रविवार, २५ जानेवारी, २०२६

विष्णुपुराण, प्रथम अंश, विंशति अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 20

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः ॥ विंशोऽध्यायः ॥

 

"प्रल्हादकृत भगवंत-स्तुति आणि भगवंताचा आविर्भाव"



 
श्रीपराशर उवाच -
 
एवं सञ्चिन्तयन्विष्णुमभेदेनात्मनो द्विज ।
 
तन्मयत्वमवाप्यग्र्यं मेने चात्मानमच्युतम् ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– हे द्विजा ! अशाप्रकारे भगवान विष्णुचे अभिन्न चिन्तन करत  पूर्ण तन्मयता प्राप्त झाल्याने त्याने स्वतःचा अच्युत रूपातील अनुभव घेतला .

 

 

विसस्मार तथात्मानं नान्यत्किञ्चिदजानत ।
 
अहमेवाव्ययोऽनन्तः परमात्मेत्यचिन्तयत् ॥ २ ॥

तो स्वतःला पूर्णपणे विसरला आणि त्यावेळी त्याला श्रीविष्णु व्यतिरिक्त आणखी काहीही स्मरणात नव्हते . केवळ ही एकच भावना मनात होती की मीच अव्यय आणि अनंत परमात्मा आहे  .

 


 
तस्य तद्‌भावनायोगात्क्षीणपापस्य वै क्रमात् ।
 
शुद्धेन्तःकरणे विष्णुस्तस्थौ ज्ञानमयोऽच्युतः ॥ ३ ॥

ह्या भावने मुळे तो क्षीण-पाप झाला आणि त्याच्या शुद्ध अंत:करणात ज्ञानस्वरूप अच्युत श्रीविष्णु विराजमान झाले .



 
योगप्रभावात्प्रह्लादे जाते विष्णुमयेऽसुरे ।
 
चलत्युरगबन्धैस्तैर्मैत्रेय त्रुटितं क्षणात् ॥ ४ ॥

हे मैत्रेया ! अशाप्रकारे योगबलाने असुर प्रल्हाद विष्णुमय झाल्याने त्याच्या विचलित झाल्याने ते नागपाश एका क्षणातच तुटले .

 


 
भ्रान्तग्राहगणः सोर्मिर्ययौ क्षोभं महार्णवः ।
 
चचाल च मही सर्वा सशैलवनकानना ॥ ५ ॥

भ्रमणशील ग्राहगण आणि तरलतरंगांनी पूर्ण सम्पूर्ण महासागर क्षुब्ध झाला तसेच पर्वत आणि वन उपवनांनी पूर्ण असलेली समस्त पृथ्वी हलु लागली .



 
स च तं शैलसङ्‍घातं दैत्यैर्न्यस्तमथोपरि ।
 
उत्क्षिप्य तस्मात्सलिलान्निश्चक्राम महामतिः ॥ ६ ॥

तसेच महामति प्रल्हाद आपल्यावर दैत्यांद्वारा लादलेल्या सम्पूर्ण पर्वत-समूहाला दूर फेकून  जलातून बाहेर आला .

 


 
दृष्ट्‍वा च स जगद्‌भूयो गगनाद्युपलक्षणम् ।
 
प्रह्लादोऽस्मीति सस्मार पुनरात्मानमात्मनि ॥ ७ ॥

तेव्हा आकाशादिरूप जगत परत पाहून स्वतःच्या मनात त्याला हे भान आले की मी प्रल्हाद आहे  .

 


 
तुष्टाव च पुनर्धीमाननादिं पुरुषोत्तमम् ।
 
एकाग्रमतिरव्यग्रो यतवाक्वायमानसः ॥ ८ ॥

आणि त्या महाबुद्धिमानाने मन, वाणी आणि शरीराने संयमपूर्वक धैर्य धारण करून एकाग्र-चित्ताने  त्याने पुन्हा भगवान अनादि पुरुषोत्तमाची स्तुति केली .

 

 

प्रह्लाद उवाच -
 
ॐ नमः परमार्थार्थ स्थूल सूक्ष्म क्षराक्षर ।
 
व्यक्ताव्यक्त कलातीत सकलेश निरञ्जन ॥ ९ ॥

प्रल्हाद बोलू लागलाहे परमार्था ! हे अर्था (दृश्यरूप) ! हे स्थूलसूक्ष्मा (जाग्रत- स्वप्रदृश्यस्वरूप) ! हे क्षराक्षरा (कार्य- कारणरूप) हे व्यक्ताव्यक्ता (दृश्यादृश्यस्वरूप) ! हे कलातीता ! हे सकलेश्वरा ! हे निरंजन देवा ! तुम्हाला नमस्कार .

 

 

गुणाञ्जन गुणाधार निर्गुणात्मन् गुणस्थित ।
 
मूर्तामूर्तमहामूर्ते सूक्ष्ममूर्ते स्फुटास्फुट ॥ १० ॥

हे गुणांना अनुरंजित करणार्‍या ! हे गुणाधारा ! हे निर्गुणात्मना ! हे गुणस्थिता ! हे मूर्ता आणि अमूर्तरूपी महामुर्तिमना ! हे सूक्ष्ममूर्ते ! हे प्रकाशाप्रकाशस्वरुपा ! (तुम्हाला नमस्कार) .

 

 

करालसौम्यरूपात्मन्विद्याऽविद्यामयाच्युत ।
 
सदसद्‍रूपसद्‌भाव सदसद्‌भावभावन ॥ ११ ॥

हे विकराला आणि सुंदररूपा ! हे विद्या आणि अविद्यामय अच्युता ! हे सदसद् (कार्यकारण) रूपी जगताच्या उद्भवस्थाना आणि सदसज्जगताच्या पालका ! .

 

 

नित्यानित्यप्रपञ्चात्मन्निष्प्रपञ्चामलाश्रित ।
 
एकानेक नमस्तुभ्यं वासुदेवादिकारण ॥ १२ ॥

हे नित्यानित्य (आकाशघटादिरूप) प्रपंचात्मना ! हे प्रपंचापासून पृथक राहणार्‍या ज्ञानिजनांच्या आश्रयरूपा ! हे एकानेकरूप आदिकारण वासुदेवा ! .

 

 

यः स्थूलसूक्ष्मः प्रकटः प्रकाशो यः सर्वभूतो न च सर्वभूतः ।
विश्वं यतश्चैतदविश्वहेतो- नमोऽस्तु तस्मै पुरुषोत्तमाय ॥ १३ ॥

जो स्थूल-सूक्ष्मरूप आणि स्फुट-प्रकाशमय आहे, जो अधिष्ठानरूपाने सर्वभूतस्वरूप तरीही वस्तुत: सम्पूर्ण भूतादिंच्या पलिकडे आहे, विश्वाचे कारण नसतानाही ज्याच्या पासून हे समस्त विश्व उत्पन्न झाले आहे, उन पुरुषोत्तम भगवंताला नमस्कार .

 



 
पराशर उवाच -
 
तस्य तच्चेतसो देवः स्तुतिमित्थं प्रकृर्वतः ।
 
आविर्बभूव भगवान् पीताम्बरधरो हरिः ॥ १४ ॥

श्रीपराशर म्हणालेत्याने अशाप्रकारे तन्मयतापूर्वक स्तुति केल्यावर पीताम्बरधारी देवाधिदेव भगवान हरि प्रकट झाला .

 

 

ससम्भ्रमस्तमालोक्य समुत्थायाकुलाक्षरम् ।
 
नमोस्तु विष्णवेत्येतद् व्याजहारासकृद् द्विज ॥ १५ ॥

हे द्विजा ! त्याला अचानक प्रकट झालेले पाहून तो उभा राहिला व गदगद वाणीनेविष्णुला नमस्कार ! विष्णुला नमस्कार !असे वारंवार म्हणू लागला .




 
प्रह्लाद उवाच -
 
देव प्रपन्नार्तिहर प्रसादं कुरु केशव ।
 
अवलोकनदानेन भूयो मां पावयाच्युत ॥ १६ ॥

प्रल्हाद म्हणालाहे शरणागत-दुःखहारी श्रीकेशवदेवा ! प्रसन्न व्हा हे अच्युता ! आपल्या पुण्यदर्शनाने मला परत परत पवित्र करा .



 
श्रीभगवान् उवाच -
 
कुर्वतस्ते प्रसन्नोऽहं भक्तिमव्यभिचारिणीम् ।
 
यथाभिलषितो मत्तः प्रह्लाद व्रीयतां वरः ॥ १७ ॥

श्रीभगवंत म्हणालेहे प्रल्हादा ! मी तुझ्या अनन्यभक्तिने अति प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग .

 


 
प्रह्लाद उवाच -
 
नाथ योनिसहस्रेषु येषु येषु व्रजाम्यहम् ।
 
तेषु तेष्वच्युताभक्तिरच्युतास्तु सदा त्वयि ॥ १८ ॥

प्रल्हाद म्हणालाहे नाथा ! सहस्र योनिंपैकी मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे हे अच्युता ! तुमच्यात माझी सर्वदा अक्षुण्ण भक्ति राहो .

 


 
या प्रीतिरविवेकानां विषयेष्वनपायिनी ।
 
त्वामनुस्मरतः सा मे हृदयान्मापसर्पतु ॥ १९ ॥

अविवेकी पुरुषांची जशी विषयांमध्ये अविचल प्रीति असते तसेच आपले स्मरण माझ्या ह्रदयापासून कधीच दूर न होवो .



 
श्रीभगवानुवाच -
 
मयि भक्तिस्तवास्त्येव भूयोऽप्येवं भविष्यति ।
 
वरस्तु मत्तः प्रह्लाद व्रीयतां यस्तवेप्सितः ॥ २० ॥

श्रीभगवान म्हणालेहे प्रल्हादा ! माझ्यात तर तुझी भक्ति आहेच आणि ह्या पुढेही ती तशीच राहील, पण ह्या शिवाय तुला आणखी ज्याची इच्छा असेल तो वर माग .

 


 
प्रह्लाद उवाच -
 
मयि द्वेषानुबन्धोऽभूत्संस्तुतावुद्यते तव ।
 
मत्पितुस्तत्कृतं पापं देव तस्य प्रमश्यतु ॥ २१ ॥

प्रल्हाद म्हणालाहे देवा ! तुमच्या स्तुतित  प्रवृत्त झाल्याने माझ्या पित्याच्या मनात माझ्याविषयी जो द्वेष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे त्यांना जे पाप लागल आहे ते नष्ट होऊ दे .

 


 
शस्त्राणि पातितान्यङ्‍गे क्षिप्तो यच्चाग्निसंहतौ ।
 
दंशितश्चोरगैर्दत्तं यद्विषं मम भोजने ॥ २२ ॥
 
बद्धा समुद्रे यत्क्षिप्तो यच्चितोऽस्मि शिलोच्चयैः ।
 
अन्यानि चाप्यसाधूनि यानि पित्रा कृताति मे ॥ २३ ॥
 
त्वयि भक्तिमतो द्वेषादघं तत्सम्भवं च यत् ।
 
त्वत्प्रसादात्प्रभो सद्यस्तेन मुच्येत मे पिता ॥ २४ ॥

ह्या व्यतिरिक्त माझ्या शरीरावर जे शस्त्राघात केले गेले – मला अग्निसमूहात घातले गेले, सर्पांकडून दंश करवला गेला, भोजनात विष दिले गेले, बांधून समुद्रात बुडवले गेले, शिळांनी दाबले गेले आणखीनही जो-जो दुर्व्यवहार पित्याने माझ्याशी केला ते सर्व तुमच्या प्रति  भक्ति असणार्‍या पुरुषाबद्दल द्वेषामुळे होते, त्यामुळे त्यांना जे पाप लागले आहे हे प्रभो ! आपल्या कृपेने माझे पिता त्यातून शीघ्र मुक्त होऊ देत .

 


 
श्रीभगवानुवाच -
 
प्रह्लाद सर्वमेतत्ते मत्प्रसादाद्‌भाविष्यति ।
 
अन्यच्च ते वरं दद्मि व्रीयतामसुरात्मज ॥ २५ ॥

श्रीभगवान म्हणालेहे प्रल्हादा ! माझ्या कृपेने तुझ्या ह्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे असुरकुमारा ! मी तुला आणखी एक वर देतो, जे हवे ते माग .



 
प्रहलाद उवाच -
 
कृतकृत्योस्मि भगवन्वरेणानेन यत्त्वयि ।
 
भवित्री त्वत्प्रसादेन भक्तिरव्यभिचारिणी ॥ २६ ॥

प्रल्हाद म्हणालाहे भगवंता ! मी तर तुमच्या ह्या वरानेच कृतकृत्य झालो कि तुमच्या कृपेने तुमच्यात माझी निरंतर अविचल भक्ति राहील .

 


 
धर्मार्थकामैः किं तस्य मुक्तिस्तस्य करे स्थिता ।
 
समस्तजगतां मूले यस्य भक्तिः स्थिरा त्वयि ॥ २७ ॥

हे प्रभो ! सम्पूर्ण जगताचे कारणरूप असलेल्यि तुमच्यात ज्याची निश्चल भक्ति आहे, मुक्ति सुद्धा त्याच्या मुठीत राहाते, मग धर्म, अर्थ, काम ह्यांचा त्याला काय उपयोग ? .

 


 
श्रीभगवानुवाच -
 
यथा ते निश्चलं चेतो मयि भक्तिसमन्वितम् ।
 
तथा त्वं मत्प्रसादेन निर्वाणण् परमाप्स्यसि ॥ २८ ॥

श्रीभगवान म्हणालेहे प्रल्हादा ! माझ्या भक्तिने युक्त तुझे चित्त जसे निश्चल आहे त्यामुळे तू माझ्या कृपेने परम निर्वाणपद प्राप्त करशील .

 


 
श्रीपराशर उवाच -
 
इत्युक्त्वान्तर्दधे विष्णुस्तस्य मैत्रेय पश्यतः ।
 
स चापि पुनरागम्य ववन्दे चरणौ पितुः ॥ २९ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मैत्रेया ! असे म्हणून भगवंत पाहता पाहता अन्तर्धान झाले आणि त्यानेही मग येऊन आपल्या पित्याचे चरण वन्दन केले .

 

 

तं पिता मूर्ध्न्युपाघ्राय परिष्वज्य च पीडितम् ।
जीवसीत्याह वत्सेति बाष्पार्द्रनयनो द्विज ॥ ३० ॥

हे द्विजा ! तेव्हा पिता हिरण्यकशिपुने, ज्याला नाना प्रकारे पीड़ित केले होते त्या पुत्राचे मस्तक हुंगून, डोळ्यात पाणी आणून म्हटले –पुत्रा, जिवंत हो !’ .

 


 
प्रीतिमांश्चाऽभवत्तस्मिन्ननुतापी महासुरः ।
 
गुरुपित्रोश्चकारैवं शुश्रूषां सोऽपि धर्मवित् ॥ ३१ ॥

तो महान असुराला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला व तो परत प्रल्हादवर प्रेम करू लागला आणि अशाप्रकारे धर्मज्ञ प्रल्हाद सुद्धा इपल्या गुरु आणि माता-पितांची सेवा-सुश्रुषा करू लागला .

 


 
पितर्युपरतिं नीते नरसिंहस्वरूपिणा ।
 
विष्णुना सोऽपि दैत्यानां मैत्रेयाभूत्पतिस्ततः ॥ ३२ ॥

हे मैत्रेया ! त्यानन्तर नृसिंहरूपधारी भगवान विष्णुद्वारा पित्याच्या मृत्युनंतर प्रल्हाद दैत्यांचा राजा झाला .

 


 
ततो राज्यद्युतिं प्राप्य कर्मशुद्धिकरीं द्वीज ।
 
पुत्रपौत्रांश्च सुबहूनवाप्यैश्वर्यमेव च ॥ ३३ ॥

क्षीणाधिकारः स यदा पुण्यपापविविर्जितः ।
 
तदा स भगवद्ध्यानात्परं नीर्वाणमाप्तवान् ॥ ३४ ॥

हे द्विजा ! नंतर प्रारब्धक्षयकारिणी राज्यलक्ष्मी, अनेक पुत्र पौत्रादि तसेच परम ऐश्वर्य प्राप्त होऊन, कर्माधिकार क्षीण झाल्याने, पुण्य-पाप रहित होऊन भगवंताचे ध्यान करत त्याने परम निर्वाणपद प्राप्त केले .

 



 
एवं प्रभावो दैत्योऽसौ मैत्रेयासीन्महामतिः ।
 
प्रह्लादो भगवद्‌भक्तो यं त्वं मामनुपृच्छसि ॥ ३५ ॥

हे मैत्रेया ! ज्याच्या विषयी तू विचारले होतेस तो परम भगवद्भक्त महामति दैत्यप्रवर प्रल्हाद असा प्रभावशाली झाला .

 

 


 
यस्त्वेतच्चरितं तस्य प्रह्लादस्य महात्मनः ।
 
शृणोति तस्य पापानि सद्यो गच्छन्ति सङ्‌क्षयम् ॥ ३६ ॥

त्या महात्मा प्रल्हादाचे हे चरित्र जो पुरुष ऐकतो त्याचे पाप शीघ्र नष्ट होते .

 

 


 
अहोरात्रकृतं पापं प्रह्लादचरितं नरः ।
 
शृण्वन् पठंश्च मैत्रेय व्यपोहति न संशयः ॥ ३७ ॥

हे मैत्रेया ! ह्यात संदेह नाही कि प्रल्हाद-चरित्र ऐकल्याने किंवा वाचल्याने दिवस-रात्र (निरंतर) केलेल्या पापातून मनुष्याची अवश्य सुटका होते .

 

 

पौर्णमास्याममावास्यामष्टम्यामथ वा पठन् ।
 
द्वादश्यां तदाप्नोति गोप्रदानफलं द्विज ॥ ३८ ॥

हे द्विजा ! पूर्णिमा, अमावास्या, अष्टमी अथवा द्वादशी ला हे वाचल्याने मनुष्याला गोदानाचे फळ मिळते .

 



 
प्रह्लादं सकलापत्सु यथा रक्षितवान्हरिः ।
 
तथा रक्षति यस्तस्य शृणोति चरितं सदा ॥ ३९ ॥

ज्याप्रकारे भगवंताने प्रल्हादची सम्पूर्ण आपत्तीपासून रक्षा केली तसेच ते सर्वदा त्याचीही रक्षा करतात जो त्याचे चरित्र ऐकतो.

 



             "इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे विशोऽध्याय
"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...