणां वै तवाख्याता रथा नव ।
 सर्वे ध्रुवे महाभाग प्रबद्धा वायुरश्मिभिः ॥ २४ ॥

हे महाभागा ! मी तुला ह्या नव ग्रहांच्या रथांचे वर्णन केले; हे सर्व वायुमयी दोरीने ध्रुवासोबत बांधलेले आहेत ॥२४॥



 ग्रहर्क्षताराधिष्ण्यानि ध्रुवे बद्धान्यशेषतः ।
 भ्रमन्त्युचितचारेण मैत्रेयानिलरश्मिभिः ॥ २५ ॥

हे मैत्रेया ! समस्त ग्रह, नक्षत्र आणि तारामण्डल वायुमयी रज्जुने ध्रुवासोबत बद्ध असल्याने यथोचित प्रकारे फिरत राहतात ॥२५॥


 यावान्त्यश्चैव तारास्तास्तावन्तो वातरश्मयः ।
 सर्वे ध्रुवे निबद्धास्ते भ्रमन्तो भ्रामयन्ति तम् ॥ २६ ॥

जितकी तारांगणे आहेत तितक्याच वायुमयीं दोर्‍या आहेत. त्या दोर्‍यांनी बद्ध ते सर्व स्वयं फिरतात आणि ध्रुवला देखील फिरवत राहतात ॥२६॥


 तैलपीडा यथा चक्रं भ्रमन्तो भ्रामयन्ति वै ।
 तथा भ्रमन्ति ज्योतींषि वातविद्धानि सर्वशः ॥ २७ ॥

ज्या प्रकारे तेली लोक स्वतः फिरत फिरत कोल्हूसुद्धा फिरवत राहतात त्याच प्रकारे समस्त ग्रहगण वायुने बद्ध होऊन फिरत राहतात ॥२७॥

 

 अलातचक्रवद्यान्ति वातचक्रेरितानि तु ।
 यस्माज्ज्योतींषि वहति प्रवहस्तेन स स्मृतः ॥ २८ ॥

कारण ह्या इस वायुचक्राने प्रेरित होऊन समस्त ग्रहगण अलातचक्रा समान फिरतात, म्हणून ह्याला 'प्रवह' म्हणतात ॥२८॥



 शिशुमारस्तु यः प्रोक्तः स ध्रुवो यत्र तिष्ठति ।
 सन्निवेशं च तस्यापि शृणुष्व मुनिसत्तम ॥ २९ ॥

ज्या शिशुमारचक्राचे आधी वर्णन केलेले, तसेच जिथे ध्रुव स्थित आहे . हे मुनिश्रेष्ठा ! आता तु त्या स्थितिचे वर्णन ऐक ॥२९॥


 यदह्ना कुरुते पापं तं दृष्ट्‍वा निशि मुच्यते ।
 यावन्त्यश्चैव तारास्ताः शिशुमाराश्रिता दिवि ।
 तावन्त्येव तु वर्षाणि जीवत्यभ्यधिकानि च ॥ ३० ॥

रात्रिच्या वेळी त्याचे दर्शन केल्याने मनुष्य दिवसा जे काही पापकर्म करतो त्यापासून मुक्त होतो आणि आकाश मण्डळात जितके तारे ह्याच्या आश्रित आहेत तितकी अधिक वर्ष तो जीवित राहतो ॥३०॥


 उत्तानपादस्तस्याधो विज्ञेयो ह्युत्तरो हनुः ।
 यज्ञोऽधरश्च विज्ञेयो धर्मो मूर्धानमाश्रितः ॥ ३१ ॥

उत्तानपाद त्याची वरची हनुवटी आहे आणि यज्ञ खालची, तसेच धर्माने त्याच्या मस्तकावर अधिकार केलेला आहे ॥३१॥


 हृदि नारायणश्चास्ते अश्विनौ पूर्वपादयोः ।
 वरुणश्चार्यमा चैव पश्चिमे तस्य सक्थिनी ॥ ३२ ॥

त्याच्या हृदय-प्रदेशात नारायण, दोन्ही चरणांत अश्विनीकुमार आणि जांघांमध्ये वरुण आणि अर्यमा आहेत ॥३२॥

 

 


शिश्नः संवत्सरस्तस्य मित्रोऽपानं समाश्रितः ॥ ३३ ॥

पुच्छेग्निश्च महेन्द्रश्च कस्यपोथ ततो ध्रुवः ।
तारका शिशुमारस्य नास्तमेति चतुष्टयम् ॥ ३४ ॥

संवत्सर त्याचे शिश्न आहे, मित्राने त्याचा अपान-प्रदेश आश्रित केला आहे, तसेच अग्नि, महेन्द्र, कश्यप आणि ध्रुव पुच्छभागी स्थित आहेत . शिशुमारच्या पुच्छभागी स्थित हे अग्नि आदि चार तारे कधीच अस्त होत नाहीत ॥३३-३४॥


 


इत्येष सन्निवेशोऽयं पृथिव्या ज्योतिषां तथा ।
द्वीपानामुदधीनां च पर्वतानां च कीर्तितः ॥ ३५ ॥

वर्षाणां च नदीनां च ये च तेषु वसन्ति वै ।
तेषां स्वरूपमाख्यातं संक्षेपः श्रुयतां पुनः ॥ ३६ ॥

अशा प्रकारे मी तुला पृथ्वी, ग्रहगण, द्वीप, समुद्र, पर्वत, वर्ष आणि नद्यांचे तसेच त्यांच्यात जे जे निवास करतात त्या सर्वांच्या स्वरूपाचे वर्णन केले. आता हे संक्षेपात परत ऐक ॥३५-३६॥



यदम्बु वैष्णवः कायस्ततो विप्र वसुन्धरा ।
पद्माकारा समुद्‍भूता पर्वताब्ध्यादिसंयुता ॥ ३७ ॥

हे विप्रा ! भगवान श्रीविष्णुचे जे मूर्तरूप जल आहे त्यापासून पर्वत आणि समुद्रादि सहित कमळा समान आकाराची पृथ्वी उप्तन्न झालि ॥३७॥

 


 ज्योतींषि विष्णुर्भुवनानि विष्णु-र्वनानि विष्णुर्गिरयो दिशश्च ।
 नद्यः समुद्राश्च स एव सर्वं यदस्ति यन्नास्ति च विप्रवर्य ॥ ३८ ॥

हे विप्रवरा ! तारागण, त्रिभुवन, वन पर्वत, दिशा, नद्या आणि समुद्र सर्वकाही भगवान श्रीविष्णुच आहे, तसेच आणखीही जे काही आहे किंवा जे नाही ते सर्व सुद्धा एकमात्र श्रीविष्णूच आहे ॥३८॥


 ज्ञानस्वरूपो भगवान्यतोसा-वशेषमूर्तिर्न तु वस्तुभूतः ।
 ततो हि शैलाब्धिधरादिभेदा- ञ्जानीहि विज्ञानविजृम्भितानि ॥ ३९ ॥

कारण श्रीविष्णु ज्ञानस्वरूप असल्याने तो सर्वमय आहे, परिच्छिन्न पदार्थाकार नाही . म्हणून हे पर्वतः समुद्र आणि पृथ्वी असे भेद म्हणजे केवळ विज्ञानाचा विलास आहे हे समजून घे ॥३९॥

 


 यदा तु शुद्धं निजरूपि सर्वं कर्मक्षये ज्ञानमपास्तदोषम् ।
 तदा हि संकल्पतरोः फलानि भवन्ति नो वस्तुषु वस्तुभेदाः ॥ ४० ॥

ज्यावेळी जीव आत्मज्ञाना द्वारा दोषरहित होऊन सम्पूर्ण कर्मांचा क्षय झाल्याने आपल्या शुद्ध-स्वरूपात स्थित होतो तेव्हा आत्मवस्तुत संकल्पवृक्षाच्या फलरूप पदार्थ-भेदांची प्रतीति नाहीं होत ॥४०॥

 


वस्त्वस्ति किं कुत्राचिदादिमध्य-
पर्यन्तहीनं सततैकरूपम् ।
यच्चान्यथात्वं द्विज याति भूयो न तत्तथा तत्र कुतो हि तत्त्वम् ॥ ४१ ॥

हे द्विजा ! घटादि कोणतिही वस्तु आहेच कुठे ? फक्त आदि, मध्य आणि अन्त रहित नित्य एकरूप चित सर्वत्र व्याप्त आहे. जी वस्तु सारखी बदलत राहते, पूर्ववत नाही राहत त्यात कोणती वास्तविकता ? ॥४१॥


 मही घटत्वं घटतः कपालिका कपालिकाचूर्णरजस्ततोऽणुः ।
 जनैः स्वकर्मस्तिमितात्मनिश्चयै- रालक्ष्यते ब्रूहि किमत्र वस्तु ॥ ४२ ॥

बघ, मृत्तिकाच घटरूप होते आणि मग त्याच घटापासून कपाल, कपालापासून चरणरज आणि रजापासून अणुरूप होते. तर मग आपल्या कर्मात वशीभूत झालेल्या मनुष्याला आत्मस्वरूप विसरून ह्यात कोणती सत्य वस्तु दिसते? ॥४२॥

 

 


तस्मान्न विज्ञानमृतेऽस्ति किञ्चित्- क्वचित्कदाचिद्‌द्विज वस्तुजातम् ।

विज्ञानमेकं इजकर्मभेद-विभिन्नचित्तैर्बहुधाभ्युपेतम् ॥ ४३ ॥

 म्हणून हे द्विजा ! विज्ञाना व्यतिरिक्त कधीच कुठेच कोणतेही पदार्थादि नाहित. आपआपल्या कर्मांच्या भेदामुळे भिन्न-भिन्न चित्तां द्वारा एकच विज्ञान नाना प्रकारचे मानले गेले आहे ॥४३॥

 

ज्ञानं विशुद्धं विमलं विशोक- मशेषलोभादिनिरस्तसङ्‍गम् ।
 एकं सदैकं परमः परेशः स वासुदेवो न यतोऽन्यदस्ति ॥ ४४ ॥

ते विज्ञान अति विशुद्ध, निर्मल, निःशोक आणि लोभादि समस्त दोषांपासून रहित आहे . तेच एक सत्स्वरूप परम परमेश्वर वासुदेव आहे, ज्याच्या शिवाय इतर कोणताही पदार्थ नाहि ॥४४॥

 


 सद्‍भाव एवं भवतो मयोक्तो ज्ञानं यथा सत्यमसत्यमन्यत् ।
 एतत्तु यत्संव्यवहारभूतं तत्रापि चोक्तं भुवनाश्रितं ते ॥ ४५ ॥

अशा प्रकारे मी तुला ह्या परमार्थाचे वर्णन केले, केवळ एक ज्ञानच सत्य आहे, त्या व्यतिरिक्त इतर सर्व असत्य आहे . ह्या शिवाय जे केवळ व्यवहार मात्र आहे त्या त्रिभुवना विषयी सुद्धा मी तुला सांगितले आहे ॥४५॥


 यज्ञः पशुर्वह्निरशेषऋत्विक् सोमः सुराः स्वर्गमयश्च कामः ।
 इत्यादिकर्माश्रितमार्गदृष्टं भूरादिभोगाश्च फलानि तेषाम् ॥ ४६ ॥

ह्या ज्ञानमार्गा व्यतिरिक्त मी कर्म-मार्ग सम्बन्धी यज्ञ, पशु, वह्नि, समस्त ऋत्विक्, सोम, सुरगण तथा स्वर्गमय कामना आदिंचे सुद्धा दिग्दर्शन केले . भूर्लोकादिचे सम्पूर्ण भोग ह्या कर्म-कलापाचेच फळ आहे ॥४६॥

 


 यच्चैतद्‍भुवनगतं मया तवोक्तं सर्वत्र व्रजति हि तत्र कर्मवश्यः ।
 ज्ञात्वैवं ध्रुवमचलं सदैकरूपं तत्कुर्याद्विशति हि येन वासुदेवम् ॥ ४७ ॥

हे जे मी तुला त्रिभुवनगत लोकांचे वर्णन केले त्यात जीव कर्मवश फिरत राहतो असे समजून त्यातून विरक्त व्हावे, मनुष्याने तेच करावे ज्यामुळे तो ध्रुव, अचल आणि सदा एकरूप भगवान वासुदेवात लीन होईल ॥४७॥

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे द्वादशोऽध्यायः (१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...