॥ प्रथमः अंशः ॥ ॥ एकविंऽशोध्यायः ॥
"कश्यपांच्या
अन्य स्त्रियांचे वंश व मरुद्गणांच्या उत्पत्तिचे वर्णन"
पराशर उवाच
संह्लादपुत्र आयुष्माञ्छिबिर्बाष्कल
एव च ।
विरोचनस्तु प्राह्लदिर्बलिर्जज्ञे
विरोचनात् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले– संह्लादचे पुत्र आयुष्मान शिवि आणि
बाष्कल होते व प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि त्याच्यापासून बलिचा जन्म झाला.
बलेः पुत्रशतं त्वसीद्बाणज्येष्ठं महामुने ।
हिरण्याक्षसुताश्चासन्सर्व एव महा
बला ॥ २ ॥
उत्कुरः शकुनिश्चैव भूतसन्तापनस्तथा ।
महानाभो महाबाहुः कालनाभस्तथापरः ॥ ३
॥
हे महामुने ! बलिचे शंभर पुत्र होते ज्यात बाणासुर सर्वात
मोठा होता. हिरण्याक्षाचे पुत्र उत्कुर, शकुनि, भूतसंतापन, महानाभ, महाबाहू तथा कालनाभ आदि सर्वच महाबलवान होते .
अभवन्दनुपुत्राश्च द्विमूर्धा
शम्बरस्तथा ।
अयोमुखः शङ्कुशिराः कपिलः शङ्करस्तथा
॥ ४ ॥
एकचक्रो महाबाहुस्तारकश्च महाबलः ।
स्वर्भानुर्वृषपर्वा च पुलोमश्च च
महाबलः ॥ ५ ॥
एते दनोः सुताः ख्याता विप्रचित्तिश्च विर्यवान्
॥ ६ ॥
दनुचे पुत्र द्विमुर्धा, शम्बर, अयोमुख, शंकुशिरा, कपिल, शंकर, एकचक्र, महाबाहू, तारक, महाबल, स्वर्भानु, वृषपर्वा, महाबली पुलोम
आणि परमपराक्रमी विप्रचिति होते. हे सर्व दनु पुत्र विख्यात आहेत .
स्वर्भानोस्तु प्रभा कन्या शर्मिष्ठा
वार्षपर्वणी ।
उपदानी हयशिरः प्रख्याता वरकन्यकाः ॥
७ ॥
स्वर्भानुची कन्या प्रभा होती तर शर्मिष्ठा, उपदानी आणि
हयशिरा ह्या वृषपर्वाच्या परम सुन्दर कन्या विख्यात आहेत .
वैश्वानरसुते चोभे पुलोमा कालका तथा
।
उभे सुते महाभागे मारीचेस्तु
परिग्रहः ॥ ८ ॥
वैश्वानराच्या पुलोमा आणि कालका ह्या दोन कन्या
होत्या. हे महाभागा ! ह्या दोन्ही कन्या मरीचिनन्दन कश्यपांच्या पत्नी झाल्या .
ताभ्यां पुत्रसहस्राणि
षष्टिर्दानवसत्तमाः ।
पौलोमाः कालकेयाश्च मारीचतनयाः
स्मृताः ॥ ९ ॥
त्यांचे पुत्र साठ हजार दानव-श्रेष्ठ झाले.
मरीचिनन्दन कश्यपांचे ते सर्व पुत्र पौलोम आणि कालकेय म्हणून ओळखले जातात .
ततोऽपरे महावीर्या दारुणास्त्वतिनिर्घृणा ।
सिंहिकायामथोत्पन्ना
विप्रचित्ते सुतास्तथा ॥ १० ॥
ह्यांच्या व्यतिरिक्त विप्रचित्तिला सिंहिकेच्या
गर्भापासून आणखी अनेक महाबलवान, भयंकर आणि अतिक्रूर पुत्र उत्पन्न झाले .
व्यंशः शल्यश्च बलवान् नभश्चैव
महाबलः ।
वातापी नमुचिश्चैव इल्वलः खसृमस्तथा
॥ ११ ॥
अन्धको नरकश्चैव कालनाभस्तथैव च ।
स्वर्भानुश्च महावीर्यो वक्त्रयोधी
महासुरः ॥ १२ ॥
ते व्यंश, शल्य, बलवान नभ, महाबली वातापी, नमुचि, इल्वल, खसृम, अंधक, नरक, कालनाभ, महावीर, स्वर्भानु आणि
महादैत्य वक्त्रयोधी होते .
एते वै दानवाः श्रेष्ठा
दनुवंशविवर्धनाः ।
एतेषां पुत्रपौत्रश्च शतशोऽथ सहस्रशः
॥ १३ ॥
ते सगळे दानवश्रेष्ठ दनुच्या वंशाची वृद्धी
करणारे होते. त्यांना आणखी शकडो हजारो पुत्र पौत्र झाले .
प्रह्लादस्य तु दैत्यस्य निवातकवचाः
कुले ।
समुत्पन्नाः सुमहता तपसा भावितात्मनः
॥ १४ ॥
महान तपस्याद्वारा आत्मज्ञानसम्पन्न दैत्यवर
प्रल्हादाच्या कुळात
निवातकवच नावाचे दैत्य उत्पन्न झाले .
षट् सुताः सुमहासत्त्वास्ताम्रायाः
परिकीर्तिताः ।
शुकी श्येनी च भासी च
सुग्रीवीशुचिगृध्रिकाः ॥ १५ ॥
कश्यपांची स्त्री ताम्रा हिच्या शुकी, श्येनी, भासी, सुग्रीवी, शुचि आणि
गृदध्रिका – ह्या सहा अति प्रभावशालीनी कन्या आहेत .
शुकी शुकानजनयदुलूकप्रत्युलूकिकान् ।
श्येनी
श्येनांस्तथा भासी भासान्गृध्रांश्च गृद्ध्र्यपि ॥ १६ ॥
शुकीपासून शुक, उलूक तसेच उलुकाचे प्रतिपक्षी काक
आदि उत्पन्न झाले व श्येनीपासून श्येन (ससाणा), भासीपासून भास आणि गृदध्रिकापासून गृद्धांचा
(गिधाड) जन्म झाला .
शुच्यौदकान्पक्षिगणान्सुग्रीवी तु
व्यजायत ।
अश्वानुष्ट्रान्गर्दभांश्च
ताम्रावंशः प्रकीर्तितः ॥ १७ ॥
शुचिपासून जलातील पक्षिगण आणि सुग्रीव्रीपासून
अश्व, उष्ट्र
आणि गर्दभांची उत्पत्ति झाली. अशाप्रकारे हा ताम्राचा वंश म्हणून ओळखला जातो .
विनतायास्तु द्वौ पुत्रौ विरतौ गरुडारुणौ ।
सुपर्णः पततां श्रेष्ठो दारुणः
पन्नगाशनः ॥ १८ ॥
विनताचे गरुड आणि अरुण हे दोन पुत्र विख्यात
आहेत. पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ सुपर्ण (गरुड) अति भयंकर आणि सर्पांना खाणारा आहे .
सुरसायां सहस्रं तु
सर्पाणाममितौजसाम् ।
अनेकशिरसां ब्रह्मन् खेचराणां
महात्मनाम् ॥ १९ ॥
हे ब्रह्मन ! सुरसापासून सहस्र सर्प उत्पन्न झाले
जे अतिशय प्रभावशाली, आकाशात
विचरण करणारे, अनेक
मस्तके असलेले आणि विशालकाय होते.
काद्रवेयास्तु बलिनः सहस्रममितौजसः ।
सुपर्णवशागा ब्रह्मन् जज्ञिरे
नैकमस्तकाः ॥ २० ॥
आणि कद्रूचे पुत्र सुद्धा महाबली आणि अमित
तेजस्वी अनेक मस्तके असलेले सहस्र सर्पच झाले जे गरूडाला वश आहेत .
तेषां प्रधानभूतास्तु शेषवासुकितक्षकाः ।
शङ्खश्वेतो
महापद्मः कम्बलाश्वतरौ तथा ॥ २१ ॥
एलापुत्रस्तथा
नागः कर्कोटकधनञ्जयौ ।
एते
चान्ये च बहवो दन्दशुका विषोल्बणा ॥ २२ ॥
त्यांच्यात शेष, वासुकि, तक्षक शंखश्वेत, महापद्म, कम्बल, अश्वतर, एलापुत्र, नाग, कर्कोटक, धनजंय तथा
आणखीही अनेक उग्र विषधर तसेच दंश करणारे सर्प प्रधान आहेत .
गणं क्रोधवशं विद्धि तस्याः सर्वे च
दंष्ट्रिणः ।
स्थलजाः पक्षिणोब्जाश्च दारुणाः
पिशिताशनाः ॥ २३ ॥
क्रोधवशाचे पुत्र क्रोधवशगण आहेत. ते सर्व मोठ्या
दाढा असणारे, भयंकर
आणि कच्चे मांस खाणारे जलचर, स्थलचर आणि पक्षिगण आहेत .
क्रोधात्तु पिशाचांश्च जनयामास
महाबलान् ।
गास्तु वै जनयामास
सुराभीर्महिषीस्तथा ।
इरावृक्षलतावल्लीस्तृणजातीश्च सर्वशः
॥ २४ ॥
महाबली पिशाचांना सुद्धा क्रोधानेच जन्म दिला. सुरभिपासून
गायी म्हशींची उत्पत्ति झाली तसेच इरापासून वृक्ष, लता, वेली आणि सर्व
प्रकारचे तृण उत्पन्न झाले .
स्वसा तु यक्षरक्षांसि मुनिरप्सरसस्तथा ।
अरीष्टा
तु महासत्त्वान् गन्धर्वान्समजीजनत् ॥ २५ ॥
स्वसाने यक्ष आणि राक्षसांना, मुनिने
अप्सरांना तसेच अरिष्टाने अति समर्थ गन्धर्वांना जन्म दिला .
एते कश्यपदायादाः कीर्तिताः
स्थाणुजङ्गमाः ।
तेषां पुत्राश्च पौत्राश्च शतशोऽथ
सहस्रशः ॥ २६ ॥
ही सर्व स्थावर जंगम कश्यपांची संतती झाली आणि
त्यांना सुद्धा पुढे शेकडो हजारो पुत्र पौत्र झाले .
एष मन्वन्तरे सर्गो
ब्रह्मन्स्वारोचिषे स्मृतः ॥ २७ ॥
हे ब्रह्मन ! हे खारोचिष मन्वन्तरातील सृष्टिचे
वर्णन म्हणून ओळखले जाते .
वैवस्वते च महति वारुणे वितते कृतौ ।
जुह्वानस्य ब्रह्मणो वै प्रजासर्ग
इहोच्यते ॥ २८ ॥
वैवस्वत मन्वन्तराच्या आरंभी महान वारुण यज्ञ
झाला, त्यात
ब्रह्माजी 'होता' होते, आता मी
त्यांच्या प्रजेचे वर्णन करतो.
पूर्वं यत्र तु
सप्तर्षिनुत्पन्नान्सप्तमानसान् ।
पुत्रत्वे कल्पयामास स्वयमेव पितामहः
।
गन्धर्वभोगिदेवानां दानवानां च सत्तम
॥ २९ ॥
हे साधूश्रेष्ठा ! पूर्व मन्वन्तरात जो
सप्तर्षिगण स्वयं ब्रह्मापासून मानसपुत्ररूपात उत्पन्न झाला होता, त्यांनाच
ब्रह्माने ह्या कल्पात गन्धर्व, नाग, देव आणि दानवादिंच्या पितृरूपाने निश्चित केले .
दितिर्विनष्टपुत्रा वै तोषयामास काश्यपम् ।
तया
चाराधितः सम्यक् काश्यपस्तपतां परः ॥ ३० ॥
वरेण च्छन्दयामास सा च वव्रे ततो वरम् ।
पुत्रमिन्द्रवधार्थाय
समर्थममितौजसम् ॥ ३१ ॥
पुत्र नष्ट झाल्यावर दितिने कश्यपांना प्रसन्न
केले. तिच्या सम्यक
आराधनेने संतुष्ट होऊन श्रेष्ठ तपस्वी कश्यपांनी तिला वर देऊन प्रसन्न केले.
तेव्हा तिने इंद्राचा वध करण्यास समर्थ अशा एका अति तेजस्वी पुत्राचा वर मागितला .
स च तस्मै वरं प्रादाद्भार्यायै
मुनिसत्तमः ।
दत्त्वा च वरमत्युग्रं
कश्यपस्तामुवाच ह ॥ ३२ ॥
मुनिश्रेष्ठ कश्यपांनी आपली भार्या दिति हिला तो
वर दिला आणि तो अति उग्र वर देताना ते म्हणाले .
शक्रं पुत्रो निहन्ता ते यदि गर्भं
शरच्छतम् ।
समाहितातिप्रयता शौचिनी धारयिष्यसि ॥
३३ ॥
जर तु भगवंताच्या ध्यानात तत्पर राहून आपला गर्भ
शौच [हे सुन्दरी ! गर्भिणी स्त्रीने सायंकाळी भोजन करू नये, वृक्षांखाली
जाऊ नये आणि तिथे थांबूही नये, तसेच लोकांशी कलह करणे व आळस काढणे सोडून द्यावे, कधीच केस मोकळे
सोडू नयेत आणि अपवित्र राहू नये ] आणि संयमपूर्वक शंभर वर्षांपर्यंत धारण करू शकलीस
तर तुझा पुत्र इंद्राला मारणारा होईल’ .
इत्येवमुक्त्वा तां देवीं सङ्गतः
कश्यपो मुनिः ।
दधार सा च तं गर्भं
सम्यक्छौचसमन्विता ॥ ३४ ॥
असे सांगून मुनि कश्यपांनी त्या देवीसोबत संगमन
केले आणि तिने अतिशय शौचपूर्वक राहून तो गर्भ धारण केला .
गर्भमात्मवधार्थाय ज्ञात्वा तं
मघवानपि ।
शुश्रूषुस्तामथागच्छद्विनयादमराधिपः
॥ ३५ ॥
तो गर्भ आपल्या वधाचे कारण होणार हे जाणून देवराज
इंद्र देखिल विनयपूर्वक तिची सेवा करण्यासाठी आला .
तस्याश्चैवान्तरप्रेप्सुरतिष्ठत्पाकशासनः
।
ऊने वर्षशते चास्या
ददर्शान्तरमात्मना ॥ ३६ ॥
तिच्या शौचादित कधी काही चूक होते का- हे
पाहायलाच इंद्र तिथे सतत उपस्थित राहात होता. शेवटी शंभर वर्ष व्हायला अगदी कमी
काळ असताना त्याला एक चूक दिसलीच .
अकृत्वा पादयोः शौचं दितिः
शयनमाविशत् ।
निद्रां चाहारयामास तस्याः कुक्षिं
प्रविश्य सः ॥ ३७ ॥
वज्रपाणिर्महागर्भं चिच्छेदाथ स
सप्तधा ।
सम्पीड्यमानो वज्रेण स
रुरोदादिदारुणम् ॥ ३८ ॥
एके दिवशी दिति चरण शुद्धि न करताच शय्येवर झोपली
होती. त्यावेळी निद्रेने तिला घेरले होते. तेव्हा इंद्र हातात वज्र घेऊन
तिच्या कुक्षित घुसला आणि त्या महागर्भाचे सात तुकड़े केले. अशाप्रकारे वज्राने
पीड़ित झाल्याने तो गर्भ जोर-जोरात रडू लागला .
मा रोदीरिति तं शक्रः पुनःपुनरभाषत ।
सोऽभवत्सप्तधा गर्भस्तमिद्रः कुपितः
पुनः ॥ ३९ ॥
एकैकं सप्तधा चक्रे
वज्रेणारिविदारिणा ।
मरुतो नाम देवास्ते बभूवुरतिवेगिनः ॥
४० ॥
इंद्राने त्याला पुन्हा पुन्हा 'रडू नको' म्हटले. पण
जेव्हा तो
गर्भ सात भागात विभक्त झाला तेव्हा इंद्राने अत्यंत क्रोधित होऊन आपल्या शत्रु
विनाशक वज्राने एका एकाचे सात–सात आणखी तुकड़े केले. ते सगळे अति वेगवान मरुत नामक
देवता झाले .
यदुक्तं वै भगवता तेनैव मरुतोऽभवन् ।
देवा एकोनपच्चाशत्सहाया वज्रपाणिनः ॥
४१ ॥
इंद्राने म्हटले होते ‘मा रोदी:’ (रडू नको)
म्हणून ते मरुत म्हणून ओळखले गेले. हे एकोणपन्नास मरुद्गण इंद्राचे सहायक देवता
झाले .
इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे एकविंशोऽध्यायः (२१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा