॥ प्रथमः अंशः ॥ ॥ द्वाविंशोऽध्यायः ॥
"श्रीविष्णुची
विभूति आणि जगताच्या व्यवस्थेचे वर्णन"
श्रीपराशर उवाच -
यदाभिषिक्तः स पृथुः पूर्वं राज्ये
महर्षिभिः ।
ततः क्रमेण राज्यानि ददौ लोकपितामहः
॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले – पूर्वकाळी महर्षींनी जेव्हा महाराज
पृथुला राज्यपदावर अभिषिक्त केले तेव्हा लोक-पितामह ब्रह्माने सुद्धा क्रमाने
राज्यांची वाटणी केली .
नक्षत्रग्रहविप्राणां वीरुधां
चाप्यशेषतः ।
सोमं राज्ये दधद्ब्रह्म यज्ञानां
तपसामपि ॥ २ ॥
ब्रह्माने नक्षत्र, ग्रह, ब्राह्मण, सम्पूर्ण
वनस्पति आणि यज्ञ तथा तप आदिंच्या राज्यावर चंद्राला नियुक्त केले .
राज्ञां वैश्रवणं राज्ये जलानां
वरुणं तथा ।
आदित्यानां पतिं विष्णुं वसूनामथ
पावकम् ॥ ३ ॥
अशाच प्रकाचे विश्रवाचा पुत्र कुबेर ह्याला राजांचा , वरुणाला जलाचा, विष्णुला
आदित्यांचा आणि अग्निला वसुगणांचा अधिपति बनवले .
प्रजापतीनां दक्षं तु वासवं मरुतामपि ।
दैत्यानां दानवानां च प्रह्लादमधिपं
ददौ ॥ ४ ॥
दक्षाला प्रजापतिंचे , इंद्राला
मरुद्गणांचे तसेच प्रल्हादला दैत्य आणि दानवांचे आधिपत्य दिले .
पितॄणां धर्मराजं तं यमं
राज्येऽभ्यषेचयत् ।
ऐरावतं गजेन्द्राणामशेषाणां पतिं ददौ
॥ ५ ॥
पितृगणांच्या राज्यपदावर धर्मराज यमाला अभिषिक्त
केले आणि सम्पूर्ण गजराजांचे स्वामित्व ऐरावताला दिले .
पतत्रिणां तु गरुडं देवानामपि वासवम्
।
उच्चैःश्रवसमश्वानां वृषभं तु गवामपि
॥ ६ ॥
गरुडाला पक्ष्यांचा, इंद्राला
देवतांचा, उच्चै:श्रवाला
घोड्यांचा आणि वृषभाला गायींचा अधिपति बनवले .
मृगाणां चैव सर्वेषां राज्ये सिंहं
ददौ प्रभुः ।
शेषं तु दन्दशूकानामकरोत्पतिमव्ययः ॥
७ ॥
प्रभु ब्रह्माने समस्त वन्यपशुंचे राज्य सिंहाला
दिले आणि सर्पांचा स्वामी शेषनागाला बनवले .
हिमालयं स्थावरणां मुनीनां कपिलं
मुनिम् ।
नखिनां देष्ट्रिणां चैव मृगाणां
व्याघ्रमीश्वरम् ॥ ८ ॥
स्थावरांचा स्वामी हिमालयाला, मुनिजनांचा
कपिलदेवाला आणि नख व दाढ असलेल्या पशुंचा राजा वाघाला बनवले .
वनस्पतीनां राजानां प्लक्षमैवाभ्यषेचयत् ।
एवमेवान्यजातीनां
प्राधान्येनाकरोत्प्रभून् ॥ ९ ॥
तसेच प्लक्षाला वनस्पतिंचा राजा केले. अशा
प्रकारे ब्रह्माने इतर सर्व जातिंच्या प्राधान्याची सुद्धा व्यवस्था केली .
एवं विभज्य राज्यानि दिशां
पालाननन्तरम् ।
प्रजापतिपतिर्ब्रह्मा स्थापयामास
सर्वतः ॥ १० ॥
अशा प्रकारे राज्याचा विभाग केल्या नंतर
प्रजापतिंच्या स्वामी
ब्रह्माने सर्व दिशांना दिक्पालांची स्थापना केली .
पूर्वस्यां दिशि राजानं वैराजस्य
प्रजापतेः ।
दिशापालं सुधन्वानं सुतं वै
सोऽभ्यषेचयत् ॥ ११ ॥
त्याने पूर्व-दिशेला वैराज प्रजापतीचा पुत्र राजा
सुधन्वाला दिक्पाल पदावर अभिषिक्त केले .
दक्षिणस्यां दिशि तथा कर्दमस्य
प्रजापतेः ।
पुत्रं शङ्खपदं नाम राजानं
सोऽभ्यषेचयत् ॥ १२ ॥
तसेच दक्षिण दिशेला कर्दम प्रजापतिचा पुत्र राजा
शंखपदाची नियुक्ति केली .
पश्चिमस्यां
दिशि तथा रजसः पुत्रमच्युतम् ।
केतुमन्तं
महात्मानं राजानं सोऽभ्यषेचयत् ॥ १३ ॥
कधीच च्युत न होणार्या रजसपुत्र महात्मा
केतुमानाला त्याने पश्चिम दिशेला स्थापित केले .
तथा हिरण्यरोमाणं पर्जन्यस्य प्रजापतेः ।
उदीच्यां दिशि दुर्धर्षं
राजानमभ्यषेचयत् ॥ १४ ॥
आणि पर्जन्य प्रजापतिचा पुत्र अति दुर्धर्ष राजा
हिरण्यरोमाला उत्तर दिशेला अभिषिक्त केले .
तैरियं पृथिवी सर्वा सप्तद्वीपा
सपत्तना ।
यथाप्रदेशमद्यापि धर्मतः परिपाल्यते
॥ १५ ॥
ते आजपर्यंत सात द्वीप आणि अनेक नगरांनी युक्त
असलेल्या ह्या सम्पूर्ण पृथ्वीचे आपल्या आपल्या विभागानुसार धर्मपूर्वक पालन करतात .
एते सर्वे प्रवृत्तस्य स्थितौ
विष्णोर्महात्मनः ।
विभूतिभूता राजानो ये चान्ये
मुनिसत्तम ॥ १६ ॥
हे मुनिसत्तमा ! हे तसेच अन्य सर्व जे राजालोक
आहेत ते सर्व विश्वाचे पालन करण्यात प्रवृत्त असलेल्या परमात्मा श्रीविष्णुचे
विभूतिरूप आहेत .
ये भविष्यन्ति ये भूताः सर्वे
भूतेश्वरा द्विज ।
ते सर्वे सर्वभूतस्य विष्णोरंशा
द्विजोत्तम ॥ १७ ॥
हे द्विजोत्तमा ! जे जे भूताधिपति ह्याआधी होऊन
गेले आणि जे जे ह्यापुढे होतील ते सर्व सर्वभूत भगवान विष्णुचे अंश आहेत .
ये तु देवाधिपतयो ये च
दैत्याधिपास्तथा ।
दानवानां च ये नाथा ये नाथाः
पिशिताशिनाम् ॥ १८ ॥
पशुनां ये च पतयः पतयो ये च पक्षिणाम् ।
मनुष्याणां च सर्पाणां
नागानामधिपाश्च ये ॥ १९ ॥
वृक्षाणां पर्वतानां च ग्रहाणां चापि
येऽधिपाः ।
अतीता वर्तमानाश्च ये भविष्यन्ति
चापरे ।
ते सर्वे सर्वभूतस्य विष्णोरंशसमुद्भावाः
॥ २० ॥
जे जे देवता, दैत्य, दानव आणि मांसाहारींचे अधिपति आहेत, जे जे पशु, पक्षी, मनुष्य, सर्प आणि
नागांचे अधिनायक आहेत, जे जे
वृक्ष, पर्वत
आणि ग्रहांचे स्वामी आहेत तसेच आणखीनही भूत, भविष्यात तसेच वर्तमानकालीन जितके भूतेश्वर आहेत
ते सगळे सर्वभूत भगवान विष्णुच्या अंशापासून उत्पन्न झाले आहेत .
न हि पालनसामर्थ्यमृते सर्वेश्वरं
हरिम् ।
स्थितं स्थितौ महाप्राज्ञ
भवत्यन्यस्य कस्यचित् ॥ २१ ॥
हे महाप्राज्ञा ! सृष्टिच्या पालन-कार्यात
प्रवृत्त असलेले सर्वेश्वर श्रीहरि ह्यांच्या शिवाय इतर कोणातही पालन करण्याची
शक्ति नाही .
सृजत्येष जगत्सृष्टौ स्थितौ पाति
सनातनः ।
हन्ति चैवान्तकत्वेन
रजःसत्त्वादिसंश्रयः ॥ २२ ॥
रज आणि सत्त्वादि गुणांच्या आश्रयाने तो सनातन
प्रभुच जगताच्या रचना समयी रचना करतो, स्थिति समयी पालन करतो आणि अंतसमयी कालरूपाने
संहार करतो .
चतुर्विभागः संसृष्टौ चतुर्धा
संस्थितः स्थितौ ।
प्रलयं च करोत्यन्ते चतुर्भेदो
जनार्दनः ॥ २३ ॥
तो जनार्दन चार विभागांनी सृष्टिसमयी, चार विभागांनीच
स्थितिसमयी आणि चार रूप धारण करूनच अंतसमयी प्रलय करतो .
एकेनांशेन ब्रह्मसौ भवत्यव्यक्तमूर्तिमान् ।
मरीचिमिश्राः
पतयः प्रजानां चान्यभागशः ॥ २४ ॥
कालस्तृतीयस्तस्यांशः
सर्वभूतानि चापरः ।
इत्थं
चतुर्धा संसृष्टौ वर्ततेसौ रजोगुणः ॥ २५ ॥
एका अंशाने तो अव्यक्तस्वरूप ब्रह्मा असतो, दुसर्या अंशाने
मरीचि आदि प्रजापति असतो,
त्याचा
तीसरा अंश काळ आहे आणि चौथा सम्पूर्ण प्राणी. अशाप्रकारे तो रजोगुण विशिष्ट होऊन
चार प्रकारे सृष्टी समयि स्थित होतो .
एकांशेनास्थितो विष्णुः करोति
प्रतिपालनम् ।
मन्वादिरूपश्चान्येन कालरूपोऽपरोण च
॥ २६ ॥
सर्वभूतेषु चान्येन संश्थितः कुरुते
स्थितिम् ।
सत्त्वं गुणं समाश्रित्य जगतः
पुरुषोत्तमः ॥ २७ ॥
मग तो पुरुषोत्तम सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन
जगताची स्थिती करतो. त्यावेळी तो एका अंशाने विष्णु होऊन पालन करतो, दुसर्या
अंशाने मनु आदि होतो, तिसर्या
अंशाने काल आणि चौथ्या अंशाने सर्वभूतांमध्ये स्थित होतो .
आश्रित्य तमसो वृत्तिमन्तकाले तथा
पुनः ।
रुद्रस्वरूपो भगवानेकांशेन भवत्यजः ॥
२८ ॥
अग्न्यन्तकादिरूपेण भागेनान्येन
वर्तते ।
कालस्वरूपो भागो यस्सर्वभूतानि चापरः
॥ २९ ॥
तसेच अन्तकाळी तो अजन्मा भगवान तमोंगुणांच्या वृत्तीचा आश्रय
घेऊन एका अंशाने रुद्ररूप,
दुसर्या
अंशाने अग्नि व अन्तकादि रूप, तिसर्याने कालरूप आणि चौथ्या अंशाने सम्पूर्ण
भूतस्वरूप होतो .
विनाशं कुर्वतस्तस्य चतुर्धैवं
महात्मनः ।
विभागकल्पना ब्रह्मन् कथ्यते
सार्वकालिकी ॥ ३० ॥
हे ब्रह्मन ! विनाश करण्यासाठी त्या
महात्म्याच्या ह्या चार प्रकारच्या सार्वकालिक विभागकल्पना सांगितल्या आहेत .
ब्रह्म दक्षादयः कालस्तथैवाखिलजन्तवः
।
विभूतयो हरेरेता जगतः सृष्टिहेतवः ॥
३१ ॥
ब्रह्मा, दक्ष आदि प्रजापतिगण, काल तथा समस्त
प्राणी – ह्या सर्व श्रीहरिच्या विभूति असून जगताच्या सृष्टिचे कारण आहेत .
विष्णुर्मन्वादयः कालः सर्वभूतानि च
द्विज ।
स्थितेर्निमित्तभूतस्य विष्णोरेता
विभूतयः ॥ ३२ ॥
हे द्विजा ! विष्णु, मनु आदि, काल आणि समस्त
भूतगण – ह्या जगताच्या स्थितिचे कारणरूप असणार्या भगवान विष्णुच्या विभूती आहेत .
रुद्रः
कालान्तकाद्याश्च समस्ताश्चैव जन्तवः ।
चतुर्धा
प्रलयायैता जनार्दनविभूतयः ॥ ३३ ॥
तसेच रूद्र, काल, अन्तकादि आणि सकल जीव श्रीजनार्दनाच्या ह्या चार
विभूती प्रलयाचे कारणरूप आहेत .
जगदादौ
तथा मध्ये सृष्टिराप्रलयाद् द्विज ।
धात्रा
मरीचिमिश्रैश्च क्रियते जन्तुभिस्तथा ॥ ३४ ॥
हे द्विजा ! जगताच्या आरंभी, मध्यकाळी तसेच
प्रलयापर्यन्त सुद्धा ब्रह्मा, मरीचि आदि भिन्न–भिन्न जीवांनीच सृष्टि होते .
ब्रह्म सृजत्यादिकाले
मरीचिप्रमुखास्ततः ।
उत्पादयन्त्यपत्यानि जन्तवश्च
प्रतिक्षणम् ॥ ३५ ॥
सृष्टिच्या आरंभी आधी ब्रह्मा रचना करतो, मग मरीचि आदि
प्रजापतिगण आणि त्यानंतर समस्त जीव क्षणो-क्षणी संतति उत्पन्न करत राहतात .
कालेन न विना ब्रह्म सृष्टिनिष्पादको
द्विज ।
न प्रजापतयः सर्वे न चैवाखिलजन्तवः ॥
३६ ॥
हे द्विजा ! काळाशिवाय ब्रह्मा, प्रजापति व
अन्य समस्त प्राणीसुद्धा सृष्टि-रचना नाही करू शकत [म्हणून भगवान कालरूप विष्णुच
सर्वदा सृष्टिचे कारण आहे] .
एवमेव विभागोयं स्थितावप्युपदिश्यति ।
चतुर्दा तस्य देवस्य मैत्रेय प्रलये
तथा ॥ ३७ ॥
हे मैत्रेया ! अशा प्रकारे जगताच्या स्थिति आणि
प्रलयाच्या वेळी सुद्धा त्या देवाचे चार विभाग सांगितले आहेत .
यत्किञ्चित्सृज्यते येन सत्त्वजातेन
वै द्विज ।
तस्य सृज्यस्य सम्भूतो तत्सर्वं वै
हरेस्तनुः ॥ ३८ ॥
हे द्विजा ! ज्या कोणा जीवाच्या द्वारे जी काही
रचना केली जाते, त्या
उत्पन्न झालेल्या जीवाच्या उत्पत्तीत सर्वथा श्रीहरिचे शरीरच कारण आहे .
हन्ति यावच्च यत्किञ्चित्सत्त्वं
स्थावरजङ्गमम् ।
जनार्दनस्य तद्रौद्रं मैत्रेयान्तकरं
वतुः ॥ ३९ ॥
हे मैत्रेया ! अशाप्रकारे जो कोणी स्थावर जंगम
भूतांमधील कोणाला नष्ट करतो, तो नाश करणारा सुद्धा श्रीजनार्दनाचे अंतकारक
रौद्ररूपच आहे .
एवमेष जगत्स्त्रष्टा जगत्पाता तथा
जगत् ।
जगद्भक्षयिता देवः समस्तस्य
जनार्दनः ॥ ४० ॥
अशाप्रकारे तो जनार्दनदेवच समस्त संसाराचा रचयिता, पालनकर्ता आणि
संहारक आहे तसेच तोच स्वयं जगत-रूप सुद्धा आहे .
सृष्टिस्थित्यन्तकालेषु त्रिधैवं
सम्प्रवर्तते ।
गुणप्रवृत्या परमं पदं तस्यागुणं
महत् ॥ ४१ ॥
जगताची उत्पत्ति, स्थिति आणि अंत समयी तो असाच तीन्ही
गुणांच्या प्रेरणेने प्रवृत्त होतो, पण त्याचे परमपद महान निर्गुण आहे .
तच्च ज्ञानमयं व्यापि
स्वासंवेद्यमनौपमम् ।
चतुष्प्रकारं तदपि स्वरूपं परमात्मनः
॥ ४२ ॥
परमत्म्याचे हे स्वरूप ज्ञानमय, व्यापक, स्वसंवेद्य
(स्वयं-प्रकाश) आणि अनुपम आहे तसेच ते देखिल चार प्रकारचेच आहे .
श्रीमैत्रेय उवाच -
चतुःप्रकारतां तस्य ब्रह्मभूतस्य हे
मुने ।
ममाचक्ष्व यथान्यायं यदुक्तं परमं
पदम् ॥ ४३ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले – हे मुने ! आपण
जे भगवंताचे परम पद म्हणालात, ते चार प्रकारचे कसे ? हे आपण मला
विधिपूर्वक सांगावे .
श्रीपराशर उवाच -
मैत्रेय कारणं प्रोक्तं साधनं
सर्ववस्तुषु ।
साध्यं च वस्त्वभिमतं
यत्साधयितुमात्मनः ॥ ४४ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे मैत्रेया ! सर्व वस्तुंचे जे कारण असते
तेच त्यांचे साधनही असते आणि आपल्या ज्या अभिमत वस्तुची सिद्धि केली जाते त्यालाच
साध्य म्हणतात .
योगिनो मुक्तिकामस्य प्राणायामादिसाधनम् ।
साध्यं
च परमं ब्रह्म पुनर्नवर्ततेयतः ॥ ४५ ॥
मुक्तिची इच्छा असणार्या योगिजनांसाठी प्राणायाम
आदि साधन आहेत आणि परब्रह्मच साध्य आहे, जिथून परत माघारी फिरावे लागत नाही .
साधनालम्बनं ज्ञानं मुक्तये योगिनां
हि यत् ।
स भेदः प्रथमस्तस्य ब्रह्मभूतस्य वै
मुने ॥ ४६ ॥
हे मुने ! जे योग्याच्या मुक्तिचे कारण आहे, ते ‘साधनालम्बन –
ज्ञान’ हाच
त्या ब्रह्मभूत परमपदाचा प्रथम भेद आहे .
युञ्जतः क्लेशमुक्त्यर्थं साध्यं यद्ब्रह्म
योगिनः ।
तदालम्बनविज्ञानं द्वितीयोंऽशो
महामुने ॥ ४७ ॥
क्लेश-बंधनातून मुक्त होण्यासाठी योगाभ्यासी
योग्याचे साध्यरूप जे ब्रह्म आहे, हे महामुने ! त्याचे ज्ञानच ‘आलम्बन-विज्ञान’ नामक दूसरा भेद
आहे .
उभयोस्त्वविभागेन साध्यसाधनयोर्हि
यत् ।
विज्ञानमद्वैतमयं तद्भागोऽन्यो
मयोदितः ॥ ४८ ॥
ह्या दोन्ही साध्य-साधनांचे जे अभेद्पुर्वक ‘अद्वैतमय ज्ञान’ आहे त्यालाच मी
तीसरा भेद म्हणतो
.
ज्ञानत्रयस्य वै तस्य विशेषो यो
महामुने ।
तन्निराकरणद्वारा
दर्शितात्मस्वरूपवत् ॥ ४९ ॥
निर्व्यापारमनाख्येयं
व्याप्तिमात्रमनूपमम् ।
आत्मसम्बोधविषयं सत्तामात्रमलक्षणम्
॥ ५० ॥
प्रशान्तमभयं शुद्धं
दुर्विभाव्यमसंश्रयम् ।
विष्णोर्ज्ञानमयस्योक्तं तज्ज्ञानं
ब्रह्मसंज्ञितम् ॥ ५१ ॥
आणि हे महामुने ! वरील तीन्ही प्रकारच्या
ज्ञानाच्या विशेषतेचे निराकरण केल्यावर ज्या आत्मस्वरूप समान ज्ञानस्वरूप भगवान
विष्णुचे निर्व्यापार अनिर्वचनीय, व्याप्तिमात्र, अनुपम, आत्मबोधस्वरुप, सत्तामन्न, अलक्षण, शांत, अभय, शुद्ध, भावनातीत आणि
आश्रयहीन रूपाचा जो अनुभव मिळतो, तै ‘ब्रह्म’ नामक ज्ञान म्हणजेच त्याचा चौथा भेद.
तत्र ज्ञाननिरोधेन योगिनो यान्ति ये लयम् ।
संसारकर्षणोप्तौ ते यान्ति
निर्बीजतां द्विजा ॥ ५२ ॥
हे द्विजा ! जे योगीजन अन्य ज्ञानांचा निरोध करून
ह्या चौथ्या भेदातच लीन होतात ते ह्या संसार-क्षेत्रात बीजारोपणरूप कर्म केल्याने
निर्बीज (वासनारहित) होतात .
एवम्प्रकारममलं नित्यं व्यापकमक्षयम् ।
समस्तहेयरहितं विष्ण्वाख्यं परमं
पदम् ॥ ५३ ॥
अशाप्रकारे हे निर्मल, नित्य, व्यापक, अक्षय आणि
समस्त हेय गुणांनी रहित विष्णु नामक परमपद आहे .
तद्ब्रह्म परमं योगी यतो नावर्तते
पुनः ।
श्रयत्यपुण्योपरमे
क्षीणक्लेशेऽतिनिर्मले ॥ ५४ ॥
पुण्य-पापचा क्षय आणि क्लेशांची निवृत्ति
झाल्याने जो अत्यंत निर्मल होतो तोच योगी त्या परब्रह्माचा आश्रय घेतो जिथून तो
परत येत नाही .
द्वे रूपे ब्रह्मणस्तस्य मूर्तं
चामूर्तमेव च ।
क्षराक्षरास्वरूपे ते
सर्वभूतेष्ववस्थिते ॥ ५५ ॥
त्या ब्रह्माची मूर्त आणि अमूर्त अशी दोन रूपे
आहेत, जी
क्षर आणि अक्षररूपात समस्त प्राण्यांमध्ये स्थित आहेत .
अक्षरं तत्परं ब्रह्म क्षरं सर्वमिदं
जगत् ।
एकदेशस्थितस्याग्नेर्ज्योत्स्ना
विस्तारिणि यथा ।
परस्य ब्रह्मणः शक्तिस्तथोदमखिलं
जगत् ॥ ५६ ॥
अक्षर हेच परब्रह्म आहे आणि क्षर सम्पूर्ण जगत
आहे. ज्याप्रकारे एकदेशीय अग्निचा प्रकाश सर्वत्र पसरतो त्याचप्रकारे सम्पूर्ण जगत
परब्रह्माचीच शक्ति आहे .
तत्राप्यासन्नदूरत्वाद्बहुत्वस्वल्पतामयः
।
ज्योत्स्नाभेदोस्ति
तच्छक्तेस्तद्वन्मैत्रेय विद्यते ॥ ५७ ॥
ब३ह्मविष्णुशिवा ब्रह्मन्प्रधाना
ब्रह्मशक्तयः ।
ततश्च देवा मैत्रेय न्यूना
दक्षादयस्ततः ॥ ५८ ॥
हे मैत्रेया ! अग्निच्या जवळ किंवा दूर असल्याने
त्याच्या प्रकाशात जसा अधिकता आणि न्यूनतेचा भेद असतो त्याचप्रकारे ब्रह्माच्या
शक्तितही तारतम्य आहे .हे ब्रह्मन ! ब्रह्मा, विष्णु आणि शिव ब्रह्माच्या प्रधान शक्ति आहेत, त्यांच्याहून
न्यून देवगण आहेत आणि त्यांच्याही नंतर दक्ष आदि प्रजापतिगण आहेत .
ततो मनुष्याः पशवौ मृगपक्षिसरीसृपाः
।
न्यूनान्यूनतराश्चैव
वृक्षगुल्मादयस्तथा ॥ ५९ ॥
त्यांच्याहूनही न्यून मनुष्य, पशु, पक्षी, मृग आणि
सरीसृपादि आहेत तथा त्यांच्याहूनही अत्यंत न्यून वृक्ष, गुल्म आणि लता
आदि आहेत .
तदेतदक्षरं नित्यं जगन्मुनिवराखिलम्
।
आविर्भावतिरोभावजन्मनाशविकल्पवत् ॥
६० ॥
म्हणून हे मुनिवरा ! आविर्भाव (उत्पन्न होणे)
तिरोभाव (नाहिसे होणे) जन्म आणि नाश आदि विकल्पांनी युक्त हे सम्पूर्ण जगत
वास्तवात नित्य आणि अक्षय आहे .
सर्वशक्ति मयो विष्णुः स्वरूपं ब्रह्मणः परम् ।
मूर्तं यद्योगिभिः पुर्वं
योगारम्भेषु चिन्त्यते ॥ ६१ ॥
सर्वशक्तिमय विष्णुच ब्रह्माचे पर-स्वरूप तथा
मूर्तरूप आहे ज्याचे योगिजन योगारंभा द्वारा पूर्वचिन्तन करतात .
सालम्बनो महायोगः सबीजो यत्र
संस्थितः ।
मनस्यव्याहते सम्यग्युञ्जतां जायते
मुने ॥ ६२ ॥
स परः परशक्तीनां ब्रह्मणः समनन्तरम्
।
मूर्तं ब्रह्म महाभाग सर्वब्रह्ममयो
हरिः ॥ ६३ ॥
हे मुने ! ज्याच्यात मनाला सम्यक प्रकारे निरंतर
एकाग्र करून आलम्बनयुक्त सबीज (सम्प्रज्ञात) महायोगाची प्राप्ति होते, हे महाभागा !
तो सर्वब्रह्ममय श्रीविष्णुभगवान समस्त परा शक्तिंमध्ये प्रधान व ब्रह्माच्या
अत्यंत निकटवर्ती मूर्त-ब्रह्मस्वरूप आहे .
यत्र सर्वमिदं प्रोतमोतं चैवाखितं
जगत् ।
ततो जगज्जगत्यस्मिन्स जगच्चखिलं मुने
॥ ६४ ॥
हे मुने ! त्याच्यातच हे सम्पूर्ण जगत ओतप्रोत
आहे, त्याच्यापासूनच
उत्पन्न झाले आहे, त्याच्यातच
स्थित आहे आणि स्वयं तोच समस्त जगत आहे .
क्षराक्षरमयो
विष्णुर्बिभर्त्यखिलमीश्वरः ।
पुरुषाव्याकृतमयं
भूषणास्त्रस्वरूपवत् ॥ ६५ ॥
क्षराक्षरमय (कार्यकारण-रूप) ईश्वर विष्णुच हे
पुरुष प्रकृतिमय सम्पूर्ण जगताला आपल्या आभूषण व आयुधरूपात धारण करतो .
श्रीमैत्रेय उवाच
भूषणास्त्रस्वरूपस्थं यच्चैतदखिलं
जगत् ।
बिभर्ति
भगवन्विष्णुस्तन्ममाख्यातुमर्हसि ॥ ६६ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले – भगवान विष्णु
ह्या संसाराला भूषण व आयुधरूपात कशाप्रकारे धारण करतो हे तुम्ही मला सांगा .
श्रीपराशर
उवाच
नमस्कृत्वाप्रमेयाय
विष्णवे प्रभविष्णवे ।
कथयामि
यथाख्यातं वसिष्ठेन ममाभवत् ॥ ६७ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे मुने ! जगताचे पालन करणार्या
अप्रेमय श्रीविष्णुला नमस्कार करून आता मी, ज्याप्रकारे वसिष्ठांनी मला सांगितले ते तुला
ऐकवतो .
आत्मानमस्य जगतो निर्लेपमगुणामलम् ।
बिभर्ति कौस्तुभमणिस्वरूपं
भगवान्हरिः ॥ ६८ ॥
ह्या जगतातल्या निर्लेप, निर्गुण व
निर्मल आत्म्याला म्हणजेच अर्थात शुद्ध क्षेत्रज्ञ स्वरूपाला श्रीहरि
कौस्तुभमणिरूपाने धारण करतो .
श्रीवत्ससंस्थानधरमनन्तेन समाश्रितम्
।
प्रधानं बुद्धिरप्यास्ते गदारूपेण
माधवे ॥ ६९ ॥
श्रीअनंताने प्रधानाला श्रीवत्सरूपात आश्रय दिला
आहे आणि बुद्धि श्रीमाधवाच्या गदारूपात स्थित आहे .
भूतादिमिन्द्रियादिं च द्विधाहङ्कारमीश्वरः
।
बिभर्ति शंखरूपेण शार्ङ्गरूपेण च
स्थितम् ॥ ७० ॥
भूतांमुळे तामस अहंकार व इन्द्रियांमुळे राजस
अहंकार हे दोन्ही तो शंख व शारंङ्ग धनुष्यरूपात धारण करतो .
चलत्स्वरूपमत्यन्तं जवेनान्तारितानिलम् ।
चक्रस्वरूपं
च मनो धत्ते विष्णुकरे स्थितम् ॥ ७१ ॥
आपल्या वेगाणे पवनाला देखिल पराजित करणारा अत्यंत
चंचल, सात्त्विक
अहंकाररूप मन श्रीविष्णुच्या कर-कमलांमध्ये स्थित चक्राचे रूप धारण करते .
पञ्चरूपा तु या माला वैजयन्ती
गदाभृतः ।
सा भूतहेतुसङ्घाता भूतमाला च वै
द्विज ॥ ७२ ॥
हे द्विजा ! भगवान गदाधराची [मुक्ता, माणिक्य, मरकत, इन्द्रनील आणि
हीरकमयी] पंचरूपा वैजयन्ती माला पंचतन्मात्रा व पंचभूतांचाच संघात आहे .
यानीन्द्रियाण्यशेषाणि
बुद्धिकर्मात्मकानि वै ।
शररूपाण्यशेषाणि तानि धत्ते जनार्दनः
॥ ७३ ॥
जी ज्ञान आणि कर्ममयी इन्द्रिये आहेत त्या
सर्वांना श्रीजनार्दन बाणरूपात धारण करतात .
बिभर्ति यच्चासिरत्नमच्युतोत्यन्तनिर्मलम् ।
विद्यामय तु
तज्ज्ञानमविद्याकोशसंस्थितम् ॥ ७४ ॥
भगवान अच्युत जो अत्यंत निर्मल खड्ग धारण करतो तो
विद्यामय कोशाने आच्छादित विद्यामय ज्ञानच आहे .
इत्थं पुमान्प्रधानं च बुद्ध्यहङ्कारमेव
च ।
भूतानि च हृषीकेशे मनः
सर्वेन्द्रियाणि च ।
विद्याविद्ये च मैत्रेय
सर्वमेतत्समाश्रितम् ॥ ७५ ॥
हे मैत्रेया ! अशाप्रकारे पुरुष, प्रधान, बुद्धि, अहंकार, मन, पंचभूत, इन्द्रियाँ तथा
विद्या आणि अविद्या सर्वच श्रीऋषिकेशात आश्रित आहेत .
अस्त्रभूषणसंस्थानस्वरूपं रूपवर्जितः ।
बिभार्ति
मायारूपोसौ श्रेयसे प्राणिनां हरिः ॥ ७६ ॥
श्रीहरि रूपरहित असूनही मायामयरूपाने
प्राण्यांच्या कल्याणासाठी त्या सर्वाना अस्त्र व भूषणरूपात धारण करतो .
सविकारं प्रधानं च पुमांसमखिलं जगत् ।
बिभर्ति पुण्डहीकाक्षस्तदेवं
परमेश्वरः ॥ ७७ ॥
अशाप्रकारे तो कमलनयन परमेश्वर सविकार प्रधान
(निर्विकार), पुरुष
तथा सम्पूर्ण जगताला धारण करतो .
या विद्या या तथाविद्या
यत्सद्यच्चासदव्ययम् ।
तत्सर्वं सर्वभूतेशे मैत्रेय
मधुसूदने ॥ ७८ ॥
जे काही विद्या–अविद्या, सत-असत तसेच
अव्ययरूप आहे, हे
मैत्रेया ! ते सर्व सर्वभुतेश्वर श्रीमधुसुदनातच स्थित आहे .
कलाकाष्ठानिमेषादिदिनर्त्वयनहायनैः ।
कालस्वरूपो भगवानपापो हरिरव्ययः ॥ ७९
॥
कला, काष्ठा, निमेष, दिन, ऋतू, अयन आणि वर्षरूपाने तो कालस्वरूप निष्पाप अव्यय
श्रीहरिच विराजमान आहे .
भूर्लोकोथ भुवर्लोकः स्वर्लोको
मुनिसत्तम ।
महर्जनस्तपः सत्यं सप्त लोका इमे
विभुः ॥ ८० ॥
हे मुनिश्रेष्ठा ! भूर्लोक, भुवर्लोक आणि
स्वर्लोक तथा मह, जन, तप और सत्य आदि
सातही लोक सुद्धा सर्वव्यापक भगवंतच आहे .
लोकात्ममूर्तिः सर्वेषां पूर्वेषामपि पूर्वजः ।
आधारः
सर्वविद्यानां स्वयमेव हरिः स्थितः ॥ ८१ ॥
सर्व पूर्वजांचे पूर्वज तसेच समस्त विद्यांचा
आधार श्रीहरि स्वयं लोकमयस्वरूपात स्थित आहे .
देवमानुषपश्वादिश्वरूपैर्बहुभिः
स्थितः ।
ततः सर्वेश्वरोऽनन्तो
भूतमूर्तिरमूर्तिमान् ॥ ८२ ॥
निराकार आणि सर्वेश्वर श्रीअनंतच भूतस्वरूप होऊन
देव, मनुष्य
आणि पशु आदि नानारूपात स्थित आहे .
ऋचो यजूंषि सामानि तथैवाथर्वणानि वै
।
इतिहासोपवेदाश्च वेदान्तेषु तथोक्तयः
॥ ८३ ॥
वेदाङ्गानि समस्तानि मन्वादिगदितानि
च ।
शास्त्राण्यशेषाण्याख्यानान्यनुवाकाश्च
ये क्वचित् ॥ ८४ ॥
काव्यालापाश्च ये केचिद्गीतकान्यखिलानि
च ।
शब्दमूर्तिधरस्यैतद्वपुर्विष्णोर्महात्मनः
॥ ८५ ॥
ऋक, यजु:, साम आणि अर्थववेद, इतिहास (महाभारतादि), उपवेद
(आयुर्वेदादि), वेदान्तवाक्य, समस्त वेदांग, मनु आदि कथित
समस्त धर्मशास्त्र, पुराणादि
सकल शास्त्र, आख्यान, अनुवाक
(कल्पसूत्र) तथा समस्त काव्य-चर्चा आणि रागरागिणी आदि जे काही आहे ते सर्वच
शब्दमुर्तिधारी परमात्मा विष्णुचेच शरीर आहे .
यानि मूर्तान्यमूर्तानि
यान्यत्रान्यत्र वा क्वचित् ।
सन्ति वै वस्तुजातानि तानि सर्वाणि
तद्वपुः ॥ ८६ ॥
ह्या लोकी किंवा इतर कुठेही जितके मूर्त, अमूर्त पदार्थ
आहेत, ते
सर्व त्याचेच शरीर आहे .
अहं हरिः सर्वमिदं जनार्दनो
नान्यत्ततः कारणकार्यजातम् ।
ईदृङ्मनो यस्य न तस्यट भूयो भवोद्भावा
द्वन्द्वगदा भवन्ति ॥ ८७ ॥
‘मी
तसेच हे सम्पूर्ण जगत जनार्दन श्रीहरिच आहे; त्याच्याहून भिन्न आणि काहीही कार्य-
कारणादि नाही’ – ज्याच्या
मनात अशी भावना आहे त्याला राग-द्वेषादि द्वन्दरूप रोगांची प्राप्ती नाही होत .
इत्यैष तेंशः प्रथमः पुराणस्यास्य वै
द्विज ।
यथावत्कथितो यस्मिन्धृते पापैः
प्रमुच्यते ॥ ८८ ॥
हे द्विजा ! अशाप्रकारे तुला पुराणाच्या पहिल्या
अंशाने यथावत वर्णन केले. ह्याचे श्रवण केल्याने मनुष्य समस्त पापांतून मुक्त होतो .
कार्त्तिक्यां पुष्करस्नाने
द्वादशाब्देन यत्फलम् ।
तदस्य श्रवणात्सर्वं मैत्रेयाप्नोति
मानवः ॥ ८९ ॥
हे मैत्रेया ! बारा वर्ष कार्तिक मासात
पुष्करक्षेत्रात स्नान केल्याने जे फल मिळते, ते सर्व मनुष्याला ह्याच्या श्रवणमात्राने मिळते .
देवर्षिपितृगन्धर्वयक्षादिनां च
सम्भवम् ।
भवन्ति शृण्वतः पुंसो देवाद्या वरदा
मुने ॥ ९० ॥
हे मुने ! देव, ऋषि, गन्धर्व, पितृ आणि यक्ष
आदिंच्या उत्पत्तिचे श्रवण करणार्या पुरुषाला ते देवादि वरदायक होतात .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे द्वाविशोऽध्याय"
।। इति श्रीपराशरमुनिविरचिते श्रीविष्णुपरत्वनिर्णायके श्रीमति विष्णु-महापुराणे प्रथम: अंश: समाप्त ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा