॥
विष्णुपुराणम् ॥
द्वितीयः अंशः॥ तृतीयोऽध्यायः ॥
"भारत आदि नऊ खंडांचे विभाग"
श्रीपराशर उवाच
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव
दक्षिणम् ।
वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः
॥ १ ॥
पराशरजी म्हणाले ;– हे मैत्रेया ! जो समुद्राच्या उत्तरेला
तसेच हिमालयाच्या दक्षिणेला स्थित आहे तो देश भारतवर्ष म्हणून
ओळखला जातो. तिथे भरताच्या
सन्तानांचे वास्तव्य आहे .
नवयोजनसाहस्रो विस्तारोऽस्य
महामुने ।
कर्मभूमिरियं स्वर्गमपवर्गं च गच्छताम् ॥
२ ॥
हे महामुने ! त्याचा विस्तार नऊ हजार योजने आहे . हा देश स्वर्ग आणि अपवर्ग प्राप्त करणार्यांची कर्मभूमि आहे .
महेन्द्रो मलयः सह्यः
शुक्तिमानृक्षपर्वतः ।
विन्ध्यश्च पारीयात्रश्च सप्तात्र
कुलपर्वताः ॥ ३ ॥
इथे महेंद्र, मलय, सहय, शुक्तिमान, ऋक्ष, विन्ध्य आणि पारियात्र हे सात कुलपर्वत आहेत .
अतः सम्प्राप्यते स्वर्गो
मुक्तिमस्मात्प्रयान्ति वै ।
तिर्यक्त्वं नरकं चापि यान्त्यतः पुरुषा
मुने ॥ ४ ॥
हे मुने ! ह्याच देशात मनुष्य शुभकर्मांच्या द्वारे स्वर्ग अथवा
मोक्ष प्राप्त करू शकतात आणि इथूनच [पाप-कर्मांत प्रवृत्त
झाल्याने] त्यांना नरक अथवा तिर्यग्योनी प्राप्त होते .
इतः स्वर्गश्च मोक्षश्च मध्यं चान्तश्च गम्यते ।
न खल्वन्यत्र मर्त्यानां कर्म भूमौ
विधीयते ॥ ५ ॥
इथूनच स्वर्ग, मोक्ष, अन्तरिक्ष अथवा पाताल आदि लोकांना प्राप्त करता येते, पृथ्वीवर
ह्याशिवाय इतर कुठेही मनुष्यासाठी कर्माची विधि नाही .
भारतस्यास्य वर्षस्य
नवभेदान्निशामय ।
इद्रद्वीपः कसेरुश्च ताम्रपर्णां
गभस्तिमान् ॥ ६ ॥
नागद्वीपस्तथा सौम्यो गन्धर्वस्त्वथ
वारुणः ।
अयं तु नवमस्तेषां द्वीपः सागारसंवृतः ॥
७ ॥
ह्या भारतवर्षाचे नऊ भाग आहेत; त्यांची नावे ही
आहेत – इंद्रद्वीप, कसेरू, ताम्रपर्ण, गभस्तिमान, नागद्वीप, सौम्य, गन्धर्व आणि वारुण तसेच हा समुद्राने घेरलेला द्वीप नववा आहे.
योजनानां सहस्रं तु द्वीपोऽयं
दक्षिणोत्तरात् ।
पूर्वे किराता यस्यान्ते पश्चिमे यवनाः
स्थिताः ॥ ८ ॥
हा द्वीप उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सहस्त्र योजने आहे. ह्याच्या पुर्व भागात किरात लोक आणि पश्चिम भागात यवनांचे वास्तव्य
आहे .
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्या मध्ये शूद्राश्च भागशः ।
इज्यायुधवणिज्याद्यैर्वर्तयन्तो व्यवस्थिताः ॥ ९ ॥
तसेच यज्ञ, युद्ध आणि व्यापार आदि आपआपल्या कर्मांच्या व्यवस्थेनुसार आचरण
करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र्गण वर्णविभागानुसार मध्यभागात राहतात .
शतद्रूचन्द्रभागाद्या हिमवत्पादनिर्गताः ।
वेदस्मृतिमुखाद्याश्च पारीयात्रोद्भवा मुने ॥ १० ॥
नर्मदा सुरसाद्याश्च नद्यो विन्ध्याद्रिनिर्गताः ।
तापीपयोष्णीनिर्विन्ध्याप्रमुखा ऋक्षसम्भवाः ॥ ११ ॥
हे मुने ! इथे शतद्रु आणि चन्द्रभागा आदि नद्या हिमालयाच्या पायथ्यावरून, वेद आणि स्मृति ह्या नद्या पारियात्र पर्वतावरून, नर्मदा आणि सुरसा आदि विंध्याचलावरून तसेच तापी, पयोष्णी आणि निर्विन्ध्या आदि नद्या ऋक्षगिरी वरून वाहतात .
गोदावरी भीमरथी
कृष्णवेण्यादिकास्तथा ।
सह्यपादोद्भवा नद्यः स्मृताः पापभयापहाः
॥ १२ ॥
गोदावरी, भीमरथी व कृष्णवेणी आदि पापहारिणी नद्या सह्यपर्वतावरून उद्गम पावतात असे सांगितले जाते .
कृतमाला ताम्रपर्णिप्रमुखा मलयोद्भवाः
।
त्रिसामा चार्यकुल्याद्या
महेन्द्रप्रभवाः स्मृताः ॥ १३ ॥
ऋषिकुल्याकुमाराद्याः
शुक्तिमत्पादसम्भवाः ।
आसां नद्युपनद्यश्च सन्त्यन्याश्च
सहस्रशः ॥ १४ ॥
कृतमाला आणि ताम्रपर्णी आदि मलयाचलावरून, त्रिसामा
आणि आर्यकुल्या आदि महेन्द्रगिरीवरून तथा ऋषि कुल्या आणि कुमारी आदि नद्या
शुक्तिमान पर्वतावरून निघतात. ह्यांच्या
आणखीनही सहस्र शाखा नद्या आणि उपनद्या आहेत .
तास्विमे कुरुपाञ्चाला मध्यदेशादयो जनाः ।
पूर्वदेशादिकाश्चैव कामरूपनिवासिनः ॥ १५ ॥
पुण्ड्राः कलिङ्गा मगधा दक्षिणाद्याश्च सर्वशः ।
तथापरान्ताः सौराष्ट्राः
शूराभीरास्तथार्बुदाः ॥ १६ ॥
कारूषा मालवाश्चैव पारियात्रनिवासिनः।
सौवीराः सैन्धवा हूणाः साल्वाः
कोशलवासिनाः ।
माद्रारामास्तथाम्बष्ठाः पारसीकादयस्तथा
॥ १७ ॥
ह्या नद्यांच्या तटावर कुरु, पांचाल आणि
मध्यदेशात राहणारे, पुर्वदेश आणि कामरूपचे निवासी, पुंड्र, कलिंग, मगध आणि
दाक्षिणात्यलोग, अपरांत देशवासी, सौराष्ट्रगण तथा शूर, आभीर
आणि अर्बुदगण, कारुष, मालब आणि पारियात्रनिवासी, सौवीर, सैन्धव, हूण, साल्व
आणि कोशल देशवासी तसेच माद्र, आराम, अम्बष्ठ आणि
पारसीगण राहतात .
आसां पिबन्ति सलिलं वसन्ति सहिताः सदा ।
समीपतो महाभाग हृष्टपुष्टजनाकुलाः ॥ १८ ॥
हे महाभागा ! हे लोक नेहमी आपसात मिळून मिसळून राहतात आणि ह्याच
नद्यांचे जल पान करतात. ह्या नद्यांच्या
सान्निध्यामुळे ते खूप ह्रष्ट-पुष्ट आहेत .
चत्वारि भारते वर्षे युगान्यत्र
महामुने ।
कृतं त्रेता द्वापरञ्च कलिश्चान्यत्र न
क्वचित् ॥ १९ ॥
हे मुने ! ह्या भारतवर्षातच सत्य, त्रेता, द्वापर
आणि कलि नामक चार युग आहेत, अन्यत्र कुठेही नाहीत .
तपस्तप्यन्ति मुनयो जुह्वते चात्र
यज्विनः ।
दानानि चात्र दीयन्ते परलोकार्थमादरात् ॥
२० ॥
ह्या देशात परलोक प्राप्तीसाठी मुनिजन तपस्या करतात, याज्ञिक
लोग यज्ञ अनुष्ठान करतात आणि दानी आदरपूर्वक दान देतात .
पुरुषैर्यज्ञपुरुषो जम्बूद्वीपे सदेज्यते ।
यज्ञैर्यज्ञमयो विष्णुरन्यद्वीपेषु
चान्यथा ॥ २१ ॥
जम्बूद्वीपात यज्ञमय यज्ञपुरुष भगवान विष्णुचे नेहमी यज्ञांद्वारा
यजन केले जाते, ह्या व्यतिरिक्त अन्य द्वीपांमध्ये त्याची वेगवेगळ्या प्रकारे उपासना
होते.
अत्रापि भारतं श्रेष्ठं जम्बूद्वीपे महामुने ।
यतो हि कर्मभूरेषा ह्यतोऽन्या भोगभूमयः ॥
२२ ॥
हे महामुने ! ह्या जम्बुद्वीपापेक्षाही भारतवर्ष सर्वश्रेष्ठ आहे, कारण ही कर्मभूमि
आहे,
ह्या व्यतिरिक्त इतर अन्य देश भोग-भूमी आहेत .
अत्र जन्मसहस्राणां सहस्रैरपि सत्तम ।
कदाचिल्लभते जन्तुर्मानुष्यं पुण्यसञ्चयात् ॥ २३ ॥
हे सत्तमा ! जीवाला सहस्र जन्मांच्या नन्तर महान पुण्यांचा उदय
झाल्यामुळेच ह्या देशात मनुष्य-जन्म प्राप्त होतो .
गायन्ति देवाः किल गीतकानि धन्यास्तु
ते भारत भूमिभागे ।
स्वर्गापवर्गास्पदमार्गभूते भवन्ति
भूयः पुरुषाः सुरत्वात् ॥ २४ ॥
कर्माण्यसंकल्पिततत्फलानि संन्यस्य विष्णो
परमात्म्भूते ।
अवाप्य तां कर्ममहीमनन्ते तस्मिंल्लयं
ये त्वमलाः प्रयान्ति ॥ २५ ॥
जानीम नैतत् क्व वयं विलीने स्वर्गप्रदे
कर्मणि देहबन्धम् ।
प्राप्स्याम धन्याः खलु ते मनुष्या ये
भारते नेन्द्रियविप्रहीनाः ॥ २६ ॥
देवगण सुद्धा निरंतर हेच गायन करतात कि 'ज्यांनी स्वर्ग आणि अपवर्गाच्या मार्गे भारतवर्षात जन्म घेतला आहे ते पुरुष आम्हा देवतांपेक्षाही अधिक भाग्यशाली आहेत. जे लोक ह्या कर्मभूमीत जन्म घेऊन आपली फलरहित कर्मे परमात्मा स्वरूप विष्णुभगवानांना अर्पण केल्याने निर्मल (पापपुण्य रहित) होऊन त्या अनंतातच लीन होतात [ते धन्य आहेत]. ‘माहीत नाही, आमच्या स्वर्गप्रदकर्मांचा क्षय झाल्यावर आम्ही कुठे जन्म ग्रहण करू ! धन्य तर तीच माणसे आहेत जी भारतभूमीत उत्पन्न होऊन इंद्रिय शक्तीहीन नाही झाली’ .
नववर्षं तु मैत्रेय जम्बुद्वीपमिदं मया ।
लक्षयोजनविस्तारं संक्षेपात्कथितं तव ॥ २७ ॥
हे मैत्रेया ! अशा प्रकारे लाख योजन विस्तार असणार्या
नववर्ष-विशिष्ट इस जम्बुद्वीपाचे वर्णन मी तुला संक्षेपात सांगितले .
जम्बूद्वीपं समावृत्य
लक्षयोजनविस्तरः ।
मैत्रेय वलयाकारः स्थितः क्षारोदधिर्बहिः
॥ २८ ॥
हे मैत्रेया ! ह्या जम्बुद्वीपाला चारही
बाजूंनी लाख योजन विस्तार असलेल्या वलयाकार खारट पिण्याच्या समुद्राने
घेरलेले आहे .
"इति श्रीविष्णुपुराणे द्वितिये अंशे
तृतीयोऽध्याय"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा