॥ प्रथमः अंशः ॥ ॥ एकोनविंशोऽध्यायः ॥
"प्रल्हादकृत
भगवत – गुण – वर्णन आणि प्रल्हादच्या रक्षणासाठी भगवंताने सुदर्शनचक पाठवणे"
श्रीपराशर उवाच -
हिरण्यकशिपुः श्रुत्वा तां कृत्यां
वितथीकृताम् ।
आहूय पुत्रं पप्रच्छ प्रभावस्यास्य
कारणम् ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले – हिरण्यकशिपुने कृत्या देखिल विफल
झालेली ऐकून आपल्या पुत्र प्रल्हादला बोलावून ह्या प्रभावाचे कारण विचारले .
हिरण्यकशिपुः उवाच -
प्रह्लाद सुप्रभावोऽसि किमेतत्ते
विचेष्टितम् ।
एतन्मन्त्रादिजनितमुताहो सहजं तव ॥ २
॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे प्रल्हादा
! तू तर मोठा प्रभावशाली आहेस ! तुझे हे प्रयत्न मन्त्रादिजनित आहेत की स्वाभाविक
आहेत ? .
श्रीपराशर उवाच -
एवं पृष्टस्तदा पित्रा
प्रह्लादोऽसुरबालकः ।
प्रणिपत्य पितुः पादौ इदं
वचनमब्रवीत् ॥ ३ ॥
श्रीपराशर म्हणाले – पित्याने असे विचारल्यावर
दैत्यकुमार प्रल्हाद त्याच्या चरणांना प्रणाम करून असे म्हणाला .
न मन्त्रादिकृतं तात न च नैसर्गिको
मम ।
प्रभाव एष सामान्यो यस्य यस्याच्युतो
हृदि ॥ ४ ॥
“पिताजी
! माझा हा प्रभाव मन्त्रादिजनितही नाही आणि स्वाभाविकही नाही, उलट ज्याच्या
ज्याच्या ह्रदयात श्रीअच्युताचा निवास असतो त्याच्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे .
अन्येषां यो न पापानि
चिन्तयत्यात्मनो यथा ।
तस्य पापागमस्तात हेत्वभावान्न
विद्यते ॥ ५ ॥
जो
मनुष्य आपल्या सारखेच दुसर्यांबददलही वाईट विचार करत नाही , हे तात !
कोणतेच कारण न राहिल्याने त्याचेही कधीच वाईट होत नाही .
कर्मणा मनसा वाचा परपीडां करोति यः ।
तद्वीजं जन्म फलति प्रभूतं तस्य
चाशुभम् ॥ ६ ॥
जो मनुष्य मन, वचन किंवा कर्माने दूसर्यांना कष्ट देतो
त्याच्या परपीड़ारूप बीजापासून उत्पन्न झालेले अत्यंत अशुभ फळ त्याला मिळते .
सोऽहं न पाप मिच्छामि न करोमि वदामि वा ।
चिन्तयन् सर्वभूतस्थं आत्मन्यपि च
केशवम् ॥ ७ ॥
स्वतः सहित समस्त प्राण्यांमध्यै श्रीकेशवाला
वर्तमान समजून मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करतही नाही, वाईट चिंतितही
नाही आणि वाईट बोलतही नाही
.
शारीरं मानसं दुःखं दैवं भूतभवं तथा
।
सर्वत्र शुभचित्तस्य तस्य मे जायते
कुतः ॥ ८ ॥
अशाप्रकारे सर्वत्र शुभचित्त असल्याने मला
शारीरिक , मानसिक, दैविक अथवा
भौतिक दुःख कशाप्रकारे प्राप्त होऊ शकेल ?
एवं सर्वेषु भूतेषु भक्तिरव्यभिचारिणी ।
कर्तव्या पण्डितैः ज्ञात्वा
सर्वभूतमयं हरिम् ॥ ९ ॥
अशाप्रकारे भगवंताला सर्वभूतमय जाणेन विद्वानांनी
सर्व प्राण्यांवर अविचल भक्ति (प्रेम) केली पाहिजे .
श्रीपराशर उवाच -
इति श्रुत्वा स दैत्येन्द्रः
प्रासादशिखरे स्थितः ।
क्रोधान्धकारितमुखः प्राह दैतेयकिङ्करान्
॥ १० ॥
श्रीपराशर म्हणारे – आपल्या महालाच्या गच्चीवर बसलेल्या
त्या दैत्यराजाने हे ऐकून क्रोधान्ध होऊन आपल्या दैत्य-अनुचरांना म्हटले .
हिरण्यकशिपुः उवाच -
दुरात्मा क्षिप्यतामस्मात्
प्रासादात् शतयोजनात् ।
गिरिपृष्ठे पतत्वस्मिन् शिलाभिन्नाङ्गसंहतिः
॥ ११ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – हा मोठा
दुरात्मा आहे, ह्याला
ह्या शंभर योजन ऊंच महलावरून खाली फेकून द्या, ज्याने हा ह्या पर्वतावर पडेल आणि शिळांनी त्याचे
शरीर छिन्न-विछिन्न होईल
.
ततस्तं चिक्षुपुः सर्वे बालं दैतेयदानवाः ।
पपात सोऽप्यधः क्षिप्तो
हृदयेनोद्वहन्हरिम् ॥ १२ ॥
तेव्हा त्या समस्त दैत्य आणि दानवांनी त्याला
महलावरून खाली फेकले आणि ते सुद्धा त्याला ढकलल्याने मनातल्या मनात श्रीहरिचे
स्मरण करत खाली पडले .
पतमानं जगद्धात्री जगद्धातरि केशवे ।
भक्तियुक्तं दधारैनमुपसङ्गम्य
मेदिनी ॥ १३ ॥
जगत्कर्ता भगवंत केशवाचा परमभक्त प्रल्हाद खाली
पडते वेळी त्याला जगध्दात्री पृथ्वीने जवळ जाऊन आपल्या मांडीवर घेतले .
ततो विलोक्य तं
स्वस्थमविशिर्णस्थिपञ्जरम् ।
हिरण्यकशिपुः प्राह शम्बरं मायिनां
वरम् ॥ १४ ॥
तेव्हा त्याला स्वस्थ व शरीराचे कोणतेही अंग न
तुटलेला असा पाहून दैत्यराज हिरण्यकशिपुने परममायावी शम्बरासुराला म्हटले .
हिरण्यकशिपुः उवाच -
नास्माभिः शक्यते हन्तुमसौ
दुर्बुद्धिबालकः ।
मायां वेत्ति भवान् तस्मान् माययैनं
निषूदय ॥ १५ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – ह्या
दुर्बुद्धि बालकाला कोणतीतरी अशी माया येते ज्यामुळे तो माझ्याकडून मारला जात नाही
आहे, म्हणून
तुम्ही त्याला मायेनेच मारून टाका .
शम्बर उवाच -
सूदयाम्येव दैत्यैन्द्र पश्य मायाबलं
मम ।
सहस्रमत्र मायानां पश्य कोटिशतं तथा
॥ १६ ॥
शम्बरासुर म्हणाला – हे दैत्येद्रा ! ह्या बालकाला मी
आताच मारून टाकतो, तु
माझ्या मायेचे बळ पाहाच. बघ, मी तुला शेकडो हजारो करोडो माया दाखवतो .
श्रीपराशर उवाच -
ततः स ससृजे मायां प्रह्लादे
शम्बरोऽसुरः ।
विनाशमिच्छन् दुर्बुद्धिः सर्वत्र
समदर्शिनि ॥ १७ ॥
श्रीपराशर म्हणाले – तेव्हा त्या दुर्बुद्धि शम्बरासुराने
समदर्शी प्रल्हादासाठी, त्याचा
नाश करण्याच्या इच्छेने अनेक माया रचल्या .
समाहितमतिर्भूत्वा
शम्बरेऽपि विमत्सरः ।
मैत्रेय सोऽपि प्रह्लादः सस्मार
मधुसूदनम् ॥ १८ ॥
पण, हे मैत्रेया ! शम्बरासुरा प्रति सुद्धा सर्वथा
द्वेषहीन राहून प्रल्हाद सावधान चित्ताने श्रीमधुसूदनाचे स्मरण करत राहिला .
श्रीपराशर उवाच -
ततो
भगवता तस्य रक्षार्थं चक्रमुत्तमम् ।
आजगाम
समाज्ञप्तं ज्वालामालि सुदर्शनम् ॥ १९ ॥
त्यावेळी भगवंताच्या आज्ञेने त्याच्या रक्षेसाठी
तिथे ज्वाला-मालांनी युक्त सुदर्शनचक्र आले .
तेन मायामहस्रं तत्
शम्बरस्याशुगामिना ।
बालस्य रक्षता देहं एकैकं च
विशोधितम् ॥ २० ॥
त्या शीघ्रगामी सुदर्शनचक्राने त्या बालकाची
रक्षा करत शम्बरासुराच्या सहस्र माया एक – एक करत नष्ट केल्या .
संशोषकं तथा वायुं
दैत्येन्द्रस्त्विदमब्रवीत् ।
शीग्रमेष ममादेशाद् दुरात्मा नीयतां
क्षयम् ॥ २१ ॥
तेव्हा दैत्यराजा ने सर्वांना सुकविणार्या
वायुला म्हटले कि माझ्या आज्ञेने तु त्वरित ह्या दुरात्म्याला नष्ट कर .
तथेत्युक्त्वा तु सोऽप्येनं विवेश
पवनो लघु ।
शीतोऽतिरुक्षः शोषाय
तद्देहस्यातिदुःसहः ॥ २२ ॥
म्हणून त्या अति तीव्र शीतल आणि रुक्ष वायुने, जो अति असहनीय
होता ‘जशी
आज्ञा’ म्हणून
त्याचे शरीर सुकविण्यासाठी शरीरात प्रवेश केला .
तेनाविष्टमथात्मानं स बुद्ध्वा
दैत्यबालकः ।
हृदयेन महात्मानं दधार धरणीधरम् ॥ २३
॥
आपल्या शरीरात वायुचा आवेश झाला आहे हे कळल्यावर
दैत्यकुमार प्रल्हादाने भगवान धरणीधराला आपल्या ह्रदयात धारण केले .
हृदयस्थस्ततस्तस्य तं वायुमति भीषणम् ।
पपौ जनार्धनः क्रुद्धः स ययौ पवनः
क्षयम् ॥ २४ ॥
त्याच्या ह्रदयात स्थित असलेल्या श्रीजनार्दनाने
क्रुद्ध होऊन त्या भीषण वायुला पिऊन टाकले, ज्यामुळे तो क्षीण झाला .
क्षीणासु सर्वमायासु पवने च क्षयं
गते ।
जगाम सोऽपि भवनं कुरोरेव महामतिः ॥
२५ ॥
अशाप्रकारे वायु आणि सर्व माया क्षीण झाल्यावर
महामति प्रल्हाद आपल्या गुरुंच्या घरी गेला .
अहन्यहन्यथाचार्यो नीतिं राज्यफलप्रदाम् ।
ग्राहयामास तं बालं राज्ञामुशनसा
कृताम् ॥ २६ ॥
त्यानंतर गुरू त्याला रोज शुक्राचार्यांनी
बनवलेल्या राज्यफलप्रदायिनी राजनीतिचे अध्ययन करवू लागले .
गृहीतनीतिशास्त्रं तं विनीतं च यदा
गुरुः ।
मेने तदैनं तत्पित्रे कथयामास
शिक्षितम् ॥ २७ ॥
जेव्हा गुरूजींनी त्याला नीतिशास्त्रात निपुण आणि
विनयसम्पन्न झालेले पाहिले तेव्हा त्याच्या पित्यास म्हटले – ‘आता हा
सुशिक्षित झाला आहे’ .
आचार्य उवाच -
गृहीतनीतिशास्त्रस्ते पुत्रो
दैत्यपते कृतः ।
प्रह्लादस्तत्त्वतो वेत्ति भार्गवेण
यदीरितम् ॥ २८ ॥
आचार्य म्हणाले – हे दैत्यराजा ! आता मी तुझ्या
पुत्राला नीतिशास्त्रात पूर्णतया निपुण केले आहे, भृगुनन्दन शुक्राचार्यांनी जे काही
सांगितले आहे ते प्रल्हाद तत्त्वत: जाणतो .
हिरण्यकशिपुः
उवाच -
मित्रेषु
वर्तेत कथमरिवर्गेषु भूपतिः ।
प्रह्लाद
त्रिषु लोकेषु मध्यस्थेषु कथं चरेत् ॥ २९ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – प्रल्हाद !
राजाला मित्रांत्री कस वागायला हवं आणि शत्रुंशी कसं तसेच
त्रैलोक्यात जो मध्यस्थ असतो, त्याच्याशी कसे आचरण करावे ? .
कथं मन्त्रिष्वमात्येषु
बाह्योष्वाभ्यन्तरेषु च ।
चारेषु पौरवर्गेषु शंकितेष्वितरेषु च
॥ ३० ॥
मंत्री, आमात्य, बाह्य व अंतःपुरातील सेवक, गुप्तचर, पुरवासी, शंकित तसेच
अन्यान्य जनां प्रति कशाप्रकारे व्यवहार करायला हवा ? .
कृत्याकृत्यविधानञ्च
दुर्गाटविकसाधनम् ।
प्रह्लाद कथ्यतां सम्यक् तथा
कण्टकशोधनम् ॥ ३१ ॥
हे प्रल्हादा ! हे नीट सांग कि करण्या व न
करण्यायोग्य कार्यांचे विधान कसे करावे, दुर्ग आणि आटविक (जंगली मनुष्य) आदिंना
कशाप्रकारे वशीभूत करावे आणि गुप्त शत्रुरूपी काटा कसा काढावा ? .
एतच्चान्यच्च सकलमधीतं भवता यथा ।
तथा मे कथ्यतां ज्ञातुं तवेच्छामि
मनोगतम् ॥ ३२ ॥
हे सर्व आणि इतरही जे तु शिकलास ते सर्व मला सांग, मी तुझ्या
मनातरे विचार जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे .
श्रीपराशर उवाच -
प्रणिपत्य पितुः पादौ तदा
प्रश्रयभूषणः ।
प्रह्लादः प्राह दैत्येन्द्रं
कृताञ्जलिपुटस्तथा ॥ ३३ ॥
श्रीपराशर म्हणाले – तेव्हा विनयभूषण प्रल्हादाने
पित्याच्या चरणांना प्रणाम करून दैत्यराज हिरण्यकशिपुला हात जोडून म्हटले .
प्रह्लाद उवाच -
ममोपदिष्टं सकलं गुरुणा नात्र संशयः
।
गृहीतन्तु मया किन्तु न सदेतन्मतं मम
॥ ३४ ॥
प्रल्हाद म्हणाला – पिताजी ! ह्यात शंका नाही, गुरूजींनी मला
ह्या सर्व विषयांची शिक्षा दिली आहे, आणि मला ते नीट समजलेही आहे, पण माझा विचार
आहे की ह्या नीति चांगल्या नाहीत .
साम चोपप्रदानं च भेददण्डौ तथापरौ ।
उपायाः कथिताः सर्वे मित्रादिनां च
साधने ॥ ३५ ॥
साम, दाम, दंड, भेद हे सर्व उपाय मित्र आदी बनविण्यासाठी सांगितले आहेत .
तानेवाहं न पश्यामि मित्रादींस्तात
मा क्रुद्धः ।
साध्याभावे महाबाहो साधनैः किं
प्रयोजनम् ॥ ३६ ॥
पण, पिताजी ! तुम्ही क्रोधित होऊ नका, मला तर कोणी
शत्रु-मित्र आदि दिसतच नाहीत, आणि हे महाबाहो ! जर काही साध्यच नाही तर ह्या
साधनांचे प्रयोजन काय ? .
सर्वभूतात्मके तात जगन्नाथे जगन्मये
।
परमात्मनि गोविन्दे मित्रामित्रकथा
कुतः ॥ ३७ ॥
हे तात ! सर्वभूतात्मक जगन्नाथ जगन्मय परमात्मा
गोविन्दात शत्रु-मित्राची गोष्टच कुठे येते ? .
त्वाय्यस्ति भगवान् विष्णुः मयि
चान्यत्र चास्ति सः ।
यतस्ततोऽयं मित्रं मे शत्रुश्चेति
पृथक्कुतः ॥ ३८ ॥
भगवान श्रीविष्णु तर तुमच्यात, माझ्यात आणि
अन्यत्र सर्वच ठिकाणी वर्तमान आहे, मग ‘हा माझा मित्र आणि हा शत्रु ’ अशा भेदभावाला
स्थानच कुठे राहाते ? .
तदेभिरलमत्यर्थं
दुष्टारम्भोक्तिविस्तरैः ।
अविद्यान्तर्गतैः यत्नः
कर्तव्यस्तात शोभेने ॥ ३९ ॥
म्हणून, हे तात ! अविद्याजन्य दुष्कर्मात प्रवृत्त करणारे
हे वाग्जाल सोडून आपल्या भल्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे .
विद्याबुद्धिरविद्यायामज्ञानात्तात
जायते ।
बालोऽग्निं किं न खद्योतमसुरेश्वर
मन्यते ॥ ४० ॥
हे दैत्यराजा ! अज्ञानामुळेच माणसांच्या अविद्येत
विद्या बुद्धि असते. लहान मूल नाही का अज्ञानवश खद्योतालाच अग्नि समजतो ? .
तत्कर्म यन्न बन्धाय सा विद्या या
विमुक्तये ।
आयासायापरं कर्म विद्यान्या
शिल्पनैपुणम् ॥ ४१ ॥
कर्म तेच जे बंधनाचे कारण नाही बनत आणि विद्या
तीच जी मुक्तिची साधिका बनते. ह्या व्यतिरिक्त कोणतेही कर्म परिश्रमरूप आहे व अन्य
विद्या केवळ कला कौशलच आहेत .
तदेतद्
अवगम्याहमसारं सारमुत्तमम् ।
निशामय
महाभाग प्रणिपत्य ब्रवीमि ते ॥ ४२ ॥
हे महाभागा ! ह्याप्रकारे ह्या सर्वाना असार
समजून तुम्हा सर्वांना प्रणाम करून मी उत्तम सार सांगतो, तुम्ही श्रवण
करा .
न चिन्तयति को राज्यं को धनं
नाभिवाञ्छति ।
तथापि भाव्यमेवैतद् उभयं प्राप्यते
नरैः ॥ ४३ ॥
राज्य मिळवण्याची चिंता कुणाला नसते आणि धनाची
अभिलाषा सुद्धा कुणाला नसते ? पण हे दोन्ही त्यांनाच मिळते ज्यांना मिळायचे
असते .
सर्व एव महाभाग महत्त्वं प्रति
सोद्यमाः ।
तथापि पुंसां भग्यानि नोद्यमा
भूतिहेतवः ॥ ४४ ॥
हे महाभाग् ! महत्त्व-प्राप्तिसाठी सर्वच प्रयत्न
करतात, पण
वैभवाचे कारण मनुष्याचे भाग्यच, उद्यम नाही .
जडानामविवेकानामशूराणामपि प्रभो ।
भाग्यभोज्यानि राज्यानि
सन्त्यनीतिमतामपि ॥ ४५ ॥
हे प्रभो ! जड, अविवेकी, निर्बल आणि
अनितिज्ञांना देखिल भाग्यवश नाना प्रकारचे भोग व राज्यादि प्राप्त होतात .
तस्माद्यतेत पुण्येषु य इच्छेन्महतीं
श्रियम् ।
यतितव्यं समत्वे च निर्वाणमपि
चेच्छता ॥ ४६ ॥
म्हणून ज्याला महान वैभवाची इच्छा आहे त्याने
केवळ पुण्यसंचयाचाच
प्रयत्न
करायला हवा; व
ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यानेही समत्वलाभाचाच प्रयत्न करायला हवा .
देवा मनुष्याः पशवः पक्षिवृक्षसरीसृपाः ।
रूपमेतद् अनन्तस्य विष्णोः भिन्नमिव
स्थितम् ॥ ४७ ॥
देव, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष आणि सरीसृप – हे सगळे भगवान विष्णु पेक्षा
भिन्न स्थित असले तरी वास्तवात श्रीअनंताचीच रूपे आहेत .
एतद्विजानता सर्वं जगत्स्थावरजङ्गमम्
।
द्रष्टव्यमात्मवद्विष्णुः यतोऽयं
विश्वरूपधृक् ॥ ४८ ॥
ही गोष्ट जाणणारा पुरुष सम्पूर्ण चराचर जगताकडे
आत्मवत पाहतो, कारण
हे सर्व विश्वरूपधारी भगवान विष्णुच आहे .
एवं ज्ञाते स भगवान् अनादिः परमेश्वरः ।
प्रसीदत्यच्युतस्तस्मिन् प्रसन्ने
क्लेशसंक्षयः ॥ ४९ ॥
हे जाणल्यावर अनादि परमेश्वर भगवान अच्युत
प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रसन्न होण्याने सर्व क्लेश क्षीण होतात .
श्रीपराशर उवाच -
एतच्छ्रुत्वा तु कोपेन समुत्थाय
वरासनात् ।
हिरण्यकशिपुः पुत्रं पदा
वक्षस्यताडयत् ॥ ५० ॥
श्रीपराशर म्हणाले – हे ऐकल्यावर हिरण्यकशिपुने
क्रोधपूर्वक आपल्या राजसिंहासना वरून उठून पुत्र प्रल्हादाच्या वक्ष:स्थलावर लाथ
मारली .
उवाच च स कोपेन सामर्षः प्रज्यलन्निव ।
निष्पिष्य पाणिना पिणिं हन्तुकामो
जगद्यथा ॥ ५१ ॥
आणि क्रोध तथा अमर्षाने भडकून जणू सम्पूर्ण
संसारालाच मारून टाकणार अशाप्रकारे हात मळत म्हणाला .
हिरण्यकशिपुः उवाच -
हे विप्रचित्ते हे राहो हे बलैष
महार्णवे ।
नागापाशैः दृढैः बद्ध्वा क्षिप्यतां
मा विलम्ब्यताम् ॥ ५२ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – हे विप्रचित्ता
! हे राहो ! हे बळा ! तुम्ही ह्याला नीट नागपाशात बांधून महासागरात फेकून द्या, वेळ काढू नका .
अन्यथा सकला लोकास्तथा दैतेयदानवाः ।
अनुयास्यन्ति मूढस्य मतमस्य
दुरात्मनः ॥ ५३ ॥
नाही तर सम्पूर्ण लोक आणि दैत्य-दानव आदि सुद्धा
ह्या मूढ़ दुरात्म्याच्या मताचे अनुगमन करतील [म्हणजे ह्याच्यासारखे तेही
विष्णुभक्त बनतील]
.
बहुशो वारितोऽस्माभिः अयं पापस्तथाप्यरेः ।
स्तुतिं करोति दुष्टानां वध
एवोपकारकः ॥ ५४ ॥
मी ह्याला खूप रोखलं, पण हा दुष्ट
शत्रुचीच स्तुति
करत आहे. ठीक आहे, दुष्टांना
मारून टाकणंच लाभदायक असतं .
पराशर उवाच -
ततस्ते
सत्वरा दैत्या बद्ध्वा तं नागबन्धनैः ।
भर्तुराज्ञां
पुरस्कृत्य चिक्षिपुः सलिलार्णवे ॥ ५५ ॥
श्रीपराशर म्हणाले – तेव्हा त्या दैत्यांनी आपल्या
स्वामीची आज्ञा शिरोधार्य मानून लगेच त्याला नीट नागपाशात बांधून महासागरात फेकून
दिले .
ततश्चचाल चलता प्रह्लादेन महार्णवः ।
उद्वेलोऽभूत्परं क्षोभमुपेत्य च
समन्ततः ॥ ५६ ॥
त्यावेळी प्रल्हादच्या हलण्या डुलण्याने सम्पूर्ण
महासागरात अत्यंत क्षोभ निर्माण झाल्यामुळे सर्वबाजूंनी ऊंच ऊंच लहरी ऊठू लागल्या .
भुर्लोकमखिलं दृष्ट्वा प्लाव्यमानं
महाम्भसा ।
हिरण्यकशिपुर्दैत्यान् इदमाह महामते
॥ ५७ ॥
हे महामते ! त्या महान जल-पूरात सम्पूर्ण
पृथ्वीला बुडताना पाहून हिरण्यकशिपु दैत्यांना असे म्हणाला .
हिरण्यकशिपुः
उवाच -
दैतेयाः
सकलैः शैलैः अत्रैव वरुणालये ।
निश्छिद्रैः
सर्वशः सर्वैश्चीयतामेष दुर्मतिः ॥ ५८ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे दैत्यांनो
! तुम्ही ह्या दुर्मतिला समुद्राच्या आतच कुठेही उघडी जागा न ठेवता सर्व बाजूंनी
पर्वतांनी दाबून टाका .
नाग्निर्दहति नैवायं शस्त्रैश्छिन्नो न चोरगैः ।
क्षयं नीतो न वातेन न विषेण न
कृत्यया ॥ ५९ ॥
न मायाभिः न चैवोच्चात् पातितो न च
दिग्गजैः ।
बालोऽतिदुष्टचित्तोयं
नानेनार्थोऽस्ति जीवता ॥ ६० ॥
पाहा, ह्याला अग्नि जाळू शकला नाही, शस्त्र कापू
शकले नाहीत, सर्प
नष्ट करू शकले नाहीत आणि वायुही नाही, विष आणि कृत्याच क्षीण झाले, तसेच हा
मायेमुळे, वरून
पडून किंवा दिग्गजां द्वाराही मारला गेला नाही. हा बालक अत्यंत दुष्ट-चित्त आहे, आता ह्याच्या जीवनाचे
कोणतेच प्रयोजन नाही .
तदेष तोयमध्ये तु समाक्रान्तो महीधरैः ।
तिष्ठत्वब्दसहस्रान्तं प्राणान्
हास्यति दुर्मतिः ॥ ६१ ॥
म्हणून आता हा पर्वत लादलेल्या अवस्थेत हजारों
वर्ष जलातच पडून राहू दे,
त्यामुळे
हा दुर्मति स्वतःच प्राण सोडेल .
ततो दैत्या दानवाश्च पर्वतैस्तं
महोदधौ ।
आक्रम्य चयनं चक्रुः योजनानि सहस्रशः
॥ ६२ ॥
तेव्हा दैत्य व दानवांनी त्याला समुद्रातच
पर्वतांनी झाकून त्याच्यावर हजारों योजनांचा ढीग केला .
स चितः पर्वतेरन्तः समुद्रस्य
महामतिः ।
तुष्टावाह्निक वेलायां
एकाग्रमतिरच्युतम् ॥ ६३ ॥
त्या महामतिने समुद्रात पर्वतांनी लादले गेल्यावर
आपल्या नित्यकर्मांच्या वेळी एकाग्र चित्ताने श्रीअच्युताची अशी स्तुति केली .
प्रह्लाद उवाच -
नमस्ते
पुण्डरीकाक्ष नमस्ते पुरुषोत्तम ।
नमस्ते
सर्वलोकात्मन् नमस्ते तिग्मचक्रिणे ॥ ६४ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे कमलनयना ! तुला नमस्कार. हे
पुरुषोत्तमा ! तुला नमस्कार. हे सर्वलोकात्मना ! तुला नमस्कार. हे तीक्ष्ण
चक्रधारी प्रभो ! तुला वारंवार नमस्कार .
नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च ।
जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमोनमः
॥ ६५ ॥
गोब्राह्मण-हितकारी ब्रह्मण्यदेव भगवान कृष्णाला
नमस्कार. जगत-हितकारी श्रीगोविंदाला वारंवार नमस्कार .
ब्रह्मत्वे
सृजते विश्वं स्थितौ पालयते पुनः ।
रुद्ररूपाय कल्पान्ते नमस्तुभ्यं त्रिमूर्तये ॥
६६ ॥
तु ब्रह्मारूपात विश्वाची रचना करतोस, मग ते स्थित
झाल्यावर विष्णुरूपात पालन करतोस आणि शेवटी रुद्ररूपात संहार करतोस – अशा
त्रिमूर्तिधारी तुला नमस्कार .
देवा यक्षाः सुराः सिद्धा नागा गन्धर्वकिन्नराः ।
पिशाचा राक्षसाश्चैव मनुष्याः
पशवस्तथा ॥ ६७ ॥
पक्षिणस्थावराश्चैव पिपीलिकसरीसृपाः
।
भूम्यापोऽग्निर्नभो वायुः शब्दः
स्पर्शस्तथा रसः ॥ ६८ ॥
रूपं गन्धो मनो बुद्धिः आत्मा
कालस्तथा गुणाः ।
एतेषां परमार्थश्च
सर्वमेतत्त्वमच्युत ॥ ६९ ॥
हे अच्युता ! देव, यक्ष, असुर, सिद्ध, नाग, गन्धर्व, किन्नर, पिशाच, राक्षस, मनुष्य, पशु, पक्षी, स्थावर, पिपीलिका
(मुंगी), सरीसृप, पृथ्वी, जल, अग्नि, आकाश, वायु, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, मन, बुद्धि, आत्मा, काल आणि गुण
ह्या सर्वांचे पारमार्थिक रूप तुच आहेस, वास्तवात तूच हे सर्व आहेस .
विद्याविद्ये भवान्सत्यमसत्यं त्वं
विषामृते ।
प्रवृत्तं च निवृत्तं च कर्म
वेदोदितं भवान् ॥ ७० ॥
तूच विद्या आणि अविद्या, सत्य आणि असत्य
तथा विष आणि अमृत आहेस तसेच तूच वेदोक्त प्रवृत्त आणि निवृत्त कर्म आहेस .
समस्तकर्मभोक्ता च कर्मोपकरणानि च ।
त्वमेव विष्णो सर्वाणि सर्वकर्मफलं च
यत् ॥ ७१ ॥
हे विष्णो ! तूच समस्त कर्मांचा भोक्ता आणि
त्यांची सामग्री आहेस तसेच सर्व कर्मांची जितकी फळं आहेत ती सर्व देखिल तूच आहेस .
मय्यन्यत्र तथान्येषु भूतेषु भुवनेषु
च ।
तवैवाव्याप्तिरैश्वर्य गुणसंसूचिकी
प्रभो ॥ ७२ ॥
हे प्रभो ! माझ्यात तसेच अन्यत्र समस्त भूत व
भुवनांमध्ये तुझेच गुण आणि ऐश्वर्याची सूचिका व्याप्ति होत आहे .
त्वां योगिनश्चिन्तयन्ति त्वां
यजन्ति च याजकाः ।
हव्यकव्यभुगेकस्त्वं
पितृदेवस्वरूपधृक् ॥ ७३ ॥
योगिगण तुझेच ध्यान करतात आणि याज्ञिक गण तुझेच
यजन करतात, तसेच
पितृगण आणि देवगणांच्या रूपात तूच हव्य आणि कव्याचा भोक्ता आहेस .
रूपं
महत्ते स्थितमत्र विश्वं ततश्च सूक्ष्मं जगदेतदीश ।
रूपामि सर्वाणि च भूतभेदाः तेष्वन्तरात्माख्यमतीव
सूक्ष्मम् ॥ ७४ ॥
हे ईशा ! हे निखिल ब्रह्माण्ड तूझेच स्थूलरूप आहे, त्याहून
सूक्ष्म हा संसार (पृथ्वीमंडल) आहे, त्याहूनही सूक्ष्म हे भिन्न-भिन्न रूपधारी समस्त
प्राणी आहेत, त्यांच्याही
आत जो अंतरात्मा आहे तो त्याहून अत्यंत सूक्ष्म आहे .
तस्माच्च सूक्ष्मादिविशेषणानां अगोचरे
यत्परमात्मरूपम् ।
किमप्यचिन्त्यं तव रूपमस्ति तस्मै
नमस्ते पुरुषोत्तमाय ॥ ७५ ॥
ह्या सर्वांच्या पलिकडे जे सूक्ष्म आदि
विशेषणांनी अविषम तुझे कोणते अचिन्त्य परमात्मस्वरूप आहे त्या पुरुषोत्तमरूप तुला
नमस्कार .
सर्वभूतेषु सर्वात्मन् या शक्तिरपरा तव ।
गुणाश्रया नमस्तस्यै शाश्वतायै
सुरेश्वर ॥ ७६ ॥
हे सर्वात्मना ! समस्त भूतांमध्ये तूझी जी
गुणाश्रया पराशक्ति आहे, हे
सुरेश्वरा ! त्या नित्यस्वरूपिणीला नमस्कार .
यातीतगोचरा वाचां मनसां चाविशेषणा ।
ज्ञानिज्ञानपरिच्छेद्या तां वन्दे
स्वेश्वरीं पराम् ॥ ७७ ॥
जी वाणी आणि मनाच्या पलिकडची आहे, विशेषरहित तथा
ज्ञानिंच्या ज्ञानाने परिच्छेद्य आले त्या स्वतंत्र पराशक्तिला मी वन्दन करतो .
ॐ नमो वासुदेवाय तस्मै भगवते सदा ।
व्यतिरिक्तं न यस्यास्ति
व्यतिरिक्तोऽखिलस्य यः ॥ ७८ ॥
ॐ त्या भगवान् वासुदेवाला सदैव नमस्कार, ज्याच्या
व्यतिरिक्त आणखी कोणतीही वस्तु नाही तसेच जो स्वतः सर्वांपासून अतिरिक्त (असंग)
आहे .
नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै
महात्मने ।
नाम रूपं न यस्यैको
योस्तित्वेनोपलभ्यते ॥ ७९ ॥
ज्याचे काही नाव किंवा रूप नाही आणि जो आपल्या
सत्तेनेच उपलब्ध होतो त्या महात्म्याला नमस्कार , नमस्कार , नमस्कार .
यस्यावताररूपाणि समर्चन्ति दिवौकसः ।
अपश्यन्तः परं रूपं नमस्तस्मै
महात्मने ॥ ८० ॥
ज्याचे पर-स्वरूप न जाणताच देवतागण त्याच्या
अवतार-शरीराचे सम्यक अर्चन करतात त्या महात्म्याला नमस्कार .
य्ॐतस्तिष्ठन्नशेषस्य पश्यतीशः
शुभाशुभम् ।
तं सर्वसाक्षिणं विश्वं नमस्ये
परमेश्वरम् ॥ ८१ ॥
जो ईश्वर सर्वांच्या अंत:करणात स्थित होऊन
त्यांची शुभाशुभ कर्मे पाहातो त्या सर्वसाक्षी विश्वरूप परमेश्वराला मी नमस्कार
करतो .
नमोस्तु विष्णवे तस्मै यस्या
भिन्नमिदं जगत् ।
ध्येयः स जगतामाद्यः स प्रसीदतु
मेऽव्ययः ॥ ८२ ॥
ज्याच्याहून हे जगत सर्वथा अभिन्न आहे त्या श्रीविष्णु ला
नमस्कार, तो
जगताचे आदिकारण आणि योग्यांचा ध्येय अव्यय हरि माझ्यावर प्रसन्न होओ .
यत्रोतमेतत्प्रोतं च विश्वमक्षरमव्ययम् ।
आधारभूतः
सर्वस्य स प्रसीदतु मे हरिः ॥ ८३ ॥
ज्याच्यात हे सम्पूर्ण विश्व ओतप्रोत आहे तो
अक्षर, अव्यय
आणि सर्वांचा आधारभूत हरि माझ्यावर प्रसन्न होओ .
ॐ नमो विष्णवे तस्मै नमस्तस्मै पुनः
पुनः ।
यत्र सर्वं यतः सर्वं यः सर्वं
सर्वसंश्रयः ॥ ८४ ॥
ॐ ज्याच्यात सर्व काही स्थित आहे, ज्याच्यापासून
सर्व उत्पन्न झाले आहे आणि जो स्वयं सर्व काही तसेच सर्वांचा आधार आहे, त्या
श्रीविष्णुला नमस्कार, वारंवार
नमस्कार .
सर्वगत्वादनन्तस्य स एवाहमवस्थितः ।
मत्तः सर्वमहं सर्वं मयि सर्वं
सनातने ॥ ८५ ॥
भगवान अनंत सर्वगामी आहे; म्हणून तोच
माझ्या रूपात स्थित आले, म्हणून
हे सम्पूर्ण जगत माझ्यापासूनच झाले आहे, मीच हे सर्व काही आहे आणि सनातन अशा माझ्यातच
सर्व स्थित आहे .
अहमेवाक्षयो नित्यः परमात्मात्मसंश्रयः ।
ब्रह्मसंज्ञोऽहमेवाग्रे तथान्ते च
परः पुमान् ॥ ८६ ॥
मीच अक्षय, नित्य आणि आत्माधार परमात्मा आहे, तसेच मीच
जगताच्या आदिच्या अंताला
स्थित
असलेला ब्रह्मसंज्ञक परमपुरुष आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा