॥ विष्णुपुराणम् ॥
द्वितीयः अंशः॥ प्रथमोऽध्यायः ॥
मैत्रेय उवाच
भगवन्सम्यगाख्यातं ममैतदखिलं त्वाया ।
जगतः सर्गसम्बन्धि यत्पृष्टोसि गुरो मया ॥ १ ॥
मैत्रेय म्हणाले -
हे भगवन् ! हे गुरू ! मी जगाताच्या
सृष्टी विषयी जे काही विचारले होते ते सर्व तुम्ही मला व्यवस्थित समजावून सांगितले
.
योऽयमंशो जगत्सृष्टिसम्बन्धो
गदितस्त्वया ।
तत्राहं श्रोतुमिच्छामि भूयोपि मुनिसत्तम
॥ २ ॥
हे मुनिश्रेष्ठ ! जगाताच्या सृष्टीसंबंधी
तुम्ही हा जो प्रथम अंश सांगितला, त्याविषयी आणखी एक
गोष्ट मी ऐकू इच्छितो .
प्रियव्रतोत्तानपादौ सुतौ स्वायम्भुवस्य
यौ ।
तयोरुत्तानपादस्य ध्रुवः
पुत्रस्त्वयोदितः ॥ ३ ॥
स्वायम्भुव मनुचे जे प्रियव्रत आणि
उत्तानपाद असे दोन पुत्र होते, त्यांच्यातील उतानपादाचा पुत्र ध्रुव
ह्याच्याविषयी आपण सांगितले .
प्रियव्रतस्य नैवोक्ता भवता द्विज सन्ततिः ।
तामहं श्रोतुमिच्छामि प्रसन्नो वक्तुमर्हसि ॥ ४ ॥
परंतु हे द्विजा
! तुम्ही प्रियव्रताच्या संतानाविषयी काहीच सांगितले नाहीत, म्हणून
मी त्याच्या विषयी जाणून घेऊ इच्छितो, तुम्ही ते मला
प्रसन्नतापूर्वक सांगावे .
श्रीपराशर उवाच
कर्दमस्यात्मजां कन्यामुपयेमे प्रियव्रतः ।
सम्राट् कुक्षिश्च तत्कन्ये दशपुत्रस्तथापरे ॥ ५ ॥
पराशर म्हणाले - प्रियव्रताने
कर्दमांच्या कन्येसोबत विवाह केला होता. तिच्यापासून त्याला सम्राट आणि कुक्षि
नावाच्या दोन कन्या आणि दहा पुत्र झाले .
महाप्रज्ञा महावीर्या विनीता दयिता पितुः
।
प्रियव्रतसुताः ख्यातास्तेषां नामानि मे शृणु ॥ ६ ॥
प्रियव्रताचे पुत्र अतिशय बुद्धिमान, बलवान, विनयसम्पन्न
आणि आपल्या मातापितांचे अत्यन्त प्रिय होते. त्यांची
नावे ऐक .
आग्नीध्रश्चाग्निबाहुश्च
वपुष्मान्द्युतिमांस्तथा ।
मेधा मेधातिथिर्भव्यः सवनः पुत्र एव च ॥
७ ॥
ज्योतिष्मान्दशमस्तेषां सत्यनामा
सुतोऽभवत् ।
प्रियव्रतस्य पुत्रास्ते प्रख्याता
बलवीर्यतः ॥ ८ ॥
आग्नीध, अग्निबाहु, वपुष्मान, द्युतिमान, मेधा, मेधातिथि, भव्य, सवन असे
नऊ पुत्र होते आणि दहावा यथार्थनामी ज्योतिष्मान होता . हे प्रियव्रताचे सर्व
पुत्र आपल्या बल आणि पराक्रमामुळे विख्यात होते .
मेधाग्निबाहुपुत्रास्तु त्रयो योगपरायणाः ।
जातिस्मारा महाभागा न राज्याय मनो दधुः ॥
९ ॥
त्यांच्या पैकी महाभाग मेधा, अग्निबाहु
आदि तीन पुत्र तीन योगपरायण असून आपल्या पूर्वजन्माचा वृत्तान्त जाणणारे होते .
त्यांनी राज्य आदि भोगांमध्ये आपले चित्त गुंतवले नाही .
निर्मलाः सर्वकालन्तु समस्तार्थेषु वै मुने ।
चक्रुःक्रियां यथान्यायमफलाकाङ्क्षिणो हि ते ॥ १० ॥
हे मुने ! ते निर्मलचित्त असून
त्यांच्यात कर्मफळाची इच्छा नव्हती, तसेच ते सर्व
विषयांमध्ये नेहमी न्यायानुकूल असत .
प्रियव्रतो ददौ तेषां सप्तानां मुनिसत्तम
।
सप्तद्वीपानि मैत्रेय विभज्य
सुमहात्मनाम् ॥ ११ ॥
ह मुनिश्रेष्ठा ! राजा प्रियव्रताने
आपल्या उरलेल्या सात महात्मा पुत्रांना सात द्वीप वाटून दिले .
जम्बूद्वीपं महाभाग साग्नीध्राय ददौ पिता ।
मेधातिथेस्तथा प्रादात्प्लक्षद्वीपं तथापरम् ॥ १२ ॥
हे महाभागा ! पिता प्रियव्रताने आग्नीधला
जम्बूद्वीप आणि मेधातिथिला प्लक्ष नामक दुसरा द्वीप दिला .
शाल्मले च वपुष्मन्तं नरेन्द्रमभिषिक्तवान् ।
ज्योतिष्मन्तं कुशद्वीपे राजानं कृतावान्प्रभुः ॥ १३ ॥
त्याने शाल्मलद्वीपात वपुष्मानाला
अभिषिक्त केले आणि ज्योतिष्मानाला कुशद्वीपाचा राजा बनवला .
द्युतिमन्तं च राजानं क्रौञ्चद्वीपे
समादिशत् ।
पुष्कराधिपतिं चक्रे सवनं चापि स प्रभुः
॥ १४ ॥
द्युतिमानची क्रौंचद्वीपच्या शासनावर
नियुक्ति केली, भव्यला प्रियव्रताने शाकद्वीपाचा स्वामी बनवला आणि सवनला
पुष्करद्वीपाचा अधिपति केला .
जम्बूद्वीपेश्वरो यस्तु आग्नीध्रो
मुनिसत्तम ॥ १५ ॥
तस्य पुत्रा बभूवुस्ते प्रजापतिसमा नव ।
नाभिः किम्पुरुषश्चैव हरिवर्ष इलावृतः ॥
१६ ॥
रम्यो हिरण्वान्षष्ठश्च कुरुभद्राश्व एव
च ।
केतुमालस्तथैवान्यः साधुचेष्टोऽभवन्नृपः
॥ १७ ॥
हे मुनिसत्तमा ! त्यात जो जम्बूद्वीपाचा
अधीश्वर राजा आग्नीध होता त्याला प्रजापति समान पुत्र झाले, त्यांची नावे नाभि, किम्पुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्य, हिरण्वान, कुरु, भद्राश्व
आणि सत्कर्मशील राजा केतुमाल अशी होती .
जन्बूद्वीपविभागांश्च तेषां विप्र निशामय
।
पित्रा दत्तं हिमाह्वं तु वर्षं नाभेस्तु
दक्षिणम् ॥ १८ ॥
हे विप्रा ! आता त्याच्या
जम्बूद्वीपाच्या विभागांविषयी ऐक. पिता आग्नीध्रने दक्षिणेकडचे हिमवर्ष (आताचे
भारतवर्ष) नाभिला दिले .
हेमकूटं तथा वर्षं ददौ किम्पुरुषाय सः ।
तृतीयं नैषधं वर्षं हरिवर्षाय दत्तवान् ॥
१९ ॥
तसेच किम्पूरुषाला हेमकूटवर्ष आणि
हरिवर्षला तिसरे नैषधवर्ष दिले .
इलावृताय प्रददौ मेरुर्यत्र तु मध्यमः ।
नीलाचलाश्रितं वर्ष रम्याय प्रददौ पिता ॥
२० ॥
ज्याच्या मध्यावर मेरुपर्वत आहे ते इलावृतवर्ष
त्याने इलावृत्ताला दिले आणि नीलाचलाला लागून असलेले वर्ष रम्याला दिले .
श्वेतं यदुत्तरं वर्षं पित्रा दत्तं
हिरण्वते ॥ २१ ॥
यदुत्तरं शृङ्गवतो वर्ष तत्कुरवे ददौ ।
मेरोः पुर्वेण यद्वर्षं भद्राश्वाय
प्रदत्तवान् ॥ २२ ॥
गन्धमाधनवर्षं तु केतुमालाय दत्तवान् ।
इत्येतानि ददौ तेभ्यः पुत्रेभ्यः स
नरेश्वरः ॥ २३ ॥
पिता आग्नीध्राने आपले उत्तरवर्ती
श्वेतवर्ष हिरण्वानाला दिले, श्रृंगवान पर्वताच्या उत्तरेला स्थित
असलेले वर्ष करुला, मेरुच्या पूर्वेला स्थित असलेले वर्ष
भद्राश्वाला आणि केतुमालाला गन्धमादनवर्ष
दिले . अशाप्रकारे राजा आग्नीध्रने आपल्या पुत्रांना ही वर्षे दिली .
वर्षेष्वेतेषु तान्पुत्रानभिषिच्य स
भूमिपः ।
शालग्रामं महापुण्यं मैत्रेय तपसे ययौ ॥
२४ ॥
हे मैत्रेया ! अपल्या पुत्रांना ह्या
वर्षांमध्ये अभिषिक्त करून तो तपस्येसाठी शालग्राम नामक महापवित्र क्षेत्री निघून
गेला .
यनि किम्पुरुषादीनि वर्षाण्यष्टौ महामुने
।
तेषां स्वाभाविकिसिद्धिः सुखप्रायाह्ययत्नतः
॥ २५ ॥
हे महामुने ! किम्पुरुष आदि जी आठ वर्ष
आहेत तिथे सुखाचे बाहुल्य असून कोणत्याही प्रयत्नाशिवाय सहजगत्या सर्व भोग-सिद्धि
प्राप्त होतात .
विपर्ययो न तेष्वस्ति जरामृत्युभयं न च ।
धर्मधर्मौ न तेष्वास्तां
नोत्तमाधममध्यमाः ॥ २६ ॥
तिथे कोणत्याही प्रकारच्या विपर्यय (असुख किंवा अकाल मृत्यु आदि)
तसेच जरा-मृत्यु आदिचे कोणतेही भय नाही आणि धर्म, अधर्म किंवा
उत्तम, अधम आणि मध्यम आदिचा भेदभावही
नाही . ह्या आठ वर्षांमध्ये कधीही कोणतेही युगपरिवर्तन सुद्धा होत नाही .
न तेष्वस्ति युगावस्था क्षेत्रेष्वष्टसु सर्वदा ।
हिमाह्वयं तु वै वर्षं नाभेरासीन्महात्मनः ।
तस्यर्षभोऽभवत्पुत्रो मेरुदेव्यां महाद्युतिः ॥ २७ ॥
महात्मा नाभिचे हिम नामक वर्ष होते; त्याला
मेरुदेवीपासून अतिशय कान्तिमान असा ऋषभ नामक पुत्र झाला .
ऋषभाद्भरतो जज्ञे ज्येष्ठः पुत्रशतस्य
सः ।
कृत्वा राज्यं स्वधर्मेण तथैष्ट्वा
विविधान्मखान् ॥ २८ ॥
अभिषिच्य सुतं वीरं भरतं पृथिवीपतिः ।
तपसे स महाभागः पुलहस्याश्रमं ययौ ॥ २९ ॥
ऋषभाला भरत नावाचा पुत्र झाला जो
त्याच्या शंभर पुत्रांपैकी सर्वात मोठा होता . महाभाग पृथ्वीपति ऋषभदेवाने
धर्मपुर्वक राज्य शासन तसेच विविध यज्ञांचे अनुष्ठान केले. नंतर त्याने आपल्या वीर
पुत्र भरताला राज्यधिकार सोपविला आणि तपस्येसाठी पुलहाश्रमाला निघून गेला .
वानप्रस्थविधानेन तत्रापि कृतनिश्चयः ।
तपस्तेपे यथान्यायमियाज स महीपतिः ॥ ३० ॥
महाराज ऋषभाने तिथे वानप्रस्थाश्रमात
राहून निश्चयपूर्वक तपस्या केली आणि नियमानुकूल यज्ञानुष्ठान केले .
तपसा कर्षितोऽत्यर्थं कृशो धमनिसन्ततः ।
नग्नो वीटां मुखे कृत्वा वीराध्वानं ततो
गतः ॥ ३१ ॥
तपस्येमुळे सूकून तो इतका कृश झाला कि
त्याच्या शरीरातील रक्तवाहक शिरा दिसू लागल्या . अंतसमयी आपल्या तोंडात दगडाचा एक तुकडा
ठेऊन त्याने नग्नावस्थेत महाप्रस्थान केले .
ततश्च भारतं वर्षमेतल्लोकेषु गीयते ।
भरताय यतः पित्रा दत्तं प्रातिष्ठता वनम् ॥ ३२ ॥
पिता ऋषभदेवाने वनात जाते वेळी आपले
राज्य भरतला दिले होते; म्हणून तेव्हापासून हे (हिमवर्ष) ह्या लोकी भारतवर्ष ह्या नावाने
प्रसिद्ध झाले .
सुमतीर्भरतस्याभूत्पुत्रः परमधार्मिकः ।
कृत्वा सम्यग्ददौ तस्मै राज्यमिष्टमखं
पिता ॥ ३३ ॥
भरताला सुमति नामक परम धार्मिक पुत्र
झाला . पिता भरताने यज्ञानुष्ठानपूर्वक यथेच्छ राज्य सुख भोगून राज्या सुमतिला
सोपविले .
पुत्रसंक्रामितश्रीस्तु भरतः स महीपतिः ।
योगाभ्यासरतः प्राणान्
शालग्रामेऽत्यजन्मुने ॥ ३४ ॥
हे मुने ! महाराज भरताने पुत्राला
राज्यलक्ष्मी सोपवून योगाभ्यासात तत्पर होऊन शेवटी शालाग्रामक्षेत्री आपले त्यागले
.
अजायत च विप्रोऽसौ योगीनां प्रवरे कुले ।
मैत्रेय तस्य चरितं कथयिष्यामि ते पुनः ॥
३५ ॥
मग त्यांनी योग्यांच्या पवित्रकुळात परत
ब्राह्मणरूपात जन्म घेतला . हे मैत्रेया ! त्याचे ते चरित्र मी तुला नंतर सांगतो .
सुमतेस्तेजसस्तस्मादिन्द्रद्युम्नो
व्यजायत ।
परमेष्ठी ततस्तस्मात्प्रतिहारस्तदन्वयः ॥ ३६ ॥
त्यानंतर सुमतिच्या वीर्यापासून
इन्द्रद्युम्नाचा जन्म झाला, त्याच्यापासून परमेष्ठी आणि परमेष्ठीचा
पुत्र प्रतिहार झाला .
प्रतिहर्तेति विख्यात उत्पन्नस्तस्य
चात्मजः ।
भवस्तस्मादथोद्गीथः प्रस्ताविस्तत्सुतो
विभुः ॥ ३७ ॥
प्रतिहाराला प्रतिहर्ता नावाचा विख्यात
पुत्र झाला, तसेच प्रतिहर्ताचा पुत्र भव, भवाचा
उद्गीथ आणि उद्गीथाचा पुत्र अति समर्थ प्रस्ताव झाला .
पृथुस्ततस्ततो नक्तो नक्तस्यापि गयः सुतः
।
नरो गयस्य नतयस्तत्पुत्रोऽभूद्विराट्
ततः ॥ ३८ ॥
प्रस्तावला पृथु, पृथुला
नक्त आणि नक्तला गय नावाचा पुत्र झाला . गयला नर आणि नरला विराट नावाचा पुत्र झाला
.
तस्य पुत्रो महावीर्यो धीमांस्तस्मादजायत
।
महान्तस्तत्सुतश्चाभून्मनस्युस्तस्य
चात्मजः ॥ ३९ ॥
त्याचा पुत्र महावीर्य होता, ह्याच्यापासून
धीमानचा जन्म झाला, तसेच धीमानचा पुत्र महान्त आणि त्याचा पुत्र मनस्यु
होता .
त्वष्टा त्वष्टुश्च विरजो
रजस्तस्याप्यभूत्सुतः ।
शतजिद्रजसस्तस्य जज्ञे पुत्रशतं मुने ॥
४० ॥
मनस्युचा पुत्र त्वष्टा, त्वष्टाचा
विरज आणि विरजचा पुत्र रज झाला . हे मुने ! रजचा पुत्र शतजित याला शंभर पुत्र झाले
.
विष्वग्ज्योतिप्रधानास्ते यैरिमा वर्धिताः प्रजाः ।
तैरिदं भारतं वर्षं नवभेदमलङ्कृतम् ॥ ४१ ॥
त्यांच्यात विष्वग्ज्योति प्रधान होता .
ह्या शंभर पुत्रांमुळे इथल्या प्रजेत खूप वाढ झाली . तेव्हा त्यांनी ह्या
भारतवर्षाचे नऊ विभाग केले व त्याचा उपभोग घेऊ लागले.
तेषां वंशप्रसूतैश्च भुक्तेयं भारती पुरा
।
कृतत्रेतादिसर्गेण युगाख्यामेकसप्ततिम् ॥
४२ ॥
ह्यांच्याच वारसांनी पुर्वकाळी
कृतत्रेतादि युगक्रमाने एकाहत्तर युगांपर्यन्त ह्या भरतभूमिचा उपभोग घेतला होता .
एष स्वायम्भुवः सर्गौ येनेदं पूरितं जगत् ।
वाराहे तु मुने कल्पे पूर्वमन्वन्तराधिपः
॥ ४३ ॥
हे मुने ! हाच ह्या वाराहकल्पातील सर्वात
पहिला मन्वन्तराधिप स्वायम्भुवमनु ह्याचा वंश आहे, ज्याने त्याकाळी
हा सम्पूर्ण संसार व्याप्त केला होता .
इति
श्रीविष्णुपुराणे द्वितीये अंशे प्रथमोऽध्यायः ॥१॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा