गुरुवार, १ जानेवारी, २०२६

विष्णुपुराण, प्रथम अंश, चतुर्दश अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 14

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः ॥ चतुर्दशोऽध्यायः ॥

 

"प्राचीनबर्हिचा जन्म व प्रचेतांचे भगवदाराधन"


पराशर उवाच
 
पृथोः पुत्रौ महावीर्यौ जज्ञातेऽन्तर्द्धिवादिनौ ।
 
शिखण्ड्इनी हविर्धानमन्तर्धानाद्‌व्यजायत ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मैत्रेया ! पृथुला अन्तर्धान आणि वादी नामक दोन धर्मज्ञ पुत्र झाले, अंतर्धानापासून त्याची पत्नी शिखंडीनीने हविर्धानाला उत्पन्न केले .

 

 

हविर्धानात् षडाग्नेयी धिषणाजनयत्सुतान् ।
 
प्राचीनबर्हिषं शुक्रं गयं कृष्णं वृजाजिनौ ॥ २ ॥

हविर्धानपासून अग्निकुलीना धिषणाने प्राचीनबर्हि, शुक्र, गय, कृष्ण, वृज आणि अजिन हे सहा पुत्र उत्पन्न केले .

 


 
प्राचीनबर्हिर्भगवान्महानासीत्प्रजापतिः ।
 
हविर्धानिर्महाभाग येन संवर्धिताः प्रजाः ॥ ३ ॥

हे महाभागा ! हविर्धानापासून उत्पन्न झालेले भगवान प्राचीनबर्हि एक महान प्रजापति होते, ज्यांनी यज्ञा द्वारा आपल्या प्रजेची खूप वृद्धि केली .

 

प्राचीनाग्राः कुशास्तस्य पृथिव्यां विश्रुता मुने ।
प्राचीनबर्हिरभवत्ख्यातो भुवि महाबलः ॥ ४ ॥

हे मुने ! त्यांच्या वेळी [यज्ञानुष्ठानाच्या अधिकतेमुळे] प्राचिनाग्र कुश समस्त पृथ्वीवर पसरले होते, म्हणून ते महाबलीप्राचीनबर्हिनावाने विख्यात झाले.


समुद्रतनयायां तु कृतदारो महीपतिः ।
महतस्तपसः पारे सवर्णायां महीपतेः ॥ ५ ॥

हे महामते ! त्या महीपतिने महान तपस्या करून समुद्रकन्या सवर्णा सोबत विवाह केला .

 


 
सवर्णाधत्त सामुद्री दश प्राचीनबर्हिषः ।
 
सर्वे प्रचेतसो नाम धनुर्वेदस्य पारगाः ॥ ६ ॥

त्या समुद्रकन्या सवर्णाला प्राचीनबर्हिपासून दहा पुत्र झाले. ते प्रचेता नामक सर्व पुत्र धनुर्विद्येत निपुण होते .

 


 
अपृथग्धर्मचरणास्तेऽतप्यन्त महत्तपः ।
 
दश वर्षसहस्राणि समुद्रसलिलेशयाः ॥ ७ ॥

त्यांनी समुद्र जलात राहून दहा हजार वर्षांपर्यंत समान धर्माचे आचरण करत घोर तपस्या केली .



 
मैत्रेय उवाच
 
यदर्थं ते महात्मानस्तपस्तेपुर्महामुने ।
 
प्रचेतसः समुद्राम्भस्येतदाख्यातुमर्हसि ॥ ८ ॥

श्रीमैत्रेय म्हणालेहे महामुने ! त्या महात्मा प्रचेतांनी ज्यासाठी समुद्रजलात तपस्या केली होती ते आपण सांगावे .



 
पराशर उवाच
 
पित्रा प्रचेतसः प्रोक्ताः प्रजार्थममितात्मना ।
 
प्रजापतिनियुक्तेन बहुमानपुरःसरम् ॥ ९ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मैत्रेया ! एकदा प्रजापतिच्या प्रेरणेने प्रचेतांचे महात्मा पिता प्राचीनबर्हिने त्यांना अति सम्मानपूर्वक संतानोत्पत्तिसाठी अशाप्रकारे सांगितले .

 


 
प्राचीनबर्हिरुवाच
 
ब्रह्मणा देवदेवेन समादिष्टोऽस्म्यहं सुताः ।
 
प्रजाः संवर्धनीयास्ते मया चोक्तं तथेति तत् ॥ १० ॥

प्राचीनबर्हि म्हणालेहे पुत्रांनो ! देवाधिदेव ब्रह्माने मला आज्ञा दिली आहे कितु प्रजेची वृद्धि करआणि मी सुद्धा त्यांनातसेच करेनअसे सांगितले .

 

 

तन्मम प्रीतये पुत्राः प्रजावृद्धिमतन्द्रिताः ।
 
कुरुध्वं माननीया च सम्यगाज्ञा प्रजापतेः ॥ ११ ॥

म्हणून हे पुत्रगणांनो ! तुम्ही सुद्धा मला प्रसन्न करण्यासाठी सावधानतापूर्वक प्रजेची वृद्धि करा, कारण प्रजापतिची आज्ञा तुम्हाला सुद्धा सर्वथा माननीय आहे .

 


 
पराशर उवाच
 
ततस्ते तत्पितुः श्रुत्वा वचनं नृपनन्दनाः ।
 
तथेत्युक्त्वा च तं भूयः पप्रच्छुः पितरं मुने ॥ १२ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मुने ! त्या राजकुमारांनी पित्याचे बोलणे ऐकून त्यांनाजशी आज्ञाअसे म्हणून परत विचारले .


 
प्रचेतस ऊचुः
 
येन तात प्रजावृद्धौ समर्थाः कर्मणा वयम् ।
 
भवेम तत् समस्तं नः कर्म व्याख्यातुमर्हसि ॥ १३ ॥

प्रचेता म्हणालेहे तात ! ज्या कर्मामुळे आम्ही प्रजावृद्धिसाठी समर्थ होऊ ते तुम्ही आम्हाला नीट समजावून सांगा .

 


 
पितोवाच
 
आराध्य वरदं विष्णुमिष्टप्राप्तिमसंशयम् ।
 
समेति नान्यथा मर्त्यः किमन्यत्कथयामि वः ॥ १४ ॥

पित्याने म्हटलेवरदायक भगवान विष्णुची आराधना केल्यानेच मनुष्याला नि:संदेह इष्ट वस्तुची प्राप्ति होते आणखी कोणत्याही उपायाने नाही. ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी काय सांगू?

 


 
तस्मात् प्रजाविवृद्ध्यर्थं सर्वभूतप्रभुं हरिम् ।
 
आराधयत गोविन्दं यदि सिद्धिमभीप्सथ ॥ १५ ॥

म्हणून जर तुम्हाला सफलता हवी असेल तर प्रजावृद्धिसाठी सर्वभूतांचे स्वामी श्रीहरि गोविन्द ह्यांची उपासना करा .

 


 
धर्ममर्थं च कामं च मोक्षं चान्विच्छतां सदा ।
 
आराधनीयो भगवाननादिपुरुषोत्तमः ॥ १६ ॥

धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षाची इच्छा करणार्‍यांनी नेहमी अनादि पुरुषोत्तम भगवान विष्णुची आराधना करायला हवी .

 


यस्मिन्नाराधिते सर्गं चकारादौ प्रजापतिः ।
तमाराध्याच्युतं वृद्धिः प्रजानां वो भविष्यति ॥ १७ ॥

कल्पाच्या आरंभी ज्यांची उपासना करून प्रजापतिंनी संसाराची रचना केली आहे, तुम्ही त्या अच्युताचीच आराधना करा. त्यामुळे तुमच्या संततिची वृद्धि होईल .

 

 

पराशर उवाच
 
इत्येवमुक्तास्ते पित्रा पुत्राः प्रचेतसो दश ।
 
मग्नाः पयोधिसलिले तपस्तेपुः समाहिताः ॥ १८ ॥

श्रीपराशर म्हणालेपित्याची अशी आज्ञा झाल्यावर प्रचेता नामक दहा पुत्रांनी समुद्रजलात पूर्णपणे बुडून राहून सावधानतापूर्वक तपाला आरम्भ केला .

 


 
दश वर्षसहस्राणि न्यस्तचित्ता जगत्पतौ ।
 
नारायणे मुनिश्रेष्ठ सर्वलोकपरायणे ॥ १९ ॥

तत्रैव ते स्थिता देवमेकाग्रमनसो हरिम् ।
 
तुष्टुवुर्यस्स्तुतः कामान् स्तोतुरिष्टान्प्रयच्छति ॥ २० ॥

हे मुनिश्रेष्ठा ! सर्वलोकाश्रय जगत्पति श्रीनारायणात चित्त लावून त्यांनी दहा हजार वर्ष तिथेच (जलातच) स्थित राहून देवाधिदेव श्रीहरिची एकाग्र-चित्ताने स्तुति केली, जो आपली स्तुति केल्यावर स्तुति करणार्‍यांच्या सर्व  कामना सफल करतो .

 


 
मैत्रेय उवाच
स्तवं प्रचेतसो विष्णोः समुद्राम्भसि संस्थिताः ।
चक्रुस्तन्मे मुनिश्रेष्ठ सुपुण्यं वक्तुमर्हसि ॥ २१ ॥

श्रीमैत्रेय म्हणालेहे मुनिश्रेष्ठा ! समुद्रजलात स्थित राहून प्रचेतांनी भगवान विष्णुंची जी अति पवित्र स्तुति केली होती ती कृपा करून मला सांगा .


 
पराशर उवाच
 
शृणु मैत्रेय गोविन्दं यथापूर्वं प्रचेतसः ।
 
तुष्टुवुस्तन्मयीभूताः समुद्रसलिलेशयाः ॥ २२ ॥

श्रीपराशर  म्हणालेहे मैत्रेया ! पूर्वकाळी समुद्रात स्थित राहून प्रचेतांनी तन्मय-भावाने श्रीगोविंदाची जी स्तुति केली ती ऐक .

 


 
प्रचेतस ऊचुः
 
नताः स्म सर्ववचसां प्रतिष्ठा यत्र शाश्वती ।
 
तमाद्यन्तमशेषस्य जगतः परमं प्रभुम् ॥ २३ ॥

प्रचेता म्हणालेज्यांच्यात सम्पूर्ण वाक्यांची नित्य-प्रतिष्ठा आहे [अर्थात जो सम्पूर्ण वाक्यांचा एकमात्र प्रतिपाद्य आहे] तसेच जो जगताच्या उत्पत्ति आणि प्रलयाचे कारण आहे त्या निखिल-जगन्नायक परमप्रभुला आम्ही नमस्कार करतो .

 


 
ज्योतिराद्यमनौपम्यमण्वनन्तमपारवत् ।
 
योनिभूतमशेषस्य स्थावरस्य चरस्य च ॥ २४ ॥

यस्याहः प्रथमं रूपमरूपस्य तथा निशा ।
 
संध्या च परमेशस्य तस्मै कालात्मने नमः ॥ २५ ॥

जो आद्य ज्योतिस्स्वरूप, अनुपम, अणु, अनंत, अपार आणि समस्त चराचराचे कारण आहे, तसेच ज्या रूपहीन परमेश्वराचे दिवस, रात्र आणि संध्या ही प्रथम रूपे आहेत, त्या कालस्वरूप भगवंताला आमचा नमस्कार .

 


 
भुज्यतेऽनुदिनं देवैः पितृभिश्च सुधात्मकः ।
 
जीवभूतः समस्तस्य तस्मै सोमात्मने नमः ॥ २६ ॥

समस्त प्राण्यांचे जीवनरूप ज्यांच्या अमृतमय स्वरूपाला देव आणि पितृगण नित्यप्रति भोगतात – त्या सोमस्वरूप प्रभुला नमस्कार .

 


 
यस्तमांस्यत्ति तीव्रात्मा स्वभाभिर्भासयन्नभः ।
 
घर्मशीताम्भसां योनिस्तस्मै सूर्यात्मने नमः ॥ २७ ॥

जो तीक्ष्णस्वरूप आपल्या तेजाने आकाशमंडल प्रकाशित करर अन्धकार भक्षण करतो तसेच जो घाम, शीत आणि जलाचे उद्गमस्थान आहे त्या सूर्यस्वरूप [नारायणाला] नमस्कार .

 


काठिन्यवान् यो बिभर्ति जगदेतदशेषतः ।
शब्दादिसंश्रयो व्यापी तस्मै भूम्यात्मने नमः ॥ २८ ॥

जे कठीण होऊन ह्या सम्पूर्ण संसाराला धारण करतात आणि शब्द आदि पाच विषयांचा आधार तसेच व्यापक आहेत, त्या भुमिरूप भगवंताला नमस्कार .

 


 
यद्योनिभूतं जगतो बीजं यत्सर्वदेहिनाम् ।
 
तत्तोयरूपमीशस्य नमामो हरिमेधसः ॥ २९ ॥

जो संसाराचे योनिरूप आहे आणि समस्त देहधारींचे बीज आहे, भगवान हरिच्या त्या जलस्वरूपाला आम्ही नमस्कार करतो .

 

 

यो मुखं सर्वदेवानां हव्यभुक् कव्यभुक् तथा ।
पितॄणां च नमस्तस्मै विष्णवे पावकात्मने ॥ ३० ॥

जो समस्त देवतांचे हव्यभूक आणि पितृगणांचे कव्यभूक मुख आहे, त्या अग्निस्वरूप विष्णुभगवंताला नमस्कार  .

 


 
पञ्चधावस्थितो देहे यश्चेष्टां कुरुतेऽनिशम् ।
 
आकाशयोनिर्भगवांस्तस्मै वाय्वात्मने नमः ॥ ३१ ॥

जो प्राण, अपान आदि पाच प्रकारच्या देहात स्थित होऊन दिवस रात्र चेष्टा करत राहतो तसेच ज्याची योनि आकाश आहे, त्या वायुरूप भगवंताला नमस्कार .

 


 
अवकाशमशेषाणां भूतानां यः प्रयच्छति ।
 
अनन्तमूर्तिमाञ्छुद्धस्तस्मै व्योमात्मने नमः ॥ ३२ ॥

जो समस्त भूतांना अवकाश देतो त्या अनंतमूर्ति आणि परम शुद्ध आकाशस्वरूप प्रभुला नमस्कार .

 


 
समस्तेन्द्रियवर्गस्य यः सदा स्थानमुत्तमम् ।
 
तस्मै शब्दादिरूपाय नमः कृष्णाय वेधसे ॥ ३३ ॥

समस्त इन्द्रिय-सृष्टिचे जो उत्तम स्थान आरे त्या शब्द-स्पर्शादिरूप विधाता श्रीकृष्णचद्राला नमस्कार .

 


 
गृह्णाति विषयान्नित्यमिन्द्रियात्मा क्षराक्षरः ।
 
यस्तस्मै ज्ञानमूलाय नताः स्म हरिमेधसे ॥ ३४ ॥

जे क्षर आणि अक्षर इन्द्रियरूपाने नित्य विषयांचे ग्रहण करतात त्या ज्ञानमूल हरिला नमस्कार .

 

 

गृहीतानिन्द्रियैरर्थानात्मने यः प्रयच्छति ।
अन्तःकरणभूताय तस्मै विश्वात्मने नमः ॥ ३५ ॥

इन्द्रियां द्वारा ग्रहण केलेल्या विषयांना जो आत्म्याच्या सम्मुख उपस्थित करतो त्या अंत:करणरूप विश्वात्म्याला नमस्कार .

 


यस्मिन्ननन्ते सकलं विश्वं यस्मात्तथोद्‍गतम् ।
लयस्थानं च यस्तस्मै नमः प्रकृतिधर्मिणे ॥ ३६ ॥

ज्या अनंतात सकल विश्व स्थित आहे, ज्यापासून ते  उत्पन्न झाले आहे आणि जे त्याच्या लयाचेही स्थान आहे त्या प्रकृतिस्वरूप परमात्म्याला नमस्कार .

 


 
शुद्धः सँल्लक्ष्यते भ्रान्त्या गुणवानिव योऽगुणः ।
 
तमात्मरूपिणं देवं नताः स्म पुरुषोत्तमम् ॥ ३७ ॥

 जे शुद्ध आणि निर्गुण असूनही भ्रमवश गुणयुक्त दिसतात .

 


 
अविकारमजं शुद्धं निर्गुणं यन्निरञ्जनम् ।
 
नताः स्म तत्परं ब्रह्म विष्णोर्यत्परमं पदम् ॥ ३८ ॥

जे अविकारी, अजन्मा, शुद्ध, निर्गुण, निर्मल आणि श्रीविष्णुचे परमपद आहेत त्या ब्रह्मस्वरूपाला आम्ही नमस्कार करतो .

 


 
अदीर्घह्रस्वमस्थूलमनण्वश्यामलोहितम् ।
 
अस्नेहच्छायमतनुमसक्तमसमीरणम् ॥ ३९ ॥

अनाकाशमसंस्पर्शमगन्धमरसं च यत् ।
अचक्षुःश्रोत्रमचलमवाक्‌पाणिममानसम् ॥ ४० ॥

अनामगोत्रमसुखमतेजस्कमहेतुकम् ।
 
अभयं भ्रान्तिरहितमनिद्रमजरामरम् ॥ ४१ ॥

अरजोऽशब्दममृतमप्लुतं यदसंवृतम् ।
 
पूर्वापरे न वै यस्मिंस्तद्‌विष्णोः परमं पदम् ॥ ४२ ॥

जो लांब नाही, बारीक नाहीजाडा नाही, छोटा नाहीकाळा नाही कि लालही नाही, जो स्नेह (द्रव), कान्ति व शरीररहित आणि अनासक्त अशरीरी (जीवापासून भिन्न) आहे. जो अवकाश स्पर्श, गंध व रस रहित तसेच डोळे व कान विहीन, अचल आणि जिव्हा, हात व मनरहित आहे . जो नाम, गोत्र, सुख आणि तेजाने शून्य तथा कारणहीन आहे, ज्याच्यात भय, भ्रान्ति, निद्रा, जरा आणि मरण – ह्या अवस्थांचा अभाव आहे . जो अरज (रजोगुणरहित), अशब्द, अमृत, अप्लुत (गतिशुन्य) आणि असंवृत (अनाच्छादित) आहे तसेच ज्याच्यात पुर्वापर व्यवहाराची गति नाही तेच भगवान विष्णुंचे परमपद आहे .

 


 
परमेशत्वगुणवत्सर्वभूतमसंश्रयम् ।
 
नताः स्म तत् पदं विष्णोर्जिह्वादृग्गोचरं न यत् ॥ ४३ ॥

ज्याचे ईशन (शासन) हाच परमगुण आहे, जो सर्वरूप आणि अनाधार आहे तथा जिव्हा व दृष्टिचा अविषय आहे, भगवान विष्णुंच्या त्या परमपदाला आम्ही नमस्कार करतो .

 


 
पराशर उवाच
 
एवं प्रचेतसो विष्णुं स्तुवन्तस्तत्समाधयः ।
 
दश वर्षसहस्राणि तपश्चेरुर्महार्णवे ॥ ४४ ॥

श्रीपराशर म्हणालेअशाप्रकारे भगवान श्रीविष्णुमध्ये समाधिस्त होऊन प्रचेतांनी महासागरात राहून त्यांची स्तुति करत दहा हजार वर्षे तपस्या केली .

 


 
ततः प्रसन्नो भगवांस्तेषामन्तर्जले हरिः ।
 
ददौ दर्शनमुन्निद्रनीलोत्पलदलच्छविः ॥ ४५ ॥

तेव्हा भगवान श्रीहरि ने प्रसन्न होऊन त्यांना पूर्ण उमललेल्या नीलकमळासारख्या आभायुक्त दिव्य छविने  जलातच दर्शन दिले .

 


 
पतत्रिराजमारूढमवलोक्य प्रचेतसः ।
 
प्रणिपेतुः शिरोभिस्तं भक्तिभारावनामितैः ॥ ४६ ॥

प्रचेतांनी पक्षिराज गरुडावर चढ़लेल्या श्रीहरिला पाहून त्यांना भक्तिभावाच्या ओझ्याने वाकलेल्या मस्तकांनी प्रणाम केला .

 


 
ततस्तानाह भगवान् व्रियतामीप्सितो वरः ।
 
प्रसादसुमुखोऽहं वो वरदः समुपस्थितः ॥ ४७ ॥

तेव्हा भगवंताने त्यांना म्हटले – “मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला वर देण्यासाठी आलो आहे, तुम्ही आपला अभीष्ट वर मागा” .

 


 
ततस्तमूचुर्वरदं प्रणिपत्य प्रचेतसः ।
 
यथा पित्रा समादिष्टं प्रजानां वृद्धिकारणम् ॥ ४८ ॥

तेव्हा प्रचेतांनी वरदायक श्रीहरिला प्रणाम करून, ज्याप्रकारे त्यांच्या पित्याने त्यांना प्रजा-वृद्धिसाठी आज्ञा दिली होती ते सर्व सांगितले .

 

 

स चापि देवस्तं दत्त्वा यथाभिलषितं वरम् ।
अन्तर्धानं जगामाशु ते च निश्चक्रमुर्जलात् ॥ ४९ ॥

त्यानंतर, भगवंत त्यांना अभीष्ट वर दोऊन अन्तर्धान झाले आणि ते जलातून बाहेर आले .

 



"इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे चतुर्दशोऽध्याय"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...