॥
विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः
अंशः ॥
चतुर्थोऽध्यायः ॥
प्लक्ष आणि शाल्मल आदि
द्वीपांचे विशेष वर्णन
श्रीपराशर उवाच
क्षारोदेन यथा द्वीपो जम्बूसंज्ञोऽभिवेष्टितः ।
संवेष्ट्य क्षारमुदधिं प्लक्षद्वीपस्तथा स्थितः ॥ १ ॥
पराशर
म्हणाले -
ज्या
प्रकारे जम्बूद्वीप क्षारसमुद्राने घेरलेला आहे त्याच प्रकारे क्षारसमुद्राला
घेरून प्लक्षद्वीप स्थित आहे .
जम्बूद्वीपस्य विस्तारः शतसाहस्रसंमितः ।
स एवं द्विगुणो ब्रह्मन्
प्लक्षद्वीप उदाहृतः ॥ २ ॥
जम्बूद्वीपाचा
विस्तार एक लक्ष योजने आहे; आणि हे ब्रह्मन ! प्लक्षद्वीपाचा त्याहून दुप्पट आहे असे म्हटले
जाते .
सप्त मेधातिथेः पुत्राः
प्लक्षद्वीपेश्वरस्य वै ।
ज्येष्ठ शान्तहयो नाम
शिशिरस्तदनन्तरः ॥ ३ ॥
प्लक्शद्वीपाचा
स्वामी मेधातिथिला याला सात पुत्र झाले. त्यांतील सर्वात मोठा शान्तहय होता आणि
त्यानंतरचा शिशिर .
सुखोदयस्तथानन्दः शिवः
क्षेमक एव च ।
ध्रुवश्च सप्तमस्तेषां
प्लक्षद्वीपेश्वरा हि ते ॥ ४ ॥
त्यानन्तर
क्रमशः सुखोदय, आनन्द, शिव आणि
क्षेमक होते व सातवा
ध्रुव होता .
हे सर्व
प्लक्षद्वीपाचे अधीश्वर झाले .
पूर्वं शान्तहयं वर्षं
शिशिरं च सुखं तथा ।
आनन्दं च शिवं चैव क्षेमकं
ध्रुवमेव च ॥ ५ ॥
(त्यांच्या
आपआपल्या अधिकृत वर्षांमध्ये) प्रथम शान्तहयवर्ष आहे तसेच अन्य शिशिरवर्ष, सुखोदयवर्ष, आनन्दवर्ष, शिववर्ष, क्षेमकवर्ष
आणि ध्रुववर्ष आहेत.
मर्यादाकारकास्तेषां
तथान्ये वर्षपर्वताः ।
सप्तैव तेषां नामानि
शृणुष्व मुनिसत्तम ॥ ६ ॥
तसेच
त्या वर्षांची मर्यादा निश्चित करणारे अन्य सात पर्वत आहेत . हे मुनिश्रेष्ठा ! त्यांची नावे ऐक .
गोमदेश्चैव चन्द्रश्च नारदो दुन्दुभिस्तथा ।
सोमकः सुमनाश्चैव वैभ्राजश्चैव सप्तमः ॥ ७ ॥
गोमेद, चन्द्र, नारद, दुन्दुभि, सोमक, सुमना
आणि सातवा वैभ्राज .
वर्षाचलेषु रम्येषु वर्षेष्वेतेषु चानघाः ।
वसन्ति देवगन्धर्वसहिताः सततं प्रजाः ॥ ८ ॥
ह्या अति
सुरम्य वर्ष-पर्वतांवर आणि वर्षांमध्ये देवता आणि गन्धर्व सहित सदा निष्पाप प्रजा
निवास करते .
तेषु
पुण्या जनपदाश्चिराच्च म्रियते जनः ।
नाधयो व्याधयो वापि सर्वकालसुखं हि तत् ॥ ९ ॥
तेथील
निवासीगण पुण्यवान असतात आणि ते चिरकाळापर्यंत जीवित राहून मृत्यु पावतात; त्यांना
कोणत्याही प्रकरची अधिव्याधि होत नाही, तिथे निरन्तर
सुखाचा वास असतो .
तेषां नद्यस्तु सप्तैव
वर्षाणां च समुद्रगाः ।
नामतस्ताः प्रवक्ष्यामि
श्रुताः पापं हरन्ति याः ॥ १० ॥
त्या वर्षांच्या
सातच समुद्रगामिनी नद्या आहेत. त्यांची नावे मी तुला सांगतो ज्यांच्या केवळ
श्रवणाने पाप दूर होतात.
अनुतप्ता शिखी चैव विपाशा
त्रिदिवाक्लमा ।
अमृता सुकृता चैव
सप्तैतास्तत्र निम्नगाः ॥ ११ ॥
तिथे
अनुतत्पा, शिखी, विपाशी , त्रिदिवा, अक्लमा, अम्रुता
आणि सुकृता ह्याच सात नद्या आहेत .
एते शैलास्तथा नद्यः
प्रधानाः कथितास्तव ।
क्षुद्रशैलास्तथा
नद्यस्तत्र सन्ति सहस्रशः ।
ताः पिबन्ति सदा हृष्टा
नदीर्जनपदास्तुते ॥ १२ ॥
हे मी
तुला प्रधान पर्वत आणि नद्यांचे वर्णन केले आहे; तिथे
आणखीनही हजारो छोटे-छोटे पर्वत आणि नद्या आहेत . त्या
देशातील हृष्ट-पृष्ट लोक सदैव त्या नद्यांचे जलपान करतात .
अपसर्पिणी न तेषां वै न
चैवोत्सर्पिणी द्विज ।
न त्वेवास्ति युगावस्था तेषु स्थानेषु सप्तसु ॥ १३ ॥
हे
द्विजा ! त्या लोकांमध्ये ह्रास अथवा वॄद्धि होत नाही आणि त्या सात वर्षांमध्ये
युगांची कोणतीही अवस्था नाही .
त्रेतायुगसमः कालः सर्वदैव
महामते ।
प्लक्षद्वीपादिषु
ब्रह्मञ्छाकद्वीपान्तिकेषु वै ॥ १४ ॥
हे
महामते ! हे ब्रह्मन् ! प्लक्षद्वीपा पासून शाकद्वीपा पर्यन्त सहाही द्वीपांमध्ये
सदैव त्रेतायुगासारखाच काळ असतो .
पञ्च वर्षसहस्राणि जना
जीवन्त्यनामयाः ।
धर्मः पञ्च तथैतेषु
वर्णाश्रमविभागशः ॥ १५ ॥
ह्या
द्वीपातील माणसं सदा नीरोगी राहून पाच हजार वर्षांपर्यंत जगतात आणि त्यांच्यात
वर्णाश्रम-विभागानुसार पाचही धर्म (अहिंसा , सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य
आणि अपरिग्रह) वर्तमान आहेत .
वर्णाश्च तत्र चत्वारस्तान्निबोध वदामि ते ॥ १६ ॥
तिथे जे
चार वर्ण आहेत त्याबद्दल मी तुला आता सांगतो .
आर्यकाः कुरराश्चैव विदिश्या भाविनश्च ते ।
विप्रक्षत्रिवैश्यास्ते
शूद्राश्च मुनिसत्तम ॥ १७ ॥
हे
मुनिसत्तमा ! त्या द्वीपात ज्या आर्यक, कुरर, विदिश्य
आणि भावी नामक जाती आहेत; तेच क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शुद्र आहेत .
जम्बूवृक्षप्रमाणस्तु तन्मध्ये सुमहांस्तरुः ।
प्लक्षस्तन्नामसंज्ञोऽयं प्लक्षद्वीपो द्विजोत्तम ॥ १८ ॥
हे
द्विजोत्तमा ! त्यातच जम्बूवृक्षा इतकेच परिमाण असलेला एक प्लक्षवृक्ष आहे, ज्याच्या
नावामुळेच त्या द्वीपाला प्लक्षद्वीप नाव पडले .
इज्यते तत्र भगवांस्तैर्वर्णैरार्यकादिभिः ।
सीमरूपि जगत्स्त्रष्टा सर्वः सर्वेश्वरो हरिः ॥ १९ ॥
तिथे
आर्यक आदि वर्णांच्या द्वारे जगत्स्त्रष्टा, सर्वरूप, सर्वेश्वर
भगवंत हरिचे सोमरूपाने यजन केले जाते .
प्लक्षद्वीपप्रमाणेन प्लक्षद्वीपः समावृतः ।
तथैवेक्षुरमोदेन परिवेषानुकारिणा ॥ २० ॥
प्लक्षद्वीप
आपल्याच परिमाणाइतक्या वृत्ताकार इक्षुरसाच्या समुद्राने घेरलेला आहे .
इत्येवं तव मैत्रेय प्लक्षद्वीप उदाहृतः ।
संक्षेपेण मया भूयः शाल्मलं मे निशामय ॥ २१ ॥
हे
मैत्रेया ! ह्या प्रकारे मी तुला संक्षेपात प्लक्षद्वीपाचे वर्णन केले, आता तू शाल्मलद्वीपाचे
वर्णन ऐक .
शाल्मलस्येश्वरो वीरो
वपुष्मांस्तत्सुताञ्छृणु ।
तेषां तु नामसंज्ञानि
सप्तवर्षाणि तानि वै ॥ २२ ॥
श्वेतोऽथ हरितश्चैव जीमूतो
रोहितस्तथा ।
वैद्युतो मानसश्चैव सुप्रभश्च महामुने ॥ २३ ॥
शाल्मलद्वीपाचा
स्वामी वीरवर वपुष्मान होता. हे महामुने त्याच्या पुत्रांची नावे - श्वेत, हरित, जीमूत, रोहित, वैद्युत, मानस आणि
सुप्रभ अशी होती. त्यांची सात वर्ष त्यांच्याच नावानुसार होती .
शाल्मलेन समुद्रोऽसौ द्वीपेनेक्षुरसोदकः ।
विस्तारद्विगुणेनाथ सर्वतः संवृतः स्थितः ॥ २४ ॥
हा
(प्लक्षद्वीपाला घेरणारा) इक्षुरसाचा समुद्र आपल्याहून दुप्पट विस्ताराच्या ह्या
शाल्मलद्विपाने चारही बाजूंनी घेरलेला आहे .
तत्रापि पर्वताः सप्त विज्ञेया रत्नयोनयः ।
वर्षाभिव्यञ्जका ये तु तथा सप्त च निम्नगाः ॥ २५ ॥
तिथेही
रत्नांचे उद्भवस्थान असे सात पर्वत आहेत जे त्या सातही वर्षांचा विभाग करतात तसेच
सात नद्या आहेत .
कुमुदश्चचोन्नतश्चैव तृतीयश्च बलाहकः ।
द्रोणो यत्र महौषध्यः स चतुर्थो महीधरः ॥ २६ ॥
पर्वतांपैकी
पहिला कुमुद, दुसरा उन्नत, तीसरा बलाहक तसेच चौथा द्रोणाचल आहे, ज्यावर
नाना प्रकारच्या महाऔषधी आहेत .
कङ्कस्तु पञ्चमः षष्ठो
महिषः सप्तमस्तथा ।
ककुद्मान्पर्वतवरः
सरिन्नामानि मे शृणु ॥ २७ ॥
पाचवा
कंक, सहावा महिष आणि सातवा पर्वत कुकुद्यान
आहे . आता नद्यांची नावे ऐक .
योनिस्तोया वितृष्णा च
चन्द्रा मुक्ता विमोचनी ।
निवृत्तिः सप्तमी तासां
स्मृतास्ताः पापशान्तिदाः ॥ २८ ॥
त्यांची
नावे योनि, तोया, वितृष्णा, चन्द्रा, मुक्ता, विमोचनी
आणि निवृत्ति आहेत आणि त्यांचे केवळ स्मरण केल्याने सर्व पाप शांत करणार्या आहेत .
श्वेतञ्च हरितं चैव
वैद्युतं मानसं तथा ।
जीमूतं रोहितं चैव सुप्रभं
चापि शोभनम् ।
सप्तैतानि तु वर्षाणि
चातुर्वर्ण्ययुतानि वै ॥ २९ ॥
श्वेत, हरित,वैद्युत, मानस
जीमूत रोहित आणि अति शोभायमान सुप्रभ ही त्याची चारही वर्णांनी युक्त सात वर्ष
आहेत.
शाल्मले
ये तु वर्णाश्च वसन्त्येते महामुने ।
कपिलाश्चारुणाः पीताः कृष्णाश्चैव पृथक् पृथक् ॥ ३० ॥
ब्रह्मणाः क्षत्रया वैश्याः शुद्राश्चैव यजन्ति तम् ।
भगवन्तं समस्तस्य विष्णुमात्मानमव्ययम् ।
वायुभूतं
मखश्रेष्ठैर्यज्वानो यज्ञसंस्थितिम् ॥ ३१ ॥
हे
महामुने ! शाल्मलद्वीपात कपिल, अरुण, पति आणि
कृष्ण हे चार वर्ण निवास करतात जे क्रमशः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शूद्र आहेत. हे यजनशील लोक सर्वांचाच आत्मा, अव्यय
आणि यज्ञाचा आश्रय असलेल्या वायुरूप विष्णुभगवानाचे श्रेष्ठ यज्ञाद्वारा यजन करतात
.
देवानामत्र सान्निध्यमतीव
सुमनोहरे ।
शाल्मलिः सुमहान्वृक्षो नाम्ना निर्वृतिकारकः ॥ ३२ ॥
ह्या
अत्यन्त मनोहर द्वीपात देवगण सदैव विराजमान असतात . इथे शाल्मलचा एक महान वृक्ष
आहे जो आपल्या नावानेच अत्यन्त शान्तिदायक आहे .
एष
द्वीपः समुद्रेण सुरोदेन समावृतः ।
विस्ताराच्छाल्मलस्यैव समेन तु समन्ततः ॥ ३३ ॥
हा द्वीप
आपल्या सारखाच विस्तार असलेल्या एका मदिरेच्या समुद्राने सर्व बाजूंनी पूर्णपणे
घेरलेला आहे .
सुरोदकः
परिवृतः कुशद्वीपेन सर्वतः ।
शाल्मलस्य तु विस्तराद् द्विगुणेन समन्ततः ॥ ३४ ॥
आणि हा
सुरासमुद्र शाल्मलद्वीपा पेक्षा दुप्पट विस्तार असलेल्या कुशद्वीप द्वारा सर्व
बाजूंनी घेरलेला आहे .
ज्योतिष्मतः कुशद्वीपे सप्त
पुत्राञ्छृणुष्व तान् ॥ ३५ ॥
उद्भिदो वेणुमांश्चैव
वेरथो लम्बनो धृतिः ।
प्रभाकरोऽथ कपिलस्तन्नामा
वर्षपद्धतिः ॥ ३६ ॥
कुशद्वीपाच्या
(तेथील अधिपति) ज्योतिष्मानाला सात पुत्र होते, त्यांची
नावे उद्भिद, वेणुमान, व्रैरथ, लम्बन, धृति, प्रभाकर
आणि कपिल. त्यांच्याच नावानुसार तेथील वर्षांची नावे आहेत .
तस्मिन्वसन्ति मनुजाः सह
दैतेयदानवैः ।
तथैव
देवगन्धर्वयक्षकिम्पुरुषादयः ॥ ३७ ॥
तिथे
दैत्य आणि दानवां सहित मनुष्य तथा देव, गन्धर्व, यक्ष, आणि किन्नर
आदि निवास करतात .
वर्णास्तत्रापि चत्वारो
निजानुष्ठानतत्पराः ।
दमिनः शुष्मिणः स्नेहा
मन्देहाश्च महामुने ॥ ३८ ॥
ब्रह्मणाः क्षत्रिया
वैश्याः शूद्राश्चानुक्रमोदिताः ॥ ३९ ॥
हे
महामुने ! तिथे देखील आपआपल्या कर्मात तत्पर दमी, शुष्मी, स्त्रेह
आणि मन्देह नामक चार वर्ण आहेत, जे
क्रमशः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शूद्रच आहेत .
यथोक्तकर्मकर्तृत्वात्स्वाधिकारोक्षयाय ते ।
तत्रैव तं कुशद्वीपे ब्रह्मरूपं जनार्दनम् ।
यजन्तः क्षपयन्त्युग्रमधिकारफलप्रदम् ॥ ४० ॥
आपल्या
प्रारब्ध क्षया निमित्त शास्रानुकूल कर्म करत तिथे कुशद्वीपातच ते ब्रह्मरूप
जनार्दनाच्या उपासनेद्वारा आपल्या प्रारब्ध फळ देणार्या अति उग्र अहंकाराचा क्षय
करतात .
विद्रुमो हेमशैलश्च
द्युतिमान् पुष्पवांस्तथा ।
कुशशयो हरिश्चैव सप्तमो
मन्दराचलः ॥ ४१ ॥
वर्षाचलास्तु सप्तैते तत्र
द्वीपे महामुने ।
नद्यश्च सप्त तासां तु शृणु
नामान्यनुक्रमात् ॥ ४२ ॥
हे
महामुने ! त्या द्वीपात विद्रुम, हेमशैल, द्युतिमान, पुष्पवान, कुशेशय, हरि आणि
सातवा मन्दराचल, हे सात वर्ष पर्वत आहेत . तसेच तिथे सात
नद्या, आहेत त्यांची क्रमशः नावे ऐक .
धूतपापा शिवा चैव पवित्रा
संमतिस्तथा ।
विद्युदम्भा मही चान्या
सर्वपापहरास्त्विमाः ॥ ४३ ॥
ती नावे
धूतपापा, शिवा, पवित्रा, सम्मति, विद्युत
अम्भा आणि मही अशी आहेत .
ह्या
नद्या सम्पूर्ण पापांचा नाश करणार्या आहेत .
अन्याः सहस्रशस्तत्र
क्षुद्रनद्यस्तथाचलाः ।
कुशद्वीपे कुशस्तम्बः
संज्ञया तस्य तत्स्मृतम् ॥ ४४ ॥
तिथे
आणखी हजारो छोट्या नद्या व पर्वत आहेत . कुशद्वीपात
एक कुशाचे झाड़ आहे . ह्यामुळेच ह्या द्वीपाचे असे नाव पडले आहे .
तत्प्रमाणेन
स द्वीपो घृतोदेन समावृतः ।
घृतोदश्च समुद्रो वै
क्रौञ्चद्वीपेन संवृतः ॥ ४५ ॥
हा द्वीप
इपल्या एवढाच विस्तार असलेल्या तुपाच्या समुद्राने घेरलेला आहे आणि हा घृत समुद्र
क्रौञ्चद्वीपाने घेरलेला आहे .
क्रौञ्चद्वीपो महाभाग
श्रुयताञ्चापरो महान् ।
कुशद्वीपस्य विस्ताराद्
द्विगुणो यस्य विस्तरः ॥ ४६ ॥
हे
महाभागा ! आता ह्या क्रौञ्चनावाच्या महाद्वीपा विषयी ऐक, ज्याचा
विस्तार कुशद्वीपाहून दुप्पट आहे .
क्रौञ्चद्वीपे द्युतिमतः
पुत्रास्तस्य महात्मनः ।
तन्नामानि च वर्षाणि तेषां
चक्रे महीपतिः ॥ ४७ ॥
क्रौञ्चद्वीपाच्या
महात्मा द्युतिमानाचे जे पुत्र थे; त्यांच्या
नावानुसार महाराज द्युतिमानाने त्यांच्या वर्षांची नावे ठेवली .
कुशलो मन्दगश्चोष्णः
पीवरोथान्धकारकः ।
मुनिश्च दुन्दुभिश्चैव सप्तैते तत्सुता मुने ॥ ४८ ॥
हे मुने
! त्यांना कुशल, मन्दग, उष्ण, पीवर, अन्धकारक, मुनि आणि
दुन्दुभि असे सात पुत्र होते .
तत्रापि देवगन्धर्वसेविताः
सुमनोहराः ।
वर्षाचला महाबुद्धे तेषां
नामानि मे शृणु ॥ ४९ ॥
तिथे
देखील देवता आणि गन्धर्वांनी सेवित अति मनोहर सात वर्षपर्वत आहेत .
हे
महाबुद्धे ! त्यांची नावे ऐक .
क्रौञ्चश्च वामनश्चैव
तृतीयश्चान्धकारकः ।
चतुर्थो रत्नशैलश्च
स्वाहिनी हयसन्निभः ॥ ५० ॥
दिवावृत्पञ्चमश्चात्र
तथान्यः पुण्डरीकवान् ।
दुन्दुभिश्च महाशैलो
द्विगुणास्ते परस्परम् ।
द्वीपा द्वीपेषु ये शैला
यथा द्वीपानि ते तथा ॥ ५१ ॥
त्यांच्यात
पहिला क्रौञ्च, दुसरा वामन, तिसरा
अन्धकारक, चौथा अश्वमुखा समान रत्नमय स्वाहिनी
पर्वत, पाचवा दिवावृत्, सहावा पुण्डरेकवान् आणि सातवा महापर्वत दुन्दुभि आहे . ते द्वीप परस्पर एक
दुसर्याच्या दुप्पट आहेत आणि त्यांच्याच
सारखे त्यांचे पर्वत सुद्धा उत्तरोत्तर द्विगुण आहेत .
वर्षेष्वेतेषु रम्येषु तथा
शैलवरेषु च ।
निवसन्ति निरातङ्काः सह
देवगणैः प्रजाः ॥ ५२ ॥
ह्या
रम्य वर्षांमध्ये आणि पर्वतश्रेष्ठांमध्ये देवगणां सहित सम्पूर्ण प्रजा निर्भय
होऊन राहते .
पुष्कराः पुष्कला
धन्यास्तिष्याख्याश्च महामुने ।
ब्रह्मणाः क्षत्रिया
वैश्याः शुद्राश्चानुक्रमोदिताः ॥ ५३ ॥
हे
महामुने ! तेथील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
आणि शुद्र क्रमाने पुष्कर, पुष्कल, धन्य आणि
तिष्य म्हणून ओळखले जातात .
नदीर्मैत्रेय ते तत्र याः
पिबन्ति शृणुष्व ताः ।
सप्तप्रधानाः
शतशस्तत्रान्याः क्षुद्रनिम्नगाः ॥ ५४ ॥
हे
मैत्रेया ! तिथे ज्यांचे जल पान केले जाते त्या नद्यांचे वर्णन ऐक . त्या द्वीपात
सात प्रधान तथा अन्य शेकडो क्षुद्र नद्या आहेत .
गौरी
कुमुद्वती चैव सन्ध्या रात्रिर्मनोजवा ।
क्षान्तिश्च पुण्डरीका च सप्तैता वर्षनिम्नगाः ॥ ५५ ॥
त्या सात
वर्षनद्या गौरी, कुमुद्वती, सन्ध्या, रात्री, मनोजवा, क्षान्ति आणि पुण्डरीका
आहेत .
तत्रापि
विष्णुर्भगवान्पुष्काराद्यैर्जानार्दनः ।
यागै रुद्रस्वरूपश्च इज्यते
यज्ञसन्निधौ ॥ ५६ ॥
तिथे
सुद्धा रुद्ररूपी जनार्दन भगवान विष्णुची पुष्करादि वर्णां द्वारा यज्ञादि द्वारा
पूजा केली जाते .
क्रौञ्चद्वीपः समुद्रेण
दधिमण्डोदकेन च ।
आवृतः सर्वतः
क्रौञ्चद्वीपतुल्येन मानतः ॥ ५७ ॥
हा क्रौञ्चद्वीप चारही बाजूंनी आपल्या सारखे परिमाण असलेल्या दह्याच्या समुद्राने घेरलेला आहे .
दधिमण्डोदकश्चापि
शाकद्वीपेन संवृतः ।
क्रौञ्चद्वीपस्य विस्ताराद्
द्विगुणेन महामुने ॥ ५८ ॥
आणि हे
महामुने ! हा दधि समुद्र देखील शाकद्वीपाने घेरलेला आहे, ज्याचा
विस्तार क्रौञ्चद्वीपाच्या दुप्पट आहे .
शाकद्वीपेश्वरस्यापि
भव्यस्य सुमहात्मनः ।
सप्तैव तनयास्तेषां ददौ
वर्षाणि सप्त सः ॥ ५९ ॥
शाकद्वीपाचा
राजा महात्मा भव्य ह्याला सुद्धा सातच पुत्र होते . त्यांना देखील त्याने वेगवेगळी
सात वर्षे दिली .
जलदश्च
कुमारश्च सुकुमारो मरीचकः ।
कुसुमोदश्च मौदाकिः सप्तमश्च महाद्रुमः ॥ ६० ॥
तत्संज्ञान्येव तत्रापि सप्त वर्षाण्यनुक्रमात् ।
तत्रापि पर्वताः सप्त वर्षविच्छेदकारिणः ॥ ६१ ॥
ते सात
पुत्र जलद, कुमार, सुकुमार, मरीचक्र, कुसुमोद, मौदाकि
आणि महाद्रुम थे .
त्यांच्याच
नामानुसार तिथे क्रमशः सात वर्ष आहेत आणि तिथेही वर्षांना विभागणारे सातच पर्वत
आहेत .
पूर्वस्तत्रोदयगिरिर्जलाधारस्तथापरः ।
तथा रैवतकः श्यामस्तथैवास्तगिरिर्द्विज ।
आम्बिकेयस्तथा रम्यः केसरी पर्वतोत्तमः ॥ ६२ ॥
हे
द्विजा ! तिथे पहिला पर्वत उदयाचल व दुसरा जलाधार आहे; तसेच
रैवतक, श्याम, अस्ताचल, आम्बिकेय
आणि अति सुरम्य गिरिश्रेष्ठ केसरी हे अन्य पर्वत आहेत .
शाकस्तत्र महावृक्षः
सिद्धगन्धर्वसेवितः ।
यत्रत्यवातसंस्पार्शादाह्लादो
जायते परः ॥ ६३ ॥
तिथे
सिद्ध आणि गन्धर्वांद्वारा सेवित एक अति महान शाकवृक्ष आहे, ज्याच्या
वायुला स्पर्श करण्याने हृदयात परम आह्लाद उप्तन्न होतो .
तत्र पुण्या
जनपदाश्चातुर्वर्ण्यसमन्विताः ।
नद्यश्चात्र महापुण्याः
सर्वपापभयापहाः ॥ ६४ ॥
सुकुमारी कुमारी च नलिनी
धेनुका च या ।
इक्षुश्च वेणुका चैव गभस्ती
सप्तमी तथा ॥ ६५ ॥
तिथे
चातुर्वर्णाने युक्त अति पवित्र देश आणि समस्त पाप तथा भय दूर करणार्या सुकुमारी, कुमारी, नलिनी, धेनुका, इक्षु, वेणुका
आणि गभस्ती ह्या सात महापवित्र नद्या आहेत .
अन्याश्च
शतशस्तत्र क्षुद्रनद्यो महामुने ।
महीधरास्तथा सन्ति शतशोऽथ सहस्रशः ॥ ६६ ॥
हे
महामुने ! ह्या शिवाय ह्या द्वीपात आणखी शेकडो छोट्या नद्या व हजारो पर्वत आहेत .
ताः
पिबन्ति मुदा युक्ता जलदादिषु ये स्थिताः ।
वर्षषु ते जनपदाः
स्वर्गादभ्येत्य मेदिनीम् ॥ ६७ ॥
स्वर्गसुख
उपभोगून नन्तर ज्यांनी पृथ्वी तळावर येऊन जलद आदि वर्षां मध्ये जन्म ग्रहण केला
आहे ते लोक प्रसन्न होऊन त्यांचे जलपान करतात .
धर्महानिर्न
तेष्वस्ति न सङ्घर्षः परस्परम् ।
मर्यादाव्युत्क्रमो नापि तेषु देशेषु सप्तसु ॥ ६८ ॥
ह्या
सातों वर्षांमध्ये धर्माचा र्हास परस्पर संघर्ष (कलह) अथवा मर्यादेचे उल्लंघन
कधीही होत नाही .
मगाश्च मागधाश्चैव मानसा
मन्दगास्तथा ।
मगा ब्रह्मणभूयिष्ठा मागधाः
क्षत्रियास्तथा ।
वैश्यास्तु मानसास्तेषां
शूद्रास्तेषां तु मन्दगाः ॥ ६९ ॥
तिथे मग, मागध, मानस आणि
मन्दग हे चार वर्ण आहेत . त्यांच्यात
मग हे सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहेत, मागध
क्षत्रिय, मानस वैश्य तसेच मन्दग शुद्र आहेत .
शाकद्वीपे तु तैर्विष्णुः
सूर्यरूपधरो मुने ।
यथोक्तौरिज्यते सम्यक्कर्मभिर्नियतात्मभिः
॥ ७० ॥
हे मुने
! शाकद्वीपात शास्त्रानुकुल कर्म करणार्या पूर्वोक्त चारही वर्णांद्वारा संयत
चित्ताने विधिपूर्वक सूर्यरूपधारी भगवान विष्णुची उपासना केली जाते .
शाकद्वीपस्तु
मैत्रेय क्षिरोदेन समावृतः ।
शाकद्वीपप्रमाणेन वलयेनेव वेष्टितः ॥ ७१ ॥
हे
मैत्रेया ! हा शाकद्वीप आपल्या इतकाच विस्तार असलेल्या मण्डलाकार दुग्ध समुद्राने
घेरलेला आहे .
क्षिराब्धिः सर्वतो ब्रह्मन्पुष्कराख्येन
वेष्टितः ।
द्वीपेन शाकद्वीपात्तु
द्वीगुणेन समन्ततः ॥ ७२ ॥
आणि हे
ब्रह्मन ! हा क्षीरसमुद्र शाकद्वीपाच्या दुप्पट परिमाण असलेल्या पुष्करद्वीपाने
परिवेष्टित आहे .
पुष्करे सवनस्यापि महावीरोऽभवत्सुतः ।
धातुकिश्च तयोस्तत्र द्वे वर्षे नामचिह्निते ।
महावीरं तथैवान्यद्धातुकीखण्डसंज्ञितम् ॥ ७३ ॥
पुष्करद्वीपात
तेथील अधिपति महाराज सवन ह्याला महावीर आणि धातकि नामक दोन पुत्र झाले . म्हणून
त्या दोघांच्या नावानुसार तिथे महावीर-खण्ड आणि धातकी - खण्ड नामक दोन वर्ष आहेत .
एकश्चात्र महाभाग प्रख्यातो वर्षपर्वतः ।
मानासोत्तरसंज्ञो
वै मध्यतो वलयाकृतिः ॥ ७४ ॥
योजनानां
सहस्राणि ऊर्ध्वं पञ्चाशदुच्छ्रितः ।
तावदेव च विस्तीर्णः सर्वतः परिमण्डलः ॥ ७५ ॥
हे
महाभागा ! तिथे मानसोत्तरनामक एकच वर्ष पर्वत असल्याचे सांगितले जाते जो त्या
द्वीपाच्या मध्यावर वलयाकार स्थित आहे आणि पन्नास सहस्त्र योजने ऊंच आणि तितकाच
सर्वबाजूंनी गोलाकार पसरलेला आहे .
पुष्करद्वीपवलयं
मध्येन विभजन्निव ।
स्थितोसौ तेन विछिन्नं जातं तद्वर्षकद्वयम् ॥ ७६ ॥
वलयाकारमेकैकं
तयोर्वर्षं तथा गिरिः ॥ ७७ ॥
हा पर्वत
पुष्करद्वीपरुप गोळ्याला जणू मधोमध विभक्त करत आहे आणि अशा प्रकारे विभक्त
झाल्याने तिथे दोन वर्षे झाली आहेत ; त्यातील
प्रत्येक वर्ष आणि तो पर्वतही वलयाकारच आहे .
दशवर्षसहस्राणि तत्र
जीवन्ति मानवाः ।
विरामया विशोकाश्च
रागद्वेषादिवर्जिताः ॥ ७८ ॥
तिथली
माणसं रोग, शोक आणि राग
द्वेषादिंनी रहित दहा सहस्त्र वर्षांपर्यंत जीवित राहतात .
अधमोत्तमौ न तेष्वास्तां न वध्यवधकौ द्विज ।
नेर्ष्यासूया भयं द्वेषो दोषो लोभादिको न च ॥ ७९ ॥
हे
द्विजा ! त्यांच्यात उत्तम अधम अथवा वध्यवधक आदि विरोधी भाव नाहीत, तसेच त्यांच्यात ईर्ष्या, असूया, भय द्वेष
आणि लोभादि दोष देखील नाहीत .
महावीरं बहिर्वर्षं
धातकीखण्डमन्ततः ।
मानसोत्तरशौलस्य
देवदैत्यादिसेवितम् ॥ ८० ॥
महावीरवर्ष
मानसोत्तर पर्वताच्या बाहेरील बाजूला आणि धातकीखण्ड आतील बाजूला आहे. इथे देव आणि
दैत्य आदि निवास करतात.
सत्यानृतेन तत्रास्तां
द्वीपे पुष्करसंज्ञिते ।
न तत्र नद्यः शैला वा
द्वीपे वर्षद्वयान्विते ॥ ८१ ॥
दोन
खण्डांनी युक्त असलेल्या त्या पुष्करद्वीपात सत्य आणि मिथ्या असे कोणतेच व्यवहार
नाहीत आणि तिथे दुसरे पर्वत व नद्या सुद्धा नाहीत .
तुल्यवेषास्तु मनुजा देवास्तत्रैकरूपिणः ।
वर्णाश्रमाचारहीनं धर्माचरणवर्जितम् ॥ ८२ ॥
त्रयीवार्तादण्डनीतिशुश्रूषारहितञ्च यत् ।
वर्षद्वयं तु मैत्रेय भौमः स्वर्गोऽयमुत्तमः ॥ ८३ ॥
तिथली
माणसं आणि देवगण समान वेष आणि समान रूप असलेले असतात . हे मैत्रेया ! वर्णाश्रम
आचाराने हीन, काम्य कर्मांनी रहित तसेच वेदत्रयी, कृषि, दण्डनीति
आणि शुश्रुषा आदिंनी रहीत अशी ती दोन्ही वर्ष म्हणजे जणू पृथ्वी वरील अत्युत्तम
भौम स्वर्ग आहेत.
सर्वर्तुसुखदः कालो
जरारोगादिवर्जितः ।
धातकीखण्डसंज्ञेऽथ महावीरे
च वै मुने ॥ ८४ ॥
हे मुने ! त्या
महावीर आणि धातकी खण्ड नामक वर्षांमध्ये काळ समस्त ऋतुत सुखदायक आणि जरा तसेच
रोगादिंनी रहित राहतो .
न्यग्रोधः
पुष्करद्वीपे ब्रह्मणः स्थानमुत्तमम् ।
तस्मिन्नवसति ब्रह्मा
पूज्यमानः सुरासुरैः ॥ ८५ ॥
पुष्करद्वीपात
ब्रह्माचे उत्तम निवासस्थान एक न्यग्रोध (वटवृक्ष) आहे, जिथे
देवता आणि दानवादिंनी पूजित श्रीब्रह्मा विराजित आहे .
स्वादूदकेनोदधिना
पुष्करः परिवेष्टितः ।
समेन पुष्करस्यैव
विस्तारान्मण्डलं तथा ॥ ८६ ॥
पुष्करद्वीप
चारही बाजूंनी आपल्याच समान विस्ताराच्या गोड पाण्याच्या समुद्राने मण्डळा समान
घेरलेला आहे .
एवं द्वीपाः समुद्रैश्च
सप्त सप्तभिरावृताः ।
द्वीपश्चैव समुद्रश्च समानो
द्विगुणौ परौ ॥ ८७ ॥
अशा
प्रकारे सातही द्वीप सात समुद्रांनी घेरलेले आहेत आणि ते द्वीप व त्यांना घेरणारे
समुद्र परस्पर समान असून उत्तरोत्तर दुप्पट होत गेले आहेत .
पयांसि सर्वदा
सर्वसमुद्रेषु समानि वै ।
न्यूनातिरिक्तता तेषां
कदाचिन्नैव जायते ॥ ८८ ॥
सर्व समुद्रांमध्ये सदैव समान जल राहते त्यात कधीही कोणतीही न्यूनता किंवा अधिकता निर्माण होत नाही .
स्थालीस्थमग्नीसंयोगादुद्रेकिसलिले यथा ।
तथेन्दुवृद्धौ सलिलमम्भोधौ
मुनिसत्तम ॥ ८९ ॥
हे
मुनिश्रेष्ठा ! पात्रातील जल ज्याप्रकारे अग्निशी संयोग झाल्याने उकळू लागते
त्याचप्रकारे चंद्राच्या कलांमध्ये वाढ होते तेव्हा समुद्राचे जल सुद्धा वाढू
लागते .
अन्यूनानतिरिक्ताश्च
वर्धन्त्यापो ह्रसन्ति च ।
उदयास्तमनेष्विन्दोः
पक्षयोः शुक्लकृष्णयोः ॥ ९० ॥
शुक्ल
आणि कृष्ण पक्षात चंद्राच्या उदय आणि अस्तामुळे न्यूनाधिक न होताही जलात घट आणि
वाढ होते .
दशोत्तराणि पञ्चैव ह्यङ्गुलानां
शतानि वै ।
अपां वृद्धिक्षयौ दृष्टौ
सामुद्रीणां महामुने ॥ ९१ ॥
हे
महामुने ! समुद्रजलाची वृद्धि आणि क्षय पाचशेदहा बोटांपर्यंत पाहिली जाते .
भोजनं पुष्करद्वीपे तत्र
स्वयमुपस्थितम् ।
षड्रसं भुञ्जते विप्र
प्रजाः सर्वाः सदैव हि ॥ ९२ ॥
हे
विप्रा ! पुष्करद्वीपात सम्पूर्ण प्रजा सर्वदा सहज आपोआप प्राप्त झालेल्या षड्रस
भोजनाचा आहार करते .
स्वादूदकस्य
परितो दृश्यते लोकसंस्थितिः ।
द्विगुणा काञ्चनी भूमिः
सर्वजन्तुविवर्जिता ॥ ९३ ॥
स्वाद
उदक असलेल्या समुद्राच्या चारही बाजूला लोकनिवासाने शून्य आणि समस्त जीवांनी रहित
अशी त्याच्यापेक्षा दुप्पट सुवर्णमयी भूमि दिसते .
लोकालोकस्ततश्शैलो
योजनायुतविस्तृतः ।
उच्छ्रायेणापि तावन्ति
सहस्राण्यचलो हि सः ॥ ९४ ॥
तिथे दहा
सहस्त्र योजने विस्ताराचा लोकालोक पर्वत आहे. ह्या पर्वताची ऊंची देखील तितकीच
सहस्त्र योजने आहे .
ततस्तमः
समावृत्य तं शौलं सर्वतः स्थितम् ।
तमश्चाण्डकटाहेन
समन्तात्परिवेष्टितम् ॥ ९५ ॥
त्याच्या
पुढे त्या पर्वताला सर्वबाजूंनी आवृत करणारा घोर अन्धकार पसरलेला आहे, आणि हा अन्धकार
चारही बाजूंनी ब्रह्माण्ड-कटाहाने आवृत आहे.
पञ्चशत्कोटिविस्तारा सेयमुर्वी महामुने ।
सहैवाण्डकटाहेन सद्वीपाब्धिमहीधरा ॥ ९६ ॥
हे
महामुने ! अण्डकटाहा सहित द्वीप, समुद्र आणि पर्वतादियुक्त
हे समस्त भूमण्डल पन्नास करोड़ योजने विस्तार असलेले आहे .
सेयं
धात्री विधात्री च सर्वभूतगुणाधिका ।
आधारभूता सर्वेषां मैत्रेय जगतामिति ॥ ९७ ॥
हे
मैत्रेया ! आकाशादि समस्त भूतांपेक्षा अधिक गुणशाली ही पृथ्वी सम्पुर्ण जगताची
आधारभूता असून त्याचे पालन आणि उद्भव करणारी आहे .
इति श्रीविष्णुपुराणे
द्वितीये अंशे चतुर्थोंऽध्यायः ॥४॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा