॥
विष्णुपुराणम् ॥
॥ द्वितीयः अंशः॥ ॥ पञ्चमोऽध्यायः ॥
"सात पाताळ लोकांचे वर्णन"
श्रीपराशर उवाच
विस्तार एष कथितः पृथिव्या भवतो मया ।
सप्ततिस्तु सहस्राणि द्विजोच्छ्रायोपि कथ्यते ॥ १ ॥
पराशर म्हणाले – हे द्विजा ! मी तुला जो पृथ्वीचा विस्तार
सांगितला त्याची ऊंची सुद्धा सत्तर सहस्त्र योजने सांगितलेली आहे.
दशसाहस्रमेकैकं पातालं मुनिसत्तम
।
अतलं वितलं चैव नितलं च गभस्तिमत् ।
महाख्यं सुतलं चाग्र्यं पातालं चापि
सप्तमम् ॥ २ ॥
हे मुनिसत्तमा ! अतल, वितल, नितल, गभस्तिमान, महातल, सुतल
आणि पाताल हे सातही लोक प्रत्येकी दहा दहा सहस्त्र योजनांच्या अंतरावर आहेत .
शुक्लाकृष्णारुणाः पीताः शर्कराः
शैलकाञ्चनाः ।
भूमयो यत्र मैत्रेय परप्रासादमण्डिताः ॥
३ ॥
हे मैत्रेया ! सुंदर महालांनी सुशोभित असलेली तेथील भूमी शुक्ल, कृष्ण, अरुण
आणि पीत वर्णाची तसेच शर्करामयी (बारीक दगडी कण असलेली), शैली
(दगडाळ) सुवर्णमयी आहे .
तेषु दानवदैतेया यक्षाश्च
शतशस्तथा ।
निवसन्ति महानागजातयश्च महामुने ॥ ४ ॥
हे महामुने ! तिथे दानव, दैत्य, यक्ष
आणि मोठमोठे नाग आदिंच्या शेकडो जाती निवास करतात .
स्वर्लोकादपि रम्याणि पातालानीति
नारदः ।
प्राह स्वर्गसदां मध्ये पातालाभ्यागतो
दिवि ॥ ५ ॥
एकदा नारदाने पाताळ लोकातून स्वर्गात येऊन तेथील लोकांना सांगितले
होते की ‘पाताळ स्वर्गाहूनही अधिक सुंदर आहे’ .
आह्लादकारिणः शुभ्रा मणयो यत्र
सुप्रभाः ।
नागाभरणभूषासु पातालं केन तत्समम् ॥ ६ ॥
जिथे नागगणांच्या आभूषणात सुंदर प्रभायुक्त आह्लादकारी शुभ्र मणि
जडले आहेत त्या पाताळाला कोणाच्या समान म्हणावे ? .
दैत्यदानवकन्याभिरितश्चैतश्च
शोभिते ।
पाताले कस्य न प्रीतिर्विमुक्तस्यापि
जायते ॥ ७ ॥
सगळीकडे दैत्य आणि दानवांच्या कन्यांनी सुशोभित पाताळ लोकात कोणत्या
मुक्त पुरुषाचे प्रेम बसणार नाही .
दिवार्करश्मयो यत्र प्रभां
तन्वन्ति नातपम् ।
शशिरश्मिर्न शीताय निशि द्योताय केवलम् ॥
८ ॥
तिथे दिवसा सूर्याची किरणे केवळ प्रकाशितच करतात, घामाघूम
करत नाहीत; तसेच रात्री चन्द्रकिरणे थंडावा देत नाहीत तर, फक्त चांदणेच पसरवतात .
भक्ष्यभोज्यमहापानमुदितैरपि भोगिभिः ।
यत्र न ज्ञायते कालो गतोपि दनुजादिभिः ॥
९ ॥
तिथे भक्ष्य, भोज्य आणि महापानादिंच्या भोगांमुळे आनन्दित सर्प तथा दानवादिंना
सरणार्या काळाचेही भान राहत नाही .
वनानि नद्यो रम्याणि सरांसि
कमलाकराः ।
पुंस्कोकिलाभिलापाश्च मनोज्ञान्यम्बराणि
च ॥ १० ॥
तिथे सुंदर वन, नद्या, रमणीय सरोवर आणि
कमळांची वने आहेत, तिथे नरकोकीळांच्या सुमधुर कूकगुंजनाने आकाश मनोहारी
आहे .
भूषणान्यतिशुभ्राणि गन्धाढ्यं
चानुलेपनम् ।
वीणावेणुमृदङ्गानां स्वनास्तूर्याणि च
द्विज ॥ ११ ॥
एतान्यन्यानि चोदारभाग्यभोग्यानि दानवैः
।
दैत्योरगैश्च भुज्यन्ते पातालान्तरगोचरैः
॥ १२ ॥
आणि हे द्विजा ! तिथे पाताळ निवासी दैत्य, दानव, आणि नागगणद्वारा
अति स्वच्छ आभूषण, सुगंधमय अनुलेपन, वीणा, वेणु आणि
मृंदगादिंचे स्वर तसेच तूर्य – हे सर्व आणि भाग्यशालिंनी भोगण्यायोग्य इतर अनेक
भोग भोगले जातात .
पातालानामधश्चास्ते विष्णोर्या
तामसी तनुः ।
शेषख्या यद्गुणान्वक्तुं न शक्ता
दैत्यदानवाः ॥ १३ ॥
पाताळांच्या खाली भगवान विष्णुचा शेष नामक जो तमोमय विग्रह आहे
त्याच्या गुणांचे दैत्य अथवा दानवगण सुद्धा वर्णन करू शकत नाहीत .
योनन्तः पाठ्यते सिद्धैर्दैवो
देवर्षिपूजितः ।
स सहस्रशिरा व्यक्तस्वस्तिकामलभूषणः ॥ १४
॥
ज्या देवर्षिपूजित देवाचा सिद्धगण ‘अनंत’ म्हणून उल्लेख करतात तो अति निर्मल, स्पष्ट स्वस्तिक
चिन्हांनी विभूषित तथा सहस्त्रशिर आहे .
फणामणिसहस्रेण यः स
विद्योतयन्दिशः ।
सर्वान्करोति निर्वीर्यान् हिताय
जगतोऽसुरान् ॥ १५ ॥
जो अपल्या फणांच्या सहस्त्र मण्यांनी सम्पूर्ण
दिशांना देदीप्यमान करत संसाराच्या कल्याणासाठी समस्त असुरांना वीर्यहीन करत राहतो
.
मदाघूर्णितनेत्रोऽसौ यः
सदैवैककुण्डलः ।
किरिटी स्रग्धरो भाति साग्निः श्वेत
इवाचलः ॥ १६ ॥
मदामुळे अरुणनयन असलेला, सदैव एकच कुंडल
ल्यायलेला तसेच मुकुट व माला आदि धारण केलेला जो अग्नियुक्त श्वेत पर्वता समान
सुशोभित आहे .
नीलवासा मदोत्सिक्तः
श्वेतहारोपशोभितः ।
साभ्रगङ्गाप्रवाहोऽसौ कैलासाद्रिरिवापरः
॥ १७ ॥
मदाने उन्मत्त झाल्याने जो नीलाम्बर तसेच श्वेत हारांनी सुशोभित होऊन
मेघमाला आणि गंगाप्रवाहाने युक्त दुसर्या कैलासपर्वता समान विराजमान आहे .
लाङ्गलासक्तहस्ताग्रो बिभ्रन्मुसलमुत्तमम् ।
उपास्यते स्वयं कान्त्या यो वारुण्या च
मूर्तया ॥ १८ ॥
ज्याने आपल्या हातात हल आणि उत्तम मूसल धारण केले आहे, तसेच ज्याची उपासना शोभा आणि वारुणी देवी स्वयं मूर्तिमती होऊन करतात .
कल्पान्ते यस्य वक्त्रेभ्यो
विषानलशिखोज्ज्वलः ।
संकर्षणात्मको रूद्रो निष्क्रम्यात्ति
जगत्त्रयम् ॥ १९ ॥
कल्पांताच्या वेळी ज्याच्या मुखातून विशाग्निशिखे समान देदीप्यमान
संकर्षण नामक रूद्र बाहेर येतो आणि तिनही लोकांचे भक्षण करतो .
स बिभ्रच्छेखरीभूतमशेषं क्षितिमण्डलम् ।
आस्ते पातालमूलस्थः शेषोऽशेषसुरार्चितः ॥
२० ॥
तो समस्त देवगणांनी वन्दित असा शेषभगवान अशेष भूमंडळाला मुकुटा सारखा
धारण करून पाताळ तळात विराजमान आहे .
तस्य वीर्यं प्रभावश्च स्वरूपं
रूपमेव च ।
न हि वर्णयितुं शक्यं ज्ञातुं च
त्रिदशैरपि ॥ २१ ॥
त्याचे बल-वीर्य, प्रभाव, स्वरूप (तत्त्व)
आणि रूप (आकार) देवतांनाही कधी कळू शकले नाही व सांगितले जाऊ शकत नाही .
यस्यैषा सकला पृथ्वी फणामणिशिखारूणा ।
आस्ते कुसुममालेव कस्तद्वीर्यं वदिष्यति
॥ २२ ॥
ज्याच्या फणांमधील मण्यांच्या प्रकाशामुळे अरुण वर्ण झालेली ही समस्त
पृथ्वी फुलांच्या माळेसारखी ठेवली गेलेली आहे त्याच्या बल-वीर्याचे वर्णन कोण करू
शकेल ?
यदा विजृम्भतेऽनन्तो
मदाघूर्णितलोचनः ।
तदा चलति भूरेषा साब्धितोया सकानना ॥ २३
॥
ज्यावेळी मदमत्तनयन शेष जांभई घेतो तेव्हा समुद्र आणि वन आदिं सहित
ही सम्पूर्ण पृथ्वी चलायमान होते .
गन्धर्वाप्सरसः सिद्धाः
किन्नरोरगचारणाः ।
नान्तं गुणानां गच्छन्ति
तेनानन्तोऽयमव्ययः ॥ २४ ॥
ह्याच्या गुणांचा अंत गन्धर्व, अप्सरा, सिद्ध, किन्नर, नाग आणि
चारण आदि कोणालाही सापडलेला नाही, म्हणूनच ह्या अविनाशी देवाला ‘अनंत’ म्हटले गेले आहे .
यस्य नागवधूहस्तैर्लेपितं हरि
चन्दनम् ।
मुहुः श्वासानिलापास्तं याति
दिक्षूदवासताम् ॥ २५ ॥
ज्याचे नाग-वधुंद्वारा लेपित हरिचन्दन पुन्हा पुन्हा श्वास-वायुतून
सुटून दिशांना सुगन्धित करत राहते .
यमाराध्य पूराणर्षिर्गर्गो
ज्योतींषि तत्त्वतः ।
ज्ञातवान्सकलं चैव निमित्तपठितं फलम् ॥
२६ ॥
ज्याची आराधना करून पूर्वकालीन महर्षि गर्ग ह्यांनी समस्त
ज्योतिर्मंडल (ग्रहनक्षत्रादि) आणि शकुन-अपशकुन आदि नैमित्तिक फळांना तत्त्वत:
जाणले होते .
तेनेयं नागवर्येण शिरसा विधृता
मही ।
बिभर्ति मालां लोकानां सदेवासुरमानुषाम्
॥ २७ ॥
त्या नागश्रेष्ठ शेषाने पृथ्वीला आपल्या मस्तकावर धारण केले आहे, त्याने
स्वयं देखील देव, असुर आणि मनुष्यां सहित सम्पूर्ण लोकमाला धारण केलेली आहे .
इति श्रीविष्णुमहापुराणे
द्वितीये अंशे पञ्चमोऽध्याय (५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा