॥ प्रथमः अंशः ॥ ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥
"राजा
वेन आणि पृथुचे चरित्र"
पराशर उवाच
ध्रुवाच्छिष्टिं
च भव्यं च भव्याच्छम्भुर्व्यजायत ।
शिष्टेराधत्त सुच्छाया पञ्चपुत्रानकल्मषान् ॥ १ ॥
रिपुं
रिपुञ्जयं विप्रं वृकलं वृकतेजसम् ।
रिपोराधत्त
बृहती चाक्षुषं सर्वतेजसम् ॥ २ ॥
श्रीपराशर म्हणाले -
हे मैत्रेया ! ध्रुवापासून (त्याच्या
पत्नीने) शिष्टि आणि भव्याला उत्पन्न केले. भव्य पासून शम्भुचा जन्म झाला व शिष्टि
द्वारा त्याची पत्नी सुच्छाया हिने रिपु, रिपुत्र्जय, विप्र, वृकत आणि वृकतेजा नामक पाच निष्पाप पुत्र उप्तन्न
केले. त्यापैकी रिपु द्वारा बृहतीच्या गर्भातून महातेजस्वी चाक्षुषाचा जन्म झाला.
अजीजनत्पुष्करिण्यां वारुण्यां
चाक्षुषो मनुम् ।
प्रजापतेरात्मजायां वीरणस्य महात्मनः
॥ ३ ॥
चाक्षुषाने
आपलि भार्या पुष्करणी पासून, जी वरूण - कुळात उप्तन्न आणि महात्मा वीरण
प्रजापतिची कन्या होती, मनुला
उप्तन्न केले (जो सहाव्या मन्वन्तराचा अधिपति झाला) .
मनोरजायन्त दश नड्वलायां महौजसः ।
कन्यायां तपतां श्रेष्ठ वैराजस्य
प्रजापतेः ॥ ४ ॥
तपस्विंमध्ये श्रेष्ठ मनुपासून वैराज प्रजापतिची
कन्या नंगवलाच्या गर्भतून दहा महातेजस्वी पुत्र उत्पन्न झाले .
कुरुः पुरुः शतद्युम्नस्तपस्वी
सत्यवाञ्छुचिः ।
अग्निष्टोमोऽतिरात्रश्च
सुद्युम्नश्चेति ते नव ।
अभिमन्युश्च दशमो नड्वलायां महौजसः ॥
५ ॥
नंगवलापासून कुरु, पुरु, शतद्युम्र, तपस्वी, सत्यवान्, शुचि, अग्निष्टोम, अतिरात्र तथा
नववा सुद्युम्न आणि दहावा अभिमन्यु ह्या महातेजस्वी पुत्रांचा जन्म झाला .
कुरोरजनयत्पुत्रान् षडाग्नेयी
महाप्रभान् ।
अङ्गं सुमनसं ख्यातिं क्रतुमङ्गिरसं
शिबिम् ॥ ६ ॥
कुरुद्वारा त्याची पत्नी आग्नेयीने अंग, सुमना, ख्याति, क्रतु, अंगिरा आणि
शिबि ह्या सहा परम तेजस्वी पुत्रांना उत्पन्न केले .
अङ्गात्सुनीथापत्यं वै वेनमेकमजायत
।
प्रजार्थमृषयस्तस्य ममन्थुर्दक्षिणं
करम् ॥ ७ ॥
अंगपासून सुनीथाने वेन नामक पुत्र उप्तन्न केला.
ऋषिंनी ह्याच वेनच्या दक्षिण हाताचे संततिसाठी मन्थन केले होते .
वेनस्य पाणौ मथिते सम्बभूव महामुने ।
वैन्यो नाम महीपालो यः पृथुः
परिकीर्त्यते ॥ ८ ॥
येन दुग्धा मही पूर्वं प्रजानां
हितकारणात् ॥ ९ ॥
हे महामुने ! वेनच्या हाताचे मन्थन केल्यावर
त्यापासून वैन्य नामक महीपाल उप्तन्न झाला जो पृथु नावाने विख्यात आहे आणि ज्याने
प्रजेच्या हितासाठी पूर्वकाळी पृथ्वीचे दोहन केले होते .
मैत्रेय उवाच
किमर्थं मथितः पाणिर्वेनस्य
परमर्षिभिः ।
यत्र जज्ञे महावीर्यः स
पृथुर्मुनिसत्तम ॥ १० ॥
श्रीमैत्रेय म्हणाले -
हे मुनिश्रेष्ठा ! परमऋषिंनी वेनच्या
हाताचे मंथन का केले ज्यामुळे महापराक्रमी पृथुचा जन्म झाला ?
पराशर उवाच
सुनीथा नाम या कन्या मृत्योः
प्रथमजाभवत् ।
अङ्गस्य भार्या सा दत्ता तस्यां
वेनो व्यजायत ॥ ११ ॥
श्रीपराशर म्हणाले -
हे मुने ! मृत्युची सुनीथा नामक जी
प्रथम कन्या होती ती अंगराजाला पत्नीरूपात विवाहात दिली गेली होती. तिच्यापासूनच
वेनचा जन्म झाला .
स मातामहदोषेण तेन मृत्योः सुतात्मजः
।
निसर्गादेष मैत्रेय दुष्ट एव व्यजायत
॥ १२ ॥
हे मैत्रेया ! त्या मृत्यु कन्येचा पुत्र आपल्या
मातामहाच्या दोषामुळे स्वभावाने मुळातच दुष्टप्रकृति झाला .
अभिषिक्तो यदा राज्ये स वेनः परमर्षिभिः ।
घोषयामास
स तदा पृथिव्यां पृथिवीपतिः ॥ १३ ॥
न
यष्टव्यं न दातव्यं न होतव्यं कथञ्चन ।
भोक्ता
यज्ञस्य कस्त्वन्यो ह्यहं यज्ञपतिः प्रभुः ॥ १४ ॥
त्या वेनचा जेव्हा महर्षिंद्वारा राजपदावर अभिषेक
झाला त्यावेळी त्या पृथ्वीपतिने विश्वघोषणा केली की 'भगवंत यज्ञपुरुष मीच आहे माझ्या
व्यतिरिक्त यज्ञाचा भोक्ता आणि स्वामी कोण असु शकतो ? म्हणून कधीच कोणी यज्ञ, दान व हवन आदि
करु नये' .
ततस्तमृषयः
पूर्वं सम्पूज्य पृथिवीपतिम् ।
ऊचुः
सामकलं वाक्यं मैत्रेय समुपस्थिताः ॥ १५ ॥
हे मैत्रेया ! तेव्हा ऋषिंनी त्या पृथ्वीपति
उपस्थित होऊन आधी त्याची खूप प्रशंसा केली व सान्त्वनायुक्त मधुर वाणीने सांगितले .
ऋषय ऊचुः
भो भो राजन् शृणुष्व त्वं यद्वदाम
महीपते ।
राज्यदेहोपकाराय प्रजानां च हितं
परम् ॥ १६ ॥
ऋषिगण म्हणाले - हे राजन ! हे पृथ्वीपते ! तुझे
राज्य, देहाचे
उपकार व प्रजेच्या हितासाठी आम्ही जे सांगतो ते ऐक .
दीर्घसत्रेण देवेशं सर्वयज्ञेश्वरं
हरिम् ।
पूजयिष्याम भद्रं ते तस्यांशस्ते
भविष्यति ॥ १७ ॥
तुझे कल्याण असो; आम्ही मोठमोठ्या यज्ञांद्वारा ज्या
सर्व - यज्ञेश्वर देवाधिपति भगवंत हरिचे पूजन करणार त्या फळाचा तुला देखील सहावा
भाग मिळेल .
यज्ञेन यज्ञपुरुषो विष्णुः सम्प्रीणितो नृप ।
अस्माभिर्भवतः
कामान्सर्वानेव प्रदास्यति ॥ १८ ॥
हे नृपा ! अशा प्रकारे यज्ञां द्वारा यज्ञपुरुष
भगवान विष्णु प्रसन्न होऊन आम्हा सर्वां सोबत तुझ्याही सकल कामना पूर्ण करतील .
यज्ञैर्यज्ञेश्वरो येषां राष्ट्रे
सम्पूज्यते हरिः ।
तेषां सर्वेप्सितावाप्तिं ददाति नृप
भूभृताम् ॥ १९ ॥
हे राजन ज्या राजाच्या राज्यात यज्ञेश्वर भगवान्
हरिचे यज्ञाद्वारा पूजन केले जाते, ते त्यांच्या सर्व कामना पूर्ण करतात .
वेन उवाच
मत्तः कोऽभ्यधिकोऽन्योऽस्ति
कश्चाराध्यो ममापरः ।
कोऽयं हरिरिति ख्यातो यो वै
यज्ञेश्वरो मतः ॥ २० ॥
वेन म्हणाला - माझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा आणि
कोण आहे जो मलाही पूजनीय आहे ? ज्याला तुम्ही यज्ञेश्वर मानता तो 'हरि' नावाचा आहे तरी
कोण ? .
ब्रह्मा जनार्दनः शम्भुरिन्द्रो
वायुर्यमो रविः ।
हुतभुग्वरुणो धाता पूषा
भूमिर्निशाकरः ॥ २१ ॥
एते चान्ये च ये देवाः
शापानुग्रहकारिणः ।
नृपस्यैते शरीरस्थाः सर्वदेवमयो नृपः
॥ २२ ॥
ब्रह्मा, विष्णु, महादेव, इन्द्र, वायु , यम, सूर्य, अग्नि, वरुण, धाता, पूषा, पृथिवी आणि चन्द्रमा तसेच ह्यांच्या व्यतिरिक्त
आणखी जेवढे देवता शाप देण्यात आणि कृपा करण्यात समर्थ आहेत ते सर्व राजाच्या
शरीरात निवास करतात, म्हणून
राजा सर्वदेवमय आहे .
एवं ज्ञात्वा मयाज्ञप्तं यद्यथा
क्रियतां तथा ।
न दातव्यं न होतव्यं न यष्टव्यं च भो
द्विजाः ॥ २३ ॥
हे ब्राह्मणांनो ! हे समजून मी जशी जी आज्ञा केली आहे
तसेच करा. कोणीही दान, यज्ञ
आणी हवन आदि करू नये .
भर्तृशुश्रूषणं
धर्मो यथा स्त्रीणां परो मतः ।
ममाज्ञापालनं
धर्मो भवतां च तथा द्विजाः ॥ २४ ॥
हे द्विजगणांनो ! स्त्रीचा परमधर्म जसे आपल्या
पतिची सेवा करणे मानला गेला आहे तसेच तुम्हा सर्वांचा धर्म सुद्धा माझ्या आज्ञेचे
पालन करणे आहे .
ऋषय ऊचुः
देह्यनुज्ञां महाराज मा धर्मो यातु
सङ्क्षयम् ।
हविषां परिणामोऽयं यदेतदखिलं जगत् ॥
२५ ॥
ऋषिगण म्हणाले - महाराज ! आपण अशी आज्ञा द्या, ज्यामुळे धर्माचा
क्षय होणार नाही. हे सारा जगत हवि (यज्ञात हवन केलेली सामग्री )चाच परिणाम आहे .
पराशर उवाच
इति विज्ञाप्यमानोऽपि स वेनः
परमर्षिभिः ।
यदा ददाति नानुज्ञां तदा प्रोक्तः
पुनः पुनः ॥ २६ ॥
ततस्ते मुनयः सर्वे
कोपामर्षसमन्विताः ।
हन्यतां हन्यतां पाप इत्यूचुस्ते
परस्परम् ॥ २७ ॥
श्रीपराशर म्हणाले - महर्षिंनी अशाप्रकारे
वारंवाह समजावल्यावर सुद्धा जेव्हा वेनने अशी आज्ञा दिली नाही तेव्हा ते अत्यन्त
क्रुद्ध आणि अमर्षयुक्त होऊन आपसात म्हणू लागले - ' ह्या पाप्याला मारा, मारा!' .
यो यज्ञपुरुषं विष्णुमनादिनिधनं प्रभुम् ।
विनिन्दत्यधमाचारो न स योग्यो भुवः
पतिः ॥ २८ ॥
जो अनादि आणि अनन्त यज्ञपुरुष प्रभु विष्णुची
निन्दा करतो तो अनाचारी कोणत्याही प्रकारे पृथ्वीपति होण्यास योग्य नाही' .
इत्युक्त्वा मन्त्रपूतैस्तैः
कुशैर्मुनिगणा नृपम् ।
निजघ्नुर्निहतं पूर्वं
भगवन्निन्दनादिना ॥ २९ ॥
असे म्हणून मुनिगणांनी भगवंताची निन्दा आदि
केल्याने आधीच मेलेल्या त्या राजाला मंत्रांनी पवित्र केलेल्या कुशांनी मारून
टाकले .
ततश्च मुनयो रेणुं ददृशुः सर्वतो
द्विज ।
किमेतदिति चासन्नान्पप्रच्छुस्ते
जनांस्तदा ॥ ३० ॥
हे द्विजा ! नंतर त्या मुनीश्वरांनी सर्व बाजूंनी
मोठी धूळ उठलेली पाहिली, ते
पाहून आपल्या जवळील लोकांना विचारले - " हे काय आहे ? "
आख्यातं च जनैस्तेषां चौरीभूतैरराजके
।
राष्ट्रे तु लोकैरारब्धं
परस्वादानमातुरैः ॥ ३१ ॥
त्या पुरुषांनी म्हटले - "राष्ट्र
राजाहीन झाल्याने दीन-दुःखी लोकांनी चोर बनून इतरांचे धन लूटण्यास आरम्भ केला आहे .
तेषामुदीर्णवेगानां
चौराणां मुनिसत्तमाः ।
सुमहान्
दृश्यते रेणुः परवित्तापहारिणाम् ॥ ३२ ॥
हे मुनिवरांनो ! त्या तीव्र वेगवान परधनहारी
चोरांच्या उत्पातामुळेच ही भलीमोठी धूळ उडताना दिसत आहे .
ततः संमन्त्र्य ते सर्वे मुनयस्तस्य
भूभृतः ।
ममन्थुरूरुं पुत्रार्थमनपत्यस्य
यत्नतः ॥ ३३ ॥
तेव्हा त्या सर्व मुनीश्वरांनी आपसात सल्लामसलत
करून त्या पुत्रहीन राजाच्या जांघेचे पुत्रासाठी यत्नपूर्वक मन्थन केले .
मथ्यमानात्समुत्तस्थौ तस्योरोः
पुरुषः किल ।
दग्धस्थूणाप्रतीकाशः
खर्वाटास्योऽतिह्रस्वकः ॥ ३४ ॥
त्याच्या जांघेचे मंथन केल्याने त्यातून एक पुरुष
उत्पन्न झाला जो जळलेल्या ओंडक्या सारखा काळा, अतिशय बुटका आणि छोटे मुख असलेला होता .
किं
करोमीति तान्सर्वान्स विप्रानाह चातुरः ।
निषीदेति
तमूचुस्ते निषादस्तेन सोऽभवत् ॥ ३५ ॥
त्याने अति आतुरतेने त्या सर्व ब्राह्मणांना
विचारले - ' मी काय
करू ?' ते म्हणाले
- "निषीद
(बस)" म्हणून
त्याचे नाव निषाद पडले .
ततस्तत्सम्भवा जाता
विन्ध्यशैलनिवासिनः ।
निषादा मुनिशार्दूल पापकर्मोपलक्षणाः
॥ ३६ ॥
म्हणून हे मुनिशार्दुला ! त्याच्यापासून उप्तन्न
झालेले लोक विन्ध्याचलनिवासी पाप-परायण निषादगण झाले .
तेन
द्वारेण तत्पापं निष्क्रान्तं तस्य भूपतेः ।
निषादास्ते
ततो जाता वेनकल्मषनाशनाः ॥ ३७ ॥
त्या निषादरूपी द्वारातून राजा वेनचे सम्पूर्ण
पाप निघून गेले. म्हणून निषादगण वेनच्या पापांचा नाश करणारे झाले .
ततोऽस्य दक्षिणं हस्तं ममन्थुस्ते
द्विजोत्तमाः ॥ ३८ ॥
मथ्यमाने च तत्राभूत्पृथुर्वैन्यः प्रतापवान् ।
दीप्यमानः स्ववपुषा साक्षादग्निरिव
ज्वलन् ॥ ३९ ॥
मग त्या ब्राह्मणांनी त्याच्या डाव्या हाताचे
मन्थन केले. त्याचे मन्थन केल्याने परमप्रतापी वेनसुवन पृथु प्रकट झाला, जो आपल्या
शरीरातील प्रज्वलित अग्नि समान देदीप्यमान होता .
आद्यमाजगवं
नाम खात्पपात ततो धनुः ।
शराश्च
दिव्या नभसः कवचं च पपात ह ॥ ४० ॥
त्याचवेळी आजगव नावाचे आद्य (सर्वप्रथम)
शिवधनुष्य आणि दिव्य बाण तथा कवच आकाशातून पडले .
तस्मिञ् जाते तु भूतानि सम्प्रहृष्टानि सर्वशः ॥
४१ ॥
सत्पुत्रेण
च जातेन वेनोऽपि त्रिदिवं ययौ ।
पुन्नाम्नो
नरकात् त्रातः स तेन सुमहात्मना ॥ ४२ ॥
त्याच्या उत्पन्न होण्याने सर्व जीवांना अत्यंत
आनंद झाला आणि केवळ सत्पुत्र जन्माला आल्याने वेन देखिल स्वर्गलोकी निघून गेला.
अशाप्रकारे महात्मा पुत्रामुळे त्याची पुम् आर्थात नरकापासून रक्षा झाली .
तं
समुद्राश्च नद्यश्च रत्नान्यादाय सर्वशः ।
तोयानि
चाभिषेकार्थं सर्वाण्येवोपतस्थिरे ॥ ४३ ॥
महाराज पृथुच्या अभिषेकासाठी सर्व समुद्र आणि
नद्या सर्व प्रकारची रत्ने आणि जल घेऊन उपस्थित झाल्या .
पितामहश्च भगवान्देवैराङ्गिरसैः सह ।
स्थावराणि
च भूतानि जङ्गमानि च सर्वशः ।
समागम्य
तदा वैन्यमभ्यषिञ्चन्नराधिपम् ॥ ४४ ॥
त्याचवेळी आंगिरस देवगणां सहित पितामह ब्रह्माने
व समस्त स्थावर जंगम प्राण्यांनी तिथे येऊन महाराज वैन्या( वेनपुत्र) चा
राज्याभिषेक केला .
हस्ते तु दक्षिणे चक्रं दृष्ट्वा
तस्य पितामहः ।
विष्णोरंशं पृथुं मत्वा परितोषं परं
ययौ ॥ ४५ ॥
त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिह्न पाहून
त्याला विष्णुचा अंश जाणून पितामह ब्रह्माला परमानंद झाला .
विष्णुचिह्नं करे चिह्नं सर्वेषां चक्रवर्तिनाम्
।
भवत्यव्याहतो यस्य
प्रभावस्त्रिदशैरपि ॥ ४६ ॥
हे श्रीविष्णुभगवानांच्या चक्राचे चिह्न सर्व
चक्रवर्ती राजांच्या हातावर असते. त्याचा प्रभाव कधी देवतांमुळेही कुण्ठित होत
नाही .
महता राजराज्येन पृथुर्वैन्यः
प्रतापवान् ।
सोऽभिषिक्तो महातेजा विधिवद्धर्मकोविदैः
॥ ४७ ॥
अशाप्रकारे महतेजस्वी व परमप्रतापी वेनपुत्र
धर्मकुशल महानुभावां द्वारा विधिपूर्वक अति महान् राजाराजेश्वर पदावर अभिषिक्त
झाले .
पित्रापरञ्जितास्तस्य
प्रजास्तेनानुरञ्जिताः ।
अनुरागात्ततस्तस्य नाम राजेत्यजायत ॥
४८ ॥
ज्या प्रजेला पित्याने अपरक्त ( अप्रसन्न ) केले
होते त्याच प्रजेला ह्यांनी अनुरंजित ( प्रसन्न ) केले, अनुरंजन
केल्याने त्यांचे नाव 'राजा' झाले .
आपस्तस्तम्भिरे चास्य
समुद्रमभियास्यतः ।
पर्वताश्च ददुर्मार्गं ध्वजभङ्गश्च
नाभवत् ॥ ४९ ॥
जेव्हा ते समुद्रात चालत असत तेव्हा जल
वाहाण्याचे थांबत असे, पर्वत
त्यांना मार्ग देत असत आणि त्यांची ध्वजा कधीच भंग झाली नाही .
अकृष्टपच्या पृथिवी सिद्ध्यन्त्यन्नानि चिन्तया ।
सर्वकामदुघा
गावः पुटके पुटके मधु ॥ ५० ॥
पृथ्वी नांगरणी किंवा पेरणीशिवाय धान्य पिकविणारी
होती; केवळ
चिन्तन मात्रा मुळे अन्न सिद्ध होत असे, गायी कामधेनु रूपा होत्या आणि पानापानात मध
भरलेला होता .
तस्य वै जातमात्रस्य यज्ञे पैतामहे
शुभे ।
सूतः सूत्यां समुत्पन्नः सौत्येऽहनि
महामतिः ॥ ५१ ॥
राजा पृथुने उप्तन्न होताच पैतामह यज्ञ केला, त्यापासून सोमाभिषव
दिवशी सूति (सोमाभिषवभूमि)पासून महामति सुताची उप्तत्ति झाली .
तस्मिन्नेव महायज्ञो जज्ञे प्राज्ञोऽथ मागधः ।
प्रोक्तौ तदा मुनिवरैस्तावुभौ
सूतमागधौ ॥ ५२ ॥
त्याच महायज्ञात बुद्धिमान् मागधाचा देखिल जन्म
झाला. तेव्हा मुनिवरांनी त्या दोन्ही सूत आणि मागधांना म्हटले .
स्तूयतामेष नृपतिः पृथुर्वैन्यः प्रतापवान् ।
कर्मैतदनुरूपं वां पात्रं स्तोत्रस्य
चाप्ययम् ॥ ५३ ॥
'तुम्ही
ह्या प्रतापवान् वेनपुत्र महाराज पृथुची स्तुति करा. तुमच्या योग्य हेच कार्य आहे
आणि राजा देखिल स्तुतीच्याच योग्य आहे' .
ततस्तावूचतुर्विप्रान्सर्वानेव
कृताञ्जली ।
अद्यजातस्य नो कर्म ज्ञायतेऽस्य
महीपतेः ॥ ५४ ॥
तेव्हा त्यांनी हात जोडून सर्व ब्राह्मणांना
म्हटले - 'हे
महाराज तर आजच उप्तन्न झाले आहेत, आम्हाला ह्यांचे कोणतेही कर्म माहित नाही .
गुणा न चास्य ज्ञायन्ते न चास्य प्रथितं यशः ।
स्तोत्रं
किमाश्रयं त्वस्य कार्यमस्माभिरुच्यताम् ॥ ५५ ॥
अजून ह्यांचे कोणतेही गुण प्रकट झालेले नाहित कि
ते यशाने विख्यातही झालेले नाहित, मग सांगा आम्ही कशाच्या आधारावर ह्यांची स्तुति
करू? " .
ऋषय ऊचुः
करिष्यत्येष यत् कर्म चक्रवर्ती
महाबलः ।
गुणा भविष्या ये चास्य तैरयं
स्तूयतां नृपः ॥ ५६ ॥
ऋषिगण म्हणाले - हे महाबाली चक्रवर्ती महाराज
भविष्यात जे जे कर्म करतील आणि त्यांचे जे जे भावी गुण असतील त्यांनीच तुम्ही
त्यांचे स्तवन करा .
पराशर उवाच
ततः स
नृपतिस्तोषं तच्छ्रुत्वा परमं ययौ ।
सद्गुणैः
श्लाघ्यतामेति तस्माल्लभ्या गुणा मम ॥ ५७ ॥
श्रीपराशर म्हणाले - हे ऐकून राजाला सुद्धा परम
सन्तोष झाला, त्यांनी
विचार केला 'मनुष्य
सद्गुणांमुळेच प्रशंसेचा पात्र होतो, म्हणून मला देखिल गुण उपार्जन करायला हवेत .
तस्माद्यदद्य स्तोत्रे मे गुणनिर्वर्णनं त्विमौ ।
करिष्येते करिष्यामि तदेवाहं समाहितः
॥ ५८ ॥
म्हणून आता स्तुति द्वारा हे ज्या गुणांचे वर्णन
करतील मी देखिल सावधानतेने तसच करेन .
यदिमौ वर्जनीयं च किञ्चिदत्र वदिष्यतः ।
तदहं
वर्जयिष्यामीत्येवं चक्रे मतिं नृपः ॥ ५९ ॥
जर ह्यांनी इथे कोणत्या त्याज्य अवगुणांचे वर्णन
केले तर मी देखिल त्यांचा त्याग करेन. अशा प्रकारे राजाने आपल्या मनात निश्चय केला
.
अथ तौ चक्रतुः स्तोत्रं
पृथोर्वैन्यस्य धीमतः ।
भविष्यैः कर्मभिः सम्यक् सुस्वरौ
सूतमागधौ ॥ ६० ॥
नंतर त्या (सूत आणि मागध) दोघांनी बुद्धिमान
वेननन्दन महाराज पृथुचे, त्यांच्या
भावी कर्मांच्या आश्रयाने स्वरसहित योग्यप्रकारे स्तवन केले .
सत्यवाग्दानशीलोऽयं सत्यसन्धो नरेश्वरः ।
ह्रीमान्मैत्रः
क्षमाशीलो विक्रान्तो दुष्टशासनः ॥ ६१ ॥
ते म्हणाले - 'हे महाराज सत्यवादी, दानशील, सत्यमर्यादावाले, लज्जाशील, सुहृद्, क्षमाशील, पराक्रमी आणि
दुष्टांचे दमन करणारे आहेत .
धर्मज्ञाश्च कृतज्ञाश्च दयावान् प्रियभाषकः ।
मान्यान्मानयिता
यज्वा ब्रह्मण्यः साधुवत्सलः ॥ ६२ ॥
समः
शत्रौ च मित्रे च व्यवहारस्थितौ नृपः ॥ ६३ ॥
हे धर्मज्ञ, कृतज्ञ, दयावान्, प्रियभाषी, माननीयांना मान देणास, यज्ञपरायण, ब्रह्माण्य, साधुसमाजात
सम्मानित व शत्रु तथा मित्रांसोबत समान व्यवहार करणारे आहेत .
सूतेनोक्तान् गुणानित्थं स तदा
मागधेन च ।
चकार हृदि तादृक् च कर्मणा कृतवानसौ
॥ ६४ ॥
अशाप्रकारे सूत आणि मागधांनी सांगितलेले गुणोंको
त्यांनी आपल्या मनात धारण केले आणि तशाच प्रकारचे कार्य केले .
ततः स पृथिवीपालः पालयन् वसुधामिमाम्
।
इयाज विविधैर्यज्ञैर्महद्भिर्भूरिदक्षिणैः
॥ ६५ ॥
तेव्हा त्या पृथ्वीपतिने पृथ्वीचे पालन करत
मोठमोठ्या दक्षिणा असणारे अनेक महान यज्ञ केले .
तं प्रजाः पृथिवीनाथमुपतस्थुः
क्षुधार्दिताः ।
ओषधीषु प्रणष्टासु तस्मिन्काले
ह्यराजके ।
तमूचुस्तेन ताः
पृष्टास्तत्रागमनकारणम् ॥ ६६ ॥
अराजकतेच्या वेळी औषधी नष्ट झाल्याने भूकेने
व्याकुळ झालेली प्रजा पृथ्वीनाथ पृथु जवळ गेली व त्याने विचारल्यावर त्याला आपल्या
येण्याचे कारण
सांगितले .
प्रजा ऊचुः
अराजके
नृपश्रेष्ठ धरित्र्या सकलौषधीः ।
ग्रस्तास्ततः
क्षयं यान्ति प्रजाः सर्वाः प्रजेश्वर ॥ ६७ ॥
प्रजा म्हणाली - हे प्रजापति नृपश्रेष्ठा !
अराजकतेच्या वेळी पृथ्वीने समस्त औषधीं आपल्यात लीन करून घेतल्या आहेत म्हणून आपली
संपूर्ण प्रजा क्षीण होत आहे .
त्वं नो वृत्तिप्रदो धात्रा प्रजापालो निरूपितः ।
देहि नः क्षुत्परीतानां प्रजानां
जीवनौषधीः ॥ ६८ ॥
विधाताने तुम्हाला आमचा जीवनदायक प्रजापति बनविले
आहे, म्हणून
क्षुधारूपी महारोगाने पीड़ित आम्हा प्रजाजनांना आपण जीवनरूप औषधी द्यावी .
पराशर उवाच
ततोऽथ
नृपतिर्दिव्यमादायाजगवं धनुः ।
शरांश्च
दिव्यान्कुपितः सोऽन्वधावद्वसुंधराम् ॥ ६९ ॥
श्रीपराशर म्हणाले -
हे
ऐकून महाराज पृथुंनी आपले आजगव नामक दिव्य धनुष आणि दिव्य बाण घेऊन अत्यन्त
क्रोधपूर्वक पृथ्वीचा पाठलाग केला .
ततो ननाश त्वरिता गौर्भूत्वा तु
वसुंधरा ।
सा
लोकान्ब्रह्मलोकादीन्संत्रासादगमन्मही ॥ ७० ॥
तेव्हा भयाने अत्यन्त व्याकुळ झालेली पृथ्वी
गायीचे रूप घेऊन पळाली आणि ब्रह्मलोक आदि सर्व लोकात गेली .
यत्र यत्र ययौ देवी सा तदा भूतधारिणी
।
तत्र तत्र तु सा वैन्यं
ददृशेऽभ्युद्यतायुधम् ॥ ७१ ॥
समस्त भूतांना धारण करणारी पृथ्वी जीथेजिथे गेली
तिथेतिथे तिने वेनपुत्र पृथुला शस्त्र घेऊन आपला पाठलाग करताना पाहिले .
ततस्तं प्राह वसुधा पृथुं
पृथुपराक्रमम् ।
प्रवेपमाना तद्बाणपरित्राणपरायणा ॥
७२ ॥
तेव्हा त्या प्रबळ पराक्रमी महाराज पृथुला, त्यांच्या
बाणप्रहारापासून बचाव करण्यासाठी थरथर कापत पृथ्वी म्हणाली .
पृथिव्युवाच
स्त्रीवधे त्वं महापापं किं नरेन्द्र
न पश्यसि ।
येन मां हन्तुमत्यर्थं प्रकरोषि
नृपोद्यमम् ॥ ७३ ॥
पृथ्वी म्हणाली - हे राजेद्रा ! तुम्हाला
स्त्रीवधाचे महापाप दिसत नाही का, जे तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न करत आहात ? .
पृथुरुवाच
एकस्मिन् यत्र निधनं प्रापिते
दुष्टचारिणि ।
बहूनां भवति क्षेमं तस्य पुण्यप्रदो
वधः ॥ ७४ ॥
पृथु म्हणाले -
जर एका
अनर्थकारीला मारण्याने अनेकांना सुख प्राप्त होत असेल तर त्याला मारणे पुण्यप्रदच
आहे .
पृथिव्युवाच
प्रजानामुपकाराय यदि मां त्वं
हनिष्यसि ।
आधारः कः प्रजानां ते नृपश्रेष्ठ
भविष्यति ॥ ७५ ॥
पृथ्वी म्हणाली - हे नृपश्रेष्ठा ! जर आपण
प्रजेच्या हितासाठी मला मारू इच्छिता तर मग माझ्या मृत्युनंतर आपल्या प्रजेचा आधार
काय असेल ? .
पृथुरुवाच
त्वां हत्वा वसुधे
बाणैर्मच्छासनपराङ्मुखीम् ।
आत्मयोगबलेनेमा धारयिष्याम्यहं
प्रजाः ॥ ७६ ॥
पृथु म्हणाले -
अगं
वसुधे ! माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणार्या तुला मारून मी माझ्या योगबळाने ह्या
प्रजेला धारण करेन .
पराशर उवाच
ततः प्रणम्य वसुधा तं भूयः प्राह
पार्थिवम् ।
प्रवेपिताङ्गी परमं साध्वसं
समुपागता ॥ ७७ ॥
श्रीपराशर म्हणाले -
तेव्हा
अत्यन्त भयभीत होऊन थरथर कापणार्या पृथ्वीने त्या पृथ्वीपतिला पुन्हा प्रणाम करून
म्हटले .
पृथिव्युवाच
उपायतः समारब्धाः सर्वे
सिद्ध्यन्त्युपक्रमाः ।
तस्माद्वदाम्युपायं ते तं कुरुष्व
यदीच्छसि ॥ ७८ ॥
पृथ्वी म्हणाली -
हे राजन ! यत्नपूर्वक आरम्भ केलेले
सर्व कार्य सिद्ध होतात . म्हणून मी देखिल तुम्हाला एक उपाय सांगते; तुमची इच्छा
असेल तर तसे करा .
समस्ता या मया जीर्णा नरनाथ महौषधीः
।
यदीच्छसि प्रदास्यामि ताः
क्षीरपरिणामिनीः ॥ ७९ ॥
हे नरनाथा ! मी ज्या समस्त औषधींचे पचन केले आहे
त्या तुमची इच्छा असल्यास तुम्हाला दुग्धरूपात मी देऊ शकते .
तस्मात्प्रजाहितार्थाय मम धर्मभृतां
वर ।
तं तु वत्सं कुरुष्व त्वं क्षरेयं
येन वत्सला ॥ ८० ॥
म्हणून हे धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ महाराजा !
आपण प्रजेच्या हितासाठी असा एक वत्स (बछड़ा) बनवा ज्याच्यावरील वात्सल्याने मी त्या
औषधींना दुग्धरूपात काढू शकेन .
समां च कुरु सर्वत्र येन क्षीरं
समन्ततः ।
वरौषधीबीजभूतं वीर सर्वत्र भावये ॥
८१ ॥
आपण
मला सर्वत्र समतल करावे ज्यामुळे मी उत्तमोत्तम औषधींचे बीजरूप दुग्ध सर्वत्र
उप्तन्न करू शकेन .
पराशर उवाच
तत
उत्सारयामास शैलान् शतसहस्रशः ।
धनुष्कोट्या
तदा वैन्यस्तेन शैला विवर्धिताः ॥ ८२ ॥
श्रीपराशरजी म्हणाले - तेव्हा महाराज पृथुने
आपल्या धनुष्यबाणाने शेकडो - हजारों पर्वत उखडून त्यांना एका स्थानी एकत्रित केले .
न हि पूर्वविसर्गे वै विषमे
पृथिवीतले ।
प्रविभागः पुराणां वा ग्रामाणां वा
तदाभवत् ॥ ८३ ॥
त्या पुर्व पृथ्वी समतल नसल्याने पुर आणि ग्राम
आदिचा कोणताही नियमित विभाग नव्हता .
न सस्यानि न गोरक्ष्यं न कृषिर्न
वणिक्पथः ।
वैन्यात्प्रभृति मैत्रेय
सर्वस्यैतस्य सम्भवः ॥ ८४ ॥
हे मैत्रेया ! त्याकाळी अन्न, गोरक्ष, कृषि आणि
व्यापाराचा देखिल कोणताही क्रम नव्हता. हे सर्व त्या वेनपुत्र पृथुच्या काळापासून
आरंभ झाले .
यत्र यत्र समं त्वस्या
भूमेरासीन्नराधिपः ।
तत्र तत्र प्रजाः सर्वा निवासं
समरोचयत् ॥ ८५ ॥
हे द्विजोत्तमा ! जिथे-जिथे भूमि समतल होती तिथे
तिथे प्रजेने निवास करणे पसन्द केले .
आहारः फलमूलानि प्रजानामभवत्तदा ।
कृच्छ्रेण महता सोऽपि
प्रणष्टास्वोषधीषु वै ॥ ८६ ॥
त्या काळापर्यंत प्रजेचा आहार केवळ फळ-मूळादि हाच
होता, आणि
तोही औषधींच्या नष्ट होण्यामुळे अतिशय दुर्लभ झाला होता .
स कल्पयित्वा वत्सं तु मनुं
स्वायम्भुवं प्रभुम् ।
स्वपाणौ पृथिवीनाथो दुदोह पृथिवीं
पृथुः ।
सस्यजातानि सर्वाणि प्रजानां
हितकाम्यया ॥ ८७ ॥
तेनान्नेन प्रजास्तात
वर्तन्तेऽद्यापि नित्यशः ॥ ८८ ॥
तेव्हा पृथ्वीपति पृथुने स्वायम्भुवमनुला वासरू
बनवून आपल्या हातानेच पृथवीपासून प्रजेच्या हितासाठी समस्त धान्यांचे दोहन केले.
हे तात ! त्याच अन्नाच्या आधारे आज देखिल प्रजा जीवित राहात आहे .
प्राणप्रदाता स पृथुर्यस्माद्भूमेरभूत्पिता
।
ततस्तु पृथिवीसंज्ञामवापाखिलधारिणी ॥
८९ ॥
महाराज पृथुंनी प्राणदान केल्याने ते भूमिचे पिता
झाले* म्हणून त्या सर्वभूत धारिणीला "पृथ्वी" नाव मिळाले .
ततश्च देवैर्मुनिभिर्दैत्यै
रक्षोभिरद्रिभिः ।
गन्धर्वैरुरगैर्यक्षैः
पितृभिस्तरुभिस्तथा ॥ ९० ॥
तत्तत् पात्रमुपादाय तत्तद्दुग्धं
मुने पयः ।
वत्सदोग्धृविशेषाश्च तेषां
तद्योनयोऽभवन् ॥ ९१ ॥
हे मुने ! त्यानंतर देवता, मुनि, दैत्य, राक्षस, पर्वत, गन्धर, सर्प , यक्ष आणि
पितृगण आदिंनी आपआपल्या पात्रात अपल्या अभिमत दुधाचे दोहन केले तथा दोहन करणार्यांच्या
अनुसार त्यांचे सजातीयच दोग्धा आणि वत्स आदि झाले .
सैषा धात्री विधात्री च धारिणी पोषणी
तथा ।
सर्वस्य जगतः पृथ्वी विष्णुपादतलोद्भवा
॥ ९२ ॥
म्हणून भगवान विष्णुच्या चरणांपासून प्रकट झालेली
ही पृथ्वी सर्वांना जन्म देणारी, निर्माण करणारी तथा धारण व पोषण करणारी आहे .
एवं प्रभावः स पृथुः पुत्रो वेनस्य
वीर्यवान् ।
जज्ञे महीपतिः पूर्वं
राजाभूज्जनरञ्जनात् ॥ ९३ ॥
अशाप्रकारे पूर्वकाळी वेनपुत्र महाराज पृथु
प्रभावशाली आणि वीर्यवान झाले. प्रजेचे रंजन केल्या कारणाने त्यांना 'राजा' नाव मिळाले .
य इदं जन्म वैन्यस्य पृथोः सङ्कीर्तयेन्नरः
।
न तस्य दुष्कृतं किञ्चित्फलदायि
प्रजायते ॥ ९४ ॥
जो मनुष्य महाराज पृथुच्या ह्या चरित्राचे कीर्तन
करतो त्याचे कोणतेही दुष्कर्म फलदायी होत नाही .
दुस्स्वप्नोपशमं नृणां
शृण्वतामेतदुत्तमम् ।
पृथोर्जन्म प्रभावश्च करोति सततं
नृणाम् ॥ ९५ ॥
पृथुचा हा अत्युत्तम जन्म वृत्तान्त आणि त्यांचा
प्रभाव ते ऐकणार्या पुरुषांची दुःस्वप्न कायमसाठी शान्त करतो .
“इति
श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे त्रयोदशोऽध्यायः”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा