॥ प्रथमः अंशः ॥ ॥ अष्टादशोऽध्यायः ॥
"प्रल्हादला मारण्यासाठी विष, शस्त्र आणि
अग्नि आदिचा प्रयोग एवं प्रल्हादकृत भगवंत – स्तुति"
श्रीपराशर उवाच -
तस्यैतां
दानवाश्चेष्टां दृष्ट्वा दैत्यपतेर्भयात् ।
आचचख्युः
स चोवाच सूदानाहूय सत्वरः ॥ १ ॥
श्रीपराशर म्हणाले – त्याचे असे प्रयत्न पाहून दैत्यांनी
घाबरून दैत्यराज हिरण्यकशिपुला सर्व वृतांत सांगितला, आणि त्याने
सुद्धा लगेच आपल्या आचार्याला बोलावून सांगितलं .
हिरण्यकशिपुः उवाच -
हे सूदा मम पुत्रोसौ अन्येषामपि
दुर्मतिः ।
कुमार्गदेशिको दुष्टो
हन्यतामविलम्बितम् ॥ २ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – अरे सुदगणा !
माझा हा दुष्ट व दुर्मति पुत्र इतरांनाही कुमार्गाचा उपदेश देत आहे, म्हणून तू लगेच
त्याला मारून टाक .
हालाहलं विषं तस्य सर्वभक्षेषु
दीयताम् ।
अविज्ञातमसौ पापो हन्यतां मा
विचार्यताम् ॥ ३ ॥
तू त्याला त्याच्या नकळत सर्व खाद्यपदार्थांमध्ये
हलाहल विष मिसळून दे आणि कोणताही शोक–विचार न करता त्या पाप्याला मारून टाक .
श्रीपराशर उवाच -
ते तथैव ततश्चक्रुः प्रह्लादाय
महात्मने ।
विषदानं यथाज्ञाप्तं पित्रा तस्य
महात्मनः ॥ ४ ॥
श्रीपराशर म्हणाले – तेव्हा त्या आचार्याने महात्मा
प्रल्हादला, त्याच्या
पित्याच्या आज्ञेनुसार विष दिले .
हालाहलं विषं घोरमनन्तोच्चारणेन सः ।
अभिमन्त्र्य सहान्नेन मैत्रेय बुभुजे
तदा ॥ ५ ॥
हे मैत्रेया ! तेव्हा त्याने ते घोर हलाहल विष
भगवान्नामाच्या उच्चारांनी अभिमंत्रित करून अन्नासोबत खाऊन टाकले .
अविकारं स तद्भुक्त्वा प्रह्लादः
स्वस्थमानसः ।
अनन्तख्यातिनिर्विर्यं जरयामास
तद्विषम् ॥ ६ ॥
तसेच भगवन्नानाच्या प्रभावाने निस्तेज झालेले ते
विष खाऊन कोणत्याही विकाराशिवाय ते पचवून स्वस्थ चित्त स्थित राहिला .
ततः सूदा भयत्रस्ता जीर्णं दृष्ट्वा
महद्विषम् ।
दैत्येश्वरमुपागम्य
प्रणिपत्येदमब्रुवन् ॥ ७ ॥
ते महान विष पचलेलं पाहून आचार्याने भयाने
व्याकुळ होऊन हिरण्यकशिपु जवळ जाऊन त्याला प्रणाम करून म्हटले .
सूदा ऊचुः -
दैत्यराज विषं दत्तमस्माभिः
अतिभीषणम् ।
जीर्णं तेन सहान्नेन प्रह्लादेन
सुतेन ते ॥ ८ ॥
सूदगण म्हणाला – हे दैत्यराजा ! मी तुमच्या आज्ञाने
अत्यंत तीक्ष्ण विष दिले होते, पण आपल्या पुत्र प्रल्हादने त्याला अन्नासोबत
पचवले .
हिरण्यकशिपुः उवाच -
त्वर्यतां त्वर्यतां हे हे सद्यो
दैत्यपुरोहिताः ।
कृत्यां तस्य विनाशाय उत्पादयत मा
चिरम् ॥ ९ ॥
हिरण्यकशिपु म्हणाला – हे
पुरोहितगणांनो ! त्वरा करा,
त्वरा
करा ! त्याला नष्ट करण्यासाठी कृत्या उत्पन्न करा, आता आणखी ऊशीर नको .
श्रीपराशर उवाच -
सकाशमागम्य ततः प्रह्लादस्य
पुरोहिताः ।
सामपूर्वमथोचुस्ते प्रह्लादं
विनयान्वितम् ॥ १० ॥
श्रीपराशर म्हणाले – तेव्हा पुरोहितांनी अति विनीत
प्रल्हादला, त्याच्याजवळ
जाऊन शान्तिपूर्वक म्हटले
.
पुरोहिता ऊचुः -
जातस्त्रैलोक्यविख्यात
आयुष्मन्ब्रह्मणः कुले ।
दैत्यराजस्य तनयो हिरण्यकशिपोर्भवान्
॥ ११ ॥
पुरोहित म्हणाले– हे आयुष्मन ! तुम्ही त्रिलोक्यात
विख्यात ब्रह्माच्या कुळात
उत्पन्न
झाला आहात आणि दैत्यराज हिरण्यकशिपुचे पुत्र आहात .
किं देवैः किमनन्तेन किमन्येन तवाश्रयः ।
पिता
ते सर्वलोकानां त्वं तथैव भविष्यसि ॥ १२ ॥
तुम्हाला देवता अनंत अथवा आणखी अन्य कोणाशी काय
प्रयोजन आहे ? तुमचे
पिता तुमचे तसेच सम्पूर्ण लोकांचे आश्रय आहेत आणि तुम्ही सुद्धा तसेच व्हाल .
तस्मात्परित्यजैनां त्वं विपक्षस्तवसंहिताम् ।
श्लाघ्यः पिता समस्तानां गुरूणां
परमो गुरुः ॥ १३ ॥
म्हणून तुम्ही ही विपक्षाची स्तुति करणं सोडून
द्या. तुमचे पिता सर्व प्रकारे प्रशंसनीय आहेत आणि तेच समस्त गुरुंचे परम गुरु
आहेत .
प्रह्लाद उवाच -
एवम् एतन् महाभागाः
श्लाघ्यमेतन्महाकुलम् ।
मरिचेः सकलेप्यस्मिन् त्रैलोक्ये
नान्याथा वदेत् ॥ १४ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे महाभागगणांनो ! हे बरोबर आहे . ह्या सम्पूर्ण
त्रिलोक्यात भगवान मरीचिंचे हे महान कुळ अवश्य प्रशंसनीय आहे. ह्यापेक्षा कोणीही
काही वेगळं म्हणू शकणार .
पिता च मम सर्वास्मिन्
जगत्युत्कृष्टचेष्टितः ।
एतदप्यवगच्छामि सत्यमत्रापि नानृतम्
॥ १५ ॥
आणि माझे पिता सुद्धा सम्पूर्ण जगात अतिशय मोठे
पराक्रमी आहेत, हे
सुद्धा मला ठाऊक आहे. हे सुद्धा अगदी खरं आहे ह्यात खोटं काहीच नाही .
गुरूणामपि सर्वेषां पिता परमको गुरुः ।
यदुक्तं भ्रान्तिस्तत्रापि स्वल्पापि
हि न विद्यते ॥ १६ ॥
आणि तुम्ही जे म्हटलं कि समस्त गुरुंमध्ये पिताच
परम गुरु आहेत – ह्यातही मला लेशमात्र संदेह नाही .
पिता गुरुर्न सन्देहः पूजनीयः पूयत्नतः
।
तत्रापि नापराध्यामि इत्येवं मनसि से
स्थितम् ॥ १७ ॥
पिताजी परम गुरु आहेत आणि प्रयन्तपूर्वक पूजनीय
आहेत – ह्यात कोणताही संदेह नाही. आणि माझ्या मनातही हाच विचार स्थित आहे कि मी
त्यांचा कोणताही अपराध करणार नाही .
यत्त्वेतत्किमनन्तेन इत्युक्तं
युष्माभिरीदृशम् ।
को ब्रवीति यथान्याय्यं किं तु
नैतद्वचोर्थवत् ॥ १८ ॥
पण तुम्ही जे हे म्हटलं कि ‘तुला अनंताचे
काय प्रयोजन ?’ तर ही
गोष्ट न्यायोचित कशी होऊ शकते ? आपलं हे असं म्हणणं अजिबात योग्य नाही .
इत्युक्त्वा सोऽभवन्मौनी तेषां
गौरवयन्त्रितः ।
प्रहस्य च पुनः प्राह किमनन्तेन
साध्विति ॥ १९ ॥
असे म्हणून त्यांचा आदर राखण्यासाठी तो गप्प
राहिला आणि मग परत हसून म्हणाला – ‘तुला अनंताचे काय प्रयोजन ?’ ह्या विचाराला
धन्यवाद .
साधु भोः किमनन्तेन साधु भो गुरुवो
मम ।
श्रूयतां यदनन्तेन यदि खेदं न यास्यथ
॥ २० ॥
हे माझ्या गुरुगणांनो ! तुम्ही म्हणता कि तुला
अनंताचे काय प्रयोजन ? धन्यवाद
तुमचे ह्या विचारासाठी. बरं, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मला अनंताचे काय
प्रयोजन आहे ते ऐका .
धर्मार्थकाममोक्षाश्च पुरुषार्था उदाहृताः ।
चतुष्टयमिदं यस्मात् तस्मात्किं
किमिदं वच ॥ २१ ॥
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत . हे चारही
ज्यांच्यापासून सिद्ध होतात, त्यांचं काय प्रयोजन ? – तुमच्या ह्या
प्रश्नाला काय म्हणावे !
.
मरीचिमिश्रैः दक्षाद्यैस्तथैवान्यैः
अनन्ततः ।
धर्म प्राप्तस्तथा चान्यैः अर्थः
कामस्तथाऽपरैः ॥ २२ ॥
त्या अनंतापासूनच दक्ष, मरीचि आदि तसेच
अन्य ऋषिश्वरांना धर्म, काही
अन्य मुनीश्वरांना अर्थ आणि अन्य काहींना कामाची प्राप्ति झाली आहे .
तत्तत्त्ववेदिनो भूत्वा
ज्ञानध्यानसमाधिभिः ।
अवापुर्मुक्तिमपरे पुरुषा
ध्वस्तबन्धनाः ॥ २३ ॥
काही अन्य महापुरुषांनी ज्ञान, ध्यान आणि
समाधी द्वारा त्यांचेच तत्त्व जाणून आपल्या संसार-बंधनाला तोडून मोक्षपद प्राप्त
केले आहे .
सम्पदैश्वर्यमाहात्म्य-ज्ञानसन्ततिकर्मणाम्
।
विमुक्तेश्चैकतो लभ्यं मूलमाराधनं
हरेः ॥ २४ ॥
म्हणून सम्पत्ति, ऐश्वर्य, माहात्म्य, ज्ञान, सन्तति आणि
कर्म तथा मोक्ष – ह्या सर्वांचे एकमात्र मूळ श्रीहरिची आराधनाच उपार्जनीय आहे .
यतो धर्मार्थकामाख्यं मुक्तिश्चपि
फलं द्विजाः ।
तेनापि किं किमित्येवमनन्तेन
किमुच्यते ॥ २५ ॥
हे द्विजगणांनो ! अशाप्रकारे, ज्यांच्यापासून
अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष
– ही चारही फळं प्राप्त होतात त्यांच्याच साठी तुम्ही असे का म्हणता ‘अनंतापासून
तुझे काय प्रयोजन ?’ .
किं चापि बहुनोक्तेन भवन्तो गुरवो मम ।
वदन्तु साधु वासाधु
विवेकोऽस्माकमल्पकः ॥ २६ ॥
आणखी बोलून काय उपयोग ? तुम्ही सर्व तर
माझे गुरु आहात, उचित-अनुचित
सर्व सांगू शकता. आणि माझ्यात विवेकही कमी आहे .
बहुनात्र किमुक्तेन स एव जगतः पतिः ।
स कर्ता च विकर्ता च संहर्ता च हृदि
स्थितः ॥ २७ ॥
ह्या विषयी आणखी काय आहे सांगण्यासारखं ? सर्वांच्या
अंत:करणात स्थित एकमात्र तोच संसाराचा स्वामी तसेच त्याचा रचयिता, पालक आणि
संहारक आहे .
स भोक्ता भोज्यमप्येवं स एव
जगदीश्वरः ।
भवद्भिः एतत्क्षन्तव्यं
बाल्यादुक्तं तु यन्मया ॥ २८ ॥
तोच भोक्ता व भोज्य तथा तोच एकमात्र जगदीश्वर
आहे. हे गुरुगणांनो ! मी बाल्यभावाने जर काही अनुचित बोललो असेन तर तुम्ही क्षमा
करा’ .
पुरोहिता ऊचुः -
दह्यमानस्त्वमस्माभिः अग्निना बाल
रक्षितः ।
भूयो न वक्ष्यसीत्येवं नैव
ज्ञातोऽस्यबुद्धिमान् ॥ २९ ॥
पुरोहितगण म्हणाले– अरे बालका ! आम्ही तर तू परत असे
बोलणार नाहीस असे समजून तुला आगीत जळण्यापासून वाचवले. आम्हाला माहित नव्हतं की तू
इतका बुद्धिहीन आहेस .
यदास्मद्वचनान्मोह-ग्राहं न त्यक्षते
भवान् ।
ततः कृत्यां विनाशाय तव स्रक्ष्याम
दुर्मते ॥ ३० ॥
रे दुर्मति ! जर तु आम्ही सांगितल्याप्रमाणे तुझा
हा मोहमय आग्रह सोडला नाहीस तर आम्ही तुला नष्ट करण्यासाठी कृत्या उत्पन्न करू .
प्रह्लाद उवाच -
कः केन हन्यते जन्तुः जन्तुः कः केन
रक्ष्यते ।
हन्ति रक्षति चैवात्मा ह्यसत्साधु
समाचरन् ॥ ३१ ॥
प्रल्हाद म्हणाला – कोण जीव कोणाकडून मारला जातो आणि
कोणाची कोणाकडून रक्षा होते ? शुभ आणि अशुभ आचरणां द्वारा आत्मा स्वयं आपली
रक्षा आणि नाश करतो .
कर्मणा जायते सर्वं कर्मैव गतिसाधनम्
।
तस्मात्सर्वप्रयत्नेन साधु कर्म
समाचरेत् ॥ ३२ ॥
कर्मांमुळेच सर्व उत्पन्न होते आणि कर्मच
त्यांच्या शुभाशुभ गतिचे साधन आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक शुभकर्मांचेच आचरण केले
पाहिजे .
श्रीपराशर उवाच -
इत्युक्तास्तेन ते क्रुद्धा
दैत्यराजपुरोहिताः ।
कृत्यामुत्पादयामासुः
ज्वालामालोज्ज्वलाकृतिम् ॥ ३३ ॥
श्रीपराशर म्हणाले – त्याने असे म्हटल्यावर त्या
दैत्यराजाच्या पुरोहितांनी क्रोधित होऊन अग्निशिखा समान प्रज्वलित शरीराची कृत्या
उत्पन्न केली .
अतिभीमा समागम्य पादन्यासक्षतक्षितिः
।
शुलेन साधु संक्रुद्धा तं जघानाशु
वक्षसि ॥ ३४ ॥
त्या अति भयंकरीने आपल्या पादाघाताने पृथ्वीला
कम्पित करत तिथे प्रकट होऊन अत्यंत क्रोधाने प्रल्हादच्या छातीत त्रिशूलाने प्रहार केला .
तत्तस्य हृदयं प्राप्य शूलं बालस्य
दीप्तिमत् ।
जगाम खण्डितं भूमौ तत्रापि शतधा गतम्
॥ ३५ ॥
पण त्या बालकाच्या वक्ष:स्थलाला लागताच तो तेजोमय
त्रिशूल तुटून पृथ्वीवर पडला आणि पडल्यानेच त्याचे शेकडो तुकडे झाले .
यत्रानपायी भगवान् हृद्यास्ते
हरिरिश्वरः ।
भङ्गो भवति वज्रस्य तत्र शूलस्य का
कथा ॥ ३६ ॥
ज्या ह्रदयात निरंतर अक्षुण्णभावाने
श्रीहरिभगवान् विराजतात त्याला लागून तर वज्राचे देखील तुकडेतुकडे होतात तिथे त्रिशूल
काय टिकणार ?
अपापे तत्र पापैश्च पातिता
दैत्यायाजकैः ।
तानेव सा जघानाशु कृत्या नाशं जगाम च
॥ ३७ ॥
त्या पापी पुरोहितांनी त्या निष्पाप बालकावर
कृत्येचा प्रयोग केला होता,
म्हणून
लगेच तिने त्यांच्यावर वार केला आणि त्यांनाच नष्ट केले .
कृत्यया दह्यमानान् तान् विलोक्य स महामतिः ।
त्राहि
कृष्णेत्यनन्तेति वदन्नभ्यवपद्यत ॥ ३८ ॥
आपल्या गुरुंना कृत्याद्वारा जाळले जाताना पाहून
महामति प्रल्हाद ‘ हे
कृष्णा ! रक्षा कर ! हे अनंता ! वाचव !’ असे म्हणत त्यांच्या जवळ धावला .
प्रह्लाद उवाच -
सर्वव्यापिन् जगद्रूप
जगत्स्रष्टर्जनार्दन ।
पाहि विप्रानिमानस्माद् दुःसहान्
मन्त्रपावकात् ॥ ३९ ॥
प्रल्हाद म्हणाला – हे सर्वव्यापी, विश्वरूप, विश्वस्त्रष्टा
जनार्दना ! ह्या ब्राह्मणांचे ह्या मंत्राग्निरूप दु:सह दुःखापासून रक्षण कर .
यथा सर्वेषु भूतेषु सर्वव्यापी जगद्गुरुः ।
विष्णुरेव तथा सर्वे जीवन्त्वेते
पुरोहिताः ॥ ४० ॥
‘सर्वव्यापी
जगद्गुरु भगवान विष्णु सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त आहे’ह्या सत्याच्या
प्रभावाने हे पुरोहितगण जीवित होऊ दे .
यथा सर्वगतं विष्णुं
मन्यमानोऽनपायिनम् ।
चिन्तयाम्यरिपक्षेऽपि जीवन्त्वेते
पुरोहिताः ॥ ४१ ॥
जर मी सर्वव्यापी आणि अक्षय श्रीविष्णुला आपल्या
विपक्षियांमध्ये सुद्धा बघत असेन तर हे पुरोहितगण जीवित होऊ देत .
ये हन्तुमागता दत्तं योर्विषं
यैर्हुताशनः ।
यैः दिग्गजैः अहं क्षुण्णो दष्टः
सर्पैश्च यैरपि ॥ ४२ ॥
तेष्वहं मित्रभावेन समः पापोस्मि न क्वचित् ।
यथा तेनाद्य सत्येन
जीवन्त्वसुरयाजकाः ॥ ४३ ॥
जे लोक मला मारायला आले, ज्यांनी मला
विष दिले, ज्यांनी
आगीत जाळलं, ज्यांनी
दिग्गजांकडून पीड़ित केलं आणि सर्पांकडून दंश करवला, त्या सर्वांप्रति जर मी समान
मित्रभावाने राहातो आणि माझी कधीही पापबुद्धि नाही झाली तर त्या सत्याच्या
प्रभावाने हे दैत्यपुरोहित उठू देत .
श्रीपराशर उवाच -
इत्युक्तास्तेन ते सर्वे
संस्पृष्टाश्च निरामयाः ।
समुत्तस्थुर्द्विजा भूयस्तमूचुः
प्रश्रयान्वितम् ॥ ४४ ॥
श्रीपराशर म्हणाले – असे म्हणून त्यांना स्पर्श करताच तै
ब्राह्मण स्वस्थ होऊन उठून बसले आणि ह्या विनम्र बालकाला म्हणू लागले .
पुरोहिता ऊचुः -
दीर्घायुरप्रतिहतो बलवीर्यसमन्वितः ।
पुत्रपौत्रधनश्वर्यैः युक्तो वत्स
भवोत्तमः ॥ ४५ ॥
पुरोहितगण म्हणाले – हे वत्सा ! तू मोठा श्रेष्ठ आहेस. तू
दीर्घायु, निर्द्वन्द, बल-वीर्यसम्पन्न
तथा पुत्र, पौत्र
एवं धन-ऐश्वर्यादिंनी सम्पन्न हो .
श्रीपराशर उवाच -
इत्युक्त्वा तं ततो गत्वा यथावृत्तं
पुरोहिताः ।
दैत्यराजाय सकलं आचचख्युर्महामुने ॥
४६ ॥
श्रीपराशर म्हणाले – हे महामुने ! असे म्हणून पुरोहितांनी
दैत्यराज हिरण्यकशिपुकडे जाऊन सर्व गोष्ट जशी झाली तशी ऐकवली .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे अष्टोदशोऽध्याय"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा