॥ प्रथमः अंशः ॥ ॥ षोडशोऽध्यायः ॥
"नृसिंहावतार
विषयक प्रश्न"
मैत्रेय उवाच
कथितो
भवता वंशो मानवानां महामुने ।
कारणं चास्य जगतो विष्णुरेव सनातनः ॥
१ ॥
श्रीमैत्रेय म्हणाले – तुम्ही महात्मा
मनुपुत्रांच्या वंशाचे वर्णन केले आणि हे देखिल सांगितले की ह्या जगताचे सनातन कारण
भगवान विष्णुच आहेत .
यत्त्वेतद्
भगवानाह प्रह्लादं दैत्यसत्तमम् ।
ददाह नाग्निर्नास्त्रैश्च
क्षुण्णस्तत्याज जीवितम् ॥ २ ॥
किन्तु, भगवन ! तुम्ही सांगितलत की दैत्यश्रेष्ठ
प्रल्हादला अग्नि भस्म करू शकला नाही की अस्त्र-शस्त्रांच्या आघातानेही त्याने
आपले प्राण सोडले नाहीत .
जगाम वसुधा क्षोभं यत्राब्धिसलिले
स्थिते ।
पाशैर्बद्धे विचलति विक्षिप्ताङ्गैः
समाहता ॥ ३ ॥
तसेच पाशबद्ध होऊन समुद्रजलात पडून राहिला तेव्हा
त्याच्या हलणार्या डुलणार्या शरिरामुळे पृथ्वी डगमगू लागली .
शैलैराक्रान्तदेहोऽपि
न ममार च यः पुरा ।
त्वयैवातीव माहात्म्यं कथितं यस्य
धीमतः ॥ ४ ॥
आणि शरीरावर दगडांचा मारा झाल्यावरही त्याचा
मृत्यु नाही झाला. अशाप्रकारे ज्या महाबुद्धिमानाचे तुम्ही माहात्म्य वर्णन केले
आहे .
तस्य प्रभावमतुलं विष्णोर्भक्तिमतो मुने ।
श्रोतुमिच्छामि
यस्यैतच्चरितं दीप्ततेजसः ॥ ५ ॥
हे मुने ! ज्या अति तेजस्वी माहात्म्याचे असे
चरित्र आहे, मी
त्या परम विष्णुभक्ताचा अतुलित प्रभाव ऐकू इच्छितो .
किंनिमित्तमसौ शस्त्रैर्विक्षतो
दितिजैर्मुने ।
किमर्थं चाब्धिसलिले निक्षिप्तो
धर्मतत्परः ॥ ६ ॥
हे मुनिवर ! तो तर मोठा धर्मपरायण होता, मग दैत्यांनि
त्याला अस्त्र-शस्त्रांनी पीड़ित का केले व समुद्रजलात का टाकले ?
आक्रान्तः पर्वतैः कस्मात्
द्दष्टश्चैव महोरगैः ।
क्षिप्तः किमद्रिशिखरात्किं वा
पावकसञ्चये ॥ ७ ॥
त्याला पर्वतांनी का चिरडले ? सापांकडून दंश का करविला ?
पर्वतशिखरावरून खाली का फेकले आणि अग्नित का जळवले ? .
दिग्दन्तिनां दन्तभूमिं स च
कस्मान्निरूपितः ।
संशोषकोऽनिलश्चास्य प्रयुक्तः किं
महासुरैः ॥ ८ ॥
त्या महादैत्यांनी त्याला दिग्गजांच्या दातांनी
भूमीवर का तुडविले आणि सर्वशोषक वायुला त्याच्यासाठी नियुक्त का केले ?
कृत्यां
च दैत्यगुरवो युयुजुस्ते तु किं मुने ।
शम्बरश्चापि मायानां सहस्रं किं प्रयुक्तवान् ॥ ९
॥
हे मुने ! त्याच्यावर दैत्यगुरुंनी कृत्येचा
प्रयोग का केला आणि शम्बरासुराने आपल्या हजारो मायांनी त्याच्यावर वार का केला ?
हालाहलं विषमहो दैत्यसूदैर्महात्मनः
।
कस्माद्दत्तं विनाशाय यज् जीर्णं
तेन धीमता ॥ १० ॥
त्या महात्म्याला मारण्यासाठी दैत्यराजाच्या
आचार्यांनी त्याला हलाहल विष का दिले जे त्या महाबुद्धिमानाने पचवले .
एतत्सर्वं महाभाग प्रह्लादस्य
महात्मनः ।
चरितं श्रोतुमिच्छामि
महामाहात्म्यसूचकम् ॥ ११ ॥
हे महाभाग् ! महात्मा प्रल्हादाचे हे सम्पूर्ण
चरित्र, जे
त्याच्या महान माहात्म्याचे सूचक आहे, मी ऐकू इच्छितो .
नहि
कौतूहलं तत्र यद्दैत्यैर्न हतोहि सः ।
अनन्यमनसो विष्णौ कः समर्थो निपातने
॥ १२ ॥
जर दैत्यगण त्याला मारू शकले नाहीत तर मला त्याचे
आश्चर्य नाही, कारण
ज्याचे मन अनन्यभावाने भगवान विष्णुत रमले आहे त्याला कोण मारू शकणार .
तस्मिन् धर्मपरे नित्यं
केशवाराधनोद्यते ।
स्ववंशप्रभवैर्दैत्यैः कर्तुं
द्वेषोऽतिदुष्करः ॥ १३ ॥
जो नित्यधर्मपरायण आणि भगवदाराधनेत तत्पर रहात
होता, त्याच्याशी
त्याच्याच कुळात उत्पन्न झालेल्या दैत्यांनी असा अति दुष्कर द्वेष केला !
धर्मात्मनि महाभागे विष्णुभक्ते विमत्सरे ।
दैतेयैः
प्रहृतं कस्मात्तन्ममाख्यातुमर्हसि ॥ १४ ॥
त्या धर्मात्मा, महाभाग, मत्सरहीन
विष्णु-भक्ताला दैत्यांनी कोणत्या कारणाने इतके कष्ट दिले, ते तुम्ही मला
सांगा .
प्रहरन्ति महात्मानो विपक्षे अपि नेदृशे ।
गुणैस्समन्विते साधौ किं पुनर्यः
स्वपक्षजः ॥ १५ ॥
महात्मा तर असे गुण-सम्पन्न साधू पुरुष विपक्षी
असतील तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे प्रहार करत नाहीत, मग स्वपक्षाचे
तर सांगायलाच नको ?
तदेतत् कथ्यतां सर्वं
विस्तरान्मुनिपुङ्गव ।
दैत्येश्वरस्य चरितं
श्रोतुमिच्छाम्यशेषतः ॥ १६ ॥
म्हणून हे मुनिश्रेष्ठा ! हा सम्पूर्ण वृतांत
विस्तारपूर्वक वर्णन करावा. मी त्या दैत्यराजाचे सम्पूर्ण चरित्र ऐकू इच्छितो .
"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे षोडशोऽध्याय"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा